प्रश्न आणि प्रश्न...

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
2 May 2012 - 11:44 pm

दुसर्‍या महायुद्धानंतर जगात दोन शक्ति अस्तित्वात आल्या. एक अमेरीका, दुसरा रशिया.

रशियाचे मांडलिक म्हणवून घेतील असे अनेक देश. रशियाचा जगातल्या अनेक देशांवर वचक.
जागतिक राजकारण बोटावर खेळवण्याचं सामर्थ्य रशियामधे होतं.

असं काय झालं
ताजिकीस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान असे रशियाचेच तुकडे कसे काय पडले.

भारत हे महान राष्ट्र आहे. ज्या इंग्रजांचे जगावर राज्य होते त्या इंग्रजान्ना आमच्या लोकांनी इथून हाकलून लावले.
एवढा बलाढ्य शत्रू परास्त केला मग फाळणी का वाचवू शकलो नाही.

आज देशाचे एक नाही दोन नाही तीन तुकडे झालेत. भारत पाकिस्तान बांग्लादेश. का बरे ?

बलाढ्य अमेरीका पण जुळे मनोरे उध्वस्त झाले तेव्हा कशी भयभीत झाली.
नंतर अमेरीकेने मोठा आव आणला न घाबरल्याचा पण आता ताक सुद्धा फुंकून पिते आहे.
का ?

भिवंडीमधे पौलिसचौकी उभी करायला पोलिस का घाबरतात ? एकदा प्रयत्न झाला.
काही पोलिस खलास झाले.

काश्मीरमधे भारताचा तिरंगा फडकावायला विरोध होतो. का ?

महाराष्ट्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे
मराठी आपली मातृभाषा नाही असं का सांगतात ?

आन्ध्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे तेलुगू सोडून
हैद्राबादी हिन्दीत का बोलतात.

नेहमी विचार करताना पडलेले हे काही प्रश्न

या सगळ्याची संगती लावण्याचा प्रयत्न करतोय. काय आहे नेमकं या सगळ्यामागे ?
उत्तरे मिळतील का ...

संस्कृतीइतिहासअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

१. आपण क्लोरमिंट का खातो?

२. व्हाय धिस कोलावेरी डी?

३. ये मेलडी इतनी चॉकलेटी क्यूं है?

या प्रश्नांची उत्तरे मिळाली की वरच्या सर्व प्रश्नांची उत्तरेदेखील आपोआप मिळतील.

प्रश्न प्रश्न प्रश्न

घ्या अजुन दोन प्रश्न...........

काही विशिष्ट वृंदातले लोक सतत फाळणी, देश, सुरक्षा, ५५ कोटी अशा 'गोडश्या ' बाता का मारत असतात?
पण सैन्यात मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, जाट रेजिमेंट... तशी यांची रेजिमेंट का नाही निघत?

( नुस्ता वृंद हा शब्द वापरला आहे. नस्ता जातीयवादी 'भ्रम' करुन घेऊन वाद घालू नये. )

पुन्हा तोच प्रतिसाद एडीट करण्‍याच्या तुमच्या चाळ्याला या प्रतिसादाचे बूच मारुन निषेध केला जात आहे ;-)

शिल्पा ब's picture

3 May 2012 - 12:39 am | शिल्पा ब

आहे तेच एडीट करणार ना? कमाल करता यक्कुबुवा तुम्ही पण!!

त्यांनी लाख एडीट करावं, पण त्या प्रतिसादात काही नवं लिहिलं/ जुनं पुसलं तर पाहिजे ना ? असं काही न करता दर दोन मिनिटाला नुसतंच एडीट;-)
म्हणजे काय समजायचं?

JAGOMOHANPYARE's picture

3 May 2012 - 12:46 am | JAGOMOHANPYARE

किरकोळ एडिटिंग असतं. शुद्धलेखन , एखादा शब्द बदलणे वगैरे.

जाऊ द्या हो, मार्क कापणार आहे का कुणी :p

शंकानिरसनाबद्दल धन्यवाद :)

कुंदन's picture

3 May 2012 - 1:03 am | कुंदन

शुद्धलेखन यकु ला औट्सोर्स करा की.

भाषांतरानंतर आता शुद्धलेखनाकडे मोर्चा का आता..?

परिकथेतील राजकुमार's picture

3 May 2012 - 11:20 am | परिकथेतील राजकुमार

काही विशिष्ट वृंदातले लोक सतत फाळणी, देश, सुरक्षा, ५५ कोटी अशा 'गोडश्या ' बाता का मारत असतात?

त्या मारल्या की काही सी-ग्रेडींची मुळव्याध एकदम भगभगायला लागते. त्यांची तळमळ पाहून आपल्याला तर जाम मजा येते. आणि जरा कुठे २ शाब्दीक रट्टे नाही पडले की लगेच हे सी-ग्रेडी आम्ही की नाही 'ब्रह्मवृंदातले' आहोत असा जो टाहो फोडतात, तो तर धमाल आणतो.

पण सैन्यात मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, जाट रेजिमेंट... तशी यांची रेजिमेंट का नाही निघत?

कसे आहे, आधी अक्कलेने प्रश्न सोडवावे लागतात. नाहीच तर मग मारामारी आहेच की. आता अक्कल लावायला त्यांच्याशिवाय कोणी सापडत नसेल त्याला काय करणार ?

माझं टमरेल कुणी पळावलं रे ? हा सुद्धा एक असाच प्राचीन प्रश्न आहे.
अवांतर - राम हरणाच्या मागं लागला ते बहुधा याचमुळं, ते बायकोनं ब्लाउजला कापड मागणं वगैरे नंतरचा भाग झाला.

माझं टमरेल कुणी पळावलं रे ? हा सुद्धा एक असाच प्राचीन प्रश्न आहे.

जगाच्या पाठीवरील काही देशात टमरेल संस्कृती नाही असं एक निरीक्षण नोंदवू इच्छितो. किंबहूना भारतातही कॉर्पोरेट नामक यंत्रणा टमरेल संस्कृती फाटयावर मारते. तर प्रश्न असा आहे की टमरेल संस्कृती कशी वाचवता येईल?

टमरेल संस्क्रुती फाट्यावर मारुन जी सोय केलेली असते तिचा वापर करणे सोडुन द्या, बघा टमरेल संस्क्रुती कशी बहराला येते ते .

रणजित चितळे's picture

3 May 2012 - 9:20 am | रणजित चितळे

असं काय झालं
ताजिकीस्तान, कझाकिस्तान, अझरबैजान असे रशियाचेच तुकडे कसे काय पडले.

ह्या सगळ्या भागात मुस्लीम समुदाय जास्त आहे, त्याला वेगळे व्हायचे होते. ड्रग्स माफिया आहे व कम्युनिझमनी आलेली भयंकर गरीबी. मुख्य म्हणजे रशिया हे वेगवेगळ्या देशांचे झालेले कडबोळे होते (ussr पूर्वीचे ) सगळे सैबेरीयाच्या धाकावर चालत असायचे. गोरबाचेव्हने जसे परिवर्तन आणले (स्टच होल्ड कमी केला) तसे हे सगळे गरीब प्रांत अलग झाले.

भारत हे महान राष्ट्र आहे. ज्या इंग्रजांचे जगावर राज्य होते त्या इंग्रजान्ना आमच्या लोकांनी इथून हाकलून लावले.
एवढा बलाढ्य शत्रू परास्त केला मग फाळणी का वाचवू शकलो नाही.

आज देशाचे एक नाही दोन नाही तीन तुकडे झालेत. भारत पाकिस्तान बांग्लादेश. का बरे ?

