ऐका सत्य नारायणाssssची कथा!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
14 Nov 2014 - 2:57 pm

थोडी पार्श्वभूमी....

मी १९९७ पासून हे पौरोहित्याचं काम करायला लागलो..पहिली ४/५ वर्ष ही इतरांच्या हाताखाली तयार होण्यात गेली.पुढे जसजसा या सर्व कर्मकांड आणि धर्माबाबतचा विरोधी मतांचा अभ्यास वाढत गेला..तसतसा मी स्वतः या निष्कर्षाप्रत आलो,की आपल्या जवळ असलेलं हे साधन जनकल्याणाच्या हेतूनी वगैरे जन्माला आलेलं आहे.हा एक लोकप्रीय गैरसमज आहे. महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब अंबेडकरांसारख्यांनी वैदिक धर्मावर/कर्मकांडांवर केलेले आरोप हे आकसापोटी नाहीत..तसेच त्यात परकीय शक्तिंचा हात इत्यादी काहिही नाही. मग त्यांचं(फुले/अंबेडकर..) लेखन कानांना आणि मनाला ऐकायला कितीही वाइट लागो. सावरकरांनी हिंदूधर्मावर केलेल्या शस्त्र-क्रीया तर अत्यावश्यकच होत्या. त्यांनी आमच्या सत्यनारायणाच्या भाकडकथेवरुन सत्यनारायणाला असत्याची पूजा असा समर्पक शब्द वापरलेला आहे. पुढे अं.नि.स.चं डॉ.नरेंद्र दाभोलकर लिहित सर्व साहित्य..आणि अंनिस..च्या इतर कार्यकर्त्यांनी लिहिलेले लेख पुस्तकं वाचून झाली..शाम मानव यांचीही पुस्तकं भाषणं इत्यादी ऐकून झाली.. नरहर कुरुंदकर* तर माझं जिवनमूल्यच आहे..त्यामुळे त्याविषयी वेगळे सांगायला नको. (*हा माणुस पुस्तकातून माझ्या हाती लागला नसता..तर मी या व्यवसायात ऑन ड्युटी असताना..धर्मनिरपेक्ष वागायचं म्हणजे...नक्की वागायचं काय? हे मला अधिक चांगल्या रितीनी कधिच कळू शकलं नसतं. :) )

या सर्व गोष्टींनंतर मी स्वतः असा निर्णय घेतला की हे भिक्षुकिचे काम करत असताना..मी स्वतः...माझ्यासमोर येणार्‍या कोणत्याही यजमानाच्या कुठल्याच प्रकारच्या श्रद्धेला खतपाणी घालणार नाही..ती श्रद्धा कमी किंवा जास्त-करवायच्या प्रयत्नात पडणार नाही. एखादा धर्मभोळा आयुष्यात न भरून येणारी हानी श्रद्धेच्या नादी लागून करताना दिसला,तर त्याला नीट समजावून सांगुन अथवा त्याच्याच हितासाठी खोट्या गोष्टी सांगुनंही त्याचा श्रद्धामार्ग बदलवायला किंवा मऊ करायला भाग पाडिन.याउप्पर मी कुणाच्याही धर्मश्रद्धेत तो पर्यंत हस्तक्षेप करणार नाही..जोपर्यंत ती इतरांना त्रासदायक ठरणार नाही.

तुंम्ही म्हणाल...
अहो ..हे सर्व तुंम्ही आंम्हाला कशाला सांगत आहात??? तर..त्याचं कारण असं की आता पुढे तुंम्ही सत्यनारायणाच्या कथेचे २ प्रकार ऐकणार आहात.ते नेमके कशामुळे तयार झाले..याची पूर्वपीठिका माहित असावी. हे सर्व बदल (गेल्या दहा वर्षात..) करत असताना माझ्या(मना)समोर एकच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे माझ्यासमोर येणार्‍या धर्म:श्रद्ध माणसाला धर्माच्या नावाखाली मिळणारी पारंपारिक मूल्य मी शक्यतोवर मला टाळता यावी..आणि त्याच्या जागी आधुनिक्/पुरोगामी असं काहि देता आलं नाही..तरी किमान नितीची उपासना घडायला काहितरी कारणीभूत होइल असं काहि देता यावं..आता यातंही एक अडचण नेहमीचीच असते/असणार आहे. ती म्हणजे एखाद्या यजमानानी ही कथा किंवा असा बदल त्याला नको असला,(जसे की कन्या-दानाच्या जागी ..मी आणलेला वधू/वर स्विकाराचा विधी!..होमाशिवाय'ची वास्तुशांत! इत्यादी..) तर मी काय करतो? त्याला हवं ते (पारंपारिक ) काम देऊन मोकळा होतो. असं का बरं मग? कारण तो मला त्याला हवं ते करवून घेण्याचेच पैसे देत असतो. आणि मी ही कुणी समाजसुधारक नव्हे तर एक भटजी आहे. (फारतर..धर्मसुधारणेची इच्छा असलेला भटजी आहे ..असे म्हणता येइल.) त्यामुळे ही मर्यादा मला केवळ पैश्यालाच नव्हे,तर यजमानाला भारतीय घटनेनी दिलेल्या धर्मोपासनेच्या स्वातंत्र्याचा मान राखून पाळावीच लागणार. अर्थात..मी जे जे बदल करतो..ते ही केवळ मला हवे असतात म्हणून नव्हे..तर त्यालाही चालणारे असतात..म्हणूनच!

