आंबट-गोड नाती

स्वाती फडणीस's picture
स्वाती फडणीस in जे न देखे रवी...
5 Aug 2008 - 4:49 pm

आंबट-गोड नाती
.

चिंचेचा आकडा गं..
शेपटावाणी वाकडा गं..
चिंचेचा आकडा.. वाकडा गं..

पेरा-पेरात गाठी गं..
चिंचोक्या बाटी गं..
पेरा-पेरात गाठी.. बाटी गं..

आकड्याची गोडी गं..
पोरं यडी-खुळी गं..
आकड्याची गोडी.. खुळी गं..

जिभेला हुळहूळ गं..
खाताना कळ गं..
जिभेला हुळहूळ.. कळ गं..

चिंच आंबट-गोड गं..
भली-बुरी चव गं..
चिंच आंबट-गोड.. चवीला गं..

चिंचेचा आकडा.. वाकडा गं..
पेरा-पेरात गाठी.. बाटी गं..
चिंचजशी आंबट-गोड नाती गं..

=====================
स्वाती फडणीस............. ०५-०८-२००८

कविताजीवनमानप्रकटनविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

5 Aug 2008 - 5:05 pm | मदनबाण

व्वा...एक वेगळी पण मस्त कविता...

(गाभुळलेली चिंच खाणारा)
मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

साती's picture

5 Aug 2008 - 7:22 pm | साती

छान कविता! अगदी लोकगीताची चव आली.

साती

धनंजय's picture

5 Aug 2008 - 8:22 pm | धनंजय

मस्त!!!

पण :
१.
गोडी-खुळी
हुळहूळ-कळ
गोड-चव
या तीन कडव्यांत पहिल्या दोन कडव्यांसारखीच यमके जुळवली असती तर बहार आली असती.

२.
खेळ खेळताना म्हणायचे गाणे वाटते (हे उत्तम) - तसे असल्यास शेवटच्या कडव्यात लांबलांब ओळींमुळे ठेका जातो. टाळ्या वाजवत-वाजवत कसे नाचता येणार?

३.
"चिंचेजशी आंबटगोड नाती" बोधवाक्य फारच बटबटीत दिसते. खेळ खेळताना हाच बोध कळे-न-कळे ध्वनित केला असता तर खेळकरपणा तसाच अबाधित राहिला असता.

कवितेची कल्पना सुंदर आहे. बहुतेक कडवी मस्त उतरली आहेत. तुमच्यापाशी प्रतिभा आहे, म्हणून टीका जास्त धारदार करतो आहे, राग मानू नये.

स्वाती फडणीस's picture

5 Aug 2008 - 11:12 pm | स्वाती फडणीस

:)

ऋषिकेश's picture

9 Aug 2008 - 8:51 pm | ऋषिकेश

खेळ खेळताना म्हणायचे गाणे वाटते (हे उत्तम) - तसे असल्यास शेवटच्या कडव्यात लांबलांब ओळींमुळे ठेका जातो. टाळ्या वाजवत-वाजवत कसे नाचता येणार?

असहत.
अनेक खेळाच्या गाण्यात एकसंध ताल नसतो. लहानपणी आईबरोबर अनेक मंगळागौरींना गेल्याचे आठवते आता ती बरीचशी गाणी आठवत नसली तरी कित्येकगाणी अचानक ठेका बदलतात.. विषेशतः समारोपाला वेगळा ठेका येण्यात वेगळी गंमत असु शकते.

उदा: गोफ विणतानाचे गाणे:
गोफ विणू बाई गोफ विणु
अर्ध्या रात्री गोफ विणू
या नंतर लगेच
गरे घ्या गरे,
पोटाला बरे................. वगैरे सुरु होते.

लहान मुलांचे "आळंचो का पाळंचो" या गाण्यात शेवटाचे "दुधात टाकू का दह्याऽऽत" हे ऑफ बीट छान वाटते की

बाकी १ व ३ शी सहमत

स्वाती,
गाणे खूप आवडले.. आता कोणता खेळ खेळताना गायचे ते ही सांग :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

स्वाती फडणीस's picture

6 Aug 2008 - 12:37 am | स्वाती फडणीस

गाभूळ नाती
.

चिंचेचा आकडा गं..
शेपटावाणी वाकडा गं..
चिंचेचा आकडा.. वाकडा गं..

पेरा-पेरात गाठी गं..
चिंचोक्या बाटी गं..
पेरा-पेरात गाठी.. बाटी गं..

आकड्याची गोडी गं..
पोरं यडी-खुळी गं..
आकड्याची खुळी..गोडी गं..

जिभेला हुळहूळ गं..
दाताना कळ गं..
खाताना हुळहूळ.. कळ गं..

चिंच आंबट-गोड गं..
भली-बुरी चव गं..
चिंच आंबट-गोड.. चवीला गं..

चिंच जशी गाभूळ गं..
नाती कच्ची-पक्की गं..
चिंच गाभूळ.. कच्ची-पक्की गं..

=====================
स्वाती फडणीस............. ०५-०८-२००८

अरुण मनोहर's picture

6 Aug 2008 - 7:41 am | अरुण मनोहर

गाभुळलेली कविता मस्त आंबट गोड होती.

फटू's picture

6 Aug 2008 - 9:15 am | फटू

गावाकडची आठवण आली... गावाकडे श्रावणात अशी लोकगीतं म्हणतात... मुहुर्ताची गरज नसते...

छान लिहिलं आहे...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

स्वाती फडणीस's picture

6 Aug 2008 - 1:08 pm | स्वाती फडणीस

:)

विसोबा खेचर's picture

9 Aug 2008 - 11:05 am | विसोबा खेचर

मस्तच कविता...

आपला,
(चिंचेचे डोहाळे लागलेला) तात्या. :)

स्वाती फडणीस's picture

11 Aug 2008 - 12:11 pm | स्वाती फडणीस

:)