Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजेश घासकडवी on Sat, 04/13/2013 - 22:09
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा
पुरुषांचे काही खास प्रश्न असतात. त्यांच्या जिव्हाळ्याचे काही विषय असतात. बहुतकरून स्त्रियांना त्यांच्यात रस असतोच असं नाही. आणि काही विषय तर स्त्रियांना लागूच होत नाही. त्यामुळे अशा विषयांवर स्त्रियांचे प्रतिसाद कितपत ग्राह्य धरावे हा प्रश्नच पडतो. तरी पुरुष आयडींनी मनमोकळेपणाने प्रतिसाद द्यावेत ही विनंती. आता तुम्ही म्हणाल, की असं काय आहे जे पुरुषांना असतं आणि स्त्रियांना नसतं? उत्तर सोपं आहे - दाढी. किंबहुना एका प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिद्धांतानुसार अनेक तरुणींना बीअर्ड एन्व्ही निर्माण होते त्यामुळे ती कमतरता झाकण्यासाठी त्या पुरुषांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. ठरलेल्या भेटण्याच्या ठिकाणी बॉयफ्रेंडला पाउण तास ताटकळवणं हे त्याच बिअर्ड एन्व्हीमधून येतं. दररोज दाढी करायला लागणं हा पुरुषजातीला मिळालेला शाप आहे. पण एके काळी असं नव्हतं. आपल्या संस्कृतीत दाढीला प्रचंड महत्त्व होतं. सर्व ऋषिमुनी पांढऱ्याशुभ्र दाढ्या राखून असायचे. द्रोणाचार्य, भीष्म वसिष्ठ वगैरे लोकांची आपल्याला दाढीशिवाय कल्पनाच करता येत नाही. किंबहुना विश्वामित्र वगैरे मंडळी आपल्या लांबलचक दाढ्या सावरून तपश्चर्येला बसली की इंद्राचं स्वर्गातलं आसन डळमळायला लागायचं. मग तो मेनकेसारख्या कोणालातरी ती तपश्चर्या भंग करायला पाठवून द्यायचा. आणि ती मेनकाही मनोभावे सेवा करायची. विश्वामित्रच दाढी हलवत तिने पुढे केलेलं पोर 'हे माझं नाही' म्हणून मान हलवायचा. ते फारसं महत्त्वाचं नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की सुंदर स्त्रियांवर प्रभाव पाडण्यासाठी पूर्वी दाढी करण्याची गरज पडत नसे. अलिकडच्या काळात (म्हणजे गेल्या चारेकशे वर्षांत) दाढी ही राजांची निशाणी असायची. शिवाजी महाराजांना सुंदर दाढी होती. सर्व मुघल बादशहांना दाढ्या होत्या - एक अकबर सोडला तर (संदर्भ - जोधा अकबर हा अविस्मरणीय चित्रपट. खासकरून त्यातल्या अकबराच्या शरीरप्रदर्शनासाठी) रामदास, गुरु नानक यांना दाढ्या होत्या. मात्र ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्यांनी सगळ्यांच्या दाढ्या कमी केल्या. भारतीय जनतेला आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक बाबतीत खच्ची करून टाकलं. आणि मग सर्वच क्षेत्रांमध्ये पाश्चात्यांचं अंधानुकरण सुरू झालं. देवानंद, राजेश खन्ना, कुमार गौरव (तोच तो जो विजेता पंडित पेक्षाही गोग्गोड दिसत होता तो), आमीर खान वगैरे सर्व चॉकोलेट हिरोंनी गुळगुळीत चिकण्या चेहेऱ्यांनी तत्कालीन तरुणींच्या तोंडून "ऐय्या क्यवढा गोsssड आहे नाही! चो च्वीssssट." वगैरे उद्गार काढवून दाढी वाढवण्याची इच्छा असणाऱ्यांची स्वप्न वस्तऱ्यांनी छाटून टाकली. आता मात्र परिस्थिती बदलते आहे. चाळिशीत कॉलेजकुमारांची कामं करणारे, पोटं सुटलेले, त्वचा निबर झालेले, आणि एखाद्या तुपाच्या व्यापाऱ्याची असावी तशी शरीरयष्टी असलेले हिरो लयाला गेले आहेत. त्याजागी नवीन रफ ऍंड टफ, सिक्सप्याकवाले, तरुण हिरो आलेले आहेत. आपल्या जवळपास समवयस्क बाईला 'मॉं मै बीए पास होगया' म्हणणारे हिरो जाऊन भाईगिरी करणारे, बकाल वस्तीत फिरणारे, सतत दाखवता येतील असे बायसेप्स बाळगणारे हिरो आले. ही रांगडी प्रतिमा राखण्यासाठी अनेकांनी दाढीकडे एक पुनर्कटाक्ष टाकला. आणि जागोजागी स्टबल राखलेले, डोळे बारीक करून हिंस्र भाव डोळ्यात आणलेले हिरो दिसायला लागले (जागोजागी म्हणजे गल्लोगल्ली, वेबसाइटोवेबसायटी - शरीरावर वेगवेगळ्या जागी नाही). नुकत्याच मिपावर झालेल्या तुम्हाला कोण सेक्सी वाटतं या चर्चेत 'स्टबल ठेवणारे केवढे सेक्सी असतात, भुकेले वाटतात' वगैरे मतं स्त्रीवर्गाकडून मांडली गेल्याचं आठवतं. त्यामुळे स्टबल ठेवण्याकडे पुरुषांचा कल व्हायला लागलेला आहे. आठवड्यातून एकदाच दाढी करायला लागणं हा आणखीनच ऍडेड ऍडव्हांटेज. दररोज दाढी केल्याने गालावरची सुकुमार त्वचा खरवडली जाते. ज्या पुरुषांना आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल त्यांच्यासाठी ही आपत्तीच ठरते. दररोज दिवसांतून पाच ते दहा मिनिटं दाढी करण्यात घालवल्याने वेळही वाया जातो. आजच्या धकाधकीच्या काळात जिथे दिवसातून मोकळा वेळ जिथे फक्त चारेक तास मिळतो, त्यातली पाच मिनिटंही घालवणं म्हणजे तीन टक्के आयुष्य फुकट घालवण्यासारखं आहे. तेव्हा अधूनमधूनच दाढी करणं केव्हाही चांगलं. एवढे सगळे फायदे असले तरी एक मोठा तोटा आहे - तो म्हणजे गर्लफ्रेंड किंवा बायको 'दाढी टोचते' म्हणून तक्रार करते. आपण रोमॅंटिक मूडमध्ये येऊन तिच्या जवळ जावं, तर ती गालावरून हात फिरवून खुंट कुरवाळते आणि लांब जाते. आणि दाढी केल्याशिवाय जवळ येऊ देत नाही. हा अनुभव सार्वत्रिक आहे. काही अपवाद असतील पण ते विरळा. एका बाजूने फॅशनची माध्यमं स्टबलधारी सेक्सी पुरुषांच्या चित्रांचा मारा करतात. आणि या पुरुषांची चित्रं कोण बघतं? तर स्त्रियाच. त्यामुळे एका अर्थाने त्याच या सवयीला जबाबदार आहेत. त्याचबरोबर सुकुमार त्वचेची निगा राखणं, वेळेची होणारी बचत, दाढीसामानाच्या खर्चावर होणारी बचत या सर्वच बाजूंनी विचार केला तरीही किंचित दाढी ठेवणं फायद्याचंच आहे. मात्र स्त्रिया दुटप्पीपणा करून एका बाजूने मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूने आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ते करण्यापासून वंचित ठेवतात. म्हणजे 'शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरात' अशी भूमिका ठेवतात. यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा.
  • Log in or register to post comments
  • 29133 views

