"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
प्रतिक्रिया
11 Apr 2024 - 11:35 am | कांदा लिंबू
असं कुणाबद्दल सार्वजनिक रित्या म्हणू नये; काही झाले तरी ते एका राज्याचे इमानदार मुख्यमंत्री आहेत.
11 Apr 2024 - 4:16 pm | मुक्त विहारि
परमपूज्य केजरीवाल, ED ने, समन्स पाठवले तरी उत्तर देत न्हवते...
बाकी, औरंग्या आणि मोदी , यांना एकाच पारड्यात टाकून, तुम्ही जास्तच आदरणीय व्यक्ती झाले आहात...
11 Apr 2024 - 4:31 pm | अमरेंद्र बाहुबली
तुम्ही कांदा लिंबू आयडी पेक्षा चाणाक्ष आहात. बाकी औरंग्या चांगला होता, निदान स्वधर्मीयाना तरी पिडायचा नाही.
11 Apr 2024 - 7:15 pm | अहिरावण
हो ? नक्की का? डाव्यांचे अध्वर्यु असलेले जदुनाथ वेगळे सांगतात
11 Apr 2024 - 8:02 pm | वामन देशमुख
नाही.
शिवाजी महाराज चांगले होते.
।। जय भवानी जय शिवाजी ।।
11 Apr 2024 - 8:07 pm | अमरेंद्र बाहुबली
हो. शिवाजी महाराज चांगले होते. >>>
आपल्या धर्मियांची काळजी घ्यायचे. पण परधर्मियनचीही काळजी घ्यायचे. औरंग्या फक्त स्वधर्मीयांची काळजी घ्यायचा. आधुनिक औरंग्याला फक्त सत्तेची काळजी आहे.
11 Apr 2024 - 8:04 pm | वामन देशमुख
+
निष्कर्ष: मोदी चांगले आहेत.
12 Apr 2024 - 6:53 am | मुक्त विहारि
कसलं कसलं...
आम्ही साधे दहावी पास शेतकरी...
"बाकी औरंग्या चांगला होता, निदान स्वधर्मीयाना तरी पिडायचा नाही."
हे नक्की का?
कारण, आदिलशहा आणि औरंग्या, हे एकमेकांचे कट्टर वैरी होते. ह्याच गोष्टीचा फायदा, छत्रपति शिवाजी महाराजांनी, शहाजी राजांच्या अटकेच्या वेळी करुन घेतला.
------
बाकी, आधी बाण मारून मग वर्तुळे काढणे, हा तुमचा मुळ स्वभाव आहे, हे परत एकदा जाणवले...
-----
12 Apr 2024 - 9:52 am | अहिरावण
>>>बाकी, आधी बाण मारून मग वर्तुळे काढणे, हा तुमचा मुळ स्वभाव आहे, हे परत एकदा जाणवले...
डाव्या विचारांनी प्रभावित तथाकथित पुरोगाम्यांचे ते महत्वाचे लक्षण आणि निकष असतो. अल्टन्युजचा जुबेर आणि हे महाशय एकसारखे आहेत
17 Apr 2024 - 7:01 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
11 Apr 2024 - 11:11 am | आग्या१९९०
औरंग्या गचकला नी पुढचा सर्व इतिहास आपल्यापुढे आहेच >>
हा हा हा. तोंडात साखर पडो
13 Apr 2024 - 1:32 pm | मुक्त विहारि
हमारे मुख्यमंत्री जेल में हैं, दिल्ली की जनता के साथ धोखा हुआ', AAP छोड़ने वाले राजकुमार आनंद का पत्र आया सामने
https://www.aajtak.in/india/news/story/rajkumar-anand-who-left-aap-lette...
-------
उन्होंने कहा कि सबसे बड़ा धोखा हमारी पार्टी के कार्यकर्ताओं और दिल्ली की जनता के साथ हुआ है जिन्होंने बड़ी उम्मीद के साथ आम आदमी पार्टी को सत्ता तक पहुंचाया ताकि दिल्ली से भ्रष्टाचार को खत्म किया जा सके. लेकिन सत्ता में आने के बाद यह पार्टी भी भ्रष्टाचार से खुद को बचा नहीं सकी.
