बाँबे टॉकीज

मस्त कलंदर's picture
मस्त कलंदर in जनातलं, मनातलं
21 Oct 2012 - 5:35 pm

ऑफिसमधल्या बर्‍याच धामधुमीनंतर दोनेक दिवसांपासून थोडा रिकामा वेळ मिळाला. रिकामपणाचे उद्योगही खोळंबले आहेत, पण लॅपटॉपला अत्यंत प्रेमाने वागवल्यामुळे त्याने मुकेपण धारण केलं होतं. ( तरीही कानसेन कसंबसं निभावून नेलं खरं) त्यामुळे नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर बर्‍याच दिवसांचे पाहायचे पाहायचे म्हणून कित्येक दिवसांपासून ठेवलेले सिनेमे आधी पाहायचे ठरवलेयत. सकाळीच काही नवीन शोधावं म्हणून पाहात होते. खरंतर काल रात्री नाना पाटेकरचा कुठल्याशा मराठी मंडळातली जुनीपुरानी मुलाखत पाहून हा माणूस इतका शहाणा आहे, तर त्या फालतू हिंदी सिनेमांतून अतिफालतू भूमिका का करतो हा प्रश्न पडला होता. म्हणून पुन्हा एकदा नव्याने त्याचा 'माफीचा साक्षीदार' शोधत होते. तो मिळाला नाहीच, पण त्यानिमित्ताने दुसरेच सिनेमे डाऊनलोड झाले. 'बॉम्बे टॉकीज' बद्दल काही माहिती नव्हतं, पण 'गुलाबी टॉकीज'च्या नावाशी साधर्म्य आणि नावावरून काहीतरी चांगलं असेल असं वाटून तोही डाऊनलोड केला.

पाहायला सुरूवात केली. सर्वात आधी नट-नट्यांची नावं आली. शशी-कपूर जेनीफर म्हणजे चांगलाच असेल पण कदाचित समांतर देखील असू शकेल असं वाटलं. जस-जशा पुढच्या पाट्या येत गेल्या तेव्हा मात्र ज्या कुणी ही संकल्पना मांडली असेल त्याला दाद द्यावीशी वाटली. सिनेमा तब्येतीत पाहायचाय हे तेव्हाच नक्की झालं. त्यामुळे तो निवांतपणे पाहीन. सध्या फक्त तुम्ही या टायटल्सचा आस्वाद घ्या.

Bombay Talkies

Poster1

Poster1

हे वरच्या फोटोवरचे लाटांचे तुषार अगदी खतरनाक!

मला ही जागा काही ओळखता आली नाही. कदाचित इतकी रिकामी दिसत असल्याने असावी.

गेल्या आठवड्यालत्या लोकसत्तामध्ये टीव्ही कलाकारांना त्यांच्या मालिकेतल्या नावांनीच ओळखले जात असल्याने आणि एक संपली की लगेच दुसरी मालिका चालू करण्याच्या नादात वाहिन्या या अभिनेत्यांची नामावली गाळत असल्याचा लेख होता. मला वाटलं. की यांना निदान कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखलं तरी जातं. पण पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ यांसारखे लोक सर्वसामान्यपणे लोकांना माहितही होत नाहीत. अशा परिस्थितीत बॉम्बे टॉकीजची नामावली खरीच अभूतपूर्व (काही कॅरीकेचर्स पाहिलीयेत, पण बहुधा ती त्या-त्या त्ंत्र प्रकारातल्या लोकांची वाटतील अशी होती, त्यावरून हाच तो माणूस असं ओळखणं अवघड असावं.) म्हणायला हवी.

टीपः लेखातील सर्व छायाचित्रे व्हीएलसी प्लेअर मधील स्नॅपशॉट हा पर्याय वापरून काढलेली आहेत, आंतरजालावरून उतरवून घेतलेली नाहीत.)

कलाचित्रपटरेखाटनविचारआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

भीडस्त's picture

21 Oct 2012 - 5:50 pm | भीडस्त

आयड्या लयीच भारी ह्ये पघा.आवाल्डी.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Oct 2012 - 6:04 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद! या सिनेमाबद्दल ऐकलंय. बघून सांगा कसा आहे ते! :)

भारी बरं का! सिनेमा कसा असेल याची उत्सुकता वाटते आहे. मोकळ्या जागेचा फोटू पाहून आजकाल अस्वस्थपणा येतो. तिथे कहीतरी बांधकाम हवेच! ;) कदाचित रामदास ओळखू शकतील.

विलासराव's picture

22 Oct 2012 - 12:22 am | विलासराव

हि मोकळी जागा आहे ती चर्चगेटवरून सीएसटीकडे यायचा शॉर्ट्कट. फॅशन स्ट्रीट.
ती उंच बिल्डींग आहे व्हीएसएनएल बिल्डींग. जी नंतर टाटा ग्रुप ने घेतली बहुतेक.

धन्यवाद. तशी मुंबैची काही माहिती नाही पण एक दोनवेळा काकूच्या मागे लागून फ्याशन स्ट्रीटला म्हणून निघालो आणि तिसरीकडेच पोहोचलो ते आठवले. शेवटी दादरला ती घेऊन गेली खरेदी करायला. माझी आणि मुंबैची पत्रिका या जन्मी तरी जमणार नाही असे वाटते आहे.सेंट्रल, वेस्टर्न, हार्बर हे शब्द तर हिब्रु भाषेतले असावेत असे वाटते. ज्यांना यातले सगळे पटकन समजते त्यांचे कौतुक करावेसे वाटते.

