"आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" ... आज बर्याच दिवसांनी एका जुन्या सुरेल गाण्याच्या ओळी आठवल्या. पण दरोज जे काही गेल्या २१ दिवसात दिल्लीत चाळे चालले आहेत त्या बदमाशियोंच्या संदर्भात...
वास्तवीक नव्याने सत्तास्थापना केल्यावर कुठल्याही सत्ताधारी पक्षास, त्यांच्यावर टिका करण्याआधी काही काळ देणे योग्य अहे असे वाटते. आम आदमी पार्टी अर्थात आप च्या बाबतीत तर हे जास्तच असावेसे वाटत होते. तसे पाळायचा प्रयत्न देखील करणार होतो, पण हे पठ्ठे जसे महाभारतात श्रीकृष्णाला शपथ मोडायला लावून रणांगणात येण्यास भाग पाडले गेले तसे करत आहेत. अर्थात येथे कोणी कृष्णही नाही आणि त्याला युद्धात उडी मारायला लावणारा कोणी भिष्मही नाही, हा भाग वेगळा. पण सत्तेत येऊ का नये हे जनतेला एस एम एस करून विचारणे हे आता अगदी विचारी कृत्य वाटावे असे चढत्या भाजणीने आप आणि त्यांच्या नेत्यांचे वागणे चालू आहे. २१ दिवसात यांनी जितके रंग दाखवलेत तितके इतर कुठल्याच पक्षाने दाखवले नसतील असे वाटते.
लोकशाहीतले राजकारण हे काही अंशी ग्यानबा-तुकाराम असे म्हणत अर्थात दोन पाउले पुढे एक पाऊल मागे असे करत जात असते. निवडणुकीतल्या घोषणा आणि सत्तेत आल्यावर वास्तवाचे भान या दोन गोष्टींचा विचार केल्यास सत्ताधारी पक्षाने काही माघारी घेतल्या तरी गैर वाटत नाही. आप च्या बाबतीत देखील त्यांनी काही मते बदलली असली किंबहूना "असती" तर विशेष असे वाटले नसते. पण त्यांनी जिथे मते बदलली आणि जिथे बदलली नाहीत त्याच्या जागा चुकीच्या आहेत. भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही. त्या भ्रष्टाचारी आहेत का नाहीत, मला माहीत नाही. पण केजरीवाल रिपोर्ट घेऊन आध हिंडायचे. बरं आता शक्य वाटत नसले तरी हरकत नाही, पण भाजपच्या हर्ष वर्धन नी पुरावा द्यावा असे म्हणणे म्हणजे अतीच झाले.
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत निर्णय घेतलेत ते राजकीय घोषणाच अधिक आहेत कारण त्यात किती पैसे उधळले जाणार आहेत आणि नक्की कुणाला फायदा होणार आहे हा मोठा प्रश्न आहे. त्या व्यतिरीक्त काही गोष्टी विधानसभेत संमत झाल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाहीत. तेंव्हा काँग्रेस काय करते त्यावर अवलंबून रहाणार.
असे बरेच काही २१ दिवसात झाले. पण गेल्या दोन दिवसात झालेली घटना ही केवळ आप पुरतीच नाही तर सगळ्या भारताला लांछनास्पद आहे. ज्या भारताने एकमुखाने, देवायनी खोब्रागडेंशी अमेरीकन पोलीस कायद्यानुसार वागले तरी स्त्री म्हणून आणि राजनैतिक अधिकारी म्हणून योग्य ट्रिटमेंट दिली नाही, म्हणून निषेध केला, त्याच भारतात युगांडातून आलेल्या स्त्रीयांवर कायदा हातात घेऊन (पक्षि: बेकायदेशीर पणे) दिल्ली सरकारातील कायदामंत्र्याने धक्कबुक्की केली, त्या बायकांना त्यांचे युरीन सँपल देण्यास भाग पाडले, ज्यातून काहीच सिद्ध होऊ शकले नाही. असे का करावे? तर त्या जेथे रहात होत्या तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून. या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले. पोलीसांनी अर्थातच वॉरंट शिवाय पकडणे शक्य नाही म्हणून नाकारले. तर आता त्या पोलीसांनाच सस्पेंड करा म्हणून केजरीवाल ओरडत आहेत आणि ज्या कायदामंत्र्याने लोकशाहीतला कायदा हातात घेतला त्यांची भलावण करत (बेवजा तारीफ करना आप की आदत तो नही?), हे देशाच्या गृहमंत्रालयासमोर धरणे धरून बसायचे जाहीर करत आहेत. या सर्व प्रकरणात भारतीय हे ते ज्या गोर्या लोकांना रेसिस्ट म्हणतात त्यांच्या पेक्षा अधिक रेसिस्ट असल्याचे चित्र जगापुढे येत आहे. आणि त्याला कारण हे केरसुणीवाले नेते आहेत. विचार करा असली सर्कस मुंबई-बंगलोर-चेन्नई सारख्या ठिकाणी येऊन तिथल्या काही म्होरक्यांचे असले हट्ट पुरवायला लागली तर.
व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला. यात भाजपा-मोदींना निवडण्याचा प्रचार नाही, पण यांच्यापुढे अगदी आजचे भ्रष्ट आणि कोडगे काँग्रेसी नेते पण चालतील, अगदी मुलायम आले तरी चालतील असे म्हणण्यासारखी अवस्था आहे. पण आप च्या मदतीवीना... कारण उद्या हे असले आप-मतलबी नेते जर केंद्रात आले तर काय होईल याचा विचार करून त्यांना उर्वरीत ठिकाणाहून लागण होण्यापासून लांब ठेवणे गरजेचे आहे असे वाटत आहे.
