वेगळे आवाज

सोत्रि's picture
सोत्रि in जनातलं, मनातलं
30 May 2012 - 12:38 am

'ए हं आली हं, आता हे यडं बघ जाईल तिच्या मागे!', आमच्या कॉलेजात, नेहमीच्या बस स्टॉपवर, चैतन्यकांडीचा आस्वाद घेत असताना बरेचदा बोलला जाणारा हा डायलॉग. यातला 'हे यडं' म्हणजे आस्मादिक आणि हं म्हणजे निलम बाळ. हा डायलॉग मारला जावो अथवा न जावो, आपसूकच मी तिच्या मागे जात असे. हं नितांत सुंदर होती हे तर सत्यच पण मी तिच्या मागे जाण्याचे कारण तिचे दिसणे नव्हते, ते होते तिचा आवाज, 'वेगळा आवाज'.

तिचा आवाज अगदी वेगळा होता. थोडासा रफ, घोगरा म्हणावा असा पण नेमका घोगरा नाही. त्या आवाजामुळेच तिला हं हे नाव पडले होते. काहीतरी वेगळेपण होते त्या आवाजात. तो आवाज ऐकल्यावर काहीतरी वेगळेच फिलींग यायचे. मंजुळ आवाज ऐकल्यावर जसे 'अंगावर मोरपीस फिरल्यासारखे' वाटते त्याप्रमाणेच पण एकदम वेगळेच काहीतरी फिलींग असायचे ते. शब्दात वर्णन करता येणार नाही असे म्हणता येणार नाही कारण माझी एक व्याख्या होती त्या फिलींगचे वर्णन करण्यासाठी. (पण ती अशी जाहिर लिहीण्यासारखी नाहीयेय #) तर त्या आवाजाच्या मोहात पडल्यामुळे तो आवाज कानावर पडावा म्हणून मी हं च्या मागे फिरायचो. 'काय मंजुळ आवाज आहे नाही तिचा', 'किती बाई तो गोsssड आवाज', 'आवाजात काय मार्दव आणून बोलते ती', 'लताचा आवाज कसा तर कोकिळेसारखा' अश्या प्रकारच्या विषेशणांनी सजलेल्या, पुस्तकी व्याख्यांनी केलेल्या स्त्रियांच्या आवाजाचे गुणगान ऐकून आपापली समज बनवलेल्या त्या मित्रांना त्या आवाजातली मादकता कधी कळलीच नाही.

अतिशय मंजुळ आणि घोगरा ह्या दोन्हीच्या बरोबर मध्ये असणारी आवाजाची एक रेंज आहे जी मला खूप मादक वाटते. त्या आवाजाला एक वेगळाच खर्ज असतो, खोली असते. एक वेगळे Texture असते. तो आवाज ऐकल्यावर लगेच तो आवाज 'वेगळा आवाज' आहे ह्याची जाणीव होते. हे असे आवाज ऐकले की एकदम मादक पेय प्यायल्याचा फील येतो आणि जोडीला खुसखुशीत आणि खमंग चकली खाल्ल्याचा आनंद मिळतो.

त्या वेगळ्या आवाजातली मादकता म्हणजे नेमके काय हे समजावून घेण्यासाठी काही 'वेगळे आवाज' बघूयात (खरंतर ऐकूयात असे म्हणायला हवे). ते आवाज आठवले की मग मला नेमके काय म्हणायचे आहे.. ह्म्म्म.. किंबहुना मला काय एवढे मादक वाटते ते कळेल :)

डेमी मूर


हीची आणि माझी भेट घोस्ट ह्या सिनेमात झाली. त्यावेळेच्या वयानुसार जे बघायला सगळेजण इंग्रजी सिनेमे बघत त्यासाठीच हा सिनेमा बघायला गेलो होतो. पण त्यात डेमीचा आवाज ऐकला आणि बास्स! 'हे यडं' ह्या माझ्या मित्रांचे माझ्यासाठीचे संबोधन सार्थ ठरले.