मी एक अभ्यास केला आहे - जेव्हा जेव्हा मुसलमानांची संख्या २० -२५ प्रतिशत झाली तेव्हा तेव्हा फाळणी झाली आहे. जेव्हा कोणत्याही प्रांतात ती १-२ टक्के असते तेव्हा ते शांत राहातात. ५ - ६ टक्के असते तेव्हा छोट्या मोठ्या कुरबूरी सुरु होतात. १० - १५ टक्के होते तेव्हा एक गठ्ठा मताने मतदानावर परीणाम होतो (युपी, असाम, केरळ - केरळातले मुसलमान संख्येने खुप असले तरी त्या मानाने पूर्वी पासून ते धंध्यात - ट्रेड मध्ये जास्त असल्या कारणाने मिसळून गेले आहेत). फाळणी पूर्व भारतात त्यांची संख्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त होती (सरकारीया कमीशनचा वृत्तांत वाचण्या सारखा आहे). आता ती संख्या भारतात १३ टक्क्यांवर आहे. पण ५३० जिल्ह्यांमध्ये साधारण २०० च्या वर ती २० टक्क्या वर येत आहे. अन तो कॉरीडॉर पाकिस्तान पासून सूरु होऊन बांगलादेश पर्यंत आहे.....

बलाढ्य अमेरीका पण जुळे मनोरे उध्वस्त झाले तेव्हा कशी भयभीत झाली.
नंतर अमेरीकेने मोठा आव आणला न घाबरल्याचा पण आता ताक सुद्धा फुंकून पिते आहे.
का ?

घाबरले जरी असतील तरी काही तरी अॅक्शन घेतली व अजून घेत आहेत - आपण साधे कसाबला फासावर चढवू शकत नाही.

भिवंडीमधे पौलिसचौकी उभी करायला पोलिस का घाबरतात ? एकदा प्रयत्न झाला.
काही पोलिस खलास झाले.काश्मीरमधे भारताचा तिरंगा फडकावायला विरोध होतो. का ?

पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, "आपले" म्हणुन सोसायचे।
तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?

महाराष्ट्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे
मराठी आपली मातृभाषा नाही असं का सांगतात ?

जर अमराठी असतील तर का सांगावे त्यांनी. ते जर मराठी बोलत नसतील घरात, तर का असावी त्यांची मातृभाषा मराठी. हे जाऊ देत महाराष्ट्रात किती तरी मराठी कुटूंब आहेत जी घरात फक्त इंग्रजी बोलतात. त्यांचे काय.

आन्ध्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे तेलुगू सोडून
हैद्राबादी हिन्दीत का बोलतात.

हिंदी हळूहळू येऊ लागली आहे व शेजार पाजारचा प्रभाव म्हणून.

अजून काही उत्तरं पाहीजेत का?

नितिन थत्ते's picture

3 May 2012 - 10:06 pm | नितिन थत्ते

>>ह्या सगळ्या भागात मुस्लीम समुदाय जास्त आहे, त्याला वेगळे व्हायचे होते. ड्रग्स माफिया आहे व कम्युनिझमनी आलेली भयंकर गरीबी. मुख्य म्हणजे रशिया हे वेगवेगळ्या देशांचे झालेले कडबोळे होते (ussr पूर्वीचे ) सगळे सैबेरीयाच्या धाकावर चालत असायचे. गोरबाचेव्हने जसे परिवर्तन आणले (स्टच होल्ड कमी केला) तसे हे सगळे गरीब प्रांत अलग झाले.

सोव्हिएट युनिअनमधून फक्त मुस्लिम प्रांतच वेगळे झाले नसून, युक्रेन, जॉर्जिया इत्यादि प्रांतही वेगळे झाले आहेत.

होल ट्रुथ सांगायचा प्रयत्न हो.

रणजित चितळे's picture

4 May 2012 - 11:57 am | रणजित चितळे

खरे आहे

भिवंडीत पोलिस चौकी आहे.. http://thanepolice.org/bhivandicity_police_station.php

तुम्ही जे सांगताय तिथे जागेवरुन वाद आहे.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2006-07-06/mumbai/27819720_1...
--------------------------------------------------------------------
आ अंटे आंध्रा चलो ... http://en.wikipedia.org/wiki/Andhra_Pradesh

The primary official language of Andhra Pradesh is Telugu [3] Other languages often spoken in the state include Hindi, Marathi, Tamil, Kannada, and Oriya.[4]

तुम्हाला फक्त हिंदी बोलणार्‍या लोकांबद्द्लच का वेगळा उल्लेख करावा वाटला ते तुम्हालाच माहीत.
-----------------------------------------------------------------------------------
महाराष्ट्रात पिढ्या न पिढ्या राहणारी काही माणसे मराठी आपली मातृभाषा नाही असं का सांगतात ?

त्यात गैर काय आहे? मातृभाषेची व्याख्या समजावून घ्या... A first language (also native language, mother tongue, arterial language, or L1) is the language(s) a person has learned from birth[1] or within the critical period, or that a person speaks the best and so is often the basis for sociolinguistic identity. In some countries, the terms native language or mother tongue refer to the language of one's ethnic group rather than one's first language.[2] Sometimes, there can be more than one mother tongue, when the child's parents speak different languages. Those children are usually called bilingual.
http://en.wikipedia.org/wiki/First_language

माझ्या आजूबाजूच्या चार कुटुंबांची अमूक एक मातृभाषा आहे, म्हणून माझीही तीच असावी, असा नियम नाही .. मीही ती भाषा बोलत असेन, वापरत असेन पण तरीही माझी मातृभाषा वेगळी असू शकते.
------------------------------------------------------------------------------------
काश्मीरबाबत उत्तर माझ्या वरच्या दुसर्‍या एका प्रतिसादात दिलेले आहे.. ( 'गोडश्या' गप्पा मारणारं सगळं पब्लिक नुस्तं बडबडण्यापेक्षा जर ६० वर्षात सैन्यात गेलं असतं तर कदाचित काश्मीरमध्ये झेंडा फडकला असता. मरायला बहुजन आणि चरायला --- आणि हे विचारतात काश्मीरात झेंडा का लागत नाही? :) )
-------------------------------------------------------------------------------------
बाकी, रशिया , अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेश... त्यांचा विचार त्यानी करावा.
------------------------------------------------------------------------
तुमचे सगळे प्रश्न संपले.
आता ऐकूया राग भैरव.. http://www.youtube.com/watch?v=CeT1H80tfP0
मेरो अल्ला मेहेरबान
कोई बिगाड सकत नही तेरो.

रणजित चितळे's picture

3 May 2012 - 11:12 am | रणजित चितळे

माझ्या आजूबाजूच्या चार कुटुंबांची अमूक एक मातृभाषा आहे, म्हणून माझीही तीच असावी, असा नियम नाही .. मीही ती भाषा बोलत असेन, वापरत असेन पण तरीही माझी मातृभाषा वेगळी असू शकते.
------------------------------------------------------------------------------------
काश्मीरबाबत उत्तर माझ्या वरच्या दुसर्‍या एका प्रतिसादात दिलेले आहे.. ( 'गोडश्या' गप्पा मारणारं सगळं पब्लिक नुस्तं बडबडण्यापेक्षा जर ६० वर्षात सैन्यात गेलं असतं तर कदाचित काश्मीरमध्ये झेंडा फडकला असता. मरायला बहुजन आणि चरायला --- आणि हे विचारतात काश्मीरात झेंडा का लागत नाही? )

सहमत

इस्पिक राजा's picture

3 May 2012 - 11:22 am | इस्पिक राजा

मरायला बहुजन आणि चरायला --- आणि हे विचारतात काश्मीरात झेंडा का लागत नाही?

तुम्ही अक्कलशून्य आहात काय हो? की अतिशहाणे? आधीच एक जातिवाचक वाद तुमच्यामुळेच चालु झालेला असताना परत परत कशाला आगीत तेल ओतताय? तुमच्यासारख्या जातिद्वेष्ट्यांमुळेच समाजात दूही माजते आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

3 May 2012 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार

तुम्ही अक्कलशून्य आहात काय हो? की अतिशहाणे? आधीच एक जातिवाचक वाद तुमच्यामुळेच चालु झालेला असताना परत परत कशाला आगीत तेल ओतताय? तुमच्यासारख्या जातिद्वेष्ट्यांमुळेच समाजात दूही माजते आहे.