प्रतिक्रिया
18 Jan 2014 - 8:08 pm | आनंदराव
अहो, सत्ता मिळवणे सोपे आहे. टिकवणे महा कठीण!
यशाच्या बाबतीतही तेच आहे.
त्यांचे खरे रंग दिसतीलच.
25 Jan 2014 - 5:00 pm | विजुभाऊ
मूळ महत्वाचा प्रश्न "पोलीस एफ आय आर का दाखल करीत नाहीत? , नागरीकानी तक्रार केल्यानंतर तक्रारसुद्धा का नोंदवुन घेत नाहीत?" हा बाजूलाच रहातो. कोणीच यावर बोलत नाहीत.
केजरीवालांचे काय चुकले या पेक्षा पोलीसानी कसे वागावे याबद्दल कोणीच बोलत नाहीत. हिंदी चॅनेलस वाल्याना तर फक्त वरवरचा चोथा चघळायला आवडते
25 Jan 2014 - 7:37 pm | विकास
"पोलीस एफ आय आर का दाखल करीत नाहीत? , नागरीकानी तक्रार केल्यानंतर तक्रारसुद्धा का नोंदवुन घेत नाहीत?"
हा प्रश्न महत्वाचा आहे याच्याशी १००% सहमत. किंबहूना या प्रश्नावर आधारीत जर चर्चा करायची झाली असती तर पोलीस करप्ट आहेत वगैरेसंदर्भात पहीला प्रतिसाद आला असता आणि उर्वरीत सर्वच प्रतिसाद हे +१ म्हणून येऊन चर्चा एकाच पानात संपली देखील असती. :)
पण चर्चेसंदर्भात हा प्रश्न महत्वाचा नाही. किंबहूना प्रस्तावात तो आलेला देखील नाही. केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने हा मुद्दा कायद्यास फाट्यावर मारून आणि कायद्या मंत्र्याच्या चुकांवर भ्रष्टाचारमुक्त पांघरूण घालून हाताळला आहे, ते योग्य आहे का हा आहे.
हा प्रश्न गंभीर आहे. कारण जर असले तमाशे केजरीवालांनी केले तर बरोबर असले तर उद्या महीला आयोग अशीच धरणे धरत दिल्लीचे व्यवहार ठप्प करू शकते. एखादा दिल्लीचा खासदार अजून एखाद्या वस्तीत जाऊन अजून कुणाला पकडून अजून राडे करू शकतो, मग मुंबईतला शिवसेनेचा खासदार-आमदार-नगरसेवक त्याच्या मतदार संघात काहीतरी चुकीचे घडले म्हणून त्याला चूक वाटणार्याच्या श्रीमुखात भडकावू शकतो... कशा कशाचे समर्थन करायचे? का केवळ हे जनलोकपाल आणि भ्रष्टाचारमुक्त म्हणून सारखी पोपटपंची करत आहेत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे?
मध्यंतरी (कधी ते आठवत नाही पण) भाजपा-शिवसेनेने मुंबईत बंद केला म्हणून कोर्टाने त्यांना सगळे व्यवहार जरी १००% बंद झाले नाही तरी दंड केला आणि तसा दंड दिल्लीचा कारभार वेठीस धरणे योग्यच होते. तेच या आप च्या बाबतीत करू नये असे वाटत नाही का?
25 Jan 2014 - 9:13 pm | विजुभाऊ
एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर अशी वेळ का यावी ?
राज्यात सुव्यवस्था आणण्यासाठी मुख्यमंत्र्याला सुद्धा अधिकार नाहीत तर ते राज्य कसले ?
25 Jan 2014 - 9:20 pm | विकास
एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्यावर अशी वेळ का यावी ? राज्यात सुव्यवस्था आणण्यासाठी मुख्यमंत्र्याला सुद्धा अधिकार नाहीत तर ते राज्य कसले ?
नक्कीच येऊ नये. या संदर्भात सर्वच प्रमुख पक्ष म्हणजे सत्ताधारी आप, पाठींबा देणारा कॉग्रेस आणि विरोधी पक्ष भाजपा सहमत आहेत. मुद्दा जनतेच्या कारभारास वेठीस धरण्याचा आहे. जर त्यांना हा मुद्दा पुढे नेयचा होता तर सर्व पक्षांना घेऊन करता आले असते. पण त्यांनी ते केले नाही. त्या शिवाय आंदोलन सुरू करताना पोलीसांवर कारवाई करा हा मुद्दा होता पण तो पुरेसा इंप्रेसिव्ह ठरला नाही म्हणून अजून, मग अजून असे होत गेले... ते वेगळेच.
25 Jan 2014 - 10:03 pm | बंडा मामा
शीला दिक्षीत ह्यांच्या सरकारने ह्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. जे अर्थातच अयशस्वी ठरले. म्हणूनच आंदोलन छेडावे लागले.
26 Jan 2014 - 2:17 am | हतोळकरांचा प्रसाद
म्हणूनच तर प्रश्न पडतो कि बाकीचे संवैधानिक पर्याय चालत नाही म्हणून आंदोलन छेडले तर ते असे आटोपले कशाला? आटोपले तेही फक्त दोन पोलिसांच्या रजेमुळे? बरं शिला दिक्षित किंवा आधीच्या लोकांनी केलेले प्रयत्न कदाचित भ्रष्टाचार किंवा नकारात्मक भूमिकेमुळे फसले असतील असे गृहीत धरून तुम्ही आधी ते प्रयत्न सकारात्मकरीत्या करायला नको होते का? बरं जर तुम्ही मानता कि आधीच्या लोकांनी खरंच प्रामाणिक प्रयत्न केले होते तर यांनी आधी काही केलेच नाही असे म्हणून तुम्ही खोटे बोलत आहात असे होत नाही का?