त्यानंतर तो सिनेमा ढीगभरवेळा बघितला पण फक्त डेमीच्या आवाजाकरिता, आवाजातला तो मादक वेगळेपणा मला प्रचंड मोहवून टाकतो, आजही. त्यात पुन्हा त्या वेगळ्या आवाजाला सौदर्याची जी जोड आहे तो बोनस ;)

लिलीट दुबे


लिलीटला मी पहिल्यांदा पाहिले किंवा ऐकले गदर सिनेमात. पण त्या सिनेमात सनी देओलचा गदारोळ, आरडाओरडा इतका होता की त्या आवाजात तिचे वेगळेपण दडपून गेले होते पण त्या वेगळेपणाची जाणिव मात्र झाली होती. त्यानंतर झुबेदा पाहिला फक्त तिच्या आवाजासाठी (त्या करिश्मासाठी कोण वेळ फुकट घालवेल).

मग कळले की ती इंग्रजी नाटकातून पण कामे करते. एका मित्राकडे तिच्या नाटकाची सिडी आहे कळल्यावर त्याला अक्षरश: पाणी लावून लावून ती CD त्याच्याकडून घेऊन बघितली. अजुनही ती बर्‍याच सिनेमांतुन तिच्या जादुई आवाजाची भुरळ घालतच आहे.

रानी मुखर्जी


रानी मुखर्जीला खास सावळ्या रुपड्याबरोबर एका खास आवाजाचेही देणं लाभले आहे.

'राजा की आयेगी बारात' ह्या तिच्या पहिल्या सिनेमात (हो.. हो... ह्या नावाचा एक सिनेमा आला होता तिचा) तिच्या ह्या खास आवाजाच्या प्रेमात पडलो मी. तीचे कामही खास होते त्या सिनेमात पण अमजद खानच्या मुलाने त्यात अभिनय(?) करण्याचा प्रयत्न करून पाहिला होता जो सपशेल अयशस्वी ठरला होता आणि तो सिनेमा डब्यात गेला.

त्यामुळे पुढे गुलाम ह्या सिनेमात तिचा आवाज डब केला गेला. त्यात रानीच्या आवाजाचा चार्म नव्हता. पुढे करन जोहरलाही कुछ कुछ होता है साठी तिचा आवाज डब करण्याची अवदसा सुचली होती पण माझ्या सुदैवाने त्याने तसे केले नाही :)

रेखा


हीला 'लेडी अमिताभ' म्हटले जाते ते कशामुळेही असो, मी तिला लेडी अमिताभ मानतो ते फक्त तिच्या कमावलेल्या, खर्जातल्या आवाजामुळेच!

अनेक थोराड दक्षिणी अभिनेत्रींच्या गर्दीतली एक अशीच हिची ओळख होती सुरुवातीला. तिने करीयरला आकार येण्यासाठी विनोद मेहेराला हाताशी घरून ठेवले होते पण काही झाले नाही.
पुढे अमिताभच्या 'परीसस्पर्शाने' तिच्यात जो अंतर्बाह्य बदल घडून आला, त्यात तिचा आवाजही होता. खास खर्जातल्या कमावलेल्या आवाजासाठी तिने खूप मेहेनत घेतली आणि त्याचे फळ सर्वांनी ऐकलेच. आजही तिच्यासारखा दमदार आणि वेगळा आवाज असणारी तिच्या वयाची अभिनेत्री विरळाच.

तर हे आहेत मला मादक वाटणारे वेगळे आवाज! तुमचेही आवडते असे काही 'वेगळे आवाज' असतील तर जरुर कळवा :)

#: ईच्छुकांनी व्यनितुन संपर्क साधावा ;)

मौजमजाप्रकटनमतआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

30 May 2012 - 12:46 am | गणामास्तर

धाग्याचे नाव अन सुरुवाती च्या काही ओळी वाचताना तुमच्या खड्ड्यात गेलेल्या धाग्याची आठवण झाली. :)

उषा उथ्थुप.

दम मारो दम मधे फक्त एकच आलाप होता.

पण हे गाणे जरूर ऐका. (अनेकांच्या जन्माआधीचे असल्याने ऐकले नसेल. साहजीकच आहे. हा चित्रपट १९७१सालचा आहे.)

