एक वाचलेच पाहिजे असे पुस्तक...नशायात्रा....लेखक: तुषार नातू (उर्फ, माझ्या द्रुष्टीने आधूनिक वाल्मिकी...)

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in जनातलं, मनातलं
26 Jun 2014 - 11:45 pm

आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजामध्ये बर्‍याच प्रकारची, किंबहूना अंगी नाना कळा असणारी बरीच माणसे असतात. त्यापैकी काही चित्रकार, काही सैनिक, काही डॉ., काही संगीतकार, तर काही गायकही असतात.काही तुमच्या आमच्या सारखी सामान्यही असतात.

ह्या शिवाय काही दुर्दैवी जीव म्हणजे, अपंग, अंध किंवा मतिमंद असतात.

समाजाचे असेच एक दुर्दैव अंग म्हणजे...व्यसनी माणसे...

आपल्या समाजाच्या दुर्दैवाने, व्यसनी माणसा विषयी, त्याच्या अपरोक्ष फार चांगले बोलल्या जात नाही.त्याला मदतही केल्या जात नाही.तुलनेने सिगरेट्,तंबाखू,दारु,पान आणि विडी ह्यांच्या अधिन झालेल्या माणसांविषयी समाज जास्त बोलत नाही.(समाजाने ही व्यसने, जवळपास स्वीकारलेली आहेत, असेही म्हणता येईल.)खरेतर ह्या व्यसनांच्या अधिन झालेली माणसे पण मदतीच्या अपेक्षेत असतात.

असेच एक समाजाचे दुर्दैवी अंग म्हणजे, गांजेकस,चरसी आणि गर्दुल्ले.

तुषार नातू हा, असाच एक गर्दच्या विळख्यात सापडलेला मनुष्य.

ह्या जीवघेण्या व्यसनातून तर ते बाहेर पडलेच पण त्या शिवाय हे व्यसनच नाही, तर प्रत्येक भारतीय हा निर्व्यसनीच हवा, ह्या ध्येयाने पछाडून त्यांनी "मैत्री" नावांच्या संस्थेत स्वयंसेवक ते समुपदेशक असा दैदीप्यमान प्रवास केला.

गेली ७/८ वर्षे ते पुर्णतः निर्व्यसनी आहेत.त्यांचा ब्लॉग वाचत असतांना, त्यांची आणि माझी ओळख झाली.माझ्या शंकांना आणि माझ्या मैत्रीच्या पुढाकाराला, त्यांनी कधीच नाही म्हटले नाही.

माझ्या ह्या मित्राचे स्वानुभवावरती आधारलेले, नशायात्रा ह्या नावांचे, पुस्तक नुकतेच बाजारांत आले आहे.

मला ज्या गोष्टी अजिबात जमत नाहीत, त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे, पुस्तक परीक्षण.

म्हणून मी श्री. तुषार नातू ह्यांना विनंती केली की, त्यांनी त्यांच्या पुस्तकातील, त्यांना आवडलेला , एखादा भाग मला पाठवावा.फेसबूक वर त्यांनी मला तो भाग पाठवला.तोच भाग मी कॉपी-पेस्ट करून खाली देत आहे.

=================================================================
माझ्या लाडक्या जँकी कुत्र्याला देखील मी हळू हळू गांजा च्या धुराची सवय लावत होतो , अर्थात त्यामागे माझा फक्त कुतूहल हाच हेतू होता त्याला त्रास देणे हा हेतू कधीच नव्हता तरीही ते अतिशय निंद्य कृत्य होते हे मान्य करायला मला संकोच वाटत नाहीय. एका नशेबाज व्यक्तीच्या डोक्यात काय येऊ शकेल हे सांगता येत नाही याचाच हा नमुना आहे .गांजाचे शारीरिक दुष्परिणाम फारसे वेगाने किवा गंभीर होत नाहीत मात्र त्याचा माणसाच्या मेंदूवर खूप भयानक परिणाम होऊ शकतो , गांजा पिऊन पुढे वेड लागलेले अनेक जण मला माहित आहेत . जँकी च्या बाबतीत माझे प्रयोग फक्त गांजा वरच थांबले नाहीत तर पुढे मी ब्राऊन शुगर ओढायला सुरवात केल्यावर जँकी ला ब्राऊन शुगर चा धूर देखील दिला होता व त्यातून भयंकर गंभीर प्रकरण उदभवले होते.

झाले असे की अधून मधून म्हणजे आठवड्यातून एक दोन वेळा मी जँकी ला माझ्या बरोबर संडासात नेऊन त्याच्या तोंडात गांजाचा धूर सोडत असे , नंतर जेव्हा मी ब्राऊन शुगर ओढायला लागलो तेव्हा देखील मला तो प्रयोग पुन्हा जँकी वर करावा असे वाटले व मी ब्राऊन शुगर चा तोंडातील धूर जँकी च्या तोंडात सोडला आता त्याला माझ्या अश्या वागण्याची सवय झाली होती त्या मुळे त्याला फारसे आश्चर्य वाटले नसावे किवा त्याने अविश्वास देखील दर्शवला नाही , ब्राऊन शुगर ही अफू वर रासायनिक प्रक्रिया करून तयार केलेली पावडर असल्याने त्यातील अफू चे गुणधर्म अफुच्या साधारण पाचपट जास्त परिणाम कारक असतात एक प्रकारे अफूचा अर्कच असते ही पावडर याचे व्यसन अतिशय वेगाने लागते व हे व्यसन मिळाले नाही तर दारू व गांजाच्या पेक्ष्या खूप जास्ती शारीरिक त्रास होतात ( विथड्रॉवल्स ) मी पूर्णपणे ब्राऊन शुगर च्या आहारी गेल्यावर माझी भूक मंदावली होती , वजन कमी होत चालले होते , तसेच आता ब्राऊन शुगर साठी लागणारे पैसे जमवणे देखील कठीण होत चालले होते त्यामुळे घरात चोऱ्या करणे , बाहेर उधारी करणे , ओळखीच्या लोकांकडे उसने पैसे मागणे असे प्रकार सुरु झाले होते.

