सकाळी ली क्वान युंचे देहावसान झाल्याचे वृत्त कानी आले. बंड्याला त्याच्या वॉसप वर लिहिलं, 'शनिवार रविवार उंडारुन झालं, आज पुन्हा सोमवारी सुटी!'
बंड्याचा दोन मिनिटांनी थंड प्रतिसाद. 'कसली सुट्टी?'
अरे! एवढा मोठा नेता गेला आणि सुट्टी नाही? हां, बरोबर; अंतिम संस्कार उद्या असतील, सुट्टी उद्या देतील. पाच मिनिटांनी उत्तर आलं, 'मला काम आहे. तुलाही असावं अशी माफक अपेक्षा आहे. संध्याकाळी बोलु आरामात'. अरे देवा! काय हा माणुस की काय? सुट्टी नसल्याचं काहीच सोयर सुतक नाही? साधा माझ्यापाशी खाजगीत निषेधही नाही? असो. संध्याकाळी बघु.
सोमवार असूनही रस्त्याला गर्दी बेताची होती, अवघ्या एका तासात घरी आलो. आल्यावर खादाडी, चहा आणि लगोलग बंड्याला वॉसप संदेश. हरामखोरा, स्काईप वर ये
पाच मिनिटात बंड्या स्काईप वर.
हं. मग आज काय काय झालं?
कुठे काय?
अरे, ली क्वान ना गेला आज? मग शोकसभा, सर्वत्र बंद, रस्त्यावर क्रिकेट, हातात झेंडे (आणि बरच काही) घेउन 'ए *******, बघतो काय शटर टाक खाली....... कुठे एखादी उघडी टपरी लुटुन फोकटमे थंडा वगैरे
नाही. इथे तस काही नसतं.
ह्यॅ. अस कसं? किमान रस्ते तरी वाहतुकीला बंद केले असतील. एमारटी च्या रुळावर कार्यकर्ते बसले असतील. 'रिक्स' घेउन जनसेवा करणारे टॅक्सीवाले 'चाउ चे काँग ५० डॉलर सीट' बोंबलत असतील. रस्त्यांवर सर्वत्र 'जब तक सूरज चांद रहेगा, ली भाऊका नाम रहेगा' चे बॅनर झळकत असतील. अंत्यसंस्कारासाठी वाहिन्यांनी क्यामेरे आगाउ लावले असतील. सगळ्या शहरभर एल सी डी वर त्यांचे जीवनपट दाखवले जात असतील.
अरे बोल ना गाढवा, मी आपला उत्साहाने विचारतोय आणि तुझ लक्ष त्या स्क्रीनवर. कोण ट्वाळ-ट्वळ्या आल्या आहेत?
हॅ. काय उगाच टीपी लावलाय, इथे अस काहीच नसत. कॅमेर्याकडे ढुंकुनही न पाहता आपल्या उद्योगा पासून अविचल असलेला बंड्या कोरडेपणानं बोलला.
काहीच नाही?
का रे, शेवटी कुठच्या तो हॉस्पिटलात होता? तुमच्याकडे सगळ्या इमारती काचबंद! मस्त राडा झाला असेल, काचांचा खच. पेशंट सलाइन सकट कल्टी, अॅम्ब्युलन्सच्या टाकीतलं डिजेल त्याच गाडीवर. लगाव माचीस.
सोड ना. कशाला पकवतोस? अस काहीच नव्हतं. लोकांनी आपापला शोक व्यक्त केला. म्हातारे कोतारे हळ्हळले. लोकांनी पदपथावर पुष्पगुच्छ ठेवले, ते ही रांगा लावुन. आता आपला पुढचा प्रवास कसा होणार ही चिंता काहींनी व्यक्त केली. बाकी सर्व सुरळीत आहे.
छ्या! आपला तर सगळा ईट्रेष्ट्च संपला. आयला या गावाचं खर नाही. लोकशाही कशाशी खातात हे यांना समजलच नाही.
