नमस्कार मिपाकरहो,
मुंबईतील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल ९ महिन्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा कट्टा करण्याचे योजले आहे. अमेरिकेतील कोकणवासी (तिथे त्याला क्यालीफोर्निया का कायसे म्हणतात म्हणे) आणि जुने-जाणते मिपाकर नंदन यांचे मुंबईत आगमन झाले आहे. त्याप्रीत्यर्थ सदर कट्टा आयोजित केला आहे. मुंबई कट्ट्यांच्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान परंपरेप्रमाणे (परंपरा ही नेहमी प्रदीर्घ आणि दैदिप्यामानच असते, असे कणेकर गुर्जी म्हणतात), कट्टा श्रीस्थानक अर्थात ठाणे येथे संपन्न होईल.
दिवस :- रविवार दिनांक २९-एप्रिल-२०१२
स्थळ :- ठाणे येथील पॉप टेट्स
वेळ :- संध्याकाळी ५:३० च्या सुमारास (आनंदी वेळेचा फायदा उठवण्यास थोडे लवकरच आयोजित केले आहे)
तूर्तास माहित असलेले कट्टेकरी :- नंदन, रामदास काका, विमे, प्रास, गवि, निखील-मकी, चतुर चाणक्य, अर्थातच किसन, आणि अर्धा स्पा (लवकर जाणार म्हणून अर्धा)
इच्छुकांनी मला आणि गविंना व्यनि करावा. म्हणजे ऐन वेळेस काहीं बदल झाल्यास कळवता येईल. कृपया दोघांनाही व्यनि करावा, म्हणजे एकाने काहीं उत्तर दिल्यास दुसऱ्याला माहित राहील. शोर्ट नोटीस बद्दल मंडळ दिलगीर आहे. पुढील वेळेस मोठी नोटीस दिली जाईल.
विमे
प्रतिक्रिया
28 Apr 2012 - 12:57 pm | प्रचेतस
कट्ट्याला शुभेच्छा.
पुरेशा वेळेअभावी ह्या वेळी तरी उपस्थित राहणे शक्य नाही. पुढच्या कट्ट्यास हजेरी लावण्याचा प्रयत्न आवर्जून केल्या जाईल.
28 Apr 2012 - 1:05 pm | प्रभाकर पेठकर
अपुर्या वेळेतील सुचनेमुळे हजर राहू शकत नाही.
हळहळ आणि जळजळ झाली असली तरी कट्ट्यास शुभेच्छा!
'कट्ट्याची छायाचित्रे पाहून हळहळ कमी होईल पण, जळजळ वाढण्याची शक्यता आहे' असा हवामान खात्याने इशारा दिला आहे.
28 Apr 2012 - 1:27 pm | कुंदन
नंदन आणि ठाणे कट्टा.
नंदन शेठ कट्ट्यापुर्वी काही तरी खास प्लॅन दिसतोय.
28 Apr 2012 - 1:39 pm | विश्वनाथ मेहेंदळे
जन्मजात वेंधळेपणामुळे पत्ता टाकायचे राहून गेले. सदर पॉप टेट्स हे कोरम मॉल ठाणे येथे आहे. कोरम मॉल प्रसिद्ध असल्याने अजून landmark ची गरज पडू नये. तरीही सदर मॉल ठाण्याला कॅडबरी जंक्शन जवळ इस्टर्न एक्सप्रेस हायवे ला आहे.
खर्च साधारण ३००-४०० रु दरडोई येणे अपेक्षित आहे याची नोंद घ्यावी.
मेन्यू कार्ड खालील दुव्यावर पाहता येईल
http://www.zomato.com/mumbai/restaurants/thane/thane-area/pop-tates-4129...
28 Apr 2012 - 5:46 pm | नितिन थत्ते
तुमच्या दुव्यावर पॉप टेट्स हे आर मॉल घोडबंदर रोड येथे आहे असे दिसते. कोरम मॉल नव्हे.
