✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मराठी शिलालेखांतील शापवचने

प
प्रचेतस यांनी
Tue, 09/23/2014 - 23:42  ·  लेख
लेख
डिस्क्लेमरः खालील शापवचने मराठीतील प्राचीन शिलालेखांतील आणि मुख्यतः शिलाहार यादव आणि विजयनगरच्या राजांच्या काळातील आहेत. जरी ती कुणाला असभ्य वाटली (तशी ती असभ्य आहेतच) तरी ती केवळ तत्कालीन प्रथेचा भाग होती असे समजून वाचावीत. सुरुवातीला हा प्रतिसाद शशिकांत ओकांच्या ह्या धाग्यावर देणार होतो पण लिहिता लिहिता प्रतिसाद बर्‍यापैकी मोठा झाल्याने स्वतंत्र धागा काढूनच आपणांसमोर आणत आहे. गधेगाळीसंबंधी माहिती आधीच वीरगळ आणि गधेगाळ ह्या धाग्यात लिहिलेली आहेच तेव्हा त्याची परत येथे पुनरुक्ती न करता केवळ काही शापवचने थोडक्यात देतो. सर्वसाधारणपणे दिलेल्या दानाला जो कोणी बाधा आणेल अथवा जो कोणी हे दान मोडीला अशा व्यक्तीस अनुलक्षून गधेगाळींतील शापवचने असतात. तेहाची माय गाढव ... हे तर बहुतेकांना माहित आहेच. इतर काही शापवचने पुढीलप्रमाणे १. स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत वसुंधरां | षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: || हे शापवचन बर्‍याच शिलालेखांत आढळते. जो स्वकीय अथवा परकीय या पृथ्वीचे (दानाचे) हरण करेल तो ६००० वर्षे विष्ठेमधला कृमी होऊन राहील. २. ससन करुनु ग्रामु दिधला हे सासन लोपि तेआसि गोहत्या ब्रम्ह- हत्या बाळहत्या पडे तेयाचीऐ माऐसि गाडौ घोडु | विजयनगरचा संगम हरिहर ह्याचा हा लेख गोव्यातील वेळूस गावातला. (इ.स. १४०२) हे शासन जो मोडील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालहत्या ही पातके लागून त्याच्या आईस गाढव व घोडा. ३. शिलाहार अपरादित्य (द्वितीय) याचा लोनाड शिलालेख (इ.स. ११८४) इये शासने लिखिता भाषा जो लोपि अथवा लोपावि यो गर्दभनाथु गर्दभु तेहाचिए मांए सूर्यपर्वे गर्दभु झवे इति विचार्य तथा यस्य यस्य यदा भूमिस्तस्य ह्या शासनाचा जो लोप करील तो गाढवांचा नाथ गाढव व त्याचे आईस सूर्यपर्वात गाढव लागेल याचा विचार करून त्याप्रमाणे करावे. ४. पंढरपूरचा विठ्ठलदेवाचा शिलालेख (शके ११११) कवणु अतिसो देई तेआ- सी वीठलाची आण ए काज जो फेडि तो धात्रुद्रोहि शके ११११ रोजी सौम्य संवत्सरी (भिल्लम यादवाच्या) काळात महाजन, देवभक्त परिवार, मुद्रहस्त विठ्ठलदेवनायक या सर्वांनी हे लहान असे देऊळ बांधले. (या देवळास) कोणी अतिसो (पीडा/ उपद्रव) करील त्यास विठ्ठलाची शपथ आहे. हे कार्य जो नष्ट करील तो धातृद्रोही होय. ५. .उदयादित्याचा आंबेजोगाई येथील शिलालेख. (शके १०६६) जो फेडी लोपी तेआ योगिनींचा वज्रदंडू पडे हे शासन जो कोणी नष्ट करेल अथवा लुप्त करेल त्यावर योगिनींचा वज्रदंड पडेल. ६. विजयनगरचा संगम देवराय याचा गोवे- वेळूस शिलालेख (शके १४०८) स्र्हीरवळनाथा श्रीमाहादेवासी १० नैवेद्या चंद्रूसूर्यू तपे सासन लोपी तेआअ गोहते ब्रम्हते बआळते पडे तेआची माए गर्धभे... श्रीरवळनाथ महादेवाच्या १० नैवेद्यांसाठी हे दान दिले आहे. हे शासन जो ल्पील त्यास गोहत्या, ब्रह्महत्या व बालह्त्या ही पातके लागतील व त्याच्या आईस... ७. जैत्र सामंत याचा जालगाव ताम्रपट (शके ११२४) हे ठाकली भाषा चंद्रार्कपर्यत जो मेली तो श्वान गधभ चांडालु ही भाषा (हे दानपत्र) चंद्र व सूर्य आहेत तो पर्यंत सिद्ध आहे. ती जो कोणी फेडील तो श्वान, गर्दभ व चांडाळ होय. ८. सिंघण यादवाचा फुलंब्री शिलालेख (शके ११६४) जो मढाचे अयगत स्वोधाराए घेयवे ए मढु फेडील यचा दोषु ब्रम्हणभोजना फेडील यचा दोषुकरि ह्या मठाचे (देवळाचे) उत्पन्न स्वतःकडे घेणे हे ब्राह्मणभोजनाच विरोध करण्यासारखे असून असे करणारा तसा दोषकरी होईल. ९. .विजयनगरचा संगम देवराय याच्या वेळचा बांदोडे शिलालेख (शके १३३५) पाळावा केला हा धर्मु जो मोडि तेणे वाराण सि श्री विस्वेस्वरा सनिधि सूर्यग्रहणिं आपुला मातापिता गाए वदिल्या पापासि जाए | हा धर्म जो मोडील त्याने काशी येथे श्री विश्वेश्वरासन्निध सूर्यग्रहणाच्या वेळेस आपले आईबाप व गाई वधिल्या असे समजावे. त्यास हे पाप लागेल. १०. यादव रामचंद्रदेवाचा वेळापूर शिलालेख (शके १२२२) पाली तो स्वर्गा जाए न पाली तो नरका जाए हे दान जो पालन करील तो स्वर्गात जाईल, न करील तो नरकात जाईल. ११. पंढरपूर येथील विठ्ठलदेवाचा शिलालेख ( शके १२३३) हा धर्मु जो नाणि लोपि तो मळकु पाली ते- आचा धर्मु | परिवंडे मराठे | सेवकु विठलदेवा खेत्रपति सदैवु धाधर्म जो नष्ट करील तो मळकु (पापी) व जो पाळील याचे मराठी सेवक विठ्ठलदेवाचे सदैव क्षेत्रपती होत. १२. शिलाहार अपरादित्य याचा परळ शिलालेख ( शके ११०८) अथ तु जो कोणु हुवि ए शासन लो- पि तेया श्री वैद्यनाथ देवाची भाल सकुटुंबिआ पडे|| तेहाचीए माय गाढवें.... परंतु हे शासन जो कोणी नष्ट करील त्याच्यावर वैद्यनाथाच्या त्रिशुळाचा फाळ त्याच्या सर्व कुटुंबियांसुद्धा पडेल व त्याच्या आईस गाढव... १३. दाभोळ येथील जामा मशिदीतला मराठी शिलालेख यासि कोणी हिंदु वा मुसलमान इरे वा इस्ति करिल त्यावरिश त्याचे मएअवरि गडदा असे जाणिजे जो हिंदु अथवा मुसलमान ह्या स्थानाचा अवमान करील त्याचे मायेस गाढव.. असे समजा. संदर्भः प्राचीन मराठी कोरीव लेख (शं. गो. तुळपुळे)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
संदर्भ

