Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by राजेश घासकडवी on Sat, 04/13/2013 - 22:09
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विरंगुळा
पुरुषांचे काही खास प्रश्न असतात. त्यांच्या जिव्हाळ्याचे काही विषय असतात. बहुतकरून स्त्रियांना त्यांच्यात रस असतोच असं नाही. आणि काही विषय तर स्त्रियांना लागूच होत नाही. त्यामुळे अशा विषयांवर स्त्रियांचे प्रतिसाद कितपत ग्राह्य धरावे हा प्रश्नच पडतो. तरी पुरुष आयडींनी मनमोकळेपणाने प्रतिसाद द्यावेत ही विनंती. आता तुम्ही म्हणाल, की असं काय आहे जे पुरुषांना असतं आणि स्त्रियांना नसतं? उत्तर सोपं आहे - दाढी. किंबहुना एका प्रसिद्ध मनोवैज्ञानिक सिद्धांतानुसार अनेक तरुणींना बीअर्ड एन्व्ही निर्माण होते त्यामुळे ती कमतरता झाकण्यासाठी त्या पुरुषांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. ठरलेल्या भेटण्याच्या ठिकाणी बॉयफ्रेंडला पाउण तास ताटकळवणं हे त्याच बिअर्ड एन्व्हीमधून येतं. दररोज दाढी करायला लागणं हा पुरुषजातीला मिळालेला शाप आहे. पण एके काळी असं नव्हतं. आपल्या संस्कृतीत दाढीला प्रचंड महत्त्व होतं. सर्व ऋषिमुनी पांढऱ्याशुभ्र दाढ्या राखून असायचे. द्रोणाचार्य, भीष्म वसिष्ठ वगैरे लोकांची आपल्याला दाढीशिवाय कल्पनाच करता येत नाही. किंबहुना विश्वामित्र वगैरे मंडळी आपल्या लांबलचक दाढ्या सावरून तपश्चर्येला बसली की इंद्राचं स्वर्गातलं आसन डळमळायला लागायचं. मग तो मेनकेसारख्या कोणालातरी ती तपश्चर्या भंग करायला पाठवून द्यायचा. आणि ती मेनकाही मनोभावे सेवा करायची. विश्वामित्रच दाढी हलवत तिने पुढे केलेलं पोर 'हे माझं नाही' म्हणून मान हलवायचा. ते फारसं महत्त्वाचं नाही. सांगायचा मुद्दा असा आहे की सुंदर स्त्रियांवर प्रभाव पाडण्यासाठी पूर्वी दाढी करण्याची गरज पडत नसे. अलिकडच्या काळात (म्हणजे गेल्या चारेकशे वर्षांत) दाढी ही राजांची निशाणी असायची. शिवाजी महाराजांना सुंदर दाढी होती. सर्व मुघल बादशहांना दाढ्या होत्या - एक अकबर सोडला तर (संदर्भ - जोधा अकबर हा अविस्मरणीय चित्रपट. खासकरून त्यातल्या अकबराच्या शरीरप्रदर्शनासाठी) रामदास, गुरु नानक यांना दाढ्या होत्या. मात्र ब्रिटिशांचं राज्य आलं आणि त्यांनी सगळ्यांच्या दाढ्या कमी केल्या. भारतीय जनतेला आर्थिक, सांस्कृतिक आणि मानसिक बाबतीत खच्ची करून टाकलं. आणि मग सर्वच क्षेत्रांमध्ये पाश्चात्यांचं अंधानुकरण सुरू झालं. देवानंद, राजेश खन्ना, कुमार गौरव (तोच तो जो विजेता पंडित पेक्षाही गोग्गोड दिसत होता तो), आमीर खान वगैरे सर्व चॉकोलेट हिरोंनी गुळगुळीत चिकण्या चेहेऱ्यांनी तत्कालीन तरुणींच्या तोंडून "ऐय्या क्यवढा गोsssड आहे नाही! चो च्वीssssट." वगैरे उद्गार काढवून दाढी वाढवण्याची इच्छा असणाऱ्यांची स्वप्न वस्तऱ्यांनी छाटून टाकली. आता