प्रतिक्रिया
23 Mar 2015 - 10:50 pm | हाडक्या
:)
(आपल्या सकल सामाजिक दांभिकतेची जाणीव आणि चीड असलेला )
24 Mar 2015 - 6:55 am | कैलासवासी सोन्याबापु
आमच्याकडे मात्र कोणाच्या मयताला किती दिवस बंद,डीडी वन ला दिवसभर शास्त्रीय संगीत मसन यात्रेत किती गर्दी ह्यावर साहेब किती 'लोकप्रिय' हे ठरते!!!
Thats our style!!!
जाता जाता
येनारआय बंड्या मातृभूमी इसरला बहुतेक ;)
24 Mar 2015 - 8:07 am | अर्धवटराव
या लोकांना लोकशाही म्हणुन काहि कधि कळणारच नाहि.
इथे अंतयात्रेच्या नावाने हि बोंब, मग पत्नि/मुलाला निवडणुक तिकीट, स्मारकाचा वाद वगैरे भानगडी कुठुन येतील.
छ्या.. काय मजा नाय.
24 Mar 2015 - 9:29 am | यसवायजी
ग्रेट माणूस. RIP. _/\_
अवांतर-
मुलाला तिकीट- Lee Hsien Loong.
काल दिवसभर तिथल्या लोकल चैनलवर म्हणे दाखवत होते की, पूर्वी किती खराब परिस्थीती होती आणि या महान व्यक्तीने ३० वर्षात कुठे नेलं देशाला.
24 Mar 2015 - 10:20 am | सस्नेह
बलिवर्द्नेत्रभंजक ..!
24 Mar 2015 - 10:34 am | वेल्लाभट
हा हा
खरं आहे....
पण बरं आहे.
24 Mar 2015 - 10:38 am | हेमन्त वाघे
http://www.loksatta.com/sampadkiya-news/founder-of-modern-singapore-lee-...
आपल्या कुटुंबकबिल्यातच सत्ता राबवल्याचा त्यांच्यावर आरोप होत असे आणि तो रास्तही होता. परंतु तसे म्हणणाऱ्यांना त्यांनी तुरुंगात डांबले. तरीही सत्य पुरून उरतेच. ते म्हणजे त्यांचा एक मुलगा सिंगापूरचा विद्यमान पंतप्रधान. दुसरा सिंगापूर नागरी हवाई खात्याचा प्रमुख. पंतप्रधानपुत्राची पत्नी हो चिंग हे तामासेक या बलाढय़ वित्तसंस्थेची प्रमुख. कन्या डॉ. ली िलग हे त्या देशाच्या एका वैद्यक सेवेची प्रमुख अणि स्वत: ली यांच्याकडे पंतप्रधानपद सोडल्यानंतरही मंत्र्यांचा मार्गदर्शक हे पद. या सगळ्यामुळे घराणेशाहीचा आरोप झाला तर ते म्हणत: मी गुणवान असल्यामुळे माझी संततीही गुणवानच असणार. शुभ्र घोडा-घोडीच्या पोटी काळा घोडा कसा निपजेल?
24 Mar 2015 - 11:25 am | टवाळ कार्टा
अश्या घराणेशाहीमुळे जे रिझल्ट मिळाले आहेत तसे असेल तर पुढची ५० वर्षे द्या भारत त्यांच्या हातात...बो*वर फटके मारून सरळ करेल सगळ्यांना
24 Mar 2015 - 10:38 am | एस
मार्मिक!
24 Mar 2015 - 2:27 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मार्मिक रे सर्वसा़क्ष्या.आपल्या येथे मोठा नेता खपला की खूप गोंधळ घालायची सवय आहे.'अमर रहे अमर रहे,परत या परत या...."
शोक व्यक्त करायलाही काही मर्यादा हव्यात.