सुनिधीसारख्या अनेक फिक्या पडतात.

(अवांतर- पंचम या काळाच्यापुढे असलेल्या संगीतकाराबद्दल बोलायची जरूरी नाही.)

संजय क्षीरसागर's picture

30 May 2012 - 1:20 am | संजय क्षीरसागर

पण आता प्रतिसाद देऊन या ललनांचे तुम्हाला आवडलेले डायलॉग्ज अपलोड करा म्हणजे लेख `श्रवणीय' होईल

मराठे's picture

30 May 2012 - 1:35 am | मराठे

विद्या बालन आणि सुश्मिता सेन यांचा 'मॅच्युअर' आवाज लै म्हंजे लैच आवडतो!

सोत्रि's picture

31 May 2012 - 7:35 am | सोत्रि

मँचुअर

लै वेऴा सहमत
-( मँचुअर) सोकाजी

सुनील's picture

30 May 2012 - 2:27 am | सुनील

नरेंद्र चंचल (बॉबीमधील कव्वाली - बेशक मंदिर्-मस्जिद तोडो), सलमा आगा यांचेदेखिल आवाज हटके होते.

हुप्प्या's picture

30 May 2012 - 2:59 am | हुप्प्या

http://www.youtube.com/watch?v=eaeY8N4T7Do

किती प्रेमळ आणि प्रसन्न आहे नाही?

फरीद खानुम

http://www.youtube.com/watch?v=wqbbILfdw94

__________________________________

रेश्मा -

______________________________________
पुतलीबाई

____________________________

नाना पाटेकर यांचा आवाज वेगळा आहेच . पुढील गाण्यात त्यांचे थोडेच शब्द आहेत. पण वेल-

स्पंदना's picture

30 May 2012 - 6:03 am | स्पंदना

मला शुभा मुदगल, अन कैलास खेर यांचे आवाज आवडतात. तसा राणी मुखर्जीचा आवाजही फेवरीट!

अमृत's picture

30 May 2012 - 9:47 am | अमृत

हीचा आवाज अपल्याला आवडतो. आणखी हटके आवाज हवा असेल तर श्रीयुत. हिमेश रेशमियाजींचा काय तो दर्द आहे आवाजात(सर्दी झाल्यामुळे होणारा) वाह वाह :-)

अमृत

हिमेश रेशमियाजींचा काय तो दर्द आहे आवाजात(सर्दी झाल्यामुळे होणारा) वाह वाह

मान गये :)

मृत्युन्जय's picture

30 May 2012 - 10:31 am | मृत्युन्जय

राणी मुखर्जीचा आवाज कोणाला कसा काय आवडु शकतो? पण 'दे'मी मूर बद्दल मात्र पुर्ण सहमती.

तिमा's picture

30 May 2012 - 7:21 pm | तिमा

राणी मुखर्जीचा आवाज मला भिजलेल्या मांजरासारखा वाटतो.
अवांतर :- वेगवेगळ्या आवाजांची लग्नं झाली तर मुलांच्या आवाजाचे 'कॉकटेल' होईल का ?

चौकटराजा's picture

30 May 2012 - 11:31 am | चौकटराजा

ब्लॅक व्हाईट टेलीवव्हिजनच्या जमान्यात दूरदर्शनवर "लुकू सन्याल" नावाची निवेदिका होती. मादक व खर्जाकडे झुकणारा तिचा आवाज ५० च्या वरच्या लोकाना आजही आठवत असेल.
विशेष आवाजात मीनाकुमारीचा आवाज लक्शात रहाण्यासारखा होता.

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2012 - 11:33 am | परिकथेतील राजकुमार

आपल्याला तर बॉ सलमा आगाचा आवाज आवडतो.

शिल्पा ब's picture

30 May 2012 - 11:37 am | शिल्पा ब

मलापण..

दिलीके अरीमां आंसुंओंमें लुटी गए..हमीं वफा करीके भी तनीहा रही गए ए ए..

भारी गाणं ए!

