मराठी शिलालेखांतील शापवचने

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
23 Sep 2014 - 11:42 pm

डिस्क्लेमरः खालील शापवचने मराठीतील प्राचीन शिलालेखांतील आणि मुख्यतः शिलाहार यादव आणि विजयनगरच्या राजांच्या काळातील आहेत. जरी ती कुणाला असभ्य वाटली (तशी ती असभ्य आहेतच) तरी ती केवळ तत्कालीन प्रथेचा भाग होती असे समजून वाचावीत.

सुरुवातीला हा प्रतिसाद शशिकांत ओकांच्या ह्या धाग्यावर देणार होतो पण लिहिता लिहिता प्रतिसाद बर्‍यापैकी मोठा झाल्याने स्वतंत्र धागा काढूनच आपणांसमोर आणत आहे.

गधेगाळीसंबंधी माहिती आधीच वीरगळ आणि गधेगाळ ह्या धाग्यात लिहिलेली आहेच तेव्हा त्याची परत येथे पुनरुक्ती न करता केवळ काही शापवचने थोडक्यात देतो.

सर्वसाधारणपणे दिलेल्या दानाला जो कोणी बाधा आणेल अथवा जो कोणी हे दान मोडीला अशा व्यक्तीस अनुलक्षून गधेगाळींतील शापवचने असतात.
तेहाची माय गाढव ... हे तर बहुतेकांना माहित आहेच.

इतर काही शापवचने पुढीलप्रमाणे

१.
स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां |
षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: ||

हे शापवचन बर्‍याच शिलालेखांत आढळते.
जो स्वकीय अथवा परकीय या पृथ्वीचे (दानाचे) हरण करेल तो ६००० वर्षे विष्ठेमधला कृमी होऊन राहील.

२. ससन करुनु ग्रामु दिधला हे सासन लोपि तेआसि गोहत्या ब्रम्ह-
हत्या बाळहत्या पडे तेयाचीऐ माऐसि गाडौ घोडु |
विजयनगरचा संगम हरिहर ह्याचा हा लेख गोव्यातील वेळूस गावातला. (इ.स. १४०२)
हे शासन जो मोडील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालहत्या ही पातके लागून त्याच्या आईस गाढव व घोडा.

३. शिलाहार अपरादित्य (द्वितीय) याचा लोनाड शिलालेख (इ.स. ११८४)

इये शासने लिखिता भाषा जो लोपि अथवा लोपावि यो गर्दभनाथु गर्दभु
तेहाचिए मांए सूर्यपर्वे गर्दभु झवे इति विचार्य तथा यस्य यस्य यदा भूमिस्तस्य

ह्या शासनाचा जो लोप करील तो गाढवांचा नाथ गाढव व त्याचे आईस सूर्यपर्वात गाढव लागेल याचा विचार करून त्याप्रमाणे करावे.

४. पंढरपूरचा विठ्ठलदेवाचा शिलालेख (शके ११११)

कवणु अतिसो देई तेआ-
सी वीठलाची आण
ए काज जो फेडि
तो धात्रुद्रोहि

शके ११११ रोजी सौम्य संवत्सरी (भिल्लम यादवाच्या) काळात महाजन, देवभक्त परिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ बांधले.
(या देवळास) कोणी अतिसो (पीडा/ उपद्रव) करील त्यास विठ्ठलाची शपथ आहे. हे कार्य जो नष्ट करील तो धातृद्रोही होय.

५. .उदयादित्याचा आंबेजोगाई येथील शिलालेख. (शके १०६६)

जो फेडी लोपी तेआ योगिनींचा वज्रदंडू पडे

हे शासन जो कोणी नष्ट करेल अथवा लुप्त करेल त्यावर योगिनींचा वज्रदंड पडेल.

६. विजयनगरचा संगम देवराय याचा गोवे- वेळूस शिलालेख (शके १४०८)
स्र्हीरवळनाथा श्रीमाहादेवासी १० नैवेद्या चंद्रूसूर्यू तपे
सासन लोपी तेआअ गोहते ब्रम्हते बआळते पडे
तेआची माए गर्धभे...

श्रीरवळनाथ महादेवाच्या १० नैवेद्यांसाठी हे दान दिले आहे. हे शासन जो ल्पील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालह्त्या ही पातके लागतील व त्याच्या आईस...