अहो, सय्या भये कोतवाल.. अब डर काहे का ?

संपादकच त्यांच्या जातिवाचक प्रतिसादांना 'वाह वाह' , 'निबर हाणलाय' अशा शब्दात पाठी थोपटत असतील तर त्यांना जोर चढणारच की. :)

आदिजोशी's picture

3 May 2012 - 2:15 pm | आदिजोशी

खाजवून खरूज काढणार्‍यांची खाज मिटवण्याचे पालथे धंदे सांगितलेत कुणी? जे ते जिथे तिथे योग्य आहेत. बाकी शून्य फाट्यावर. अशांना सोडून द्यावे आणि मजा बघावी.
संपादकांनाही सोडोनी द्यावे.

आयला गंमतच आहे... भ्रम शब्द लिहिला तरी याना यांचीच जात वाटते.. आता इथं कुठला शब्दच लिहिलेला नाही, तरी याना यांचीच जात दिसते. गंमतच की !

श्रीरंग's picture

7 May 2012 - 12:38 am | श्रीरंग

हे असले पळपुटे आणी भिक्कार युक्तिवाद करण्यापेक्षा, तुमच्याकडे मुद्दा नसताना गप्प पडून बाकिच्यांनी लिहिलेले केवळ वाचत जा. किंवा स्वतः जे लिहिलय त्याचं समर्थन करण्याचं धैर्य जवळ बाळगा.

इरसाल's picture

3 May 2012 - 10:31 am | इरसाल

आवडले.अतिशय संयत आणि माहितीपुर्ण प्रतिसाद.

अवांतर : आज्काल मला काही प्रतिसादवरुन डुआयडीची स्वप्न पडत आहेत.

रणजित चितळे's picture

3 May 2012 - 11:14 am | रणजित चितळे

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
..

मस्त

इरसाल's picture

3 May 2012 - 3:00 pm | इरसाल

.

सुजित पवार's picture

3 May 2012 - 2:18 pm | सुजित पवार

इन्ग्रज स्वता गेले त्याना कोनि पल्वुन नाहि लावले.

प्यारे१'s picture

3 May 2012 - 2:51 pm | प्यारे१

अरे लोकांनो (सभ्य शब्द वापरतोय)...
ब्राह्मण व तत्सम आणि ब्रिगेडी व तत्सम लोक सोडून महाराष्ट्रात भरपूर इतर समाज आहे आणि त्यांना तुमच्या ह्या असल्या कोण कुणाला लागू होतं आणि असल्या इतर 'पालथ्या धंद्यांशी' काहीही शष्प घेणं देणं नाही.

कृपया ज्यानं काहीही निष्पन्न होणार नाही असा इतिहास गाडा आणि आपले हे पालथे धंदे बंद करा..... !

बॅटमॅन's picture

3 May 2012 - 2:57 pm | बॅटमॅन

>>असल्या इतर 'पालथ्या धंद्यांशी' काहीही शष्प घेणं देणं नाही.

हा शब्द मी पहिल्यांदा वाचला तेव्हापासून त्याचा जब्बरदस्त फॅन आहे :) सभ्य परंतु येकदम परिणामकारक. बाकी आपल्या मताशी सहमत.

JAGOMOHANPYARE's picture

3 May 2012 - 3:31 pm | JAGOMOHANPYARE

अगदी सहमत

राजघराणं's picture

3 May 2012 - 7:15 pm | राजघराणं

+१

इतिहासात भारत कधीच एक एकसंध देश नव्हता.
तसे पहायला गेले तर हे महान राष्ट्र कंदहार पासून ब्रह्मदेशापर्यन्त पसरलेले होते. त्याचे केवळ तीनच नव्हेत तर एकुणात किती तुकडे झालेत एकदा मोजायलाच हवे. श्रीलंका ,मलद्वीप , तसेच जावा सुमात्रा पासून ते नेपाळ भूतान तिबेट हे देखील त्या महान राष्ट्राचे भाग होते.
हे तुकडे कोणी केले आणि त्या महान राष्ट्रातील लोकानी त्याला कधीच विरोध का केला नाही याचाही विचार व्हावा.

अगदी सहमत. समान धर्म असूनही हे प्रांत भारतापासुन वेगळे झालेच.. आणि इतर कुठले प्रांत वेगळे झाले तर अमूक धर्माच्या लोकानी आमचा देश तोडला असा आक्रोश करत काही लोक आजही कलकलाट करतात.

इतिहासात भारत कधीच एक एकसंध देश नव्हता.

भारतवर्श हिंदू धर्माने गुंफला गेला होता. हे वेगवेगळे प्रांत चंद्रगुप्त व चाणक्याच्या प्रयत्नांनी एकजूट व्हायला लागले होते. त्या वेळेला कोणचेच युरोपिय देश किंवा अमेरीकन देश एक संध नव्हते. प्रत्येक देशात लढाया होत्या, युद्ध होत होती. आपल्या राष्ट्रची ऐतिहासीक सीमा सांधल्या गेल्या होत्या पण देशाच्या (political) सीमा सांधायच्या होत्या. भारतवर्शात राहाणारी लोक बहूतांशी एकच जीवन पद्धत जगत होती....

MAKING PEACE WITH HISTORY --

http://www.rashtravrat.blogspot.in/2010/09/making-peace-with-history.html

पुण्याचे वटवाघूळ's picture

7 May 2012 - 8:17 am | पुण्याचे वटवाघूळ

भारतवर्श हिंदू धर्माने गुंफला गेला होता.

धर्म हे राष्ट्र एकत्र ठेवायचे कारण होऊ शकत नाही हे जगात वारंवार सिध्द झाले आहे. युरोपात एक अल्बेनिया सोडला तर इतर सगळ्या राष्ट्रांचा धर्म एकच आहे. धर्म हे राष्ट्र एकत्र ठेवायचे कारण असते तर या वेगळ्या देशांचे अस्तित्व न राहता एकच "युरोपीय राष्ट्र" निर्माण झाले असते. तिथे काही अंशी भाषा हे वेगळी राष्ट्रे निर्माण झाली त्याचे कारण आहे. काही अंशी का कारण स्वीस देशात फ्रेंच आणि जर्मन या दोन भाषा बोलल्या जातात. तसेच बेल्जियममध्ये फ्रेंच भाषा बोलली जाते. जर भाषा हेच राष्ट्रनिर्मितीचे किंवा एकत्र ठेवायचे कारण असते तर अशांचे वेगळे अस्तित्व राहिले नसते. अरबस्तानातही तीच परिस्थिती.तिथे तर धर्म आणि भाषा (इराण वगळता) दोन्ही एक. पाकिस्तानात धर्माच्या नावावर पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान ही आवळ्या-भोपळ्याची मोट एकत्र बांधायचा प्रयत्न झाला त्याचे पुढे काय झाले हे माहितच आहे.

तेव्हा धर्म, भाषा यापलीकडे जाऊन संबंधित भागांमधील लोकांना आपले "स्वीसपण","जर्मनपण","फ्रेंचपण","इराकपण", "इराणपण","बांगलापण" इत्यादी जपावेसे वाटले/वाटते .यातच राष्ट्र एकत्र ठेवायला धर्म /भाषा हे घटक कुचकामी आहेत हे सिध्द होते. तरीही भारत हा एकाच हिंदू धर्माने गुंफला होता हे विधान वारंवार केले जाते ते अत्यंत हास्यास्पद आहे असे वाटते.

आशु जोग's picture

7 May 2012 - 10:54 pm | आशु जोग

पु व

>> "स्वीसपण","जर्मनपण","फ्रेंचपण","इराकपण", "इराणपण","बांगलापण"

हे सगळच खरं आहे.

आणि तुम्ही म्हणता तसं
>> धर्म हे राष्ट्र एकत्र ठेवायचे कारण होऊ शकत नाही हे जगात वारंवार सिध्द झाले आहे

याबाबत एक म्हणता येइल, धर्म राष्ट्र तोडण्याला मात्र कारण होऊ शकतो हेही पहायला मिळते.

