जॉन अब्राहम, अभिनय कशाशी खातात हे न कळणारा एक बॉलीवुडी पेहेलवान, जेव्हा एक चित्रपट प्रोड्युस करणार हे वाचले होते तेव्हा हसू आले होते. खरंतर त्याचा हा सिनेमा डाऊनलोड करूनच बघितला असता. पण सध्या मद्र देशी काहिच विरंगुळा नसल्याने आणि १२-२ असे लोड शेडिंग असल्यामुळे एका मॉल मध्ये गेलो (A.C. मध्ये २ तास घालवायला). बघण्यासारखी काहीच 'प्रेक्षणीय स्थळं' नसल्यामुळे भयंकर बोर झाले म्हणून PVR मल्टीप्लेक्स कडे मोर्चा वळवला. तिथे त्यावेळी फक्त विकी डोनर ची तिकीटे करंटला मिळत होती. म्हटले चला १२० रूपये जॉनच्या बोडक्यावर घालूयात काही पर्याय नाही. पण चक्क १२० रूपयांमधले ८०-९० रूपये वसूल झाले आणि जॉन एक अभिनेता नसला तरीही चक्क एक चांगला निर्माता असल्याचे निदर्शनास आले.
दिल्लीत डॉ. बलदेव चढ्ढा (अन्नू कपूर) दरियागंज मध्ये एक Infertility Clinic आणि स्पर्म बॅन्क चालवत असतात. पण सध्या काही केसेस फेल गेल्यामुळे त्यांचे पेशंट कमी होऊन स्पर्म बॅन्क बंद पडते की काय अशी परीस्थिती झालेली असल्यामुळे ते एका तरूण वीर्यदात्याच्या शोधात असतात.
ह्या शोधाशोधीच्या प्रयत्नात त्यांना सापडतो लजपत नगर मध्ये रहाणारा तरुण, विकी (आयुष्यमान खुराणा). विकीची आई, डॉली, एक ब्युटी पार्लर चालवत असते. आजीचा,'बीजी'च्या, लाडावलेल्या विकीला बिजनेस न करता एक रेप्युटेड नोकरदार व्ह्यायचे असते. 'मम्मी आय वॉन्ट रेस्पेक्ट, आय वॉन्ट क्लास' असे तो डॉलीला सारखा अस्सल पंजाबी लहेजात बजावत असतो. डॉ. चढ्ढा मग ह्या विकीला पटवून वीर्यदाता बनण्याची विनंती करतात. पण विकी त्यांची ही मागणी धुडकावून लावतो. पण छानछौकीला चटावल्यावलेल्या विकीला ते पैशाचे अमिष दाखवून 'बाटलीत उतरवतात' ;)
मग विकीकडे पैशाचा ओघ सुरू होतो. त्याच्या घराचा आणि डॉलीच्या ब्युटी पार्लरचा कायापालट होतो. बीजीला हवा असलेला १६ जीबी iPhone आणी ४२ इंची LCD TV घरात येतो. सगळा आनंदी आनंद असतो. मग विकीला एक जोडीदारीण पण मिळते बॅन्केत (खर्याखुर्या, स्पर्म बॅन्केत नव्हे) काम करणारी, अशीमा रॉय (यामी गौतम). त्यांचे यथावकाश लग्न होते आणि इथे कथा एक वळण घेते...