७. जैत्र सामंत याचा जालगाव ताम्रपट (शके ११२४)

हे ठाकली भाषा चंद्रार्कपर्य<त जो मेली तो श्वान
गधभ चांडालु

ही भाषा (हे दानपत्र) चंद्र व सूर्य आहेत तो पर्यंत सिद्ध आहे. ती जो कोणी फेडील तो श्वान, गर्दभ व चांडाळ होय.

८. सिंघण यादवाचा फुलंब्री शिलालेख (शके ११६४)

जो मढाचे अयगत स्वोधाराए घेयवे ए
मढु फेडील यचा दोषु ब्रम्हणभोजना फेडील यचा दोषुकरि

ह्या मठाचे (देवळाचे) उत्पन्न स्वतःकडे घेणे हे ब्राह्मणभोजनाच विरोध करण्यासारखे असून असे करणारा तसा दोषकरी होईल.

९. .विजयनगरचा संगम देवराय याच्या वेळचा बांदोडे शिलालेख (शके १३३५)

पाळावा केला हा धर्मु जो मोडि
तेणे वाराण
सि श्री विस्वेस्वरा सनिधि सूर्यग्रहणिं आपुला मातापिता गाए वदिल्या
पापासि जाए |

हा धर्म जो मोडील त्याने काशी येथे श्री विश्वेश्वरासन्निध सूर्यग्रहणाच्या वेळेस आपले आईबाप व गाई वधिल्या असे समजावे. त्यास हे पाप लागेल.

१०. यादव रामचंद्रदेवाचा वेळापूर शिलालेख (शके १२२२)

पाली तो स्वर्गा
जाए न पाली तो नरका जाए

हे दान जो पालन करील तो स्वर्गात जाईल, न करील तो नरकात जाईल.

११. पंढरपूर येथील विठ्ठलदेवाचा शिलालेख ( शके १२३३)
हा धर्मु जो नाणि लोपि तो मळकु पाली ते-
आचा धर्मु | परिवंडे मराठे | सेवकु
विठलदेवा खेत्रपति सदैवु

धाधर्म जो नष्ट करील तो मळकु (पापी) व जो पाळील याचे मराठी सेवक विठ्ठलदेवाचे सदैव क्षेत्रपती होत.

१२. शिलाहार अपरादित्य याचा परळ शिलालेख ( शके ११०८)

अथ तु जो कोणु हुवि ए शासन लो-
पि तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबिआ पडे||
तेहाचीए माय गाढवें....

परंतु हे शासन जो कोणी नष्ट करील त्याच्यावर वैद्यनाथाच्या त्रिशुळाचा फाळ त्याच्या सर्व कुटुंबियांसुद्धा पडेल व त्याच्या आईस गाढव...

१३. दाभोळ येथील जामा मशिदीतला मराठी शिलालेख

यासि कोणी हिंदु वा मुसलमान इरे वा इस्ति करिल
त्यावरिश त्याचे मएअवरि गडदा असे जाणिजे

जो हिंदु अथवा मुसलमान ह्या स्थानाचा अवमान करील त्याचे मायेस गाढव.. असे समजा.

संदर्भः प्राचीन मराठी कोरीव लेख (शं. गो. तुळपुळे)

संस्कृतीइतिहाससंदर्भ

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 11:48 pm | बॅटमॅन

मी पयला!!!!!!!!!!

वल्लीशेठच्या लेखाला न्याय मिळेलशी प्रतिक्रिया नंतर यथावकाश देईनच, तूर्त ही पोच फक्त.

एस's picture

23 Sep 2014 - 11:48 pm | एस

मी पयला!.... ;-)

एस's picture

23 Sep 2014 - 11:49 pm | एस

श्याट!!!!!

ब्याट्या!!! XXXXXXXX

आदूबाळ's picture

24 Sep 2014 - 12:33 am | आदूबाळ

श्याट!!!!!