24 Mar 2015 - 3:03 pm | डॉ सुहास म्हात्रे
ली क्वान यू हे सर्वार्थाने जनहितेच्छु नेता होते. सत्तेच्या सुरुवातीच्या काळात अगदी "हुकूमशाह" आणि "कम्युनिस्ट" या पाश्च्यात्य राष्ट्रांनी देऊ केलेल्या बिरुदांची पर्वा न करता त्याने सिंगापूरच्या उत्थानासाठी अथक प्रयत्न केले. दुसर्या महायुद्धाच्या अखेरीपर्यंत सिंगापूर एक गरीब झोपाळू मासेमारी खेडेगाव होते. १९५९ मध्ये ब्रिटिश सत्तेपासून स्वतंत्र झाल्यानंतर केलेल्या १९६३-६५ या काळातल्या मलेशियाच्या संयुक्त राज्याच्या प्रयोगाच्या अपयशानंतर, सिंगापूरला मलेशियन संघाने बाहेर काढले. त्या नामुश्कीच्या खडतर कालखंडातून बाहेर काढून ली ने सिंगापूरला केवळ दोनच दशकांत फक्त मलेशियाच नाही तर सर्व जगाने असूया करावे असे सधन आणि सुशासित लोकशाही राष्ट्र बनवले.
हे सर्व करताना निस्वार्थी आणि निष्कलंक राजकारण म्हणजे काय याचा एक वस्तूपाठच त्याने सर्व जगाला दिला. हा वस्तूपाठ जगातल्या सर्वोत्तम समजल्या जाणार्या व्यवस्थापन विश्वविद्यापीठांत आणि महाविद्यालयांत शिकवला जातो.
जगातिल सर्वात जास्त काळ (१९६५ - १९९०) पंतप्रधान राहिलेल्या या नेत्यावर भ्रष्टाचाराचा एक लहानसा डागही नव्हता. इतका मोठा काळ अगदी विवादास्पद असणे वास्तवात शक्य नव्हते पण स्वतःच्या, नातेवाईकांच्या अथवा कुटुंबाच्या फायद्यासाठी ली ने आपल्या स्थानाचा फायदा उठवला असे त्याचे विरोधकही म्हणू शकत नाही.
ली च्या राजकारणाचा एक फार मोठा गुण म्हणजे त्याने व्यक्तीपूजेला पूर्ण फाटा दिला... जे जगातल्या अनेक महान विभूतींना आणि त्याच्या अनुयायांना करणे शक्य झालेले नाही. आज ली च्या मृत्युनंतर, जनमानसात अतीव श्रद्धा असूनही, सिंगापूरमध्ये मोठा गाजावाजा करून भावनेचे बिभत्स प्रदर्शन केले जात नाही, हे ली ने शिकवलेली तत्वे सिंगापूरच्या धानीमनी खोलवर रुजलेली आहे याचेच सुखद दर्शन आहे... ली ला यापेक्षा मोठी श्रद्धांजली ती काय असू शकते ?!
सद्यकाळातल्या एका खर्या जनहितेच्छु नेत्याचे निर्वाण झाल्याबद्दल मनापासून शोक आहे...
ली क्वान यू यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
25 Mar 2015 - 2:45 am | बहुगुणी
परवाच्या न्यूयॉर्क टाईम्स मध्ये ली क्वान यू विषयी वाचनीय मृत्यूलेख आहे.
25 Mar 2015 - 11:14 am | अरुण मनोहर
बाकी हे वाचून मौज वाटली..
एमारटी च्या रुळावर कार्यकर्ते बसले असतील.
असे जर कोणी केले तर सेकंदात कोळसा झालेली बॉडी रुळावर ठेवून तो ली ना भेटायला स्वर्गातच जाईल!
१२०० व्होल्ट्स !
30 Mar 2015 - 10:49 am | स्पंदना
तुलना तर होणारच, पण तरी ही तुलना करावी ती तुल्यबळांची.
अहो डॉक्टर सी ए असलेले नातेवाईक आमचे, निवांत रस्त्यावर कचरा फेकत, कसे वाटेल तसे गाड्या चालवत, स्वतःचीह्च लाल करताना पाहिले की मनापासून आठवण होते एका कागदाच्या कपट्यासाठी ३/३०० डॉलर होणार्या दंडाची. अन ते धोरण राबवलं या माणसानेच.
30 Mar 2015 - 10:52 am | चिनार
मार्मिक !
आवडेश !
30 Mar 2015 - 4:47 pm | पॉइंट ब्लँक
सहि! आपल्याकडं अस काय व्हायची शक्यता लई कमी.