तात्पर्य काय कि दिल्लीमध्ये एक मतदारांचा "वैतागलेला" वर्ग आहे जो आंदोलनाला मानतो. तो बेस पक्का करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. कारण "हे काहीतरी करुन दाखवतील" किंवा "हे उच्च नैतिकतेचे लोक आहेत" यामुळे मागच्या निवडणुकीत यांच्याकडे सरकलेला वर्ग एका महिन्यातील यांच्या वागणुकीमुळे दुरावताना दिसत आहे. तेव्हा इतर राजकीय पक्ष जे करतात (एक मतदारवर्ग तयार करून ठेवा) तेच यांनीही या आंदोलनाद्वारे करण्याचा प्रयत्न केला यापलीकडे या आंदोलनाचा काही उद्देश होता असे मला वाटत नाही.
26 Jan 2014 - 7:34 am | बंडा मामा
मुळात हे आंदोलन असवैंधानिक होते हीच माहिती चुकिची आहे. त्यामुळे बाकीच्या मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याची गरजच रहात नाही.
26 Jan 2014 - 9:26 am | हतोळकरांचा प्रसाद
बरं, वरच्या प्रतिसादात "संवैधानिक" चा अर्थ "आमदारांच्या बळावर विधिमंडळात कायदा करून किंवा सनदशीर मार्गाने" असा घ्या आणि बाकींच्या मुद्द्यांवर प्रतिवाद करा.
26 Jan 2014 - 9:32 am | बंडा मामा
'संवैधानिक'चा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ पाहून धन्य झालो. तरी बरं 'तुम्ही म्हणताय तेच खरं' असा अर्थच घ्यायला सांगितले नाहीत.
26 Jan 2014 - 9:44 am | बंडा मामा
भारताचे संविधान म्हणजे काय हतोळकरांनी लिहिलेला निबंध आहे का? तुम्ही म्हणाल तशा अर्थाने घ्यायला?
क्लिंटन, विकास वगैरेंशी मी असहमत असलो तरी त्यांच्या मुद्द्यांना एक दर्जा आहे. त्यांचा प्रतिवाद करायला मजा येते. तुमचे मुद्दे हे फेसबुकवरील मोदी फॅन्बॉय उथळपणे मांडत असतात त्या दर्जाचे आहे. त्याचा काय प्रतिवाद करणार? वाटल्यास पळवाट म्हणा त्याला..
27 Jan 2014 - 12:08 am | हतोळकरांचा प्रसाद
उत्तरे नसली कि वैयक्तिक हल्ला हि तुमची खोड आहे कि खरंच तुमच्याकडे उत्तरे नाहीत? मी तर बुआ अजाण बालक, गुगल करून व्याख्या काढली, तुम्ही सांगा तुमच्या मते संविधान म्हणजे काय? मी कधी दावा केला मी संविधान लिहिले आहे? आणि मी तरी समजत होतो कि कायदे हे विधिमंडळात किंवा संसदेत चर्चा करून बनतात. "धरने" हा जरी असंवैधानिक मार्ग नसला तरी पहिला उपाय नसावा असं इतिहास दर्शवतो.
पण असो, कसंय तुम्हाला ज्या प्रश्नांची उत्तरे देता येतात ते उत्तम दर्जाचे ह्या सातवी-आठवीतल्या पोराच्या दर्जाचा प्रतिसाद पाहिल्यावर पुढे काय बोलणे! समोरच्याचा मुद्दा खोडताना त्याला मोदी फॅन्बॉय म्हणून मुद्द्याला बगल देणे हे तर मोदी अंध विरोधकांचे पहिले लक्षण आहे. (माफ करा मला वैयक्तिक टीका करणे आवडत नाही पण तुम्ही सुरुवात केली म्हणून प्रतिवाद केला).
आता राहिला मुद्दा! चला अगदी बालिश प्रश्न असं समजून अगदी मोठेपणाने, संविधानाचा तुम्हाला अभिप्रेत असलेला अर्थ लावुन, वरील प्रश्नावर तुमचे मत कळेल काय? नाही दिलेत तर काय माझ्या अंगाला भोकं पडणार नाहीत पण "अपरिपक्व (किंवा उथळ)" प्रश्नाला परिपक्व उत्तराची अपेक्षा आहे.
18 Jan 2014 - 8:38 pm | प्रभाकर पेठकर
पहिल्याच प्रयत्नात आपल्याला एवढे घवघवीत यश मिळेल आणि आपण थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरच बसू, असे केजरीवालांनाही वाटले नसेल. त्यामुळे अचानक मिळालेले यश कसे हाताळायचे ह्याची कांही योजना नाही. हा पक्ष मरतो कधी ह्याचीच वाट पाहात काँग्रेस आणि बिजेपी ही दोन गिधाडे शांतपणे झाडावर बसली आहेत. वाट पाहणे एवढेच आपल्या हाती आहे.
आप मध्ये अंतर्गत लाथाळीही सुरु झाली आहेत. केजरीवालांवर 'हुकुमशहा' असल्याचा आरोप त्यांचेच खासदार करीत आहेत. बिजेपी-काँग्रेस एवढ्यातच 'आप' ला पाडायचा प्रयत्न करणार नाही. 'एका चांगल्या आणि लोकाभिमुख पक्षाच्या सरकारला ह्यांनी स्वार्थासाठी पाडलं' असं बोंबलत फिरायला 'आप'ला संधी मिळू नये एव्हढी काळजी घेतली जात आहे.
सध्या फक्त 'काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा हिशोब मागा' असा, 'आप' साठी अडचणीचा, धोशा बिजेपी लवकरच लावेल असे वाटते आहे. पाहूया.
