मंदी आली का हो !

नर्मदेतला गोटा's picture
नर्मदेतला गोटा in जनातलं, मनातलं
15 Jul 2012 - 12:52 pm

परवाची गोष्ट. आमचा एक मित्र आहे. नुकतेच त्याचे कॉलेज संपले. नोकरीच्या शोधात आहे. म्हणून त्याचा बायो डेटा
एका परीचिताकडे पाठवला.

हा परीचित एका बँकींग क्षेत्रासाठी आय टी सर्व्हिस देणार्‍या कंपनीत काम करतो.

म्हणाला 'अहो चूकीच्या वेळेला आलात."

मागील आठवड्यातच आमच्याकडे काही शे लोकांना नारळ दिला. आम्हालाही नोटीस मिळालीये.
निरोप समारंभ ३ महिन्यांनी होणार आहे.

म्हणून तो बायोडेटा घेऊन गेलो दुसर्‍या मित्राकडे.
त्याचे कम्पनी जागतिक, त्यामुळे बेंचही जागतिक. मला म्हणाला अहो आता कशाला बायोडेटा आणलात.

आम्हीच राहतोय का नाही ते माहीत नाही.

आमच्या इथेच स्थिती अवघड बनत चाललीये.
पूर्वी आमच्या कंपनीत बर्‍याच फॅसिलिटीज होत्या. प्लॅस्टीकचे युज अँड थ्रो कप्स असायचे कॉफी प्यायला.
आता युज अँड थ्रो कप्स फेकून दिलेत. प्रिंट आऊटस वरही मर्यादा आलीये.

पण याला कॉस्ट कटींग नाही म्हणायचे. ही आहे पर्यावरणाबाबत जागरूकता. प्लॅस्टीकने पर्यावरणाची खूप हानी होते.
आणि प्रिंटींगच्या कागदासाठीही बरीच जंगलतोड करावी लागते. म्हणून हे टाळायचे असा संदेश आला होता सी इ ओ चा.

अलिकडे बाहेर जाणार्‍या प्रत्येक मेलच्या शेवटी पर्यावरणाबाबत एक हिरवा मेसेज जोडला जातो.

तात्पर्य :- तुमचे काम इथे होणे नाही.

मग गेलो तिसर्‍याकडे. याची कंपनी थोर. टेलिकॉमच्या क्षेत्रात झाडू मारण्याचं काम करणारी. सॉरी चुकलो.
टेलिकॉमच्या क्षेत्रात फार उच्च दर्जाचे काम करणारी.तिथल्या मित्राला म्हटले बघ बाबा काहीतरी.

तर म्हणतो कसा...

आय टी मधे राहीलय काय. अहो इथे काही हजार लोक आम्ही हाकलणार आहोत.
त्याहून अधिक लोक सध्या बस कम्पनी मधे आहेत म्हणजे बिनकामाचे बसून आहेत.

त्याला म्हटले 'अरे मग हे लोक दिवसभर करतात काय ?'
तर म्हणाला 'दोन पंच एक लंच' .

तर काय तिथेही काम झाले नाही.

म्हणून प्रश्न पडला मंदी आली की काय !

बिल्डींग कन्स्ट्रक्शनबाबतही हाच अनुभव--

कुठल्याही नव्या साइटवर जा. लोक मागेच लागतात.

आमचा एक मित्र २ आठवड्यापूर्वी एका पूर्ण बाधलेल्या साइटवर गेला. साइट ऑफिसमधे जाऊन चौकशी केली.
म्हणाले ' सग्गळे सग्गळे फ्लॅट संपले. फक्त दोनच शिल्लक. ५ व्या मजल्यावरचा ३ रा
आणि २ र्‍या मजल्यावरचा कॉर्नरचा फक्त शिल्लक आहेत.
तेही जातील. आमचे रेप्युटेशनच आहे.तसं '

मित्र घरी आला. काही दिवसांनी या लोकांचा फोन. साहेब घेताय ना फ्लॅट.
हा नाही म्हणाला तरी पिच्छा पुरवतायत.

आणखी एक अनुभव. एका मित्राबरोबर गेलो होतो एक स्कीम पहायला.
ठीक वाटले. आय टी पार्क जवळच आहे.

भाव विचारला. त्यांनी एकूण किम्मत सांगितली. बरीच महाग वाटली. म्हणून मित्राने तो फ्लॅट घेण्याचा विचार सोडून दिला.

त्यानंतर गम्मत म्हणजे या बिल्डरच्या ऑफिसमधल्या लोकांनी पुन्हा फोन केला.
येऊन जा एकदा. बसू बोलू. म्हणून हा परत गेला बिल्डरच्या ऑफिसमधे. तर तिथला माणूस याला म्हणाला.

