आद्य आंदोलक- गोदाईवा

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
29 Jul 2012 - 5:03 am

आता अण्णा पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात करणार आणि कदाचित नेहमीप्रमाणे ते संपणार किंवा कसे याबद्दल विचार सुरु होते. कारण ‘ नेमेची येतो’ प्रमाणे दर संसद अधिवेशना आधी ते होऊ लागलंय. एकूणच आंदोलनं वगैरे कधी सुरु झाली असावीत? राजेशाहीत तर ते दुर्मिळच. लोकशाही किंवा त्यासदृश राज्य व्यवस्थेतच ते शक्य आहे.

असंच एक आंदोलन इंग्लंड मध्ये झालं होतं. ते वेगळं अशासाठी की ते लोकांचं नव्हतं पण लोकांसाठीच होतं. हेच कदाचित पाहिलं आंदोलन असेल..
इंग्लंडवर पण परकीय आक्रमण करून रोमन आणि नंतर जर्मन राजानी राज्य केलं होतं. नंतर अनेक वर्षं राजेशाही सुरु होती.
सन दहाशे त्रेचाळीस! अंग्लो-साक्सन राजवटीचा काळ. ठिकाण कोवेन्त्री. लंडनपासून शंभर मैल अंतरावर असलेलं एक छोटं गाव!
तत्कालीन राजा एडवर्ड याचा मित्र लेओफ्रिक हा मध्य इंग्लंड चा (आता West Midland हे राज्य) कारभार पहात असे. त्याची पत्नी गोदाईवा ही फार दयाळू होती. समाजातली गरीब आणि श्रीमंत यांच्यातली दरी पाहून व्यथित होई. एकदा तिच्या नवरयाकडे म्हणजेच सरदार लेओफ्रिक कडे तिने तक्रार केली. तेव्हा त्याने तिला समजावण्या चा प्रयत्न केला.
आपल्याला राजासारखं रहायचं असेल तर जनतेकडून वाढवून कर घेतलाच पाहिजे..वगैरे. पण हे समर्थन काही तिला पटणार नव्हतं.

शेवटी तो म्हणाला-” तू जर हे सिद्ध केलंस की तुलां संपत्तीची गरज नाही, तर मीही कराचा फेर विचार करेन ”
मग गोदाईवा ने आदेश काढला, की ती तिच्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन नग्नावस्थेत शहराला फेरी मारणार आहे. या प्रकारच्या निषेधामुळे तुम्हा लोकांचा कर कमी होईल. पण या वेळी सर्वानी घरातच राहावे आणि तिला पहाण्याचा प्रयत्न करू नये.

लोकांचाही राजाबद्दल आदर असल्याने त्यांनी हा आदेश पाळला. ठरल्या प्रमाणे लेडी गोदैवा ने फेरी वगैरे मारली. पण त्यातच थोमस नामक एका शिंप्याने घराच्या खिडकीतून तिला पाहिलंच. मग काय! संतप्त लोकांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचे डोळे फोडले. याच थोमस वरून पुढे ‘Peeping Tom’ हा शब्दप्रयोग इंग्रजीत प्रचारात आला.

पण शेवटी या आंदोलनाचा परिणाम म्हणून लोकांची कर वाढ मात्र रद्द झाली!
ही घटना पुढे दंत कथा म्हणून विविध रुपात सांगितली जाते. तिच्या मृत्यू पश्चात एक शतकानंतर ही घटना लिखित रुपात प्रसिद्ध झाली. एके काळी तिला लोक देवीच्या रूपात पहात असत. इथे अनेक दुकाने किंवा इमारतीना तिचे नाव दिले जाते.
अशी ही आद्य आंदोलक- गोदाईवा. कोवेन्त्री च्या नगर वाचनालयात शहराच्या इतिहासाचा एक विशेष विभाग आहे. इथल्या अनेक पुस्तकांमध्ये भरभरून लिहीलं गेलंय. तिच्या नावानं दर वर्षी महोत्सव पण असतो, आणि तीस वर्षानी या घटनेला एक हजार वर्षे होतील. तेव्हा मोठा उत्सव होणार आहे!

