पुरुष विभाग - धागा क्र. १ - सेक्सी स्टबल आणि गर्लफ्रेंड/बायकोच्या तक्रारी

राजेश घासकडवी's picture
राजेश घासकडवी in जनातलं, मनातलं
13 Apr 2013 - 10:09 pm

पुरुषांचे काही खास प्रश्न असतात. त्यांच्या जिव्हाळ्याचे काही विषय असतात. बहुतकरून स्त्रियांना त्यांच्यात रस असतोच असं नाही. आणि काही विषय तर स्त्रियांना लागूच होत नाही. त्यामुळे अशा विषयांवर स्त्रियांचे प्रतिसाद कितपत ग्राह्य धरावे हा प्रश्नच पडतो. तरी पुरुष आयडींनी मनमोकळेपणाने प्रतिसाद द्यावेत ही विनंती. आता तुम्ही म्हणाल, की असं काय आहे जे पुरुषांना असतं आणि स्त्रियांना नसतं? उत्तर सोपं आहे - दाढी. किंबहुना एका प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिद्धांतानुसार अनेक तरुणींना बीअर्ड एन्व्ही निर्माण होते त्यामुळे ती कमतरता झाकण्यासाठी त्या पुरुषांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. ठरलेल्या भेटण्याच्या ठिकाणी बॉयफ्रेंडला पाउण तास ताटकळवणं हे त्याच बिअर्ड एन्व्हीमधून येतं.

दररोज दाढी करायला लागणं हा पुरुषजातीला मिळालेला शाप आहे. पण एके काळी असं नव्हतं. आपल्या संस्कृतीत दाढीला प्रचंड महत्त्व होतं. सर्व ऋषिमुनी पांढऱ्याशुभ्र दाढ्या राखून असायचे. द्रोणाचार्य, भीष्म वसिष्ठ वगैरे लोकांची आपल्याला दाढीशिवाय कल्पनाच करता येत नाही. किंबहुना विश्वामित्र वगैरे मंडळी आपल्या लांबलचक दाढ्या सावरून तपश्चर्येला बसली की इंद्राचं स्वर्गातलं आसन डळमळायला लागायचं. मग तो मेनकेसारख्या कोणालातरी ती तपश्चर्या भंग करायला पाठवून द्यायचा. आणि ती मेनकाही मनोभावे सेवा करायची. विश्वामित्रच दाढी हलवत तिने पुढे केलेलं पोर 'हे माझं नाही' म्हणून मान हलवायचा. ते फारसं महत्त्वाचं नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की सुंदर स्त्रियांवर प्रभाव पाडण्यासाठी पूर्वी दाढी करण्याची गरज पडत नसे. अलिकडच्या काळात (म्हणजे गेल्या चारेकशे वर्षांत) दाढी ही राजांची निशाणी असायची. शिवाजी महाराजांना सुंदर दाढी होती. सर्व मुघल बादशहांना दाढ्या होत्या - एक अकबर सोडला तर (संदर्भ - जोधा अकबर हा अविस्मरणीय चित्रपट. खासकरून त्यातल्या अकबराच्या शरीरप्रदर्शनासाठी) रामदास, गुरु नानक यांना दाढ्या होत्या.

मात्र ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्यांनी सगळ्यांच्या दाढ्या कमी केल्या. भारतीय जनतेला आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक बाबतीत खच्ची करून टाकलं. आणि मग सर्वच क्षेत्रांमध्ये पाश्चात्यांचं अंधानुकरण सुरू झालं. देवानंद, राजेश खन्ना, कुमार गौरव (तोच तो जो विजेता पंडित पेक्षाही गोग्गोड दिसत होता तो), आमीर खान वगैरे सर्व चॉकोलेट हिरोंनी गुळगुळीत चिकण्या चेहेऱ्यांनी तत्कालीन तरुणींच्या तोंडून "ऐय्या क्यवढा गोsssड आहे नाही! चो च्वीssssट." वगैरे उद्गार काढवून दाढी वाढवण्याची इच्छा असणाऱ्यांची स्वप्न वस्तऱ्यांनी छाटून टाकली.

आता मात्र परिस्थिती बदलते आहे. चाळिशीत कॉलेजकुमारांची कामं करणारे, पोटं सुटलेले, त्वचा निबर झालेले, आणि एखाद्या तुपाच्या व्यापाऱ्याची असावी तशी शरीरयष्टी असलेले हिरो लयाला गेले आहेत. त्याजागी नवीन रफ ऍंड टफ, सिक्सप्याकवाले, तरुण हिरो आलेले आहेत. आपल्या जवळपास समवयस्क बाईला 'मॉं मै बीए पास होगया' म्हणणारे हिरो जाऊन भाईगिरी करणारे, बकाल वस्तीत फिरणारे, सतत दाखवता येतील असे बायसेप्स बाळगणारे हिरो आले. ही रांगडी प्रतिमा राखण्यासाठी अनेकांनी दाढीकडे एक पुनर्कटाक्ष टाकला. आणि जागोजागी स्टबल राखलेले, डोळे बारीक करून हिंस्र भाव डोळ्यात आणलेले हिरो दिसायला लागले (जागोजागी म्हणजे गल्लोगल्ली, वेबसाइटोवेबसायटी - शरीरावर वेगवेगळ्या जागी नाही).

नुकत्याच मिपावर झालेल्या तुम्हाला कोण सेक्सी वाटतं या चर्चेत 'स्टबल ठेवणारे केवढे सेक्सी असतात, भुकेले वाटतात' वगैरे मतं स्त्रीवर्गाकडून मांडली गेल्याचं आठवतं. त्यामुळे स्टबल ठेवण्याकडे पुरुषांचा कल व्हायला लागलेला आहे. आठवड्यातून एकदाच दाढी करायला लागणं हा आणखीनच ऍडेड ऍडव्हांटेज. दररोज दाढी केल्याने गालावरची सुकुमार त्वचा खरवडली जाते. ज्या पुरुषांना आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल त्यांच्यासाठी ही आपत्तीच ठरते. दररोज दिवसांतून पाच ते दहा मिनिटं दाढी करण्यात घालवल्याने वेळही वाया जातो. आजच्या धकाधकीच्या काळात जिथे दिवसातून मोकळा वेळ जिथे फक्त चारेक तास मिळतो, त्यातली पाच मिनिटंही घालवणं म्हणजे तीन टक्के आयुष्य फुकट घालवण्यासारखं आहे. तेव्हा अधूनमधूनच दाढी करणं केव्हाही चांगलं.

एवढे सगळे फायदे असले तरी एक मोठा तोटा आहे - तो म्हणजे गर्लफ्रेंड किंवा बायको 'दाढी टोचते' म्हणून तक्रार करते. आपण रोमॅंटिक मूडमध्ये येऊन तिच्या जवळ जावं, तर ती गालावरून हात फिरवून खुंट कुरवाळते आणि लांब जाते. आणि दाढी केल्याशिवाय जवळ येऊ देत नाही. हा अनुभव सार्वत्रिक आहे. काही अपवाद असतील पण ते विरळा.

