अकादमी... १ , अकादमी... २ , अकादमी... ३ , अकादमी... ४ , अकादमी... ५ , अकादमी... ६
***
पैलेस चा पहिला दिवस मला आजही आठवतो "इंडक्शन डे", आधीच्या भागात सांगितल्याप्रमाणे सकाळी सहाला आम्हाला बी एन चौधरी उर्फ़"बड़े उस्तादजी" नावाचा कर्दनकाळ भेटला होता , तो सतत का कावलेला असतो हे आम्हा वयाने बारक्या अन सिविलियन पोरांस न उलगडलेले कोड़े होते बाकी पुढे एक समजले होते कोणाचे काही चुकले नसेल तर बड़े उस्तादजी देव माणुस. रनिंग करताना कोण मागे पड़तो त्याला मोटीवेट कसे करायचे ट्रूप कितीवेळ ड्रिल (परेड लेफ्ट राईट वाला) केली की लैक्स होतो मग त्याला कितीवेळ रेस्ट द्यायची ह्याचे ज्ञान त्याला अगाध होते. तर, पहिल्यादिवशी झाला तो ओळख सोहळा, ओळख माणसे ते फायरिंग रेंज अन हॉस्टेल ते अकैडेमिक ब्लॉक सगळ्यांची. माणसात सर्वात मोठे अकादमी अद्जुडेंट साहेब, आय.जी विरूपाक्ष शास्त्री उर्फ़ व्हीएस सर प्रॉपर कर्नाटक चे, नंतर डेप्युटी अद्जुडेंट डीआयजी विक्रम सिंह हे राजस्थानी राजपुत, डीआयजी मैथ्यू वर्घीस हे केरळ चे, सीएमओ डॉक्टर मेजर राजेंद्र कुलकर्णी, एमबीबीएस, बीजेएमसी, एमएस ऑर्थोपेडिक्स अन स्पेशलाइजेशन इन ट्रॉमा एएफएमसी पुणे (पुढे हा इसम ठार वेडा होता हे कळले अन आम्ही पोरे आजारी पडायची बंदच झालो). ह्या शिवाय श्रीवास्तवजी (मेस मैनेजर), प्रभजोत सिंह तोमर (स्पोर्ट्स इंचार्ज), बड़े उस्तादजी, अन त्याच्या बरोबर उस्ताद विष्णु गुरुंग, उस्ताद गुल मोहम्मद, उस्ताद जागीराम मीणा, उस्ताद राम शर्मा, अन उस्ताद अलोक सोलंकी हे अनुक्रमे अल्फ़ा,ब्रावो,चार्ली,डेल्टा,इको ह्या कम्पनीज चे उस्ताद होते सगळे हुद्द्याने सुभेदार होते. अन बड़ा उस्ताद सुभेदार मेजर. ही सर्व मंडळी कैंपस वरच असलेल्या स्टाफ क्वार्टर मधे राहत असे, अन काहीही प्रॉब्लम असल्यास फ़क्त ह्यांच्याशीच बोलायचे असा आम्हाला स्ट्रिक्ट निर्देश होता, बाकी काही सिविलियन प्रोफेसर लोकं काही कायदेविषय शिकवायला येणार होते ते काही परमानेंट नसत. आम्हा 35 लोकांना ट्रेनिंग पुरते 5 कम्पनीज मधे वर सांगितल्याप्रमाणे विभागले होते. मी अन पुनीत डेल्टा कंपनी ला होतो मोसाय चार्ली ला अन सरदार गिल ब्रावो कंपनी ला होता. आज पहिला दिवस होता सो aclamatization साठी आम्हाला मोकळे सोडले होते पण त्या आधी प्रत्येक कंपनी ने आपल्या उस्तादजी सोबत चहा प्यायचा कार्यक्रम होता. मी अन पुनीत निमुट शर्मा उस्तादजी जवळ जाऊन उभे राहिलो इतर ही आले होते. बाकी 5 लोकांची नावे माहिती नव्हती.आम्ही उभे असतानाच त्या पाचांपैकी एक, हात पैंट च्या खिशात घालुन दीड पायावर उभा होता !! झाले, ते पाहुन शर्मा उस्ताद भड़कला !!! "नाम क्या है तेरा???"