अगदी बरोबरं ती उंच बिल्डींग आता टि सी एस ची आहे.. रोज तीच्या समोरुनच तर सीएसटी कडे बस ने जातो.

सहज's picture

21 Oct 2012 - 7:03 pm | सहज

आधीक शोध घेता ही ओपनींग क्रेडीटची थिम ही कल्पना सत्यजीत रे यांची होती असे दिसले.

पूर्वी काही सिनेमांना हिंदी-मराठी अनिमेशन असलेली ओपनींग टायटल्स असायची ती पहायला मजा यायची :-)

सहज's picture

21 Oct 2012 - 7:09 pm | सहज

ह्या दुव्यावर ती सुरवातीची टायटल्स बघता येतील.

पैसा's picture

21 Oct 2012 - 8:46 pm | पैसा

आता लवकरात लवकर सिनेमाबद्दल निवांत आणि डिट्टेल लेख येऊ दे!

उदय's picture

22 Oct 2012 - 7:41 am | उदय

त्याचा 'माफीचा साक्षीदार' शोधत होते. तो मिळाला नाहीच
माफीचा साक्षीदार तुम्हाला आपलीमराठी डॉट कॉम वर बघता येईल.
किंवा थेट पुढील लिंकवर
http://www.umovietv.com/ShowDetails.aspx?MovieId=659

अवांतरः तुम्ही VLC player ( free and open source cross-platform multimedia player) वापरता, हे वाचून आनंद झाला.

नुसत्या टायटल्सनाच अशी दाद तर मुव्ही कसा असेल अस वाटुन गेल.

कल्पना आवडली. अन टायटल्सही भारीच.

शिल्पा ब's picture

22 Oct 2012 - 11:01 am | शिल्पा ब

माफीचा साक्षीदार ज्या घटनेवरुन बनवलाय ती घटना जोशी अभ्यंकर खुन प्रकरण म्हणुन माहीती आहे.
यामधे जोशी अभ्यंकर घरातील लोकांचे खुन झाले का?

हो. ते भयानक खूनसत्र होते. याची माहिती http://en.wikipedia.org/wiki/Joshi-Abhyankar_serial_murders.

ड्रॉप बॉक्स असेल तर कळव.
'मासा' आहे माझ्याकडे.
चला आता 'बाँबे टॉकिज' शोधणे आले. :)

प्रदीप's picture

22 Oct 2012 - 5:40 pm | प्रदीप

ज्या व्यक्तिंची नावे पाटीवर आहेत, त्यांची चित्रे तिच्या आजूबाजूस देण्याची कल्पना नाविन्यपूर्ण म्हटली पाहिजे.

हा चित्रपट कसा होता माहिती नाही, पण शशि कपूर- जेनिफर केंडाल ह्यांनी निर्मीलेला, अपर्णा सेन दिग्दर्शीत '३६ चौरंगी लेन' अप्रतिम होता, अजून माझ्या स्मरणात आहे. अपर्णा सेननेच दिग्दर्शीत केलेला बंगाली चित्रपट 'पारोमितार एक दिन' ही नितांत सुंदर होता.

मस्त कलंदर's picture

22 Oct 2012 - 7:19 pm | मस्त कलंदर

मला रहस्यकथा, पोलिस तपासकथा आवडतात. माफीचा साक्षीदार सत्यकथा असल्यानेही त्याबद्दल कुतूहल होते,आहे.

@विलासराव, धन्यवाद. मलाही ती इमारत आधी व्हीएसएनएलची वाटली होती, पण त्याशेजारी इतकी रिकामी जागा पाहून शंका आली.

@प्रदीप, अपर्णा, ई.- चित्रपट थोडाफार पुढे पळवून पाहिला होता. थोडा समांतर वळणाकडे झुकणारा आणि ९५% इंग्रजी संवाद असलेला सिनेमा आहे.

अवांतरः काल सकाळी "बातों बातों मे" पाहिला. त्यात टुनटुन अर्ध्या सेकंदासाठीच दाखवली आहे, तरीही श्रेयनामावलीत त्यांचं नांव आहे.

शेखरमोघे's picture

15 Nov 2012 - 11:56 pm | शेखरमोघे

हे चित्र चर्चगेटच्या बाजूने साधारण हुतात्मा चौकाकडे (फ्लोरा फाउन्टनकडे) तोन्ड करून, उन्चावरून काढले आहे. खाली डाव्या बाजूला अर्धवट दिसणारी इमारत म्हणजे पूर्वीच्या वेस्टर्न रेल्वेचे (१९५० च्या आधी जिला "बॉम्बे बरोडा सेन्ट्रल इन्डिया" असे भर भक्कम नाव होते) मुख्य कार्यालय. उन्च इमारत अर्थातच एकेकाळच्या "विदेश सन्चार निगम्"चे मुख्य कार्यलय, जे आता टाटा समुदायाकडे आहे.

चौकटराजा's picture

16 Nov 2012 - 1:53 pm | चौकटराजा

माझ्या माहितीप्रमाणे सदर चित्रपटाचे नाव "बोंम्बे टॉकी " असे होते.