परिकथेतील राजकुमार's picture

30 May 2012 - 11:40 am | परिकथेतील राजकुमार

तिच्या आणि राज बब्बरच्या आवाजाची जुगलबंदी काय वर्णावी .

प्रदीप's picture

30 May 2012 - 7:33 pm | प्रदीप

दिलीके अरीमां आंसुंओंमें लुटी गए..हमीं वफा करीके भी तनीहा रही गए ए ए..

अंगंदीं...

फालतू गायक/ गायिका निव्वळ पाकिस्तानी आहेत म्हणून कौतुक करायचे तेव्हापासूनच चालू झाले!

उदय के'सागर's picture

30 May 2012 - 11:36 am | उदय के'सागर

माधुरी दिक्षीत चा अवाज आवडतो... विशेषतः हसतांना जो अवाज असतो तो... व्वा... एकदम घायाळच करतो तो अवाज!!!

कोंकणा सेन-शर्मा चा अवाज पण खुप गोड आहे... खुपच फिदा आहे तिच्या अवाजावर....

सिमरन भार्गव हि खुप छान होस्ट्/निवेदिका आहे... खुपच आकर्षक व्यक्तिमत्त्व... आणि खुप शांत (सुदिंग) बोलणं आहे तिचं...ऐकत राहावं असंच...

आणि रेखाच्या अवाजाचा, तिच्या सौंदर्याचा, अभिनयाचा प्रचंड मोठ्ठा फ्यान आहे.... :)

कंगना राणावत----हि बया बोलायला लागली को अगदी नको नको होतं... कानांवर अत्याचार... टॉर्चर :(

बाकि ह्या मंडळींच्या अवाजाबरोबर त्यांच्या बोलण्याची ढब/पद्धत जाम भावते :
प्रियंका चोप्रा
विद्या बालन
सुश्मिता सेन
दिपीका पादुकोण
मलाईका अरोरा-खान
सोनाली कुलकर्णी (जुनी)
वर्षा उसगांवकर (पण खुपच मोजुन मापुन बोलते म्हणुन मग 'डिप्लोमॅटिक' वाटते)


कामिनी कौशल, बेबी तब्बसूम ह्यांचे अवाज ऐकले कि लहानपणीचे दिवस आठवल्यावाचुन राहत नाहि... त्या काळात सगळ्याच बाळ-गोपाळांना लळा लावला होता ह्यांनी...काय गोडवा त्या अवाजात...तोडच नाहि :)

नन्दादीप's picture

30 May 2012 - 11:47 am | नन्दादीप

आपल्याला बॉ राणी मुखर्जी तिच्या आवजासकट आवडते.
खरतर तिचा आवाज "च" जास्त आवडतो....

गवि's picture

30 May 2012 - 2:25 pm | गवि

अदनान सामी.. बसकट पण सुरेल..आणि ( योग्य जागी !!) चिरकादेखील होणारा आवाज..

-सिली सिली तपती रातों में.. - सलाम ए इश्क.
-बातें कुछ अनकही सी - मेट्रो(अदनान व्हर्शन)
- मीटर डाऊन - टॅक्सी नं ९२११
- ऐ उडी उडी उडी.. - साथिया
-कभी नही (अमिताभसहीत)

ही गाणी अदनानखेरीज इतर गोडगोड आवाजवाल्या कोणाकडून ऐकण्याची कल्पना करता येत नाही.. तशी गाऊन घेतलीच असती तर ती बरीच वेगळी झाली असती.

बाकी अमिताभचा गायक म्हणून आवाज हीदेखील वेगळी चीज आहे..

-एक रहन ईर एक रहन बीर.. एक रहन फत्ते.. एक रहन हम..

"अक्स"मधेही आहे बहुधा एक गाणं, आत्ता आठवेना.

दिपोटी's picture

30 May 2012 - 2:44 pm | दिपोटी

गायिकांमध्ये इला अरुणचा आवाज एकदम हटके आहे.

http://www.youtube.com/watch?v=dGR2rA-engk

http://www.youtube.com/watch?v=XglltKu_Fnk

अभिनेत्रींमध्ये तब्बूचा आवाज विशेष व वेगळा वाटतो.