प्रतिक्रिया

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 04/13/2013 - 22:39

Permalink

अहाहा.

समतेच्या वाटेवर दमदार पावलं टाकतांना पुरुषांचेही काही प्रश्न असतात सालं याचा आता विसर पडत चालला होता. पण अजून पुरुष म्हणून आपण आपल्या प्रश्नाकडे तितक्या जागृकपणे आणि गंभीरपणे पाहात नाही, असं आजच्या प्रस्तावनेवरुन वाटायला लागलं आहे. दाढीचं म्हणाल तर वाढलेल्या दाढीवर प्रयोग करता येतात. फ्रेंच कट वगैरे. बरं असा प्रयोग केला तर 'काय हल्ली डोक्यात खूळ घेऊन येतात वगैरे' ऐकावं लागलं आहे. फ्रेंच कटला मेंटनस खूप आहे, दर दिवसाला, दोन दिवसाला कट मारावी लागते. एवढं शुल्लक कामाकरिता नाव्ह्याकडे जाणंही परवडत नाही. दररोज खरडायचं म्हटलं तरी कंटाळ्याचं काम होत चाललं आहे. प्रश्न तसा जीवाभावाचा आहे, यात काही वाद नाही. >>>>आमीर खान वगैरे सर्व चॉकोलेट हिरोंनी गुळगुळीत चिकण्या चेहेऱ्यांनी तत्कालीन तरुणींच्या तोंडून "ऐय्या क्यवढा गोsssड आहे नाही! चो च्वीssssट." वगैरे उद्गार काढवून दाढी वाढवण्याची इच्छा असणाऱ्यांची स्वप्न वस्तऱ्यांनी छाटून टाकली. हाहाहा. हे मात्र खरं आहे. दाढी वाढलेली म्हणजे तंगी आहे, गरिबी आहे, काही दु:खद प्रसंग आला आहे, किंवा प्रेयसीचा विरह आहे किंवा तो कवी तरी आहे, अशी प्रतिमा दाढी वाढलेल्यांची बनत चालली आहे, याला जवाबदार माध्यमं आहेत, असे वाटते. माध्यमं जशी संस्कृती लादतील त्याप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. बाकी, स्त्रीयांच्या दुटप्पीपणाबद्दल काही विदा नसल्यामुळे काही बोलणं उचित ठरणार नाही. पण, पुरुषांची दाढी, मिशा, हे कधी काळी भूषण होतं. पण जग जसं आधूनिक आणि आधूनिकोत्तर होत चाललं तस तसं या पारंपरिक भूषणांना जळमटं लागायला लागली आहेत याच्याशी सहमत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sat, 04/13/2013 - 23:07

Permalink

जाऊ दे !