असो..बरच पुराण लावलं. आता मूळ विषयाकडे वळू.
सत्यनारायणाच्या कथेत..मी केलेले बदल म्हणजे,नक्की आहे तरी काय???

अध्याय पहिला :- यात सुरवातीच्या काहि वाक्यांनंतर येणारं कर्मविपाकाचं मुल्य मी सरळ उडवुन लावलेलं आहे. आणि पुढे इहलैकिक दु:खांचा पूर्वजन्मात झालेल्या पापांशी असलेला समंधही ...मी रद्दबातल केला आहे. तसेच नारद आणि विष्णुच्या संवादात..ही पूजा पौर्णिमेला केली असता मिळणारं..अधिक फळ! हे टाळून कोणताही शुभकारक दिवस आणि आपलं मन प्रसन्न असेल अशी वेळ..म्हणजेच चांगला मुहुर्त असा फेरबदल केलेला आहे. बाकि पुजेमुळे होणारे फायदे/तोटे तर संपूर्ण कथेत कुठेच शिल्लक ठेवलेले नाहीत.

अध्याय दुसरा:- या अध्यायापसून सत्य-देव किंवा सत्य-नावाचा-नारायण असे सूचक उल्लेख पुढे सर्वत्र मी केले आहेत. आणि शतानंद ब्राम्हणाला देव त्याची गरिबी जाऊन श्रीमंती यावी..म्हणून हा उपाय सांगतो..असं जे प्र-लोभन दाखवलय..ते सोडून मी त्याला "हे पूजन केल्यानी तुझी दु:ख दूर होऊन..तुला सन्मार्गाचं दर्शन घडेल(आणि त्या योगेच तू सुखी होशिल!) असं वाक्य टाकलय. पुढे हा शतानंद (लॉट्री लागल्या सारखा) पूजेवर पूजा(स्वतःच्या घरी!) करुन सुखी होत नाही..तर स्वतःजवळ असलेली विद्या इतरांना प्रसादासारखी वाटतो,आणि त्यायोगे लोकप्रतिष्ठा/राजप्रतिष्ठा मिळवुन सुखी होतो..(आणि याची जाणिव) म्हणून त्याला वाटेल तेंव्हा पूजा करतो ..असं दाखवलय. त्यापुढचा त्याला मोळिविक्या भेटण्याचा प्रसंगही बदलवून त्यात पूजेऐवजी नामस्मरण ही पण (वेळप्रसंगी..) पूजा होऊ शकते असं मांडलय. शिवाय या गरीब मोळिविक्याला प्राचिन कथेत कचकाऊन प्रलोभनं/अमिषं दाखवली आहेत..त्यांनाही मी टाळलेलं आहे. थोडक्यात..परमेश्वरी आशिर्वादाच्या योगे माणसाच्या जीवनात मुळातच असलेला प्रयत्नवाद..सदाचरण हेच फळ-मिळायला कारणीभूत असतं...हे मी या दुसर्‍या अध्यायाचं बीज बनवलं आहे.

अध्यात तिसरा:- हा फेमस साधुवाणी एपिसोड आहे.. भरपूर चमत्कार..लबाड्या केल्या तरी फळणारा देव..तसेच निष्कारण त्रासात टाकणारा आणि पूजा केल्यावर-सोडणारा असा-देव..मी उडवून लावलेला आहे. किंबहुना पहिल्यांदाच राजा उल्कामुख हा..हे पूजन पुत्रप्राप्तीसाठी करतो..असं दाखवलय तिथुनच बदल सुरु केलाय.. राजा हे पुजन कशासाठी करतो..? तर राज्य चालविण्यासाठी जी बुद्धी इच्छा शक्ति लागते..ती देणारा(अश्या मनोकामना)पूर्ण करणारा हा देव आहे म्हणून!.. नंतर साधुवाणी हेच पूजन का करतो? तर.. मूळ कथेत अपत्यप्राप्तीसाठी पूजा हा हेतू दर्शविलाय..मी तो बदलून..आयुष्यात जे न्यून आहे..ते(योग्य मार्गानी.) पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना साधुवाण्याकडून करविली आहे.पुढे मग साधुवाण्याची बायको(मुलं झाल्यावर..साधुवाण्याला देवाचे ऋण मानावे म्हणून पूजा करायला लावते..तो ती टाळतो..आणि नंतर पुढे बोलल्याप्रमाणे मुलिच्या विवाहावेळी करत नाही..वचनभंग करतो..त्यामुळे त्याला चोरिचा आळ येऊन तुरुंगात पडावं लागतं.. हा भाग साधारण तसाच ठेवलाय.(कारण आरपार बदलेली कथा कुणालाच अवडत नाही..हा अनुभव आहेच!) तरिही पुन्हा तुरुंगातून सुटायला पुन्हा पूजेचा प्रकार मी ठेवलेला नाहीच.. शिवाय इकडे साधुवाण्याच्या घरच्यांनी पुजा प्रार्थना केली..आणि लगेच तो (त्या योगे) तिकडे सुटला ..हा चमत्कारिक पणा बदलून..मी त्या चंद्रकेतू राजाला..नीट तपास पूर्ण झाल्यावर हे कळलं..की हे दोघं चोर नसून व्यापारीच आहेत..आणि मग त्यांनी यांना सोडलं..असं सांगुन या अध्यायाला शेवटाला आणलय..मूळ कथेत हे सर्व राजाला सत्यनारायणानी स्वप्नात येऊन ..कुठलिहि कारणमिमांसा न देता "हे चोर नाहीत..यांना सोडून दे " असं सांगितलेलं आहे. (पुढे हिच गोष्ट्/कथा चवथ्या आध्यायात पूर्ण होते..)