21 Jan 2014 - 5:10 pm | वामन देशमुख
नक्की?
21 Jan 2014 - 7:31 pm | प्रभाकर पेठकर
माफी असावी. चुक झाली.
दिल्ली म्हंटली की केंद्र सरकारच डोळ्यासमोर येते.
18 Jan 2014 - 9:32 pm | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
केजरीवाल हा खोटारडा आहे हे त्याच्याकडे बघितल्यावरच कळते ,आप हे 'खाप'च्याच औलादीचे वाटायला लागलेत,याचा बोलवता धनी वेगळाच असावा ....
20 Jan 2014 - 9:53 pm | lakhu risbud
अवांतर,
"टॉपगिअर्ड फिलोसॉफर " याचे भाषांतर मायमराठीत "वरच्या'तारे' चा तत्वज्ञ" असे घ्यावे काय ?
21 Jan 2014 - 7:25 pm | गब्रिएल
... "वरच्या'तारे' चा तत्वज्ञ"...
हे वाच्ताना "पहिल्या धारेचा तत्वज्ञ" आसं वाच्लं की वो +D21 Jan 2014 - 4:38 pm | प्रसाद जवळे
जर काही माहित नसेल उगाच बडबड करण्याची गरज नहि. आप सामान्य लोकांसाठी लढत आहे
18 Jan 2014 - 9:59 pm | कानडाऊ योगेशु
केजरीवाल हे गो.रा.खैरनारांसारखेच प्रसिध्दीलोलुप प्रकरण आहे असे वाटू लागले आहे. ज्या मनुष्याने स्वतः सरकार दरबारी अधिकारी म्हणुन काम केलेले असावे त्याला सरकार चालते कसे ह्याची इतरांपेक्षा जास्त कल्पना असावी पण सत्तेवर आल्यापासुनच काही ना काही कारणाने स्वतःचे हसे करुन घेत आहे. घरासाठी सरकारी यंत्रणेचा विनाकारण बल्ल्या अगोदरच करुन झालाय आणि त्यात अजुन हे एक प्रकरण. आप म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असा प्रकार होतो आहे का काय असे वाटतेय. ( गांधीच्या बाबतीत सरोजिनी नायडूंनी असे म्हटले होते कि इट इज व्हेरी कॉस्टली टू किप गांधीजी पूअर. त्याच धर्तीवर केजरीवाल व आप च्या बाबतीत यंत्रणा भ्रष्ट्राचारमुक्त ठेवणे हे एक कॉस्टली अफेअर न होवो. केजरीवाल सेक्युरिटी घेत नव्हते त्यामुळे एरवी जितका झाला अस्ता त्यापेक्षा दसपट जास्त खर्च त्यांच्या सेक्युरिटीवर झाला असे पेपरांत वाचले होते.)
18 Jan 2014 - 10:16 pm | श्रीगुरुजी
>>> व्हिपी सिंग आले आणि साधारण एक-दिड आठवड्यातच भारताने पहील्यांदा दहशतवाद्यांना सोडले जो जनतेने नियम मानून नंतर कंदहार प्रकरणात केवळ राजकारण्यांच्याच मुलांसाठी का म्हणत पुढे रेटला.
वि.प्र.सिंगांच्या काळातील रूबिया सैदच्या बनावट ओलीस प्रकरणात अतिरेकी सोडल्यापासून कंदाहार होईपर्यंतच्या १० वर्षांच्या काळात अजून काही वेळा अतिरेकी सोडण्यात आले होते. कंदाहार प्रकरण व त्यापूर्वीची इतर प्रकरणे यांची तुलना होऊ शकत नाही. इतर प्रकरणात निव्वळ राजकीय निर्णय घेतला गेला होता. १९९३ साली तर कोणीही ओलीस नसताना व अतिरेकी पूर्णपणे मशिदीत अडकले असून तिथून ते सुटण्याची सुतराम शक्यता नसताना निवडणुकीवर डोळा ठेवून त्यांना सुखरूप पाकिस्तानला सोडण्यात आले होते. १९९९ ला कंदाहार प्रकरणात देशाबाहेरून पळविलेले भारतीय विमान देशाबाहेर नेऊन १६० प्रवाशांना ओलीस ठेवल्यामुळे व त्यांना सोडविण्याचा कोणताच मार्ग शिल्लक नसल्याने १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी नाईलाजाने ३ अतिरेक्यांना सोडावे लागले.
18 Jan 2014 - 10:19 pm | विद्युत् बालक
आणखी जर कंदहार प्रकरणी अतिरेक्यांना सोडले नसते तर प्रवाशांचे जीव गेले असते आणि मग ह्याच लोकांनी वाजपेयी सरकारला लोकांची काळजी नाही म्हणून टाहो फोडला असता .
20 Jan 2014 - 10:58 pm | अत्रन्गि पाउस
तो निर्णय सर्वपक्षीय बैठकीनंतर घेतला होता...
18 Jan 2014 - 10:42 pm | आतिवास
सोमनाथ भारती हे स्वतः वकील आहेत, वकिली व्यवसाय त्यांनी केलेला आहे - तरीही कायद्याबद्दलचे त्यांचे अज्ञान (स्त्रियांना सूर्यास्त ते सूर्योदय या काळात अटक करता येत नाही, विशेष प्रसंगी दंडाधिका-याच्या लेखी आदेशानंतरच अटक करता येते) आणि कायदा 'हातात' घेण्याची घाई पाहून आश्चर्य वाटलं. अशा अरेरावीने आणि घाईने 'आप'च्या कार्यकर्त्यांना अटक झालेली त्यांना चालेल काय? दिल्लीत 'अराजक' माजणं (म्हणजे ते आहेच पुष्कळसं पण ते आणखी वाढणं) आपल्याला परवडणार नाही.