"अमित गौड़ा, मैसुर, कर्नाटक सरssss" पोरगे थरथरत बोलले
"यहाँ क्या घर के खेती में खड़ा है क्या तू!!, अब सारे सातों लोग, जो परेड ग्राउंड के पीछे वाला लैंप पोस्ट है उसे छु कर आएंगे, शूटssss"
काय झाले हे कळायच्या आत आम्ही रिफ्लेक्स एक्शन ने कुत्र्यागत धावत सूटलो होतो!! परत आल्यावर उस्ताद ने फॉल इन करुन "आरामसे" असा आदेश दिला तेव्हा जीव भांड्यात अन शर्मा उस्ताद चे शब्द कानावर पडले होते "तुम आजसे सात जिसम एक जान हो तुम्हारी कंपनी ही तुम्हारा सबकुछ है इससे पहले डेल्टा कंपनी ने बोहोत सुरमा अफसर दिए है वह तरतीब टूटनी नहीं चाहिए, गलती कोई भी करे भुगतना पुरे कंपनी को पड़ेगा !! बात समझमें आई ओ.सीज ssss"
अन नकळत आमच्या तोंडुन सामयिक चीत्कार निघाला "यसsssssसरssssss"
तापलेल्या लोखंडावर घणाचे घाव पडायला, पाती घडायला सुरुवात झाली होती!!!!.
पुर्ण कंपनी ला माइल्ड रगड़ा लागला होता,पण ह्याचमुळे काही चमत्कार ही झाले होते!चहा अप्रतिम लागत होता चवीला अन गौड़ा वर पोरे सॉरी ऑफिसर कैडेट्स (ओ.सीज) रागवली होती तरी त्याला सांत्वनापर साथ ही देत होती!!! जेलिंग अप सुरु झाले होते !!
चहा प्यायल्यावर अकादमी चा एक गाइडेड टूर झाला , महाल एकंदरित भारीच होता मुख्य महालात अद्जुडेँट ऑफिस अन इतर एडम शाखेच्या बैरक्स होत्या त्याशिवाय वेपन्स सिम्युलेटर अन ऑपरेशनल रेकोनिसंस फोटोग्राफी लॅब पण महालातच होती , महालाच्या उत्तरेकडून जी 4 मोठी मैदाने होती त्यात एक परेड ग्राउंड एक आउटडोर ऑब्स्टकल कोर्स , एक जंगल ट्रेल, अन पिटी झोन होता. त्याच्या नेमक्या विरुद्ध दिशेला महालच्या मागल्या दारातून गेल्यास पाणीटाकी अन त्याच्या पुढे न्यू होस्टेल ब्लॉक होता, अन होस्टेल पासुन खाली जराशी खड्यात ऑफिसर्स मेस होती तिच्यामागे किचन अन किचन च्या मागे आवरभिंतीचा एक भाग होता.बाकी पूर्ण दाट जंगल होते!!इतके की ह्या जागेपासुन 8 किमी वर ग्वालियर सारखे शहर आहे ह्यावरच अविश्वास वाटावा!!
ह्या टूर हुन परत आलो ते आम्हाला हॉस्टेल रूम्स अलोट झाल्या होत्या! दोघांना मिळून एक रूम दिली होती पुनीत ला पार्टनर म्हणुन अमित गौड़ाच आला होता , मोसाय अन गिल पार्टनर्स होते माझ्या सोबत एक नाव होते "समीर सांगवान" हरयाणवी पोरगे!!! मी सुचनेबरहुकुम स्टोर्स च्या काउंटर ला गेलो तिथे मला रूम नंबर विचारुन एक रजिस्टर मधे सही करायला लावली अन मग एक बादली एक मग्गा एक सोपकेस 3 अंघोळीचे अन 3 कपड्याचे साबण , दोन बेडशीट्स दोन उश्या काही वह्या पेन अन एक ब्लैंकेट दिले वर "गुम किया तो स्टाइपेंड से काटूँगा" हा दम सुद्धा दिला गेला, मग रूम ची किल्ली दिली , अन मी माझे "घर" न्यू हॉस्टल ब्लॉक कड़े निघालो वाटेत पुनीत भेटला त्याने अन अमित ने सामान लावले होते जागी, तो मला म्हणाला
"बापुसाहब तेरे स्टेट का एक और बन्दा है पूछ रहा था तेरे लिए रूम नंबर 22"
"अबे उससे तो मिलते रहेंगे पहले ये बताओ रूम नंबर 13 कोनसी है!!??"