- दिपोटी

आबा's picture

30 May 2012 - 2:48 pm | आबा

जेरेमी ब्रेट
हे ऐकाच http://www.youtube.com/watch?v=81qmI1I-INc

पियुशा's picture

30 May 2012 - 3:05 pm | पियुशा

गायकांमध्ये -
लकी अली " ओ सनम "

गायिकांमध्ये -
शिल्पा राव " खुदा जाने के मै फिदा हु "
उषा उत्थुप - "हरे रामा हरे क्रिष्णा "
श्रुती पाठक - " तुझे भुला दिया ओ "
नंदीनी श्रीकर - " भरे नैना ,बहे मोरे नैना ,झरे मोरे नैना "

नायिकांमध्ये :
चित्रांगणा सिंह
राणी मुखर्जी

नायकांमध्ये
फरहान अख्तर
सैफ अली खान

ओम पुरी
अमरिश पुरी ( हे दोघे नक्की कुठल्या क्याटेगरित येतात ) ;)

हुस्श................ मला तरी यांचे आवाज वेगळे वाटतात :)

किचेन's picture

30 May 2012 - 3:20 pm | किचेन

सैफ अलि खान ...हा मला फक्त त्यच्या आवाजासाठि आवदतो.

विजुभाऊ's picture

11 Oct 2014 - 3:48 pm | विजुभाऊ

सैफ अलि खान ...हा मला फक्त त्यच्या आवाजासाठि आवदतो.

अरे बापरे......... इतका भयानक. ब्लेडने पत्र्यावर घासताना आणि सैफ बोलताना एक सारखाच आवाज येतो

ज्युली लंडन चे "यु गो टू माय हेड" गाणे जरुर ऐका. या स्लो गाण्यातील तिचा आवाज ऐकताना अक्षरक्षः, वारुणी पीत आहोत असा भास होतो.

http://www.youtube.com/watch?v=YmV5oThSwK4
_____________________________________________________________________________

केरोल अ‍ॅल्स्ट्न चा "कुम्बायाह माय लॉर्ड कुम्बायाह" मधील आवाज अप्रतिम!!
http://www.youtube.com/watch?v=eYZwoodmAhw

वेताळ's picture

30 May 2012 - 7:43 pm | वेताळ

राणी खरोखरच मस्त आहे. तिचा आवाज मलाही आवडतो.विद्याबद्दल पण सोत्रीनी लिहायला पाहिजे होते.

सोत्रि's picture

30 May 2012 - 11:39 pm | सोत्रि

विद्याबद्दल लिहायचे तेही फक्त आवाजाबद्दल...ये तो बहुत नाइन्साफी है| म्हणून लिहीले नाही :D

- (विद्यामय) सोकाजी

मदनबाण's picture

30 May 2012 - 8:41 pm | मदनबाण


हीचा आवाज हल्ली मला लयं म्हणजी लयं आवडतोया...अन् अभिनय ही ! ;)
या मोहक लावण्यवतीचे नाव आहे मॄणाल दुसानिस. ;)

अमीन सायानी यांचा आवाज वेगळा आहे.

अप्रतिम's picture

30 May 2012 - 9:02 pm | अप्रतिम

आवाज पुरुषी आहे..पण मला आवडतो...

सोत्रि's picture

30 May 2012 - 11:36 pm | सोत्रि

बर्‍याच जणांना माहिती नसावे, टुणटुण हीने तीच्या फिल्मी दुनियेची सुरुवात पार्श्वगायिका म्हणून केली होती. तीचे त्यावेळचे नाव उमा देवी.
अफसाना लिख रही हू दिले बेकरार का आंखो मे रंग भरके... एकदम खास वेगळ्या आवाजातले गाणे

- (ह्या गाण्याचा पंखा) सोकाजी

सुहास..'s picture

31 May 2012 - 12:49 am | सुहास..

मला " आवाज " नावाचे मासिक आवडते , अजुन ही =)) =))

असो जोक्स अपार्ट !! बरेचशे आवाज आहेत आयुष्यात नुसत मोबाईलवर " हॅलो " म्हणल की समजते ..पण तरी बी हि यादी !!