17 Apr 2024 - 4:45 pm | मुक्त विहारि
उपराज्यपाल ने लिखा CM केजरीवाल को खुला पत्र, पानी को लेकर लेटर वॉर शुरू
https://www.aajtak.in/india/delhi/story/delhi-lt-governor-open-letter-to...
-----
दिल्ली के उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना ने जेल में बंद मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल को एक खुला पत्र लिखकर कहा है कि पानी को लेकर हुई लड़ाई में एक महिला की मौत होना सरकार की विफलता को दर्शाता है. इसके अलावा उपराज्यपाल ने अपने पत्र में लिखा कि सरकार के मंत्रियों को अपनी गलती के लिए अधिकारियों को दोषी ठहराने की आदत सी हो गई है.
21 Apr 2024 - 6:09 pm | मुक्त विहारि
AAP का झूठ हो गया एक्सपोज', LG का दावा- इंसुलिन पर केजरीवाल के डॉक्टर ने ही लगाई थी रोक
https://www.aajtak.in/india/news/story/arvind-kejriwal-health-controvers...
------
21 Apr 2024 - 6:22 pm | अमरेंद्र बाहुबली
सत्ता संपत्तीच्या भडव्यांचा देश म्हटले
तर डोके फोडतील,
हलकट लाचारांचा देश म्हटले
तर रस्त्यावर झोडतील,
खरीदले जाणार्यांचा देश म्हटले
तर वाटा रोखतील,
देवधर्माविषयी,नेत्यांविषयी वाईट बोललो
तर नाक्यावर गाठून ठोकतील,
शोषण करणार्यांचा देश म्हटले
तर नोकरीवरुन कढतील
म्हणून आधी माझ्या नपुंसकत्वाला सलाम,
आणि त्यानंतर अर्थातच
या माझ्या
परमपवित्र सुउदात्त सुमंगल देशाला सलाम,
या महान देशाच्या महान परंपरेला सलाम.
- मंगेश पाडगावकर/१९७५.
22 Apr 2024 - 4:53 am | चित्रगुप्त
मंगूअण्णांची १९७५ ची ही जबरदस्त कविता एकदम चपखल आहे. १९७५ मधेच तर इंदिरा गांधींनी २१ महिन्यांची इमर्जंसी लादली होती. फकरुदीन अलि अहमद राष्ट्रपती होते त्यावेळी. मंगूअण्णांना सलाम (मंगूअण्णा माझे मित्र होते, त्यांच्या कविता अगदी एकट्याने समोरासमोर बसून ऐकण्याचा योग १९८७-९७ या काळात बरेचदा मुंबईला जायचो तेंव्हा यायचा. त्यामुळे त्यांचा प्रेमाने 'मंगूअण्णा' असा उल्लेख )
22 Apr 2024 - 10:18 am | अमरेंद्र बाहुबली
अरे वा.
23 Apr 2024 - 12:43 pm | निनाद
अवांतरः मंगेश पाडगावकर यांना ख्रिस्ती धर्माविषयी फार प्रेम होते असे दिसते. त्यांनी बायबलच्या नव्या कराराचे इंग्रजीवरून मराठी बायबल लिहिले होते नवा करार नावाने. २००८ साली प्रसिद्ध केले.
23 Apr 2024 - 12:57 pm | अमरेंद्र बाहुबली
नवा करार मराठीत लिहिला म्हणून ख्रिस्ती धर्मावर प्रेम?? उद्या कुणी ख्रिस्ती देशात नोकरीस गेला तर तुम्ही म्हणाल त्याचे ख्रिस्ती धर्मावर प्रेम आहे? :)
25 Apr 2024 - 4:27 pm | चित्रगुप्त
पाडगावकर यांच्या पत्नी यशोदा या माहेरच्या यशोदा भास्करराव उजगरे. यशोदाबाईंचे वडील ख्रिस्ती मिशनरी होते. 1934 साली वडलांचा मृत्यू झाला. तेव्हा यशोदाबाई सात वर्षाच्या होत्या. त्यांनी लिहीलेले आत्मवृत्त 'कुणास्तव कुणीतरी' हे २००० साली प्रकाशित झालेले आहे.