जाऊ दे !
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 04/13/2013 - 23:42

In reply to जाऊ दे ! by आशु जोग

Permalink

बोला की....

>>>> जाऊ दे ! लिहिण्या बोलण्याचं स्वातंत्र्य आहे तेव्हा अभिव्यक्त व्हायला हरकत नाही. बाकी,लेखनात असे काही दुवे भरले असते तर बरे राहीले असते. ''तिथे फुलांच्या वसत्यावर वणवे लावले जातात नि स्वामित्त्वाचे उत्सव आनंदाने साजरे होतात पण तिथेल्या करुण कहाण्या दु:खाने उद्गारतात की 'दाढी' एक जुलुम आहे....... '' (चांगल्या कवितेच्या काही ओळीत 'दाढी' हा शब्द घुसाडल्याबद्दल कवयित्री मला क्षमा करतील) अवांतर : रॉयल चॅलेंज आणि चेन्नईचा आयपीएलमधील क्लास सामना पाहता आला धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by रमताराम on Sat, 04/13/2013 - 23:27

Permalink

आं

मिपा स्वतंत्र विभाग देत नाही काय पुरुषांना, मग आम्हीच करतो सुरू असं म्हणणं भलतंच विद्रोही की हो. लाल सलाम कॉ. घासकडवी.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 04/14/2013 - 00:12

In reply to आं by रमताराम

Permalink

छे हो

छे हो, मी कसला विद्रोही? विद्रोहासाठी एक जहालपणा आवश्यक असतो. मी जहाल वगैरे नाही, मी मवाळ पक्षातला. पुरुषांचेही काही स्वतंत्र विषय असू शकतात एवढंच म्हणणं मांडायचं होतं. त्यांच्याही बारीकसारीक दुःखांना वाचा फोडण्याचा हा मवाळ माफक प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 04/14/2013 - 13:13

In reply to आं by रमताराम

Permalink

विद्रोही ?

मिपाद्वेष्टे ह्या पदावरुन उचलबांगडी का काय मग आता ? बाकी, गुर्जींचे लिखाण हे 'अतिअभ्यासू आणि जडजड' होत चालल्याने आम्ही ते वाचणे सोडून दिले आहे. आमचे मूळचे गुर्जी कुठेतरी हरवले आहेत आणि हे 'शह-काटशह' वाले भलतेच कोणी त्यांची जागा घेऊ पाहात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Mon, 04/15/2013 - 02:19

In reply to विद्रोही ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

विद्रोही

विद्रोही Image removed. लेख आवडला ,मात्र त्याचे शीर्षक ओढून ताणून दिल्यासारखे वाटत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sat, 04/13/2013 - 23:55

Permalink

पुरुष विभागाचा पहिलाच धागा

पुरुष विभागाचा पहिलाच धागा गर्लफ्रेंड/बायकोला काय आवडतं/आवडत नाही असा का आहे बरं? पुरुष विभागात स्वायत्तपणे पुरुषांचे असे विषय चघळले गेले पाहिजेत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 04/14/2013 - 00:08

In reply to पुरुष विभागाचा पहिलाच धागा by आदूबाळ

Permalink

पुरुष विभागाचा पहिलाच धागा

पुरुष विभागाचा पहिलाच धागा गर्लफ्रेंड/बायकोला काय आवडतं/आवडत नाही असा का आहे बरं?
रास्त प्रश्न. लिंगभूमिकांचा व्यापक विचार करताना स्त्रिया पुरुषांच्या दृष्टिकोनातून आणि पुरुष स्त्रियांच्या दृष्टिकोनातून बघितल्याशिवाय प्रत्यवाह नसतो. ते थोडंस यिन आणि यांग सारखं आहे. काळा आणि पांढरा असे दोन रंग आहेत म्हणूनच काळ्यापांढऱ्या आकृतींना अर्थ येतो. मानव जर एकलिंगी असता तर या स्त्रीपुरुष द्वंद्वाला अर्थच राहिला नसता.
पुरुष विभागात स्वायत्तपणे पुरुषांचे असे विषय चघळले गेले पाहिजेत.
दाढीइतका दुसरा पुरुषी विषय सापडला तर जरूर लिहा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Tue, 04/16/2013 - 01:54

In reply to पुरुष विभागाचा पहिलाच धागा by राजेश घासकडवी

Permalink

हा घ्या तेवढाच पुरुषी विषय

दाढीइतका दुसरा पुरुषी विषय सापडला तर जरूर लिहा.
अ‍ॅडम्स अ‍ॅपल, त्याची निगा कशी राखावी, त्या भागातली दाढी करून निर्माण होणारे चामडीचे (तिथल्या आणि एकंदर पुरुषांच्या कातडीला त्वचा म्हणणं जीवावर आलं) प्रश्न आणि ज्यांचं अ‍ॅडम्स अ‍ॅपल लहान किंवा स्त्रियांसारखं न दिसणारं असतं त्यांची समाजात होणारी अप्रतिष्ठा. चघळा ... मी तोपर्यंत इंग्लिश-विंग्लिशमधल्या लोराँचे फोटो पहात "दिल बहलवते". खास पुरुषी विषयातही मज सबलेला प्रतिसाद लिहू देण्याबद्दल लेखक श्री. राजेश घासकडवी आणि मिसळपाववरील अन्य पुरुष आयडींचे विशेष आभार.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Sun, 04/14/2013 - 00:22

Permalink

पांढरी दाढी

दाढी आणि मिशी मधे पांढरे केस डोकावयाला लागले कि दाढी करा , असा आग्रह चलू होतो . अमितभ चे काळे केस आणि पांढरी दाढी चालते ..पण नवर्याची दाढी / मिशी पांढरी झालेली आणि ठेवलेली चालत नाही ..म्हणूनच ३५-५० मधले बहुतेक काका चकाचक असतात
  • Log in or register to post comments

Submitted by आशु जोग on Sun, 04/14/2013 - 00:33

Permalink

.

