प्रश्न आणि प्रश्न...

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
2 May 2012 - 11:44 pm

दुसर्‍या महायुद्धानंतर जगात दोन शक्ति अस्तित्वात आल्या. एक अमेरीका, दुसरा रशिया.

रशियाचे मांडलिक म्हणवून घेतील असे अनेक देश. रशियाचा जगातल्या अनेक देशांवर वचक.
जागतिक राजकारण बोटावर खेळवण्याचं सामर्थ्य रशियामधे होतं.

असं काय झालं
ताजिकीस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान असे रशियाचेच तुकडे कसे काय पडले.

भारत हे महान राष्ट्र आहे. ज्या इंग्रजांचे जगावर राज्य होते त्या इंग्रजान्ना आमच्या लोकांनी इथून हाकलून लावले.
एवढा बलाढ्य शत्रू परास्त केला मग फाळणी का वाचवू शकलो नाही.

आज देशाचे एक नाही दोन नाही तीन तुकडे झालेत. भारत पाकिस्तान बांग्लादेश. का बरे ?

बलाढ्य अमेरीका पण जुळे मनोरे उध्वस्त झाले तेव्हा कशी भयभीत झाली.
नंतर अमेरीकेने मोठा आव आणला न घाबरल्याचा पण आता ताक सुद्धा फुंकून पिते आहे.
का ?

भिवंडीमधे पौलिसचौकी उभी करायला पोलिस का घाबरतात ? एकदा प्रयत्न झाला.
काही पोलिस खलास झाले.

काश्मीरमधे भारताचा तिरंगा फडकावायला विरोध होतो. का ?

महाराष्ट्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे
मराठी आपली मातृभाषा नाही असं का सांगतात ?

आन्ध्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे तेलुगू सोडून
हैद्राबादी हिन्दीत का बोलतात.

नेहमी विचार करताना पडलेले हे काही प्रश्न

या सगळ्याची संगती लावण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे नेमकं या सगळ्यामागे ?
उत्तरे मिळतील का ...

संस्कृतीइतिहासअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

4 Jun 2012 - 11:59 pm | आशु जोग

काश्मीरमधील पंडीतांचे निर्वासित होणे किंवा
२००६ चे रेल्वे मधील बॉम्बस्फोट असा विषय निघाला

की

दंतेवाडा, नक्षलवाद यावर बोला असे म्हणायचे

आणि

डॉ. नाईक यांचा विषय आला की

सिंघल, तोगडीया अशी नावे फेकायची

--

चालू द्या ...

नितिन थत्ते's picture

5 Jun 2012 - 10:52 am | नितिन थत्ते

.

आशु जोग's picture

19 Aug 2012 - 1:20 am | आशु जोग

उत्तरे अजुन सापडलेली नाहीत

प्रश्नांचे स्वरूप गम्भीर होत चालले आहे

उत्तरे अजून मिळाली नाहीत कारण प्रश्न चुकीचे आणि एका विशिष्ट उद्देशाने लोडेड आहेत.

उदाहरणार्थ रशियाचे तुकडे झाले असं म्हणताना प्रश्नात असं दाखवलं गेलं आहे जुन्या सोव्हिएट युनियनमधून जणू फक्त मुस्लिम बहुल प्रांतच फुटले आहेत. सोव्हिएट रशियाचे विभाजन झाले तेव्हा युक्रेन, जॉर्जिया हेही वेगळे झाले हे झाकले गेले आहे.

बाकी भिवंडीतल्या पोलीस चौकीबद्दल जे काही लिहिले आहे त्यावरून धागाप्रस्तावक कधीही भिवंडीला गेलेले नाहीत हे दिसून येते.

आशु जोग's picture

14 Feb 2013 - 3:21 pm | आशु जोग

.

पप्पु अंकल's picture

14 Feb 2013 - 8:44 pm | पप्पु अंकल

अगदी योग्य

> आपण साधे कसाबला फासावर चढवू शकत नाही.
अखेर चढवले कसाबला

मनोरा's picture

17 Feb 2013 - 7:44 am | मनोरा

माझा प्रश्न हा आहे व मला एका परदेशी कलीग ने विचारलेला प्रश्न ही तोच होता- एव्ह्ढ्या मोठ्या भारतावर ( पाकिस्तान, बान्ग्लादेश व सध्याचा भारत) हे शम्भर ईन्ग्रज २०० वर्ष राज्यच कसे काय करु शकले? आय रेड युर हिस्टरी. आय कुड नॉट अन्डरस्ट्यान्ड वन थिन्ग द्याट हाउ कम सो स्माल ब्रिटिश इन नम्बर्स कॉन्कर सो बिग इन्डिया यान्ड रुल फॉर २०० इयर्स मी. मनोरा? मी आजही निरुत्तर.