अध्याय चवथा:- या अध्यायात साधुवाण्याने घरीजाताना मार्गात विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राम्हणांना दक्षिणा देऊन प्रवास सुरु केला असा मुद्दा आहे.. हा मी सुरवातीपासूनच कधिही सांगितलेला नाही. पुढे सत्यनारायण संन्यासी वेष धारण करुन येतो..नौकेत काय आहे? विचारतो..साधुवाणी खोटं बोलतो..त्याची परिणिती नौकेतल्या द्रव्यनाशात होते..मग पुन्हा संन्याशाचे पाय धरणे..संन्याश्याने त्याला पूजेविषयी सुनावणे..साधुवाण्याने त्याला हो'कार देणे..नौकेतील धनंद्रव्य पुन्हा मिळविणे..यात मी.. प्रसंग तोच ठेऊन मूल्यबदल केलाय..आधिच्या कथेत सांगितल्या प्रमाणे साधुवाण्याला दामदुप्पट धन विनासायास मिळतं..मग फुकट मिळालेल्या धनानी माणूस असत्य बेताल वर्तन करतो..त्याला यामुळेच जवळ असलेलं धन..द्र्व्य सुख देत नाही..(नष्ट होतं..पालापाचोळ्यासमान होतं) हा मानवी जिवनातला धागा पकडून नंतर..हे साधुवाण्याच्या लक्षात येतं..पैश्याची आसक्ती संपते..देवाला केवळ मूर्तीतच नाही तर दिन दु:खितांमधेही पहावं.. सदाचरणी राहुन परमेश्वराचं नाव घेण्याचा मार्ग अवलंबावा .. हे सर्व कळतं... असा बदल मी त्यात केला आहे.. पुढे साधुवाण्याचं घरी जाणे..त्याच्या बायकोने(लीलावतीने) मुलिला(कलावतीला) "सत्यनारायण पूजा करुनच यांना भेटायला नदिवर ये" असं सांगणे..तिने पूजा करुन,परंतू प्रसाद न घेता येणे..मग नौका बुडणे..कलावतीने "पति पुन्हा प्राप्त झाला नाही,तर त्याच्या पादुका घेऊन सती जाइन" असं बोलणे..मग साधुवाण्याने पूजा केल्यावर नौका जावयासह परत वरती येणे.. हा सर्व चमत्कारीक आणि अनैतिक कथा भाग..वगळून..मी त्या जागी- साधुवाणी घरी येतो..संन्याश्याच्या दर्शनानी/उपदेशानी आपलं जीवन कसं सन्मार्गी झालं..हे कुटुंबियांना सांगतो..पुढचं सगळं आयुष्य हा साधुवाणी त्याला वाटेल तेंव्हा* (कृतज्ञता म्हणून..) सत्यदेवाचं नामस्मरण/पूजन करुन सदाचारी जीवन जगण्यात घालवतो..आणि या पद्धतीनी जगल्यावर त्याला शेवटी फळं काय मिळतं बरं??? तर वृद्धापकाळी मृत्यु जवळ आल्यानंतर/येइपर्यंत, त्याची इहलोकावरची आस(स्वार्थपूर्णआशा)..पूर्ण संपलेली असते..सुखी अंतःकरणानी तो भगवंताच्या भेटीला जाऊ शकतो.. असं दाखवून..मी या प्रकारच्या प्राप्त होणार्‍या अवस्थेला..इहलौकिक मोक्ष अश्या नव्या संकल्पनेत सादर केलेलं आहे. ..याच मुद्द्यावर हा अध्याय संपवलेला आहे.
(* :- मूळ कथेत साधुवाणी पुढे आयुष्यभर दर पौर्णिमेला ही पूजा करतो..असं सांगुन हा जो..प्रॉडक्ट गिर्‍हाइकाला अ‍ॅटेज करण्याचा प्रयत्न सर्व कथेत झालेला आहे..तो मी उडवला आहे.)

अध्याय पाचवा:- ही अंगध्वज राजाची गोष्ट..हा राजा जंगलात जातो..शिकार खेळतो..तिथे गोपालकांनी केलेल्या पूजेला नमस्कार करत नाही..त्यांनी दिलेला प्रसादंही जमिनीवर टाकतो..याची परिणीती म्हणून देवाचा कोप होऊन..त्याचं राज्य जातं..शंभर मुलांचा मृत्यू होतो..सत्यनारायण परत केल्यानी हे सगळं परत मिळतं..असा हा कथाभाग आहे..आणि शेवटी या पाच अध्यायातल्या गोष्टींना आधाराला धरून..लोकांना ही पूजा करण्याचं महत्व..काहि प्रमाणात भीती आणि मोह घालून सांगत हे सर्व संपवलेलं आहे. मी यात राजाला शिकार खेळण्याचं व्यसन आहे असं दाखवून..गोपालकांनी दिलेल्या प्रसादाचा त्याग इथपर्यंत सर्व तसच ठेऊन..त्याची परिणीती त्याचं राज्य शत्रुनी बळकावण्यात दाखवली आहे..पुढे हा राजा दु:ख्खी अंतःकरणानी,राज्य गेलं..म्हणून जंगलात इतस्ततः भटकत असताना याच गोपालकांच्या दृष्टीला पडतो..असं दाखवून्,गोपालकां कडून राजाला एक उपदेश करवलाय..त्यात ते राजाला असं सांगतात..की -

हे राजन.. तू प्रसाद टाकलास तेंव्हाच तुला ..हे असं काहितरी फळ मिळणार हे आंम्ही ओळखलं होतं..अभक्त सुद्धा(जे अधार्मिक असतात असे लोक...) ते ही प्रसाद अन्न समजुन खातात.(फेकून देत नाहीत..) याच वर्तनाला प्रथमधर्म..म्हणजे मनुष्यधर्म म्हणतात.. तुझ्याकडे हा मनुष्यधर्म नव्हता..म्हणूनच राजधर्म(हा त्यानंतरच येणारा..) दुसरा धर्मही नव्हता/राहिला नाही ..म्हणून तुझ्याकडे राज्यपालनाची बुद्धी राहिली नाही(शिकारी खेळत बसलास) आणि राज्य शत्रूनी नेलं..."

