कालच ७ वेळा टुर द फ्रांसचा विजेता लॅन्स आर्मस्ट्राँग याने सुरुवातीपासुनच परफॉर्मन्स एन्हॅन्सिंग ड्र्ग्ज घेतले याची कबुली दिली.
याआधी त्याने अगदी शपथेवर खोटं बोलुन झालेलं आहे.
मुलाखतीत त्याने तो जे प्रकार करत होता त्याविषयी तेंव्हा आपलं काही चुकतंय वगैरे वाटत नसल्याचं सांगितलं.
एक लिंक :
http://www.youtube.com/watch?v=QTHSFRndS1s
आता आमच्या डोक्यात एक किडा वळवळला की बहुतेक खेळाडु टिकुन रहायच्या आशेने असले कैतरी उद्योग करत असतात. क्रिकेट मधे मॅच फिक्सिंक होत होतं / आहे. पण क्रिकेटर्स डोपींग करत असतील का? अगदी लॅन्स आर्मस्ट्राँगसारख ब्ल्ड ट्रान्सफ्युजन वगैरे पर्यंत मजल नसली तरी कैतरी तं करतंच असतील. नै का?
मिपाकरांनी आपल्या अमुल्य मताची भर घालावी. आर्मस्ट्राँग अन क्रिकेटमधले शक्यता असलेले डोपिंग दोन्हीबद्दल.
प्रतिक्रिया
19 Jan 2013 - 8:36 am | अन्या दातार
सत्य समोर आल
19 Jan 2013 - 9:06 am | प्रचेतस
डोपिंगने गुणवत्तेत इतका फरक पडत असेल असे वाटत नाही. स्प्रिंटमध्ये पडतही असावा. परंतु टूर द फ्रान्स सारखी लांबलचक शर्यत, फूटबॉल, क्रिकेट, फॉर्म्युला वन यासारख्या शारीरीक क्षमतेचा कस पाहणार्या खेळांमध्ये सतत अग्रेसर राहणे हे उच्च गुणवत्तेशिवाय शक्य नाही. (तरी तज्ज्ञांच्या मतांच्या प्रतिक्षेत)
19 Jan 2013 - 10:27 am | वेताळ
डोपिंग मुळे फारतर थोड्या कालावधी करिता ताकत येत असेल पण ७ वेळा फ्रान्स सायकलिंग जिंकणे सोपे नाही. शारिरीक क्षमता,दुर्दम्य आत्मविश्वास आणि बलवत्तर नशीव ह्या बळावर त्याने हे यश मिळवले आहे.त्यामुळे त्याच्या बद्दल कधीच वाईट वाटणार नाही.औषधामुळे तारुण्य येत नाही.
19 Jan 2013 - 9:43 am | आनन्दिता
व्यक्तिशः मला लान्स आर्म स्ट्राँग खुप आवड्तो.. गेली कित्तेक वर्षे मी त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक बातमी फॉलो करतेय..
या ़काही दिवसातल्या बातम्या ऐकुन खुप निराशा झाली..
या सर्व गोष्टींमधे लान्स कडे एक वलयांकित खेळाडू म्हणून न पाहता एक साधा माणुस म्हणून पाहिले तर कुठेतरी असंही वाटून जात की,
जीवघेणा आजार, किमोथेरपीच्या काळातली ढासळलेली शारीरिक व मानसिक स्थिती, ऐनवेळी स्पॉन्सर्सनी दिलेला दगा, कोलमडलेली आर्थिक स्थिती, करियर अन् एकंदरितच भविष्याबद्दल ची अनिश्चितता अशा अत्यंत टोकाच्या व्यथा एखाद्याच्या आयुष्यात सतत थैमान घालत असतील तर कुठेततरी,काहीतरी चांगलं हाती लागावं म्हणून माणूस असले शॉर्ट्कट शोधत असेल का?
थोड्याशा श्रमाने मिळवलेली साध्यातली साधी गोष्ट पण माणसाला प्रिय असते. इथेतर प्रश्न एका खेळाच्या सम्राट्पदाचा होता.. त्यात अमेरिकेसारख्या देशात तुमचं वलय, पास्ट परफॉर्मन्सेस तुमच्या निवडीला मॅटर करत नसल्याले, त्या ने हा असला रस्ता धरला असावा.
या सगळ्यातून मला त्याने जे ़केलय ते योग्य आहे वगैरे म्हणायचं नाहीये.. बस एतकंच वाटतं की असले निर्णय घेण्यासाठी खेळाडूच्या स्वभावापेक्षाही तत्कालीन परिस्थिती जास्त जबाबदार असते.