त्याला विचारेपर्यंत एक खणखणित आवाज आला
"ओये बाऊ जे से रूम नंबर 13!!!"
मी आधी त्याला आमच्याच कंपनी मधे पाहिले होते.
माझा रूम पार्टनर समीर सांगवान, रोहतक, हरयाणा, दिलखुलास माणुस सरळ येऊन गळ्यात पडला
"काक्के के हाल से रे?? आजसे तु अपणा भाई!!" विलक्षण गोरापान चेहरा घारे डोळे अन मिश्किल हसु , ह्या साहेबांनी मला "बापूसाहेब" अख्ख्या 11 महिन्यात दोनच वेळी म्हणले एकदा कोणीतरी फैकल्टी ने रूममेट चे नाव विचारले तेव्हा अन एकदा पास आउट परेड ला भावुक झाल्यावर एरवी आजतागायत माझे नामकरण झाले आहे ते "कक्के"
रूम उघडून आत आलो ते मस्त साफ़ रूम होती प्रत्येकाला एक टेबल,लैंप,अलमीरा,सेपरेट बेड वाटर कूलर इत्यादी जमानिमा होता ज़रा स्पेशल फील करत होतो , मी सैलावुन बसलो होतो समीर त्याच्या कॉट वर होता त्याची अन तेवढ्यात रूम मधे आलेल्या मोसाय अन गिल ची ओळख करुन दिली होती चौघे बोलत होतो तोवर बाहेर एक आवाज आला , अस्सल मराठी बाजाच्या हिंदीत कोणीतरी विचारत होता
"वह 13 नंबर का खोली किदर कु पड़ता है दादा???"
मी मराठीत ओरडलो "या या इकडे असे या खोलीत या"
साधारण 6 फुट ऊंची राकट गव्हाळ वर्ण असा एक पोरगा आत आला
"मी किशोर , किशोर उमरीकर, अहमदनगर चा"
त्याला आत बोलावले व् बसवले त्याची सर्व लोकांशी ओळख करुन दिली ,नव्या मैत्री जुळत होत्या दुसऱ्या दिवशी पासुन त्या घट्ट होणार होत्या!! काही कुरकुरी होऊन शेवटी भट्टी जमणार होती.
हसत खेळत गप्पा सुरु होत्या तोवर एक अशी गोष्ट झाली जिचा आम्ही अख्खे 11 महीने नंतर धसका घेतला होता!! ते म्हणजे कर्कश्य "फॉलइन विस्सल" चा आवाज!!! धडपडत धावत आम्ही सारे होस्टेल च्या पुढे फॉल इन झालो, तेव्हा बड़े उस्तादजी बोलले
"एक लाइन से सभी आदमी अकादमी बार्बर शॉप पे जाएंगे बाल कटवाएंगे और उसके बाद 1230 hrs तक फ्रेश होकर ऑफिसर्स मेस में मिलेंगे, याद रहे मेस में कोई चप्पल सैंडल पहनके पयजमा पहनके नहीं आएगा, वरना रगड़ा परेड होगी पुरे परेड ग्राउंड के 20 चक्कर पुरे गुनहगार कंपनी को, क्लियर?"
