मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन

शरदिनी · · कलादालन
अनन्यशून्या गरळविशिष्टा मंतरलेली चरणप्रतिष्ठा अल्लडढोली धोतरजोडी चित्तरबद्धा जळमंजिष्ठा चपळ्शरीरी आटापीटा अल्फाबीटाग्यामाथीटा शोधनभंजक वरबालंटा कुठे कोणासी सचित्रघंटा अभिजाताची मंत्रसमाधी थिल्लर घोटा अतिकोलांटी कांक्षितबुद्धी धरणललाटी मेंदूक्रांती मेंदूक्रांती शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे

वाचने 13931 वाचनखूण प्रतिक्रिया 28

अभिजाताची मंत्रसमाधी थिल्लर घोटा अतिकोलांटी कांक्षितबुद्धी धरणललाटी मेंदूक्रांती मेंदूक्रांती या चार ओळी खासच आहेत. बाय द वे, कोणतं वृत्त म्हणायच हे ? -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शरदिनी Sun, 08/19/2012 - 18:50
" तेरी भी चुप और मेरी भी.. " या टीकग्रंथात जालिंदरजींनी सांगितलं हे वृत्त... मेंदूक्रांता वृत्त.. दोलक सतराव्या मात्रेवर. तीर्थ पाचव्या मात्रेवर... बाकी पूर्ण वेळ टाम्टुम.. इतकंच आठवतंय...

In reply to by शरदिनी

दोलक सतराव्या मात्रेवर. तीर्थ पाचव्या मात्रेवर... बाकी पूर्ण वेळ टाम्टुम.. माधव ज्युलियन छन्दोरचना या ग्रंथात मेंदूक्रांतावृत्तावर लिहायचे राहुन गेले. बाकी आभार. दोन क्षण सुखात गेले. -दिलीप बिरुटे

रमताराम Sun, 08/19/2012 - 18:55
जागा चुकली की हो. बरं ते असो. या निमित्ताने काही अभिजात काव्य वाचायला मिळाले - ते ही समजावून घेण्याचा आटापिटा न करता - हा एक फायदा झाला. बादवे: तुमच्या कवितेवर ग्रेसचा प्रभाव आहे नि थोडी नियतीशरणता असे वाटते का?

शरदिनी Sun, 08/19/2012 - 19:30
भ्रांत स्वतंत्र मी स्वयंभू मी तांत्रिकांची भ्रांत मी वर्णविंध्य स्पंदनांत घट्ट स्पष्ट रुष्ट मी अष्टमी त नष्टमी सुबद्ध मीच भ्रष्ट मी कष्ट मी नि क्लिष्ट मी यत्र तत्र मीच मी शरदिनी १९ ऑगस्ट २०१२

In reply to by बॅटमॅन

शरदिनी Sun, 08/19/2012 - 19:28
जालिंदरजींनी असल्या लोकांवर केलेली एक कविता आहे... त्यातल्य काही ओळी टंकत आहे. स्मरणभरारी दौलतजादा जोश जलाली संकटनादा ऐन दुपारी केला वादा. इंजिनदादा इंजिनदादा जालिंदर जलालाबादी ( जलालाबादचे असह्यकडे.. या संग्रहातून)

चित्रगुप्त Sun, 08/19/2012 - 22:36
काही कळले काही नकळले नकळलेले कळले कळले कळलेले न कळले न कळले कळत वळत चुळत बुळत कळवळत चुळबुळत वळवळत कळकळत कळकळ वळवळ मळमळ सळसळ सळवळ मळसळ कळवळ कळसळ

आंबोळी Sun, 08/19/2012 - 23:27
वा तै... भडकमकरांनी आमचा निरोप पोचवलेला दिसतोय.... तुम्हाला पुन्हा कविता व्हायला लागलेल्या बघुन समाधान वाटले...

अर्धवटराव Tue, 08/21/2012 - 00:35
या असल्या कविता खरच अर्थगर्भीत असतात का पहिले कविता लिहायची आणि मग अर्थ शोधायचा असा प्रकार असतो? अर्धवटराव

In reply to by अविनाशकुलकर्णी

मूकवाचक Wed, 08/22/2012 - 16:17
'गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व' असे एक शीर्षक तरळून गेले डोळ्यासमोरून ...

In reply to by मूकवाचक

अर्धवटराव Wed, 08/22/2012 - 21:18
>>गर्विष्ठ निराकाराच्या शष्पतत्वज्ञानाचे कवित्व -- व्वा.. काय झकास व्युत्पन्न शिवी आहे (नक्की शिवीच आहे का माहित नाहि ). आता येऊ देत कोणाला वादविवाद करायला... पार फाडुन काढतो. अर्धवटराव