मात्र परिस्थिती बदलते आहे. चाळिशीत कॉलेजकुमारांची कामं करणारे, पोटं सुटलेले, त्वचा निबर झालेले, आणि एखाद्या तुपाच्या व्यापाऱ्याची असावी तशी शरीरयष्टी असलेले हिरो लयाला गेले आहेत. त्याजागी नवीन रफ ऍंड टफ, सिक्सप्याकवाले, तरुण हिरो आलेले आहेत. आपल्या जवळपास समवयस्क बाईला 'मॉं मै बीए पास होगया' म्हणणारे हिरो जाऊन भाईगिरी करणारे, बकाल वस्तीत फिरणारे, सतत दाखवता येतील असे बायसेप्स बाळगणारे हिरो आले. ही रांगडी प्रतिमा राखण्यासाठी अनेकांनी दाढीकडे एक पुनर्कटाक्ष टाकला. आणि जागोजागी स्टबल राखलेले, डोळे बारीक करून हिंस्र भाव डोळ्यात आणलेले हिरो दिसायला लागले (जागोजागी म्हणजे गल्लोगल्ली, वेबसाइटोवेबसायटी - शरीरावर वेगवेगळ्या जागी नाही). नुकत्याच मिपावर झालेल्या तुम्हाला कोण सेक्सी वाटतं या चर्चेत 'स्टबल ठेवणारे केवढे सेक्सी असतात, भुकेले वाटतात' वगैरे मतं स्त्रीवर्गाकडून मांडली गेल्याचं आठवतं. त्यामुळे स्टबल ठेवण्याकडे पुरुषांचा कल व्हायला लागलेला आहे. आठवड्यातून एकदाच दाढी करायला लागणं हा आणखीनच ऍडेड ऍडव्हांटेज. दररोज दाढी केल्याने गालावरची सुकुमार त्वचा खरवडली जाते. ज्या पुरुषांना आपल्या त्वचेची काळजी घ्यायची असेल त्यांच्यासाठी ही आपत्तीच ठरते. दररोज दिवसांतून पाच ते दहा मिनिटं दाढी करण्यात घालवल्याने वेळही वाया जातो. आजच्या धकाधकीच्या काळात जिथे दिवसातून मोकळा वेळ जिथे फक्त चारेक तास मिळतो, त्यातली पाच मिनिटंही घालवणं म्हणजे तीन टक्के आयुष्य फुकट घालवण्यासारखं आहे. तेव्हा अधूनमधूनच दाढी करणं केव्हाही चांगलं. एवढे सगळे फायदे असले तरी एक मोठा तोटा आहे - तो म्हणजे गर्लफ्रेंड किंवा बायको 'दाढी टोचते' म्हणून तक्रार करते. आपण रोमॅंटिक मूडमध्ये येऊन तिच्या जवळ जावं, तर ती गालावरून हात फिरवून खुंट कुरवाळते आणि लांब जाते. आणि दाढी केल्याशिवाय जवळ येऊ देत नाही. हा अनुभव सार्वत्रिक आहे. काही अपवाद असतील पण ते विरळा. एका बाजूने फॅशनची माध्यमं स्टबलधारी सेक्सी पुरुषांच्या चित्रांचा मारा करतात. आणि या पुरुषांची चित्रं कोण बघतं? तर स्त्रियाच. त्यामुळे एका अर्थाने त्याच या सवयीला जबाबदार आहेत. त्याचबरोबर सुकुमार त्वचेची निगा राखणं, वेळेची होणारी बचत, दाढीसामानाच्या खर्चावर होणारी बचत या सर्वच बाजूंनी विचार केला तरीही किंचित दाढी ठेवणं फायद्याचंच आहे. मात्र स्त्रिया दुटप्पीपणा करून एका बाजूने मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूने आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ते करण्यापासून वंचित ठेवतात. म्हणजे 'शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरात' अशी भूमिका ठेवतात. यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा.
  • Log in or register to post comments
  • 29133 views