जँकी ला देखील मी जेव्हा चार पाच वेळा ब्राऊन शुगर चा धूर दिला तेव्हा त्याला देखील त्याचे व्यसन लागल्याचे मला जाणवू लागले होते कारण मी संडासात गेलो की तो बाहेरून माझ्यावर भुंकणे सुरु करत असे म्हणजे त्याचा अर्थ असा की त्याला देखील मी आत घ्यावे . माझ्या कडे जेव्हा जास्त पैसे असत व पुरेशी ब्राऊन शुगर असे तेव्हा मी त्याला आत घेऊन ब्राऊन शुगर चा धूर त्याच्या तोंडात सोडत असे , मात्र जेव्हा माझ्या कडे कमी ब्राऊन शुगर असे व माझा मुड ठीक नसे तेव्हा मी त्याच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष करीत असे . मला हे जाणवत होते की माझ्या प्रमाणेच जँकी ला देखील ब्राऊन शुगर मिळाली नाही तर शारीरिक त्रास होत असावा व म्हणून तो जिवाच्या आकांताने बाहेरून भुंकून मला देखील दे अशी विनंती करत असावा पण जँकी त्या बाबतीत सर्वस्वी माझ्यावर अवलंबून असल्याने त्याचा नाईलाज होता म्हणजे मी जर कृपा केली तरच त्याला ब्राऊन शुगर चा धूर मिळत असे . सुरवातीला गांजामुळे वाढलेली जँकी ची भूक नंतर ब्राऊन शुगर मुळे मंदावली होती व तो जरा सुस्त होत चालला होता हे स्पष्ट बदल मी मनात नोंद केले होते.

माझा मोठा भाऊ नुकताच त्याचे पुण्याचे अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण करून पुन्हा घरी आला होता , त्याला बाहेरून माझे सगळे प्रताप समजले होते व तो एकदोन वेळा माझ्याशी माझ्या व्यसनाबाबत बोलला देखील होता पण मी त्याला उडवून लावले होते . माझा मोठा भाऊ स्वभावाने शांत , सालस प्रवृत्तीचा आहे त्यामुळे त्याला माझे वागणे पटत नव्हते तरी तो माझ्याशी भांडण वगैरे करीत नसे शिवाय मी किती बंडखोर आहे व बाहेर कोणकोणत्या प्रकारच्या लोकांमध्ये वावरतो हे त्याला माहित होते , माझा रागीट स्वभाव , हाणामारीला तत्पर असणे या गोष्टींमुळे तो शक्यतो माझ्या बाबतीत बोलणे टाळत असे . एकदा सकाळ पासून मला जरा पैश्यांची चणचण होती त्यामुळे मी वैतागात होतो , सकाळी आईला कुठेतरी समारंभाला बाहेर जायचे होते म्हणून ती लवकर घराबाहेर पडली होती , तिच्या कडून जाताना पैसे घेतले होते पण ते माझ्या व्यसनासाठी पुरेसे नव्हते , मी साधारणतः सकाळी ९ घराबाहेर पडलो होतो अड्ड्यावर गेल्यावर समजले की आदल्या दिवशी पोलिसांची रेड पडली होती आणि त्यामुळे ब्राऊन शुगर मिळणे बंद होते.

हे एकून माझे हातपायच गळाले , तेथे अड्ड्यावर माझ्या सारखे बरेच गर्दुल्ले घोळक्याने उभे होते , एका ठिकाणी मिळत नाही म्हंटल्यावर मग दुसरीकडे कोठे मिळते का याची एकमेकांना विचारणा होत होती एकाने सांगितले की नाशिक शहरात भद्रकाली मध्ये माल ( ब्राऊन शुगर ) मिळतो आहे . ज्यांच्या कडे जास्त पैसे होते ते ताबडतोब बस आणि रिक्षा करून भद्रकाली कडे रवाना झाले , माझ्या कडे जेमतेम पैसे असल्याने माझी अडचण होती नाशिक ' भद्रकाली ' ला बसने जाणे येणे आणि ब्राऊन शुगर खरेदी करणे या साठी पुरेसे पैसे नव्हते फार तर एका वेळचे म्हणजे जाण्याचे किवा येण्याचे पैसे होते , शेवटी येताना पायी येऊ असा निर्धार करून बसने भद्रकाली ला गेलो तेथे ब्राऊन शुगर मिळण्यासाठी बराच वेळ लागला इकडे विड्रॉवल्स मुळे माझा जीव कासावीस झाला होता , शेवटी एकदाची पुडी मिळाली व मी तेथेच आडोश्याला तीनचार दम मारून आधी मला होणारा त्रास थांबविला व मग घरी यायला निघालो भद्रकाली ते नाशिक रोड रेल्वे क्वार्टर्स हे अंतर सुमारे ९ किलोमीटर असावे येताना भाड्यासाठी पैसे नव्हते म्हणून भर उन्हात मी पायी येण्यास निघालो . सुमारे अडीच तास पायी चालून मी घरी आलो घरात मोठा भाऊ होता फक्त , वडील कामावर गेले होते दुपारचे ३ वाजले होते मी घरात आल्याबरोबर सरळ संडासात शिरलो व उरलेली ब्राऊन शुगर ओढण्यास सुरवात केली.