प्रतिक्रिया द्या
35147 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

याला म्हंटात बॅलन्स्ड

बॅटमॅन
Wed, 09/24/2014 - 15:46 नवीन
याला म्हंटात बॅलन्स्ड प्रतिसाद. एकदम सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

सहमत.

प्रचेतस
Wed, 09/24/2014 - 19:24 नवीन
सहमत. अर्थात शापवचनांपेक्षा मांगल्यसूचक वचने बरीच जास्त आहेत पण लक्षात कोण घेतो. रा. चिं. ढेरे यांनी 'शिवी आणि समाजेतिहास' ह्या एका प्रकरणात शापवचनांचे विस्तृत विवेचन केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

अरेच्चा!

पैसा
Wed, 09/24/2014 - 15:26 नवीन
सध्या काय रासभ नाम पक्ष वगैरे सुरू आहे की काय? ;)
  • Log in or register to post comments

"आपण लिहीलेल्या दगडावरची रेघ

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/24/2014 - 15:38 नवीन
"आपण लिहीलेल्या दगडावरची रेघ असलेल्या अमर साहित्याचे मिपावर असे मुल्यमापन होत आहे हे पाहून पितृपक्षात भेट देणार्‍या पूर्वजांना काय वाटत असेल बरे?" असा विचार मनात उगाचच डोकावला. (... आणि त्यांत कोणी एखादा गरम डोक्याचा खड्गधारी पूर्वज असल्यास वल्लींचे काय ? अशी काळजीही वाटून गेली ;) )
  • Log in or register to post comments

अगदी अगदी

प्रचेतस
Wed, 09/24/2014 - 19:24 नवीन
अगदी अगदी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

खिक्क!