प्रतिक्रिया

Submitted by मी_आहे_ना on Mon, 04/15/2013 - 09:53

Permalink

विषय दाढल्याबद्दल धन्स

गुर्जींनी विषय दाढल्याबद्दल धन्स :) आजकाल सकाळी (पहाटे पहाटे) लवकर ऑफिसची बस पकडता पकडता, आठवड्यातले ३-४ दिवस १० मिनिटे घालवून दाढी करणे म्हणजे अगदी नाकी नऊ (केस नव्हे हो...ते नाकापाशी राहात असतीलही गडबडीत नऊच...हीही) येतात, तेव्हा वॅक्स सारखा काही उपाय आहे का असा विचार येतो मनात. (वरती माऊताईने म्हणल्याप्रमाणे लेझर असेलही, पण महागडा असणार नक्कीच...आणि कधी दाढी वाढवायची तर लेझर नंतर शक्य नसावे) जाणकारांचे काय मत?
  • Log in or register to post comments

Submitted by नगरीनिरंजन on Mon, 04/15/2013 - 16:01

Permalink

दोन दिवसांच्या वाढलेल्या

दोन दिवसांच्या वाढलेल्या दाढीसारखाच बोचरा लेख. टू बिअर्ड ऑर णॉट टू बिअर्ड हा एक आदिम प्रश्न आहे आणि गुर्जींनी त्या प्रश्नाला आपल्या विचारांचा नवीन साबण लावून चर्चेचा फेस आणण्याचे महत्कार्य केले आहे. ज्या प्रमाणे मोराचा पिसारा फक्त लांडोरीला आकर्षित करण्यापुरताच असतो व त्याचा (म्हणजे पिसार्‍याचा) पुढच्या कार्यात काहीही सहभाग नसतो, त्याप्रमाणे पुरुषाची स्टबल ही फक्त आकर्षिण्याच्याच कामाची असते पुढच्या सत्कार्यात तिची (म्हणजे स्टबलची) अडचणच होते असे दिसते. किंबहुना पुढच्या टप्प्यात दाढी जाऊन त्याजागी लावलेले मंद आफ्टरशेव जास्त उपयुक्त ठरते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या बाबतीत अज्ञानी असलेल्या लोकांना
मात्र स्त्रिया दुटप्पीपणा करून एका बाजूने मागणी करतात आणि दुसऱ्या बाजूने आपल्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला ते करण्यापासून वंचित ठेवतात. म्हणजे 'शिवाजी जन्मावा तर शेजारच्या घरात' अशी भूमिका ठेवतात. यामुळे पुरुषमनाची जी कुतरओढ होते ती कळायला पुरुषाच्या जातीतच जन्म घ्यायला हवा.
असा अनुभव येतो. वापरण्याच्या व बघण्याच्या ह्या फरकातूनच "देखणी बायको दुसर्‍याची" या उक्तीप्रमाणेच "देखणी स्टबल दुसर्‍याची" हा अनुभव विवाहित पुरुषांना येतो, त्यात कुतरओढ (अश्लील! अश्लील!! म.सं.म. इकडे लक्ष देतील काय?) करून घेण्यात हशील नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Mon, 04/15/2013 - 18:37