मी घरात आल्याबरोबर जँकी माझ्या मागे पुढे घोटाळू लागला होता पण त्याच्या कडे मी सरळ दुर्लक्ष केले होते. मी संडासात गेल्यावर त्याने भुंकणे सुरु केले याचा अर्थ ' मला पण हवे ' हा होता हे आता मला माहित झाले होते . त्या दिवशी मी सकाळ पासून पनवती लागल्यासारखा फिरलो होतो , वर पैश्यांची अडचण त्यामुळे डोके फिरले होतेच , मी जँकी च्या भुंकण्या कडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो पण ते काही जमेना जेमतेम माझ्यापुरती ब्राऊन शुगर असताना मी जँकी ला त्यात सहभागी करून घेणे शक्यच नव्हते.

एकीकडे त्यांच्या भुंकण्यामुळे माझे लक्ष पिण्यात नीट लागत नव्हते व मला जँकीचा राग येऊ लागला होता . शेवटी मी वैतागून बाहेर आलो आणि त्याच्या पेकाटात दोन लाथा घातल्या त्याला हे अनपेक्षित होते तो मोठ्याने विव्हळू लागला तितक्यात माझा मोठा भाऊ तेथे आला त्याने मी जँकी ला मारलेले पहिले व मला तो रागावू लागला ' का मारतोस त्या गरीब जीवाला ? कसला राग काढतो आहेस त्यांच्यावर वगैरे बोलू लागला " मी मुजोर होतोच सुरवातीपासूनच मी देखील ''माझा कुत्रा आहे तो , मी आणला आहे त्याचे हवे ते करीन , तू कोण मध्ये बोलणारा म्हणून भावाशी वाद करु लागलो " शेवटी वैतागून भाऊ म्हणाला '"किती त्रास देशील सर्वाना ? तू सर्व लाजलज्जा सोडली आहेस , इतका निर्लज्ज मुलगा मी कधी पहिला नाही , एखादा असता तर आपल्या मुळे इतका त्रास होतोय घरच्यांना म्हणून सरळ जीव तिला असता रेल्वे खाली , तसाही तुझा जगुन काही फायदा नाही " असे त्याने म्हणताच माझे डोके फिरले थांब मला मर म्हणतोस ना बघ आता मरतोच मी , असे म्हणून मी रागाने दुसऱ्या खोलीत जाऊन दार आतून लावून घेतले.

=================================================================

वाङ्मयसमाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

27 Jun 2014 - 12:41 am | खटपट्या

सुन्न !!!
पुस्तक घेवुन वाचावे लागेल

वाचावंच लागेलसं दिसतंय. :)

बोबो's picture

27 Jun 2014 - 1:14 am | बोबो

कठीण आहे

केदार-मिसळपाव's picture

27 Jun 2014 - 12:55 pm | केदार-मिसळपाव

आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2014 - 1:17 am | डॉ सुहास म्हात्रे

:( . व्यसन म्हणजे "स्वत: विकत घेतलेले" मानसीक अपंगत्व... ज्याचे शारिरीक परिणामही होतात.

किसन शिंदे's picture

27 Jun 2014 - 1:53 am | किसन शिंदे

+१

आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं.

पुस्तक नक्की वाचेन!

रामपुरी's picture

27 Jun 2014 - 3:02 am | रामपुरी

पूर्णपणे ताबा मिळवता येत असेल तर त्याला "व्यसन" कसे म्ह्णता येईल? :)

सुबोध खरे's picture

27 Jun 2014 - 11:45 am | सुबोध खरे

शिंदे साहेब
माझा स्वतःवर संपूर्णपणे ताबा आहे असे म्हणणारे गर्द च्या व्यसनातून बाहेर पडू शकत नाहीत. नौदलाच्या व्यसनमुक्ती केंद्रात काम करताना आलेले प्रत्यक्ष अनुभव आहेत( ऐकीव नाहीत) त्यामुळे कोणताही माणूस किंवा स्त्री जर केवळ गम्मत म्हणून किंवा किक म्हणून किंवा एक अनुभव म्हणून जर गर्द किंवा अफूचे सेवन करणार असेल तर त्याला कळकळीने परावृत्त करणे हे फार महत्त्वाचे आहे. चार किंवा पाच डोस मध्ये आयुष्यभरासाठी विळख्यात अडकणारे कित्येक लोक आहेत. गर्द बद्दल खरच अशी परिस्थिती आहे कि विषाची परिक्षासुद्धा पाहू नये

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2014 - 12:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे.

हे सत्य लक्षात न घेता "आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं." असा गैरसमज करून घेऊन व्यस॑नाधिन झालेली उदाहरणं नेहमिचीच आहेत. एखाद्या व्यसनमुक्ती केंद्राला भेट दिल्यास (कारण तेथे आपल्या व्यसनाबद्दल खरेपणाने बोलणारी मंडळी सापडण्याची जास्त शक्यता असते) खात्री करून घेता येईल.

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2014 - 12:22 pm | प्रसाद गोडबोले

आपल्या व्यसनावर ज्याला पुर्णपणे ताबा मिळवता येतो त्यानेच व्यसन करावं.