केसांचे करतात तसे टकलाचे रोपण करा
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 04/14/2013 - 00:59

Permalink

गुड वन!

वाढलेली दाढी हे विद्रोहींचं व्यवच्छेदक की काय लक्षण असल्यामुळे सुरवात तर जोरदार झाली आहे. स्वगतः जितेंद्रच्या 'हाथीमताई' मधली दाढीच्या फ्रेंच कट ठेवलेली राजकूमारी कुणाला आठवते का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Sun, 04/14/2013 - 01:42

Permalink

या प्रश्नावर स्त्रियांकडून

या प्रश्नावर स्त्रियांकडून कौल घ्यावा काय...कौल घेतल्यास स्त्री डू आय डिंचा रिज़ल्ट वर प्रभाव पडेल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 04/14/2013 - 10:02

Permalink

आँ?

पण तुमचा राखीव विभाग सुरू कुठे झालाय?
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Sun, 04/14/2013 - 11:32

In reply to आँ? by पैसा

Permalink

ज्योती जपून. या "मान ना मान

ज्योती जपून. या "मान ना मान मै तेरा मेहमान" अशा "धटींगण राखीव विभागातून" तुझा प्रतिसाद कोणी पुरुष संपादक उडवतील बाई.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 04/14/2013 - 18:46

In reply to आँ? by पैसा

Permalink

ऑ?

राखीव हा शब्द कुठे दिसला तुम्हाला? काही विषय फक्त पुरुषांच्या जिव्हाळ्याचे असतात एवढंच सांगायचं होतं. पुरुषमनांची सुकुमार स्पंदनं चित्रित करणारं लेखन मी आधीही केलेलं आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 04/14/2013 - 19:23

In reply to ऑ? by राजेश घासकडवी

Permalink

धाग्याच्या नावातच

धाग्याच्या नावातच लिहिलंत ना! "पुरुष विभाग-धागा क्र. १"
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 04/14/2013 - 19:45

In reply to धाग्याच्या नावातच by पैसा

Permalink

पण 'राखीव' हा शब्द नाही तिथे.

पण 'राखीव' हा शब्द नाही तिथे. स्त्री विभाग किंवा पुरुष विभाग करायला काहीच हरकत नाही. तो विशिष्ट आयडींसाठी राखीव ठेवण्याला माझी हरकत आहे. कुठल्याही समाजात एखादा अधिकार जन्माधिष्ठित होणं चांगलं नाही. तो कर्माधिष्ठित असावा. नाहीतर जातीव्यवस्था निर्माण होते. आज आंबेडकरांची जयंती - तेव्हा त्यानिमित्ताने त्यांनी दिलेल्या लढ्याची आठवण करूया. आणि मिपासारख्या मोकळ्या वातावरणात जातीव्यवस्था निर्माण होणार नाही अशी आशा करूया.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Sun, 04/14/2013 - 20:05

In reply to पण 'राखीव' हा शब्द नाही तिथे. by राजेश घासकडवी

Permalink

वा वा वा

स्त्री विभाग किंवा पुरुष विभाग करायला काहीच हरकत नाही. तो विशिष्ट आयडींसाठी राखीव ठेवण्याला माझी हरकत आहे.
वा वा वा गहिवरुन आलं हो हा प्रतिसाद पाहुन
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 04/14/2013 - 11:36

Permalink

काही विस्कळीत टीप्स.