19 Jan 2013 - 9:53 am | शिल्पा ब
तुमची काहीतरी चुक होतेय. त्याने करीअरच्या सुरुवातीपासुनच ड्र्ग्ज घेत असल्याचं सांगितलंय. सातही स्पर्धांच्या वेळी त्याने ब्लड ट्रान्सफ्युजन / ईपीओ सारखे प्रकार केल्याचं सुद्धा सांगितलंय. त्यानेच नाही तर लँडस अन हॅमिल्टननेसुद्धा ते सांगितलंय. त्यामुळे अगदी शेवटचा पर्याय म्हणुन केलेली धडपड नाही.
19 Jan 2013 - 12:31 pm | आनन्दिता
माझ्या माहिती नुसार, लान्स च्या सायक्लींग करियरची सुरुवात साधारणतः १९८७-८९ च्या दरम्यान झाली. काही छोट्या मोठ्या स्पर्धांच्या विजेतेपदापेक्षा जास्त त्याने तोपर्यंत तरी केलं नव्हतं.कारकिर्द सुराला लागाण्याच्या वयात म्हण्जे २४ व्या वर्षी त्याला कॅन्सर झाला..
त्याला कॅन्सर डिटेक्ट व्हायच्या आधी फक्त दोनदा (१९९३,१९९५साली)म्हणजे तो सधारण २१-२२ वर्षाचा असताना त्याने पहिल्यांदा टुर दि फ्रान्स मधे पार्टीसिपेट केलं. पण या स्पर्धा तो जिंकू शकला नव्हता. ११९६ साली त्याच्या कॅन्सर चं निदान झालं.
१९९९ साली त्याने पहिली टुर दि फ्रान्स जिंकली.त्याने जिंकलेल्या सातही टुर दि फ्रान्स या त्याच्या कमबॅक नंतर जिंकलेल्या आहेत.( साल ११९९ पासुन ते २००५ पर्यंत सलग सात वेळा)
19 Jan 2013 - 11:49 am | धन्या
काल परवापर्यंत या साहेबांचं पुस्तक बाजारात दिसायचं.
शेवटी कुणीतरी म्हटलंय तेच खरं, दुसर्या यशस्वी व्यक्तीचं चरीत्र किंवा आत्मचरीत्र वाचून आणि तसं वागण्याचा प्रयत्न करुन तुम्हीही त्या व्यक्तीईतकेच यशस्वी, प्रसिद्ध व्हाल किंवा त्याच्याईतकाच पैसा मिळवाल तर ते तितकंस़ खरं नाही.
कारण प्रत्येकाला मिळणार्या संधी, प्रत्येकाचा पिंड, आलेल्या प्रसंगांना सामोरं जायची कुवत, त्या व्यक्तीला पुढे जाण्यास साहाय्य करणार्या इतरही बर्याच तात्कालिक बाबी अशा बर्याच गोष्टी त्या व्यक्तीच्या यशाला कारणीभूत असतात.
19 Jan 2013 - 12:53 pm | ५० फक्त
मला तर त्याचं कॅन्सर होणं सुद्धा या कँम्पेनचाच एक भाग वाटु लागलं आहे आता. विशेषतः कॅन्सर असताना युवराज ज्या पद्धतीनं वर्ल्ड कपला खेळला आणि बरं होउन आल्यावर खेळला ते पाहुन.
का कॅन्सर हा घटसर्प आणि डिफिशियंशि ऑफ बि १२ सारखा चिल्लर रोग झाला आहे, काय माहित. ?
माझ्या शंकेखोर मनात एक गोष्ट नेहमी येते, हे असलं काहीतरी तेंडुलकरबद्दल ऐकायला मिळु नये कधी काळी.
21 Jan 2013 - 3:02 pm | बॅटमॅन
पिल्लू सोडलेच आहे तर मलापण आता तेच वाटायला लागलंय :(
21 Jan 2013 - 3:17 pm | इनिगोय
अगदी अगदी!
(..५०दादा आणि बॅटमॅनदादाशी सहमत)
22 Jan 2013 - 4:01 pm | बॅटमॅन
काय झालं इनिगोयदादी ;) =))
22 Jan 2013 - 6:20 pm | इनिगोय
सद्या हितं संदर्भासहित सपष्टीकर्णाचे दिवस सुरू हैत नं, नवन्व्या मंडळींचे (आणखी नवन्वे) गोंधळ उडायला नकोत, म्हणून सांगिटलं, इतकंच :P
19 Jan 2013 - 12:58 pm | आदूबाळ
"पुतळ्यांचे पाय मातीचे" हे टायगर वुड्स नंतर पुन्हा सिद्ध झालं.
