अखेर धमाल्याचं 'वाजवा रे वाजवा' वाजलं! :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
8 Jul 2008 - 10:41 pm

तर मंडळी,

आज सकाळीच शिवाजीनगर स्टेशण (भें.. शुलेची ऐशीतैशी!) व परिसरात 'मुंबईहून कुणीतरी बडी असामी येणार आहे बॉ!' अशी लोकांची चर्चा चालली होती. कारण डॉक्टर दाढे आणि पेठकर आपापल्या गाड्या घेऊन महामहीम तात्यासाहेब अभ्यंकरांना प्रेमाने उतरवून घ्यायला आले होते. हां, आता आपण आपलं स्वत:ला महामहीम वगैरे म्हणून घ्यायचं, अहो पण कसला आलाय डोंबलाचा महामहीम? या दीडदमडीच्या तात्याला त्या शिवाजीनगगर फलाटावरचं कुत्रंदेखील ओळखत नव्हतं! :)

तर ते असो.. !

ठरल्याप्रमाणे पेठकरशेठ, तात्या अन् डॉ प्रसाद दाढे काटा किर्र् मध्ये मिसळ खायला गेले. मिसळ बाकी खरोखरंच फसकिल्लास होती. मिसळीचे पैशे पेठकरशेठने दिल्यामुळे ती अजूनच फसकिल्लास लागली! म्हणतात ना, फुक्कट ते पौष्टिक आणि फुकट तिथे बापट! :)

त्यानंतर मला आणि प्रसादला पेठकरशेठ त्यांच्या घरी घेऊन गेले. तिथे पेठकर वहिनींनी फर्मास चाय पाजून आमचं आदारातिथ्य केलं! आमच्या पेठकरवहिनी म्हणजे खरंच अगदी साधी अन् सोज्वळ बाई हो! मी तर नेहमी एक स्वगत म्हणत असतो ते आत्ताही म्हणून घेतो,

"आमच्या डांबिस प्रभाकरला एवढी साधी अन् सोज्वळ बायको मिळाली तरी कशी? गेल्या जन्मी गंगेच्या कुठल्या किनार्‍यावर एका पायावर उभं राहून तप केलं होतन देव जाणे!" :)

तर ते असो...!

पेठकरांकडचं चहापाणी झाल्यावर आमची वरात मग धम्याच्या लग्नाच्या हॉलकडे वळली.

मिपावर गेले अनेक दिवस गाजत असलेलं धम्याचं लग्न अखेर थाटामाटात पार पडलं! आम्हा काही मिपाकरांच्या उपस्थितीमुळे त्या लग्नाला विशेष शोभा आली हे वेगळे सांगायला नको! (साला इथेही आमचीच लाल!) ;)

त्या लग्नाचा सचित्र वृत्तांत आम्ही येथे देत आहोत. हलकटसुमारांच्या, सॉरी, केशवसुमारांच्या या काथ्याकुटात यात्रीने हायलाईटस् दिलेच आहेत. सबब आता आम्ही येथे थोडसं विवेचन करून चित्रे देत आहोत....

१) धमाल्याला कुणीतरी लग्नाला आणत आहे! बहुतेक मुलीकडचे कुणीतरी असावेत. बळीचा बकरा हार-मुंडासं-मुंडावळ्या बांधून दिसतोय पाहा कसा! :)

२) रुखवत! मला त्यातली ती बैलाची जोडी असलेली बैलगाडी फार म्हणजे फारच आवडली बुवा! मस्तच होती...! :)

३) लग्नाला उपस्थित मिपाकर! (चेहेर्‍यावरून कोण सर्वात अधिक हलकट आहे ते ओळखा पाहू! पण जाऊ दे! नकाच चुकीचे अंदाज बांधू! आम्ही सगळे एकाच माळेचे मणी आहोत!) :)

डावीकडून - आनंदयात्री (याची हेयरष्टाईल आपल्याला जाम आवडली बॉ!), डॉ दाढे (एक सज्जन दंतवैद्य. आज मला पुण्यात एशी गाडीतनं फिरवल्याबद्दल तर फारच सज्जन अन् भला माणूस! :), फौजदारसाहेब नीलकांत, इनोबा, टकल्या विजूभाऊ, इंटिलिजंट (म्हणजे स्वत:ला तसं समजणारा!) मनीष, मास्तर, मिपावर वाट चुकलेला एक नमोगती चित्तोबा, पेठकरशेठ, हककट अन् बाईलवेडा कोकणी तात्या, आणि भाईकाकांचा सख्या गटणे!

