इतकेच मला जाताना...

चिन्मय खंडागळे's picture
चिन्मय खंडागळे in जे न देखे रवी...
4 Jan 2014 - 8:03 am

(भटसाहेबांची जोरदार क्षमा मागून...)

इतकेच मला जाताना घर सोडून कळले होते
सजणाने केली सुटका, नवर्‍याने छळले होते

लांबवलेल्या पैशांचा, मधुचंद्र गडे उरकू या,
मी दागदागिने घरचे, पिशवीत टाकले होते

मी ऐकवली दुनियेला माझी सगळी रडगाणी
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते

याचेच हसू आले की, दारू देता नवर्‍याला
मी औषध जुलाबाचे ग्लासात मिसळले होते

प्रेमिक माझा शोधाया मी भलती वणवण केली
जे दार खुले दिसले ते, तुझ्या बंगल्याचे होते

मी एकटीच त्या रात्री गच्चीवर जागत होते
मी पळून गेले तेव्हा सासरचे घोरत होते...

गरम पाण्याचे कुंडगोवाहझलप्रवासदेशांतरमौजमजा

प्रतिक्रिया

पैसा's picture

4 Jan 2014 - 11:03 am | पैसा

शीर्षक वाचून धागा उघडला आणि जोर का झटका बसला! विडंबन झकास. मात्र आमच्या गोव्याला यात आणल्याबद्दल णिसेढ! इथे कोडाईकॅनॉल लिहायची प्रंपरा आहे. :-/

प्यारे१'s picture

5 Jan 2014 - 8:47 pm | प्यारे१

>>>प्रेमिक माझा शोधाया मी भलती वणवण केली
>>>जे दार खुले दिसले ते, तुझ्या बंगल्याचे होते

आँ? काय म्हनाचं काय नक्की?
कन्चा परकार ह्यो?
=))

अत्रुप्त आत्मा's picture

6 Jan 2014 - 1:11 am | अत्रुप्त आत्मा

=))

दिपक.कुवेत's picture

6 Jan 2014 - 10:50 am | दिपक.कुवेत

हे वाचल्याबरोबर मुळ गाणं पण लगेच परत एकलं