सुरुवातीच्या काळात पाडगवकरांची आर्थिक स्थिती बिकट होती. त्यांनी भाषांतराचे काम पैश्यासाठी केले असेल, किंवा त्यांच्यातील अभिजात कवीला ते एक मोठे आव्हान वाटल्याने पत्करले असेल. पत्नीमुळे त्यांना त्याविषयी आत्मियता पण वाटत असेल कदाचित. माझे त्यांच्याशी घरगुती विषयावर कधी संभाषण झाले नाही.
बायबलातील 'जुना करार' फार रोचक आहे. येशुपूर्व हजारो वर्षांच्या काळातल्या ऐतिहासिक घटना, व्यक्ती वगैरेंची माहिती त्यात संग्रहित आहे. जुना करार अर्थात 'ओल्ड टेस्टामेंट' मधील प्रसंगांवर युरोपातील दिग्गज कलवंतांनी शेकडो महान कलाकृती बनवलेल्या आहेत.
(किरिस्तावांचे पुराण हे 'खरा इतिहास' आणि हिंदुंचे रामायण -महाभारत म्हणजे निव्वळ 'कविकल्पना' असे जाणूनबुजून पसरवले गेले आहे किंवा कसे , वगैरे भाग वेगळा)
'कुणास्तव कुणीतरी' आणि पाडगावकरांचे 'बायबल-नवा करारः भाषांतर व मुक्तचिंतन' दोन्ही वाचायला हवीत.
26 Apr 2024 - 12:11 am | अमरेंद्र बाहुबली
छान माहिती.
26 Apr 2024 - 9:39 am | सुबोध खरे
मी मिसळपाव वर लिहायला श्री मंगेश पाडगावकर यांच्या आग्रहामुळे सुरुवात केली हा किस्सा मी अन्य ठिकाणी लिहिला आहे.
त्यांना मुलुंड ला कार्यक्रम झाला होता तेंव्हा त्यांना शीवच्या त्यांच्या घरून आणायची आणि पोचवायची जबाबदारी माझ्याकडे होती
यामुळे त्यांच्याशी तीन तास दिलखुलास गप्पा मारण्याची मला संधी मिळाली. मी डॉक्टर आहे म्हटल्यावर त्यांनी परत पोचवण्याचे वेळेस आग्रहाने घरी बोलावले
(त्यांचा मुलगा सुद्धा प्रथितयश स्त्रीरोगतज्ज्ञ आहे).
यावेळेस कोणतीही ओळख देख नसताना श्रीमती यशोदा पाडगावकर यांनी श्री मंगेश पाडगावकर यांच्या एकंदर स्वभावाबद्दल अत्यंत खालच्या शब्दात टिप्पण्या केल्या आणि हे सर्व मी माझ्या पुस्तकात लिहिले आहे. "तुम्हाला वाटतो तसा हा माणूस नाही", "प्रत्यक्ष काय आहे हे मी जाणते" अशा तर्हेची वक्तव्ये संपूर्ण पणे अनोळखी माणसाकडे करणे हे उचित नाही आणि सुसंस्कृतपणात बसत नाही.
श्री मंगेश पाडगावकर त्यांचे बोलणे चालू असे पर्यंत अतिशय शांतपणे केवळ ऐकत होते. त्यांनी कोणताही प्रतिवाद केला नाही. कारण अनोळखी माणसासमोर पत्नीबरोबर वाद घालण्याऐवजी त्यांनी गप्प राहणे पसंत केले असे वाटले.
चहापान झाल्यावर मी तिथून निघालो. पण या बाई माझ्या मनातून संपूर्णपणे उतरल्या.
त्यांचे म्हणणे कितीही सत्य असले तरी ती वेळ नव्हती आणि तो प्रसंगही नव्हता.