Permalink

माझा मुळात काही विषय फक्त

माझा मुळात काही विषय फक्त स्त्रियांचे आणि काही फक्त पुरुषांचे या संकल्पनेलाच विरोध आहे. अगदी "दाढी करणे" हा ही! दाढी कशी करावी, कशी करू नये या बाबतीत बायकांनीही का सांगु नये? (किंबहुना बायकांनीच सांगावे. या निमित्ताने बाय्कांना (अपवाद असतीलच पण) साधारणतः नक्की काय - पक्षी कश्या प्रकारची दाढी ठेवलेली/भादरलेली आवडते हे तरी कळेल ;) नाहितर प्राडॉच्या म्हणण्यावर भरवसा ठेऊन हे बायकांना आवडेल अशी आशा धरावी लागेल ;) - प्रा.डॉ. ह घ्यालच ) परदेशात स्त्री न्हावी असलेली बघितलीच नाही तर तिच्यासमोर प्रसंगी डोके झुकवले आहे. तेव्हा याही विषयात एखादी जाणकार बाई असेलही कोणी सांगावे!? (अर्थात हेच उलट 'तथाकथित' स्त्री-विषयांना लागू)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 04/15/2013 - 18:50

In reply to माझा मुळात काही विषय फक्त by ऋषिकेश

Permalink

पटले नाही

अर्थात हेच उलट 'तथाकथित' स्त्री-विषयांना लागू
ह्याचे एक उदाहरण द्या राव ... असं नसतं हो , पुरुषांच्या समस्यांवर बायका बोलल्या म्हणुन पुरुषांना वाईट वाटत नाही ..ते बिचारे ठिक आहे असे म्हणुन सोडुन देतात ....तसं बायकांचं नसतं ... आमच्या ओळखीतल्या एका मुलीने पळुन जाऊन लग्न केले अन ६व्या महिन्यात पाळणा हालला सगळ्या बायका प्री मॅचुअर बेबी प्री मॅचुअर बेबी काळजी घ्यायला लागणार अशी चर्चा करत होत्या अन ह्याच विषयावर मी पुरुषी मत मांडले तेव्हा मार खाता खाता वाचलो होतो ... असो तर तात्पर्य : बायकांना स्वतंत्र विभाग असु द्यावा ... रमु दे बिचारींना त्यांच्या विश्वात =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/15/2013 - 18:54

In reply to पटले नाही by प्रसाद गोडबोले

Permalink

+११११११११११११११११.

+११११११११११११११११. खिलाडूवृत्ती आणि बायका हे दोन विरुद्धार्थी शब्द/घटक आहेत. अन हे सांगितले तर जाण समज वगैरे काढतात. तो एकूणच मूर्खागमनी प्रकार असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 04/15/2013 - 19:04

In reply to +११११११११११११११११. by बॅटमॅन

Permalink

+११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

आणुभव
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 19:22

In reply to +११११११११११११११११. by बॅटमॅन

Permalink

टिपिकल पुरुषी मत. ज्याला

टिपिकल पुरुषी मत. ज्याला कुठलाच आधार नाही
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/15/2013 - 19:26

In reply to टिपिकल पुरुषी मत. ज्याला by पिंपातला उंदीर

Permalink

हे अनुभवांती बनलेले मत आहे,

हे अनुभवांती बनलेले मत आहे, जाल आणि प्रत्यक्ष संभाषण अशा दोहोंचा त्याला आधार आहे. पण तुमची गैरसोयीचे सत्य बघण्याची तयारी नसेल तर त्याला इलाज नाही. शेवटी ज्याची त्याची जाण समज वगैरे आहेच.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 20:16

In reply to हे अनुभवांती बनलेले मत आहे, by बॅटमॅन

Permalink

सरसकट सरसकटीकरण करणे वैइगेरे

सरसकट सरसकटीकरण करणे वैइगेरे आहेच आणि . वैयक्तिक sample survey वर मत थैय्यर करायची तर सगळे दलित भ्रष्टाचारी, सगळे मुसलमान दहशतवादी आणि सगळ्या बायका कटकट करणार्‍या हे आहेतच, तुमची समज वैइगेरे कळली. तुमच्या सहज सरसकटीकरणाना आपला सल्यूट
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/15/2013 - 21:51

In reply to सरसकट सरसकटीकरण करणे वैइगेरे by पिंपातला उंदीर

Permalink

पुलंनंतर महान विनोदी काय ते

पुलंनंतर महान विनोदी काय ते एकटे तुम्हीच बघा. तुमच्या या विनोदाला आपला एक कडक(पहिल्या धारेचा) लाल(करण्याबद्दल) सलाम. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 21:54