असंख्य उदाहरणे देता येतील. आम्ही जिथे राहू त्या मातीशी एकरूप होता यायला हवं
यात त्या प्रदेशाचाही फायदा आहे अणि आम्हालाही समाधान मिळणार आहे.

पाकिस्तानमधून झरदारी अंकल आले होते तेव्हा त्यांनी अजमेरच्या दर्ग्याला
काही रक्कम दिली. त्याऐवजी हिंदू देवस्थानला दान जाऊदे,भेट दिली असती तर ?

झरदारींनी यामधून काय संदेश दिला ?

--

देशाचे स्वातंत्र्य आंदोलन जोरात असताना काही जणांना
दुसर्‍या देशातल्या खलिफाची काळजी असते आणि मग खिलाफत आंदोलन घडते.

सद्दामला फाशी दिली म्हणून लखनौमधे निदर्शने होतात.

कसला संदेश हवा होता? तुम्ही जेंव्हा दुसर्‍या प्रांतात उदा. कर्नाटकात जाता तेंव्हा तिथल्या मशिदीत नतमस्तक व्हायला जाता का? झरदारी त्यांच्या धर्माच्या देवस्थानात गेला, यात चुकीचे काय आहे?

खिलाफत घडले तर तुमचे काय दुखले? बापू सार्‍या विश्वाचे आदर्श होते. ते काही तुमच्या 'महासभेच्या' नेत्याप्रमाणे कुठल्या तरी एका धर्माला वाहून घेतलेले नेते नव्हते.. ते इराणातल्या आंदोलनाला पाठिंबा देतील नाहीतर होनो लुलु च्या आदीवासीना पाठिंबा देतील, तुम्हाला फिकिर करायची गरज नाही.

श्रीरंग's picture

8 May 2012 - 11:02 am | श्रीरंग

>>ते काही तुमच्या 'महासभेच्या' नेत्याप्रमाणे कुठल्या तरी एका धर्माला वाहून घेतलेले नेते नव्हते..

कुठल्या महासभेच्या कुठल्या नेत्याबद्दल बोलताय ते जरा स्पष्ट सांगा...का पुन्हा एकदा पळपुटी स्पष्टीकरणं देता यावीत म्हणून ही संदिग्ध बोलण्याची पळवाट पकडताय?

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2012 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार

बापू सार्‍या विश्वाचे आदर्श होते

कोण बापू ?

पराराम गोडसे

JAGOMOHANPYARE's picture

8 May 2012 - 3:50 pm | JAGOMOHANPYARE
पुण्याचे वटवाघूळ's picture

8 May 2012 - 4:03 pm | पुण्याचे वटवाघूळ

आम्ही जिथे राहू त्या मातीशी एकरूप होता यायला हवं
यात त्या प्रदेशाचाही फायदा आहे अणि आम्हालाही समाधान मिळणार आहे.

हो पण धर्माच्या नावावर देश एकत्र राहू शकणारे लोक "एकरूपता" हा मापदंड न मानता "धर्म" हा मापदंड मानतात त्याचे काय? (किंवा अमुक एका धर्माचे असाल तरच तुम्ही मातीशी एकरूप होऊ शकता असे मानतात).

झरदारींनी यामधून काय संदेश दिला ?

आता हे मी कसे सांगणार?

प्रदीप's picture

8 May 2012 - 8:17 pm | प्रदीप

त्या वेळेला कोणचेच युरोपिय देश किंवा अमेरीकन देश एक संध नव्हते.

चीनचे काय?

मुक्त विहारि's picture

3 May 2012 - 4:25 pm | मुक्त विहारि

मी एक विचारमंथन वाचले होते...

१. हे प्रभु, मला माझे प्रश्न सोडवायची ताकद दे.
२. जे प्रश्न मला सोडवता येत नाहित, ते तू सोडव.
आणि
३. कुठले प्रश्न तुझे आणि कुठले माझे, हे ओळखायची विचार-शक्ती दे.

तुमचे सगळे प्रश्न, मी त्या प्रभू वर सोपवतो आणि रोजचा घास स्वकष्टाने आणि कुणालाही न फसवता कसा मिळेल त्याची चिंता करतो.

आणि ह्या देशाचे नांव भारत असू दे नाहीतर रशिया, मी खाणार तर इथे पिकते तेच... आणि बाकी ते फूकाचे वाद-विवाद अजून जोरात चालू दे...(ब्राह्मण आणि अब्राह्मण, मूळचे आणि ऊपरे ई. , माझा जर फूकट टाईम-पास होत असेल तर का सोडा.)

तिमा's picture

3 May 2012 - 8:53 pm | तिमा

भारताच्या भविष्यात अगदी हेच लिहिलंय. 'कायम भांडत रहाणार आणि कधीच नाही अक्कल शिकणार.'
(आम्ही फक्त जगाचे व देशाचेच भविष्य वाचतो.)

परिकथेतील राजकुमार

>>कसे आहे, आधी अक्कलेने प्रश्न सोडवावे लागतात. नाहीच तर मग मारामारी आहेच की. आता अक्कल लावायला त्यांच्याशिवाय कोणी सापडत नसेल त्याला काय करणार ?
<<

प रा
तुमचा प्रतिसाद नेमका आणि मार्मिक आहे
उद्याचा अनर्थ टाळायचा म्हणून तर प्रश्नाचा अभ्यास चालू आहे

--
JAGOMOHANPYARE

>>बाकी, रशिया , अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेश... त्यांचा विचार त्यानी करावा.

मला शत्रूकडे लक्ष द्यावेच लागेल...
आणि शत्रूचे शत्रू म्हणून काहीजण मित्रही बनवावे लागतील

JAGOMOHANPYARE's picture

8 May 2012 - 1:17 pm | JAGOMOHANPYARE

सहमत. म्हणूनच तर घटना लिहायला पिढ्यान पिढ्या हुशार समजलेल्या वर्गातून कुणी मिळाले नाही, तो मान बाबांना मिळाला. :)

परिकथेतील राजकुमार's picture

8 May 2012 - 1:41 pm | परिकथेतील राजकुमार

बेक्कार हसतोय !!

इस्पिक राजा's picture

8 May 2012 - 7:30 pm | इस्पिक राजा

भेंडी हसूही येत नाही आहे. एकदम टाळ्याखाऊ वाक्य. घटनासमितीचे शिल्पकार. माझ्यासमोर एकदम एकहाती घटना लिहिणारा माणूस आला. एकहाती गीता वदणारा तो कृष्ण (तो तरी हुषार समजल्या जाणार्‍या समाजातून कुठे होता????) आणि एकहाती घटना लिहिणारे बाबासाहेब. सद्गती प्राप्त झाली आज मला ( हुषार समजल्या जाणार्‍या समाजातील लोकांना सद्गती प्राप्त होउ शकते काय?)

ठाई ठाई कृष्ण दिसू लागला तर सद्गती आणि मोक्ष नक्कीच मिळेल.

श्रीरंग's picture

8 May 2012 - 3:11 pm | श्रीरंग

अगदी अगदी.. एका बाबांनीच एकट्यानीच बसून लिहून काढली घटना. याचे श्रेय त्यांना एकट्यालाच मिळायल हवे!
(हुशार समजला जाणारा वर्ग म्हणजे कोण, बाबा म्हणजे कोण, हे तुम्ही स्पष्ट लिहिणार नाहे हे माहितच आहे. ते तसे लिहिलेत, तर वादातून शेपूट घलून पळता येणार नाही तुम्हाला. चालू द्या!)

मृत्युन्जय's picture

9 May 2012 - 11:54 am | मृत्युन्जय

१. घटना कोण्या एका माणसाने लिहिलेली नसून त्यात शेकडो माणसांचा हातभार लागला. घटनेचा प्राथमिक मसूदा पहिल्या संसदेने बनवला होता.