मी काही येऊ शकणार नाही. :) त्यातून जमलं तर आयत्यावेळी येईन. :P
28 Apr 2012 - 6:06 pm | गवि
आर मॉल घोडबंदर रोडलाही पॉप टेट्सची शाखा आहे.
पण
मेन्यूकार्ड कोणत्याही शाखेचे का असेना आपल्याला कोरम मॉल मधल्या
पॉप टेट्सला भेटायचं आहे. तेव्हा क न्फ्यु जन नको
म्हणून हा खुलासा..
28 Apr 2012 - 6:27 pm | नितिन थत्ते
ओके
28 Apr 2012 - 2:18 pm | निखिल देशपांडे
काही कारणास्तव माझे आणि मकीचे येणे जमणार नाही...
28 Apr 2012 - 2:23 pm | सुहास झेले
व्यनि केलाय.... :) :)
28 Apr 2012 - 2:32 pm | किसन शिंदे
आईंग...!!
मी तर ऎकलं होतं कि विजूभाऊही येताहेत म्हणून आणि त्यांच नाव तर इथे दिसत नाहीये.
28 Apr 2012 - 10:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आय माय स्वारी. विजुभाऊ पण आहेत. मी लिहायला विसरलो.
28 Apr 2012 - 2:54 pm | मोदक
काय राव विमे....
पुढच्या वेळी हजेरी लावली जाईल.
28 Apr 2012 - 4:33 pm | सूड
कट्ट्याला शुभेच्छा !! बहुत काय बोलणें आपण सुज्ञ आहा.
28 Apr 2012 - 4:58 pm | प्रास
सुधांशुचा 'सूड'झाला तेव्हाच ओळखलं आता 'सूज्ञ'चाही 'सुज्ञ'च होणार ;-)
विकांत आहे, सूडराव, करा की काही प्रयत्न नि जमवा.... :-)
28 Apr 2012 - 9:56 pm | रेवती
कसं जमावायचं? अहो दाखवण्याचा कार्यक्रम नेमका तेंव्हाच आहे.
मुलगी आफ्रिकेहून ८ दिवसांसाठी आलिये. तेवढ्यात सगळं ठरवायचय.
यावेळी त्याला भरीला घालू नका. जरा संसारला लागू द्या पोराला. ;)
3 May 2012 - 1:56 pm | वपाडाव
आज्जे, तुझी शाखा लैच खंडांमध्ये फोफावलेली दिसत्ये...
3 May 2012 - 1:59 pm | स्पा
सूड साठी आफ्रिका का.. बर बर ;)
मग वप्यासाठी , कुठला देश निवडला आहेस ?परभणी का :)
3 May 2012 - 2:11 pm | गवि
अवांतर : वप्याला आतापासून फप्या म्हणावे का? :)
28 Apr 2012 - 5:09 pm | निवेदिता-ताई
:)
28 Apr 2012 - 6:52 pm | जेनी...
मुम्बई मध्ये ????
वॉव ....मस्तच :)
28 Apr 2012 - 7:30 pm | धन्या
येणं जमणार नाही परंतू तुम्ही मजा करा.
28 Apr 2012 - 7:46 pm | अत्रुप्त आत्मा
कामाचे दिवस हाय्ती... नाय येवू शकत... :-)
28 Apr 2012 - 9:53 pm | सर्वसाक्षी
येणार. व्यनि टाकला आहे.
28 Apr 2012 - 10:00 pm | पिवळा डांबिस
आमच्या वतीने नंदनला दोन पेग जास्त पाजा!!
;)
29 Apr 2012 - 5:12 pm | बबलु
+१ असेच म्हणतो.
आमच्याही वतीने नंदनला चांगले चार पेग जास्त पाजा. :) :) :)
(अवांतरः- नंदन आणि पिडांसेठ, सॅन फ्रॅन्सिस्कोला कधी येतांव बोला).
