हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या संयत अभिनयाने व नर्मविनोदी भूमिकांनी परिचित "देवेन वर्मा" यांचे आज निधन झाले.
त्यांना विनम्र आदरांजली.
आजच्या ओढून-ताणून विनोदाच्या पार्श्वभूमीवर निखळ विनोदवीरांचे महत्व ठळकपणे समोर येते.
त्यांच्याबद्दल आपल्या काही आठवणी (आवडत्या भूमिका/चित्रपट माहीती असल्यास) या आदरांजलीत समावेश करावी ही
विनंती.
मला त्यांचा "अंदाज अपना अपना" मधील छोटासा रोल पण लक्षवेधी अभिनय आवडला होता.
प्रतिक्रिया
2 Dec 2014 - 12:00 pm | विलासराव
मला त्यांचा "अंगुर" हा सिनेमा आठवला.
2 Dec 2014 - 12:04 pm | स्पंदना
2 Dec 2014 - 12:32 pm | वेल्लाभट
विशेष बघितलेला नाही यांचा अभिनय; किंवा चटकन लक्षात येत नसावा आत्ता.
पण गेल्याचं दु:ख आहेच.
निखळ विनोद दुरापास्त होत चाललाय हे कटुसत्य आहे.
2 Dec 2014 - 1:07 pm | चौकटराजा
आडव्या तिडव्या उड्या न मारताही विनोदाचे दर्शन घडविणारा ! देवन वर्माची खट्टा मीठा तील भूमिका स्मरणीय. सादर
श्रद्धांजली !
2 Dec 2014 - 2:12 pm | भिंगरी
खट्टा मीठा मधील लग्नासाठी आतुरलेला तरुण त्याने छान रंगवला होता.
त्यांना मनापासून श्रद्धांजली!
2 Dec 2014 - 3:09 pm | बोका-ए-आझम
देवेन वर्मा म्हटलं की विनोदी भूमिकाच लोकांच्या डोळ्यासमोर येतात पण अमिताभ बच्चन आणि विनोद मेहरा असलेल्या
बेमिसाल मधली त्यांची गंभीर भूमिकाही अप्रतिम होती. बाकी विनोदी भूमिकांबद्दल तर प्रश्नच नाही. जल महल नावाच्या एका चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिकाही समर्थपणे केली होती
2 Dec 2014 - 3:25 pm | आसुड
रंग बिरंगी....यात फारुख शेख परविन बाबी दिप्ती नवल आणि अमोल पालेकरांसोबत काय धमाल काम केल होत....एक उत्तम कलाकार गेला....फार फार वाईट झालं.
2 Dec 2014 - 10:17 pm | किसन शिंदे
आत्ता या क्षणी इश्कमधला त्यांचा पारसी व्यापारी उभा राह्यलाय.
बर्याचश्या जून्या चित्रपटातला त्यांचा अभिनयही लक्षात राहण्याजोगा..
श्रद्धांजली!
2 Dec 2014 - 10:20 pm | अर्धवटराव
उत्पल दत्त आणि अमोल पालेकरांबद्दल तर बोलायलाच नको, पण देवेन वर्माने देखील आपला छोटेखानी रोल मस्त केला होता.
3 Dec 2014 - 10:15 am | राही
चोरी मेरा काम मध्ये शशी कपूर्हीरो असूनही देवेन वर्माच लक्ष्यात राहिला. (चोरीचा माल लपवण्यासाठी किंवा प्रेताला गाडण्यासाठी) खड्डा खणताना 'एक बार आवजो मारे गामडा' हे गाणे म्हणत त्या तालावर कुदळ मारीत राहातो ते ग्रेट होतं.
3 Dec 2014 - 10:21 am | सौंदाळा
देवन वर्मांना श्रद्धांजली
दिल मधला पोलीस इन्स्पेक्टर आठवतो
तसे अंदाज अपना अपना मधील सलुनवाला (अमीर खानच्या वडीलांचा रोल) मस्तच