२. घटानेतील मूलभुत हक्क, केंद्राचे अधिकार आणि केंद्राचे संघटन या विषयांवर उहापोह करण्यासाठी ३ स्वतंत्र समित्या स्थापन केल्या.

३. चौथी समिती नेमली गेली जिने घटनेचे कायदेशीर मसूदा तयार केला (लक्षात घ्या. प्राथमिक मसूदा तयारच होता). या समितीत ७ सदस्य होते त्यापैकी एक बाबासाहेब आंबेडकर होते आणि तेच समितीचे अध्यक्ष देखील होते. या समितीला वरील ३ समित्यांनी त्यांचे अहवाल सादर केले. त्यावर विचार करुन रचना समितीने अंतरिम मसूदा तयार केला.

४. हा अंतरिम मसूदा संसदेत सादर केला गेला. त्यात हजारो सूचना केल्या गेल्या. त्या सामील करुन घेउन अंतिम मसूदा तयार केला गेला आणि हीच आपली घटना होय.

पण तरीही कोणाला घटना बाबासाहेबांनी एकट्याने लिहिली असे म्हणायचे असेल तर म्हणोत बापडे. देव त्यांचे भले करो. या गैरसमजात राहुन त्यांना प्रेरणा मिळत असेल आणी ते काही विधायक कार्य करु शकत असतील तर आनंदच आहे की.

* घटनेला कायदेशीर मान्यता मिळेपर्यंत संसदही संसद नव्हती पण त्याचे स्वरुप तेच होते. घटना अंगिकारल्यावर त्याच (Constituent Assembly) समितीला संसदेचे स्वरुप प्राप्त झाले

JAGOMOHANPYARE's picture

8 May 2012 - 3:28 pm | JAGOMOHANPYARE

डबल प्रतिसाद संपादित

आशु जोग's picture

3 May 2012 - 11:04 pm | आशु जोग

'मातृभाषा' शब्दापेक्षा लोकभाषा शब्द वापरुया

Mothertounge चं भाषांतर नको.

जी भाषा मुद्दाम शिकावीच लागत नाही अशी भाषा

असो

विषयावर येउया

अहो एखादा मनुष्य आपला प्रांत सोडून दुसर्‍या प्रांतात गेला
आणि त्याने तिथे आपली भाषा टिकवून ठेवली तर आनंद आहे.

परन्तु

ज्यांनी आणि ज्यांच्या आज्या पणज्यांनी कधी दुसरा प्रांत पाहिला नाही
ज्यांची मुळं इथलीच
त्यांना हिन्दी का अवलम्बावी ?

बरं ही हिन्दी अशी दिव्य
जाऊदे सध्या त्यात नको घुसायला

पण वेगळेपणाची ही सुरूवात असते.

एके काळी बाकीचे लोक प्राकृतात बोलायचे तेंव्हा काही मोजके लोक संस्कृतात बोलायचे (म्हणे! ) .. त्यात वेगळेपण नव्हते का? मग आज कुण्या चार लोकानी दुसरी मातृभाषा ठरवली तर वेगळेपणाची सुरुवात म्हणून का रडत बसलाय? का तुम्ही दुसरी भाषा वापरली तर ती देववाणी आणि बाकीच्यानी दुसरी भाषा वापरली तर आसुरी वाणी, असे काही आहे का?

बॅटमॅन's picture

4 May 2012 - 1:17 am | बॅटमॅन

>>>एके काळी बाकीचे लोक प्राकृतात बोलायचे तेंव्हा काही मोजके लोक संस्कृतात बोलायचे (म्हणे! )

हे खरे नाही. शेल्डन पोलॉकचे लेख / पुस्तक वाचा मग कळेल की अशी सरसकट विधाने करणे किती चूक आहे ते.

अजून काही पिढ्या जाऊ द्यात, त्या लोकांचे मराठीकरण आपोआप होईल.

आशु जोग's picture

19 Aug 2012 - 1:42 am | आशु जोग
आशु जोग's picture

5 May 2012 - 1:17 am | आशु जोग

भारताला शह देताना चीनने पाकीस्तानशी केलेली मैत्री सर्वान्ना ठाऊक आहे.

पण

पाकच्या सहवासात राहताना काही व्हायरस चीनच्या शरीरामधेही घुसले आहेत .

जिनजियांग प्रांतापुरता असणारा प्रश्न अधिक व्यापक बनत चालला आहे.

JAGOMOHANPYARE's picture

5 May 2012 - 7:59 pm | JAGOMOHANPYARE

http://en.wikipedia.org/wiki/Languages_with_official_status_in_India

आंध्र प्रदेशाची तेलगू आणि ऊर्दु अशा दोन ऑफिशियल भाषा आहेत.. मग कुणी ऊर्दु ( ज्याला तुम्ही हिंदी म्हणता) बोललं तर तुमच्या पोटात का दुखू लागले?

आशु जोग's picture

6 May 2012 - 1:48 am | आशु जोग

काही प्रश्न उरतातच

हैद्राबादमधे 'हनुमान जयन्तीला' विरोध का होतो !
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी सारखे सण आम्ही काही भागात इतक्या भीत भीत का साजरे करतो
--

जगमोहन प्यारे

मी फक्त वस्तुस्थिती मांडतोय. इथे राहणार्‍यांनी हा देश आपला मानावा, स्वतःला पाहुणा मानू नये
घरच्यासारखे रहावे. एकदिलाने आणि दुधात साखर मिसळावी तसे रहावे
हा आमचा उदार दृष्टीकोन आहे . पोटात दुखण्याबद्दल म्हणाल तर उर्दुवाल्यांचे पोट दुखू नये
हीच खरी काळाजी आहे.

नितिन थत्ते's picture

6 May 2012 - 10:57 am | नितिन थत्ते

>>एकदिलाने आणि दुधात साखर मिसळावी तसे रहावे

तसे रहावे याच्याशी पूर्ण सहमत आहे. पण साखरेने दुधाची मूळ चव बदलते म्हणून साखर वेगळी करून बाजूस काढण्याचे प्रयत्न झालेले/चालू असलेले दिसतात.

आशु जोग's picture

7 May 2012 - 12:21 am | आशु जोग

>>साखर वेगळी करून बाजूस काढण्याचे प्रयत्न झालेले/चालू असलेले दिसतात.

तर मग साखर वेगळी काढली जाऊ नये म्हणून काय करता येइल
आपला याबाबतचा काही अनुभव ?

नितिन थत्ते's picture

8 May 2012 - 11:59 am | नितिन थत्ते

त्यासाठी दूध 'शुद्ध' करू पाहणार्‍यांनी साखरेने दुधाची चव अधिक चांगली होते हे मान्य करायला लागेल. परंतु प्रत्यक्षात साखरेने चव बिघडते असे दूधवाल्यांवर बिंबवले जाते.

नाना चेंगट's picture

8 May 2012 - 3:46 pm | नाना चेंगट

>>त्यासाठी दूध 'शुद्ध' करू पाहणार्‍यांनी साखरेने दुधाची चव अधिक चांगली होते हे मान्य करायला लागेल.

साखरेने दुध खराब होते हे खरे आहे.
निरसं दुध किंवा बत्तासा (अधिक हळद) घातलेले गरम गरम दूध चांगले लागते.
झोप शांत लागते आणि सर्व चिंता मिटून जातात.

नितिन थत्ते's picture

8 May 2012 - 6:05 pm | नितिन थत्ते

साखरेने दूध खराब होते हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. द पॉइंट इज मेड.

आशु जोग यांना त्यांच्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर यातून मिळालं असेल अशी आशा करतो.

अवांतर: तुमच्याकडे बत्तासा कार्ल्याचा करतात का हो?

नाना चेंगट's picture

8 May 2012 - 6:59 pm | नाना चेंगट

आमच्या कडे उसाच्या रसापासून बत्तासा बनवतात ब्वा !

तुमच्याकडे कशाचा बनवतात ते माहित नाही.