एका बाजूने फॅशनची माध्यमं स्टबलधारी सेक्सी पुरुषांच्या चित्रांचा मारा करतात. आणि या पुरुषांची चित्रं कोण बघतं? तर स्त्रियाच. त्यामुळे एका अर्थाने त्याच या सवयीला जबाबदार आहेत. त्याचबरोबर सुकुमार त्वचेची निगा राखणं, वेळेची होणारी बचत, दाढीसामानाच्या खर्चावर होणारी बचत या सर्वच बाजूंनी विचार केला तरीही किंचित दाढी ठेवणं फायद्याचंच आहे. मात्र स्त्रिया दुटप्पीपणा करून एका बाजूने मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूने आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ते करण्यापासून वंचित ठेवतात. म्हणजे 'शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरात' अशी भूमिका ठेवतात. यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा.

संस्कृतीप्रकटनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2013 - 10:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

समतेच्या वाटेवर दमदार पावलं टाकतांना पुरुषांचेही काही प्रश्न असतात सालं याचा आता विसर पडत चालला होता. पण अजून पुरुष म्हणून आपण आपल्या प्रश्नाकडे तितक्या जागृकपणे आणि गंभीरपणे पाहात नाही, असं आजच्या प्रस्तावनेवरुन वाटायला लागलं आहे. दाढीचं म्हणाल तर वाढलेल्या दाढीवर प्रयोग करता येतात. फ्रेंच कट वगैरे. बरं असा प्रयोग केला तर 'काय हल्ली डोक्यात खूळ घेऊन येतात वगैरे' ऐकावं लागलं आहे. फ्रेंच कटला मेंटनस खूप आहे, दर दिवसाला, दोन दिवसाला कट मारावी लागते. एवढं शुल्लक कामाकरिता नाव्ह्याकडे जाणंही परवडत नाही. दररोज खरडायचं म्हटलं तरी कंटाळ्याचं काम होत चाललं आहे. प्रश्न तसा जीवाभावाचा आहे, यात काही वाद नाही.

>>>>आमीर खान वगैरे सर्व चॉकोलेट हिरोंनी गुळगुळीत चिकण्या चेहेऱ्यांनी तत्कालीन तरुणींच्या तोंडून "ऐय्या क्यवढा गोsssड आहे नाही! चो च्वीssssट." वगैरे उद्गार काढवून दाढी वाढवण्याची इच्छा असणाऱ्यांची स्वप्न वस्तऱ्यांनी छाटून टाकली.

हाहाहा. हे मात्र खरं आहे. दाढी वाढलेली म्हणजे तंगी आहे, गरिबी आहे, काही दु:खद प्रसंग आला आहे, किंवा प्रेयसीचा विरह आहे किंवा तो कवी तरी आहे, अशी प्रतिमा दाढी वाढलेल्यांची बनत चालली आहे, याला जवाबदार माध्यमं आहेत, असे वाटते. माध्यमं जशी संस्कृती लादतील त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. बाकी, स्त्रीयांच्या दुटप्पीपणाबद्दल काही विदा नसल्यामुळे काही बोलणं उचित ठरणार नाही. पण, पुरुषांची दाढी, मिशा, हे कधी काळी भूषण होतं. पण जग जसं आधूनिक आणि आधूनिकोत्तर होत चाललं तस तसं या पारंपरिक भूषणांना जळमटं लागायला लागली आहेत याच्याशी सहमत.

-दिलीप बिरुटे

आशु जोग's picture

13 Apr 2013 - 11:07 pm | आशु जोग

जाऊ दे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Apr 2013 - 11:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> जाऊ दे !

लिहिण्या बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तेव्हा अभिव्यक्त व्हायला हरकत नाही.
बाकी,लेखनात असे काही दुवे भरले असते तर बरे राहीले असते.

''तिथे फुलांच्या वसत्यावर वणवे लावले जातात
नि स्वामित्त्वाचे उत्सव आनंदाने साजरे होतात
पण तिथेल्या करुण कहाण्या दु:खाने उद्गारतात
की 'दाढी' एक जुलुम आहे....... ''

(चांगल्या कवितेच्या काही ओळीत 'दाढी' हा शब्द घुसाडल्याबद्दल कवयित्री मला क्षमा करतील)

अवांतर : रॉयल चॅलेंज आणि चेन्नईचा आयपीएलमधील क्लास सामना पाहता आला धन्स.

-दिलीप बिरुटे

रमताराम's picture

13 Apr 2013 - 11:27 pm | रमताराम

मिपा स्वतंत्र विभाग देत नाही काय पुरुषांना, मग आम्हीच करतो सुरू असं म्हणणं भलतंच विद्रोही की हो. लाल सलाम कॉ. घासकडवी.

राजेश घासकडवी's picture

14 Apr 2013 - 12:12 am | राजेश घासकडवी

छे हो, मी कसला विद्रोही? विद्रोहासाठी एक जहालपणा आवश्यक असतो. मी जहाल वगैरे नाही, मी मवाळ पक्षातला. पुरुषांचेही काही स्वतंत्र विषय असू शकतात एवढंच म्हणणं मांडायचं होतं. त्यांच्याही बारीकसारीक दुःखांना वाचा फोडण्याचा हा मवाळ माफक प्रयत्न आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2013 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

मिपाद्वेष्टे ह्या पदावरुन उचलबांगडी का काय मग आता ?

बाकी, गुर्जींचे लिखाण हे 'अतिअभ्यासू आणि जडजड' होत चालल्याने आम्ही ते वाचणे सोडून दिले आहे. आमचे मूळचे गुर्जी कुठेतरी हरवले आहेत आणि हे 'शह-काटशह' वाले भलतेच कोणी त्यांची जागा घेऊ पाहात आहे.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

15 Apr 2013 - 2:19 am | निनाद मुक्काम प...

विद्रोही
Rambo with gun
लेख आवडला ,मात्र त्याचे शीर्षक ओढून ताणून दिल्यासारखे वाटत आहे.

पुरुष विभागाचा पहिलाच धागा गर्लफ्रेंड/बायकोला काय आवडतं/आवडत नाही असा का आहे बरं?

पुरुष विभागात स्वायत्तपणे पुरुषांचे असे विषय चघळले गेले पाहिजेत.

:)

राजेश घासकडवी's picture

14 Apr 2013 - 12:08 am | राजेश घासकडवी

पुरुष विभागाचा पहिलाच धागा गर्लफ्रेंड/बायकोला काय आवडतं/आवडत नाही असा का आहे बरं?