साहेब तुम्ही फ्लॅट घेणार आहात का, नक्की घेणार आहात का. सांगा. आपण तुमच्यासाठी किम्मत कमी करू.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने नव्याने सांगितलेली किम्मत ६.५० लाखाने कमी होती.

त्याला सहज शंका म्हणून विचारले, 'तुम्हाला गिर्‍हाइकांची काय कमी, एवढे लोक गर्दी करतात ना ऑफीसमधे
गिर्‍हाइक कमी दिसत नाहीये.'
तर म्हणाला 'अहो हे सगळे आय टी वाले लोक. फ्लॅट पहायला येतात, गर्दी करतात.
शनिवारी, रविवारी तर इथे जत्रा भरते.पहायला येणारे खूप पण घेणारा मात्र कुणीच नाही.'

गाड्या बनवणारी एक कंपनी -
पूर्वी त्यांच्या ३ प्लांटस मधे गाड्यांचे प्रॉडक्शन होत असे.प्रत्येकात १००० चे टारगेट दिलेले होते.
तीन शिफ्टमधे काम चाले.

आणि आज आठवड्याचे काही दिवस कमी केलेत. काही शिफ्टही कमी केल्यात.

म्हणे आता गाड्यांना मागणी नाही.

--

परवा एक बॅकेचा एजंट भेटला. म्हणाला पर्सनल लोन घ्या. मी म्हटले नको.
म्हणाला मग होमलोन घ्या. मी म्हटले आधीच घेतलेले आहे.
तर मग मागेच लागला. म्हणाला "तुम्ही लोन घेतलेले असेल, तर आमच्या बँकेकडे ट्रान्सफर करा.
तुमचाही फायदा. आमचेही टारगेट पूरे होऊन जाइल."

पण आता लोन घेता का लोन म्हणून बँका मागे लागू लागल्या आहेत ग्राहकांच्या.

हे कस काय झालं ! मंदी आली की काय !

एकूण ग्राहक पुन्हा राजा होइल.
पूर्वी ग्राहकाचा जिथे किमान शब्दात कमाल अपमान होत असे. तिथे आता कमाल शब्दात किमान अपमान होइल
अशी अपेक्षा आहे.

या मंदीची संधी कशी करून घ्यावी बरे !

धोरणसमाजजीवनमानअर्थकारणप्रतिसाद

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

15 Jul 2012 - 5:10 pm | चिरोटा

संपादकांना विनंती की negativity spread करणारा हा धागा काढून टाकावा!!
सॉफ्टेकसिंग प्रोग्रॅमवालिया

नाना चेंगट's picture

15 Jul 2012 - 6:35 pm | नाना चेंगट

यात निगेटीव्हीटी काय आहे हे समजले नाही.
संपादकांनी जरी धागा उडवला तरी मंदी (जर खरेच असेल तर) हटणार कशी?
उलट यानिमित्ताने काही जण घाईने एखादा निर्णय घेत असतील तर क्षणभर थांबून विचार करुन पुढे जातील. हे योग्य नाही काय?
पण जर टिपीकल आयटीवाल्यांप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसायचे असेल तर बसा ब्वा !!

चिरोटा's picture

15 Jul 2012 - 8:23 pm | चिरोटा

ईनोद होता हो तो नाना.

नाना चेंगट's picture

16 Jul 2012 - 12:17 pm | नाना चेंगट

आयला ! नक्कीच म्हातारा झालो मग मी !! :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Jul 2012 - 10:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>> टिपीकल आयटीवाल्यांप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसायचे असेल तर बसा ब्वा !!
माझा मित्र (कुंदन नव्हे.....) वाळुत तोंड खुपसुन बसणार्‍यापैकी नाही, याची मला खात्री आहे.

-दिलीप बिरुटे

कुंदन's picture

16 Jul 2012 - 9:38 am | कुंदन

छे हो प्रा डॉ
अन तशी वेळ आलीच तर एखाद्या विना अनुदानित महा विद्यालयात ....... असो ... ;-)
लवकरच ७वा वेतन आयोग पण येईल , शिवाय उन्हाळी सुटी + दिवाळी सुटी.
नान्या , बघतोस काय , सामील हो.

नाना चेंगट's picture

16 Jul 2012 - 12:22 pm | नाना चेंगट

गप रे ! आपल्या मित्राला बोलायचं काम नाही. ;)

या मंदीची संधी कशी करून घ्यावी बरे !
हे शेवटचे वाक्य मननीय आहे.
........ काही लोक अशी संधी करून घेत असतीलही.... कशी?