28 Apr 2012 - 10:15 pm | क्लिंटन
मी येणार आहे. रात्रीच्या डिनरचा दुसरा बेत आधीच करून ठेवला असल्याने जेवायला थांबणार नाही. गेले बरेच कट्टे मिस केले होते. हा मिस करायचा नाही.
28 Apr 2012 - 10:37 pm | jaypal
९९.९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९% हजर
कट्टा प्रेमी जयपाल
29 Apr 2012 - 9:35 am | गवि
क्या बात... झकास..
29 Apr 2012 - 12:33 am | शैलेन्द्र
बहुदा जमवतोय.. म्हणजे जमवतोच्.. :)
29 Apr 2012 - 9:29 am | गवि
जमवाच... वाट पाहतो..
29 Apr 2012 - 8:22 am | लीलाधर
गुर्जी हजर
29 Apr 2012 - 8:46 am | गवि
वा वा... वेलकम चचा.
29 Apr 2012 - 9:06 am | लीलाधर
आमच्या हजेरीची दखल घेतलीत हे पाहून मनी हर्ष जाहला.
29 Apr 2012 - 12:51 pm | प्रचेतस
सदर कट्ट्याचे ठिकाणी मा. चतुर चाणक्य उर्फ चचा हे त्यांची कट्ट्यावरी ही अतिशय गाजलेली कविता सादर करणार असल्याचे आमच्या खात्रीलायक सूत्रांच्या हवाल्यानुसार समजते.
29 Apr 2012 - 12:59 pm | पियुशा
तुमच्या ठाणे कट्ट्याला हार्दीक हार्दीक शुभेच्छा :)
29 Apr 2012 - 2:48 pm | स्वाती दिनेश
कट्ट्याला धमाल, मजा करा! कोरम मॉल मधील पॉपटेट्स, हा व्हेन्यु मस्त आहे. फक्त रविवार संध्याकाळ म्हणजे जागा मात्र आधीपासूनच पकडायला हव्यात,गर्दी बरीच असते.
स्वाती
29 Apr 2012 - 3:14 pm | गवि
जागा पकडणारी त्रिसदस्यीय समिती आगाऊ पोचत आहे.
29 Apr 2012 - 3:44 pm | विश्वनाथ मेहेंदळे
मी आधी "आगाऊ समिती पोचत आहे." असे वाचले :-)
29 Apr 2012 - 3:50 pm | यकु
=)) =)) =))
=)) =))
=))
वृत्तांत लवकर येऊ द्या समिती सदस्यांनो
29 Apr 2012 - 4:31 pm | स्वाती दिनेश
लवकर जागा पकडणार असाल तर मस्तच..
@ विमे, समिती आगाऊ पोहोचणे काय किवा आगाऊ समिती पोहोचणे काय, एकच की ;)
(तसेही आगाऊ पोहोचणारी आगाऊ समिती जास्त महत्त्वाची ना,;) )
स्वाती
29 Apr 2012 - 5:16 pm | बबलु
मेहेंदळे साहेब, अंड न घालता हा कट्टा कसा करता येइल ? ;) ;)
असो.... मजा करा.
(अवांतरः-- मागे फोनवर म्हटल्याप्रमाणे गविंना माझा निरोप कळवा).
30 Apr 2012 - 12:25 am | विश्वनाथ मेहेंदळे
आयला, काय निरोप होता रे ? साफ विसरलो. :-(
व्यनी कर. किंवा, विरोप, गबोल्या आहेच :-)
2 May 2012 - 12:39 pm | प्रभाकर पेठकर
अंड (अंडं)न घालता हा कट्टा कसा करता येइल ?
आयला, कट्याला आलं तर अंडी घालावी लागतात? बापरे! ही काहीतरी भलतीच अट दिसते आहे.
29 Apr 2012 - 6:03 pm | निनाद मुक्काम प...
कट्याला हार्दिक शुभेच्छा.