या स्पष्टी-करणानंतर..राजा देवासमोर पश्चाताप बुद्धिनी अशी शपथ घेतो..की- "मी तुझ्या आशिर्वादानी आणि माझ्या बळावर राज्य तर परत मिळविनच..परंतू तू मला तिथे राजधर्म पाळता यावा यासाठी मनुष्यधर्म पालन करण्याची बुद्धी दे".. मग..पुढे हा राजा,राज्य परत मिळवतो..बोलल्यासारखं वागून दाखवतो.. सुखी होतो..मोक्षाचा अधिकारी होतो..इथे हे सर्व संपवून.. शेवटी ही (म्हणजे अशी सांगितली गेलेली..) कथा ही बोधकथे सारखी असते..असं सांगून या शेवटच्या अध्यायाचा आणि एकंदर कथेचा समारोप मी केलेला आहे...

आता..वरती या पाच अध्यायांचं जे काही विवेचन मी केलेलं आहे ते खाली दिलेल्या या दोन रेकॉर्डिंग वर आपल्याला ऐकायला मिळणार आहे..या पैकी एक प्रकार मराठी कथेचा..तर दुसरा हिंदी कथेचा आहे.. दोन्ही रेकॉर्डिंग..ही मी गेल्या सिझनमधे केलेल्या पूजांमधे केलेली आहेत (live आहेत..) त्यामुळे वर केलेल्या विवेचना प्रमाणे ती अगदी शंभर टक्के असतीलच असे नाही..(८० टक्के नक्की आहेत..) परंतू कथाभागातले बदल जसेच्या तसे (ठेवलेले)आहेत.. सर्व कथा बोली भाषेत आहेत.. मूळ कथेतले चमत्कार नाहीत..तसेच फापटपसाराही त्यात नाही..जे नको ,ते उडवलं किंवा बदललं आहे.आणि हवं किंवा असावं..ते घातलेलं आहे..याखेरीजंही जे बदल तुंम्ही सुचवाल सांगाल..ते यथामती यथायोग्य (यापुढे..) स्विकारले जातीलच..

तेंव्हा ..मि.पा.करांन्नो.. चला आता (या आत्मू भटाची.. ;) )

ऐका सत्य नारायणाssssची कथा!!!

१) मराठी कथा:- ही कथा सांगताना मोबल्या थोडा लांब होता..त्यामुळे शब्दश्रुती साठी जरा लक्षपूर्वक ऐकावी लागेल..क्षमस्व!

http://mfi.re/listen/ibszayaiki3vm2d/satya_narayan_katha2.mp3

२) हिंदी कथा:- ही कथा एका बँकेत झालेल्या पूजेच्या वेळेची आहे..बँक नॉनमहाराष्ट्रीयन असल्यानी तिकडून आलेले त्यांचे हिंदी भाषिक साहेब्/उपसाहेब..यांच्या आग्रहानी मी ही हिंदित सांगितली आहे..(या रेकॉर्डिंगमधे..सुरवातीला थोडा प्रार्थनेचा भाग आलाय..नंतर लगेच कथा सुरु झालीये..ही कथा जास्त प्रासादिक आणि ठणठणीत शब्दात बद्ध झालेली आहे..मराठी पेक्षा ऐकाला सुरसही वाटेल..)

http://mfi.re/listen/edbym84erbqw3po/hindi_satya_katha.ogg

(कथा ऐकल्यानंतर साहेब असा आनंदून गेला..की त्यानी ती रेकॉर्ड केलेली कथा नंतर दिवसभर बँकेत अखंड लावली होती..माझ्या हिशोबी "हे" जरा जास्तच लाइव्ह झालं! :) ..असो.)
====================================================
https://lh3.googleusercontent.com/-4Vf1W471Fmg/VGWv1ppHVAI/AAAAAAAAGmw/e3DrKorvhsQ/w800-h450-no/my%2Bfone%2B223.jpg
दोन्ही कथाप्रकार ऐकून/ आस्वादून आपला अभिप्रायंही जरूर द्या . :)

मांडणीसंस्कृतीधर्मसमाजविचार

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 10:00 pm | अत्रुप्त आत्मा

काही कल्पना नाही ब्वॉ! जे चिखलाच पौरोहित्य करतात,त्यांनाच् जाऊन विचारा

बरं आता तुम्हाला समजावं म्हणून..

हिंदू धर्मातल्या परंपरा पाळणे= चिखलात खेळणे....मग आता या चिखलात खेळण्याचं पौरोहित्य कोण करतं हे मिपावरचं शेंबडं पोर पण सांगेल.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Nov 2015 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा

चालु द्या निरर्थक आत्मवंचितकुंथन!

शब्दबम्बाळ's picture

27 Nov 2015 - 6:17 pm | शब्दबम्बाळ

आहेत! मग काय?