सग्गळे सग्गळे फ्लॅट संपले. फक्त दोनच शिल्लक.

सावधान! ;)
जे फ्ल्याट खपत नसतील ते खपवण्याची युक्ती आहे.
काही म्हणता काही शिल्लक नाही म्हणायचे आणि कानाकोपर्‍यातले आधी विकत बसायचे.
एखादा एन आर आय आला की जास्त किमतीत (त्यांच्या दृष्टीने) चांगले फ्ल्याट विकायचे ही जुनी पद्धत आहे.
बाकी मंदी बाबत काय म्हणावे समजत नाही. एकीकडे नोकर्‍या नाहीत म्हणावे तर नोकर्‍या असलेलेही भरपूरजण आहेत ज्यांच्यामुळे बाजार तेजीत आहे. ;)

लेख मननीय आहे. भारताची वाढणारी लोकसंख्या, त्यातील शिक्षितांचे वाढणारे प्रमाण, गावाकडून शहराकडे येणारे लोंढे, युरोपीय देशातील वाढणारे बेरोजगारीचे प्रमाण, सर्वच देशांनी मुलभूत सुविधांमधील केली असलेली लक्षणीय गुंतवणुक आणि त्यातील न येणारे परतावे इत्यादीचा विचार केला तर बेरोजगारीचे वाढणार हे नक्की.

त्यातही सर्वच देशांचे अती औद्योगिकीकरणाचा कल आणि त्यातील असलेला पर्यावरण विरोध आणि र्‍हास इत्यादींचा विचार केला तर मंदीचे ढग आपल्या आयुष्याच्या अंतापर्यत नेहमीच राहणार अशी मला भिती वाटते.

भारतासारख्या देशाने आता तरी आपल्या अर्थधोरणांचा विचार केला पहिजे असे सुचवावेसे वाटते.

मराठमोळा's picture

16 Jul 2012 - 7:42 am | मराठमोळा

वाढणारी लोकसंख्या हा जरी काळजीचा विषय असला तरी "त्यातील शिक्षितांचे वाढणारे प्रमाण" हा काळजीचा मुद्दा नाही.
भारतासमोर सगळ्यात मोठा यक्षप्रश्न हाच आहे की अशिक्षित लोकांना स्किल्ड लेबर मधे कसे परिवर्तीत करावे?
कारण अनस्किल्ड लेबरमुळेच मंदीची शक्यता वाढते. जितके लोक स्किल्ड लेबर कॅटेगरीमधे येतील तितकाच मंदीचा प्रश्न देशापुरता तरी निकालात निघू शकतो.. जागतिक मंदीचा परीणाम हा जाणवणारच शेवटी त्याबद्दल दुमत नाही.

>>भारतासारख्या देशाने आता तरी आपल्या अर्थधोरणांचा विचार केला पहिजे असे सुचवावेसे वाटते.

हॅहॅहॅ.. माकडाच्या हाती कोलीत दिलय आपण.. :) आपला विचार आपणच करुन ठेवणे.. देशाच्या वगैरे भरोशावर बसू नये असे मला तरी वाटते. ;)

मराठमोळा's picture

16 Jul 2012 - 7:37 am | मराठमोळा

विनोदी लेख!!!

कॉस्ट कटींग भाग सोडला तर लेखात म्हंटलय तितकी वाइट परीस्थिती भारतात तरी नक्कीच नाही अजुन. येणार्‍या काळात नव्या नोकर्‍या कमी होतील किंवा वर्स्ट केस थांबतीलही कदाचित, पण आहेत त्यात फार कपात होणार नाही असे वाटते.
मंदी आली ही ओरड भारतात २००७ पासून सुरु आहे, पण तुमच्यापैकी किती लोकांनी ही मंदी अनुभवली ते सांगा.

कॉस्ट कटींग चे म्हणाल तर भारत हा स्वस्त कामगारांचा देश म्हणून पाहिला जातो. इथल्या सगळ्या कंपन्या कॉस्ट सेंटर्/प्रॉफिट सेंटर याच मॉडेल मधे काम करतात. गोर्‍यांच प्रॉफिट कमी झालं तर ते पहिले भारतातील खर्च कमी करुन प्रॉफिट लेव्हल ला आणायचा प्रयत्न करतात. फार वाईट परीस्थिती असेल तर मग गोर्‍यांना नोकरीतुन कमी करुन त्या पोझिशन भारतात/फिलीपाईन्स किंवा ईतर कॉस्ट सेंटर मधे भरल्या जातात.