मालवीयनगर -खिडकी भाग चांगलाच माहिती आहे मला. भारती यांचा मुद्दा बरोबर आहे पण त्याची अंमलबजावणी अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाली आहे यात संशय नाही.
एकंदरित काळजी वाढली आहे हे खरं!!
20 Jan 2014 - 12:29 am | संजय क्षीरसागर
सोमनाथ भारती प्रकरणात नक्की काय झालं याविषयी केजरीवाल (खाली दिलेल्या मुलाखतीत) जे सविस्तर बोलले आहेत, ते पटेल.
20 Jan 2014 - 9:27 am | आतिवास
तुम्ही देखिल शासकीय अधिकारी आहात
या पूर्णतः नव्या माहितीबद्दल धन्यवाद.
उगाच व्यक्तिगत बाबीत शिरायचं कारण काही कळलं नाही.
आंतरजाल!!
असो.
20 Jan 2014 - 10:51 pm | रामपुरी
"उगाच व्यक्तिगत बाबीत शिरायचं कारण काही कळलं नाही"
माणूस सवयीचा गुलाम असतो.
21 Jan 2014 - 10:41 am | संजय क्षीरसागर
तुमचं लेखन वाचून तसा गैरसमज झाला होता. पण त्यावर `अवहेलना झाल्यासारखा' उपप्रतिसाद आणि `उगाच व्यक्तिगत बाबीत शिरायचं कारण काही कळलं नाही' हा शेरा आश्चर्यकारक वाटला.
तुमच्या लेखनात सामाजिक आशय असतो त्यामुळे तुम्हाला सामाजिक सह-संवेदना असावी हा सुद्धा कदाचित माझा गैरसमज असावा. कारण तुमच्या या वाक्यावर :
मी म्हटलं होतं की :
पण मुलाखतीलल्या केजरीवालांच्या मुद्याऐवजी तुम्हाला हुद्याची पडलेली दिसते. तर मुद्दा असा होता की :
कोणतेही ड्रग रॅकेट किंवा सेक्स रॅकेट चालू आहे याची पोलिसांना कल्पना असते. त्यानं तिथल्या नागरिकांचं जगणं असह्य झालेलं असतं. (मुलाखतीत जेंव्हा कार्यप्रणालीचा विषय येतो तेंव्हा केजरीवाल उघडपणे म्हणतात की राजदीप तुम्ही उच्चाभ्रू सोसायटीत राहात असल्यानं तुम्हाला त्याची झळ पोहोचत नाही). आणि ज्या पोलिसांना हाताशी धरुन ते बंद पाडायचं तेच भ्रष्ट आहेत. त्यावर राजदीप म्हणतात : हेच तर शीला दिक्षित म्हणत होत्या की पोलिसांवर त्यांचं नियंत्रण नाही. यावर केजरीवाल म्हणतात, त्या असहाय असतील पण आम्ही नाही. हे चार अधिकारी हटवा, सगळे पोलिस लाईनीत येतील!
21 Jan 2014 - 11:32 am | संजय क्षीरसागर
सारं आयुष्य एकमेव संशोधनाला वाहिलेलं : माझा प्रतिसाद कुठे दिसतो! दिसला प्रतिसाद की झाले प्रकट! (कुठलिही पोस्ट उघडून पाहा). काही लोकांना मुद्याशी, काहींना हुद्याशी तर यांना फक्त माझ्या प्रतिसादाशी घेणं! सगळं आयुष्य त्यातच चाललंय पण तत्त्वनिष्ठा कायम!
21 Jan 2014 - 7:48 am | बंडा मामा
तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण दुर्दैव असे आहे की आप ला विरोध करणारे जे घटक आहेत त्यांचा आंधळा विरोध टोकाचा आहे की ह्या वॅलिड मुदद्द्यवर चर्चा होउच शकत नाही.
21 Jan 2014 - 10:00 am | अनुप ढेरे
दंडाधिकारी म्हणजे कोण? न्यायधीश?
21 Jan 2014 - 11:56 am | चिगो
"एक्झेक्युटीव्ह मजिस्ट्रेट".. बाकी दिल्ली युनिव्हर्सिटीत म्हटलं जातं तसे भारती "कुंजी" वाचूनच वकील झाले आहे, असं दिसतं. (माझी अक्कल काढण्याआधीचा एक डीसक्लेमर: सदरहू व्यक्तीने दिल्ली युनिव्हर्सिटीत "कॅम्पस लॉ सेंटर" ह्या त्यांच्या लॉ कॉलेज मध्ये एक सेमिस्टर केलीय. नंतर काही व्यक्तिगत कारणांनी ते शिक्षण सोडले.) त्यांनी "क्रिमीनल प्रोसिजर कोड" वाचला काय, ऐकला पण नसावा अशी शंका येण्याइतपत आतातायीपणा दाखवला.. ज्या "जानता नहीं, मैं कौन हूं?" अॅटीट्युडच्या विरोधात "आप" उभी राहीलीय, तोच अॅटीट्युड आताहे नेते दाखवताहेत. मी काय म्हणतो, "घाई क्या हैं?" अरे, जर वेळ थांबा, शिका आणि मग दांडूके हाणा ना.. आणि केजरीवाल तर लहान मुलासारखेच "मला आत्ताच्या आत्ता हे पाहीजे.", "मी काय नाही केलं, त्या शिंद्यानी केलं.." असं करताहेत. साहेब, आता तुम्ही "आतले" झालायत, "बाहेर"चे बहाणे आणि नाटकं आता कामी येऊ शकत नाहीत.. ;-)
21 Jan 2014 - 1:46 pm | पैसा
पर्फेक्ट!