गर्लफ्रेंड/बायकोच्या तक्रारी येऊ नये म्हणून आपण काही काळजी घ्यायला पाहिजे. काही टीप्स एकमेकांना अशा जाहीर सांगितल्या पाहिजेत. परिपक्व विचार, पिळदार शरीरेष्टी, देखणेपणाबरोबर.... १] गबाळेपणा नसावा. आकर्षक कपडे. शूज, मंद डिओ, हजार पाचशेनं गच्च भरलेलं पॉकेट. उगा वर काढायचं आणि पुन्हा खिशात ठेवून द्यायचं. (हेही सारखं सारखं नाही करायचं) २] मनगटी घड्याळ आकर्षक असावं. चेहरा तेलकट असेल तर मूलतानी माती आणि डाळीचं पीठ चेहर्‍यावर तास दोन तास चोपडावं. चेहरा आकसायला लागला की काढून टाकावं. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी भेट घ्यावी. ३] गर्लफ्रेंडबरोबर असाल आणि उन्हाळ्याच्या दिवसात भेट झाल्यावर चेहर्‍यावर घाम येत असेल तर रुमालाने घाम पिळून काढू नका. अलगद टीपण्याचा प्रयत्न करा. हल्ली खूप उन पडतंय नाही, अशा थापा मारा. वेळ मारुन न्या. ४] गर्लफ्रेंडबरोबर असेल किंवा बायको बरोबर असाल आणि हॉटेलमधे गेल्यावर जेवण येण्याअगोदर पेपरनॅपकीनवर पेनानं काही लिहिण्याचा प्रयत्न करु नका, ते बरं दिसत नाही. काही महत्त्वाचं व्यक्त करायचं असेल तर सरळ बोलून व्यक्त करा. ५] सार्वजनिक ठिकाणी गर्लफ्रेंड किंवा बायको बरोबर असतांना कितीही 'खोखो' हसण्यासारखा विनोद झाला तरी मंद हसा. हसतांना हात टेबलावर आपटू नका. टेबलाला दणके देऊ नका. [आमचा एक मित्र हसतांना हात टेबलवर आपटतो आणि पायही जमिनीवर दणादण आदळतो] ६] हॉटेलमधील आरशासमोर उभे राहून केस बरोबर विंचरले आहे का ते सारखं सारखं बघू नये. आयड्यानं बघायचं आणि नकळत टापटीप करुन घेण्याचा प्रयत्न करावा. इन करात असाल तर बेल्ट प्यांटीत व्यवस्थित घातला आहे का बघून घ्यावे. झीप लावली आहे का खात्री करुन घ्यावी. सार्वजनिक ठीकाणी सारखं सारखं चेक करु नये. अजून काही टीप्स सवडीनं देतो. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चावटमेला on Sun, 04/14/2013 - 12:33

In reply to काही विस्कळीत टीप्स. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

परिपक्व विचार, पिळदार

परिपक्व विचार, पिळदार शरीरेष्टी, देखणेपणाबरोबर....
बाकी सगळं ठीक आहे हो, पण तो देखणेपणा कुठून आणायचा ? :( जाऊदे..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 04/14/2013 - 13:35

In reply to परिपक्व विचार, पिळदार by चावटमेला

Permalink

देवानं तसा अन्यायच केला आहे.

देखणेपणाशी सहमत. सर्वच पुरुष देखणे असू शकत नाही. पण, आहे त्यातल्या त्यात देखणेपणाच्या बाबतीत थोडीफार तडजोड करुन इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 04/14/2013 - 13:47

In reply to देवानं तसा अन्यायच केला आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

उदा. ???

इतर गोष्टींकडे लक्ष द्यावे, उदा. ???? सर सांगा की इतर यूएसपी.
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Sun, 04/14/2013 - 12:07

Permalink

गर्लफ्रेंड/बायकोच्या तक्रारी येऊ नये म्हणून

प्राध्यापक साहेब गर्ल फ्रेंड किंवा बायकोला खुश करण्यासाठी एवढे कष्ट का घ्या?मी आहे असा आहे पाहिजे तर या नाही तर जा. मी लग्न ठरण्याच्या आधी किंवा लग्न ठरल्यावर बायकोला खुश करण्यासाठी कोणताही अतिरिक्त प्रयत्न केला नाही.दुर्दैवाने माझा प्रेमविवाह झाला नाही.(इच्छा होती पण!!)याचा मोठा फायदा म्हणजे तू आता बदलला आहेस असे मला ऐकायला लागले नाही. ( अर्थात लष्करात असल्याने गर्ल फ्रेंडला खुश करण्यासाठी खिशात पैसे फारसे नसत) पण गणवेशात माणूस रुबाबदार दिसतो त्यामुळे वर फार पैसे टाकावे लागत नसत. गबाळे असू नये हे मान्य पण टापटीप राहावे हे २४ तासासाठी.आपल्या अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून निर्गन्धक( deodorant) किंवा अत्तर रोज लावण्यास काय हरकत आहे. कपड्याला इस्त्री रोजच व्यवस्थित असावी. केवळ गर्ल फ्रेंड ला खुश करण्यासाठी का? अर्थात ही शिकवण लष्करात प्रथम पासूनच मिळते म्हणून असेल कदाचित पण रामपरसाद देविसरण नावाचा माणूस सुद्धा लष्करात गणवेश घातल्यावर रुबाबदार दिसतो ते केवळ गणवेशामुळे नव्हे तर या शिकवणीमुळे. य़ाच नावाचा माणूस आपला सुरक्षा रक्षक/ वाहन चालक म्हणून गणवेशात पाह्तो तेतेंव्हा किती ढिला आणि अजागळ दिसतो? यावरून माझे म्हणणे पटावे
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Sun, 04/14/2013 - 12:30

Permalink

लेख ठीक आहे पण उत्कृष्ट मराठी

लेख ठीक आहे पण उत्कृष्ट मराठी बोलणाऱ्या गुर्जींनी खुंट हा शब्द का टाळला असेल याचा विचार करतो आहे....
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sun, 04/14/2013 - 13:59

Permalink

आँ ??

पुरुष विभाग - धागा क्र. १ - हे मला कसे काय दिसते आहे ? हा माझा डू आयडी आहे की काय ? Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by तिमा on Sun, 04/14/2013 - 14:28

Permalink

दाढीनंतर

कानावर वाढलेले केस, शटर्स वाटतील अशा वाढलेल्या भुवया, सुटलेले पोट आणि गणपतीसारखी झालेली छाती या विषयावरही चर्चा व्हाव्यात.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 04/14/2013 - 14:39

In reply to दाढीनंतर by तिमा

Permalink

खिक्क.