बाकी वर वल्लीताईंचा प्रतिसाद वाचला. थोडक्या काळासाठी शारिरिक क्षमता वाढवणे क्रिकेटमध्ये पण उपयोगी ठरू शकतं. उदा. शोएब अख्तरसारख्या गोलंदाजाने डोपिंग करून ४-५ षटकं तुफानी वेगात टाकली, तर त्यात तो प्रतिस्पर्धी संघाचं प्रचंड नुकसान करू शकतो.
डोपींगने मानसिक क्षमता वाढते का नाही कल्पना नाही - पण आयपीएल मधल्या एखाद्या सलामीच्या फलंदाजाने (रात्रीच्या रंगीत पार्टीनंतर) एकाग्रता वाढवायच्या गोळ्या खाल्ल्या, तर त्याचा खेळही सुधारेल.
19 Jan 2013 - 12:59 pm | धन्या
हे वाचून ड्वाले पानावले.
19 Jan 2013 - 1:05 pm | आदूबाळ
आता माझेही पाणावले!
वल्लीदादा
मंडळ दिलगीर आहे!
19 Jan 2013 - 1:23 pm | प्रचेतस
वेगात इतका फरक पडेल असे वाटत नाही. फारतर १५० चा १५२/१५३ होऊ शकेल पण १७०/१८० होणे शक्य नाही, शिवाय अचूकता पण महत्वाची.
बाकी वल्लीदादा म्हटल्याबद्दल धन्स. :)
22 Jan 2013 - 1:35 am | मोदक
:))
19 Jan 2013 - 1:04 pm | टवाळ कार्टा
टायगर वुड्स ने डोपिंग नव्हते केलेले ;)
22 Jan 2013 - 3:56 am | एक
त्याने जे काही केलं (कितीही चुकीचं असलं तरीही) त्याचा त्याच्या खेळाशी किंवा खेळातल्या परफॉर्मन्स वाढीशी काहीही संबंध नव्हता.
डोपींग आणि अफेअर्स या वेगळ्या गोष्टी असाव्यात असं वाटतं.
-(टायगर वूडसचा पक्का फॅन) एक
22 Jan 2013 - 11:09 am | डॉ सुहास म्हात्रे
+ एक (हा शब्द आकडादर्शक नाही, सहमतीदर्शक आहे :) )
22 Jan 2013 - 11:16 am | डॉ सुहास म्हात्रे
+ एक (हा शब्द आयडीदर्शक नाही, सहमतीदर्शक आहे ;) )... वर टंकण्यात थोडा घोळ झालाय :(.
19 Jan 2013 - 1:52 pm | डॉ सुहास म्हात्रे
डोपींगमध्ये वापरली जाणारी तंत्रे मुख्यतः एकतर स्नायुंच्या काम करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करतात (स्टिरॉईड-बेस्ड औषधे) अथवा रक्ताच्या प्राणवायू वाहून नेण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ करतात (ऑटो ब्लड ट्रान्सफुजन) हे शास्त्रीय पद्धतीने सिद्ध झालेले आहे.
या गोष्टींना आक्षेप आहे तो मुख्यतः दोन कारणांमुळे:
(१) नैतिक : हे प्रकार वापरणार्या खेळाडूला मिळणारा अनुचित फायदा (unfair advantage) आणि त्यामुळे ते न वापरणार्या प्रामाणिक खेळाडूंवर होणारा अन्याय
(२) वैज्ञानिक: स्टिरॉईड व इतर काही औषधांच्या वापराने खेळाडूच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम.
ज्या प्रकारे अनुचित मार्गाने मिळवलेली संपत्ती / कॉपी करून मिळवलेले गुण / अनुचित प्रकाराने जिंकलेली निवडणूक ई. प्रकार निषिद्ध आणि त्याकरिता दंड आवश्यक समजला जातो; त्याच न्यायाने डोपिंग करून मिळवलेली बक्षिसे / मानसन्मान / प्रसिद्धी ई. गोष्टीही निषिद्ध व दंडास प्राप्त आहेत.