"यसssss सरssss"
बार्बरशॉप चा मालक दुनिराम हा अजब मशीनी नमूना होता !! एका पोराची कटिंग तो सरासरी 40 सेकंदात करत होता अर्थात तिथे स्टाइल्स नव्हत्याच!! खुर्चीत बसले की कापड लावायचे जीरो मशीन परजायची अन तीन पट्टयात डोक्यावर जावळ अन बाजुने टक्कल ! काम खत्म!! 20 मिनट्स मधे 34 ओसी "डोक्याने रिकामे" झालेले होते!!! सगळे फरक गळून पडले होते बार्बर शॉप च्या जमीनीवर राठ, काळे, भुरकट, पिंगट, लांब, कुरळे !! एकतेची भावना "ड्रेसिंग शिस्त" मधुन येते हा अविष्कार त्या दिवशी झाला होता!! सगळेच सारखे! 34 चमनगोटे वजा एकटा अंगद सिंह गिल !!!
रूम वर येऊन सामयिक बाथरूम कड़े पळालो आम्ही, अन्हिके आटपुन मेस ला हजर! मेस मस्त होती ! विशाल हॉल त्यात भिंतींवर आमच्याच फ़ोर्स च्या काही अधिकाऱ्यांच्या तसबीरी, फ्लॅग, आडवे करुन लावलेले भाले तलवारी इत्यादी, उत्तम शिसवी टेबल्स. "पहला खाना" साठी निर्दिष्ट जागेवर अद्जुडेंट पासुन सगळे स्थानापन्न झालेले अन एक घोषणा झाली,
"पुरे डिसिप्लिन के साथ बिना प्लेट चम्मच बजाये यहाँ खाना होगा, ये सिर्फ मेस नहीं है ये ट्रेडिशन है, सबको परोसने के बाद ही खाना शुरू होगा, कोई शक???"
"नोsssssसरsssss"
त्या शिस्तीपासुन जी एक "गरमा गरम" खायची सवय मोडली ती मोडलीच!!! आजही बायको च्या गरम शिव्या खातो पण अन्न गरम नाही!! सगळ्यांना वाढल्याशिवाय नाही! अन वचावचा तर मुळीच नाही!!.
प्रतिक्रिया
30 Mar 2015 - 8:26 am | श्रीरंग_जोशी
क्या बात है. सगळे चित्र डोळ्यांसमोर स्पष्ट उभे राहिले.
डॉक्टरचे वर्णन वाचून प्रहार चित्रपटातला पोटदुखीच्या उपचाराचा प्रसंग आठवला.
फौजी मालिका अन प्रहार, मेजर साब, लक्ष्य या चित्रपटांमधून लष्करी प्रशिक्षणांचे जे चित्रण केले आहे ते वास्तवाच्या किती जवळ आहे असे तुम्हाला वाटते?
पुभाप्र.
30 Mar 2015 - 8:50 am | कैलासवासी सोन्याबापु
प्रहार अन लक्ष्य एक्यूरेट आहेत आर्मी च्या बाबतीत
प्रहार मधे जे प्रशिक्षण दाखवले आहे ते बेळगाव ला होते , पॅराकमांडोज ट्रेनिंग असते ते भयंकर खडतर असते ते
30 Mar 2015 - 9:09 am | श्रीरंग_जोशी
प्रहार अन लक्ष्य दोन्हीमध्ये नाटकीपणा जाणवत नाही.
मेजर साब प्रदर्शित झाल्यावर एनडीएच्या अधिकार्यांनी आक्षेप घेतल्याची बातमी वाचली होती.
30 Mar 2015 - 9:13 am | कैलासवासी सोन्याबापु
मेजरसाब शुद्ध च्युगिरी आहे!!! कुठला ही वरिष्ठ अधिकारी सीमेवर आपली बायका पोरे आणून भारत मातेची मूर्ति स्थापन करुन गाणी गात नसतो!!! लक्ष्य चे शूटिंग मात्र खुद्द आर्मी चे सर्वोच्च ट्रेनिंग इंस्टिट्यूट उर्फ़ इंडियन मिलिट्री अकादमी ला झाले आहे त्या साठी ह्रितिक रोशन सहा महीने तिथे राहुन् ट्रेनिंग घेऊन बसला आहे!