आणि जर खरंच महाभयंकर मंदी आलीच तर सगळे एकाच बोटीत आहोत हे विसरु नका, बुडाले तर सगळेच बुडतील, तुम्ही आम्ही चिंता करुन काहीही होणार नाही. सो टेंशन इल्ले. ;)

काही फुकट सल्ले. ज्यांना हवे त्यांनी घ्या बाकीच्यांनी त्यावर काथ्या कुटु नका. :)
१. शक्यतो असे काम निवडा/करा/शिका की ज्यात तुमची नेहमी कंपनीला/मार्केटला गरज राहील. रेअस स्किल्स आर ऑलवेज इन डिमांड
२. कंपनी जितकी मोठी तितका नोकरी जाण्याचा धोकाही मोठाच (विचित्र वाटेल पण खरं आहे.)
३. सध्याच्या नोकरी व्यतिरिक्त आणखी एक ऑप्शन/हातचा नेहमी हाताशी हवा.

नगरीनिरंजन's picture

16 Jul 2012 - 8:40 am | नगरीनिरंजन

ममो, असं सेल्फ-हेल्प छाप गोलगोल नको.
उदाहरणे द्या बरं.

१. शक्यतो असे काम निवडा/करा/शिका की ज्यात तुमची नेहमी कंपनीला/मार्केटला गरज राहील. रेअस स्किल्स आर ऑलवेज इन डिमांड

समजा आयटी कन्सल्टन्सीच्या धंद्यात मंदी आलीच तर कोणते स्किल्स इन डिमांड असतील असे तुम्हाला वाटते?

२. कंपनी जितकी मोठी तितका नोकरी जाण्याचा धोकाही मोठाच (विचित्र वाटेल पण खरं आहे.)

छोट्या कंपन्यांमध्ये नोकरी जाण्याचा धोका नसतो असे समजले तरी कंपनीच बंद पडण्याचा धोका असतो की नाही? शिवाय प्रोफेशनल ग्रोथ, धोरणे, सुखसोयी, वर्क-लाईफ बॅलन्स यात फरक पडेल की नाही?

३. सध्याच्या नोकरी व्यतिरिक्त आणखी एक ऑप्शन/हातचा नेहमी हाताशी हवा.

ऑप्शन हाताशी ठेवायचा म्हणजे कसा? सध्याची नोकरी करताना एक छोटा व्यवसाय करावा की कसे? तुम्ही अशी काही उदाहरणे पाहिली असतील किंवा स्वतःच काही केले असेल तर सांगा म्हणजे त्या दृष्टीने विचार करणे सोपे जाईल.

हे सगळे गंभीरपणे लिहीले आहे.
धन्यवाद.

चिरोटा's picture

16 Jul 2012 - 11:03 am | चिरोटा

खरंच महाभयंकर मंदी आलीच तर सगळे एकाच बोटीत आहोत हे विसरु नका, बुडाले तर सगळेच बुडतील, तुम्ही आम्ही चिंता करुन काहीही होणार नाही

सगळे बुडणे शक्य नाही. काही व्यवसाय्,कंपन्या चालणारच.जीवनावश्यक गोष्टींचा धंदा करणारे लोक सहसा बुडत नाहीत. आतापर्यंत किती हॉटेल्स बंद झालेली आपण पाहिली आहेत?

समजा आयटी कन्सल्टन्सीच्या धंद्यात मंदी आलीच तर कोणते स्किल्स इन डिमांड असतील असे तुम्हाला वाटते?

proprietary सॉफ्टवेयर ला पर्याय असणारी सॉफ्ट्वेयर वापरण्याचे/बनवण्याचे कौशल्य भविष्यात डिमांडमध्ये असेल असे वाटते.

मराठमोळा's picture

16 Jul 2012 - 12:21 pm | मराठमोळा

सगळे बुडणे शक्य नाही. काही व्यवसाय्,कंपन्या चालणारच.जीवनावश्यक गोष्टींचा धंदा करणारे लोक सहसा बुडत नाहीत. आतापर्यंत किती हॉटेल्स बंद झालेली आपण पाहिली आहेत?

काय राव चिरोटाशेट,
शब्दशः अर्थ कशाला काढताय? अहो बुडतील याचा अर्थ सगळे धंदे बंद पडतील असा अर्थ नव्हता तिथे. सगळेच त्या आगीत थोड्याफार फरकाने होरपळतील असा अर्थ होता. आता माझ्या या वाक्यावरुन तुम्ही लगेच "सगळे होरपळणार नाहीत, काही लोकांकडे फायरप्रुफ कपडे असतात असे म्हणणार का? :)

मराठमोळा's picture

16 Jul 2012 - 12:16 pm | मराठमोळा

समजा आयटी कन्सल्टन्सीच्या धंद्यात मंदी आलीच तर कोणते स्किल्स इन डिमांड असतील असे तुम्हाला वाटते?