21 Jan 2014 - 10:23 pm | अप्पा जोगळेकर
र् रेकेट मधल्या पुरुशांना अटक झाली होती का. का तसाही कायदा आहे.
18 Jan 2014 - 11:00 pm | विनोद१८
अशी गत आहे ही, नव्या नवलाइचे नउ दिवस सम्पल्यावर त्या केज्रीवालचा खरा कस लागेल, अहो ही तर सुरवात आहे त्याची, आन्दोलन करणे वेगळे आणि राज्यशकट चालवणे वेगळे हे त्याच्या आता लक्षात येइलच. १०वीत अपे़क्शा नसताना बोर्डात १ला आलेल्या विध्यार्थ्याला जर एकदम पदवी परीक्शेत तीसर्या वर्षाला बसविले तर त्याची गत जशी होइल तसेच आता केजरीवालचे होइल, जरा थाम्बा आणि वाट पहा. त्याची गाठ काँग्रेस आणि भा.ज.प.शी आहे. तो कधीच शीला दिक्षीतवर कारवाइ करु शकेल असे वाटत नाही, जर तसा प्रयत्न त्याने केला तर काँग्रेसला ते सहन होणार नाही, त्याचा वचपा १२५ वर्षाची काँग्रेस कसा काढेल हे वेगळे सान्गायला नको.
केवळ आन्दोलने सोडल्यास कोणताही राजसत्तेचा पुर्वानुभव नसताना केवळ दिल्लीत निवडुन आलेल्या २८ आमदारान्च्या बळावर अखिल भारतिय स्तरावर लोकसभा लढवून लाल किल्ल्यावर डोक्यावर पान्ढरी टोपी घालुन भाषणे करायचे मान्डे केजरीवाल आप'ल्या मनात खाऊ लागलाय, तसे त्याने ते जरुर खावेत तो त्याचा अधिकार मान्य करुन ज्या वेगाने तो आलाय त्याच वेगाने आपल्या परतीच्या मार्गाला लागेल असे वाटते, त्यासाठी अजुन काही दिवस वाट पहावी लागेल.
तो एक यशस्वी--आन्दोलन्कर्ता आहे यशस्वी--राज्यकर्ता होण्यासाठी लागणारी तपस्या ही त्याच्याकडे अजुन कमीच दिसते.
विनोद१८
19 Jan 2014 - 12:20 am | टॉपगिअर्ड फिलोसॉफर
सहमत
19 Jan 2014 - 12:25 am | विद्युत् बालक
कि रात्री तुम्ही रंग बदलता ?
19 Jan 2014 - 3:43 am | बर्फाळलांडगा
इतके असुनही आप अजुनही अतिशय नगण्य भ्रष्टाचारी सुधा नाही... सत्ता राबवायाची अक्कल यायला वेळ गेला तरी हरकत नाही उठसुठ आरोपी करने योग्य न्हवे.
19 Jan 2014 - 8:25 am | विकास
दिल्ली विधानसभेत निवडून आलेले आप चे लोकप्रतिनिधी लोकसभेची निवडणूक लढवणार नाहीत म्हणून सांगितले गेले होते. त्यानुसार केजरीवाल यांनी देखील ते स्वतः लोकसभा निवडणू़क लढवणार नाहीत असे म्हणाले होते. पण आता पक्षसदस्यांच्या "आग्रहाच्या विनंतीस" मान देऊन आपण स्वतः लोकसभा निवडणु़कीस उभे न रहाण्याचा फेरविचार करत आहोत असे जाहीर केले आहे. पण ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसतील (अर्थात जो पर्यंत त्यांना देशभरातून एस एम एस येत नाहीत तो पर्यंत)
19 Jan 2014 - 8:47 am | श्रीरंग_जोशी
लेखात मांडलेल्या विचारांशी सहमत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूकीपासून आम आदमी पक्ष जे काही करत आहे त्यास पोरखेळ याखेरीज काही म्हणावेसे वाटत नाही. आपल्या लोकशाही व्यवस्थेत काही दोष नक्कीच आहेत पण ते दूर करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करण्याऐवजी या पक्षाचे नेते व दिल्लीचे नवे राज्य सरकार एकूण व्यवस्थेवरच प्रश्न निर्माण करून त्यांना हवे वागत आहेत.
दिल्ली राज्य सरकारकडे दिल्लीमधील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी नाहीये, ती जबाबदारी केंद्रीय गॄहमंत्रालयाकडे आहे. सामान्य नागरिकांच्या या विषयातील तक्रारी पोलिसांद्वारा ऐकून घेतल्या जात नसतील तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठपुरावा करणे अन तेही जुमानत नसतील तर जाहिरपणे त्यांच्यावर राजकीय टिका करणे हे मार्ग योग्य ठरले असते.
त्याऐवजी दिल्ली राज्य सरकारमधील एक मंत्रीमहोदय स्वतःच कारवाई करू बघतात अन त्या कामी स्थानिक पोलिसांनी बेकायदेशीर मार्गाने सहकार्य करण्यास नकार दिला म्हणून त्यांच्या निलंबनासाठी खुद्द मुख्यमंत्री धरणे देण्याची धमकी देतात म्हणजे समस्या या पक्षाच्या मुलभूत मुल्यव्यवस्थेमध्येच आहे.
दिल्ली व आसपासच्या भागांमधील जनता आगामी लोकसभा निवडणुकींमध्ये या पक्षाला किती मतदान करते हे पाहणे रोचक ठरेल.