In reply to पुलंनंतर महान विनोदी काय ते by बॅटमॅन

Permalink

फालतू उत्तर देण्यापेक्षा काही

फालतू उत्तर देण्यापेक्षा काही सांख्यिकी विदा दिलात तर बरे होईल. वैयक्तिक कॉंप्लिमेंट्स द्यायला तुम्ही इथे येत असाल मी नाही
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/15/2013 - 22:00

In reply to फालतू उत्तर देण्यापेक्षा काही by पिंपातला उंदीर

Permalink

सत्य झोंबलेले दिसतेय. असो.

सत्य झोंबलेले दिसतेय. असो. माझ्या मताचे खंडन तुम्ही केले, सबब विदा तुम्ही द्या. मी माझे निरीक्षण सांगितले, फुक्कट फालतू गोष्टींचा सर्व्हे करायची आपली इच्छा नाही. बाकी तुमचे मिपावर येण्याचे प्रयोजन काय हे न सांगितले तर अजून बरे. वाचनश्रम वाचतील.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 22:06

In reply to सत्य झोंबलेले दिसतेय. असो. by बॅटमॅन

Permalink

घेऊ पण नका श्रम. तुमचा आइडी

घेऊ पण नका श्रम. तुमचा आइडी मला या तुमच्या बाष्कळ विधान येण्यापूर्वी माहीत पण नव्हता त्यामुळे तुमचा इथे येण्या मागचा उद्देश वैइगेरे गोष्टी मध्ये अजिबात रस नाही हे स्वाभाविक पणे आलेच
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/15/2013 - 22:09

In reply to घेऊ पण नका श्रम. तुमचा आइडी by पिंपातला उंदीर

Permalink

श्रम घेऊ नका वगैरे तुम्ही

श्रम घेऊ नका वगैरे तुम्ही सांगणे गरज नाही. खंडन तुम्ही केलेत, सबब तुमच्या विधानास पूरक विदा तुम्ही द्या. बाकी कुणाचा आयडी कधी माहिती झाला याबद्दल एक बाष्कळ लेखमाला लिहिली तरी हरकत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 22:12

In reply to श्रम घेऊ नका वगैरे तुम्ही by बॅटमॅन

Permalink

प्रस्ताव चांगला आहे. लेखी

प्रस्ताव चांगला आहे. लेखी अर्ज केलात तर विचार केल्या जाईल. : )
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Mon, 04/15/2013 - 22:12

In reply to फालतू उत्तर देण्यापेक्षा काही by पिंपातला उंदीर

Permalink

फालतू उत्तर देण्यापेक्षा काही

फालतू उत्तर देण्यापेक्षा काही सांख्यिकी विदा दिलात तर बरे होईल.
मूर्खपणा मोजण्याचे परिमाण व बेंचमार्क सांगता का? सॅंपल सर्व्हेसाठी पूर्वतयारी चालू करावी म्हणतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 22:14

In reply to फालतू उत्तर देण्यापेक्षा काही by अन्या दातार

Permalink

तुम्ही कशाला त्रास घेता?

तुम्ही कशाला त्रास घेता? तुम्हाला झेपायचे नाही : )
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Mon, 04/15/2013 - 22:16

In reply to तुम्ही कशाला त्रास घेता? by पिंपातला उंदीर

Permalink

हॅ हॅ हॅ

भले मी सर्व्हे पूर्ण करण्याचा त्रास घेणार नाही; पण निदान दोन गोष्टी (मूर्खपणाचे परिमाण व बेंचमार्क) तरी कळतील. तेवढीच ज्ञानात भर! काय म्हणता?
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 22:18

In reply to हॅ हॅ हॅ by अन्या दातार

Permalink

हे बर बोललात : )

हे बर बोललात : )
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 04/15/2013 - 22:18