ते पुस्तक वाचावे असे मला कधीही वाटले नाही.
आणि यशोदा पाडगावकर यांचे पुस्तक कोणी का वाचेल? त्या श्री मंगेश पाडगावकरांची पत्नी आहेत म्हणूनच ना?
त्यांची स्वतंत्र ओळख माझ्या माहिती प्रमाणे तरी नाही.
असो
27 Apr 2024 - 10:50 pm | अमरेंद्र बाहुबली
तुम्ही योग्य वाटला असाल म्हणून कदाचित तुमच्याकडे मन मोकळं केलं असेल.
27 Apr 2024 - 10:55 pm | मुक्त विहारि
अगदी अगदी...
कधी कधी होते असे...
28 Apr 2024 - 7:17 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माहितीपूर्ण प्रतिसाद. मोठ्या साहित्यिकांची भेट स्वतंत्र लेख लिहा डॉक्टरसाहेब.
-दिलीप बिरुटे
28 Apr 2024 - 9:05 pm | अमरेंद्र बाहुबली
मी मिसळपाव वर लिहायला श्री मंगेश पाडगावकर यांच्या आग्रहामुळे सुरुवात केली हा किस्सा मी अन्य ठिकाणी लिहिला आहे. हा किस्सा काय आहे?
22 Apr 2024 - 10:35 am | सर टोबी
अतिशय चपखल बसते. फक्त अपवाद नपुसंकत्वाचा केला पाहिजे. नर-मादी मधील फरक आणि प्रजनन क्षमता या काही श्रेष्ठत्वाच्या कल्पना होऊ शकत नाही.
अजून एक अपवाद म्हणजे जे होरपळले जात नाहियेत त्यांच्या दृष्टीने तर सध्याचा काळ तर निव्वळ सुवर्णयुग आहे. आम्ही त्यांना “माझा देश बदलतोय” गँगवाले म्हणतो.
22 Apr 2024 - 11:29 am | अमरेंद्र बाहुबली
अजून एक अपवाद म्हणजे जे होरपळले जात नाहियेत ते पण होरपळले जाताहेत. पण अंधभक्त असल्याने उघड विरोध करू शकत नाहीत. कारण इतर अंधभक्ताकडून द्वेषाचा सामना करवा लागू शकतो. म्हणून स्वतःलाच उभारी द्यायला ते “शेर पाला है…” “पेट्रोल २०० झाले तरी चालेल पण आयेगा तो..” सारखी वायफळ बडबड करत सुटतात. जास्तच धीर सुटला तर मग भाऊक तोसरेकरांचे कल्पनांचे मांडे ऐकत बसतात. एखाद्या गंजेडीला गांजा जसा दुसऱ्याक जगात नेतो तसे हया अंधभक्ताना भाऊ तोसरेकर दुसऱ्या जगात नेतात. पण वास्तवात ना खासदार त्यांच्याकडे ढुंकून पाहत असतो ना आमदार. तरी त्याला जिंकवायला ते सोमीवर गरळवर गरळ ओकत सुटतात. अंधभक्ताना ना पेट्रोल ची चिंता असते ना खराब रस्त्यांची ना ट्राफिकची ना गटारीची. त्यांना चिंता असते फक्त “मोदीजींची.”
ह्यातून एनआरआय अंधभक्त सुटलेले असतात. चांगल्या सुविधांसाठी नी पैशासाठी ते देश सोडून पळालेले असतात. नी हा देश अजून खड्ड्यात जावा म्हणून तिकडूनच काड्या टाकत असतात.
22 Apr 2024 - 12:26 pm | चौकस२१२
ह्यातून एनआरआय अंधभक्त सुटलेले असतात. चांगल्या सुविधांसाठी नी पैशासाठी ते देश सोडून पळालेले असतात. नी हा देश अजून खड्ड्यात जावा म्हणून तिकडूनच काड्या टाकत असतात.
तुमचाच मोदी द्वेष तर जगजाहीर आहहेच पण दुसरा पेट द्वेष म्हणजे अनिवासी भारतीय...