अवांतरः वरील काही प्रतिसादांत कंदहार प्रकरणावर टिप्पणी झालेली दिसत आहे. ज्यांना या विषयात रस असेल त्यांनी पूर्वी वाचली नसल्यास काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814 या धग्यावरील चर्चा अवश्य वाचावी.
19 Jan 2014 - 5:48 pm | उडन खटोला
ि ु ा ू
19 Jan 2014 - 5:55 pm | बर्फाळलांडगा
तो पर्यन्त कोणीही त्याना ,विशेषता सामान्य मतदाराने नावे ठेवायचा नैतिक अधिकार स्वेच्छेने म्यान करावा
19 Jan 2014 - 5:56 pm | बर्फाळलांडगा
ते सुधा विरोधी पक्ष म्हणून न्हवे तर आम आदमी म्हणुनच
20 Jan 2014 - 12:22 am | संजय क्षीरसागर
स्वतः अरविंद केजरीवालांची क्लॅरिटी आणि राजदीप सरदेसाईसारख्या पत्रकाराला पूर्णपणे निरुत्तर करणारी उत्तरं ऐकायची असतील तर ही मुलाखत जरुर पाहा.
त्रेचाळीस मिनीटांच्या संवादात अरविंदला कोणताही प्रश्न अडचणीत आणू शकत नाही की त्याला कसलीही भीती नाही. उलट मुद्दा निर्विवाद असून देखिल सरदेसाईच खुल्यादिलानं तो मान्य करत नाहीत असं चित्रं आहे.
तुमच्या खालील सर्व प्रश्नांची यथोचित उत्तरं अरविंदनं दिली आहेत :
केवळ मिडीया काय म्हणतो यावरनं स्वतःची मतं बनवून, "आपकी बदमाशियोंके ये नये अंदाज है" वगैरे लेख लिहीण्यापूर्वी खुद्द त्या व्यक्तीची काय भूमिका आहे ते आधी समजावून घेणं श्रेयस आहे.
20 Jan 2014 - 9:25 am | हुप्प्या
ही मुलाखत वाचून केजरीवालांच्या प्रामाणिकपणाविषयी मला तरी शंका वाटत नाही. उलट मिडिया त्यांची राईइतक्या चुकीचा पर्वत बनवायला शिवशिवते आहे असे जाणवते. कधी एकदा आप चुकते आणि मग आम्हीच कसे बरोबर होतो अशी आरोळी ठोकतो पहा अशी मिडियाला घाई झाली आहे. त्यामागे बड्या धेंडांचे संगनमतही असणे शक्य आहे.
उगाचच कुणाला विजिलान्ते बनवून गुण्ड घोषित करायचे आणि बोंब मारायची.
20 Jan 2014 - 10:37 am | विकास
केजरीवाल यांची आय बी एन वरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! ती मुलाखत मी पूर्णपणे (या दुव्यामुळे) पाहिली आणि ऐकली.
...जयदीप सरदेसाईसारख्या पत्रकाराला पूर्णपणे निरुत्तर करणारी उत्तरं...
ते काही निरूत्तर झाल्यासारखे वाटले नाहीत. इतर अनेक पत्रकारांप्रमाणे ते (म्हणजे सरदेसाई) पब्लीसिटीस्टंट करत मुलाखत घेत होते असे वाटले नाही.
स्वतः अरविंद केजरीवालांची क्लॅरिटी ... अरविंदला कोणताही प्रश्न अडचणीत आणू शकत नाही की त्याला कसलीही भीती नाही.
क्लॅरीटी? LOL! एक तर हा माणूस ठार वेडा असला पाहीजे अथवा जबरा चालू असे माझे आधीच असलेले मत ही मुलाखत पाहून दृढ झाले. त्यातील अर्थात दुसरी (म्हणजे जबरा चालू असण्याची) शक्यताच अधिक आहे, नव्हे तेच आहे. त्यांची उत्तरे म्हणजे पडलो तरी नाक वर अशी होती.
आता त्यांनी माझ्या ज्या प्रश्नांना उत्तरे दिली असे म्हणता त्या बद्दलः
भ्रष्टाचारावरून निवडून आलेली ही पार्टी आता शीला दिक्षित यांचे नाव देखील घेण्यास तयार नाही.
अजून पण घेत आहेत असे वाटत नाही. त्यांनी सत्तेत येण्याआधी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या वेळेस आठ दिवसात अॅक्शन घेतली नाही तर एफ आय आर दाखल करू असे म्हणले होते. त्याशिवाय ३७० पानांचा पुराव्यासहीत अहवाल त्यांच्याकडे होता. Aam Aadmi Party will get investigation of Transport Scam of Sheila Dixit done by Janlokayukta असे त्यांच्या संस्थळावर म्हणलेले आहे. मात्र सत्तेत आल्यावर म्हणाले की भाजापने पुरावे द्यावेत मग आम्ही बघू! आता टिका झाल्यावर नुसते म्हणत आहेत की तपास करू म्हणू...
वीजदराबाबत आणि पाण्याबाबत
पाण्याबाबत त्यांनी मुलाखतीत मान्य केले आहे की त्याचा फायदा गरीबांना होऊ शकत नाही म्हणून. वीजेच्या बाबतीत मला वाटते २०० कोटींच्या सबसिडीचे समर्थन करत बसले आहेत. वर हे तात्पुरते आहे असे म्हणणे आहे.
या कायदा मंत्र्यांनी सोमनाथ भारतींनी पोलीसांना त्यांना पकडायला सांगितले.