नाखु's picture

27 Nov 2015 - 6:27 pm | नाखु

त्यांचं म्हणणं आहे की शेजारच्याच्या घरात कचरा आहे म्हणून मी माझ्या घरात त्याच्या दुप्पट ठेवणार,त्याच्या वासानी आणि त्रासानी घरचे आजारी पडले तरी बेहत्तर पण दुप्पट ठेवणार म्हणजे ठेवणारच !!!


दै "अडाणी लाटणी" मधील वडाची साल पिंपळाला या ज्ञानामृतातील अमृतकण

धर्म कोणताही असो कर्मकांडाचे अधिकतम मुल्य कर्मकांडच असावे. कर्मकांडाची संस्कृती सुसह्य असते तो पर्यंत कर्मकांडाचे अवडंबर अंगावर येत नाही. कर्मकांड करणार्‍यालाच नव्हे करणार्‍याच्या आजूबाजूच्यांनाही त्याने क्लेष पोहोचत असेल उद्देश साध्य होत नसेल तर कर्मकांड टाळणे श्रेयस्कर असावे. स्वमनाच्या सुरक्षीततेसाठी गजाननमहाराजांच्या पोथीची पारायणे करता येतात पण गाडगे महाराजांचा पंथ अधीक रचनात्मक राहतो. खुलभर दुधाची कहाणी मध्ये महादेवाचा गाभारा गावभरचे दुधाच्या अभिषेकानेही भरत नाही, घरातील तान्ह्यांना तृप्तकरून मग उरलेल्या टिचभर दुधाच्या अभिषेकानेही देव प्रसन्न होतो. इथे कर्मकांडाचे मह्त्वही कमी केले आहे आणि कर्मकांडाचे महत्व अशा पद्धतीने कमी करण्याचा परधर्माशी तुलनांशी काहीही संबंध नसावा किंवा कसे.

हेमंत लाटकर's picture

27 Nov 2015 - 9:39 pm | हेमंत लाटकर

सत्यनारायण नको, मुंज नको तर चारधाम यात्रा तरी काय उपयोगाची.

हेमंत लाटकर's picture

27 Nov 2015 - 10:40 pm | हेमंत लाटकर

तसे म्हणले तर हिंदू धर्मातील बरीच कर्मकांडे अनावश्यक आहेत.

संदीप डांगे's picture

28 Nov 2015 - 10:00 am | संदीप डांगे

हिंदू धर्मातलीच कशाला. सगळ्याच धर्मातली सगळीच कर्मकांडे अनावश्यक आहेत. आता काय करायचे?

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2015 - 1:55 pm | प्रसाद गोडबोले

करेक्ट !
सगळीच कर्मकांडे अनावश्यकच आहेत !!
बाकी इतर धर्मांचे माहीत नाहीत पण किमान हिंदु धर्मातील सारी कर्मकांडे स्वार्थी लोकांनी चालवलेली स्वार्थी लोकांसाठी चालवलेली रोजगार हमी योजना आहे ह्यात तिळमात्र शंका नाही !

हे पहा तुकोबांचेही स्पष्ट वचन आहे = >
तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म । जे जे कर्म धर्म नाशिवंत॥

आता काय करायचे?
>> सच्च्या हिंदु ने ह्या सर्व कर्मकांडांचा मुळापासुन त्याग करावा अन ज्ञानकांड अर्थात प्रस्थानत्रयी आणि मुळ वेदांकडे वैदिक धर्माकडे वाटचाल करावी :)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Dec 2015 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

ह्हहा ह्हहा ह्हहा ! पुन्हा अर्धज रती न्याय! चालु द्या स्वार्थक आत्मकुंथन..
म्हणे मूळ वैदिक धर्माकडे चला ! त्याची टनाटनी मूल्य व्यवस्था हेच कर्मकांडांचे बेसिक रूप आहे..आणि ते वेदाच्या ग्रंथोपग्रंथातून प्रकट झालेले आहे.
अत्ता एक सर्वपरिचीत पुरावा देतो.
पुरुषसूक्त :-

ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥

(ऋग्वेद संहिता आणि अन्य ठिकाणी)
हेच विषमता समर्थक मूल्य गीता मनुस्मृती सगळी कड़े आहे... आणि हे म्हणतात त्याच्याकडे चला!

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2015 - 3:05 pm | प्रसाद गोडबोले

बरं मग राहु दे , आपण सत्यनारायण घालु . उगी उगी =))))

सूड's picture

1 Dec 2015 - 3:50 pm | सूड

पुरुषसूक्त :-

ब्राह्मणोऽस्य मुखामासीद्वाहू राजन्यः कृतः। ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत॥

मी काय म्हणतो, मान्य ह्यात विषमता आहे!! पौरोहित्याच्या अभ्यासक्रमातून हे पुरुषसूक्त काढून टाकायला तुम्ही काय प्रयत्न केलेत ते वाचायला आवडेल.

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 3:16 pm | संदीप डांगे

आता काय करायचे? ह्या प्रश्नाचा उद्देश वेगळा होता. कोणत्याही धर्माकडे जा, मनुष्याच्या मूळ स्वभावानुसार कर्मकांडे टाळणे अशक्य आहे. कितीही पुरोगामी, क्लिन राहण्याचा प्रयत्न केला तरी काही ना काही कर्मकांडे निर्माण होतातच. टाळणे सर्वथा अशक्य. हिंदूधर्मातली कर्मकांडे टाळण्यासाठी बौद्ध् धर्मात गेलेल्यांनीही कर्मकांडे निर्माण केलीच. त्यापासून सुटका नाही.