तुमची हि भिकारडी वक्तवये आता आवर्ती घ्या .. भारत सशक्त व्हावा ( मग तो राहुल जी नि केलं तरी चालेल ) हीच इच्छा निंदान मिपावरील जे कोणी परदेशी भारतीय आहेत त्यांची आहे ....
22 Apr 2024 - 1:45 pm | अमरेंद्र बाहुबली
तुमचाच मोदी द्वेष तर जगजाहीर आहहेच
मोदींचा नाहीतर मोदी जे सरकारी संस्थांचा सत्ता मिळवण्यासाठी गैरवापर करताय त्याचा मी द्वेष करतो. ऑस्ट्रेलियात केला जातो का तेथील पंतप्रधानांकडून सरकारी संस्थांचा गौरवापर??
दुसरा पेट द्वेष म्हणजे अनिवासी भारतीय... आजीबाबत नाही. मी अंधभक्त अनिवासी भारतीयांबद्दल लिहिलय. जे पैसे नी सोयींसाठी भारतातून पळून गेलेत नी तिथून भारतत्क चालणाऱ्याक गैरप्रकारांच समर्थन करतात.
तुमची हि भिकारडी वक्तवये आता आवर्ती घ्या .. वक्तव्ये तुम्हाला भिकारडी वाटत असली तरी ती सत्य आहेत. सत्य लपून राहत नाही.
भारत सशक्त व्हावा ( मग तो राहुल जी नि केलं तरी चालेल ) हीच इच्छा निंदान मिपावरील जे कोणी परदेशी भारतीय आहेत त्यांची आहे .... सगळ्यांचीच नाही. काहींची भारताची वाट लागली तरी चालेल पण मोदीच पाहिजे अशीही इच्छाय. त्यानाच मी अंधभक्त एनआरआय म्हणतो. अर्थात त्यांचं काही जात नसतं. जाणार नसतं. कारण तिथल्या सरकारांपुढे त्यानी तिथल्या नागरिकत्वा साठी लोटांगण घातलेलं असतं. कधी भारतीय नागरिकत्व जातं नी सुटतो अस त्यांचं झालेल असतं, पण सोमीवर भयानक देशप्रेम उबाळून येत.
22 Apr 2024 - 1:52 pm | चौकस२१२
ऑस्ट्रेलियात केला जातो का तेथील पंतप्रधानांकडून सरकारी संस्थांचा गौरवापर??
ऑस्ट्रेल्या सम्बंआधी आपण बोलत नाहीयोत तुम्ही जे सतत भक्त / अनिवासी , असले ताशेरे तोडताना न त्याबद्दल
22 Apr 2024 - 2:03 pm | अमरेंद्र बाहुबली
मी फक्त अंधभक्त अनिवासी भारतीयांबद्दल बोलतोय तुम्ही अनिवासी भारतीय आहात पण अंधभक्त अनिवासी भारतीय आहात का?? नसाल तर तुम्ही का चिडताय?? असाल तर तस स्पष्ट सांगा. चिडचिड करू नका.
22 Apr 2024 - 2:06 pm | चौकस२१२
तुम्ही याआधी कारण नसताना माझया अनिवासी असण्याचाच उल्लेख केलेला आहे म्हणून हे लिहिले ..
22 Apr 2024 - 1:56 pm | चौकस२१२
सगळ्यांचीच नाही. काहींची भारताची वाट लागली तरी चालेल पण मोदीच पाहिजे अशीही इच्छाय.
तुम्ही सर्वसकट धरून चाललाय कि भारताची वाट लागेल...
मोदीच पाहिजेत वैगरे काही नाही { माझ्यसाठी मोंदींपेक्षा भाजप हा पक्ष जास्त महत्वाचा आहे म्हणा पण तुम्ही अर्थात मला मोदी अंधभक्त लेबल लावणारच कारण तुम्हाला दोन्हीतला ( पक्ष कि व्यक्ती ) फरक कळत नाही }
23 Apr 2024 - 7:59 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
23 Apr 2024 - 8:31 pm | अमरेंद्र बाहुबली
भ्रष्टाचार इतर पक्षात राहुन केला तर तो देशद्रोह. पण भाजप मध्ये राहून केला तर राष्ट्रहित.
कुटुंबातील सदस्याना इतर पक्षानी उमेदवारी दिली तर ती घराणेशाही पण भाजपात तस असेल तर ती घराणेशाही नाही. (उदा. फडणवीसांबद्दल डॉ. साहेबांच मत)
काँग्रेस सोबत शिवसेना गेली तर हिंदुत्व सोडलं, पण मेहबूबा नी अजितदादा सोबत भाजप गेली तर हिंदुत्व सोडल नाही.
त्याच प्रमाणे भाजप समर्थक असेल तर तो खांद्याच्या वर बळकट पण भाजप विरोधक असेल तर तो खांद्याच्या खाली बळकट.
- भाजप प्रेमी, खोटयांचे समर्थक डॉ. श्री. खरे.
22 Apr 2024 - 2:02 pm | चौकस२१२
कारण तिथल्या सरकारांपुढे त्यानी तिथल्या नागरिकत्वा साठी लोटांगण घातलेलं असतं.
अजून एक एकांगी आणि अर्ध माहीती आणि द्वेषावर आधारित व्यक्तव्य
लोटांगण वैगरे काही घालावे लागत नाही "स्थलांतर " स्किल बेस्ड इमिग्रेशन म्हणजे काय माहिती आहे का?
हा एक खेळीमेळीचं सौदा असतो
ऑस्ट्रेल्या / कानडा सारखया देशांना आपली लोकसंख्या वाढाव्याची आहे त्यासाठी ज्यांच्याकडं चांगले शिक्षण आणि अनुभव आहे त्यानं ते ( हातात नोकरी नसताना सुद्धा) कायम राहण्याचा व्हिसा देतात आणि काही वर्षांनी त्याचे रूपांतर सहज पने नागरिकत्वात करत येते आणि दुधावरची साय म्हणजे भारतीय अनिवासी नागरिक पण होता येते
लोटांगण वगैरे हिणकस भाषेतून तुमची ही हींन वृत्ती दिसून येते .....
22 Apr 2024 - 2:11 pm | अमरेंद्र बाहुबली
त्याला कसलाही मुलामा दिला तरी भारतीय नागरिकत्व सोडून चांगल्या सोयी आणी पैशासाठीच तिकडचं नागरिकत्व घेतात ना? शिकायचं भारतात, सोयीसुविधा उपटायच्या भारतात आणी पैशासाठी कॅनडा/ ऑस्ट्रेलियाची/युरोप, अमेरिका हया देशांची सेवा करायची.
कराना सेवा त्यांची कुणी अडवलं आहे?? पण मग सोशल मीडिया नी संकेतस्थळावर खोटं, बेगडी देशप्रेम का दाखवायचं?? इतकीच देशाची काळजिय तर या परत देशात नी करा भारतमातेचची सेवा?? पण पैसा नी तिकडची आरामदायक जीवनशैली सुटत नसते. आता सांगाल की आम्ही पैसे पाठवतो तिकडून. पैशांनी काय देशप्रेम विकत घेता का? हजारो उदाहरण आहेत की लोकपरदेशातली लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून भारतात आले नी हया भारतमातेची सेवा करू लागले. हे खरे देशप्रेम.
22 Apr 2024 - 3:53 pm | चौकस२१२
त्याला कसलाही मुलामा दिला तरी भारतीय नागरिकत्व सोडून चांगल्या सोयी आणी पैशासाठीच तिकडचं नागरिकत्व घेतात ना? शिकायचं भारतात, सोयीसुविधा उपटायच्या भारतात आणी पैशासाठी कॅनडा/ ऑस्ट्रेलियाची/युरोप, अमेरिका हया देशांची सेवा करायची.