त्यांनी एकीकडे कायदा हातात घेण्याचे समर्थन केले आहे आणि दुसरीकडे कायद्या मंत्र्यांनी ते केलेच नाही असे म्हणले आहे. आता सीसीटिव्ही फुटेज पण मिळाले आहे आणि दिल्ली हायकोर्टाने पोलीसांना त्यांच्या विरोधात एफ आय आर दाखल करायला सांगितला असल्याचे वाचले. त्यामुळे ही गोष्ट अजून पूर्ण झालेली नाही. आणि कुठल्याही परीस्थितीत कायदा हातात घेणे हे अयोग्यच आहे. आता कलम १४४ तोडून गृहमंत्रालयासमोर धरणे धरणार आहेत. सरदेसाईनी त्यांना जे अॅनार्कीस्ट म्हणले आहे, तेच खरे वास्तव आहे. अशाने राज्यशकट हाकता येत नाही.
या मुलाखतीत जेंव्हा त्यांच्या फसलेल्या जनतादरबारवरून प्रश्न विचारला तेंव्हा आपणच फक्त असे कसे करतो हे सांगण्यात रममाण झाले... पण जेंव्हा सरदेसाईंनी त्यांना मोदींचा (आणि अजून कोणी तरी) जनतादरबार कसा वीना प्रॉब्लेम चालतो हे सांगितले तेंव्हा त्यांनी एकदम सफाईने दुर्लक्ष केले. :)
हिंदू मधे आज लेख आला आहे त्याप्रमाणे त्यांनी अमेरीकेत जाण्यासाठी लिव्ह ऑफ अबसेन्स घेतल आणि त्याच्या साठी जितके वर्षे काम करायला हवे ते नंतर नाकारले. तो लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे.
20 Jan 2014 - 3:57 pm | llपुण्याचे पेशवेll
मोदींचा जनता दरबार.
http://swagat.gujarat.gov.in/
20 Jan 2014 - 10:36 pm | संजय क्षीरसागर
यापूर्वीचे तुमचे प्रतिसाद वाचून, तुम्ही एका पक्षीय विचारसरणीचा चष्मा चढवलाय आणि त्यातून अरविंद केजरीवालकडे (प्रतिस्पर्धी पक्षाचा उमेदवार म्हणून) पाहतायं, असं दिसतं. त्यामुळे उघड गोष्टींना विनाकारण राजकीय रंग चढतो.
आता तुमची मतं इतकी ठाम आहेत :
की चर्चेला अर्थच नाही. तरीही तुम्ही उपस्थित केलेले मुद्दे किती फोल आहेत ते पाहा :
तुम्ही मुलाखत ऐकलेलीच दिसत नाही. `थोड्याच दिवसात चवकशी होईल आणि काँग्रेसला आम्हाला पाठिंबा दिल्याचा पश्चात्ताप होईल' असं केजरीवालनी खुल्ला म्हटलंय!
पाण्याबाबात अत्यंत सुरेख लॉजिक आहे. केजरीवाल म्हणतात : दोनहजार लिटरची मर्यादा ओलांडली तर सर्व पाण्यावर टॅक्स द्यावा लागणार असल्यानं वापरात बचत होईल. आणि केवळ मिटरधारकांना लाभ असल्यामुळे इतर लोक मिटर बसवून घेतील.
वीज आणि पाणी किमान दरात आणि आवश्यक प्रमाणात प्रत्येकाला मिळायलाच हवं असं त्यांच सुरुवातीपासून म्हणणं आहे आणि ते रास्त आहे.
तुम्ही मुलाखत नीट ऐकलीच नाही हे पुन्हा उघड आहे. `सोमनाथ भारतींनी कायदा हातात घेतला नाही' असं केजरीवाल म्हणालेले नाहीत. पोलिस भ्रष्ट आहेत आणि त्यांनी ऑन द स्पॉट अॅक्शन घेतली नाही असं त्यांच म्हणणं आहे. त्या आणि इतर प्रकरणातल्या मिळून चार पोलिस अधिकार्यांच्या बडतर्फीचा मुद्दा हा आजच्या आंदोलना मधला एक विषय आहे.
ते फूटेज (काही प्रमाणात) दिलेल्या मुलाखतीत सुद्धा आहे. कोर्टानं FIR दाखल करायला सांगितला कारण तशी कार्यप्रणाली आहे. उलट नायजेरीयन एंबसीनं आआपार्टीला त्यांचा आक्षेप नसल्याचं पत्र दिल्याचं वृत्त आहे.
हाच तो चष्मा आहे! त्यामुळे तुम्हाला समोरचं नीट दिसत नाही आणि ऐकून घेण्याची मनस्थिती नाही.
21 Jan 2014 - 7:36 am | बंडा मामा
अगदी योग्य बोललात. केजरीवाल जे बोलतो ते कुठेतरी खोलवर पटते. कसलाही आवेश किंवा अस्मितांना हात वगैरे त्यात नसते. बर्याच लोकांच्या तारा त्यामुळे जुळून येतात. जे लोकं पुर्वी कधीही राजकारणावर अवाक्षरही काढायचे नाहित, कसलाही रस घ्यायचे नाहीत असे अनेक लोक आता आवडीने राजकारणावर चर्चा करताना दिसत आहेत हे मी तरी अनुभवतो आहे. अर्थात एकाच रंगाच्या चष्म्यातुन हे पाहिल्यस जाणवणे अशक्य आहे.
20 Jan 2014 - 12:55 am | जासुश
नारकॉटैक्स कायद्या नुसार अटक करता येते..रेव पार्टीस मधे अशाच प्रकारे विदाउट वोर्रन्ट अटक करतात..
> तिथल्या रहीवाशांची तक्रार होती की ड्रग्ज-वेश्याव्यवसाय वगैरे चालत आहे म्हणून>>>> मग का नाही पोलिसांनी आधी कार्यवाही केली??.. <