(बेचैन)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
30 Jul 2008 - 9:07 pm

अनिरुद्ध अभ्यंकरांची सुंदर गजल'चैन' आम्हाला चांगलीच हलवून गेली आणि आम्ही बेचैन झालो!;)

गजल वाचुन हालतो 'वरचाच मजला'
काय मी आता करु? घरचाच मजला

हालला आहेच तो आता तरीपण
व्यर्थ शब्दांचा तुझ्या का जाच मजला

का विडंबन रोजचे असते कपाळी?
प्रश्न मेले लाविती बघ आच मजला

वायदा सार्‍या कवींचा ज्ञात मजला
कायदा हा रोजचा झालाच मजला

मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा?
छळतात जर त्याच त्या गजलाच मजला

संस्थळांची मात्र ह्या झाली दुकाने
सर्व म्हणती माल घ्या हो हाच,मजला

एकदा सोडीन म्हटले मी विडंबन
देती कसे पाताळयंत्री लाच मजला

चैन कवितेची मला करता न आली
आहेर असतो रोज, घरचाच मजला

चतुरंग

कवितागझलविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

30 Jul 2008 - 9:11 pm | प्राजु

मजा आहे बुवा... आवडले विडंबन.

एकदा सोडीन म्हटले मी विडंबन
देती कसे पाताळयंत्री लाच मजला

चैन कवितेची मला करता न आली
आहेर असतो रोज, घरचाच मजला

हे जास्ती छान.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2008 - 9:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा?
छळतात जर त्याच त्या गजलाच मजला

अरेरे !!! नवीन काहीच नाही काय कवींच्या कवितेमधे, समस्त कवींनो नुसत्या कविता ओता मिपावर आता, हीच वेळ आहे, क्रांतीची :)

बाकी विडंबन झकास !!!

शितल's picture

30 Jul 2008 - 9:53 pm | शितल

केशवसुमारांची गादी पुढे चालवली आहे.
मस्त विडंबन .

सर्किट's picture

30 Jul 2008 - 10:40 pm | सर्किट (not verified)

पाताळयंत्री .. मध्ये लय गेली.

बाकी ठीक.

- (सडेतोड) सर्किट

बेसनलाडू's picture

30 Jul 2008 - 10:43 pm | बेसनलाडू

रंगराव,
उत्तरोत्तर रचनांमध्ये सुधारणा दिसत चालली आहे. मात्रापूर्तीसाठीचे भरीचे शब्द/अक्षरे टाळता आल्यास आणखी चांगले होऊ शकेल. काही द्विपदी आणखी स्पष्टही व्हायल्या हव्यात. पण एकंदर छान झालाय प्रयत्न. चालू द्यात.
(वाचक)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

31 Jul 2008 - 8:39 am | आनंदयात्री

>>एकदा सोडीन म्हटले मी विडंबन
>>देती कसे पाताळयंत्री लाच मजला

>>चैन कवितेची मला करता न आली
>>आहेर असतो रोज, घरचाच मजला

ही दोन्ही कडवी लै लै भारी =))

(स्वगतः काउंटर इंटेलिजन्स वापरायला सुरुवात करायला हवी ;) )

विसोबा खेचर's picture

31 Jul 2008 - 8:39 am | विसोबा खेचर

मी भरवसा त्या कवींचा काय द्यावा?
छळतात जर त्याच त्या गजलाच मजला

संस्थळांची मात्र ह्या झाली दुकाने
सर्व म्हणती माल घ्या हो हाच,मजला

एकदा सोडीन म्हटले मी विडंबन
देती कसे पाताळयंत्री लाच मजला

वा! रंगा, मस्त रे! :)

(स्वगत - सुधारणेला भरपूर वाव आहे हे कोण म्हणालं रे? X( )

चतुरंग

अनिल हटेला's picture

31 Jul 2008 - 6:19 pm | अनिल हटेला

एकदा सोडीन म्हटले मी विडंबन
देती कसे पाताळयंत्री लाच मजला

रन्गाशेठ !!

लै भारी!!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

पारिजातक's picture

31 Jul 2008 - 7:19 pm | पारिजातक

चांगलेच रंग उधळलेत की तुम्ही चतुरंगराव ! भयंकररावांनी काही लिहाव की नाही !
;)
पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

मग आम्ही नको का उधळण करायला रंगांची? B)

चतुरंग

पारिजातक's picture

1 Aug 2008 - 12:09 pm | पारिजातक

करा करा, आमच्या शुभेच्छा !!! :)

पारिजातकाच आयुष्य लाभल तरी चालेल पण लयलूट करायची ती सुगंधाचीच !!!

पद्मश्री चित्रे's picture

1 Aug 2008 - 12:40 pm | पद्मश्री चित्रे

:)
(स्वगत- मला कधी जमेल असं लिहायला?)

केशवसुमार's picture

1 Aug 2008 - 1:29 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
चांगल चलयं.. चालू द्या..
बेलाशेठ आणि सर्किटशेठ च्या सुचनांकडे लक्ष द्या.. पुलेशु..
(निवृत्त)केशवसुमार