या आधी हि उत्तर दिलेलं आहे , भारतातात राहून जेवढा कर काही वर्षात भरला असता किंवा स्थानिक अर्थ वयवस्थेत उलाढाल केली असती तेवढी किंवा त्या पेक्षा थोडी जास्त भारतात पैसे पाठवून किंवा सुट्टीवर येऊन केलेला खर्च
याशिवाय मेक इन इंडिया साठी मी तरी प्रयतन केले आहेत
याशिवाय मराठी कलाकारांना परदेशात अनन्यस्तही जी काही धडपड केली
कराना सेवा त्यांची कुणी अडवलं आहे?? पण मग सोशल मीडिया नी संकेतस्थळावर खोटं, बेगडी देशप्रेम का दाखवायचं??
बेगडी का? उदाहरण मेक इन इंडिया चे कौतुक केले ( भारत शक्ती नावाच्या चॅनल संबंधी मी दिलेली लिंक बघ जरा ..) हे बेगडी प्रेम कसे
इतकीच देशाची काळजिय तर या परत देशात नी करा भारतमातेचची सेवा??
भारतात राहिला तरच भारताची सेवा होते हा एक गोड गैरसमज आणि भारतात राहणारे सर्वच देशभक्त आहेत ?
मग तास म्हणलं तर तुम्ची मूळ वाडी , खेड सोडून शहरात आलात तो काय
परत एकदा सांगतो भारत सोडलं तो काही भारतावर रंगग आहे म्हणून नाही उलट भारत सोडल्यावर भारताबद्दल चे प्रेम वाढले
पण पैसा नी तिकडची आरामदायक जीवनशैली सुटत नसते.
या दोन गोष्टी काय भारतात राहणार्या लोकांना नको असतात.. काय वाटेल ते ! तुम्ही काय चिंचोक्यात पगार घेता ?
आता सांगाल की आम्ही पैसे पाठवतो तिकडून. पैशांनी काय देशप्रेम विकत घेता का? हजारो उदाहरण आहेत की लोकपरदेशातली लाखो रुपये पगाराची नोकरी सोडून भारतात आले नी हया भारतमातेची सेवा करू लागले. हे खरे देशप्रेम.
त्यांचे कौतुकच आहे कि पण जो नाही आला तो लगेच "बेगडी प्रेम " असणारा हे कुठलं गृहीत ?
नुसता द्वेष आणि काह्ही तर्क नाही
बसा कुटत
22 Apr 2024 - 4:00 pm | अमरेंद्र बाहुबली
त्या पेक्षा थोडी जास्त भारतात पैसे पाठवून किंवा सुट्टीवर येऊन केलेला खर्च
याशिवाय मेक इन इंडिया साठी मी तरी प्रयतन केले आहेत पैशाने देशप्रेम विकत घेताय का?? हे म्हणजे लाहांक भावाकडे राहणाऱ्या आई वडिलाना मोठ्या भावाने ने आणिर त्याच्या बायकोने पैसे पाठवून आम्ही तुमची सेवा करतोय सांगण्यासारखं आहे.
22 Apr 2024 - 5:58 pm | चौकस२१२
म्हणजे भारतचे कौतुक केले तरी देशद्रोही कि काय !
तुमचच्या विचारानुसार सगळे अनिवासी भारतीय बेगडी प्रेम कि काय ते दाखवता असे दिसतंय.. म्हणलं ना बस कुटत
22 Apr 2024 - 7:19 pm | अमरेंद्र बाहुबली
मी अंधभक्ताबद्दल लिहिलय. भारतप्रेमाआड मोदीचा प्रचार करत सुटतात. अरे कराना प्रचार विदेशातील हस्तिदंती मनोऱ्यातून. पण मध्ये बेगडी देशप्रेम का आणतात??
23 Apr 2024 - 4:55 am | चौकस२१२
मी जर स्पष्टच म्हणलं कि "मेक इन इंडिया आणि निर्यात हे भारतासाठी चांगले आहे " ( मग ते कोणत्या का पक्षाचच्या सरकार ने करावे ) तर यात मोदी कौतिक कुठे आले ? भारतप्रेमापोटी मोदींचाच उदो उदो असल काही नाही , जे योग्य केलं त्याला योग्य म्हणालं पाहिजे , पण तो मनमोकळेपणा तुमच्यात नाही सतत आपलं मोदी मोदी मोदी अरेरे
मोदी करोत नाहीतर ममता भारताचा फायदा झाला तर चांगलाच हे तुमचच्या सारखया "देशप्रेमयाला " माझ्या सारख्य एन आर आय ( नॉट रिकव्यार्ड इंडियन ) ने सांगायला नको ..
"हम रहे न रहे देश ये रहना चाहिये "
काय म्हणत पतं काही समजलं कि कळलं
23 Apr 2024 - 12:11 pm | अमरेंद्र बाहुबली
कधी येताये परत मग? भारत मातेची सेवा करायला??
23 Apr 2024 - 7:59 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
खांद्या खाली बळकट असलेल्या माणसांशी वाद घालून निष्पन्न काहीच होत नाही.
22 Apr 2024 - 12:57 pm | सर टोबी
भक्त यांची टकळी अगदी गुरुवाणी ऐकावी इतक्या भक्तिभावाने ऐकत असतात असं एक निरीक्षण आहे. शरद पवार एका गुंठा मंत्र्यापेक्षा फार काही लायक नाहीत अशी जी आवडती समजूत एका विशिष्ठ वर्गात आहे त्या समजुतीचे जनक म्हणजे भाऊ तोरसेकर.
मोदी विरोधकांनी आपले व्हिडीओ ब्लॉग ऐकू नये अशी स्वच्छ सूचना त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर असायची. अशी त्यांची निस्पृहता.
22 Apr 2024 - 1:55 pm | अमरेंद्र बाहुबली
भाऊ तोसरेकर पवारद्वेष्टे आहेत. गल्लीतल्या निवडणुकीत उभे राहिले तर त्यांच्या घरातले लोकही मत देणार नाहीत. आणी टीका थेट पवारांवर. उभ्या आयुष्यात भाऊनी घराबाहेर पडून एक दिवस समाजसेवा केली नसेल पण उभं आयुष्य समाजसेवा केलेल्या पवारांवर वाट्टेल ते बोलत सुटतात. मागे तर कुठल्यातरी अंधभक्ताने भाऊंच्या व्हिडिओखाली पवारांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. भाऊ म्हणजे भक्तांचे झाकिर नाइक आहेत. त्यांचे व्हीडीओ पाहण्याआधी अंधभक्त गांजा मारून बसत असतील.
भाऊ बायस्ड नाहीत असही सिद्ध झालेल नाही. मणिपूर, पी एम केअर पैशांचा घोटाळा, इलेक्टरल बाँड घोटाळा, चंडीगड निवडणूक ह्यावर भाऊ काहीही बोलले नाहीत, बोलणार नाहीत. कारण प्रचंड सांख्येने जमलेले अंधभक्त चॅनल सोडुन जातील नी भाऊना यूट्यूब द्वारे मिळणारा पैसा बंद होईल.
पैसा कमवण्यासाठी केला जाणारा पवारद्वेष चिंताजनक आहे.
23 Apr 2024 - 9:09 am | वेडा बेडूक
मोदीद्वेष्टे आहेत. गल्लीतल्या निवडणुकीत उभे राहिले तर त्यांच्या घरातले लोकही मत देणार नाहीत. आणी टीका थेट मोदींवर.
बाहुबलींनी युट्युब चॅनेल काढलं तर त्याला भाऊंइतके व्यूज मिळतील का?
की ते जसे इतरांच्या युट्युब चॅनेल गलिच्छ भाषेत निरर्थक वैयक्तिक शेरेबाजी करतात तशा कमेंट्स येतील?
23 Apr 2024 - 9:33 am | अमरेंद्र बाहुबली
भाऊ भक्त आले. कल्पना विलासात खुश रहा.
23 Apr 2024 - 4:01 pm | वेडा बेडूक
तुमच्या सारखे?