करेकट ! ( माझ्या कपाटात ग्लेन्लेव्हिट खंबा ऑक्टोबर महिन्यापासुन आहे ....पण "निर्विकार" अवस्था अनुभवतानाच दारु प्यायची *i-m_so_happy* ह्या अटी मुळे पडुन आहे *sad* ह्याला ताबा म्हणता येईल काय ? *biggrin* )

बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही असे ऐकुन आहे !

गांजा किंव्वा भांग सारखी व्यसनं "जीवनमुक्त" माणसांनी करायला हरकत नाही असे आपले स्पष्ट मत आहे *crazy*

उरलेल्या इतर व्यसनांच्या बाबतीत बोलायचा आपल्याला "अधिकार" आणि "अभ्यासही" नाही *biggrin*

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2014 - 12:25 pm | प्रसाद गोडबोले

अवांतर : ओशो चे ड्रग्स वरील पवचन आवर्जुन पहावे

मृत्युन्जय's picture

27 Jun 2014 - 1:30 pm | मृत्युन्जय

बाकी तंबाखु आणि तंबाकुजन्य व्यसनं करणं हा तर शुध्द गाढवपणा आहे ... रादर गाढवही तंबाखु खात नाही ...गाढवच काय , कोणताच प्राणी तंबाखुच्या झाडाला तोंड लावत नाही

सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही किंवा गांजा देखील ओढत नाही.

सामान्यतः गाढव दारु देखील पीत नाही

अगदी अगदी.. गाढवच ते..

(हा निव्वळ जोक आहे. ही व्यसने हानीकारक आहेत याची नोंद वाचकांनी घ्यावी..)

चौकटराजा's picture

27 Jun 2014 - 1:37 pm | चौकटराजा

मेलो मेलो .....ह ह पु वा !

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2014 - 1:38 pm | प्रसाद गोडबोले

=))))

बॅटमॅन's picture

27 Jun 2014 - 3:10 pm | बॅटमॅन

गाढवाला दारुची चव काय?

अतिअवांतरः गाढवाइतका क्यूट प्राणी आजवर पाहिला नाही. एकदा घराच्या गेटजवळ सावलीत एक गाढव उभे होते. त्याच्या समोर उभा राहिलो. ते जरा बिचकले, पण मी तिथेच उभा राहिलो. एक पाऊल पुढे गेलो. जरा बिचकले, पण तिथेच उभा राहिलो. असे करतकरत त्याला हात लावला, त्यानेही लावून घेतला. लय मजा आली.

सुनील's picture

27 Jun 2014 - 3:38 pm | सुनील

त्याच्या समोर उभा राहिलो

छॅ! गाढवाच्या समोर उभे राहण्यात काय मजा नाय. मागे उभे राहून पहा!! ;)

नको, तेवढी समज त्या वयातही होती म्हणूनच वाचलो. :)

गाढवाइतका क्यूट प्राणी आजवर पाहिला नाही.

सांभाळून जरा नाहीतर तुमचा प्रतिसाद वाचून 'निराकार गाढव' धावून यायचं. *lol*

बॅटमॅन's picture

27 Jun 2014 - 4:56 pm | बॅटमॅन

हा हा हा =))

मृत्युन्जय's picture

27 Jun 2014 - 5:51 pm | मृत्युन्जय

च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे. बाकी गाढवाची पिल्ले असत्तात खुप निरागस. मोठ्या गाढवांच्या कधी मागे नाही गेलो ;)

मृत्युन्जय's picture

27 Jun 2014 - 5:52 pm | मृत्युन्जय

पुढेही नाही गेलो म्हणा ;)

च्यामारी पण तुला गाढवाला हात लावुन बघायची इतकी उत्सुकता का होती म्हणे.

अशीच. गाढव हा प्राणी मला आवडायचा तरी लोकं उगीच दुस्वास करायचे ते आवडत नव्हतं, शिवाय गाढवं जवळ गेलो तर बुजायची. म्हणताना मग एकदा अनायासे घराजवळच दिसलं गाढव नि हात लावला झालं. :) बाकी लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, सबब मोठ्या गाढवावरच समाधान मानावे लागले.

वॉल्टर व्हाईट's picture

28 Jun 2014 - 3:25 am | वॉल्टर व्हाईट

गाढव बॅचलर होते का ?

( लहान पिल्लांना त्यांच्या आया हात लावू देत नाहीत, यासबबी नुसार मोठ्या गाढवांवर त्यांच्या बायकांचा हक्क असावा )

बॅटमॅन's picture

30 Jun 2014 - 12:32 pm | बॅटमॅन

कल्पना नाही ओ. मंगळसूत्र किंवा अंगठी/तोडा यांपैकी काहीच दिसले नाही, शिवाय आम्हांस गर्दभी प्राकृत येत नसल्याने ते विचारताही आले नाही.

निशदे's picture

27 Jun 2014 - 3:55 am | निशदे

व्यसन हा एक मानसिक आणि शारिरिक रोगच असतो. 'नॉर्मल' मेंदूमध्ये जशी साद-प्रतिसादांची मालिका चालू असते तशी व्यसनी लोकांमध्येही त्यांची स्वतःची अ‍ॅक्शन-रिअ‍ॅक्शन मालिका चालू असते. दुर्दैवाने लोकांना सदर मनुष्य स्वतःच्या मर्जीने असे करतोय असेच वाटत असते आणि मग व्यसनी मनुष्य त्यातून बाहेर येण्याऐवजी 'lack of support' मुळे अधिकाधिक गर्तेत रुतत जातो.