रच्याकने, तुम्ही नेहमी सांगता तो तुम्हाला अभिप्रेत असलेला वैदिक धर्म नेमका काय आहे त्याबद्दल अधिक माहिती मिळेल काय?

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2015 - 3:27 pm | प्रसाद गोडबोले

सुसंवादाबद्दल धन्यवाद डांगे सर !

त्यापासून सुटका नाही.

हे काही खरे नाही , यज्ञात पशुबळी देणे हा कर्मकांडाचा भाग होता जो आचार्यांच्या कार्यांनंतर बहुतांशी बंद झाला ! आजच्या काळातही जी कर्मकाम्डे केवळ लुबाडणुक करण्यासाठी रचलेली आहेत त्यांचे पितळ उघडे पाडुन ती तरी नक्कीच बंद करता येतील !

वैदिक धर्म नेमका काय आहे

नक्कीच ! खव मध्ये काही प्रतिसाद देत आहे . आमच्या श्रीधर स्वामींचे आर्य धर्म नावाचे पुस्तक प्रसिध्द आहेच , त्याची लिन्क सपडली तर देतो ( अन्यथा सज्जनगडावर जावुन विकत घ्यावे लागेल )! बाकी आचार्यांन्नी अगदी सोप्प्या शब्दात सांगुन ठेवली आहे व्याख्या वैदिक धर्माची
द्विविधो हि वेदोक्तो धर्मः - प्रवृत्तिलक्षणः निवृत्तिलक्षणश्चजगतः स्थितिकारणम् ।
प्राणिनां साक्षात् अभ्युदयनिःश्रेयसहेतुः य्ः स धर्मः ब्राह्मणाद्यैः वर्णिभिः आश्रमिभिः श्रेयोर्थिभिः अनुष्ठीयमानः ।
http://sanskritdocuments.org/doc_giitaa/gitaabhaashhya.html?lang=hi

:)

प्रसाद१९७१'s picture

1 Dec 2015 - 4:58 pm | प्रसाद१९७१

आजच्या काळातही जी कर्मकाम्डे केवळ लुबाडणुक करण्यासाठी रचलेली आहेत त्यांचे पितळ उघडे पाडुन ती तरी नक्कीच बंद करता येतील !

पण ती कर्मकांड करुन कोणाला आनंद मिळत असेल, बरं वाटत असेल तर काय हरकत आहे. हा दॄष्टीकोन यनावालांसारखाच झाला. करु दे की कोणाला काय करायची ती कर्मकांडं आणि देवु देत भटजींना पैसे. वाटत असेल बरे असे काहीतरी करुन. एखाद्याचा तो आनंद पण काढुन घ्यायचा का?

प्रसाद गोडबोले's picture

1 Dec 2015 - 5:12 pm | प्रसाद गोडबोले

पण ती कर्मकांड करुन कोणाला आनंद मिळत असेल, बरं वाटत असेल तर काय हरकत आहे.

अगदी अगदी अनुमोदन ! ज्याने त्याने ज्याच्ज्या त्याच्या आनांदाला हवे ते करावे , त्यात आपण लक्ष घालण्याची गरज नाही ,सत्यनारायण कोणत्याही प्रकारे वैदिक तत्वज्ञानातील संदेश देत नाही , त्याने फक्त भडजी लोकांचा स्वार्थ साधला जातो इतकेच मी म्हणत होतो , आता हे सारे माहीत असुनही कोणाला सत्यनारायण करायचाच असेल तर करु दे की ... त्याच्या आनंदाला हरकत घेणारे आपण कोण !

बाकी सत्यनारायण पुजेपेक्षा ईशावास्योपनिषद हे किमान १००० पट जास्त आणि चिरकाल आनंद देणारे आहे ह्यात शंका नाही :)

करु दे की कोणाला काय करायची ती कर्मकांडं आणि देवु देत भटजींना पैसे. वाटत असेल बरे असे काहीतरी करुन.

करु देत की!! पण हेच भटजी मी करतोय ते आधुनिक आणि बाकी टनाटनी असा प्रत्येक ठिकाणी स्टँड घेत असतील तर आधुनिकपणा समजून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करु शकतात की लोक, आता वर दिलेला पुरुषसुक्ताचा रेफरन्स पहा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते विषमतावादी आहे. जर तसं असेल, तर पौरोहित्यात ते शिकवलं जाऊ नये म्हणून असे 'आधुनिक' भटजी काय करतात ते माहिती करुन घ्यायला हवंच की!!

प्रसाद१९७१'s picture

2 Dec 2015 - 2:23 pm | प्रसाद१९७१

करु देत की!! पण हेच भटजी मी करतोय ते आधुनिक आणि बाकी टनाटनी असा प्रत्येक ठिकाणी स्टँड घेत असतील तर आधुनिकपणा समजून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करु शकतात की लोक

एकदम मान्य. भटजींकडुन उत्तर अपेक्षीत आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Dec 2015 - 4:08 pm | अत्रुप्त आत्मा

@पण हेच भटजी मी करतोय ते आधुनिक आणि बाकी टनाटनी असा प्रत्येक ठिकाणी स्टँड घेत असतील तर आधुनिकपणा समजून घ्यायचा नक्कीच प्रयत्न करु शकतात की लोक,>> हे आत्मकुंथकरित्या (पूर्वीप्रमाणेच) स्वतःच ठरवून टाकलं! सबब.. हे प्रतिवाद करायच्या लायकीच रहात नाही. असो!