४) आम्हा मिकाकरांसोबत पेठकर वहिनी. प्रभाकर पेठकर मिपावर ज्या छान छान पाकृ टाकतात, त्या वास्तविक त्यांच्या असतात. पेठकर मात्र मधल्यामध्ये भाव खाऊन जातात! :)

५ अ) श्री व सौ पेठकर, कुमार तात्या अभ्यंकर, व सखाराम गटणे - लक्ष्मी-नारायणाच्या जोड्यासमवेत ष्टेजवर!
धमाल्या, लेका हा फोटू जपून ठेव हो. अजून काही वर्षांनंतर लोक आश्चर्याने विचारतील, "अरे वा! तुमच्या लग्नाला साक्षात तात्या अभ्यंकर आले होते? तुम्ही कित्ती कित्ती लकी! :)

ब) यात डॉ दाढ्यांच्या शेजारी डोमकावळा उभा आहे! छत्रपतीही दिसतोय! :)

६) तेवढ्यात त्या हॉलमधली एक पुणेरी पाटी विजूभाऊंनी टिपली! :)

७) वदनी कवळ घेता, नाम घ्या श्रीहरीचे! आम्रखण्ड, गुलाबजामून, पुर्‍या, टोमॅटो सूप, मटकीची उसळ असा फर्मास बेत होता!

८) मंडळी जेवायला बसली आहेत! :)

९) आणि हा लाष्ट फोटू.. सखाराम गटणे आणि तात्या अभ्यंकर.

बराय तर!

आपला,
(वृत्तांतकार) तात्या अभ्यंकर.

समाजचित्रपटप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

8 Jul 2008 - 10:50 pm | विसोबा खेचर

सखाराम गटणे आणि तात्या अभ्यंकर.

हा माणूस आज ना उद्या माझ्या व्यक्तिचित्राचा विषय होणार हे नक्की! :)

प्राजु's picture

9 Jul 2008 - 12:08 am | प्राजु

तात्या,
तुमचा वृतांत एकदम छान. धम्याच्या लग्नाला उपस्थित राहल्यासारखेच वाटले. फोटो एकदम छान आले आहेत. धम्या आणि धमी मस्त दिस्ताहेत. एकदम सह्ही. धम्या अगदी सोज्वळ(????) नवरा वाटतो आहे (नसला तरी).
तात्या, किती आम्रखंड भरपूर खाल्लत की नाही? जेवणाचा बेत एकदम जबरा..
सगळंच कसं आता छान छान वाटतं आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

9 Jul 2008 - 12:20 am | मुक्तसुनीत

हेच म्हणतो ! डोळे निवले आमचे ! :-)

मदनबाण's picture

9 Jul 2008 - 2:28 pm | मदनबाण

हेच म्हणतो..

मदनबाण....

वरदा's picture

8 Jul 2008 - 10:57 pm | वरदा

शेवटी आला व्रुत्तांत.... धमी आणि धमु मस्तच दिसतायत....
ते जेवणाचं ताट पाहून भयंकर भूक लागली हो...का चिडवता....
तात्या तुमच्या ताटात अंमळ जास्तच श्रीखंड दिसतय्...मज्जा आहे बॉ..
सगळ्यांनी सॉलीड मजा केलेली दिसतेय्....मस्तच आलेत फोटो...
हा माणूस आज ना उद्या माझ्या व्यक्तिचित्राचा विषय होणार हे नक्की!
अरे वा मस्त व्यक्तिचित्र वाचायला मिळणार ढीन्चॅक ढीचॅक ढीन्चॅक ढीचॅक

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

II राजे II's picture

9 Jul 2008 - 9:51 am | II राजे II (not verified)

हेच म्हणतो !!!!

राज जैन
येथे काय लिहावे हेच सुचेनासे झाले आहे..... ब्रॅन्ड बदलावयास हवा आता

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jul 2008 - 11:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपाकर पाहवयास मिळाले आनंद वाटला. मिपाकरांचे सर्वच गृप फोटो आवडले.
( कुठे तरी दगडफेक करायला निघालेला टोळी वाटली तो भाग सोडून द्या ;) )
धमाल, धमी जोडी सुरेख आहे.
आणि सर्वात आवडला फोटो तो गटनेचा आणि तात्याचा.

तात्यासाहेब, सचित्र वृत्तांत कळवल्याबद्दल आभार !!!