30 Mar 2015 - 9:13 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तं. एक विचारतो. ह्या ज्या अल्फा, डेल्टा कंपनीज असतात त्यामधे त्यांच्या नावाप्रमाणे काही स्पेशल टास्क असते का? म्हणजे अल्फा कंपनीज मधे स्नायपर्स, डेल्टा कंपनीमधे स्पेशल टास्क फोर्स वगैरे?
30 Mar 2015 - 9:16 am | कैलासवासी सोन्याबापु
नाही नाही असे काही नसते its just an routine specialization is decided once you passout of the academy based on your performances during training And then u r directed for respective specilist training
30 Mar 2015 - 9:18 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
वोक्के. :)...पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
30 Mar 2015 - 9:25 am | नाखु
सरस.
पुलेप्र.
30 Mar 2015 - 10:00 am | चिनार
लय भारी ! वाचताना मजा येते आहे !
चालू द्या
30 Mar 2015 - 10:12 am | निशदे
हादेखील भाग आवडला
""(पुढे हा इसम ठार वेडा होता हे कळले अन आम्ही पोरे आजारी पडायची बंदच झालो). ""
""दुसऱ्या दिवशी पासुन त्या घट्ट होणार होत्या!! काही कुरकुरी होऊन शेवटी भट्टी जमणार होती.""
या गोष्टी पुढे सांगायला मात्र विसरू नका. पुभाप्र.
30 Mar 2015 - 10:38 am | बॅटमॅन
अरे क्या बात है....पिच्चर बघितल्यागत वाटले एकदम. लैच भारी.
30 Mar 2015 - 11:51 am | अन्या दातार
मस्त लेखमाला.
30 Mar 2015 - 11:27 am | झकासराव
भारी :)
30 Mar 2015 - 11:31 am | आदूबाळ
वाचिंग!
30 Mar 2015 - 11:33 am | आदूबाळ
माझ्या अंदाजाप्रमाणे ही BSF ची टेकनपूर अकादमी आहे, रैट?
30 Mar 2015 - 11:57 am | कैलासवासी सोन्याबापु
नोप्स, पण जर आपणास टेकनपुर माहिती आहे तर "हिमवीर" पण माहितीच् असतील!!! आता हॉट झोन मधुन बाहेर आल्यामुळे इतके तरी बोललो!! ;)
30 Mar 2015 - 2:38 pm | आदूबाळ
आह... आलं लक्षात!
30 Mar 2015 - 12:25 pm | आतिवास
एका नव्या जगाची ओळख- मस्त!
30 Mar 2015 - 1:52 pm | अजया
आज मिपा सुरु झालं आणि भाग २ बघुन लगेच वाचायला घेतला!मस्त लिहिताय.पुभाप्र.
30 Mar 2015 - 2:11 pm | सुबोध खरे
मुळात तुम्ही मेडिकल ऑफिसर म्हणून अकादमी मध्ये रुजू झालात कि तुमचे बौद्धिक घेतले जाते. शक्य असेल तितके वैद्यकीय रजा वगैरे देऊ नका.ताबडतोब इलाज करून परत पाठवा इ इ.
हात दुखतो पाय दुखतो अशा तक्रारी १०० % लोकांना सुरुवातीला होतात( एवढ्या व्यायामाची सवय नसते). त्यातून होम सिकनेसमुले मुलं हळवी झालेली असतात पण अशावेळेस कर्तव्य कठोर व्हावेच लागते. तुम्हाला कितीही वाईट वाटत असेल तरीही. त्यातून एखादा डॉक्टर जर मऊ हृदयाचा असला कि त्याचा लागलीच गैरफायदा घेतला जातोच. (कॅडेट अनुभवाने शहाणे झालेले असतातच आणि नको असलेले वर्ग कसे टाळायचे याच्या वगवेगळ्या कल्पना त्यांच्या सुपीक डोक्यातून निघत असतात).