कानावर वाढलेले केस आठवणीने काढले पाहिजेत. लैच बेक्कार प्रकार आहे हा. भूवयांच्या बाबतीत 'आयब्रो, करुन त्यांना फार धनुष्यबानाच्या आकाराच्या करु नये, असे वाटते. सुटलेल्या पोटासाठी सकाळ-संध्या़काळ दहा किमि. आणि खाण्यापिण्याच्या बाबतीत पथ्य पाळून पोट सरळ छातीच्या सरळ रेषेत आणता येईल. (चाळीशीच्या पुढच्या लोकांनी या भानगडीत पडू नये). असे वाटते. बाकी, स्त्री-पुरुषांनीही याबाबतीत आपली मतं मांडावी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Sun, 04/14/2013 - 15:09

In reply to खिक्क. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अबब!

सुटलेल्या पोटासाठी सकाळ-संध्या़काळ दहा किमि.
म्हणजे सुटलेलं पोट या जन्मात कमी होणं शक्य नाही असं वाटतं.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 04/14/2013 - 16:18

In reply to खिक्क. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

काननबाला

हीहीही, ते कानावर केसं वाढलेले काननबाला लैच भारी दिसतेत. =)) =)) =)) अग्दी वळून आकड्याचा आकार होइपर्यंत दिसत नाहीत का यांना स्वत:ला आयन्यात? का ते काढू नयेत असे काही शास्त्र आहे? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 04/14/2013 - 17:16

In reply to काननबाला by अभ्या..

Permalink

काननबाला...

काननबाला...=)) =)) =)) ग्रीन टी सांडला की बे अभ्या पीशीवरऽ, कस्ला गहिन्यागत हसायलोय ये*भो*** =)) =)) ह्हीह्हीह्हीह्हीह्हीह्ही =)) =)) किती लोळू तेच्यायला, आज हास्यवात मज झाला =)) (दाढी वाढवल्यावर मातोश्रींच्या मते अफगाण दिसणारा) बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Mon, 04/15/2013 - 15:50

In reply to काननबाला by अभ्या..

Permalink

काननबाला हा शब्द भन्नाट

काननबाला हा शब्द भन्नाट आवडल्या गेलेला आहे. नुसतेच कल्ले वाढवणारांना कल्लावंत म्हणता येईल. खालच्या ओठाला लागून संततीनियमनाच्या त्रिकोणासारखी किंचित दाढी वाढवणारांना काय म्हणावं असा प्रश्न पडला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 04/17/2013 - 18:46

In reply to काननबाला by अभ्या..

Permalink

=))

काननबाला =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on Sun, 04/14/2013 - 15:09

Permalink

पुरुषांच्या प्रायव्हसीचा मान

पुरुषांच्या प्रायव्हसीचा मान ठेवायचा म्हणून मी प्रतिसाद देत नव्हते, फक्त गपचुप वाचत होते! ;) पण स्त्रियांच्या सल्ल्याशिवाय पुरुषांना इलाज नाही. जसे बिरुटे सरांनी "चेहरा तेलकट असेल तर मूलतानी माती आणि डाळीचं पीठ चेहर्‍यावर तास दोन तास चोपडावं. चेहरा आकसायला लागला की काढून टाकावं. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी भेट घ्यावी." हा उपाय बरोब्बर निवडला तसाच दाढीसाठीही स्त्रियाच पुरुषांना टिप्स देउ शकतील. माझा सल्ला आहे की लेसर थेरेपी वापरुन कायमची सुटका करुन घ्यावी दाढीपासून. मात्र ज्यांना घोसभर वाढवायची असेल त्यांनी जास्वंदीचे तेल वापरावे. ...बाकीचे सल्ले सवडीने देइन.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Sun, 04/14/2013 - 16:03

Permalink

आपणच सिक्स पॅक अ‍ॅब्स

आपणच सिक्स पॅक अ‍ॅब्स बनवाव्या म्हणजे बायको किंवा प्रेयसीला वारंवार तिच्या खाण्याच्या सवयी किती चुकीच्या आहेत यावर ऐकवता येईल, असा अंदाज !!;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 04/14/2013 - 16:18