छोटा डॉन's picture

8 Jul 2008 - 11:14 pm | छोटा डॉन

खरं सांगु तात्यानु, सकाळी आंद्याने तो "छोटा वॄत्तांत" टाकल्यावर व त्यात "तुमच्या फोटोवॄत्तांताचा उल्लेख" केल्यानंतर मी याची वाटच पहात होतो. आत्ताच मी आपल्याला खरड टाकणार होतो की "लोहा गरम आहे तेवढ्यात हातोडा" मारा पण आपण त्याआधीच लेख टाकलात. लै ब्येस केलात (आमचं पण त्या भें.. शुलेची ऐशीतैशीच!)

आता आपण आपलं स्वत:ला महामहीम वगैरे म्हणून घ्यायचं, अहो पण कसला आलाय डोंबलाचा महामहीम? या दीडदमडीच्या तात्याला त्या शिवाजीनगगर फलाटावरचं कुत्रंदेखील ओळखत नव्हतं!

=)) =)) =))
अरे बापरे ... असे झाले काय ?
आमच्या पुण्याच्या "कारभार्‍यांची" एकदा हजरी घ्यायला पाहिजे ...
खुद्द "महामहिम तात्यांची" बेअदबी म्हणजे काय ???

आयला "धम्या" त्या राजेशाही पोषाखात खराच "सरनौबत" दिसत आहे....
बेश्ट !!!!
बरं तेथे वरातीच घोडं नव्हते नाहीतर महाशय लगेच "मोहीमेवर" निघाले असते ...

बाकी प्रत्येकाची ओळख अप्रतिमच ...
आपण पण आंद्याच्या "हेअरस्टाईलला" मानतो ...

आम्हा मिकाकरांसोबत पेठकर वहिनी. प्रभाकर पेठकर मिपावर ज्या छान छान पाकृ टाकतात, त्या वास्तविक त्यांच्या असतात. पेठकर मात्र मधल्यामध्ये भाव खाऊन जातात!

असं आहे तर, ऐकतायं ना पेठकरकाका ???
कुणी का असेना, पाककॄती भारीच असतात !!!

धमाल्या, लेका हा फोटू जपून ठेव हो. अजून काही वर्षांनंतर लोक आश्चर्याने विचारतील, "अरे वा! तुमच्या लग्नाला साक्षात तात्या अभ्यंकर आले होते? तुम्ही कित्ती कित्ती लकी!

मस्त हो ... आवडले ...
धमाल्या, तुझ्या फोनवरचे रेकॉर्ड पण सेव्ह कर ....
पुढं मागं आत्मचरित्र लिहशील तर त्यात लिही की "माझ्या लग्नाच्या वेळी छोट्या डॉनाने आठवणीने फोन केला होता" ...
स्वगत : मार खाणार बहुतेक आता ...

पुणेरी पाटी टिपणार्‍या "विजुभाऊंसमोर" आम्ही केव्हाच हात जोडले आहेत ...

भरल्या ताटाच फोटो झकासच ...
[ इकडे आमचा जीव जळतो आहे पण त्याला पर्याय नाही. आता हे पाहिल्यावर पोटात "राईस - सांबार" कसे ढकलायचे हाच सध्याचा महत्वाचा प्रश्न. ]
पण ते पंगतीत थोडे काही तरी कमी वाटतेय, प्रत्येकाच्या ताटात "२-३ च जिलब्या" कशा ?
चांगला "ढिग" लावायचा ना जिलब्याचा ...
कार्यालय तर "पुणे-३०" मध्ये नव्हते, वाढणारे वाढपीही "पुणे - ३०" चे असण्याची शक्यता नाही मग अशी गोष्ट घडलीच कशी ?
धमाल्या आला नाही का "आग्रहाची जिलबी " वाढायला ???
[ नेहमीचेच, कॄपया ह. घ्या.]

बाकी मंडळी, तुम्ही खुप मजा केलीत ...
तुम्ही केलेली मजा पाहुन आम्हाला इकडे आनंद झाला.
"मिपाकरांचा असाच स्नेह वाढत राहो हिच विठुचरणी प्रार्थना"

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनिष's picture

8 Jul 2008 - 11:28 pm | मनिष

अरे जिलेबी नव्हती....आम्रखंड आणि गुलाबजाम हाणलेत आम्ही! :)
नंबर तपासून घे रे बाबा.. )

छोटा डॉन's picture

8 Jul 2008 - 11:33 pm | छोटा डॉन

अरे खरचं की, मला ते तात्यांच्या ताटात पसरलेले "आम्रखंड" म्हणजे "जिलबी" वाटले रे ...

असो "जिलबी" संमंधीत लिहलेली वाक्ये "ती तेथे नाहीत" असे समजुन उरलेले वाचावे ...
हा ना. नाहितर आमच्या "दिसण्याच्या क्षमतेबद्दल" आत्ता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. उद्या बाकीचे "महाभाग" मला "आंधळा" म्हणून जाहीर करुन टाकतील ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

यशोधरा's picture

8 Jul 2008 - 11:15 pm | यशोधरा

छान आलेत फोटो सगळेच!! मजा केलीत तर!! :)

मेघना भुस्कुटे's picture

9 Jul 2008 - 6:43 am | मेघना भुस्कुटे

खरंच जाम धमाल आली असणार! मस्त फोटो, तात्या.

संजय अभ्यंकर's picture

8 Jul 2008 - 11:23 pm | संजय अभ्यंकर

तात्या,

वृतांत लै भारी दिलायत राव!
एवढी पक्वाने हादडलीत, आयला आमच्या तोंडाल पाणी सुटले.
(मटकीची उसळ सुद्धा लै पेशल दिसली)

सध्या बंगळूरास आहे. हे पदार्थ येथे कोठुन मिळणार?
मुंबईस आल्यावर धाड टाकतो.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मनिष's picture

8 Jul 2008 - 11:25 pm | मनिष

मी कधी 'इंटे..." जे काय असेल ते...त्याचा दावा केल तात्यानु????????

(सुमार आणि सामान्य) मनिष

शितल's picture

8 Jul 2008 - 11:32 pm | शितल

धम्याच्या लग्नाला धमाल करून आलात तर. :)

टारझन's picture

8 Jul 2008 - 11:39 pm | टारझन

तात्यानू.... फोटोसकट समिक्षेबद्द्ल मंडळातर्फे हार्दिक धन्यावाद.. सगळेच फोटो जबरा....(थाळी अंम्मळ सहीच)
सर्वांना चापताना पाहून आनंद .. आणि पुण्यात नसल्याने भेट न झाल्याचे दु:ख....
आपण धमूस आम्हा मिपाकरांकडून शूभेच्छा दिल्या असतीलच.....
सखाराम गटणे ने खर्‍या गटण्याच्या व्यक्तिमत्वाची बरोबरी केलीये...

(ग्रूप फोटो पाहून कुठल्याही मासिकात , चोरट्या अफूची आयात करणारी टोळी- हे पुलंचे बोल आठवले.)

कु.ख.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

केशवसुमार's picture

9 Jul 2008 - 12:00 am | केशवसुमार

(ग्रूप फोटो पाहून कुठल्याही मासिकात , चोरट्या अफूची आयात करणारी टोळी- हे पुलंचे बोल आठवले.)
खविसशेठ
जबरा... एकदम चफखल....
:)) :)) :)) :)) हा हा हा हा हा खो खो खो खो =)) =)) =)) पडलो..

केशवसुमार's picture

9 Jul 2008 - 12:09 am | केशवसुमार

असे पक्वांनाने भरलेले ताट बघायचे आणि नंतर मॅगी आणि बनपाव खावा लागणे ह्याच्या सारखा दुसरा करेंटेपणा नाही
(करंटा रेशिडेंट जर्मन)केशवसुमार :''(
स्वगतः तात्याशेठ, प्रकाशचित्रे उत्तम आणि वर्णनही..धन्यवाद

मैत्र's picture

9 Jul 2008 - 12:31 am | मैत्र

वृत्तांत ...
पुणेकर असून महामहिम तात्या अभ्यंकर आणि मि पा परिवारा बरोबर धम्याच्या लग्नात धमाल करण्याची संधी हुकली..
त्यात असं बेष्ट जेवण पण राहिलं राव ... आम्रखंड उसळ वडे ... मला वाटतंय माझ्या लग्नानंतर परत असं जेवण नाही झालं ... :(
पुढचा नंबर कोणाचा आहे विकेट जाण्याचा... पुण्यात लग्न करा राव... जरा दोन तीन महिन्यानंतर...

धम्या ... अभिनंदन !!

चित्रा's picture

9 Jul 2008 - 1:09 am | चित्रा

हवेत दिसते आहे.. नवे नवरानवरी छान!
नवर्‍या मुलाकडच्या जवळच्या नातेवाईकांना फेटा बांधण्याची मध्ये सुरू झालेली परंपरा अजून जारी आहेसे दिसते आहे!
छान आले आहेत फोटो! आणि थाळ्याही स्टीलच्या जाऊन रंगीबेरंगी कधीपासून झाल्या? का हे आनंदमंगल कार्यालयाचे विशेष?

आमच्या लग्नानंतर मला वाटते कुटुंबातील एकाही लग्नाला भारतात नव्हते, त्यामुळे बरेच काही जुनाट संदर्भ आहेत.

तात्या .....फार भुक लागली हो पन्चपक्वान्नपाहुन
मिपा वरच्या लोकास एकत्र पाहुन मजा आली. नागपुरात असताना अशा कित्तीतरी लग्नात मेजवान्याचा फडशा उडविला होता. माहित नाही पुन्हा केव्हा परत अशा पन्गतीत जेवायला मिळेल.
अमेरीकी मनची उवाच.....नशीबाचा खेळ आणखीन काय?
मला तर स्वप्नातही भुक लागते.... :/

धामधुमीतून वेळ काढून धम्या आणि धमी तुमच्यासर्वांसोबत एकदम सजधजके छान दिसताहेत. (मनमोकळेपणाने हसणार्‍या धमीच्या शेजारी धम्याच्या चेहेर्‍यावरचे उसनं हसू बरंच काही सांगून जातंय! ;) आता कसं हायसं वाटलं, फार मज्जा करत होतास नाही का एकटा-एकटा? आता भोग आपल्या लग्नाची फळं)

चापा लेको आम्रखंड अन गुलाबजाम! =P~

तीन नंबरच्या फोटोतली 'सोनेरी टोळी' आपल्याला जाम आवडली बाबा! (स्वगत - तात्यांच्या 'भारदस्त व्यक्तिमत्त्वाचा' परिणाम हळूहळू बर्‍याच जणांवर होऊ लागलाय असे दिसते! :D )

विजूभाऊंनी टिपलेल्या पाटीबाबत काय बोलावे? ते येणार म्हटल्यावर, "विजूभाऊ येणार आहेत, कृपया कोणत्याही पाट्या लावू नयेत. त्यांनी फोटू काढल्यास आम्ही जबाबदार नाही!" अशी पाटी लावायची काळजी कार्यालयवाल्यांनीच घ्यायला नको का?

आणि शेवटी सखाराम गटणे ह्या प्राण्याचे दर्शन झाले व माझ्या इतक्या दिवस तुंबलेल्या उत्सुकतेच्या मोरीचा बोळा निघून मला हायसे वाटले! ;)

(स्वगत - सकाळी सकाळी काटाकिर्र मिसळ चापून झाल्यानंतर माझ्याशी थेट बोस्टनला फोनवर बोलल्याचे लिहायला तात्या विसरलेले दिसतात? हम्म्म्म्म्..चालायचंच, रंगा आतातरी जमिनीवर ये!)

चतुरंग

संदीप चित्रे's picture

9 Jul 2008 - 3:00 am | संदीप चित्रे

धन्स तात्या ... एकदम देशवारी घडवलीस..
माझं स्वातंत्र्यही अकरा वर्षांपूर्वी आनंद मंगल इथेच संपलं :)
------
मिसळ कुठे खाल्लीत? 'काटा किर्र' हा प्रकार कुठे आहे पुण्यात ?
--------
(बरेच दिवसा पुणे वारी न झाल्याने उत्सुक) संदीप

वेदनयन's picture

9 Jul 2008 - 3:03 am | वेदनयन

आम्रखंड आणि गुलाबजाम पाहुन आमचे थोबाड उघडले एकदाचे. अभिनंदन

धम्या आणि धमीला घेऊन "धुम-४" चित्रपट काढुया का?

गणा मास्तर's picture

9 Jul 2008 - 5:55 am | गणा मास्तर

फोटो लय झकास! थाळी पाहुन भुक लागली. मस्त मजा केलेली दिसते.
तात्या वर्णन जबरा केले आहे.
आणि शेवटी सखाराम गटणे ह्या प्राण्याचे दर्शन झाले व माझ्या इतक्या दिवस तुंबलेल्या उत्सुकतेच्या मोरीचा बोळा निघून मला हायसे वाटले काय लिहिलय झकास.-

विसोबा खेचर's picture

9 Jul 2008 - 8:52 am | विसोबा खेचर

तीन नंबरचा फोटू - चोरट्या अफूची विक्री करणारी टोळी!- हा हा हा.. :)

बाकी, तीन नंबरच्या फोटूतले अर्धेअधिक लोक हे चेहेर्‍यावरून मोटर वाहन कायदा कलम १८५ चे आरोपी वाटताहेत! :)

तात्या.