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 7:16 am | प्रचेतस

भयानक व्यसन आहे हे.
तुषार नातूंची कहाणीचा एक भाग याआधीही वाचला होताच.
ग्रेगरी डेविड रॉबर्ट्स यांच्या सुप्रसिद्ध 'शांताराम' कादंबरीतूनही गर्दच्या व्यसनाचे, कोल्ड टर्कीचे भयानक दर्शन झाले होते.

मुवि, हे मिपावर आणल्याबद्दल आभार.

तुषार नातूंच्या ब्लाॅगची ओळख एका मिपाकराकडूनच झाली. ब्लाॅगवरचं जवळजवळ सगळं लेखन वाचलं आहे. हा माणूस अतिशय सरळसोटपणे जे जे घडलं ते सगळं लिहित गेला आहे. सुन्न व्हायला होतं, त्यांच्या कुटुंबीयांनी किती, किती काळ आणि कसं सहन केलं असेल याचा विचार येत राहतो. गर्दच्या नादापायी या माणसाने घेऊ नये ते ते सगळे अनुभव घेतले आहेत. आणि ते सगळे शब्दात मांडले आहेत.

व्यसनी ते (यशस्वी.. हे खूप महत्त्वाचं आहे) समुपदेशक हा त्यांचा प्रवास मूळीच सोपा नाही. लिहिणार्यासाठीही नाही आणि वाचणार्यासाठीही नाही. किंबहुना वाचता वाचता या माणसाची कीव येते, चीड येते, आणि त्याचवेळी कौतुकही वाटतं. वरच्या उतार्यात दिलेला प्रसंग काहीच नाही अशा घटना नातूंच्या आयुष्यात घडल्या आहेत, आणि तिरस्करणीय असलं तरी लोकांना व्यसनी माणसाची मानसिकता समजायलाच हवी म्हणून त्यांनी ते लिहून काढलं आहे. गर्दचा "विळखा" या शब्दाची यथार्थता प्रत्येक ब्लाॅगपोस्टमधून जाणवत राहते.

व्यसनी माणसांबाबत कळकळ असणार्यांनी, आणि नसणार्यांनीही हे अनुभव जरूर वाचण्यासारखे आहेत.

आतिवास's picture

27 Jun 2014 - 9:01 am | आतिवास

पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल आभार, मुवि.

तुषार नातु यांचे सर्वलेखन चेपुवर एका बंदिस्त कम्युनिटीत वाचले होते.काही दिवसापुर्वी लोकसत्तामध्ये पण या पुस्तकाचा काही भाग आलता.जमल्यास लिंक देतो.निरागस पणे मांडलय सगळ.

एस's picture

27 Jun 2014 - 11:15 am | एस

जीवघेणा अनुभव आहे. व्यसनी माणसाच्या आयुष्याची वाट लागते त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या कुटुंबाची काय वाताहत होते हे जवळच्या नात्यात पाहतो आहे.
पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

भडकमकर मास्तर's picture

27 Jun 2014 - 11:19 am | भडकमकर मास्तर

!!!

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2014 - 11:30 am | धर्मराजमुटके

बोलल्या जात नाही, केल्या जात नाही सारख्या शब्दांचे शुद्धलेखन सुधारा असा एक आपुलकीचा सल्ला. एकंदरीतच अशा प्रकारे चुकीचे लिहीण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे असे दिसत आहे.

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 11:36 am | प्रचेतस

शुद्धलेखन कसले ह्यांत?
ही मराठवाड्यातील बोली भाषेची पद्धत आहे. ना की अशुद्ध भाषा.

धर्मराजमुटके's picture

27 Jun 2014 - 11:47 am | धर्मराजमुटके

बोली भाषेत आणि लिहिण्याच्या भाषेत साधारणपणे बदल असतो. तसा तो असावा. एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात. तशी ती गरजच असते. लेखकाने लिहीलेले लिखाण हे परिचय निवेदन आहे.

जाता जाता : ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 11:51 am | प्रचेतस

एखाद्या कथेतले संवाद त्या त्या पात्रांच्या तोंडी बोलीभाषेत असले तर चांगले वाटतात.

ह्याबाबतीत सहमत. पण तरीही प्रमाणभाषेत लिहितांना बोलीभाषेचा वापर केला तर त्यात वावगे अथवा अशुद्ध आहे असे मला वाटत नाही. उदा. श्री.ना. पेंडसे अथवा गोनीदांचे लेखन पहा.

ना की अशुद्ध भाषा हे मटा टाईप "न की अशुद्ध भाषा" ह्या हिंदी वाक्याचे सरळसरळ मराठी रुपांतर आहे काय ?

माहीत नै ब्वा.

आपण ज्या लेखनाचा संदर्भ देत आहात ती बहुतेक सर्व कथा, कादंबर्‍या किंवा ललीत लिखाण आहे. रिपोर्ताज पद्धतीच्या लि़खाणात बोलीभाषेचा वापर करु नये असे माझे मत.
याउपर ही चर्चा येथेच थांबवूया. धाग्याचा मुळ उद्देश हा पुस्तक परिचयाचा आहे त्या अनुषंगाने प्रतिसाद येवोत. धागा विनाकारण भरकटविण्याचे श्रेय की पाप :) आपल्या माथी नको !

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 12:32 pm | प्रचेतस

सहमत

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2014 - 12:41 pm | प्रसाद गोडबोले

मी बुध्दाला मारुन डोळा भरतो माझा पेला रे !
जो प्याला तो मेला जो ना प्याला तोही मेला रे !!