आशु जोग's picture

9 May 2012 - 10:00 pm | आशु जोग

काही प्रत्यक्ष अनुभव असेल तर सांगावा

नितिन थत्ते's picture

10 May 2012 - 8:28 am | नितिन थत्ते

>>काही प्रत्यक्ष अनुभव असेल तर सांगावा

भाषाशुद्धी या नावाखाली वर्षानुवर्षे प्रचलित असलेले साधे शब्द (केवळ ते "त्यांच्या" भाषेतले आहेत म्हणून) बदलून नवीन (कधीकधी बोजड) शब्द निर्माण करणे.

१. एकदम- एकसमयावच्छेदेकरून
२. पोलादी पुरुष - लोहपुरुष
३. (हिंदीत) फौलाद - इस्पात (हा सरकारी - सॉरी - शासकीय पातळीवरचा बदल)
४. कायदा - अधिनियम (हाही सरकारी - सॉरी - शासकीय पातळीवरचा बदल)
.
.
.
.
वगैरे

भाषाशुद्धी हे एक उदाहरण, इतरही बाबींमध्ये हे चालू असते. उदाहरणार्थ (एखाद्या धार्मिक नसलेल्या) ठिकाणी पंजाबी ड्रेस* घालून येण्यास बंदी असणे.

*पंजाबी ड्रेस हा आधुनिक शब्द आहे मुळात त्या पोषाखाचे नाव सलवार-कमीझ आहे.

डोळसपणे पाहिले तर असले प्रकार सातत्याने चालू असतात असे दिसेल.

आशु जोग's picture

10 May 2012 - 9:14 am | आशु जोग

>> एकसमयावच्छेदेकरून

खरेच बोजड आहे.
पण
धर्मामुळे वेगळेपणाची भावना का निर्माण व्हावी ?

पाकीस्तान हे एक उदाहरण आहे.
जीना यांचे आजोबा हिंदू होते. मग २ पिढ्यात असं काय झालं.
ज्यामधे देशही भरडला जावा.

@ थत्तेचाचा.

तुम्ही म्हणता ते शब्द मूळ शब्द टाळण्याच्या अट्टाहासातून आलेले आहेत का हे माहीत नाही पण याखेरीजही चिंवि जोशींनी त्यांच्या लेखनकालात केलेलं निरीक्षण रोचक आहे. ते एका ठिकाणी म्हणतात (त्यांचे नेमके शब्द आता आठवत नाहीत पण आशय असा की), एकाच गोष्टीचा चांगल्या, किंवा पॉझिटिव्ह अर्थाने उल्लेख करायचा असेल तर संस्कृतोद्भव किंवा "आपले" शब्द वापरले जातात आणि तुच्छ किंवा हिणकस उल्लेख करायचा असेल तर फारशी अरबी उगमाचे शब्द वापरले जातात.

मला आठवत असलेली उदा.

संतती : अवलाद
मनुष्याची संतती, .... जनावराची / फितुराची / नीचाची अवलाद..

वंशवृद्धी : पैदास
मानवाची / भारतीयांची वंशवृद्धी .....गुरांची पैदास

शिष्य : चेला
समाजमान्य शिक्षणाबाबत (उदा, वैद्यकी, भिक्षुकी) गुरु-शिष्य ....... अधिक पूर्वीच्या काळी संगीताला वगैरे व्यवसाय म्हणून प्रतिष्ठा नसताना तुलनेत उण्या मानल्या जाणार्‍या कलांमधे उस्ताद-चेला

आणखीही आहेत आत्ता आठवत नाहीत.

नितिन थत्ते's picture

10 May 2012 - 12:08 pm | नितिन थत्ते

मला पूर्वी हे "संस्कृतोद्भव शब्द वापरण्याचे वेड" असल्याचे वाटत असे. पण थोडा अधिक खोलात विचार केल्यावर ते "फारसी/अरबी शब्द काढण्याचे वेड" असल्याचे दिसून आले.

हुप्प्या's picture

30 May 2012 - 11:44 am | हुप्प्या

मुस्लिम धर्माच्या आडमुठेपणाचा अनुभव आला असेल तर त्यामुळे भारतीय भाषांवरील मुस्लिम प्रभाव कमी करावा असे वाटणे स्वाभाविक आहे. आजही कुराणात काही चुकीचे, कालबाह्य आहे असे ते मानत नाहीत.

शिवाजी महाराजांनी आपली राजमुद्रा संस्कृतात लिहून घेतली. त्या काळात तमाम राजे, उपराजे आपल्या मुद्रा फारसीतच लिहून घेत. महाराजांनी संस्कृतला प्रतिष्ठा मिळवून द्यायचा प्रयत्न केला हे कटू सत्य नाकारता येणार नाही.

फारसी वा अरबी भाषा बोलणार्‍या लोकांनी जो विध्वंस केला आहे त्याचे अवशेष आजही दिसतात. त्याबद्दल कुणाला त्या संस्कृतीबद्दल राग वाटला तर त्यात इतके चूक आहे का? आक्रमकांचा प्रभाव मोडून काढण्याचा प्रयत्न जगभर होत असतो.
उदा. जर्मन लोकांना लॅटिन भाषेतील उसनवार आवडत नाही.

ज्यांची भाषा तुम्हाला प्रमाण मानावी असे वाटते ते खुद्द मुस्लिम लोक भाषांबद्दल किती सहिष्णू आहेत?
अरबी भाषा सोडून इतर कुठल्याही भाषेत अजान देता येत नाही. भक्तगणांत एकही अरबी न जाणणारा असला तरी बेहत्तर, प्रार्थना केवळ अरबीतच म्हटली गेली पाहिजे असा दंडक आहे आणि त्यात बदल होणे नाही. कुराणाचे वेगवेगळे अध्याय मुखोद्गत करताना ते केवळ अरबीतच केले पाहिजेत असा नियम आहे. कुठल्या भाषेतल्या अनुवादाला घोकून पाठ करणे हे अमान्य आहे. कारण कुठलेही भाषांतर हे मूळ अरबीच्या जवळपासही जात नाही हा तमाम धार्मिक मुसलमानांचा आवडता सिद्धांत आहे.

मेलेलं मढं जाळताना तुम्हीही संस्कृत मंत्र म्ह्णता, त्यातले किती आणि कुणाला समजते हो?

कौन्तेय's picture

7 May 2012 - 2:20 pm | कौन्तेय

आशू,
तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर 'इस्लामिस्ट्स्‌मुळे' हे एकच आहे. अर्थात हे तुम्हाला नि इथे चर्चा करणाऱ्या सगळ्यांनाच माहिती आहे.
इस्लामिक नि इस्लामिस्ट या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जसा सिद्धिविनायकाला अनवाणी जाणारा प्रत्येकच भाविक हिंदू हा कट्टर हिंदूराष्ट्रवादी (हिंदूइस्ट) नसतो तसेच दिवसातून पाचवेळा नमाज पढणारा प्रत्येकच इस्लामिक हा दरूल-इस्लामवादी (इस्लामिस्ट) नसावा असं आपल्याला प्रामाणिकपणे वाटतं.
हिंदू समाजावरचा हिंदूइस्ट्स्‌चा पगडा हा मुसलमान समाजावरच्या इस्लामिस्ट्स्‌च्या पगड्याच्या तुलनेत नगण्य आहे. आणि इस्लामिस्ट्स्‌चा नुसता पगडाच नाही, तर दहशतही आहे. याचबरोबर हिंदूंमधल्या हिंदूइस्ट्स्‌चं प्रतिशत प्रमाण हे इस्लाममधल्या इस्लामिस्ट्स्‌च्या प्रतिशत प्रमाणाच्या तुलनेत नगण्य आहे.
आंध्रमधे हनुमान जयंती / रामनवमीला मुसलमानांकडून विरोध होतो म्हणून त्या प्रचंड प्रमाणावर साजऱ्या करण्यात आल्या. इंटरनेटवर त्या लाखा लाखाच्या यात्रांचे फ़ोटो पाह्यले. मला प्रश्न असा पडला की हे साजरे करणारे नि त्याला विरोध करणारे इतक्या मोठ्या संख्येत, उत्साहात १५ ऑगस्टचं ध्वजवंदन का बरे नाही साजरं करत?
यामुळे आणि एतद्देशीय लोक नि वाढते मुसलमान यांच्या परस्परसंबंधांबाबतीतला जगाचा इतिहास पाह्यला तर भारतासाठी दोन्हीकडे जबरदस्त भारतीयत्वाचा परिपोष हाच तुमच्या प्रश्नांवर उपाय आहे. पण भारतीयत्व ठरवताना मात्र राम की बाबर, औरंगजेब की छत्रसाल, अफ़झलखान की शिवाजीराजा, मनुस्मृती की राज्यघटना, बुलबुल-गुलिस्ताँ की मातृभूमी, शरीयत की समान नागरी कायदा, चातुर्वर्ण्य ग्राह्य की त्याज्य, प्रांतभावना आधी की राष्ट्र, जातीविद्वेष की जाती निर्मूलन - असे अगणित अडचणीचे प्रश्न या दोन्ही आणि बाकीच्याही गटांना भेडसावतील. त्यावेळी मात्र शेपूट न घालता विशुद्ध भारतीयता नि त्याहून व्यापक वैश्विक ग्राह्यता या दोन निकषांवर निवड करावी लागेल.
आणि हे काम या चर्चागटाच्या क्षमतेपलिकडचे आहे. कारण यात चर्चा नाही, तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे.