अशीमा कधीच आई बनू शकणार नाही अस डॉक्टर तीला एका तपासणीच्या वेळी सांगतात. त्यामुळे अशीमा मानसिकरीत्या खचून जाते तर वीर्यदानामुळे इतरांना बाप होण्याचे सुख मिळवून देणारा विकी स्वतः कधीही बाप होऊ शकणार नाही, ह्या असल्या, दैवाच्या खेळामुळे हतबल होऊन जातो. त्याच दरम्यान तो स्पर्म डोनर असल्याचे अमीशाला कळते आणि त्याने तिला ते आधि का सांगीतले नाही म्हणून चिडून, भांडून घर सोडून निघून जाते. कथा एकदम सिरीयस वळण घेते. डॉ. चढ्ढांना हे सर्व कळते आणि मग ते एक युक्ती करतात आणि अमीशाला परत आणतात. सर्व आलबेल होऊन शेवट गोड होतो. पण ती युक्ती काय हे पहाण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. :)
जरासा वेगळा म्हणजे बॉलीवुडच्या भाषेत 'हटके', खासकरून भारतीय समाजात चर्चा करण्यास निषीद्ध असा स्पर्म डोनर हा विषय विनोदी अंगाने हाताळला आहे. ह्यात सर्वात जमेची बाजू म्हणजे संपूर्ण चित्रपटाला असलेली दिल्ली आणि पंजाबी पार्श्वभूमी आणि पंजाबी भाषेचा तडका असलेले डायलॉग्स. पूर्वार्धात सिनेमा अतिशय मनोरंजन करतो. खुसखुशीत संवाद मजा आणतात. विकीची आजी 'बिजी' (कमलेश गील) हे पात्र खासंच रंगवले आहे, मजा आणते. डॉली आणि बिजी ह्यांचे सास-बहू सीन्स एकदम मिश्कील आहेत. विकी पंजाबी आणि अशीमा बंगाली, त्यांच्या कुटुंबीयांचे त्यांचे हे लग्न स्विकारण्याचे प्रसंग धमाल आणतात. विषेशतः अशीमाच्या वडिलांचे 'पंजाबीकरण' मजेशीर.
MTV रोडीज ह्या कार्यक्रमाची फाईंड असलेला आयुष्यमान अतिशय आत्मविश्वासाने वावरला आहे पूर्ण चित्रपटात. पहिला चित्रपट करतो आहे असे कुठेही वाटत नाही. पंजाबी आणि दिल्लीकर विकी त्याने मस्त रंगवला आहे. यामी गौतमने तीची भुमिका व्यवस्थित निभावली आहे. अन्नु कपूरचा डॉ. चढ्ढा काही जास्त भावत नाही. पोट सुटलेला अन्नु बघवत नाही. हे पात्र खूप छान रंगवता आले असते पण अन्नु कपुरला वाया घालवले आहे. ह्या मेनस्ट्रीम कलांकारांपेक्षा चित्रपटात जान आणली आहे कमलेश गील ह्यांच्या बिजीने. हे पात्र छान लिहीले आहे आणि त्याला १००% न्याय दिला आहे कमलेश गील ह्यांनी.
शुजीत सरकारचे दिग्दर्शन ओके ओके, जास्त इंप्रेसिव्ह नाही. जुही चतुर्वेदीचे संवाद भन्नाट आहेत. पुर्वाधात फक्त ह्या संवादांची आतिषबाजी धमाल आणते. पण कथा आणि पटकथा शेवटी भरकटली आहे. डॉ. चढ्ढांची युक्ती एकदम पकाऊ आणि निरर्थक वाटते. खरेतर अशीमा भांडून तिच्या घरी गेल्यावर विकी तीला आणायला तीच्या घरी कलकत्त्याला जातो. त्यावेळी अशीमाचे वडील तिच्या मानसिक गोंधळाचा गुंता एका परखड प्रश्नाने सोडवतात. ते विचारतात "तुझ्या रागाचे कारण काय आहे? तु आई होउ शकणार नाहीस हे की विकीने तुला सत्य सांगीतले नाही हे की तु आई व्हायला समर्थ नाहीस आणि पण विकी बाप बनायला समर्थ आहे हे?" तिथेच गुंता संपून सिनेमा संपवायला हवा होता. तो एकदम परफेक्ट आणि इफेक्टीव्ह शेवट झाला असता. ईथे जुही चतुर्वेदी कथाकार म्हणून थोडी भरकटली आहे आणि शेवट लांबून विस्कळीत झाला आहे.