1 May 2012 - 1:10 pm | कुंदन
कट्टा ठाण्याला अन म्हणे "मुंबई कट्टा"
मुंबई मुलुंडलाच संपते मालक ;-)
(मुंबईकर) -कुंदन
1 May 2012 - 1:38 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हद्दीवरून वाद घालणारी इतर अनेक शहरे आहेत. मुंबईकर त्या भानगडीत पडत नाहीत. उगाच झाली काय मुंबईची इतकी प्रगती ?? ;-)
2 May 2012 - 12:42 pm | प्यारे१
>>>उगाच झाली काय मुंबईची इतकी प्रगती ??
खिक! :) ;)
विमे फारच ब्वा विनोदी! ;)
3 May 2012 - 11:48 am | विश्वनाथ मेहेंदळे
नाही झाली म्हणता ?? ठीक आहे, तुम्ही म्हणता तसे....
या मुद्द्यावर वाद घालायला वेळ कुठे आहे ? प्रगती नाही का करायची आम्हाला ?? ;-)
3 May 2012 - 12:00 pm | प्यारे१
:)
यावरुन एक ज्योक आठवला:
मुंबईत सायकलचं हॅन्डल पकडून एक माणूस जात असतो. खूप घाईत असल्यासारखा जवळजवळ पळत असतो.
दुसरा म्हणतो अरे ए जरा ऐक तरी.
पहिला म्हणतो नको घाई आहे. लवकर जायचंय.
दुसरा : अरे मग सायकलवर ब सून जा.
पहिला : अरे जास्तच घाई आहे. सायकलवर बसायलाही वेळ नाही..... ;)
3 May 2012 - 12:09 pm | गवि
मलाही एक जोक आठवला.
एक मनुष्य १२० वर्षांचा होतो. जगातला सध्या जिवंत असलेला सर्वात दीर्घायुषी मनुष्य म्हणून त्याची मुलाखत घ्यायला एक पत्रकार येतो.
पत्रकार : तुमच्या दीर्घायुष्याचं रहस्य काय?
दीर्घायुषी मनुष्य : मी मन शांत ठेवतो.
पत्रकार : कसं ?
दीर्घायुषी मनुष्य : मी कोणाशीही कशावरुनही वाद घालत नाही.
पत्रकार : (काहीसा वैतागून) तुम्ही काहीच्याकाही बोलताय. इतक्या मोठ्या आयुष्यात तुम्ही कोणाशी वाद न करता राहिलात हे शक्य आहे का? वाद घालणं हा मनुष्याचा मूळ गुणधर्म आहे. सर्वांशी एकमत होणं शक्यच नाही. तुम्ही दीर्घायुषी झाला आहात म्हणून काहीही कारण सांगण्याचा हक्क तुम्हाला मिळाला आहे, म्हणून तुम्ही वाट्टेल ते, तोंडाला येईल ते खोटं कारण ठोकून देता आहात.
दीर्घायुषी मनुष्य : बरं. तुम्ही म्हणता तसंच असेल.
.......................
2 May 2012 - 9:39 am | नंदन
ठाणे-वसई-ठाकुर्ली-भाईंदर-कल्याण-विरारकरांनाही आपलं म्हणा, कुंदनसेठ! :)
2 May 2012 - 1:02 pm | कुंदन
तथास्तु !!!
चला ठाणे-वसई--भाईंदर-कल्याण-विरारकरांनो रांग लावा.
स्पा : ठाकुर्ली वाल्यांसाठी वेगळी रांग आहे , तिकडे जा तु.
2 May 2012 - 9:43 am | स्पा
ठाणे-वसई-ठाकुर्ली-भाईंदर-कल्याण-विरारकरांनाही आपलं म्हणा, कुंदनसेठ!
=)) =))=)) =))=)) =))
2 May 2012 - 1:17 pm | गणपा
वा वा वा.. मुंबई कट्टा का मजा करा लेको. ;)