गधेगाळीला शोभेलसा प्रतिसाद ;)

>>गधेगाळीला शोभेलसा प्रतिसाद

__/\__ =))))

अत्रुप्त आत्मा's picture

24 Sep 2014 - 12:01 am | अत्रुप्त आत्मा

श्या...न्ना इतकी प्राचीन प्रंपरा
आता बोला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! =))

मार्क ट्वेन's picture

24 Sep 2014 - 12:31 am | मार्क ट्वेन

एकविसाव्या शतकातही अशी अनेक शापवचने आढळली आहेत. विशेषकरून पुण्यग्रामाच्या आसपास.
उदा - इये सोसायटीचिये फाटकासमोरु पार्किंग करी तो गाडौ जाणावा
इये भिंतीवरू थुंकी तेहाची माय गर्दभे इ. इ.

रामपुरी's picture

24 Sep 2014 - 1:13 am | रामपुरी

गाढव घोड्याची परंपरा एवढी मागे जाते हे माहीतच नव्हतं. आता शिव्या देताना परंपरेचं पालन केल्याचासुद्धा आनंद मिळेल.

पिवळा डांबिस's picture

24 Sep 2014 - 2:20 am | पिवळा डांबिस

या पवित्र परंपरेचा पाईक रहाण्याची पात्रता अंगी टिकावी म्हणून सदैव प्रयत्न करीन!!!!
:)

कवितानागेश's picture

24 Sep 2014 - 11:49 am | कवितानागेश

पुढची ओळ?
=))

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2014 - 2:53 am | पिवळा डांबिस

त्यापाई मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा, आणि वडिलधार्‍या माणसांचा प्राण घेईन!!
आणि सर्वांशी औधत्याने वागेन.
माझं मिपा आणि इब्लिस मिपाकर यांच्याशी सदैव टवाळक्या करण्याची मी प्रतिज्ञा घेतो.
त्यांचे कट्टे आणि त्यांची ऐशीतैशी यांतच माझे सौख्य सामावले आहे!!!
:)

(आमीबी चार धागे तोडल्यात म्हंटलं, तटातटा!!!!)
:)

कवितानागेश's picture

26 Sep 2014 - 9:35 am | कवितानागेश

बेस्ट =))

बॅटमॅन's picture

26 Sep 2014 - 3:10 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

अन्या दातार's picture

24 Sep 2014 - 4:54 am | अन्या दातार

रामपुरी व डांबिसकाकांशी एक कोल्हापुरकर म्हणून जोर्दार सहमत :)

स्पा's picture

24 Sep 2014 - 7:11 am | स्पा

खिक्क

धन्या's picture

24 Sep 2014 - 7:57 am | धन्या

किती ती समृद्ध परंपरा...

लावल्ली लवंगी फटाक्यांची माळ.

अनुप ढेरे's picture

24 Sep 2014 - 9:34 am | अनुप ढेरे

हा हा हा. भारी!

विलासराव's picture

24 Sep 2014 - 10:20 am | विलासराव

हे शिलालेख ज्यांच्या आदेशावरुन लिहीले त्यांच्या *** ** ***!!!!!!!!!!!!

नाव आडनाव's picture

24 Sep 2014 - 10:48 am | नाव आडनाव

:)
वा विलासराव ! वर दिलेल्या १३ जुन्या रेफरंस नंतर २१ व्या शतकातला रेफरंस म्हणून तुमची ही प्रतिक्रिया दिली जाईल :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2014 - 10:58 am | डॉ सुहास म्हात्रे

बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय? =))

वल्लीशेट, तुस्सी ग्रेट हो !

विलासराव's picture

24 Sep 2014 - 12:43 pm | विलासराव

बघा, बघा. इतकी बहरलेली प्राचीन परंपरा असलेल्या शिव्यांना शिव्या देणे शोभते काय?

अरेरे!!!!!! मी तर शाप देणार्यांना ऊ:शाप दिलाय असेच समजत होतो.

मृत्युन्जय's picture

24 Sep 2014 - 11:24 am | मृत्युन्जय

आयला पुर्वज लै ड्यांजर होते. कसले कसले घाणेरडे शाप द्यायचे.

वल्लीबुवा यातील बहुतांश वचनांबाबत तो मूळचा आदेश/ नियम / कायदा इ इ काय होता की जो मोडल्यास त्या मोडणा-यांच्या मातु:श्रीना पशुप्रेमाची संधी दिली जात होती ते समजेल तर त्या कायद्यांचे कितपत महत्व होते तेही कळेल.