कौन्तेय

तुमच्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल
धन्यवाद !

JAGOMOHANPYARE's picture

20 May 2012 - 1:16 pm | JAGOMOHANPYARE

भिवंडी आणि तिथला समाज म्हणजे जणु काय देशद्रोही लोकांचाच इलाका आहे, असे समजणार्‍यानी सत्यमेव जयतेचा तिसरा भाग पहावा.

http://www.satyamevjayate.in/issue03/videos/ ००.४२ मिनिटांपुढचा भाग

पण

आजवरचा अनुभव काय सांगतो...

JAGOMOHANPYARE's picture

29 May 2012 - 8:30 pm | JAGOMOHANPYARE

http://twocircles.net/2011jan16/muslims_just_3_army_account_6_martyrs.html

जम्मु आणि काश्मीर इन्फन्ट्रीत तर ५० % मुसलमान आहेत आणि १९४७ पासून आजअखेर झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणावर त्या धर्माचे लोक भारतासाठी शहीदही झालेले आहेत.

http://www.globalsecurity.org/military/world/india/rgt-jakli.htm

http://en.wikipedia.org/wiki/Jammu_and_Kashmir_Light_Infantry
कुठल्याही धर्माला सरसकट धोपटणे बरे नव्हे....

हुप्प्या's picture

30 May 2012 - 4:51 am | हुप्प्या

http://www.faithfreedom.org/op-ed/sachar-committee-report-uncovered-back...

जवळपास सगळ्या राज्यात मुस्लिम गुन्हेगारांची टक्केवारी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात बरीच जास्त आहे.
आता ही टक्केवारी विचारात घेऊन ह्या धर्माला धोपटले तर चालेल का?

आशु जोग's picture

29 May 2012 - 8:57 pm | आशु जोग

आम्ही आपले आम्हाला पडलेले साधे सुधे प्रश्न मांडले

निष्कर्श अभ्यासकांनी, विचारवंतांनी आम्हाला सांगावेत

सूड's picture

30 May 2012 - 11:23 am | सूड

घोडं का अडलं ?
पान का सडलं ?
गर्लफ्रेंड का रुसली ?
सगळ्यात महत्त्वाचं म्हण्जे यकुंच्या कोंबडीचं काय झालं ?

हारुन शेख's picture

30 May 2012 - 12:45 pm | हारुन शेख

श्री आशु जोग, तुम्हाला एक सल्ला द्यावासा वाटतो. तुम्ही प्रश्न मांडले आहेत ते ठीक पण तुमचे त्या विषयावर पूर्ण समाधान व्हावे असे वाटत असेल आणि वस्तुनिष्ठ चर्चा घडवून आणायची असेल तर प्रत्येक प्रश्नाची पूर्वपिठीका, त्यावरची तुमची मते, विचार, इतर अभ्यासकांची मते , उपाय असा व्यवस्थित गोषवारा लिहून मग त्यावर चर्चा घडवून आणा. त्यासाठी लागणारा अभ्यास वाढवा. बर्याच वेळा तुम्हाला उत्तरं त्या अभ्यासातूनच मिळून जातील . मुळात वेगवेगळ्या विषयावरचे प्रश्न ठासून एका धाग्यात घुसडायचे आणि तो गडबडगुंडा हवेत फेकायचा, मग झेलायला पब्लिक येतंच,ती गम्मत बघत राह्यचं. शिवाय तुम्ही विचारलेल्या जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरं "मुस्लीम लोक, त्यांचा धर्म, भाषा आणि संस्कृती " असं तुम्ही आधीच मनात धरलेलं असतं असं वाटतं आणि फक्त त्याला अनुमोदन देणारे प्रतिसाद यावेत यासाठी तुम्ही जिलबी टाकता. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं,प्रतिवाद आले कि तुम्ही अजून वेगळेच , वेगळ्या विषयाशी संबंधित प्रश्न काढून किंवा मुद्दे उपस्थित करून गाडी वेगळ्याच रुळावर सोडून देता. चर्चा भरकटून जाते ती याचमुळे. तुमचे वरचे सर्व प्रतिसाद वाचले तर कुणालाही ते चटकन लक्षात येईल. आणि तुमचा मागचा धागा वाचनमात्र झाला त्याचं कारण हेच. बघा पटलं तर बाकी तुम्ही काय करावं याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहेच. तरीपण हे असे धागे टाकण्यामागे तुमची प्रेरणा काय आहे याचा विचार 'सतत आपले मन आणि विचार जास्त सुसंस्कृत आणि प्रगल्भ करणारी एक प्रामाणिक व्यक्ती' बनण्यासाठी तुम्ही कराल अशी अपेक्षा ठेऊन दिलेला हा सल्ला.

आबा's picture

31 May 2012 - 3:47 am | आबा

+१

भारतीय माणूस परदेशी जायच्या गोष्टी करतो, किवा परदेशात गेल्यावर, तिथून परत आल्यावर भारताला इंडिया असाच म्हणतो.लाज वाटते का मी भारतीय आहे अस सांगण्याची? कि आपल्या देशाच नाव भारत नाहीच?

आशु जोग's picture

30 May 2012 - 10:54 pm | आशु जोग

गल्ली चुकलं काय हो पी एल

आशु जोग's picture

1 Jun 2012 - 12:24 am | आशु जोग

खूप भाराभर लिहिले आहेस

पण

हारुन मित्रा एक गल्लत केलीस.

माझ्या मुद्यांऐवजी तू मलाच टार्गेट करायला लागलास.
टीका लेखनावर करा लेखकावर नको.

मागील धाग्यातदेखील तू दहशतवादाचे कारण गरीबी, उपासामारी दिले होतेस.
पण मग

दाउदची कुठली गरीबी आहे,
पाकिस्तान निर्मितीसाठी प्रचंड दंगे करणार्‍या जीनांची कोणती होती गरीबी.
हे सांगणे तुला जमलेले नाही...

कुठलेही कारण दिले तरी दहशतवाद, खून समर्थनीय कसे होऊ शकतात.

>> तो गडबडगुंडा हवेत फेकायचा, मग झेलायला पब्लिक येतंच,

मला नावे ठेवतो आहेसच पण आता पब्लिकलाही नावे ठेवतो आहेस.

का बाकीच्या लोकांना स्वतंत्र बुद्धी नाही वाटते.

---

आणि जोपर्यंत पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट,
मुम्बई रेल्वे बॉम्बस्फोट. मुम्बईवरचा २६/११ चा हल्ला

काश्मीरातील पंडीतांना काश्मीरातून हाकलवून लावणे

या गोष्टी चालू राहतील तोपर्यंत मी त्याविरुद्ध

आवाज उठवतच राहणार !