या घटनेच्या स्मरणार्थ तिचा एक पुतळा शहराच्या मध्यभागी १९४७ मध्ये बसवण्यात आला आहे. समोरच्या इमारतीत या प्रसंगाची आठवण म्हणून ‘Peeping Tom’ चा हलता देखावा पण तयार केला आहे. दर तासाने एकदा हा खेळ पहायला मिळत असल्याने पर्यटक काय, पण आम्ही इथे नेहमी रहाणारे सुधा त्या भागात आलोच असू तर तासाची वेळ गाठून पहातोच!

तो या विडीयो मध्ये पहाता येईल..

एक कविता: Lady Godiva

Leofric was a rich man
And he lived in Coventry.
His wife was called Godiva
And she was as kind as could be.

Godiva said to her husband one day
“It’s a terrible thing I’m sure
That we have so much money
While everyone else is poor.

Perhaps we can give some money away
To help the hungry and needy.
We can keep a little bit for ourselves
But I think we should stop being greedy.”

Her husband laughed and said “My dear,
Stay away from my moneybox!
You wouldn’t last five minutes
If we couldn’t afford your fine frocks.”

Godiva thought for a while then said,
“Let us both take oaths
That we will give our money away
If I can prove I don’t need clothes.”

The next day she got on her horse
And let down her long hair.
Nobody could believe what they saw,
Godiva was totally bare.

“We must avert our eyes” said one,
“Or else it would be rude.
It’s not polite to stare at a lady
When she is in the nude.”

So everybody looked away
Apart from Peeping Tom.
He had a sneaky peak and saw
Lady Godiva’s bum.

When Godiva got back home
Her husband said “I guess
We’ll have to give our money away.
You’ve proved you don’t need your dress”

पॉल पेरो या कवीची वरील कविता इथे प्रसिद्ध आहे. लहान मुलाना अन्यायाचा प्रतिकार करणे आणि नैतिकता एकाच वेळी शिकवणारी. (कोवेन्त्री कौन्सिल ग्रंथालयातून.साभार…)

कथासंस्कृतीकविताइतिहासप्रकटन

प्रतिक्रिया

मन१'s picture

29 Jul 2012 - 10:50 am | मन१

पण तिने वस्त्रहीन का फिरावे ह्याचा काही उलगडा झाला नाही. दुसरी एखादी अट नसती का ठेवता आली.
असो. आपल्याकडे कशा विक्रमादित्य ,कालिदास, बिरबल, तेनाली , शिवाजी महाराज ह्यांच्या लोककथा आणि काही दंतकथा प्रसिद्ध आहेत तशाच इंग्लंडातल्या प्रसिद्ध कथा म्हणजे बुडिका राणी,किंग आर्थर ,रॉबिन हूड वगैरे असे ऐकून होतो. ही दोगाइवा बद्दल नव्यानेच समजले.
खरे तर ही बया आद्य आंदोलक कमी आणि गरिबांचे टॅक्स वगैरे माफ करण्याच्या मागणीने सोशालिस्ट अधिक वाटते.

नितिन थत्ते's picture

29 Jul 2012 - 11:50 am | नितिन थत्ते

गोदाईवा हे नाव वाचून गोदूताई परुळेकरांविषयी लेख असावा असं वाटलं होत.

पैसा's picture

29 Jul 2012 - 1:48 pm | पैसा

पण याला आंदोलन म्हणण्यापेक्षा सत्याग्रह नाव योग्य दिसेल. एका व्यक्तीने केलेला सत्याग्रह. आंदोलन म्हणजे समुहाने केलेली चळवळ असावी.

हजार वर्षांपूर्वी एखाद्या स्रीने असा निर्णय घ्यावा ही विशेषच गोष्ट आहे.

असल्यास अधिक माहिती द्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

29 Jul 2012 - 10:43 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त! पिपिंग टॉमबद्दलची माहिती नवीन कळली. इंग्लंडच्या इतिहासातील ही एक विलक्षण घटना आहे हे खरेच.