हळू हळू येतेय बिनपावली
तुझ्या खांद्यामागे सकाळ सोनसळी
पांढूरल्या तावदानात
धीट होत, सूर्य येतोय आत
उशीवर बरसताहेत तुझे केस
तू अजूनही झोपेतच आहेस!
वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं
सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं
बघ, मी सकाळ देतोय तुला
हा दिवसही घे, माझ्या फुला!
येतील हलत्या पडद्यामागे सूर्याची किरणे
फडफडणाऱ्या पापण्यामागे स्वप्नांचे फिरणे
झोपेत तुझे स्वप्नांना बिलगणे
सुखाचे क्षण आठवून ओठांचे विलगणे
वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं
सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं
बघ, मी सकाळ देतोय तुला
हा दिवसही घे, माझ्या फुला!
खिडकीच्या कट्ट्याखाली माती देतेय हुंकार
बागडत्या बाळागत दिवसाला येतोय आकार
सकाळ-गाणं ऐकत तुझ्या पापण्याचा झुला झुले
नृत्यशाळेतला जणू पंखा हलकेच डुले
सूर्यप्रकाशाने अखेर उघडलं पडद्याचं भुयार
तुही झालीस, मला वाटतं, प्रवासाला तयार
वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं
सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं
बघ, मी सकाळ देतोय तुला
हा दिवसही घे, माझ्या फुला!
टॉम प्रॅक्स्टन लिखित आणि त्यानेच गायलेलं मूळ गाणं:
प्रतिक्रिया
17 Aug 2012 - 11:26 pm | रेवती
वाह!
सुंदर.....
18 Aug 2012 - 4:42 am | स्पंदना
अंहं!
18 Aug 2012 - 8:35 pm | पैसा
छान आविष्कार!
18 Aug 2012 - 8:45 pm | मन१
छान
19 Aug 2012 - 9:55 pm | मूकवाचक
छान
19 Aug 2012 - 2:07 pm | कवितानागेश
छान. :)
20 Aug 2012 - 1:49 pm | मेघवेडा
सुरेख!
20 Aug 2012 - 2:30 pm | मस्त कलंदर
अगदी सुरेख!!!