In reply to हॅ हॅ हॅ by अन्या दातार

Permalink

तुला काही व्यक्तींची उंची वजन

तुला काही व्यक्तींची उंची वजन वगैरे काही पाहिजे आहे का? मी ५.४ आहे. वजन अम्मळ जास्त आहे. उदगीरकर तुमचं काय?
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 22:21

In reply to तुला काही व्यक्तींची उंची वजन by प्यारे१

Permalink

दुखार्या नसेवर हात ठेवला

दुखार्या नसेवर हात ठेवला प्यारे जी : (
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 04/15/2013 - 22:34

In reply to दुखार्या नसेवर हात ठेवला by पिंपातला उंदीर

Permalink

अर्रर्रर्र...

अर्रर्रर्र... अन्या सर्व्हे अपुरा राहणार काय? माझेच आकडे दे टाकून. असू दे. आपलेच आहेत उदगिरकर. :)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/15/2013 - 22:19

In reply to फालतू उत्तर देण्यापेक्षा काही by अन्या दातार

Permalink

आजूबाजूला पाहिले तर बर्राच

आजूबाजूला पाहिले तर बर्राच विदा हाती लागेल अन्याशेठ ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मालोजीराव on Mon, 04/15/2013 - 23:14

In reply to फालतू उत्तर देण्यापेक्षा काही by अन्या दातार

Permalink

धन्य आय आय टी वाल्यानु कश्यात

धन्य आय आय टी वाल्यानु कश्यात काय शोधाल...सांगतायेत नाय
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 21:59

In reply to पुलंनंतर महान विनोदी काय ते by बॅटमॅन

Permalink

सूपर हीरो चे नाव घेऊन इथे

सूपर हीरो चे नाव घेऊन इथे येणारे ९८.६७ % लोक बावळट असतात असा उद्या कुणी वैयक्तिक संभाषण आणि आजा वरच्या संभाषणावरून निष्कर्ष काढला तर
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/15/2013 - 22:02

In reply to सूपर हीरो चे नाव घेऊन इथे by पिंपातला उंदीर

Permalink

अगदी ९८ का १००% लोक बावळट

अगदी ९८ का १००% लोक बावळट असतात असे म्हणालात तरी मला काय त्याचे? कशाला फाट्यावर मारायचे हे आम्हाला व्यवस्थित कळते.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 04/15/2013 - 22:05

In reply to अगदी ९८ का १००% लोक बावळट by बॅटमॅन

Permalink

>>>कशाला फाट्यावर मारायचे हे

>>>कशाला फाट्यावर मारायचे हे आम्हाला व्यवस्थित कळते. अजूनपर्यंत 'नेमकेपणा' आलेला नाहीये. ;) (कशाला मारायचं कळलं तरी 'कधी' मारायचं ते नाही. :) ) हलके घ्या ब्या म्या शेट!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Mon, 04/15/2013 - 22:09

In reply to >>>कशाला फाट्यावर मारायचे हे by प्यारे१

Permalink

हम्म

हम्म :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 04/15/2013 - 20:24

In reply to टिपिकल पुरुषी मत. ज्याला by पिंपातला उंदीर

Permalink

कुठलाच आधार नाही>>> हा हा हा

अवांतर ० ) महाराष्ट्रात प्रीमॅचुअर बर्थ्स ५% पेक्षा जास्त नसणार हे मी पुराव्याने शाबीत करु शकेन ( इन्टुशन : प्रीमॅचुअर बर्थ्स मधे डेथ रेट प्रचंड जास्त असतो , आणि महाराष्ट्रात (किमान शहरी भागात ) इन्फन्ट डेथ रेट नक्कीच खुप कमी आहे ) . सोप्प्या शब्दात ती बेबी प्रीमॅचुअर बेबी असण्याची प्रोबॅबिलिटी फार्फार कमी आहे !! अवांतर १ ) टिपिकल बायकी मताला तरी काय आधार आहे हो ? असते एकेकाचे लॉजिक . अवांतर २ ) ह्या टीपिकल केस मधे त्या हिरोला आम्ही आधी पासुनच ओळखत होतो अन त्या पोरीलाही अवांतर ३) माझे अनुमान चुकीचे असु शकेलही कदाचित अगदीच नाही असे नाही ... पण त्याची शक्यता फारच कमी दिसत आहे .
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on गुरुवार, 04/18/2013 - 22:58

In reply to +११११११११११११११११. by बॅटमॅन

Permalink

अय्या होssssss??