माझा अभ्यास माझ्या क्षेत्रापुरता मर्यादित आहे. आयटी क्षेत्र हे स्वतःच इतके प्रचंड मोठे आहे की त्यातील नेमके कोणते तंत्रज्ञान पुढे डिमांड मधे राहील हा अभ्यास ज्याचा त्याने करावा. लिंक्ड ईन, गार्टनर, नासकॉम आनी अशाच ईतर सायटींवर प्रकाशित होणारे स्टॅटीस्टीक्स, आर्टीकल्स, स्वतःच्या क्षेत्रासंबंधी असलेल्या बातम्या यावर नजर ठेवणे गरजेचे आहे. नुसती नजर न ठेवता त्याचा अभ्यास करुन पावले उचलणे देखील तितकेच गरजेचे आहे.
Knowledge is not Power, Applied knowledge is power.
याचप्रमाणे बाकी क्षेत्रांमधेही अभ्यास करता येतो.

छोट्या कंपन्यांमध्ये नोकरी जाण्याचा धोका नसतो असे समजले तरी कंपनीच बंद पडण्याचा धोका असतो की नाही? शिवाय प्रोफेशनल ग्रोथ, धोरणे, सुखसोयी, वर्क-लाईफ बॅलन्स यात फरक पडेल की नाही?

हा विचार ज्याच्या त्याच्या अनुभवांवर आधारीत आहे. मी स्वतः छोट्य आनि मोठ्या दोन्ही कंपन्यांमधे काम केले, पुर्ण विचार केल्यावर मला जे योग्य वाटले ते मी केले. प्रोफेशनल ग्रोथ, धोरणे, सुखसोयी, वर्क-लाईफ बॅलन्स हे सगळं केवळ मोठ्या कंपनीतच मिळेल याची काहीही खात्री देता येत नाही.

ऑप्शन हाताशी ठेवायचा म्हणजे कसा? सध्याची नोकरी करताना एक छोटा व्यवसाय करावा की कसे? तुम्ही अशी काही उदाहरणे पाहिली असतील किंवा स्वतःच काही केले असेल तर सांगा म्हणजे त्या दृष्टीने विचार करणे सोपे जाईल.
ऑप्शन हाताशी कसा आणि कोणता ठेवायचा हे सगळ्यांना कळते अशा मताचा मी आहे, ते ज्यांना करायचे आहे त्यांनी करावे असा अर्थ इथे अभिप्रेत होता. मी इथे उदाहरणे दिली तर पुन्हा त्यावरुन भलतीकडेच विषय वाहवत जाइल. (कारण तसे अनुभव आहेत, कितीही चांगल्या मनाने काही करायचा प्रयत्न केला तर ते काहींना सहन होत नाही, मग ते त्यात फाटे फोडुन, शब्द पकडुन भांडायला लागतात.) आनी मी स्वतः कौंसेलर नाही, त्यामुळे मी इथे कुणालाही काही सांगू शकत नाही. ज्याचा त्याने थोडं डोकं वापरून अभ्यास करुन निर्णय घेणे केव्हाही हिताचे ठरते.

क्लिंटन's picture

16 Jul 2012 - 1:09 pm | क्लिंटन

३. सध्याच्या नोकरी व्यतिरिक्त आणखी एक ऑप्शन/हातचा नेहमी हाताशी हवा.

ऑप्शन हाताशी ठेवायचा म्हणजे कसा? सध्याची नोकरी करताना एक छोटा व्यवसाय करावा की कसे

मी आय.टी वाला नाही आणि आय.टी वाला व्हायची माझी इच्छाही नाही. मलाही नेहमीच्या नोकरीबरोबरच आणखी एखादा ऑप्शन हाताशी असावा असे पहिल्यापासूनच वाटत आले आहे.त्या दृष्टीने मी विकांताला क्लासमध्ये जाऊन शिकवितो.मी काही फायनान्शियल सर्टिफिकेशन परीक्षा दिल्या आहेत.त्या परीक्षांसाठी अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांना मी शिकवितो.मला शिक्षकी पेशाची आवड आहे आणि तो मला जमतो देखील. कधीकधी नोकरी आणि क्लास हे दोन्ही करणे हेक्टिक होतेच आणि कधीकधी सोशल लाइफवरही मर्यादा येतात. पण अनिश्चित आर्थिक परिस्थिती असताना असा वेगळा मार्ग हाताशी असणे कधीही चांगले या उद्देशाने हे मी करतो. तसेच महिन्याच्या मध्याला मागच्या महिन्यात घेतलेल्या क्लासचे पैसे जमा झाल्याचा एस्.एम.एस आला किंवा कोणा विद्यार्थ्याचा Thank you चा ई-मेल आला की या सगळ्या हेक्टिकपणाचा विसर पडतो :).