चाणक्य's picture

9 Jul 2008 - 9:38 am | चाणक्य

वृत्तांत वाचून आणि बघून लग्नाला न आल्याची हुरहुर वाटली राव. छ्या...!

सागररसिक's picture

9 Jul 2008 - 9:50 am | सागररसिक

पुन्या मधे असुन येता अले नहि. असु दे फोतो मस्त अहेत

आनंदयात्री's picture

9 Jul 2008 - 10:18 am | आनंदयात्री

>>आनंदयात्री (याची हेयरष्टाईल आपल्याला जाम आवडली बॉ!),

धन्यवाद धन्यवाद !

(फोटोत आम्ही काय नीट पोझ घेउन उभे नाय र्‍हायलो बॉ :( )

मनस्वी's picture

9 Jul 2008 - 10:22 am | मनस्वी

तात्या, वृत्तांत वाचून लग्न अटेंड केल्याचा फील आला एकदम. श्री व सौ धमाल मस्तच दिसत आहेत! गृप फोटोही झकास आणि श्रीखंड पुरीचा बेतही फर्स्टक्लास!
हो.. आणि पुणेरी पाटीही नंबर १.

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

नंदन's picture

9 Jul 2008 - 2:32 pm | नंदन

अगदी असेच म्हणतो :). भरलेल्या ताटाचा आणि ग्रूप फोटो मस्तच.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

झकासराव's picture

9 Jul 2008 - 11:41 am | झकासराव

.मनमोकळेपणाने हसणार्‍या धमीच्या शेजारी धम्याच्या चेहेर्‍यावरचे उसनं हसू बरंच काही सांगून जातंय! आता कसं हायसं वाटलं, फार मज्जा करत होतास नाही का एकटा-एकटा? आता भोग आपल्या लग्नाची फळं)>>>>>>>..
=))
तात्या सगळे फोटो आणि वर्णन छान. :)

...............
http://picasaweb.google.co.in/zakasrao

स्वाती राजेश's picture

9 Jul 2008 - 2:19 pm | स्वाती राजेश

तात्या, धन्यवाद,
बाकी फोटो आणि वृतांतावरून लग्नाला जाऊन आल्यासारखे वाटले...

धमु,धमी छान आहे रे....किती गोड हसते आहे...:)
बाकी मि.पा.च्या सदस्यांचे फोटो पण मस्तच...

विजुभाऊंपासून आता पाट्या वाचवायला पाहिजेत, ते माझ्या घरी येणार असतील तर मी दारावरची नावाची पाटी लपवून ठेवेन..:))
काय माहिती, त्यातून नविन शोध लावतील आणि २-३ भागात वर्णन करून इतरांची करमणूक करतील?

आनंदयात्री's picture

9 Jul 2008 - 2:22 pm | आनंदयात्री

>>त्यातून नविन शोध लावतील आणि २-३ भागात वर्णन करून इतरांची करमणूक करतील?

हाण हाण तायडे !! पाट्याचे वर्णन करायला पण २-३ भाग .. भारीच =)) =))

वरदा's picture

9 Jul 2008 - 6:36 pm | वरदा

त्यातून नविन शोध लावतील आणि २-३ भागात वर्णन करून इतरांची करमणूक करतील
झक्कास्.... ते म्हणतील 'पाटी म्हणजे पाटी म्हणजे पाटी असते, पुण्यात आणि युरोपात खूपच वेगेवेगळी असते'
विजुभाऊ ह.घ्या. हे सा न लगे
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

प्रभाकर पेठकर's picture

18 Jul 2008 - 10:32 pm | प्रभाकर पेठकर

धमाल मुलाच्या लग्नात खूप मजा आली. तो स्वतः म्हणाला नाही, पण त्यालाही आली असावी.
तात्यांनी फोटो मस्तच टाकले आहेत.
माझ्या आणि तात्यांच्या शेजारी धमाल मुलगा आणि त्याची चि.सौ.का. वधू म्हणजे अगदीच कायदा मोडून केलेला बाल-विवाह असल्यासारखे वाटते आहे.

आमच्या डांबिस प्रभाकरला एवढी साधी अन् सोज्वळ बायको मिळाली तरी कशी?

तात्या, उसके लिए जोहरीकी नजर होनी चाहिए।
हा: हा: हा: लग्नापूर्वी मलाही असेच (साधी अन् सोज्वळ) वाटले होते.