माझा मित्र नौदलाच्या अकादमीचा मेडिकल ऑफिसर होता त्याच्याकडे आळशी आणि कामचुकार असे कॅडेटस वेगवेगळी कारणे घेऊन येत.सुरुवातीच्या आठवड्यात त्याने जरा सढळ हाताने रजा दिल्या तेंव्हा दोन दिवसात एका कॅडेट ने डॉक्टरला कसा चु ** बनवला हे आपसात बोलताना ऐकवले. दोन दिवसांनी तोच कॅडेट परत पाय मुरगळला म्हणून "लंगडत" आला असताना त्याला तपासून सांगितले कि तुझ्या घोट्याचे तणावे फाटले आहेत आणी त्यासाठी तुला मुंबईला आश्विनी रुग्णालयात जाऊन एम आर आय करावा लागेल आणी एखादे वेळेस शल्यक्रिया सुद्धा लागेल. या वर तो कॅडेट टरकला आणी त्याने थापा मारल्याची कबुली दिली. याबद्दल त्याला अकादमीच्या प्रमुखाकडे तक्रार करू म्हटल्यावर तो एकदम गयावया करू लागला. माझ्या मित्राने त्याला एकाच शिक्षेवर सोडण्याचे कबुल केले. ती म्हणजे स्वागत कक्षात एका मोठ्या दोनशे पानी वहीवर I AM A SHAMMER. I AM SORRY FOR THAT असे मोठ्या ( कॅपिटल) अक्षरात प्रत्येक पानाच्या प्रत्येक ओळीवर लिहून वही भरून काढायची. प्रत्येक पानावर ३० ओळी असल्यातर जवळ जवळ साडेपाच हजार वेळा असे कॅपिटल अक्षरात लिहून त्याच्या हाताला घट्टे पडले, कमरेचा काटा ढिला झाला आणी डोक्याचा पार भुगा झाला. त्यातून येणाऱ्या जाणार्या प्रत्येक कॅडेटला ते दिसत होते. प्रत्येक ओळखीच्या कॅडेटला त्याला राम कहाणी सांगायला लागत होती. हाच कॅडेट जेंव्हा संध्याकाळी परत गेला तेंव्हा त्याचा पाय पूर्ण "बरा" झाल्याने पळत आपल्या बराकीत गेला. नौदलाच्या अकादमीत कोणत्याही कॅडेटला "चालत" जाण्याची परवानगी नाही. कुठूनही कुठेही जाताना "पळतच" गेले पाहिजे हा शिरस्ता आहे. कॅडेट वैद्यकीय कारणाशिवाय चालत जाताना दिसला तर शिक्षा होते.
यामुळे मित्राची कीर्ती पूर्ण अकादमीत "क्रेझी डॉक्टर " म्हणून पसरली. परंतु हात दुखतो पाय दुखतो पोट दुखते अशा सर्व तक्रार करणाऱ्या कॅडेटचे आजार आपोआप बरे होऊ लागले.
लष्करातील सर्वच प्रशिक्षण केंद्रातील डॉक्टरांचे अनुभव असेच असतात. आणी जर मऊ हृदयाचा डॉक्टर असेल तर मोठ्या परेड किंवा कॅम्पच्या अगोदर अशा तक्रारी चक्रवाढ तर्हेने वाढतात असा "अनुभव" आहे
30 Mar 2015 - 2:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
यु nailed इट डॉक्!!!! आम्हाला आमचा डॉक् सरळ बोलला होता "तुम्ही लेको मला लॉलीपॉप देऊन हळूच टुच्च करणारा डॉक्टर समजत असाल तर क्लियर योर माइंड्स!!! तुम्ही इथे फाइटिंग मशीन्स व्हायला आला आहात!!! अन मी ह्या मशीनीचा मैकेनिक!! तेल पाणी करेन ठिगळ् लावेन पण तुम्हाला धावते ठेवन!!! एकसाथ लाइन तोड़sssss"
:D
30 Mar 2015 - 3:20 pm | मोहनराव
खणखणीत सुनावनी!! ;)
30 Mar 2015 - 2:13 pm | अभिरुप
मनाच्या जवळची लेखमाला. तुमचे लिखाण नेहमीच वाचनीय असते त्यामुळे ही मालिका सुद्धा सुंदरच होइल याची खात्री आहे.रच्याकने ही अकादमी आयएमए नाही ना?कारण ती डेहराडूनला आहे आणि तुमची ग्वालियरला...आणि हा काळ नेमका कोणत्या दशकातील आहे?