सगळ्याच भारतीयांचा याला विरोध असला पाहीजे.
--

कास्मिरी पंडितांच्या वाटोळे होण्याला तेच जबाबदार आहेत.

जेंव्हा मुसलमान अब्दाली कडून सत्ता राजपुतांकडे गेली तेंव्हा सगळे मुसलमान राजाला भॅटले आणि आम्हाला हिंदु करा म्हणाले.. राजाने त्यासाठी मोठा समारंभही आयोजीत केला होता. पण आदल्या दिवशी कास्म्हिरी पंडीत राजाला म्हणाले त्याना हिंदु केलेत तर आम्ही प्राण देऊ.. त्यामुळे तो कार्यक्रम बारगळला.

त्याची फळे म्हणजे आजची त्यांची अवस्था.

हिंदु धर्म कर्मविपाक सांगतो ना? :)

मृत्युन्जय's picture

1 Jun 2012 - 1:39 pm | मृत्युन्जय

??????????

काश्मिरी पंडितांनी बाटलेल्यांना हिंदु करु नका म्हणुन सांगितले. चुकलेच. पण म्हणुन त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हक्क इतरांना कोणी दिला?

वर्षानुवर्षे महार मांगांवर जो अन्याय झाला त्याचे मूळही त्यांच्या पुर्वजांच्या पापांमध्ये आहे काय मग? नाही हिंदु धर्म कर्मविपाक सांगतो म्हणुन विचारले.

जातीपातीच्या राजकारणाचा आणि द्वेषाचा हा कळस झाला. प्रत्येक गोष्टीसाठी ब्राह्मणांना दोष देउन तुम्ही काय साधताय हे कळत नाही पण त्यातुन तुमचेच हसे होत आहे हे तुम्हाला कळत नाही काय? असो. तुमचे अज्ञान, तुमची विद्वेषी वृत्ती आणि तुमचे टोकाचे जातीय विचार आणि त्यातुन तुमचेच होणारे नुकसान हाही तुमच्याच गतजन्मीच्या पापाचा कर्मविपाक असावा.

मी पण विचारु का एक प्रश्न?

" क्या आप के टूथपेश्ट मे नमक हय?? "

:)

हारुन शेख's picture

1 Jun 2012 - 11:28 pm | हारुन शेख

माझ्या मुद्यांऐवजी तू मलाच टार्गेट करायला लागलास.
टीका लेखनावर करा लेखकावर नको.

---- श्री. आशु जोग टार्गेट करण्याची भाषा आवडली नाही. टीका खेळकरपणे घेतली असतीत तर तुम्हाला तसे वाटले नसते. शिवाय टीका लिखाणावरच होती. धाग्यातला विषय कसा मांडला जावा ते सांगावेसे वाटले तसे सांगितले. सातत्याने असे लिखाण करण्याची प्रेरणा तपासून पहा असे म्हंटले त्याचे वाईट वाटले काय ? तुमच्या लिखाणात तसे जाणवले म्हणून विचारले. बाकी तुमची मर्जी.

मागील धाग्यातदेखील तू दहशतवादाचे कारण गरीबी, उपासामारी दिले होतेस.
पण मग

---- ते कारण आहेच कि मग. त्याशिवायही अनेक कारणे आहेत. फक्त तेच आहे असे म्हंटले का ? बाकी ते एक प्रमुख कारण नक्कीच आहे.

दाउदची कुठली गरीबी आहे,

---- तो एक क्रूर अपराधी आहे. आणि त्याच्या अपराधी कारवायांमागे त्याची अपराधी वृत्ती हीच कारणीभूत आहे. तो गरीब आहे (?) म्हणून समर्थनीय अपराधी आहे असे मी केंव्हा म्हंटले. किंवा भारतातल्या कुठल्या मुस्लिमांनी म्हंटले ते सांगा.

पाकिस्तान निर्मितीसाठी प्रचंड दंगे करणार्या जीनांची कोणती होती गरीबी.
हे सांगणे तुला जमलेले नाही...

---- परत वडाची साल पिंपळाला. जगातल्या किंवा भारतातल्या सगळ्याच समस्या गरीबीमूलक आहेत असं माझं मत असल्याचं तुम्ही सोयीस्कर ठरवून घेता आहात. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी नुसते दंगे कारणीभूत होते हे म्हणणं किती भोळेपणाचं आहे. त्यामागे आपल्या त्या काळातल्या नेत्यांनी ब्रिटीशांच्या मुत्सद्देगिरीपुढे पत्करलेली शरणागती, दाखवलेला दुर्दर्शितेचा अभाव, देशातल्या सर्व लोकसमूहांना एकजूट करण्यात त्यांना आलेले अपयश ह्या आणि अशा अनेक गोष्टी आहेत. व्ही. व्ही. नगरकरांचे ' the Genesis of Pakistan ' नावाचे पुस्तक खूप माहितीपूर्ण आहे. वाचायचा आग्रह करतो.खूप प्रश्नांची उत्तरं मिळतील.

कुठलेही कारण दिले तरी दहशतवाद, खून समर्थनीय कसे होऊ शकतात.

---- अलबत होऊ शकत नाही. पण ते घडण्यामागची कारणमीमांसा करणे ही एक निरोगी समाज बनवण्यासाठी आवश्यक प्रक्रिया आहे असं तुम्हाला वाटत नाही काय ?

>> तो गडबडगुंडा हवेत फेकायचा, मग झेलायला पब्लिक येतंच,

मला नावे ठेवतो आहेसच पण आता पब्लिकलाही नावे ठेवतो आहेस.

का बाकीच्या लोकांना स्वतंत्र बुद्धी नाही वाटते.

---- मुळात असे द्वेषमुलक धागे काढायचे त्यावर भावना भडकावून प्रतिसाद गोळा करायचे आणि वर नावं ठेवली जातायत असा कांगावा करायचा. हो, प्रत्येकाला स्वतंत्र बुद्धी असतेच पण त्याखेरीज प्रत्येक माणसाच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करणारे भावना , वैयक्तिक श्रद्धा , लहानपणापासून आपण जीत वाढलो ती संस्कृती हे घटकहि असतात. या गोष्टींचा फायदा घेऊन वस्तुनिष्ठ विचार करण्याची क्षमता झाकोळून टाकणारे व त्यावर पोटं भरणारे राजकारणी नावाचे कीटक वर्षानुवर्षे पोसले जातात हे आपण पाहतोच. अर्थात म्हणूनच तुम्हाला तुमची प्रेरणा तपासून पहायचा सल्ला दिला होता.

आणि जोपर्यंत पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट,
मुम्बई रेल्वे बॉम्बस्फोट. मुम्बईवरचा २६/११ चा हल्ला

काश्मीरातील पंडीतांना काश्मीरातून हाकलवून लावणे

या गोष्टी चालू राहतील तोपर्यंत मी त्याविरुद्ध

आवाज उठवतच राहणार !

---- त्याकरता शुभेच्छा , घटनांची निवड तुमचा एका समाजाविषयीचा द्वेष चटकन दाखवून देते. दांतेवाडा हत्याकांड , नक्सली चळवळ, अरुणाचलातील afspa , कश्मीरमधील afspa , उल्फा सन्घटना, खैरलांजी, मालेगाव बॉम्बस्फोट, गुजरात दंग्यातील बेस्ट बेकरी हत्याकांड, भिंद्रनवाले, खलिस्तान चळवळ यावरही तुम्ही आवाज उठवणारे धागे काढाल अशी अपेक्षा !

सगळ्याच भारतीयांचा याला विरोध असला पाहीजे.

---- भारतीयत्वाचा तुमचा आणखी एक निकष काय ? सगळ्या भारतीयांचा तुम्ही उल्लेखलेल्या गोष्टींना विरोध नाही असे गृहीत धरणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध.