.
मतदान करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.
.
निवडणुकीत मतदान करू की नको असा विचार मनात आल्यास खालच्या चित्रातील संदेश डोळ्यापुढे आणा...
(कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो. मतदान न करणारे नागरीक वाईट राजकारणी घडवतात.)
.
मतदान न करणे म्हणजे इतरांना आपला नेता / शासक निवडायचा अधिकार देणाची "पॉवर ऑफ अॅटर्नी" देण्यासारखे आहे... त्यामुळे तुम्हाला इतरांना अयोग्य माणसाला निवडून दिले असा दोष देण्याचा अधिकार राहत नाही !
.
दर निवडणूकीत जरूर मतदान करा.
.
प्रतिक्रिया
13 Oct 2014 - 11:40 am | समिक्शा
कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो. मतदान न करणारे नागरीक वाईट राजकारणी घडवतात
अगदी बरोबर
मी मतदान न चुकता करते.
13 Oct 2014 - 11:43 am | समिक्शा
अगदी बरोबर.....
मी मतदान न चुकता करते
13 Oct 2014 - 2:12 pm | एस
'नोटा' वापरल्यास वरील 'दोष' येईल काय हो? ;-)
13 Oct 2014 - 3:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
मराठीतल्या (पैश्याच्या) 'नोटा' असल्यास दोष येईलच, पण तो कायदेशीर गुन्हाही आहे !!! :)
'नोटा' (NOTA) हा इंग्लिशमधला पर्याय उपलब्ध असल्यास आणि तो वापरल्यास ते वैध मतदान होईल... आणि अर्थातच दोषरहीत असेल !
8)
13 Oct 2014 - 4:04 pm | हाडक्या
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही.
तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्या उमेदवारास करु.
13 Oct 2014 - 4:27 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम विचार !
मतदान न करण्यापेक्षा 'वाईट' आणि 'अतीवाईट' उमेदवारापैकी नाईलाज म्हणून का होईना 'वाईट' उमेदवाराला मतदान केले तर कालांतराने सुधार होत 'वाईट' आणि "चांगला' असे आणि नंतर 'चांगला' आणि 'अधिक चांगला' असे उमेदवारांचे पर्याय शक्य होतील... अन्यथा चांगले उमेदवार निवडणुकीपासून दूर राहणेच पसंत करतील (जे आता होत आहे.)
13 Oct 2014 - 4:04 pm | हाडक्या
आम्ही दर निवडणुकीत मतदान करतो. आमचे आई-वडिल पण करतात. तरीपण आमच्या सातार्यात राजेशाही आहे. ती काही जात नाही आणि ती आमच्या हयातीतपण जाईल असे वाटतही नाही.
तरी आम्ही मतदान करुच आणि कुचकामी अशा राजांच्या राजेशाहीविरुद्ध (त्यातल्या त्यात) चांगल्या वाटणार्या उमेदवारास करु.
13 Oct 2014 - 4:33 pm | मदनबाण
मोबाइल घेताना सुद्धा आपण १० पर्याय आणि त्यांचे पर्फॉरमन्स बघुन चांगला पर्याय निवडतो ! ;)
योग्य पर्यायालाच मत द्या. :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मराठीचे सोयीस्कर अस्मिताकारण
13 Oct 2014 - 4:35 pm | विलासराव
करतोच आता मतदान. सगळ्यांनाच एकेक मत देउन टाकतो.
13 Oct 2014 - 4:53 pm | अजया
करणारच आहे मतदान परंतु कोणालाही मत देणे म्हणजे ते वायाच जाणार अाहे.कमी वाईट कोणी दिसेना झालंय!!आजवर निवडुन आलेल्या सर्वांनी आमच्या भागातल्या बंद पडलेल्या कारखान्यांना ऊर्जीतावस्था आणू,या भागाची दळणवळण यंत्रणा सुधारु अशी आमिषं दाखवुन मतं पदरात पाडुन घेतली आहेत.पुन्हा एकदा जातीआधारित मतदान होणार,माझे खरोखरचे अ मूल्य! मत वाया जाणार पण मी कोणत्यातरी अाडवाटेच्या मतदान केंद्रावर माझे नाव आले आहे तिथे जाऊन कर्तव्य पार पाडणार!
लोकसभेच्या मतदानाला जाताना रस्ताच नसलेल्या मतदान केंद्रावर गाडी नेऊन धडपडलेली(अजया)!!
13 Oct 2014 - 5:49 pm | तुषार काळभोर
काँग्रेस्/राष्ट्रवादीला या जन्मात तरी मत देणार नाही.
आमचं घर माझ्या जन्माच्या आधीपासून जनसंघ-भाजपा-शिवसेना-युतीचं समर्थक (मराठा असूनसुद्धा :) )
दसर्याच्या आदल्या दिवशी घरी जाताना मुंढव्याच्या चौकात शिवसेनेची रॅली होती. नदीच्या पलिकडे ट्रॅफिक जाम चालू झालं(खराडीच्या बाजूने). ३५ मिनिटात पुलावर पण बस पोचली नव्ह्ती. उतरलो, चालत चालत मुंढव्याच्या सिग्नलला पोचलो, तर रॅलीमुळे रिक्षा बंद होत्या. तसाच चालत चालत अॅमनोरापर्यंत पोचलो अन् रिक्षाने हडपसरला घरी गेलो. घरी गेल्यावर फोन केला, बस अजून नदीवरच्या पुलावरच होती.
शिवसेना बाद!
काल भाजपची रॅली होती. अॅमनोरा ते मगरपट्टा साऊथगेट पोचायला २५ मिनिटे लागली.
भाजपा बाद!
काल रात्री परत मनसेची रॅली. १००+ दुचाकींवर ३००+ मुले हॉर्न वाजवत, ओरडत, सायलेन्सर काढलेल्या मोटारसायकलीवरून चालली होती.
मनसे बाद!
शी!!!
हा काय प्रचार आहे. हे करून मते मिळतील?
13 Oct 2014 - 7:23 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
अपक्ष उमेद्वार नाही आहे का कुणी?
13 Oct 2014 - 7:36 pm | प्रसाद१९७१
खरे आहे, एक सुद्धा उमेदवार आपले मत देण्याच्या लायकीचा नाही.
आप नी मूर्ख पणा केला, नाहीतर यावेळेला बरीच मरे मिळाली असती.
13 Oct 2014 - 7:43 pm | भाते
गेले दोन दिवस वैताग आणला होता या प्रचाराने.
समस्त महिला मंडळासाठी पायी प्रचार फेऱ्या आणि पुरूषांसाठी बाइक रॅली.
डोंबिवलीत तर पेट्रोलपंपांवर पेट्रोल सुध्दा संपले होते.
अर्थात माझी ११ नंबरची बस असल्याने मला त्याने काही फरक पडला नाही.
त्यामुळे यावेळी नोटा (यापैकी कोणीही नाही) हाच पर्याय.
13 Oct 2014 - 10:02 pm | तुमचा अभिषेक
वोट फॉर महाराष्ट्र !
कालच मी मेंबर असलेल्या सर्व व्हॉट्सपग्रूपचे नाव असे बदलून टाकलेय.
यंदा माझे मत महाराष्ट्राला ..... आणि माझे नाव ....... गुप्त मतदान :)
14 Oct 2014 - 9:27 am | नाखु
मतदान करण्याबाबत सगळ्यांचे "एकमत" आहे
जर आहे प्रगतीची अपे़क्षा तर नको मतदानाची उपेक्षा
आवर्जून मतदान करणारा.
14 Oct 2014 - 9:46 am | ज्ञानोबाचे पैजार
मतदान करणारच.
मतदान हा माझा हक्क नसुन ते माझे कर्तव्य आहे.
पैजारबुवा,
14 Oct 2014 - 4:28 pm | NiluMP
म्ही मतदान का करता असा जर सर्वे केला तर देशातील 50%
मतदारांना यांच समाधानकारक उत्तर देता येणार नाही. एका नगरसेवकापासून ते खासदारापर्यतच्या नेत्यांनाचा पगार किती, त्यांना कोणकोणत्या इतर सवलती मिळतात याची किती मतदारांना माहिती असेल. का हे नेते लोक निवडूणकीदरम्यान जीवाचा आटापिटा करतात.
भारतासारख्या भाषावर प्रांतरचना झालेल्या, धर्म आणि जातीपाती जोखडलेल्या देशात मतदान करुन नेता निवडून देणे खरंच योग्य आहे. याच मतदान पध्दतीचे दुषपरिणाम आपण गेले 60 वर्षे पाहतो आहोत ते म्हणजे व्होटबक, घराणशाही, झोपडपटटया, भष्टचार अर्थात काही चांगल्या गोष्टी घडल्या पण त्याच प्रमाण कमी आहे.
मला नेता निवडूण देण्याचा अधिकार आहे पण तो काम करत नसेल त्याला त्याचा पदावरून काढण्याचा अधिकार नाही. नाहीतर ज्याला जनतेचा आंदोलनामुळे गहखात सोडव लागल तोच पुन्हा गहमंत्री झाला नसता. पण त्यांचा विरोधी केलेली आंदोलन चिरडली जातात याच उदा म्हणजे आण्णा हजारे यांच आंदोलन. दिल्ली आजही नेत्याशिवाय चालतेच आहे की.
मोदी सरकारामुळे राजकारण सकारात्माक वाटू लागेल आहे पण त्यावर 5 वर्षानंतर बोलू.
14 Oct 2014 - 4:35 pm | पैसा
यावेळी महाराष्ट्रातल्या विचार करू शकणार्या मतदारांना खरंच मोठं अवघड कोडं आहे. मतदान कोणाला करावे ठरवणे कठीण आहे. मतदान नाही केलं तुम्ही इडियट ठरता. सर्व मतदारांना शुभेच्छा! आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे! आणि हा बदल सामान्य मतदारांनीच घडवून आणला आहे, त्याची कोणत्याही पक्षाला सुतराम कल्पना नव्हती!
14 Oct 2014 - 4:59 pm | अनन्न्या
आम्हाला जसं चालणारं सरकार गोव्यात मिळालं तसं तुम्हालाही मिळू दे!
पण आमच्याकडे पर्रीकर नाहीत *smile* तरीही मतदान करणारच!