भावनेच्या भरात चुकून एकदा गुन्हा करणे वेगळे आणि गुन्ह्याचे हेतुपुरस्सर व्यवस्थापन करून त्याला विरोध करणार्यांना गैरप्रकाराने (बूलीईग, चारीत्र्यहनन, ई.) नेस्तनाबूत करण्याचे जे प्रकारही लान्सने केले आहेत ते वेगळे... आणि ते आता पाणी अगदी नाकाच्याही वर गेल्यावरच ओपरा समोर कबूल केले आहेत. असे वर्तन असलेल्या माणसाला सरळ शुद्ध मराठीत निर्ढावलेला गुन्हेगार म्हणतात.
लान्सच्या भूतकाळाकडे बघितले तर, "या कबूलीमागेही त्याचा काही डाव असावा" असा संशय काही जणांनी व्यक्त केला आहे, तो फार ओढून ताणून केलेला आहे असे वाटत नाही. ओपरासमोर बसून बोलतानाची त्याची बोलण्याची पद्धत व देहबोली याबाबत बरेच काही सांगून जाते.
लान्स कर्करोगग्रस्त आहे त्याबद्दल जरूर सहानुभूती असावी आणि आहे. पण त्यामुळे त्याने अनेक वर्षे हेतुपुरस्सर केलेल्या गुन्ह्यांना माफ करा असे म्हणणे रास्त आहे काय?
अजून एक हस्यास्पद मुद्दा काहीजण पुढे करतातः लान्सने केलेल्या धर्मदाय कार्यामुळे (Charity) त्याच्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करावे असा सांगितला जातो. असे केले तर त्याच न्यायाने भ्रष्टाचार घोटाळ्यांत दोषी असलेल्या अनेक भारतीय राजकारण्यांना त्यांनी चालवलेल्या धर्मदाय संस्थांच्या आधारावर माफ करायला काहीच हरकत नाही !!!???
20 Jan 2013 - 12:41 am | शिल्पा ब
ज्या खेळात दम राखणं महत्वाचं आहे जसं सायकलिंग, क्रिकेट, ऑलिंपिक्समधले काही प्रकार, स्विमींग वगैरे अशा खेळात इपीओ, टेस्टॉस्टेरॉन, ब्ल्ड ट्रान्सफ्युजन असे प्रकार केल्याने तुमचा फटीग डीले वाढतो. त्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो असं मी वाचलंय अन या कबुली दिलेल्या लोकांच्या मुलाखतीत ऐकलंय.
म्हणजे काय, अगदी मठ्ठ मुलाने/मुलीने कॉपी केली तर फारतर पासिंगचे मार्क मिळतील पण एखाद्या हुश्श्यार मुलाने/मुलीने कॉपी केली तर बोर्डात येईल. तोच फरक आहे.
बाकी या आर्मस्ट्राँगने स्वतः कबुली देउनसुद्धा त्याचे "फॅन" त्याने गुणवत्तेवरच जिंकलंय म्हणत असतील तर त्याची गंमत वाटते. त्याची मुलाखत पाहीली तर तीसुद्धा अती झाल्याने इमेज वाचवायचा शेवटचा प्रयत्न वगैरे एक खेळीच वाटते याच्याशी सहमत.
20 Jan 2013 - 12:47 am | बॅटमॅन
च्यायला अवघड आहे. अशा बातम्या येईपर्यंत वाटायचं कह दो ये झूठ है :( पण भवितव्यता बलीयसी :(
20 Jan 2013 - 1:26 am | अग्निकोल्हा
लॅन्स आर्मस्ट्राँग ला दंडवत. चिटींग करणे चुकच. मग ते केले असो वा घडले असो.... पण करुन सवरुन वरुन एव्हडं रॉक केलं म्हणजे जबराच माणुस दिसतोय हा.
20 Jan 2013 - 9:37 am | पैसा
सगळ्यांचे पाय शेवटी मातीचेच. त्याने आपणहून कबूल केलं, (जसं हॅन्सी क्रोन्ये ने केलं होतं) हे महत्त्वाचं. भारतात गुन्हे करणारा माणूस असं आपणहून कधी कबूल करतो का?
22 Jan 2013 - 1:47 am | रेवती
या गोष्टींमुळे कोणाचं लगेच कौतुक करायला आजकाल नको वाटतं. उगीच गळ्यात मेडल घालायचं आणि तासाभरात काढून घ्यायचं. अश्याने फक्त चाहत्यांचाच नाही तर एकंदरीत मोठ्या स्पर्धांवर विश्वास असलेल्या साध्या प्रेक्षकाचाही गोंधळ उडतो. माझ्यासारखे खेळाशी फारसा संबंध नसलेले तर आणखी लांब जातात.