गोविंदा २०१३

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
29 Aug 2013 - 11:23 pm

या वर्षी दहीहांडीचा उत्सव पाहता येईल की नाही अशी जरा शंका होती...पण तस काही झालं नाही.ऑफिसातुन घरी आल्यावर बॅग ठेवली आणि लगेच दहीहांडी पाहण्यासाठी आणि तीचे फोटो तुमच्यासाठी काढण्यासाठी खाली पळालो. :)

१)ट्रक भर भरुन गोविंदांचे पथक येताना...
G1

२)बांधलेली हांडी.
G2

३)मी फोटो काढतोय हे पाहुन काही गोविंदांनी मला त्यांचा फोटो काढावा असा आग्रह केला, मला त्यांचा आग्रह मोडता आला नाही.
G3

४)इथे गोंविंदांचा उत्साह जोमात होता, टॅंकरच्या पाण्याच्या फवार्‍यात बच्चे कंपनी आणि गोविंदा नाच करत होते.
G4

५)हल्ली दहीहंडी हा उत्सव राहिला नसुन तो इव्हेंट झाला आहे, हे तुम्हा सर्वांना माहित आहेच, मग काय डिजे,नाच-गाणी होणारच ! कोळी पोशाखातले पंटर आणि त्यांच्या सखुबाई ! :)
गाणं झाल... ओ नाखवा बोटीने फिरवाल का ? ;)
G5
६)समोर जल्लोश सुरुच होता...
G6
७)आता हा थर तर पहा.
G7

८)सर्वात वरच्या थरावर पोहचलेली ही चिमुरडी अगदी बिनधास्त न-घाबरता सलामी देताना अशी दिसते.
G8

९)विजयाची ढाल !
G9
१०)प्रचंड जल्लोश सोबत डिजेचा ताल... आणि त्यावर नाचणारे गोविंदा...त्यांना आता पुढच्या वर्षी परत पहायच असं ठरवले आणि शेवटचा फोटो क्लीक केला.
G10

कॅमेरा :- निकॉन डी-५१००
रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केलेले आहेत.

(हौशी फोटो ग्राफर) :)
मदनबाण.....

संस्कृतीकलानृत्यप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

30 Aug 2013 - 12:03 am | राघवेंद्र

आमच्या पर्यंत गोविंदा पोहचवल्याबद्दल....

मीनल's picture

30 Aug 2013 - 12:58 am | मीनल

अश्या वेळी भारतात नसल्यचे दु:ख होते.

प्रसाद गोडबोले's picture

31 Aug 2013 - 9:50 pm | प्रसाद गोडबोले

अगदी हेच म्हणणार होतो

उपास's picture

30 Aug 2013 - 1:06 am | उपास

गिरगावातली दहीहंडी आणि ते मंतरलेले दिवस.. दहीहंडीची दोन महिने प्रॅक्टीस आणि मग गणपतिचे वेध. दहीहंड्या फोडल्या दिवसभर की त्याच रात्री गणपतीचे बॅनर लागायचे.. मांडवास सुरुवात लग्गेच!
एक्दम नॉस्टेल्जिक वाटत होतो पण बाणा फोटो बद्दल थँक्स रे!
अवांतर - गोविंदाचा इव्हेंट झाला ते मात्र इतकं झेपत नाही. साला पुरुषाच्या कच्चीवर आणि कोंबडी बाजावर नाचत वाढलेली पिढी.. कच्ची नाय तर गोविंदा नाय ;)

स्पंदना's picture

30 Aug 2013 - 6:10 am | स्पंदना

केव्हढीशी पोरगी आहे!
मस्त फोटोज.

प्रचेतस's picture

30 Aug 2013 - 8:32 am | प्रचेतस

सही रे बाणा.

कपिलमुनी's picture

30 Aug 2013 - 10:54 am | कपिलमुनी

सगळे फोट्टो छान आहेत.. आवडले

सूड's picture

30 Aug 2013 - 1:58 pm | सूड

मस्तच!!

मुक्त विहारि's picture

30 Aug 2013 - 7:31 pm | मुक्त विहारि

फोटो मस्त आले आहेत..

किसन शिंदे's picture

31 Aug 2013 - 3:58 pm | किसन शिंदे

फोटो भारी. उजवीकडची कोपर्‍यातली कोळीणबाय तुझ्याकडे रागाने का पाहतेय?? ;)

पाषाणभेद's picture

1 Sep 2013 - 12:46 pm | पाषाणभेद

खुन्नस रे किस्ना खुन्नस.

अनिरुद्ध प's picture

31 Aug 2013 - 4:37 pm | अनिरुद्ध प

छायाचित्रे एकदम अप्रतिम आहेत अगदी व्यावसायीक छायाचित्रकारा प्रमाणे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

31 Aug 2013 - 5:09 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

त्या चिमुरडीला पाहून थरथर झालं.

दादा कोंडके's picture

1 Sep 2013 - 12:48 pm | दादा कोंडके

अवांतरः

त्या चिमुरडीला पाहून थरथर झालं.

?

संजय क्षीरसागर's picture

1 Sep 2013 - 12:45 am | संजय क्षीरसागर

सुरेख फोटो. मस्त टिपलायं महौल!

जॅक डनियल्स's picture

1 Sep 2013 - 6:56 am | जॅक डनियल्स

मस्त वाटले फोटो बघून. :)

बाणा लय म्हंजे लय भारी......................

आवडेस्म रे...............................

सर्वसाक्षी's picture

1 Sep 2013 - 2:04 pm | सर्वसाक्षी

सणाचे उत्तम चित्रण.

मामु क्या फोटो निकाला हे तुने बोले तो मस्त... एक्दम :)

मदनबाण's picture

4 Sep 2013 - 11:09 am | मदनबाण

ठांकु मंडळी ! :)

क्रेझी's picture

4 Sep 2013 - 11:18 am | क्रेझी

मस्त आहेत फोटोज. कोणत्या भागातल्या दहीहंडीचा जल्लोष आहे हा?

ठाण्यातली आहे, ठाणे शहर आता गोविंदा इव्हेंटसाठी बदनाम झाले आहे.

अमोल केळकर's picture

4 Sep 2013 - 11:45 am | अमोल केळकर

मस्त, सुरेख :)
नंतर गणपतीही बघायला मिळू दे

अमोल

नंतर गणपतीही बघायला मिळू दे
नक्कीच ! मागच्या वर्षी केशवजी नाईकांच्या चाळीतील गणपतीने सुरुवात केली होती, या वेळी वेगळ्या ठिकाणी जायचा विचार आहे,बघु कसे जमते ते... पण इच्छा मात्र आहे.