आवाज गाण्याच्या म्हणाल तर ...आशा आणि किशोर ....

आवाज मोबाईल वर म्हणाल तर .....आहे एक मैत्रीण ;)

आवाज क्लांईट चा म्हणाल तर ....फिल म्हणुन एक आहे स्साली ;)

आवाज शिव्यांच्या म्हणाल तर ...आहे एक मित्र रां**कोल्हापुरी

आवाज जरबी म्हणाल तर ....खुद्द घरातच एक पिळदार शरीर आणि मिश्या असलेले व्यक्तीमत्व वावरत सभोवताली

आवाज प्रेमळ म्हणाल तर ......घालते भाकरी दोन वेळच्या ...

आवाज सख्ख्या मित्राचा म्हणाल तर .....आहे एक स्साल बुधवारच्या कविता लिहीणारं

आवाच हलकटाचा म्हणाल तर .......हे टिंग्या नावाच भुत लागल मला....

आवाज गुरूदेवांचा म्हणाल तर ........झटक्यात प्रसन्नदा आठवले

आणि आवाज हिरोईन चा म्हटले तर..........सध्या परिनीता ...मैं परेशान परेशान परेशा !! :)

चिंतामणी's picture

31 May 2012 - 1:01 am | चिंतामणी

अनेक वेगळ्या आवाजांची चर्चा येथे चालू आहे हे पाहील्यावर मला या आवाजाची आठवण झाली.

आजच्या जमान्यातील किती जणांना हा "आद्य गझल सम्राट" ठाउक असेल या बद्दल शंका आहे. परन्तु वेगळाच आवाज घेउन आलेल्या या गायकाने अनेक पिढ्यांच्या हृदयावर राज्य केले आहे.

"जलते है जिसके लिये" हे दुस-या कोणाही गायकाच्या आवाजात कसे वाटेल याची कल्पनासुद्धा करता येत नाही.

"मेरी याद मे तुम ना आसू बहाना" असो अथवा "तेरी आँख के आँसू पी जाऊं ऐसी मेरी तक़दीर कहाँ" सारखी गजल असो वा "आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत लिए" अथवा "इतना न मुझसे तू प्यार बढ़ा"
के मैं एक बादल आवारा" सारखी रोमॅंटीक गीते असोत, या आवाजाची जादू तुम्हाला भुरळ पाडेल.

तलत मेहमुद यांनी मराठी गाणीसुद्धा गायली. "हसले आधी कुणी" हा गाणे खूप गाजले होते.

स्वप्नज's picture

12 Oct 2014 - 7:26 pm | स्वप्नज

सनी लिओनी यांच्या आवाजाबद्दल कुणी कसे बोलले नाही अजून....!!!
केवळ स्वरयुक्त आवाज असतो यांचा. व्यंजनाची गरज नसते हिला......

टवाळ कार्टा's picture

13 Oct 2014 - 9:00 am | टवाळ कार्टा

त्या भाषेला सनी खडी म्हणतात ;)

प्रमोद देर्देकर's picture

16 Oct 2014 - 10:58 am | प्रमोद देर्देकर

अगदि अगदि ट.का. सहमत आहे. आणि ज्याला कोणाला ती सनी खडी सचित्र पाहिजे असेल त्या इच्छुकांनी व्य.नी. करावा.

तुमचा अभिषेक's picture

14 Oct 2014 - 8:55 pm | तुमचा अभिषेक

पुरुषांमध्ये अमिताभ, नाना, विनय आपटे, रमेश भाटकर, संजय दत्त, निळू फुले, उपेंद्र लिमये ... वगैरे आवाज आवडतात.

महिलांमध्ये ... श्रीदेवी !

हाडक्या's picture

14 Oct 2014 - 9:48 pm | हाडक्या

आवडत्या पुरुषांमध्ये एवढी मोठ्ठी लिष्ट आणि एकच बाई ?

दया कुछ तो गडबड है.. *secret*