Permalink

दररोज दाढी करायला लागणं हा

दररोज दाढी करायला लागणं हा पुरुषजातीला मिळालेला शाप आहे. अगदी खरयं ! तो म्हणजे गर्लफ्रेंड किंवा बायको 'दाढी टोचते' म्हणून तक्रार करते. हे देखील अगदी खरयं... ;) मात्र स्त्रिया दुटप्पीपणा करून एका बाजूने मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूने आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ते करण्यापासून वंचित ठेवतात. या बाबतीत १००% सहमत ! मी तर मुद्दामुन दर शुक्रवारीच दाढी करतो... बायडीची अंमळ चीडचीड होते,का तर शुक्रवारी आम्हाला हापिसात ड्रेसकोड नसतो,त्याचा फायदा पुरुष मंडळीं पेक्षा स्त्रीयांना मिळतो हे काही वेगळे सांगायला नको अगदी टकाटक बनुन येतात !हे माझ्या बायडीला मी सांगितले (चूक केली हे नंतर लक्षात आले.) त्यामुळे मी शुक्रवारी दाढी करायला सुरु केली की हिचे स्वतःशीच बोलणे सुरु होते,बरोबर आहे आज शुक्रवार ना ! करणारच दाढी ! इतर वेळी वेळ मिळत नाही,पण शुक्रवारी बरोबर मिळतो कसा ? मग मी उगाच गाणे म्हणल्याचा आव आणतो...आज शुक्रवार है आज शुक्रवार है... या बरोबर तिचा पारा अजुन चढतो, मग मला दमदाटी सुरु होते,आज जास्त चिकणा बनुन जायचे नाहीस समजलसं ? मी उगाच होहो म्हणतो. ;) तिच्या माहेरी जायची वेळ आली तरी हीच दमदाटी वेळोवेळी होते,तिथे जास्त बोलायचे नाहीस ! उगाच चिकणा बनुन यायचे नाही वगरै वगरै, का तर हिच्या मैत्रिणी भेटायला येतात्,बाकीचा स्त्री वर्ग सुद्धा येतो आणि त्या माझ्याशी सुद्धा बोलतात... मग हीची धुसफुस ! जरा कोणी माझ्याशी बोलले की हिची चुळबुळ सुरु... घरी आल्यावर काय एवढ्या गप्पा चालल्या होत्या ? या प्रश्नापासुन माझी उलट तपासणी सुरु होते,आणि त्याला मी अगदी मसालेदार उत्तर देतो. ;) यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा. परत सहमत ! ;) हा प्रतिसाद दाढी करुनच दिला आहे... ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 04/14/2013 - 16:21

In reply to दररोज दाढी करायला लागणं हा by मदनबाण

Permalink

परफेक्ट

बाणराव म्हणजे तुम्ही तुमचा आयडी एकदम परफेक्ट घेतलाय म्हणा की? ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 04/14/2013 - 16:22

In reply to परफेक्ट by अभ्या..

Permalink

खी...खी.खी.

खी...खी.खी. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 04/14/2013 - 16:55

In reply to खी...खी.खी. by मदनबाण

Permalink

ऑ ?

मदनबाण..... वक्त करता जो वफा,आप हमारे होते :- दिल ने पुकारा {मुकेश}
लग्न झाल्यावरही बाण्याने अशी सही का ठेवले असावी?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sun, 04/14/2013 - 17:02

In reply to ऑ ? by परिकथेतील राजकुमार

Permalink

हेहेहेहे

कही पे निगाहे कही पे निशाना झाला असेल बाणाचा ;) किंवा नेमच वेगळीकडे लागूनसुध्दा बक्षीस मिळाले असेल ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sun, 04/14/2013 - 21:45

In reply to हेहेहेहे by अभ्या..

Permalink

परा,अरे त्या सहीचं काय घेउन

परा,अरे त्या सहीचं काय घेउन बसलायस ? ;) घे बदलली.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sun, 04/14/2013 - 22:44

In reply to परा,अरे त्या सहीचं काय घेउन by मदनबाण

Permalink

च्यायला !

बाण्या, लेका वहिनींनी ही सही वाचली, तर आधिची सही परवडली अशी अवस्था होईल.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Mon, 04/15/2013 - 09:37

In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार

Permalink

बाण्या, लेका वहिनींनी ही सही

बाण्या, लेका वहिनींनी ही सही वाचली, तर आधिची सही परवडली अशी अवस्था होईल. हॅहॅहॅ...परा आता मला वहिनी आण लवकर ! मग खर्‍या गमती-जमती कळतील तुला ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sun, 04/14/2013 - 17:24

Permalink

जय हो!! जय हो!!!! घासूगुर्जी

जय हो!! जय हो!!!! घासूगुर्जी की जय हो!!!!! खास पुरुषविषयक धागा काढल्याबद्दल समस्त बिचार्‍या पुरुषांतर्फे गुर्जींचे खंग्री अभिनंदन. बाकी भारतीय संस्कृतीबरोबरच ग्रीक संस्कृतीतसुद्धा सगळे दाढ्या ठेवायचे. अकीलिसपण दढियल होता. पण तो नतद्रष्ट अ‍ॅलेक्झांडर साला हरामखोर होता. त्याने दाढ्या औट ऑफ फ्याशन केल्या आर्मीत- का तर शत्रूसैनिक दाढ्या ओढतील म्हणून. पुढे रोमन संस्कृतीत तर जितके चेहर्‍यावरील केस जास्त तितके हुच्चभ्रू असा प्रवाद सुरू झाला. पण जर्मानिक टोळ्यांनी आणि नंतर अरबांनी, तसेच शीख धर्मीयांनी हा ट्रेंड यथाशक्ती परतवून लावला. महाराष्ट्राचे यासंबंधी योगदान गुर्जींनी विशद केलेच आहे. चीनवालेपण याबाबतीत मागे नव्हते. अगदी त्या हावरट ब्रिटिशांतदेखील परवापरवापर्यंत दाढी ठेवणारे लोक होते. मधेच हे काय बंड झालं तेच्यायला, काय माहिती. आम्रविकन लोकांचा तो लिंकनसुद्धा दढियलच होता. तस्मात दाढी ही आपल्या थोरथोर मानवी संस्कृतीचा एक अति-अविभाज्य असा भाग आहे. अहो बाकी सोडा, लॉर्ड ऑफ द रिंग्जमध्ये ड्वार्फ बायकांनासुद्धा दाढी असते असे सांगून टोल्किनसाहेबांनी जो दिलदारपणा दाखवला आहे त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. असा दिलदारपणा फक्त पुरुषच दाखवू जाणे. दाढी बचाओ, संस्कृती बचाओ!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on Sun, 04/14/2013 - 20:04