पैसा
Wed, 09/24/2014 - 21:21 नवीन
त्यांचा एक प्रतिनिधी मिपावरच वल्लीवर शिव्या शाप, बंदुका, बॉम्ब आदिंचा वर्षाव करत असतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हो ना ! त्याची या कामावर

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/24/2014 - 23:37 नवीन
हो ना ! त्याची या कामावर कायमस्वरुपी नेमणूक झालेली आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

कोण म्हणे तो प्रतिनिधी?

प्रचेतस
गुरुवार, 09/25/2014 - 08:50 नवीन
कोण म्हणे तो प्रतिनिधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कोण हो कोण म्हणे तो?

बॅटमॅन
गुरुवार, 09/25/2014 - 12:35 नवीन
कोण हो कोण म्हणे तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हा बघा

पैसा
गुरुवार, 09/25/2014 - 16:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

"प्रत्येक अत्रुप्त

बॅटमॅन
गुरुवार, 09/25/2014 - 16:45 नवीन
"प्रत्येक अत्रुप्त आत्म्यामागे एक पाशवी शक्ती असते" या विधानास सार्थ करणारे चित्र ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

वल्ली म्हणजे आयडी सार्थ

झकासराव
Wed, 09/24/2014 - 17:32 नवीन
वल्ली म्हणजे आयडी सार्थ करणारा माणुस आहे :)
  • Log in or register to post comments

+123321

यसवायजी
Wed, 09/24/2014 - 20:54 नवीन
+123321
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव

14०

धन्या
Wed, 09/24/2014 - 22:03 नवीन
14०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यसवायजी

+४२०

किसन शिंदे
गुरुवार, 09/25/2014 - 09:50 नवीन
+४२०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मस्त

राजेश घासकडवी
Wed, 09/24/2014 - 22:05 नवीन
मस्त ही माझी नवीन स्वाक्षरी - स्वदत्तां परदत्तां वा यो हरेत प्रतिसादः| षष्टिं वर्षसहस्राणि विष्टायां जायते कृमि: ||
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मुक्त विहारि
गुरुवार, 09/25/2014 - 14:58 नवीन
आवडला... एकूण घोडा आणि गाढव, फार पुर्वीपासूनच "कामा"ला जुंपले जायचे.
  • Log in or register to post comments

शिव्या आणि शापां संबंधी

मनीषा
गुरुवार, 09/25/2014 - 16:54 नवीन
शिव्या आणि शापां संबंधी अभ्यासु लेख वाचून संतोष जाहला . संत मंडळी देखिल यात मागे नव्हती हे वाचून त्यांच्याबद्दलचा आदर दुणावला. इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत?
  • Log in or register to post comments

>>इतक्या उच्चं आणि थोर

सूड
गुरुवार, 09/25/2014 - 17:11 नवीन
>>इतक्या उच्चं आणि थोर परंपरेला हीन का लेखत असावेत? हीन नव्हतेच लेखत!! वशाडी येवो त्या ब्रिटिशांवर, त्यांनी सगळी सभ्यता का कायची लेबलं लावलंनीत!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

संत तुकारामांची(चा) गाथा वाचू

प्यारे१
गुरुवार, 09/25/2014 - 18:19 नवीन
संत तुकारामांची(चा) गाथा वाचू गेल्यास झीट येईल अशा शिव्या आहेत. प्राकृत गधेगाळच जणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनीषा

+१

बॅटमॅन
Fri, 09/26/2014 - 15:12 नवीन
अन या परंपरेला हुच्चभ्रू पंडितकवीही अपवाद नव्हते म्हटलं. उदा. मोरोपंतसमकालीन एका अज्ञात कवीची ही आर्या पहा:- यतिने न वागवावा चित्तांत अल्पहि मोड कामाचा | सुरतीं घातक जैसा युवदांपत्यासि मोडका माचा || हाय का तोड?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

... ...

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/26/2014 - 16:01 नवीन
=)) ... =)) ... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मोडका माचा सुरतमधेच नव्हे तर

गवि
Fri, 09/26/2014 - 16:24 नवीन
मोडका माचा सुरतमधेच नव्हे तर वापी, विरार, दमण , बडोदे आदि सर्वत्रच घातक .. येक थोडं "लोड कामाचा" बसतंय का बघा की पीयल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी....

बॅटमॅन
Fri, 09/26/2014 - 17:04 नवीन
हा हा हा, अगदी अगदी.... मोरोपंती व्यवस्था बाकी एकदम चोख हो. दुस्रा शब्द घालूनपण बस्तंय बगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा