"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
प्रतिक्रिया
23 May 2024 - 9:28 am | अमरेंद्र बाहुबली
इथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा काय संबंध?
23 May 2024 - 1:12 pm | कांदा लिंबू
का? तुमचे मुख्यमंत्री भाजपचे एजंट नाहीत?
23 May 2024 - 6:34 pm | मुक्त विहारि
स्वाती मालीवाल भाजप एजंट आहे... हे नक्की का?
कारण, स्वाती मालीवाल तर म्हणते की, ती भाजपची एजंट नाही...
23 May 2024 - 6:41 pm | मुक्त विहारि
मालीवाल का मारपीट केस के बाद पहला इंटरव्यू:कहा- बिभव ने थप्पड़ और लात मारी, मदद के लिए कोई नहीं आया; केजरीवाल घर में ही थे
https://www.bhaskar.com/national/news/swati-maliwal-interview-update-arv...
23 May 2024 - 6:42 pm | मुक्त विहारि
'केजरीवाल को पाई-पाई की खबर थी' सुखपाल सिंह खैरा ने 'विदेशी फंडिंग घोटाला' मामले में किए कई बड़े दावे, बोले- ED को भी सब बता दिया
https://hindi.moneycontrol.com/news/lok-sabha-election/sukhpal-singh-kha...
------
ये हैं केजरीवाल का असली चेहरा....
23 May 2024 - 10:01 pm | मुक्त विहारि
'जब मुझ पर हमला हुआ था तो CM केजरीवाल अपने घर पर थे मौजूद', स्वाति मालीवाल का दावा
https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-when-i-was-attacked-cm-k...
24 May 2024 - 9:30 pm | मुक्त विहारि
'मैं इस्तीफा जूते की नोक पर रख कर चलता हूं, मुझे मुख्यमंत्री की कुर्सी का लालच नहीं है'
https://www.amarujala.com/video/india-news/i-leave-my-resignation-on-the...
------
आणि आता हे पलटूराम म्हणतात की, 'कभी नहीं दूंगा CM पद से इस्तीफा...',
https://www.abplive.com/news/india/lok-sabha-elections-2024-delhi-cm-arv...
------
24 May 2024 - 10:34 pm | मुक्त विहारि
स्वाति मालीवाल और अरविंद केजरीवाल की बातों में नहीं, 7 सवालों के जवाब में छिपा है पूरा सच
https://www.aajtak.in/opinion-analysis-/story/swati-maliwal-and-arvind-k...
सच्ची ये कहानी हैं, सून लो....
24 May 2024 - 11:28 pm | मुक्त विहारि
https://www.abplive.com/states/delhi-ncr/arvind-kejriwal-cm-aap-tihar-ja...
----
अगदी अगदी...
मग महाराज, पलटूराम... बांगलादेशी आणि रोहींग्या, बाबतीतील, CAA आणि NRC कायद्याला आपला विरोध का?
26 May 2024 - 8:19 pm | मुक्त विहारि
ध्रुव राठी आणि ‘आप’वर स्वाती मालिवाल यांचा मोठा आरोप; म्हणाल्या, “बलात्कार आणि जीवे मारण्याची..”
https://www.loksatta.com/desh-videsh/swati-maliwal-alleges-rape-and-deat...
----------
त्या म्हणाल्या, “माझ्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझे चारित्र्यहनन करण्याची मोहीम उघडली. त्यानंतर आता माझ्याबद्दल अश्लील कमेंट करणे, बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सुरू केला आहे. तसेच युट्यूबर ध्रुव राठीच्या एकांगी व्हिडीओनंतर या प्रकारात आणखी वाढ झाली आहे.”
27 May 2024 - 8:17 pm | मुक्त विहारि
दिल्ली सीएम के PA की जमानत याचिका खारिज:मालीवाल ने कहा था- बिभव का रसूख मंत्रियों जैसा, उसे बेल मिली तो मुझे खतरा
https://www.bhaskar.com/national/news/swati-maliwal-bibhav-kumar-assault...
27 May 2024 - 8:18 pm | मुक्त विहारि
home/National/Swati Maliwal Case Arvind Kejriwal Pa Bibhav Kumar Bail Court All DetailsSwati Maliwal Case: 'खुद को भी चोटें पहुंचाई जा सकती हैं', केजरीवाल के PA बिभव कुमार को जमानत दिलाने के लिए कोर्ट में दी गई ये दलीलें
27 May 2024 - 8:22 pm | मुक्त विहारि
https://www.jansatta.com/national/swati-maliwal-case-arvind-kejriwal-pa-...
31 May 2024 - 11:04 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/ncr/story-lg-says-aap-government-giving-55...
-----
सबसे बडा रुपैय्या....
31 May 2024 - 11:18 pm | मुक्त विहारि
दिल्ली में जल संकट को लेकर सुप्रीम कोर्ट पहुंची केजरीवाल सरकार, अदालत में रखी ये मांग
https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-kejriwal-government-move...
-----
इसके साथ ही शुक्रवार को दिल्ली के सीएम अरविंद केजरीवाल ने भी एक ट्वीट के माध्यम यूपी और हरियाणा दोनों राज्यों को सहयोग के लिए कहा है।
-----
स्वतःला जमले नाही तर दुसऱ्यावर खापर फोडा...
12 Jun 2024 - 8:31 pm | मुक्त विहारि
अरविंद केजरीवाल के खिलाफ दिल्ली की महिलाओं का हल्ला बोल, मांगे 1000 रुपये
https://www.aajtak.in/india/delhi/video/arvind-kejriwal-had-promised-to-...
12 Jun 2024 - 8:32 pm | मुक्त विहारि
पानी पर हाहाकार! दिल्ली सरकार से सुप्रीम कोर्ट नाराज, पूछा- आपने बर्बादी रोकने के लिए क्या किया?
https://www.abplive.com/news/india/delhi-water-crisis-supreme-court-ques...
12 Jun 2024 - 8:33 pm | मुक्त विहारि
https://www.livehindustan.com/ncr/story-supreme-court-slams-delhi-govern...
12 Jun 2024 - 8:38 pm | मुक्त विहारि
'हमें हल्के में न लें, नहीं तो हम...', केजरीवाल सरकार से सुप्रीम कोर्ट नाराज, सिंघवी को भी लगा दी फटकार
https://www.jagran.com/news/national-sc-to-kejriwal-govt-on-delhi-water-...
29 Jun 2024 - 8:40 pm | मुक्त विहारि
केजरीवाल को अदालत से झटका, सीबीआई मामले में 12 जुलाई तक न्यायिक हिरासत में भेजे गए
https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-three-day-cbi-remand-end...
-------
माझा तरी न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे..
----
29 Jun 2024 - 9:27 pm | पॅट्रीक जेड
भारतात लोकशाहीचा गळा दाबला जातोय. सीबीआय इडी ने आतातरी भाजपसाठी काम करणे सोडावे
नी केजरीवालना मुक्त करावं.
30 Jun 2024 - 12:05 am | टीपीके
म्हणजे तसाच का जसा नेहरू, इंदिरा गांधी यांनी अगणित वेळा दाबला? कधी विरोधी पक्षांची राज्य सरकारे बरखास्त करून, कधी किशोर, कधी मजरुह यांच्यावर बंदी घालून? १९७० मधील इंदिरा , संजय यांची तानाशाही विसरला की ....
जमले तर जरा मारुतीचा खरा इतिहासही वाचा मग बीजेपी आणि मोदी तुम्हाला फार सज्जन वाटू लागतील. अर्थात तुमच्या नोकरीच्या अटी शर्तींमधे बसत असेल तरच, नाहीतर रेटून खोटं चालू द्या. एखाद्यावेळेस तुमचे काम बघून पगार वाढही मिळेल.
30 Jun 2024 - 10:25 pm | मुक्त विहारि
त्यामुळे, अशा प्रतिसादांना फाट्यावर मारणे उत्तम...
1 Jul 2024 - 1:41 pm | पॅट्रीक जेड
किती दिवस नेहरूंच्या नावाने बोंबलणार?? शेठने कितीतरी सरकवरी संस्था बटिक बनवून ठेवल्यात त्याबद्दल बोला.
1 Jul 2024 - 4:42 pm | टीपीके
चला नेहरू सोडा, पण 2004 ला घटना बाह्य पद्धतीनी मॅडम नी सत्ता आणि सत्तेवर अंकुश मिलावलाच ना? त्या वेळी काय लोकशाहीचा गळा की काय ते आवळले नव्हते का?
चला या निमित्ताने तुम्ही पहिल्यांदा निदान हे मान्य केले की नेहरू, इंदिरा, संजय यांनी सर्रास लोकशाहीची हत्या केली. अभिनंदन, आपल्यावरील एकांगी असल्याचा आरोप दूर करण्यास पाहिले पाऊल उचलल्या बदल. याच पद्धतीने उठा यांनी सत्तेचा कसा गैरवापर केला हे पण होऊन जाउ दे. प्रयत्न करा, नक्की जमेल तुम्हाला.
1 Jul 2024 - 6:16 pm | पॅट्रीक जेड
काढा काढा पळ काढा शेटच्या हुकुमशाहीपासून.
1 Jul 2024 - 6:22 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
1 Jul 2024 - 7:38 pm | टीपीके
अहो आमचे सोडा, पण तुमचे काय? तुम्ही का पळ काढताय?
1 Jul 2024 - 8:37 pm | पॅट्रीक जेड
मग कधी बोलताय शेटच्या हुकूमशाहीवर. किती ती जळजळ केजरीवालांवर?
1 Jul 2024 - 9:50 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
न्यायालयाचा निर्णय आहे....
आता तुमचा न्यायालयावर विश्वास नसेल तर गोष्ट वेगळी...
1 Jul 2024 - 10:27 pm | सुक्या
त्यांच्या बाजुने निकाल आला तरच (आणी तरच) न्यायालय निष्पक्ष असते. बाकी इतर वेळेस ते सरकारच्या दावणीला बांधलेले असते ... हे तुम्हास माहीत नाही काय मुवि?
30 Jun 2024 - 10:23 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
3 Jul 2024 - 10:22 pm | मुक्त विहारि
अरविंद केजरीवाल की बढ़ेगी और मुसीबत, अब इस मामले में एलजी ने केंद्र सरकार से की सिफारिश; अभी तक दो अधिकारी निलंबित
https://www.jagran.com/delhi/new-delhi-city-ncr-arvind-kejriwal-gets-ano...
-----
3 Jul 2024 - 10:24 pm | मुक्त विहारि
स्वाति मालीवाल ने केजरीवाल को लिखा 4 पेज का लेटर, दिल्ली सरकार पर लगाए कई गंभीर आरोप
https://www.agniban.com/swati-maliwal-wrote-letter-arvind-kejriwal-serio...
5 Jul 2024 - 1:04 am | मुक्त विहारि
home/Rajya/Swati Maliwal Attacks Arvind Kejriwal Government Says Aap Want To Shut Down Delhi Commission For Women'DCW बंद करना चाहती है दिल्ली सरकार', केजरीवाल पर मालीवाल का प्रहार, बोलीं- छह महीने में नहीं जारी किया एक भी रुपया
https://www.jansatta.com/rajya/swati-maliwal-attacks-arvind-kejriwal-gov...
17 Aug 2024 - 7:46 pm | मुक्त विहारि
https://www.abplive.com/news/india/arvind-kejriwal-got-the-support-of-ra...
The Man is Recognised by the company he keeps...
18 Aug 2024 - 8:19 pm | टीपीके
काहीच कळत नाही, म्हणजे दिल्लीतील आपचा दारू घोटाळा पहिल्यांदा काँग्रेसनेच उघड केला ना? आणि आता तीच काँग्रेस म्हणते की आप दोषी नाही? तेव्हा खोटारडे पणा चालू होता की आता की नेहमीच?
18 Aug 2024 - 9:48 pm | आग्या१९९०
खरंच काही कळत नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना पक्षात घेऊन क्लीन चीट देतात.
19 Aug 2024 - 10:39 am | टीपीके
अगदी अगदी
एकदम बरोबर
पण दुसऱ्याने चूक केली म्हणून पहील्याची चूक दुरुस्त होत नाही ना, दोघीही चूकाच आणि त्यांना चूक म्हणायची हिम्मत पहिजे, नाहीतर तुमची विश्वासाहर्ता धोक्यात येते.
18 Aug 2024 - 10:58 pm | रात्रीचे चांदणे
आपला तो बाबू दुसऱ्याच ते कार्ट हाच न्याय दोन्ही पक्ष वापरत आहेत. उद्या भाजपा आणि आप दोघांना एकमेकांची गरज लागली तर भजपा केजरवालांना वाचवेल तर काँग्रेस विरोघ करेल.