Permalink

घोटून घोटून गुळगुळीत झालेला /

घोटून घोटून गुळगुळीत झालेला / ली ( विषय / दाढी ) अवांतरः
यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा.
अगदी अगदी !! कित्ती नै बिच्चारे पुरुष !! पुरुषांना किनै कित्ती कित्ती महत्वाची कामं असतात... अखिल जगाच्या राजकारणाचा विचार / त्यावर वाद करणे, स्पोर्ट्स चॅनल सतत बघणे, त्यावर चर्चा करणे ( हमरी तुमरी वर येईपर्यंत !), मित्रांबरोबर बसून ( याला वयाची अट नाही ) दारू पिऊन कधिकाळी झालेल्या प्रेमभंगाच्या त्याच त्याच गोष्टी उगाळणे वगैरे वगैरे ( येथे मिपा परंपरेप्रमाणे 'वैग्रे' लिहीण्याचा मोह कमालीचा संयम राखून टाळला आहे).... एव्हढ्या महत्वाची कामं असताना कशाला बै उग्गाच दाढी करत बसायची आणि वेळ वाया घालवायचा. वर कुणीतरी लिहील्याप्रमाणे सिक्स पॅक अ‍ॅब्स असतील तर एकवेळ आम्ही खुंट चालवूनही घेऊ एखादेवेळेस पण इथे हे ही नै अन तेही नै असं नै बै चालायचं !!! स्वगतः सुते आता पळ !! प्रतिसादावर मिपाकरांच्या उड्या पडणाच्या आधीच...
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Sun, 04/14/2013 - 22:49

In reply to घोटून घोटून गुळगुळीत झालेला / by इन्दुसुता

Permalink

प्रतिसाद आवडला

मित्रांबरोबर बसून ( याला वयाची अट नाही ) दारू पिऊन कधिकाळी झालेल्या प्रेमभंगाच्या त्याच त्याच गोष्टी उगाळणे वगैरे वगैरे
तशा मैत्रिणी नाही का एकमेकींना कधी आपल्या मागे किती जण आणि कोण कोण होते याची कधी चर्चा करत?
वर कुणीतरी लिहील्याप्रमाणे सिक्स पॅक अ‍ॅब्स असतील तर एकवेळ आम्ही खुंट चालवूनही घेऊ एखादेवेळेस पण इथे हे ही नै अन तेही नै असं नै बै चालायचं !!!
रेसिप्रॉसिटी महत्त्वाची. पुरुषांनी सिक्स पॅक ऍब ठेवायचे तर स्त्रियांनी झीरो फिगर नको का ठेवायला? दोघांनीही ते मेंटेन केलं तर एकमेकांच्या कित्ती कित्ती कमतरता स्वीकारल्या जातील याची कल्पना करून हृदय भरून आलं. एकूणात काय, घरोघरी मातीच्याच चुली. :)
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on Mon, 04/15/2013 - 06:03

In reply to प्रतिसाद आवडला by राजेश घासकडवी

Permalink

रेसिप्रॉसिटी महत्त्वाची.

रेसिप्रॉसिटी महत्त्वाची.
:D
एकूणात काय, घरोघरी मातीच्याच चुली. smiley
:D :D
  • Log in or register to post comments

Submitted by तर्री on Sun, 04/14/2013 - 22:25

Permalink

पुरुष जमाती वरील अन्याया विरुद्ध आवाज उठवणारा धागा .

माझी दाढी आणि "इकडून होणाऱ्या हिणकस कॉमेंटस् ऐका : १. गुळगुळीत दाढी + आफ्टर शेव - कोण भेटणार आहे आज . २. एक दिवसाची दाढी - खुंटे साहेब तसेच जाणार का ? ३. दोन दिवसाची दाढी - जोगेंद्र कवाडे आले . ( कृपया हलकेच घ्यावे ) ४. ३ दिवसाची दाढी - घरगुती शेखर कपूर दिसतोय. ५. ४ दिवसापेक्षा जास्त दाढी - अस्वल्या / दाढी दीक्षित .
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग_जोशी on Mon, 04/15/2013 - 07:02

Permalink

लेखनाच्या भावनेशी सहमत

समयोचित लेखन आवडले. मी स्वतः केवळ सोमवारी सकाळीच दाढी करतो. इतर दिवशी गरज वाटल्यास केवळ मिशीला आकार द्यायचे काम करतो. विकांताला कार्यक्रमाला अथवा कुणाकडे जायचे असल्यास किंवा कुणाला घरी बोलावले असल्यास तेवढा दाढीचा दिवस बदलतो त्या आठवड्यापुरता.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com