चूज युवर पॉईझन *diablo*

poison

या चार्टवरुन एलेसडी, भांग आदि पदार्थ तंबाखू आणि मद्यापेक्षा कमी सवयखोर आणि कमी हानीकारक आहेत असं मत होतं. आणि असं मत होणं डेंजरस आहे. सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं.

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2014 - 1:44 pm | प्रसाद गोडबोले

सर्व पदार्थांतला फरक १ २ ३ अशा "रिलेटिव्ह" फरकाच्या अंकांनी दिलेला आहे, आणि त्यात अ‍ॅडिक्टिव पोटेन्शियल आणि हानीकारकपणात फार जास्त अंतर नसावं.

>>> करेक्ट ! हा ग्राफ विकीपेडीयावर मिळालाय ... ह्यात नक्की स्केल काय आहे ते पहायला हवे ...

चौकटराजा's picture

27 Jun 2014 - 1:09 pm | चौकटराजा

आमच्या अगोदरच्या म्हणजे १९२० चे सुमारास जन्माला आले व २००० पर्यंत मरण पावले अशा पिढीत जवळ जवळ प्रत्येकाला सुपारी, पान, तंबाखू, जर्दा, तपकीर, सिगरेट, दारू चहा ई पैकी कशाचे तरी व्यसन असायचेच. आता त्यानंतर
या प्रकारच्या व्यसनांच्या प्रमाणात खूपच सुधारणा झाली आहे. निदान भारतात तरी. माझ्या सख्या मामीचा सख्खा पुतण्या गर्द च्या व्यसनात सापडून देवाला प्रिय झाला.
माझे मामे आते ई प्रकारचे सर्व भाउ या सर्वांपासून दूर आहेत. पण त्यांचे वडील मात्र नव्हते.
माझा स्वता: चा एक अनुभव असा की २००३ साली माझ्या हाताला कंपाउंड फ्रॅकचर झाले त्यावेळी मला भूल देण्यासाठी
जो पदार्थ वापरला तो या नार्कोटिक्सच्या पैकी एक होता. त्याच्या सहवासात मला जो अनुभव आला तो माझ्या ६१ वर्षाच्या आयुष्यातील सर्वात आनंददायी अनुभव आहे. त्यामुळे सिगरेट ( ही ही मी एकदा ओढून पाहिली आहे ) पेक्षा नर्कोटिक्स यात माणूस वेगाने का ओढला जातो याची कल्पना मी करू शकतो.
असे कुठेतरी वाचले आहे की त्याचे अत्याकर्षण पेशीच्या पातळीला तयार होते. ( असेच साखरेचे आकर्षण मधुमेह झाल्यावर होत असावे काय ? )
माझे स्वता: चे मत असे आहे की तुम्ही फ्लर्ट असत रहा. म्हणजे व्यसन लागत नाही. अगदी रोजचा मोर्निगं वॉक देखील एकाच मार्गावरून करू नका. पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही
आजारी असल्याची लक्षणे आहेत.

मृत्युन्जय's picture

27 Jun 2014 - 1:32 pm | मृत्युन्जय

सख्या मामीचा सख्खा पुतण्या

तुमच्या मामीचा पुतण्या तुमचा मामेभाऊच असणार की? इतके लांबवुन का सांगितले नाते?

चौकटराजा's picture

27 Jun 2014 - 1:34 pm | चौकटराजा

स्वारी स्वारी मामीचा भाचा तिच्या बहिणीचा मुलगा.

सुबोध खरे's picture

27 Jun 2014 - 3:22 pm | सुबोध खरे

चौरा साहेब,
]माझ्या छातीत पाणी झाले होते तेंव्हा ते काढून त्याची तपासणी करायची होती. तेंव्हा मला १५ मिग्राम मोर्फिन दंडात इंजेक्शन ने दिले होते. आणि पाणी काढणारा डॉक्टर माझा कॉलेजमध्ये ३ वर्षे वरिष्ठ होता. मार्च चा महिना आणि पुण्यातील सकाळ तेंव्हा मला फार छान वाटत होते. सगळीकडे आनंद भरून राहिला होता. माझा वरिष्ठ माझ्या छातीतून पाणी काढण्यासाठी सुई घेऊन आला तेंव्हा मी स्वतःहून पोझिशन घेऊन बसलो आणि त्याच्याशी गप्पा मारू लागलो.त्याने मला बधिर करणारे इंजेक्शन दिले आणि माझ्या छातीत सुई खुपसली पण त्यातून पाणी आले नाही त्यावर मी त्याला म्हटले कि सर असे होते टेन्शन घेऊ नका. कदाचित तुम्ही लिव्हर मध्ये गेला असाल. परत प्रयत्न करा आणि जर वर सुई घुसवा. त्यावर त्याला अधिकच टेन्शन आले. पण दुसर्या वेळेस सुई घातल्यावर पाणी आले. ते एका परीक्षनळीत आणि बाटलीत घेऊन त्यांनी सुई काढली आणि मला परत वार्डात नेले. मी त्यांना मजेत म्हणत होतो कि सर तुम्ही उगाच टेन्शन घेतले जसे काही हा प्रकार दुसर्याच व्यक्तीवर चालू होता.
हा अनुभव अगदी पूर्ण शुद्धीत असताना आणि पूर्ण ज्ञानासह घेतला आहे. परंतु हा अनुभव सर्वात जास्त आनंददायी आहे असे वाटले नाही त्यापेक्षा सेक्स(ORGASM) चा आनंद वैयक्तिक दृष्ट्या मला अत्त्युच्च आनंदाचा वाटतो.