थोडक्यात, विनोदी आणि धमाल पूर्वार्ध असलेला, इंटरव्हल नंतर थोडा सिरीयस असलेला आणि शेवट लांबून विस्कळीत झालेला हा विकी डोनर १००-१२५ रुपयांमध्ये मल्टीप्लेक्स मध्ये बघायला हरकत नाही, आयुष्यमान, डॉली आणि बिजी साठी. ह्यापेक्षा जास्त ति़कीट असेल तर मात्र आरामात डाऊन्लोड करून बघायाला हरकत नाही.
जर यदाकदाचित तुम्हाला हा चित्रपट पाहून वीर्यदानाचे महत्व पटले तर जॉन अब्राहम खर्या अर्थाने 'यशस्वी' निर्माता आहे असे म्हणता येईल ;)
प्रतिक्रिया
22 Apr 2012 - 5:28 pm | संजय क्षीरसागर
चित्रपट पाह्यल्यासारखा आनंद होतो.
आगदि पहिल्या वाक्याशी > दिल्लीत डॉ. बलदेव चढ्ढा (अन्नू कपूर) दरियागंज मध्ये एक Infertility Clinic आणि स्पर्म बॅन्क चालवत असतात....
एका ओघात वाचताना > मग विकीला एक जोडीदारीण पण मिळते बॅन्केत काम करणारी, अशीमा रॉय (यामी गौतम).
हे वाक्य रिलेट होऊन, आता ही ललना काय करायची त्या बँकेत? असा विचार मनात येऊन होऊन थोडा वेळ हँग झालो होतो!
बाय द वे, महाभारतातली `नियोग' वगैरे पद्धती वर चाललेली चर्चा आणि त्याच वेळी अशा चित्रपटावर परिक्षण येणं हा एक वेगळाच `योग' आहे असं वाटून गेलं
22 Apr 2012 - 6:31 pm | धनंजय
कालच पाहिला. तिकिटाचे पैसे ७०-८०% वसूल होण्याइतपत आवडला. सहमत.
सुरुवातीच्या काही हलक्या विनोदांचे गैरसमज शेवट येईपर्यंत दूर केलेले आहेत. म्हणजे स्पर्म डोनेशन लाजिरवाणे आहे, बंगाली आणि पंजाबी लोकांचे एकमेकांविषयी गैरसमज कधीच दूर होणार नाहीत... हे सगळे शेवटी ठीक होते.
फक्त विनोदासाठी उभा केलेला एक गैरसमज शेवटी दूर करत नाहीत : अलेक्झांडरच्या वंशजांचे आणि एकुणात आर्यवंशाचे वीर्य हे उच्च प्रतीचे असते, म्हणून डोनेशनसाठी अधिक योग्य असते. कथा आणि विनोद खुलवण्यासाठी याची कितपत आवश्यकता होती, ठाऊक नाही.
(खरे तर डॉ. चढ्ढा विकीला त्याच्या बिन्धासपणासाठी निवडतो. शिवाय देखणा म्हणून. बिन्धास का हवा? कारण तणावामुळे वीर्यातील शुक्रजंतू कमी आणि कमजोर होतात, असे त्याचे मत आहे. हे चित्रपटाचे कथानक. वैद्यकीय माहिती खरीखोटी मला ठाऊक नाही.)
22 Apr 2012 - 9:17 pm | पैसा
नावाजलेले कोणी कलाकार नाहीत, या चित्रपटाला किती प्रतिसाद मिळतोय देव जाणे. पण एकदा बघायला नक्कीच हरकत नाही.
22 Apr 2012 - 10:18 pm | शिल्पा ब
परीक्षण वाचुन युटयुबवर ट्रेलर पाहीला. मजेशीर आहे.
22 Apr 2012 - 10:41 pm | रेवती
सिनेमा मिळाला तर बघते.