रास्त प्रश्न. लिंगभूमिकांचा व्यापक विचार करताना स्त्रिया पुरुषांच्या दृष्टिकोनातून आणि पुरुष स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघितल्याशिवाय प्रत्यवाह नसतो. ते थोडंस यिन आणि यांग सारखं आहे. काळा आणि पांढरा असे दोन रंग आहेत म्हणूनच काळ्यापांढऱ्या आकृतींना अर्थ येतो. मानव जर एकलिंगी असता तर या स्त्रीपुरुष द्वंद्वाला अर्थच राहिला नसता.

पुरुष विभागात स्वायत्तपणे पुरुषांचे असे विषय चघळले गेले पाहिजेत.

दाढीइतका दुसरा पुरुषी विषय सापडला तर जरूर लिहा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Apr 2013 - 1:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

दाढीइतका दुसरा पुरुषी विषय सापडला तर जरूर लिहा.

अ‍ॅडम्स अ‍ॅपल, त्याची निगा कशी राखावी, त्या भागातली दाढी करून निर्माण होणारे चामडीचे (तिथल्या आणि एकंदर पुरुषांच्या कातडीला त्वचा म्हणणं जीवावर आलं) प्रश्न आणि ज्यांचं अ‍ॅडम्स अ‍ॅपल लहान किंवा स्त्रियांसारखं न दिसणारं असतं त्यांची समाजात होणारी अप्रतिष्ठा. चघळा ...

मी तोपर्यंत इंग्लिश-विंग्लिशमधल्या लोराँचे फोटो पहात "दिल बहलवते".

खास पुरुषी विषयातही मज सबलेला प्रतिसाद लिहू देण्याबद्दल लेखक श्री. राजेश घासकडवी आणि मिसळपाववरील अन्य पुरुष आयडींचे विशेष आभार.

कपिलमुनी's picture

14 Apr 2013 - 12:22 am | कपिलमुनी

दाढी आणि मिशी मधे पांढरे केस डोकावयाला लागले कि दाढी करा , असा आग्रह चलू होतो .

अमितभ चे काळे केस आणि पांढरी दाढी चालते ..पण नवर्याची दाढी / मिशी पांढरी झालेली आणि ठेवलेली चालत नाही ..म्हणूनच ३५-५० मधले बहुतेक काका चकाचक असतात

आशु जोग's picture

14 Apr 2013 - 12:33 am | आशु जोग

केसांचे करतात
तसे टकलाचे रोपण करा

दादा कोंडके's picture

14 Apr 2013 - 12:59 am | दादा कोंडके

वाढलेली दाढी हे विद्रोहींचं व्यवच्छेदक की काय लक्षण असल्यामुळे सुरवात तर जोरदार झाली आहे.

स्वगतः जितेंद्रच्या 'हाथीमताई' मधली दाढीच्या फ्रेंच कट ठेवलेली राजकूमारी कुणाला आठवते का? ;)

मालोजीराव's picture

14 Apr 2013 - 1:42 am | मालोजीराव

या प्रश्नावर स्त्रियांकडून कौल घ्यावा काय...कौल घेतल्यास स्त्री डू आय डिंचा रिज़ल्ट वर प्रभाव पडेल काय?

पैसा's picture

14 Apr 2013 - 10:02 am | पैसा

पण तुमचा राखीव विभाग सुरू कुठे झालाय?

ज्योती जपून. या "मान ना मान मै तेरा मेहमान" अशा "धटींगण राखीव विभागातून" तुझा प्रतिसाद कोणी पुरुष संपादक उडवतील बाई.

राजेश घासकडवी's picture

14 Apr 2013 - 6:46 pm | राजेश घासकडवी

राखीव हा शब्द कुठे दिसला तुम्हाला? काही विषय फक्त पुरुषांच्या जिव्हाळ्याचे असतात एवढंच सांगायचं होतं. पुरुषमनांची सुकुमार स्पंदनं चित्रित करणारं लेखन मी आधीही केलेलं आहे.

पैसा's picture

14 Apr 2013 - 7:23 pm | पैसा

धाग्याच्या नावातच लिहिलंत ना! "पुरुष विभाग-धागा क्र. १"

राजेश घासकडवी's picture

14 Apr 2013 - 7:45 pm | राजेश घासकडवी

पण 'राखीव' हा शब्द नाही तिथे. स्त्री विभाग किंवा पुरुष विभाग करायला काहीच हरकत नाही. तो विशिष्ट आयडींसाठी राखीव ठेवण्याला माझी हरकत आहे. कुठल्याही समाजात एखादा अधिकार जन्माधिष्ठित होणं चांगलं नाही. तो कर्माधिष्ठित असावा. नाहीतर जातीव्यवस्था निर्माण होते. आज आंबेडकरांची जयंती - तेव्हा त्यानिमित्ताने त्यांनी दिलेल्या लढ्याची आठवण करूया. आणि मिपासारख्या मोकळ्या वातावरणात जातीव्यवस्था निर्माण होणार नाही अशी आशा करूया.

प्रसाद गोडबोले's picture

14 Apr 2013 - 8:05 pm | प्रसाद गोडबोले

स्त्री विभाग किंवा पुरुष विभाग करायला काहीच हरकत नाही. तो विशिष्ट आयडींसाठी राखीव ठेवण्याला माझी हरकत आहे.

वा वा वा
गहिवरुन आलं हो हा प्रतिसाद पाहुन

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2013 - 11:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गर्लफ्रेंड/बायकोच्या तक्रारी येऊ नये म्हणून आपण काही काळजी घ्यायला पाहिजे. काही टीप्स एकमेकांना अशा जाहीर सांगितल्या पाहिजेत. परिपक्व विचार, पिळदार शरीरेष्टी, देखणेपणाबरोबर....

१] गबाळेपणा नसावा. आकर्षक कपडे. शूज, मंद डिओ, हजार पाचशेनं गच्च भरलेलं पॉकेट. उगा वर काढायचं आणि पुन्हा खिशात ठेवून द्यायचं. (हेही सारखं सारखं नाही करायचं)

२] मनगटी घड्याळ आकर्षक असावं. चेहरा तेलकट असेल तर मूलतानी माती आणि डाळीचं पीठ चेहर्‍यावर तास दोन तास चोपडावं. चेहरा आकसायला लागला की काढून टाकावं. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी भेट घ्यावी.

३] गर्लफ्रेंडबरोबर असाल आणि उन्हाळ्याच्या दिवसात भेट झाल्यावर चेहर्‍यावर घाम येत असेल तर रुमालाने घाम पिळून काढू नका. अलगद टीपण्याचा प्रयत्न करा. हल्ली खूप उन पडतंय नाही, अशा थापा मारा. वेळ मारुन न्या.

४] गर्लफ्रेंडबरोबर असेल किंवा बायको बरोबर असाल आणि हॉटेलमधे गेल्यावर जेवण येण्याअगोदर पेपरनॅपकीनवर पेनानं काही लिहिण्याचा प्रयत्न करु नका, ते बरं दिसत नाही. काही महत्त्वाचं व्यक्त करायचं असेल तर सरळ बोलून व्यक्त करा.