चौकटराजा's picture

27 Jun 2014 - 6:40 pm | चौकटराजा

मी घेतलेला अनुभव अर्ध बेहोशीतला असावा . पार सप्तस्वर्ग फिरून आलो. नंतर आय सी यू त डॉ ना म्हणालो' ईटस वोज
एस्पीरियन्स ओफ लाईफ टाईम ' त्यावर ते मला म्हणाले 'तसे काही नसते तुम्ही एकदम मेरी मूडमधे अनास्थेशियात गेलात म्हणून तुम्हाला असा अनुभव आला असावा.

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2014 - 1:12 pm | प्रसाद गोडबोले

पैशाची चटक , आरामाची चटक, महत्वाकांक्षेची चटक, उद्ममाची चटक ही सारी तुम्ही आजारी असल्याची लक्षणे आहेत.

आणि जगत रहाण्याची चटक ?

चौकटराजा's picture

27 Jun 2014 - 1:22 pm | चौकटराजा

यावर एक उपाय असा की त्यातही विचारांशी फ्लर्टिंग करीत रहायचे.. जीवन सुंदर आहे असे अनुभवतानाच मरणात खरोखर
जग जगते किंवा सुंदर मी होणार हो मरणाने जगणार अशा कवितांचा ही संस्कार मनावर करायचा. न जीवनाची आसक्ती न
आत्महत्येचे आकर्षण असा प्रयत्न करायचा !!!

प्रसाद गोडबोले's picture

27 Jun 2014 - 1:29 pm | प्रसाद गोडबोले

खुपच सुंदर उत्तर !!

मान गये !!

म्हैस's picture

27 Jun 2014 - 1:56 pm | म्हैस

व्यसन म्हणजे "स्वत: विकत घेतलेले" मानसीक अपंगत्व.
व्यसन लागणे हेच स्वत:वरचा ताबा सुटल्याचे सर्वोत्तम डायग्नोस्टीक लक्षण आहे. कारण स्वत:वरचा ताबा सुटणे हेच व्यसनाचे प्रमुख लक्षण आहे.

अगदी अगदी .. लोकांना काळात असतं पण वळत नसत.

परिचयाबद्दल धन्यवाद, मुवि.

हे पुस्तक कुठे मिळेल?
या ब्लॉगचा दुवा शक्य असल्यास (म्हणजे ब्लॉग प्रायवेट नसल्यास) देणे.

मुक्त विहारि's picture

27 Jun 2014 - 3:01 pm | मुक्त विहारि

....डोंबिवलीच्या मॅजेस्टिक मध्ये सध्या उपलब्ध आहे....

लेखकाच्या ब्लॉगचा पत्ता देत आहे.त्यांची टेलीफोनिक परवानगी घेतली आहे....

http://tusharnatu2013.blogspot.in/2013/03/introductory-post.html

आदूबाळ's picture

27 Jun 2014 - 3:22 pm | आदूबाळ

आभारी आहे.

मुक्त विहारि's picture

27 Jun 2014 - 3:26 pm | मुक्त विहारि

एका मिपाकराने दुसर्‍या मिपाकराचे , आभार मानू नयेत असे वाटते.

आभार मानायचेच असतील तर, तुषार नातू यांचे माना.

बापरे...जबराच पुस्तक दिस्तंय..वाचलेच पाहिजे एकदा असं!!!!!

मुक्त विहारि's picture

27 Jun 2014 - 3:23 pm | मुक्त विहारि

आणि

समजा जर एखादा व्यसनांच्या आहारी गेलाच असेल तर घरच्यांनी काय उपाय-योजना करावी?

ह्याची पण सुंदर माहिती दिली आहे.

पुस्तक शक्यतो विकत घेऊन वाचा, कारण ह्या पुस्तकाची रॉयल्टी त्यांना मिळणार आहे.

एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

बॅटमॅन's picture

27 Jun 2014 - 3:36 pm | बॅटमॅन

धन्यवाद, नक्की वाचेन.

स्पा's picture

27 Jun 2014 - 4:11 pm | स्पा

येस

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jun 2014 - 5:42 pm | डॉ सुहास म्हात्रे

+१००
एखादा मनुष्य जर, स्वतःच्या चुका कबूल करून आणि त्याचे योग्य ते प्रायश्र्चित्त घेऊन, परत समाजात यायला तयार असेल तर समाजाने पण त्याला परत स्वतःच्या पायावर उभे रहायला मदत केली पाहिजे. एका सशक्त स्माजाचे ते पण एक अंग असावे, असे मला वाटते.

प्यारे१'s picture

27 Jun 2014 - 4:36 pm | प्यारे१

वाचायलाच हवं असं पुस्तक दिसतंय. इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल. दारु, ड्रग्स चे दुष्परिणाम लगेच दिसतात, बाकीचे लगेच नाहीत दिसत पण परिणाम करुन जातातच.

आधीच नकार हे एक उत्तर जास्त परिणामकारक असणार आहे असं वाटतं. देर आये दुरुस्त आये वगैरे बोलायला सोपं असलं तरी वागताना कमीजास्त आठवण करुन देणारंच असतंय. भविष्यात कधीही काहीही झालं की लगेच जनता बोलायला मोकळी असते... 'म्हत्लं नव्हतं? हे तसलंच आहे म्हणून' असं काही सुरु होतं.