22 Apr 2012 - 10:47 pm | अत्रुप्त आत्मा
:-)
22 Apr 2012 - 11:00 pm | चैतन्य गौरान्गप्रभु
अतिशय छान समिक्षण आहे. हे वाचून हा सिनेमा पहाण्याची ईच्छा झाली. नाहीतर असा लो बजेट सिनेमाला जायला मन धजत नाही.
23 Apr 2012 - 2:12 am | सुहास झेले
मस्त परीक्षण... डाउनलोड करतोय... थेटरात जायची हिम्मत नाय :)
मग रा-वन नक्की बघितला असेल चैतन्यराव ;) :)
23 Apr 2012 - 3:49 am | शिल्पा ब
हॅ हॅ हॅ
23 Apr 2012 - 3:56 am | चैतन्य गौरान्गप्रभु
नाही राव! रा-वन पहाण्याची ईच्छा तर झाली होती, पण पहिल्या ४८ तासातच त्याचे ईतके घाणेरडे रिपोर्टस आले की त्या ईच्छेचा नाश झाला. याउलट रोबोट मी पहिल्या दिवशीच मरमर करत पाहिला आणि तो ईतका आवडला की नन्तर 'ईन्धीरन' ही त्याची मुळ तामीळ आवृत्तीही पाहिली. भलेही जास्त काही समजली नाही तरीही!
मात्र... हा विकी डोनर पाहण्याची ईच्छा आहे. आता सोमवार-ते शुक्रवार दरम्यान स्वस्त्यातला मॉर्नीन्ग शो बघतो. . ..
23 Apr 2012 - 11:50 pm | सोत्रि
हा हा हा :D
सुहास, मस्तच ;)
- (रा-वन बघितलेला [पैसे देऊन] :( ) सोकाजी
23 Apr 2012 - 10:02 am | प्रचेतस
परीक्षण झकास.
23 Apr 2012 - 11:55 am | स्पा
झकास परीक्षण हो सोत्री
23 Apr 2012 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार
परिक्षण खुमासदार एकदम.
चित्रपट पाहिल्या जाईल.
धन्याचे वादस सोत्रि अन्ना.
23 Apr 2012 - 1:32 pm | संजय क्षीरसागर
धन्याचे वारस सोत्रि नियोगी!
असं हवं
24 Apr 2012 - 12:01 pm | परिकथेतील राजकुमार
चालेल चालेल. हे पण चालेल.
24 Apr 2012 - 11:40 am | हसरी
चित्रपटाविषयी छान लिहिलंय. लेखन वाचून चित्रपट पाहण्याची इच्छा झाली आहे.
25 Apr 2012 - 9:45 am | अमृत
तुमचं प्रोत्साहन वाया जाणार नाही. परिक्षण मस्त खुसखुशीत. बाकी आमी 'यामी' बद्दल जास्त न लिहिल्यामुळे निषेध नोंदवतो. :-)
अमृत
25 Apr 2012 - 7:06 pm | सोत्रि
भावना पोहोचल्या! :)
पण यामीने जास्त लिहावे अशी तार न छेडल्यामुळे तसे झाले खरे. जर सिनेमात विद्या असती तर.... ;)
- (विद्यामय) सोकाजी
25 Apr 2012 - 8:10 pm | रेवती
सगळीकडे कशी विद्या मिळेल हो!;)
आता दक्षिणी झालाच आहात तर तुम्ही का नाही विद्याला घेऊन शिनेमा काढत?
20 Jun 2013 - 9:34 am | आशु जोग
यामीने जास्त लिहावे
यामी लिहिते वाटते. मग बोलवा की मिसळीवर.
20 Jun 2013 - 9:36 am | आशु जोग
बादवे यामी अनुष्काची जागा नक्की घेइल. अनुष्कापेक्षा आवाजही अधिक चांगला आहे.