बहुतेकदा देवळास दिलेले दान उदा. माळ्याने काही फुले, तेल्याने काही तेल, सुताराने डागडुजीचे काम, इ.इ. काँट्रि करणे, रोज अभिषेक करणे, इ. नियम. ते मोडणारास,

किंवा काही जमीन ब्राह्मणांस दान म्हणून दिलेली असे ती व्यवस्था मोडणारास इ.इ.

प्रचेतस's picture

24 Sep 2014 - 7:18 pm | प्रचेतस

यात देऊळ बांधणे, अग्रहार देणे, मूर्ती स्थापन करणे, वतन देणे आदी व्यवस्थांचाही समावेश होतो.

हरकाम्या's picture

25 Sep 2014 - 11:44 pm | हरकाम्या

" पशुप्रेम " शब्दाबद्दल " गवि " चे अभिनन्दन . हा शब्द्प्रयोग वाचुनन्मी डोळ्यात पाणी येइइपर्यन्त हसलो.

टवाळ कार्टा's picture

26 Sep 2014 - 10:00 am | टवाळ कार्टा

=))

पण नियमाने हे अश्वमेध यज्ञातही यजमानाच्या घरच्यान्च्या वाट्याला येत असे ऐकिवात आहे. पण बहुदा तो गैरसमज असावा अथवा मला चुकीची माहिती मिळाली असावी.(संदर्भ अर्थातच चार्वाक : आह सालूंखे) असो.

किसन शिंदे's picture

24 Sep 2014 - 12:09 pm | किसन शिंदे

म्हणजे शिव्यांना फार अतिप्राचीन परंपरा आहे तर!! :-) एकापेक्षा एक डेन्जर शिलालेख आहेत मायला. =))

प्यारे१'s picture

24 Sep 2014 - 12:34 pm | प्यारे१

आणि लोक उगाच काम न करणाराला गाढव म्हणतात.

बघा बघा गाढव कित्ती 'कामा'चं आहे ते.

वल्ल्या, भारीच रे!

प्रमोद देर्देकर's picture

24 Sep 2014 - 1:27 pm | प्रमोद देर्देकर

वल्लीशेठ नेहमी प्रमाणेच लय भारी खोदकाम.

झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर.

चला कांडी टाकली आता पळा!!!

झालं नुकतंच मि.पा वर असलेलं निराकार गाढवाची मान ताठ झाली असेल. आता ते उलटुन येतय बघा हा लेख वाचल्यावर.

अश्लील, अश्लील ;)

जेपी's picture

24 Sep 2014 - 12:42 pm | जेपी

लै भारी.
लोक उगाच नाव ठेवत्यात आताची पिढी बिघडली मनुनशान

सस्नेह's picture

24 Sep 2014 - 12:43 pm | सस्नेह

बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील.
संशोधन करावे, ही इणंती इशेष !

विलासराव's picture

24 Sep 2014 - 12:58 pm | विलासराव

बाकी, काही आदरार्थी संबोधने बापाला उद्देशूनही असतील.

अर्थातच असतील. माझ्यामते आर्थीक/शारिरीक आनी मानसीक /भावनीक अशा शाखा ढोबळमानाने असाव्यात.

जसे की तुझ्या बापाचं खातोय का? तुझ्या बापाची जागा आहे का? तुझ्या बापानी ठेव ठेवलीये का? तुझ्या बापाचा नोकर आहे का? ई.
दुसर्या शाखेवर बरेचसे ज्ञानकण आधीच उधळले/सांडले गेलेले आहेतच.

संशोधन करावे, ही इणंती इशेष !

वरील संशोधन केलेले लोक तितक्याच ईमानेईतबारे हे काम करु शकतील की नाही ही शंका आहे. मी करु शकलो असतो कदाचीत पण तेवढा अभ्यास नाहीये माझा.

फारतर आम्ही मित्र आपापसात एकमेकांना प्रेमाने एकमेकांच्या बापांच्या नावाने हाक मारायचो बुवा कालेजात.

शैलेन्द्र's picture

24 Sep 2014 - 12:46 pm | शैलेन्द्र

मस्त लेख..