५] सार्वजनिक ठिकाणी गर्लफ्रेंड किंवा बायको बरोबर असतांना कितीही 'खोखो' हसण्यासारखा विनोद झाला तरी मंद हसा. हसतांना हात टेबलावर आपटू नका. टेबलाला दणके देऊ नका. [आमचा एक मित्र हसतांना हात टेबलवर आपटतो आणि पायही जमिनीवर दणादण आदळतो]

६] हॉटेलमधील आरशासमोर उभे राहून केस बरोबर विंचरले आहे का ते सारखं सारखं बघू नये. आयड्यानं बघायचं आणि नकळत टापटीप करुन घेण्याचा प्रयत्न करावा. इन करात असाल तर बेल्ट प्यांटीत व्यवस्थित घातला आहे का बघून घ्यावे. झीप लावली आहे का खात्री करुन घ्यावी. सार्वजनिक ठीकाणी सारखं सारखं चेक करु नये.

अजून काही टीप्स सवडीनं देतो. :)

-दिलीप बिरुटे

चावटमेला's picture

14 Apr 2013 - 12:33 pm | चावटमेला

परिपक्व विचार, पिळदार शरीरेष्टी, देखणेपणाबरोबर....

बाकी सगळं ठीक आहे हो, पण तो देखणेपणा कुठून आणायचा ? :(

जाऊदे..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2013 - 1:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देखणेपणाशी सहमत. सर्वच पुरुष देखणे असू शकत नाही. पण, आहे त्यातल्या त्यात देखणेपणाच्या बाबतीत थोडीफार तडजोड करुन इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे.

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

14 Apr 2013 - 1:47 pm | अभ्या..

इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे, उदा. ????
सर सांगा की इतर यूएसपी.

प्राध्यापक साहेब
गर्ल फ्रेंड किंवा बायकोला खुश करण्यासाठी एवढे कष्ट का घ्या?मी आहे असा आहे पाहिजे तर या नाही तर जा. मी लग्न ठरण्याच्या आधी किंवा लग्न ठरल्यावर बायकोला खुश करण्यासाठी कोणताही अतिरिक्त प्रयत्न केला नाही.दुर्दैवाने माझा प्रेमविवाह झाला नाही.(इच्छा होती पण!!)याचा मोठा फायदा म्हणजे तू आता बदलला आहेस असे मला ऐकायला लागले नाही. ( अर्थात लष्करात असल्याने गर्ल फ्रेंडला खुश करण्यासाठी खिशात पैसे फारसे नसत) पण गणवेशात माणूस रुबाबदार दिसतो त्यामुळे वर फार पैसे टाकावे लागत नसत.
गबाळे असू नये हे मान्य पण टापटीप राहावे हे २४ तासासाठी.आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून निर्गन्धक( deodorant) किंवा अत्तर रोज लावण्यास काय हरकत आहे. कपड्याला इस्त्री रोजच व्यवस्थित असावी. केवळ गर्ल फ्रेंड ला खुश करण्यासाठी का?
अर्थात ही शिकवण लष्करात प्रथम पासूनच मिळते म्हणून असेल कदाचित पण रामपरसाद देविसरण नावाचा माणूस सुद्धा लष्करात गणवेश घातल्यावर रुबाबदार दिसतो ते केवळ गणवेशामुळे नव्हे तर या शिकवणीमुळे.
य़ाच नावाचा माणूस आपला सुरक्षा रक्षक/ वाहन चालक म्हणून गणवेशात पाह्तो तेतेंव्हा किती ढिला आणि अजागळ दिसतो? यावरून माझे म्हणणे पटावे

विश्वनाथ मेहेंदळे's picture

14 Apr 2013 - 12:30 pm | विश्वनाथ मेहेंदळे

लेख ठीक आहे पण उत्कृष्ट मराठी बोलणाऱ्या गुर्जींनी खुंट हा शब्द का टाळला असेल याचा विचार करतो आहे....

सस्नेह's picture

14 Apr 2013 - 1:59 pm | सस्नेह

पुरुष विभाग - धागा क्र. १ -
हे मला कसे काय दिसते आहे ? हा माझा डू आयडी आहे की काय ? a

तिमा's picture

14 Apr 2013 - 2:28 pm | तिमा

कानावर वाढलेले केस, शटर्स वाटतील अशा वाढलेल्या भुवया, सुटलेले पोट आणि गणपतीसारखी झालेली छाती या विषयावरही चर्चा व्हाव्यात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2013 - 2:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कानावर वाढलेले केस आठवणीने काढले पाहिजेत. लैच बेक्कार प्रकार आहे हा. भूवयांच्या बाबतीत 'आयब्रो, करुन त्यांना फार धनुष्यबानाच्या आकाराच्या करु नये, असे वाटते. सुटलेल्या पोटासाठी सकाळ-संध्या़काळ दहा किमि. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत पथ्य पाळून पोट सरळ छातीच्या सरळ रेषेत आणता येईल. (चाळीशीच्या पुढच्या लोकांनी या भानगडीत पडू नये). असे वाटते. बाकी, स्त्री-पुरुषांनीही याबाबतीत आपली मतं मांडावी.

-दिलीप बिरुटे

दादा कोंडके's picture

14 Apr 2013 - 3:09 pm | दादा कोंडके

सुटलेल्या पोटासाठी सकाळ-संध्या़काळ दहा किमि.

म्हणजे सुटलेलं पोट या जन्मात कमी होणं शक्य नाही असं वाटतं.

अभ्या..'s picture

14 Apr 2013 - 4:18 pm | अभ्या..

हीहीही, ते कानावर केसं वाढलेले काननबाला लैच भारी दिसतेत. =)) =)) =))
अग्दी वळून आकड्याचा आकार होइपर्यंत दिसत नाहीत का यांना स्वत:ला आयन्यात?
का ते काढू नयेत असे काही शास्त्र आहे? ;)

बॅटमॅन's picture

14 Apr 2013 - 5:16 pm | बॅटमॅन

काननबाला...=)) =)) =))

ग्रीन टी सांडला की बे अभ्या पीशीवरऽ, कस्ला गहिन्यागत हसायलोय ये*भो*** =)) =))

ह्हीह्हीह्हीह्हीह्हीह्ही =)) =)) किती लोळू तेच्यायला, आज हास्यवात मज झाला =))

(दाढी वाढवल्यावर मातोश्रींच्या मते अफगाण दिसणारा) बॅटमॅन.

राजेश घासकडवी's picture

15 Apr 2013 - 3:50 pm | राजेश घासकडवी

काननबाला हा शब्द भन्नाट आवडल्या गेलेला आहे.

नुसतेच कल्ले वाढवणारांना कल्लावंत म्हणता येईल. खालच्या ओठाला लागून संततीनियमनाच्या त्रिकोणासारखी किंचित दाढी वाढवणारांना काय म्हणावं असा प्रश्न पडला आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Apr 2013 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काननबाला =))

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

14 Apr 2013 - 3:09 pm | कवितानागेश

पुरुषांच्या प्रायव्हसीचा मान ठेवायचा म्हणून मी प्रतिसाद देत नव्हते, फक्त गपचुप वाचत होते! ;)
पण स्त्रियांच्या सल्ल्याशिवाय पुरुषांना इलाज नाही.
जसे बिरुटे सरांनी "चेहरा तेलकट असेल तर मूलतानी माती आणि डाळीचं पीठ चेहर्‍यावर तास दोन तास चोपडावं. चेहरा आकसायला लागला की काढून टाकावं. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी भेट घ्यावी." हा उपाय बरोब्बर निवडला तसाच दाढीसाठीही स्त्रियाच पुरुषांना टिप्स देउ शकतील.
माझा सल्ला आहे की लेसर थेरेपी वापरुन कायमची सुटका करुन घ्यावी दाढीपासून.
मात्र ज्यांना घोसभर वाढवायची असेल त्यांनी जास्वंदीचे तेल वापरावे.
...बाकीचे सल्ले सवडीने देइन.

आपणच सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवाव्या म्हणजे बायको किंवा प्रेयसीला वारंवार तिच्या खाण्याच्या सवयी किती चुकीच्या आहेत यावर ऐकवता येईल, असा अंदाज !!;)

दररोज दाढी करायला लागणं हा पुरुषजातीला मिळालेला शाप आहे.
अगदी खरयं !
तो म्हणजे गर्लफ्रेंड किंवा बायको 'दाढी टोचते' म्हणून तक्रार करते.
हे देखील अगदी खरयं... ;)
मात्र स्त्रिया दुटप्पीपणा करून एका बाजूने मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूने आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ते करण्यापासून वंचित ठेवतात.
या बाबतीत १००% सहमत ! मी तर मुद्दामुन दर शुक्रवारीच दाढी करतो... बायडीची अंमळ चीडचीड होते,का तर शुक्रवारी आम्हाला हापिसात ड्रेसकोड नसतो,त्याचा फायदा पुरुष मंडळीं पेक्षा स्त्रीयांना मिळतो हे काही वेगळे सांगायला नको अगदी टकाटक बनुन येतात !हे माझ्या बायडीला मी सांगितले (चूक केली हे नंतर लक्षात आले.) त्यामुळे मी शुक्रवारी दाढी करायला सुरु केली की हिचे स्वतःशीच बोलणे सुरु होते,बरोबर आहे आज शुक्रवार ना ! करणारच दाढी ! इतर वेळी वेळ मिळत नाही,पण शुक्रवारी बरोबर मिळतो कसा ? मग मी उगाच गाणे म्हणल्याचा आव आणतो...आज शुक्रवार है आज शुक्रवार है... या बरोबर तिचा पारा अजुन चढतो, मग मला दमदाटी सुरु होते,आज जास्त चिकणा बनुन जायचे नाहीस समजलसं ? मी उगाच होहो म्हणतो. ;)
तिच्या माहेरी जायची वेळ आली तरी हीच दमदाटी वेळोवेळी होते,तिथे जास्त बोलायचे नाहीस ! उगाच चिकणा बनुन यायचे नाही वगरै वगरै, का तर हिच्या मैत्रिणी भेटायला येतात्,बाकीचा स्त्री वर्ग सुद्धा येतो आणि त्या माझ्याशी सुद्धा बोलतात... मग हीची धुसफुस ! जरा कोणी माझ्याशी बोलले की हिची चुळबुळ सुरु... घरी आल्यावर काय एवढ्या गप्पा चालल्या होत्या ? या प्रश्नापासुन माझी उलट तपासणी सुरु होते,आणि त्याला मी अगदी मसालेदार उत्तर देतो. ;)

यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा.
परत सहमत ! ;)
हा प्रतिसाद दाढी करुनच दिला आहे... ;)

अभ्या..'s picture

14 Apr 2013 - 4:21 pm | अभ्या..

बाणराव म्हणजे तुम्ही तुमचा आयडी एकदम परफेक्ट घेतलाय म्हणा की? ;)

मदनबाण's picture

14 Apr 2013 - 4:22 pm | मदनबाण

खी...खी.खी. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2013 - 4:55 pm | परिकथेतील राजकुमार

मदनबाण.....
वक्त करता जो वफा,आप हमारे होते :- दिल ने पुकारा {मुकेश}

लग्न झाल्यावरही बाण्याने अशी सही का ठेवले असावी?

अभ्या..'s picture

14 Apr 2013 - 5:02 pm | अभ्या..

कही पे निगाहे कही पे निशाना झाला असेल बाणाचा ;)
किंवा नेमच वेगळीकडे लागूनसुध्दा बक्षीस मिळाले असेल ;)

परा,अरे त्या सहीचं काय घेउन बसलायस ? ;) घे बदलली.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Apr 2013 - 10:44 pm | परिकथेतील राजकुमार

बाण्या, लेका वहिनींनी ही सही वाचली, तर आधिची सही परवडली अशी अवस्था होईल.

बाण्या, लेका वहिनींनी ही सही वाचली, तर आधिची सही परवडली अशी अवस्था होईल.
हॅहॅहॅ...परा आता मला वहिनी आण लवकर ! मग खर्‍या गमती-जमती कळतील तुला ;)

बॅटमॅन's picture

14 Apr 2013 - 5:24 pm | बॅटमॅन

जय हो!! जय हो!!!! घासूगुर्जी की जय हो!!!!! खास पुरुषविषयक धागा काढल्याबद्दल समस्त बिचार्‍या पुरुषांतर्फे गुर्जींचे खंग्री अभिनंदन.

बाकी भारतीय संस्कृतीबरोबरच ग्रीक संस्कृतीतसुद्धा सगळे दाढ्या ठेवायचे. अकीलिसपण दढियल होता. पण तो नतद्रष्ट अ‍ॅलेक्झांडर साला हरामखोर होता. त्याने दाढ्या औट ऑफ फ्याशन केल्या आर्मीत- का तर शत्रूसैनिक दाढ्या ओढतील म्हणून. पुढे रोमन संस्कृतीत तर जितके चेहर्‍यावरील केस जास्त तितके हुच्चभ्रू असा प्रवाद सुरू झाला. पण जर्मानिक टोळ्यांनी आणि नंतर अरबांनी, तसेच शीख धर्मीयांनी हा ट्रेंड यथाशक्ती परतवून लावला. महाराष्ट्राचे यासंबंधी योगदान गुर्जींनी विशद केलेच आहे. चीनवालेपण याबाबतीत मागे नव्हते. अगदी त्या हावरट ब्रिटिशांतदेखील परवापरवापर्यंत दाढी ठेवणारे लोक होते. मधेच हे काय बंड झालं तेच्यायला, काय माहिती. आम्रविकन लोकांचा तो लिंकनसुद्धा दढियलच होता.

तस्मात दाढी ही आपल्या थोरथोर मानवी संस्कृतीचा एक अति-अविभाज्य असा भाग आहे. अहो बाकी सोडा, लॉर्ड ऑफ द रिंग्जमध्ये ड्वार्फ बायकांनासुद्धा दाढी असते असे सांगून टोल्किनसाहेबांनी जो दिलदारपणा दाखवला आहे त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. असा दिलदारपणा फक्त पुरुषच दाखवू जाणे.

दाढी बचाओ, संस्कृती बचाओ!!!!

इन्दुसुता's picture

14 Apr 2013 - 8:04 pm | इन्दुसुता

घोटून घोटून गुळगुळीत झालेला / ली ( विषय / दाढी )

अवांतरः

यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा.

अगदी अगदी !! कित्ती नै बिच्चारे पुरुष !!
पुरुषांना किनै कित्ती कित्ती महत्वाची कामं असतात... अखिल जगाच्या राजकारणाचा विचार / त्यावर वाद करणे, स्पोर्ट्स चॅनल सतत बघणे, त्यावर चर्चा करणे ( हमरी तुमरी वर येईपर्यंत !), मित्रांबरोबर बसून ( याला वयाची अट नाही ) दारू पिऊन कधिकाळी झालेल्या प्रेमभंगाच्या त्याच त्याच गोष्टी उगाळणे वगैरे वगैरे ( येथे मिपा परंपरेप्रमाणे 'वैग्रे' लिहीण्याचा मोह कमालीचा संयम राखून टाळला आहे).... एव्हढ्या महत्वाची कामं असताना कशाला बै उग्गाच दाढी करत बसायची आणि वेळ वाया घालवायचा.
वर कुणीतरी लिहील्याप्रमाणे सिक्स पॅक अ‍ॅब्स असतील तर एकवेळ आम्ही खुंट चालवूनही घेऊ एखादेवेळेस पण इथे हे ही नै अन तेही नै असं नै बै चालायचं !!!
स्वगतः सुते आता पळ !! प्रतिसादावर मिपाकरांच्या उड्या पडणाच्या आधीच...

राजेश घासकडवी's picture

14 Apr 2013 - 10:49 pm | राजेश घासकडवी

मित्रांबरोबर बसून ( याला वयाची अट नाही ) दारू पिऊन कधिकाळी झालेल्या प्रेमभंगाच्या त्याच त्याच गोष्टी उगाळणे वगैरे वगैरे

तशा मैत्रिणी नाही का एकमेकींना कधी आपल्या मागे किती जण आणि कोण कोण होते याची कधी चर्चा करत?

वर कुणीतरी लिहील्याप्रमाणे सिक्स पॅक अ‍ॅब्स असतील तर एकवेळ आम्ही खुंट चालवूनही घेऊ एखादेवेळेस पण इथे हे ही नै अन तेही नै असं नै बै चालायचं !!!

रेसिप्रॉसिटी महत्त्वाची. पुरुषांनी सिक्स पॅक ऍब ठेवायचे तर स्त्रियांनी झीरो फिगर नको का ठेवायला? दोघांनीही ते मेंटेन केलं तर एकमेकांच्या कित्ती कित्ती कमतरता स्वीकारल्या जातील याची कल्पना करून हृदय भरून आलं.

एकूणात काय, घरोघरी मातीच्याच चुली. :)

इन्दुसुता's picture

15 Apr 2013 - 6:03 am | इन्दुसुता

रेसिप्रॉसिटी महत्त्वाची.

:D

एकूणात काय, घरोघरी मातीच्याच चुली. smiley

:D :D

माझी दाढी आणि "इकडून होणाऱ्या हिणकस कॉमेंटस् ऐका :
१. गुळगुळीत दाढी + आफ्टर शेव - कोण भेटणार आहे आज .
२. एक दिवसाची दाढी - खुंटे साहेब तसेच जाणार का ?
३. दोन दिवसाची दाढी - जोगेंद्र कवाडे आले . ( कृपया हलकेच घ्यावे )
४. ३ दिवसाची दाढी - घरगुती शेखर कपूर दिसतोय.
५. ४ दिवसापेक्षा जास्त दाढी - अस्वल्या / दाढी दीक्षित .

श्रीरंग_जोशी's picture

15 Apr 2013 - 7:02 am | श्रीरंग_जोशी

समयोचित लेखन आवडले.

मी स्वतः केवळ सोमवारी सकाळीच दाढी करतो. इतर दिवशी गरज वाटल्यास केवळ मिशीला आकार द्यायचे काम करतो.
विकांताला कार्यक्रमाला अथवा कुणाकडे जायचे असल्यास किंवा कुणाला घरी बोलावले असल्यास तेवढा दाढीचा दिवस बदलतो त्या आठवड्यापुरता.

मी_आहे_ना's picture

15 Apr 2013 - 9:53 am | मी_आहे_ना

गुर्जींनी विषय दाढल्याबद्दल धन्स :)
आजकाल सकाळी (पहाटे पहाटे) लवकर ऑफिसची बस पकडता पकडता, आठवड्यातले ३-४ दिवस १० मिनिटे घालवून दाढी करणे म्हणजे अगदी नाकी नऊ (केस नव्हे हो...ते नाकापाशी राहात असतीलही गडबडीत नऊच...हीही) येतात, तेव्हा वॅक्स सारखा काही उपाय आहे का असा विचार येतो मनात. (वरती माऊताईने म्हणल्याप्रमाणे लेझर असेलही, पण महागडा असणार नक्कीच...आणि कधी दाढी वाढवायची तर लेझर नंतर शक्य नसावे) जाणकारांचे काय मत?

नगरीनिरंजन's picture

15 Apr 2013 - 4:01 pm | नगरीनिरंजन

दोन दिवसांच्या वाढलेल्या दाढीसारखाच बोचरा लेख. टू बिअर्ड ऑर णॉट टू बिअर्ड हा एक आदिम प्रश्न आहे आणि गुर्जींनी त्या प्रश्नाला आपल्या विचारांचा नवीन साबण लावून चर्चेचा फेस आणण्याचे महत्कार्य केले आहे.
ज्या प्रमाणे मोराचा पिसारा फक्त लांडोरीला आकर्षित करण्यापुरताच असतो व त्याचा (म्हणजे पिसार्‍याचा) पुढच्या कार्यात काहीही सहभाग नसतो, त्याप्रमाणे पुरुषाची स्टबल ही फक्त आकर्षिण्याच्याच कामाची असते पुढच्या सत्कार्यात तिची (म्हणजे स्टबलची) अडचणच होते असे दिसते. किंबहुना पुढच्या टप्प्यात दाढी जाऊन त्याजागी लावलेले मंद आफ्टरशेव जास्त उपयुक्त ठरते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या बाबतीत अज्ञानी असलेल्या लोकांना

मात्र स्त्रिया दुटप्पीपणा करून एका बाजूने मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूने आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ते करण्यापासून वंचित ठेवतात. म्हणजे 'शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरात' अशी भूमिका ठेवतात. यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा.

असा अनुभव येतो.
वापरण्याच्या व बघण्याच्या ह्या फरकातूनच "देखणी बायको दुसर्‍याची" या उक्तीप्रमाणेच "देखणी स्टबल दुसर्‍याची" हा अनुभव विवाहित पुरुषांना येतो, त्यात कुतरओढ (अश्लील! अश्लील!! म.सं.म. इकडे लक्ष देतील काय?) करून घेण्यात हशील नाही.

ऋषिकेश's picture

15 Apr 2013 - 6:37 pm | ऋषिकेश

माझा मुळात काही विषय फक्त स्त्रियांचे आणि काही फक्त पुरुषांचे या संकल्पनेलाच विरोध आहे.
अगदी "दाढी करणे" हा ही! दाढी कशी करावी, कशी करू नये या बाबतीत बायकांनीही का सांगु नये? (किंबहुना बायकांनीच सांगावे. या निमित्ताने बाय्कांना (अपवाद असतीलच पण) साधारणतः नक्की काय - पक्षी कश्या प्रकारची दाढी ठेवलेली/भादरलेली आवडते हे तरी कळेल ;) नाहितर प्राडॉच्या म्हणण्यावर भरवसा ठेऊन हे बायकांना आवडेल अशी आशा धरावी लागेल ;) - प्रा.डॉ. ह घ्यालच )

परदेशात स्त्री न्हावी असलेली बघितलीच नाही तर तिच्यासमोर प्रसंगी डोके झुकवले आहे. तेव्हा याही विषयात एखादी जाणकार बाई असेलही कोणी सांगावे!?

(अर्थात हेच उलट 'तथाकथित' स्त्री-विषयांना लागू)

प्रसाद गोडबोले's picture

15 Apr 2013 - 6:50 pm | प्रसाद गोडबोले

अर्थात हेच उलट 'तथाकथित' स्त्री-विषयांना लागू

ह्याचे एक उदाहरण द्या राव ...

असं नसतं हो , पुरुषांच्या समस्यांवर बायका बोलल्या म्हणुन पुरुषांना वाईट वाटत नाही ..ते बिचारे ठिक आहे असे म्हणुन सोडुन देतात ....तसं बायकांचं नसतं ...
आमच्या ओळखीतल्या एका मुलीने पळुन जाऊन लग्न केले अन ६व्या महिन्यात पाळणा हालला सगळ्या बायका प्री मॅचुअर बेबी प्री मॅचुअर बेबी काळजी घ्यायला लागणार अशी चर्चा करत होत्या
अन ह्याच विषयावर मी पुरुषी मत मांडले तेव्हा मार खाता खाता वाचलो होतो ...

असो तर तात्पर्य : बायकांना स्वतंत्र विभाग असु द्यावा ... रमु दे बिचारींना त्यांच्या विश्वात =))

बॅटमॅन's picture

15 Apr 2013 - 6:54 pm | बॅटमॅन

+११११११११११११११११.

खिलाडूवृत्ती आणि बायका हे दोन विरुद्धार्थी शब्द/घटक आहेत. अन हे सांगितले तर जाण समज वगैरे काढतात. तो एकूणच मूर्खागमनी प्रकार असतो.

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 7:22 pm | पिंपातला उंदीर

टिपिकल पुरुषी मत. ज्याला कुठलाच आधार नाही

हे अनुभवांती बनलेले मत आहे, जाल आणि प्रत्यक्ष संभाषण अशा दोहोंचा त्याला आधार आहे. पण तुमची गैरसोयीचे सत्य बघण्याची तयारी नसेल तर त्याला इलाज नाही. शेवटी ज्याची त्याची जाण समज वगैरे आहेच.

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 8:16 pm | पिंपातला उंदीर

सरसकट सरसकटीकरण करणे वैइगेरे आहेच आणि . वैयक्तिक sample survey वर मत थैय्यर करायची तर सगळे दलित भ्रष्टाचारी, सगळे मुसलमान दहशतवादी आणि सगळ्या बायका कटकट करणार्‍या हे आहेतच, तुमची समज वैइगेरे कळली. तुमच्या सहज सरसकटीकरणाना आपला सल्यूट

पुलंनंतर महान विनोदी काय ते एकटे तुम्हीच बघा. तुमच्या या विनोदाला आपला एक कडक(पहिल्या धारेचा)
लाल(करण्याबद्दल) सलाम. :)

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 9:54 pm | पिंपातला उंदीर

फालतू उत्तर देण्यापेक्षा काही सांख्यिकी विदा दिलात तर बरे होईल. वैयक्तिक कॉंप्लिमेंट्स द्यायला तुम्ही इथे येत असाल मी नाही

बॅटमॅन's picture

15 Apr 2013 - 10:00 pm | बॅटमॅन

सत्य झोंबलेले दिसतेय. असो. माझ्या मताचे खंडन तुम्ही केले, सबब विदा तुम्ही द्या. मी माझे निरीक्षण सांगितले, फुक्कट फालतू गोष्टींचा सर्व्हे करायची आपली इच्छा नाही. बाकी तुमचे मिपावर येण्याचे प्रयोजन काय हे न सांगितले तर अजून बरे. वाचनश्रम वाचतील.

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 10:06 pm | पिंपातला उंदीर

घेऊ पण नका श्रम. तुमचा आइडी मला या तुमच्या बाष्कळ विधान येण्यापूर्वी माहीत पण नव्हता त्यामुळे तुमचा इथे येण्या मागचा उद्देश वैइगेरे गोष्टी मध्ये अजिबात रस नाही हे स्वाभाविक पणे आलेच

बॅटमॅन's picture

15 Apr 2013 - 10:09 pm | बॅटमॅन

श्रम घेऊ नका वगैरे तुम्ही सांगणे गरज नाही. खंडन तुम्ही केलेत, सबब तुमच्या विधानास पूरक विदा तुम्ही द्या. बाकी कुणाचा आयडी कधी माहिती झाला याबद्दल एक बाष्कळ लेखमाला लिहिली तरी हरकत नाही.

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 10:12 pm | पिंपातला उंदीर

प्रस्ताव चांगला आहे. लेखी अर्ज केलात तर विचार केल्या जाईल. : )

अन्या दातार's picture

15 Apr 2013 - 10:12 pm | अन्या दातार

फालतू उत्तर देण्यापेक्षा काही सांख्यिकी विदा दिलात तर बरे होईल.

मूर्खपणा मोजण्याचे परिमाण व बेंचमार्क सांगता का? सॅंपल सर्व्हेसाठी पूर्वतयारी चालू करावी म्हणतो.

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 10:14 pm | पिंपातला उंदीर

तुम्ही कशाला त्रास घेता? तुम्हाला झेपायचे नाही : )

अन्या दातार's picture

15 Apr 2013 - 10:16 pm | अन्या दातार

भले मी सर्व्हे पूर्ण करण्याचा त्रास घेणार नाही; पण निदान दोन गोष्टी (मूर्खपणाचे परिमाण व बेंचमार्क) तरी कळतील. तेवढीच ज्ञानात भर! काय म्हणता?

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 10:18 pm | पिंपातला उंदीर

हे बर बोललात : )

तुला काही व्यक्तींची उंची वजन वगैरे काही पाहिजे आहे का?

मी ५.४ आहे. वजन अम्मळ जास्त आहे.
उदगीरकर तुमचं काय?

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 10:21 pm | पिंपातला उंदीर

दुखार्या नसेवर हात ठेवला प्यारे जी : (

प्यारे१'s picture

15 Apr 2013 - 10:34 pm | प्यारे१

अर्रर्रर्र...

अन्या सर्व्हे अपुरा राहणार काय? माझेच आकडे दे टाकून. असू दे. आपलेच आहेत उदगिरकर. :)

आजूबाजूला पाहिले तर बर्राच विदा हाती लागेल अन्याशेठ ;)

मालोजीराव's picture

15 Apr 2013 - 11:14 pm | मालोजीराव

धन्य आय आय टी वाल्यानु कश्यात काय शोधाल...सांगतायेत नाय

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 9:59 pm | पिंपातला उंदीर

सूपर हीरो चे नाव घेऊन इथे येणारे ९८.६७ % लोक बावळट असतात असा उद्या कुणी वैयक्तिक संभाषण आणि आजा वरच्या संभाषणावरून निष्कर्ष काढला तर

बॅटमॅन's picture

15 Apr 2013 - 10:02 pm | बॅटमॅन

अगदी ९८ का १००% लोक बावळट असतात असे म्हणालात तरी मला काय त्याचे? कशाला फाट्यावर मारायचे हे आम्हाला व्यवस्थित कळते.

प्यारे१'s picture

15 Apr 2013 - 10:05 pm | प्यारे१

>>>कशाला फाट्यावर मारायचे हे आम्हाला व्यवस्थित कळते.

अजूनपर्यंत 'नेमकेपणा' आलेला नाहीये. ;)
(कशाला मारायचं कळलं तरी 'कधी' मारायचं ते नाही. :) )
हलके घ्या ब्या म्या शेट!

बॅटमॅन's picture

15 Apr 2013 - 10:09 pm | बॅटमॅन

हम्म :)

प्रसाद गोडबोले's picture

15 Apr 2013 - 8:24 pm | प्रसाद गोडबोले

अवांतर ० ) महाराष्ट्रात प्रीमॅचुअर बर्थ्स ५% पेक्षा जास्त नसणार हे मी पुराव्याने शाबीत करु शकेन ( इन्टुशन : प्रीमॅचुअर बर्थ्स मधे डेथ रेट प्रचंड जास्त असतो , आणि महाराष्ट्रात (किमान शहरी भागात ) इन्फन्ट डेथ रेट नक्कीच खुप कमी आहे ) .

सोप्प्या शब्दात ती बेबी प्रीमॅचुअर बेबी असण्याची प्रोबॅबिलिटी फार्फार कमी आहे !!

अवांतर १ ) टिपिकल बायकी मताला तरी काय आधार आहे हो ? असते एकेकाचे लॉजिक .
अवांतर २ ) ह्या टीपिकल केस मधे त्या हिरोला आम्ही आधी पासुनच ओळखत होतो अन त्या पोरीलाही
अवांतर ३) माझे अनुमान चुकीचे असु शकेलही कदाचित अगदीच नाही असे नाही ... पण त्याची शक्यता फारच कमी दिसत आहे .

मस्त कलंदर's picture

18 Apr 2013 - 10:58 pm | मस्त कलंदर

अय्या होssssss??

कवितानागेश's picture

18 Apr 2013 - 11:10 pm | कवितानागेश

ऐकावं ते नवलच! ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Apr 2013 - 12:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चला, माझी गॉसिप डबलची पार्टनर आली म्हटल्यावर मी मरायला मोकळी!

पिंपातला उंदीर's picture

15 Apr 2013 - 8:29 pm | पिंपातला उंदीर

अहो ताई एक स्त्री असून तुम्ही असे बोलता. एका स्त्री ने अशी पर्सेप्षन्स मांडावीत ज्याला काहीच सांख्यिकी विदा नाही ; )

प्रसाद गोडबोले's picture

16 Apr 2013 - 12:30 am | प्रसाद गोडबोले

सांख्यिकी विदा

>>> ह्या मंत्राचा १३ माळा जप करायला वगैरे का सांगितलय हो तुम्हाला ??

डेटा आणुन द्या , १५ मिनिटात प्रुव्ह करु हे हायपॉथेसीस .

पण हातच्या काकणाला आम्हालातरी आरसा लागत नाही =))

बॅटमॅन's picture

17 Apr 2013 - 12:31 pm | बॅटमॅन

+११११११११११११११११.

तुम मुझे डेटा दो, मैं तुम्हे हायपोथेसिस प्रॉव्ह कर के दूंगा =))

(सुभाषचंद्र महालानोबिस).

कपिलमुनी's picture

17 Apr 2013 - 1:54 pm | कपिलमुनी

अहो ताई एक स्त्री असून

ताईच आहे याचा सांख्यिकी विदा आहे का ??

पिंपातला उंदीर's picture

17 Apr 2013 - 2:47 pm | पिंपातला उंदीर

गिरीजा नाव आहे ना ताई च/ काकूच

राजेश घासकडवी's picture

17 Apr 2013 - 6:55 pm | राजेश घासकडवी

खिलाडूवृत्ती आणि बायका हे दोन विरुद्धार्थी शब्द/घटक आहेत.

पुरुषांच्या प्रश्नांना हात घालणारा धागा अशासारख्या स्फोटक विधानांनी हायजॅक झालेला पाहून वाईट वाटलं. पुरुष विभागातल्या लिखाणात स्त्रियांविषयी विधानं टाळणं अशक्य असलं तरी 'स्त्रिया कशा अबक असतात' (अबक = अखिलाडू, अतिसंवेदनाशील, वगैरे वगैरे) या पातळीवर जाऊ नये अशी इच्छा आहे.

सरसकटीकरण नेहेमीच चुकीचं असतं. ;)

मुद्दा नोट केल्या गेला आहे. ढिस्क्लेमर आणि अ‍ॅजम्प्शन्स सांगणे राहून गेले ;)