इच्छाशक्ती कमी पडून इंद्रियं धाव घेतील तसं त्यांच्या मागं जाणं म्हणजे व्यसनच म्हणावं लागेल

ये बात!

शिद's picture

27 Jun 2014 - 5:33 pm | शिद

रोचक माहीती. नक्कीच वाचण्याजोग पुस्तक आहे असं दिसतेय.

नानासाहेब नेफळे's picture

27 Jun 2014 - 6:53 pm | नानासाहेब नेफळे

नातुंचा ब्लॉग वाचला होता .आजच्या तरुणासाठी अंजन ठरावे.

सस्नेह's picture

27 Jun 2014 - 9:30 pm | सस्नेह

आहेत लेखनातील प्रसंग !
वाचलेच पाहिजे

विटेकर's picture

30 Jun 2014 - 11:55 am | विटेकर

स्साला २ दिवस अस्वस्थ होतो.. सगळा ब्लोग वाचून काढला.. लै म्हन्जे लैच त्रास झाला.. अदभुत आणि भयचकित होऊन नकळत पुन्हा पुन्हा ब्लोग्वर जात होतो... धड वाचवत नव्हते आणि ना ही सोडवत ! नारायण धारपांच्या कथेसारखे ! फरक इतकाच हे सारे खरे खरे घडलेले होते ...
मी ललित लेखन सहसा वाचत नाही .. आता फारशी आवड ही राहीली नाही .. पण हे एक हाती वाचले !
आमचा साष्टांग नमस्कार तुमच्या मित्राच्या कुटुंबीयाना आणि नन्तर त्यांनाही कळवा.
.....
..
.
राहून राहून एक सतत वाटत राहीले , इतक्या सहज ब्राउन शुगर मिळते कशी ? कायद्याचे रक्षक , माणसे आहेत की राक्षस ? कुटूम्बे उद्धस्त होतात आणि तरीही आमचे शासन जागे होत नाही ?

प्रसाद प्रसाद's picture

30 Jun 2014 - 3:37 pm | प्रसाद प्रसाद

अगदी असेच वाटले...... अगदी मी जे अनुभवले ते तुम्ही लिहून सांगितले आहे विटेकर साहेब. तुमच्याइतके व्यवस्थित कदाचित मला लिहिता आले नसते.

पैसा's picture

30 Jun 2014 - 12:34 pm | पैसा

पुस्तकाची ओळख चांगली आहे. पण मला वाचणे शक्य नाही. कुत्र्याचेही असे हाल करू शकतो तो इसम माणूस राहिलेला नसतोच. त्याच्याबद्दल कितीही प्रयत्न केला तरी दया/सहानुभूती वाटून घेणे शक्य दिसत नाही. त्यातून बाहेर आल्याबद्दल श्री नातू यांचे अभिनंदन. पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे. "Once a bearer cheque always a bearer cheque" अशी काहीशी परिस्थिती आहे ही. आपल्या जवळचे कोणी या भयानक परिस्थितीत सापडू नये एवढी प्रार्थनाच आपण करू शकतो.

प्यारे१'s picture

3 Jul 2014 - 3:37 pm | प्यारे१

>>> पण परत फिरण्यासाठी फक्त एक डोस पुरेसा असतो असं ऐकून आहे.

श्री. नातूंबद्दल शक्यता कमी वाटत आहे. कारण त्यांच्या फेबु प्रोफाईल वरुन ते स्वतः मुक्तांगण ला समुपदेशक म्हणून काम करत आहेत असं वाटतंय.

बाकी इन जनरल सहमती.

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2014 - 3:21 pm | प्रसाद गोडबोले

बाकी मला एकदा हे व्यसन करुन पहायची फार इच्छा आहे ...

http://en.wikipedia.org/wiki/Soma

http://en.wikipedia.org/wiki/Ephedra_sinica

*crazy*

बॅटमॅन's picture

3 Jul 2014 - 3:22 pm | बॅटमॅन

मलाही..'स्टोरी ऑफ इंडिया' नामक डाकुमेंट्रीत मायकेल वुड पेशावरला गेला असताना हे करून पाहतो, साला लय हेवा वाटला होता त्याचा.

मराठी कथालेखक's picture

3 Jul 2014 - 3:48 pm | मराठी कथालेखक

(तेरा वर्षांच्या करिअर मध्ये सात जॉब करुन आठव्याचे वेध लागल्यावर पडलेला प्रश्न) *scratch_one-s_head*
वारंवार नोकरी बदलणे /बदलाविशी वाटणे हे पण एक व्यसन असेल का ? असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे

प्रसाद गोडबोले's picture

3 Jul 2014 - 3:52 pm | प्रसाद गोडबोले

असल्यास नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे

>>> स्काळ संध्याकाळ काली फॉसीफोरम ६ ३० घेत चला... शाबुदाण्याच्या गोळ्यातुन *lol*

आदूबाळ's picture

3 Jul 2014 - 6:08 pm | आदूबाळ

नोकरीबदलाच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे

कथा लिहून

बॅटमॅन's picture

3 Jul 2014 - 6:34 pm | बॅटमॅन

फु-ट-लो !!!!! =)) =)) =))

(लोटांगण'समर्पित') बॅटमॅन =))

आबा आबा व्हता कुडं इक्ते दिस? =))

मराठी कथालेखक's picture

3 Jul 2014 - 3:49 pm | मराठी कथालेखक

पुस्तक नक्कीच वाचायला आवडेल...