आमच्या डोंबिवलीचा गधेगाळ आठवला..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2014 - 12:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्वा...!! सालं त्या काळातला समाज सध्या समाजापेक्षा जास्त चावट होता असे म्हणावे वाटते.
सालं सभ्यपणा नव्हताच. सध्याच्या पिढीने नवीन काहीच भर घातली नाही. ;)

वल्लीशेठ, अजून येऊ द्या. शिलालेखाचे फोटोसहीत.

-दिलीप बिरुटे

बॅटमॅन's picture

24 Sep 2014 - 2:49 pm | बॅटमॅन

इंग्रजांच्या अंमलाखाली महाराष्ट्र सोवळा अन दांभिक बनला असे आमचे स्पष्ट मत आहे. तो हँगओव्हर इतका गच्च बसलाय की अजूनही तीच डिफॉल्ट स्थिती असे म्हटल्या जाते.

हा घ्या रतनवाडीतील अमृतेश्वर मंदिराच्या पुढ्यातील गधेगाळ.
दुर्दैवाने ह्यावरचा शिलालेख पूर्ण झिजून गेला आहे. पण शिवपिंडीवरचा अभिषेक पाहून निश्चितपणे मंदिराच्या काहीतरी व्यवस्थेसंबंधी असावा.

a

ही गधेगाळ नसून हत्तीगाळ आहे असा आपल्याशी मध्ये झालेल्या चर्चेत निष्कर्ष काढल्या गेला होता.

प्रचेतस's picture

25 Sep 2014 - 8:49 am | प्रचेतस

हो. हत्तीगाळच आहे. पण सरसकटपणे ह्यांना गधेगाळच (ass curses stones) म्हटल्या जाते.

बॅटमॅन's picture

25 Sep 2014 - 12:35 pm | बॅटमॅन

हम्म रैट्ट.

मदनबाण's picture

24 Sep 2014 - 1:11 pm | मदनबाण

निराकार गाढव आता झीट येउन पडेल ! ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ई निविदा घोटाळा प्रकरण : महापालिकेचे नऊ अभियंते निलंबित

शिद's picture

24 Sep 2014 - 1:30 pm | शिद

रोचक माहिती.

सुहास..'s picture

24 Sep 2014 - 2:57 pm | सुहास..

हम्म ! अस्स आहे तरं

सूड's picture

24 Sep 2014 - 2:59 pm | सूड

मिपाशापवाणी !! ;)

अथ तु जो कोणु हुवि ए लेखा नावे ठेवि तेहाचीए खरडवहे मोजींचा लेखु अष्टोत्तरशत दिवसु चोप्यपेस्तु...तदुपरिही नावे ठेवि तेहाचिए खरडवहे अआंचे काव्य

सूड's picture

24 Sep 2014 - 3:00 pm | सूड

ह घ्या हो !! ;)

आतिवास's picture

24 Sep 2014 - 3:22 pm | आतिवास

धन्यवाद.
आपण ज्या संस्कृतीचं रक्षण करू पाहतोय, त्या संस्कृतीत 'अशाही' गोष्टी होत्या - आणि 'गावंढ्या' (!) लोकांनी नाही तर सुसंस्कृत लोकांनी असे शब्दप्रयोग वापरले होते; हे समजल्यावर संस्कृतीरक्षकांची प्रतिक्रिया 'पाहायला' मजा येते नेहमीच.

काय योग्य आणि काय अयोग्य याचे सामाजिक संदर्भ वेळ, काळ, परिस्थिती, व्यक्ती... यांच्यानुसार बदलत असतात हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

सूड's picture

24 Sep 2014 - 3:27 pm | सूड

अगदी !!

बॅटमॅन's picture

24 Sep 2014 - 3:46 pm | बॅटमॅन

याला म्हंटात बॅलन्स्ड प्रतिसाद.

एकदम सहमत.

प्रचेतस's picture

24 Sep 2014 - 7:24 pm | प्रचेतस

सहमत.

अर्थात शापवचनांपेक्षा मांगल्यसूचक वचने बरीच जास्त आहेत पण लक्षात कोण घेतो.
रा. चिं. ढेरे यांनी 'शिवी आणि समाजेतिहास' ह्या एका प्रकरणात शापवचनांचे विस्तृत विवेचन केले आहे.

पैसा's picture

24 Sep 2014 - 3:26 pm | पैसा

सध्या काय रासभ नाम पक्ष वगैरे सुरू आहे की काय? ;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2014 - 3:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

"आपण लिहीलेल्या दगडावरची रेघ असलेल्या अमर साहित्याचे मिपावर असे मुल्यमापन होत आहे हे पाहून पितृपक्षात भेट देणार्‍या पूर्वजांना काय वाटत असेल बरे?" असा विचार मनात उगाचच डोकावला.

(... आणि त्यांत कोणी एखादा गरम डोक्याचा खड्गधारी पूर्वज असल्यास वल्लींचे काय ? अशी काळजीही वाटून गेली ;) )

प्रचेतस's picture

24 Sep 2014 - 7:24 pm | प्रचेतस

अगदी अगदी =))

पैसा's picture

24 Sep 2014 - 9:21 pm | पैसा

त्यांचा एक प्रतिनिधी मिपावरच वल्लीवर शिव्या शाप, बंदुका, बॉम्ब आदिंचा वर्षाव करत असतो!

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Sep 2014 - 11:37 pm | डॉ सुहास म्हात्रे

हो ना ! त्याची या कामावर कायमस्वरुपी नेमणूक झालेली आहे ! :)

प्रचेतस's picture

25 Sep 2014 - 8:50 am | प्रचेतस

कोण म्हणे तो प्रतिनिधी?

बॅटमॅन's picture

25 Sep 2014 - 12:35 pm | बॅटमॅन

कोण हो कोण म्हणे तो?

पैसा's picture

25 Sep 2014 - 4:38 pm | पैसा

a

बॅटमॅन's picture

25 Sep 2014 - 4:45 pm | बॅटमॅन

"प्रत्येक अत्रुप्त आत्म्यामागे एक पाशवी शक्ती असते" या विधानास सार्थ करणारे चित्र ;)

झकासराव's picture

24 Sep 2014 - 5:32 pm | झकासराव

वल्ली म्हणजे आयडी सार्थ करणारा माणुस आहे :)

यसवायजी's picture

24 Sep 2014 - 8:54 pm | यसवायजी

+123321

धन्या's picture

24 Sep 2014 - 10:03 pm | धन्या

14०

किसन शिंदे's picture

25 Sep 2014 - 9:50 am | किसन शिंदे

+४२०

राजेश घासकडवी's picture

24 Sep 2014 - 10:05 pm | राजेश घासकडवी

मस्त

ही माझी नवीन स्वाक्षरी

- स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत प्रतिसादः|
षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: ||

मुक्त विहारि's picture

25 Sep 2014 - 2:58 pm | मुक्त विहारि

आवडला...

एकूण घोडा आणि गाढव, फार पुर्वीपासूनच "कामा"ला जुंपले जायचे.

मनीषा's picture

25 Sep 2014 - 4:54 pm | मनीषा

शिव्या आणि शापां संबंधी अभ्यासु लेख वाचून संतोष जाहला .
संत मंडळी देखिल यात मागे नव्हती हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला.

इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत?

>>इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत?

हीन नव्हतेच लेखत!! वशाडी येवो त्या ब्रिटिशांवर, त्यांनी सगळी सभ्यता का कायची लेबलं लावलंनीत!!

संत तुकारामांची(चा) गाथा वाचू गेल्यास झीट येईल अशा शिव्या आहेत. प्राकृत गधेगाळच जणू.

बॅटमॅन's picture

26 Sep 2014 - 3:12 pm | बॅटमॅन

अन या परंपरेला हुच्चभ्रू पंडितकवीही अपवाद नव्हते म्हटलं. उदा. मोरोपंतसमकालीन एका अज्ञात कवीची ही आर्या पहा:-

यतिने न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा |
सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा ||

हाय का तोड?

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2014 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा

=)) ... =)) ... =))

मोडका माचा सुरतमधेच नव्हे तर वापी, विरार, दमण , बडोदे आदि सर्वत्रच घातक ..

येक थोडं "लोड कामाचा" बसतंय का बघा की पीयल..

बॅटमॅन's picture

26 Sep 2014 - 5:04 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी....
मोरोपंती व्यवस्था बाकी एकदम चोख हो. दुस्रा शब्द घालूनपण बस्तंय बगा.