कधि कधि मी असतो A कधि कधि मी असतो B ॥
कधि कधि मी असतो पुस्तक,कधि कधि मी असतो फी॥धृ॥
नुस्ताच वर्ग,नुस्तिच बाकडी
नुस्त्या फळ्याला चौकट लाकडी...
मग मी होऊ पाहातो डस्टर,ऑफ तासांचा ब्लॉकबस्टर
सांगा कसा हा नवधर्म?आणी त्याचे धर्म विधी?॥१॥
शाळेत शिक्षक इकडे तिकडे,
यांचे विषय त्यांना वाकडे,घालती सारे देवाला साकडे
का झाले हे शिक्षक सारे?आधी ग्रह,नंतर तारे!
बि.ए. सोडुन दुसरा मार्ग,यांना परवडला होता का कधी?॥२॥
इथले विद्यार्थी,कोचिंगला जाती
घरचे सोडून,बाहेर खाती,इथल्यापेक्षा तिथेच जास्ती
कोचिंग क्लास का लागतात गोड,जणू जेवणातली लोणच्याची फोड..
कशी माणसावर मिळवते विजय?मेंदुपेक्षा मनातली भिती॥३॥
शाळा सोडून इतकी वर्षं, मनात अजुन दाटतो हर्ष
मला तिचा ,झालेला स्पर्श
आजही वाटतो हवाहवा,तेंव्हाचा 'तो' नवा नवा
फक्त पडतो एकच प्रश्न?आजही असेल का,'तो' अन् 'ती' ॥४॥
पर्वाच गेलो बघायला शाळा,तेच वर्ग तोच फळा
तीच दप्तरं तोच गळा
शाळेत होती तीच घंटा,कुणी द्यायची??? शिपायात तंटा
यावरून मला पटली खूण,अजुन शाळा आहे साधी॥५॥
आता माझं तान्हं कार्टं,कार्टं कसलं? साक्षात कोर्टं
तेच दप्तर तोच शर्ट
द्यायचं का मी,त्याला सांगा?तोवर जरा मनात थांबा
यातून सुटायचा नवा मार्ग,काढणारा शिक्षक मी देणार कधी??? ॥६॥
फि आणी पुस्तक,घट्ट नातं
नुसतच दळायच दगडी जातं
घरापेक्षा फुसकं जोतं
सांधू किती मी आतल्या फटी,छोटी झालीय मधली सुटी
हवं ते शिक्षण देणारी शाळा,आपल्यात उतरणार सांगा कधी???॥७॥
प्रतिक्रिया
12 Mar 2013 - 6:40 pm | प्रचेतस
वाह....!!!!.बुवा वाह.
हल्ली बरेच नॉस्टॅल्जिक व्हायला लागलात जणू.
बाकी ही कविता वाचून फळ्यावर लिहिली गेलेली अजरामर कविता आठवली आणि त्यावरचा हा तुमचा प्रतिसादपण.
13 Mar 2013 - 6:21 am | पाषाणभेद
तेच म्हणतोय,
बुवाचा बाबा होतोय की काय?
17 Mar 2013 - 1:59 am | मोदक
बुवाचा "बाबा" होतोय की काय?
श्लेष जमलाय! ;-)