@आता वर दिलेला पुरुषसुक्ताचा रेफरन्स पहा. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते विषमतावादी आहे. >>> पुन्हा तेच्च निरर्थक आत्मकुंथन.. आपलं आपणच वाट्टेल ते ठरवून आमच्या अंगावर फेकायचं. म्हणजे हे मी म्हणतो म्हणून विषमतावादी आहे..एरवी नाही! यातच काय ते स्पष्ट होतं..

@जर तसं असेल, तर पौरोहित्यात ते शिकवलं जाऊ नये म्हणून असे 'आधुनिक' भटजी काय करतात ते माहिती करुन घ्यायला हवंच की!! >>> हे वेदपाठशाळांनी करायचं काम आहे..अभ्यासक्रम बदलायचं.. मी काय काय करतो असला टनाटनीपणा उपटून फेकायला..ते इथे जाहीर आहे.. तेंव्हा मी टनाटनीपणा काढायचं काम करतो,हे दिसत असूनंही आतल्या अंगानी तुम्ही ते करता का? असा प्रश्न टाकुन..करत नाही,असं जाणीवपूर्वक ध्वनीत करण हे खोडसाळपणाचं लक्षण आहे.

संदीप डांगे's picture

1 Dec 2015 - 5:29 pm | संदीप डांगे

ईच्छा वा परिस्थिती नसूनही समाज काय म्हणेल किंवा आपल्यात असंच असतं, करावंच लागतं ह्या नावाखाली कर्मकांडे रेटली जातात. तिथे जरा समस्या निर्माण होते. आपल्या समाजात कर्मकांडे नाकारण्याचा तसा कुणाला ऑप्शन उपलब्ध आहे काय? जेव्हा मी ऑप्शन म्हणतोय तेव्हा तो सहज उपलब्ध असलेला हवा. निर्माण करण्याची यजमानाची जबाबदारी नसावी. जसे लग्न मोठा समारंभ करून करा वा बिन खर्चाने कोर्टात रजिस्टर करून करा, दोन्ही ऑप्शन सहज उपलब्ध आहेत. पण लग्न करा वा करू नका असे दोन ऑप्शन तितक्या सहज उपलब्ध नाहीत. हेच इतर बाबतीतही.

जसे वर मी मुंजीचे उदाहरण दिले. की हट्टाने पेटून मी नाही मुलांची मुंज केली तर ज्ञातीबांधव तितक्या सहज स्विकारतील का मुलांना? आजूबाजुला सगळे मुंज झालेले मित्र-नातेवाईक बघून त्यांना आपण कोणीतरी वेगळे आहोत असा फील येऊ शकतो वा आणून दिल्या जाऊ शकतो. 'हेकटपणाने कर्मकांडे नाकारणे' वा 'होतोय आनंद म्हणून पैसे खर्चून पुजा घालणे' ह्या दोन्ही गोष्टी एवढ्या सहज नाहीत असे मला वाटते. याबद्दल अधिक खोल चर्चा अपेक्षित आहे.

जसे वर मी मुंजीचे उदाहरण दिले. की हट्टाने पेटून मी नाही मुलांची मुंज केली तर ज्ञातीबांधव तितक्या सहज स्विकारतील का मुलांना? आजूबाजुला सगळे मुंज झालेले मित्र-नातेवाईक बघून त्यांना आपण कोणीतरी वेगळे आहोत असा फील येऊ शकतो वा आणून दिल्या जाऊ शकतो.

त्यात काय झालं? वडिलांनी माझी मुंज केलेली नाही. सुरुवातीला काही वर्षे अधूनमधून " मुंज झाली नाही म्हणजे तू खरा ब्राह्मण नाहीस" , "अजून कशी काय मुंज नै झाली?" छाप शेरे मारले लोकांनी, एकदादोनदा "मुंज न झालेल्याला गायत्री मंत्र ऐकण्याचा अधिकार नाही" असेही नुकतीच मुंज झालेल्या मुलाने ऐकवले होते. पण ते वगळता त्रास काही झाला नाही.

वैयक्तिक पाहिले तर मुंज न करून फार काही साधले असे मला वाटत नाही-तसे मी बोलूनही दाखवलेले आहे, पण नाहीच केली मुंज तरी फार काही फरक पडत नाही. सध्याच्या काळात तर नाहीच नाही. पंधरावीस वर्षांपूर्वी अजून जास्त पडत असे.

टवाळ कार्टा's picture

2 Dec 2015 - 3:16 pm | टवाळ कार्टा

असूदे की...तु त्यांना "तुम्ही तरी कुठे चिकन खाउ शकता" असे खिजवायचे =))

संदीप डांगे's picture

2 Dec 2015 - 4:01 pm | संदीप डांगे

मुंज हे एक उदाहरण धरा हो. माझा रोख सर्वच कर्मकांडांकडे आहे. ह्यात जन्मापासून मृत्यूपर्यंतची सगळीच येतात. जे लोक जनरितीला विरोध करून ही कर्मकांडे करत नाहीत, त्यांना ते ऑप्शन्स स्वतः पुढे होऊन मिळवावे लागतात. सहज उपलब्ध नाहीत असे मला म्हणायचे आहे. समाजात बहुसंख्य लोक कचखाऊ वृत्तीची, प्रवाहासोबत वाहण्याची इच्छा असणारी असतात. तिथे स्वतंत्र मताने आचरणाचा हक्क सहज उपलब्ध नसतो. समाजात राहायचे तर हे केलेच पाहिजे अशी बहुसंख्यांची मनोवृत्ती असते. समाजधुरिणांकडून ह्या प्रथा चुकीच्या असून तुम्ही पाळू नका असे आश्वस्थ करणारे वर्तन झाले तरच समाज आपल्या चालिरीती, प्रथा बदलतो. त्यात पौरोहित्य करणारे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात असे मला वाटते. म्हणजे मी ऑप्शन्स बद्दल विचारत आहे ते उपलब्ध करून देण्यात भटजीसमुदाय मोठे कार्य करू शकतो. पण ते 'घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या' असे होइल.

