(तू)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
15 Jul 2008 - 8:53 pm

अजब यांचे 'तू' हे मुक्तक वाचून मनात अनेक विचार मुक्तपणे आले ते असे ;)

तू भयकथेगत
नकोस येऊ
मी त्या पालीगत
थरथरतो...
तू 'इतिहास' होऊन
नकोस वाहू
'बे-भान'पणे मी
भरकटतो...

तू 'वैशाख फळ' होउन
जवळ राहा
मी ओरपून
खाईन असा...
तू 'गजल' एखादी
होउन ये
मी विडंबनात
नाहीन असा...

चतुरंग

कवितामुक्तकविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रियाली's picture

15 Jul 2008 - 8:56 pm | प्रियाली

कवितांशी माझा दूरान्वये संबंध नाही :( पण

तू बुद्धीबळागत
नकोस खेळू
मी त्या प्याद्यागत
कोलमडतो

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 9:00 pm | चतुरंग

सुंदर प्रतिचाल!

चतुरंग

केशवसुमार's picture

15 Jul 2008 - 9:10 pm | केशवसुमार

वा रंगाशेठ,
एकदम झकास मुक्तके..चालूद्या..
प्रियालीताई,
जबरा प्रतिचाल
(हसरा)केशवसुमार
स्वगतः केश्या प्रतिसादा बरोबर स्वगत लिहिलेच पाहिजे का? गप्प बस अता :T

प्राजु's picture

15 Jul 2008 - 10:06 pm | प्राजु

चालीवर प्रतिचाली...
चालूद्या..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सर्किट's picture

15 Jul 2008 - 10:31 pm | सर्किट (not verified)

सदर संकेतस्थळावरच्या कालातीत साहित्याचे संचित मुक्तकाच्या माध्यमातून करण्याच्या संकल्पनेला १० पैकी दहा गुण.

"नाहीन" हा शब्दा न कळल्या मुळे - २ मार्क

एकूण ६ मार्क (मुक्तकाच्या विडंबनाला आम्ही ७ पेक्षा अधिक गुण देत नाही.)

पण प्रियालीची काव्यप्रतिभा बहरण्यास कारणीभूत झाल्याने, +१.

एकूण सात मार्क.

- सर्किट

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 10:46 pm | चतुरंग

"नाहीन" मधे न कळण्यासारखे काही नाही - नहाणे= अंघोळ करणे, चे ते रुप आहे!
(स्वगत - बाकी रंगा, तुझ्या विडंबनात सुधारणा आहे हो, मास्तरांनी ह्यावेळी ७ गुण दिलेत, मागल्या खेपेस ६ च होते! केशा आता सटपटला असेल कांपिटिशन वाढली म्हणून!;))
चतुरंग

सर्किट's picture

15 Jul 2008 - 10:49 pm | सर्किट (not verified)

न्हाईन बरे वाटले असते का ?

धन्यवाद.

(स्वगतः इतके शिंपल शब्द कळत नाही सर्किटा, बरे झाले परीक्षक झालास ते. उगाच विडंबने करण्यात वेळ घालवू नकोस आता.)

- (खजील) सर्किट

चतुरंग's picture

15 Jul 2008 - 11:03 pm | चतुरंग

खरंच की, माझेच चूक आहे. परीक्षक महोदय, 'न्हाईन' असेच हवे होते! (चुकून त्याही शब्दाचे विडंबन झाले).
पुढल्या विडंबनात अशी चूक होणार नाही! :)

चतुरंग

बेसनलाडू's picture

15 Jul 2008 - 10:32 pm | बेसनलाडू

रंगराव,
झकास विडंबन.आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू

सहज's picture

16 Jul 2008 - 6:49 am | सहज

रंगाशेट, प्रियाली विडंबन खूप आवडले.