तेव्हा शिकवायची आवड असेल तर क्लासमध्ये जाऊन शिकविणे किंवा घरच्या घरी कसली तरी डिलरशीप घेणे, आय.टी वाले असाल तर इतरांना गरजेप्रमाणे सॉफ्टवेअर बनवून देणे अशा प्रकारचे मार्ग अवलंबता येतील. अजून नक्की काय करता येईल हे प्रत्येकाला आपली आवड्/पिंड लक्षात घेता समजेलच.

माझी सध्याची नोकरी सुरू करण्यापूर्वी मी महिनाभर आधीच मुंबईत आलो होतो. अगदी तेव्हापासून मी क्लास घेत आहे. नोकरी सुरू होण्यापूर्वी एक दिवस मी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत (लंच ब्रेक २० मिनिटांचा) सलग शिकविले होते.आवड असल्यास अशा ऑप्शनमध्ये झोकून देता येईल आणि अर्थातच जास्तीचे पैसेही मिळतील.

काळा पहाड's picture

27 Jul 2013 - 1:41 am | काळा पहाड

समजा आयटी कन्सल्टन्सीच्या धंद्यात मंदी आलीच तर कोणते स्किल्स इन डिमांड असतील असे तुम्हाला वाटते?

उदाहरणार्थ सीएफए करणार्या लोकांना मरण नाही, राजे! खास करून जे सिंगापूर मध्ये काम करतात त्यांना.

नर्मदेतला गोटा's picture

24 Nov 2016 - 11:45 pm | नर्मदेतला गोटा

लार्सन टूब्रोने आपल्या १४००० कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले आहे.

पर्नल नेने मराठे's picture

16 Jul 2012 - 9:30 am | पर्नल नेने मराठे
विनायक प्रभू's picture

16 Jul 2012 - 3:50 pm | विनायक प्रभू

टेक्स्टाइल मधे मंदी येण्याचे कारण हा फटू असण्याची दाट शक्यता नाकारता येत नै.

नर्मदेतला गोटा's picture

17 Jul 2012 - 1:17 am | नर्मदेतला गोटा

तेजी मंदी दोन्ही अर्थिक चक्राचे भाग आहेत आणि ते आवश्यक आहेत. हे लक्षात घ्यायला हवे.
एकाची मंदी दुसर्‍यासाठी तेजी असू शकते इ इ .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

17 Jul 2012 - 2:33 am | निनाद मुक्काम प...

ओबामा ह्यांनी आपल्या मनमोहन ह्यांना खास सल्ला दिला आहे. भारतात एफ डी आय ची गंगा फवारण्यासाठी विशेष भागीरथी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. मंदीचा भरपूर अनुभव असलेले व ती चुटकी सरशी संपवणाऱ्या ओबामा ह्यांनी भारतीय अर्थ व्यवस्थेला बरकत येण्यासाठी. अमेरिकन उद्योग समुहा तर्फे हा मूलमंत्र दिला आहे

नर्मदेतला गोटा's picture

20 Jul 2012 - 12:56 am | नर्मदेतला गोटा

पर्नल आणि सहज
यान्चे दुवे वाचनीय

नर्मदेतला गोटा's picture

18 Dec 2012 - 1:09 am | नर्मदेतला गोटा

मंदी आली का हो !

आमचा एक मित्र आहे. नुकतेच त्याचे कॉलेज संपले. नोकरीच्या शोधात आहे. म्हणून त्याचा बायो डेटा
एका परीचिताकडे पाठवला.

हा परीचित एका बँकींग क्षेत्रासाठी आय टी सर्व्हिस देणार्‍या कंपनीत काम करतो.

म्हणाला 'अहो चूकीच्या वेळेला आलात."

मागील आठवड्यातच आमच्याकडे काही शे लोकांना नारळ दिला. आम्हालाही नोटीस मिळालीये.
निरोप समारंभ ३ महिन्यांनी होणार आहे.

म्हणून तो बायोडेटा घेऊन गेलो दुसर्‍या मित्राकडे.
त्याचे कम्पनी जागतिक, त्यामुळे बेंचही जागतिक. मला म्हणाला अहो आता कशाला बायोडेटा आणलात.

आम्हीच राहतोय का नाही ते माहीत नाही.