30 Mar 2015 - 2:50 pm | कैलासवासी सोन्याबापु
दशक कसले हो आत्ता दहा-अकरा साल ची गोष्ट!!!! तरणा आहे मी अजुन :P
30 Mar 2015 - 2:21 pm | मोदक
वाचतोय..!!!
भारी लिखाण.
30 Mar 2015 - 3:24 pm | आनंदराव
बापू,
जबराट राव.
लैयच भारी म्हणतो.
आणि डॉ.खरे नी सांगितलेला किस्सा लाजवाब.
चालू द्या !
30 Mar 2015 - 3:45 pm | अत्रन्गि पाउस
भोसला मिलिटरी स्कूलच्या उन्हाळी वर्गाला गेलो होतो त्याची आठवण झाली ...
आर्मी लाईफ हे आपले काम नव्हे हे पासिंग औट परेड च्या आदल्या रात्री सुमारे ३०-४० जणांनी एकमेकांचा निरोप घेतांना एकमेकांना सांगितले
वा बुवा !!!
पुलेशु ...
30 Mar 2015 - 3:48 pm | नितीन पाठक
चला तर, ट्रेनिंग मध्ये आमचा गाववाला (अहमदनगर) भेटला तर ......
लेखमाला एकदम मस्त. आवडली.
30 Mar 2015 - 4:25 pm | विशाल कुलकर्णी
जबरी बे ह्यो भाग बी.. , लै भारी राव :)
30 Mar 2015 - 7:06 pm | पिलीयन रायडर
मस्त!! लिहीत रहा!!
30 Mar 2015 - 7:22 pm | जेपी
वाचतोय. मस्त चाललय.
30 Mar 2015 - 7:26 pm | कैलासवासी सोन्याबापु
मित्रहो अकादमी भाग ३ प्रकाशित केला आहे! _/\_
30 Mar 2015 - 7:29 pm | यशोधरा
मस्त! वाचतेय.
30 Mar 2015 - 7:36 pm | यशोधरा
आणि प्लीज मागच्या भागाच्या लिंक्स देत जाल का?
30 Mar 2015 - 7:43 pm | कैलासवासी सोन्याबापु
अहो मी मिपा चे एंड्रॉइड एप्प वापरतो आहे इथे मोबाइल मधे युआरएल कुठे शोधु एप्प मधे?? ते काही माला सुधरना!!! नाहीतर हाइपरलिंक एम्बेड केलीच असती :(
30 Mar 2015 - 7:49 pm | श्रीरंग_जोशी
पण त्याच चतुरभ्रमणध्वनीवरून ब्राउझरमधून मिपावर प्रवेश केल्यास ही समस्या सहज दूर होईल.
वाचकांच्या सोयीसाठी तीनही भागांचे दुवे -
30 Mar 2015 - 7:57 pm | कैलासवासी सोन्याबापु
हे बेस्ट आहे!!!!
30 Mar 2015 - 7:53 pm | यशोधरा
बरं बरं. असूद्यात. शोधून वाचले ३ ही भाग. धन्यवाद मस्त लिखाणाबद्दल आणि वाचायला दिल्याबद्दल. :)
30 Mar 2015 - 11:59 pm | खटपट्या
ज - ब - री
1 Apr 2015 - 11:19 am | सिरुसेरि
वरील सर्व प्रतीसादांशी सहमत . अजुन एक सहज सुचवावे असे वाटते ते म्हणजे - तुमची अकादमी , आमए , मर्चंट नेवी व अशाच प्रकारच्या कोणकोणत्या संधी आहेत . व त्यासाठी तयारी कशी करावी , कोणत्या training institues यांसाठी चांगल्या आहेत . या सर्व संदर्भातील तुमचे विचार , तुमची मते व तुमचे अनुभव हे सुद्धा सर्वांना नंतर वाचायला आवडतील व उपयोगी ठरतील .