अय्या होssssss??
  • Log in or register to post comments

Submitted by कवितानागेश on गुरुवार, 04/18/2013 - 23:10

In reply to अय्या होssssss?? by मस्त कलंदर

Permalink

ऐकावं ते नवलच!

ऐकावं ते नवलच! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 04/19/2013 - 00:44

In reply to अय्या होssssss?? by मस्त कलंदर

Permalink

:D

चला, माझी गॉसिप डबलची पार्टनर आली म्हटल्यावर मी मरायला मोकळी!
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Mon, 04/15/2013 - 20:29

Permalink

अहो ताई एक स्त्री असून तुम्ही

अहो ताई एक स्त्री असून तुम्ही असे बोलता. एका स्त्री ने अशी पर्सेप्षन्स मांडावीत ज्याला काहीच सांख्यिकी विदा नाही ; )
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Tue, 04/16/2013 - 00:30

In reply to अहो ताई एक स्त्री असून तुम्ही by पिंपातला उंदीर

Permalink

सांख्यिकी विदा

सांख्यिकी विदा
>>> ह्या मंत्राचा १३ माळा जप करायला वगैरे का सांगितलय हो तुम्हाला ?? डेटा आणुन द्या , १५ मिनिटात प्रुव्ह करु हे हायपॉथेसीस . पण हातच्या काकणाला आम्हालातरी आरसा लागत नाही =))
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 04/17/2013 - 12:31

In reply to सांख्यिकी विदा by प्रसाद गोडबोले

Permalink

+११११११११११११११११.

+११११११११११११११११. तुम मुझे डेटा दो, मैं तुम्हे हायपोथेसिस प्रॉव्ह कर के दूंगा =)) (सुभाषचंद्र महालानोबिस).
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Wed, 04/17/2013 - 13:54

In reply to अहो ताई एक स्त्री असून तुम्ही by पिंपातला उंदीर

Permalink

ताईच आहे याचा विदा

अहो ताई एक स्त्री असून
ताईच आहे याचा सांख्यिकी विदा आहे का ??
  • Log in or register to post comments

Submitted by पिंपातला उंदीर on Wed, 04/17/2013 - 14:47

In reply to ताईच आहे याचा विदा by कपिलमुनी

Permalink

गिरीजा नाव आहे ना ताई च/

गिरीजा नाव आहे ना ताई च/ काकूच
  • Log in or register to post comments

Submitted by राजेश घासकडवी on Wed, 04/17/2013 - 18:55

Permalink

अरेरे

खिलाडूवृत्ती आणि बायका हे दोन विरुद्धार्थी शब्द/घटक आहेत.
पुरुषांच्या प्रश्नांना हात घालणारा धागा अशासारख्या स्फोटक विधानांनी हायजॅक झालेला पाहून वाईट वाटलं. पुरुष विभागातल्या लिखाणात स्त्रियांविषयी विधानं टाळणं अशक्य असलं तरी 'स्त्रिया कशा अबक असतात' (अबक = अखिलाडू, अतिसंवेदनाशील, वगैरे वगैरे) या पातळीवर जाऊ नये अशी इच्छा आहे. सरसकटीकरण नेहेमीच चुकीचं असतं. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 04/17/2013 - 18:56

In reply to अरेरे by राजेश घासकडवी

Permalink

मुद्दा नोट केल्या गेला आहे.

मुद्दा नोट केल्या गेला आहे. ढिस्क्लेमर आणि अ‍ॅजम्प्शन्स सांगणे राहून गेले ;)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com