आमच्या इथेच स्थिती अवघड बनत चाललीये.
पूर्वी आमच्या कंपनीत बर्‍याच फॅसिलिटीज होत्या. प्लॅस्टीकचे युज अँड थ्रो कप्स असायचे कॉफी प्यायला.
आता युज अँड थ्रो कप्स फेकून दिलेत. प्रिंट आऊटस वरही मर्यादा आलीये.

पण याला कॉस्ट कटींग नाही म्हणायचे. ही आहे पर्यावरणाबाबत जागरूकता. प्लॅस्टीकने पर्यावरणाची खूप हानी होते.
आणि प्रिंटींगच्या कागदासाठीही बरीच जंगलतोड करावी लागते. म्हणून हे टाळायचे असा संदेश आला होता सी इ ओ चा.

अलिकडे बाहेर जाणार्‍या प्रत्येक मेलच्या शेवटी पर्यावरणाबाबत एक हिरवा मेसेज जोडला जातो.

तात्पर्य :- तुमचे काम इथे होणे नाही.

कॉस्ट कटींगमधे आता मिडल मॅनेजमेंटला डच्चू दिला जाऊ लागलाय
प्रॉजेक्ट नाही तर मॅनेजर काय कामाचा

मग गेलो तिसर्‍याकडे. याची कंपनी थोर. टेलिकॉमच्या क्षेत्रात झाडू मारण्याचं काम करणारी. सॉरी चुक झाली.
टेलिकॉमच्या क्षेत्रात फार उच्च दर्जाचे काम करणारी. तिथल्या मित्राला म्हटले बघ बाबा काहीतरी.

तर म्हणतो कसा...

आय टी मधे राहीलय काय. अहो इथे काही हजार लोक आम्ही हाकलणार आहोत.
त्याहून अधिक लोक सध्या बस कम्पनी मधे आहेत म्हणजे बिनकामाचे बसून आहेत.

त्याला म्हटले 'अरे मग हे लोक दिवसभर करतात काय ?'
तर म्हणाला 'दोन पंच एक लंच' .

तर काय तिथेही काम झाले नाही.

म्हणून प्रश्न पडला मंदी आली की काय !

बिल्डींग कन्स्ट्रक्शनबाबतही हाच अनुभव--

कुठल्याही नव्या साइटवर जा. लोक मागेच लागतात.

आमचा एक मित्र २ आठवड्यापूर्वी एका पूर्ण बाधलेल्या साइटवर गेला. साइट ऑफिसमधे जाऊन चौकशी केली.
म्हणाले ' सग्गळे सग्गळे फ्लॅट संपले. फक्त दोनच शिल्लक. ५ व्या मजल्यावरचा ३ रा
आणि २ र्‍या मजल्यावरचा कॉर्नरचा फक्त शिल्लक आहेत.
तेही जातील. आमचे रेप्युटेशनच आहे.तसं '

मित्र घरी आला. काही दिवसांनी या लोकांचा फोन. साहेब घेताय ना फ्लॅट.
हा नाही म्हणाला तरी पिच्छा पुरवतायत.

आणखी एक अनुभव. एका मित्राबरोबर गेलो होतो एक स्कीम पहायला.
ठीक वाटले. आय टी पार्क जवळच आहे.

भाव विचारला. त्यांनी एकूण किम्मत सांगितली. बरीच महाग वाटली. म्हणून मित्राने तो फ्लॅट घेण्याचा विचार सोडून दिला.

त्यानंतर गम्मत म्हणजे या बिल्डरच्या ऑफिसमधल्या लोकांनी पुन्हा फोन केला.
येऊन जा एकदा. बसू बोलू. म्हणून हा परत गेला बिल्डरच्या ऑफिसमधे. तर तिथला माणूस याला म्हणाला.

साहेब तुम्ही फ्लॅट घेणार आहात का, नक्की घेणार आहात का. सांगा. आपण तुमच्यासाठी किम्मत कमी करू.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याने नव्याने सांगितलेली किम्मत ६.५० लाखाने कमी होती.

त्याला सहज शंका म्हणून विचारले, 'तुम्हाला गिर्‍हाइकांची काय कमी, एवढे लोक गर्दी करतात ना ऑफीसमधे
गिर्‍हाइक कमी दिसत नाहीये.'
तर म्हणाला 'अहो हे सगळे आय टी वाले लोक. फ्लॅट पहायला येतात, गर्दी करतात.
शनिवारी, रविवारी तर इथे जत्रा भरते.पहायला येणारे खूप पण घेणारा मात्र कुणीच नाही.'