जेपी's picture

28 Nov 2015 - 10:09 am | जेपी

१००

प्रचेतस's picture

28 Nov 2015 - 10:21 am | प्रचेतस

१०० झाल्याबद्दल बुवांचा सत्कार जेपीच्या वतीने एक तांब्याभांडं, सत्यनारायणाची प्रतिमा आणि शाम मानवांच्या भाषणाची एक क्यासेट देऊन करण्यात येत आहे.

अभ्या..'s picture

28 Nov 2015 - 10:45 am | अभ्या..

बुवा ची फार इच्छा आपल्या धाग्याला सेंचुरी लागावी. सारखे कन्हायचे सॉरी म्हणायचे. तुम्ही शंभर शंभर मारता. मीच काय पाप केले. शेवटी बिचारा वल्ली म्हणाला देऊ करुन. बुवा म्हणाले बघा बाबा शत् सत्यनारायनाचे पुण्य लाभेल तुम्हाला. झ्याल एकदाच बुवांच्य्या मनासारखे. आता आम्ही मोकळे.

अभ्या..'s picture

28 Nov 2015 - 10:45 am | अभ्या..

बुवा ची फार इच्छा आपल्या धाग्याला सेंचुरी लागावी. सारखे कन्हायचे सॉरी म्हणायचे. तुम्ही शंभर शंभर मारता. मीच काय पाप केले. शेवटी बिचारा वल्ली म्हणाला देऊ करुन. बुवा म्हणाले बघा बाबा शत् सत्यनारायनाचे पुण्य लाभेल तुम्हाला. झ्याल एकदाच बुवांच्य्या मनासारखे. आता आम्ही मोकळे.

धाग्यावर सेंच्युरी लागल्यावर तरी बुवा 'तृप्त' होणार का???

अत्रुप्त आत्मा's picture

28 Nov 2015 - 11:52 pm | अत्रुप्त आत्मा

:)

अमीबा's picture

29 Nov 2015 - 7:35 am | अमीबा

स्तुत्य उपक्रम, अतृप्तजी. अभिनंदन आणि शुभेच्छा.

हेमंत लाटकर's picture

30 Nov 2015 - 9:34 pm | हेमंत लाटकर

तर मग शांती, कालसर्प, नारायण नागबळी, राहू केतू जप याविषयी आपले काय मत आगे बुवाजी.

अत्रुप्त आत्मा's picture

30 Nov 2015 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा

जसे बदल ह्यात,तसेच बदल त्यात!
ध न्य वाद

जेपी's picture

1 Dec 2015 - 5:46 pm | जेपी

या धाग्याचे 200 झाले तर सत्यनारायणला पवमानाचा अभिषेक करु..

सतिश गावडे's picture

1 Dec 2015 - 11:25 pm | सतिश गावडे

पवमान काय असते?

या चर्चेवरून मागे एकदा वाचलेला हा लेख आठवला.

यावरूनच माझा स्वतःचा एक अनुभव लिहावासा वाटतो. मार्च महिन्यात आमच्या "भावकीची" पुजा होती. पुजा म्हणजे अर्थातच सत्यनारायण. समस्त गावडे कुळातील कुटुंब या पूजेला हजर राहतात. मी काही कारणानिमित्त गावी गेलो होतो. भाऊबंदांच्या भेटी-गाठी होतील म्हणून मी पुजेच्या घरी गेलो. त्या घरी एका खोलीत पुजा चालू होती. बाहेर हॉलमध्ये बाकिच्यांच्या गप्पा-टप्पा चालू होत्या. मी मखराजवळ नमस्कार वगैरे करायला न गेल्यामुळे भटजींना पाहिले नव्हते. मात्र लाऊडस्पिकरवर ऐकू येणारा आवाज ओळखीचा वाटत होता. कोण भटजी आहेत हे पाहण्यासाठी मी पुजेच्या खोलीत गेलो तर मला आश्चर्याचा धक्का बसला. माझ्याच मित्रवर्तुळातील ती "अबक" व्यक्ती होती.

"काय हो अबक, हे काय हो?" अबक मुखाने विष्णूसहस्त्रनाम चालू ठेवून माझ्याकडे पाहत चेहरा भरून हसले. मी ही हसलो.

अबक एसटी महामंडळात चालक होते. निवृत्ती नजरेच्या टप्प्यात दिसत असताना यांना नोकरी सोडाविशी वाटली. स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि हा नविन आरामदायी व्यवसाय चालू केला.

हेमंत लाटकर's picture

2 Dec 2015 - 11:25 am | हेमंत लाटकर

http://anita-patil.blogspot.in/2011/12/blog-post_31.html?m=1 हा लेख वाचला बाह्मणावरचा राग काढलेला दिसतो.

अत्रुप्त आत्मा's picture

2 Dec 2015 - 12:01 pm | अत्रुप्त आत्मा

तो ब्लॉग महान आहे,त्यांच्या अक्लेसमोर मी लहान आहे!

(पडलीच जिल्बि तिच्यामायला! http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-029.png )