गाड्या बनवणारी एक कंपनी -
पूर्वी त्यांच्या ३ प्लांटस मधे गाड्यांचे प्रॉडक्शन होत असे.प्रत्येकात १००० चे टारगेट दिलेले होते.
तीन शिफ्टमधे काम चाले.

आणि आज आठवड्याचे काही दिवस कमी केलेत. काही शिफ्टही कमी केल्यात.

म्हणे आता गाड्यांना मागणी नाही.

--

परवा एक बॅकेचा एजंट भेटला. म्हणाला पर्सनल लोन घ्या. मी म्हटले नको.
म्हणाला मग होमलोन घ्या. मी म्हटले आधीच घेतलेले आहे.
तर मग मागेच लागला. म्हणाला "तुम्ही लोन घेतलेले असेल, तर आमच्या बँकेकडे ट्रान्सफर करा.
तुमचाही फायदा. आमचेही टारगेट पूरे होऊन जाइल."

पण आता लोन घेता का लोन म्हणून बँका मागे लागू लागल्या आहेत ग्राहकांच्या.

हे कस काय झालं ! मंदी आली की काय !

एकूण ग्राहक पुन्हा राजा होइल.
पूर्वी ग्राहकाचा जिथे किमान शब्दात कमाल अपमान होत असे. तिथे आता कमाल शब्दात किमान अपमान होइल
अशी अपेक्षा आहे.

या मंदीची संधी कशी करून घ्यावी बरे !

चिरोटा's picture

18 Dec 2012 - 9:49 am | चिरोटा

आपण,Placement consultancy मध्ये काम करता का?असो.

या मंदीची संधी कशी करून घ्यावी बरे

रोटी,कपडा,मकानशी संबंधीत व्यवसाय करा.पण सध्या मकानवाल्यांची बूच बसली आहे.
सिलिकॉन व्हॅलीतले/बेंगळूर व्हॅलीतले venture capitalists म्हणतात- मंदीच्या काळातच खरी उद्योगशीलता वाढते.

नर्मदेतला गोटा's picture

12 May 2017 - 1:34 am | नर्मदेतला गोटा

पण सध्या मकानवाल्यांची बूच बसली आहे

खरंय

नर्मदेतला गोटा's picture

1 Feb 2018 - 8:45 am | नर्मदेतला गोटा

इमारत बांधणी क्षेत्रात पुन्हा एकदा मंदी आली आहे काय

नर्मदेतला गोटा's picture

14 Jul 2013 - 10:56 pm | नर्मदेतला गोटा

महिंद्राचे उत्पादन मंदीमुळे बंद

याचा अर्थ ऑटोमोबाइल क्षेत्रात मंदी. याचे कारण आय टी तील पडझड. हे लोक गाड्या घ्यायला तयार नाहीत. आणि परीणाम - बँकांकडे कर्ज घेणारे कमी होणार. म्हणजे बँकींग क्षेत्रावरही परिणाम. आयटीवाले लोनशिवाय काही घेत नाहीत

दादा कोंडके's picture

26 Jul 2013 - 6:28 pm | दादा कोंडके

म्हणूनच अभियांत्रिकीच्या पण्णासहजार जागा रिक्त आहेत.

राघवेंद्र's picture

26 Jul 2013 - 6:43 pm | राघवेंद्र

एम. बी. ए च्या ३२००० हजारच्या आसपास जागा रिक्त आहेत.

दादा कोंडके's picture

26 Jul 2013 - 7:25 pm | दादा कोंडके

पण्णासहजार जास्त की बत्तीस हजार?

:)

धमाल मुलगा's picture

26 Jul 2013 - 7:45 pm | धमाल मुलगा

=))
च्यायला! पर्फेक्ट दादा कोंडके! जियो! :)

राघवेंद्र's picture

26 Jul 2013 - 7:58 pm | राघवेंद्र

पी जी च्या मानाने ३२००० जास्त.

अभ्या..'s picture

27 Jul 2013 - 2:16 am | अभ्या..

बहुतेक झेड्पीत दिसतात. ;)
ह्याच्या मानाने त्याच्या मानाने,

काय दादा होतात कुटं ?... बरेच दिवसात बोर्डावर दिसला नाहीत.

मंदी आयी है आयी है मंदी आयी है =)) =))

मदनबाण's picture

12 May 2017 - 7:39 pm | मदनबाण

एके काळचे बिगेस्ट मॅन्यूफॅक्चरिंग हब असलेल्या Baltimore ची आजची अवस्था !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Infosys defers salary hikes till July; no job cuts planned
IT cos had firing list ready 5 years back
Techie, and worried about layoffs? These 20 skills can help you stay relevant