समलिंगी संबंध.....

अमितसांगली's picture
अमितसांगली in जनातलं, मनातलं
7 Mar 2012 - 9:07 am

लैंगिकता हि प्रत्येक व्यक्तिगणिक वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीचे काही लैंगिक अग्रक्रम असतात. पुरुषाला स्त्रीविषयी वाटणारे आकर्षण व स्त्रीला पुरुषाविषयी वाटणारे आकर्षण(भिन्नलिंगी आकर्षण) हे समाजाच्या सर्व घटकाद्वारे नैसर्गिक मानण्यात आले आहे. समान लिंग असणाऱ्या दोन व्यक्तींच्या लैंगिक संबंधाना समलिंगी म्हणतात. पुरुषांचे पुरुषांशी संबंध असतील तर त्यांना गे म्हणतात व स्त्रीचे स्त्रीशी संबंध असतील तर त्यांना लेस्बिअन म्हणतात. समलिंगी संबंधातून मुल जन्माला घालता येत नाही त्यामुळे बहुसंख्य लोकांच्या दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानण्यात आले आहेत. पण लैंगिक संबंधांचा हेतू हा फक्त मुल जन्माला घालणे नसून परस्परांना आनंद देणे हा आहे. दोन्ही व्यक्तींनी एकमेकांच्या आनंदासाठी केलेला लैंगिक अविष्कार हाच या संबंधांचा मूळ हेतू आहे.

समलिंगी आकर्षण हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. साहित्य,शिल्प,कला या प्रकारच्या माध्यमातून ते आढळून येत. पण त्याकाळी याविषयी समाजात खुलेपणाने बोलले जात नसे.एकोणिसाव्या शतकात मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून समलिंगी संबंध अनैसर्गिक मानले जायचे. अमेरिकन मानसशास्त्र संस्थेने वैद्यकीय संशोधन करून समलैंगिकतेची व्याख्या "लैंगिकतेच्या विविध अविष्कारापैकी एक" अशी केली आहे. समलिंगी असणे हा मानसिक रोग किंवा विकृती नाही. ती शरीराची व मनाची एक अवस्था आहे. भिन्नलिंगी आकर्षणाप्रमाणे समलिंगी आकर्षणही नैसर्गिकच आहे. या व्यक्तींची बोद्धिक क्षमता, जडणघडण भिन्नलिंगी व्यक्तीप्रमाणेच असून या व्यक्तीही निरोगी आयुष्य जगू शकतात.

समलिंगी असण्याची काही कारणे :
१. शास्त्रज्ञांच्या मते आनुवंशिक व हार्मोनिक बदलांमुळेसुद्धा एखादी व्यक्ती समलैंगिक असू शकते.

२. तारुण्यात असणारी मुले भावनिक व मानसिक आधारासाठी समलिंगी संबंधांचा आधार
घेतात.

३. महाविद्यालयीन जीवनात लैंगिक प्रयोग करून बघण्याचे विलक्षण कुतूहल असते. अशावेळी भिन्नलिंगी जोडीदार न मिळाल्यास समलिंगी संबंध ठेवले जातात व नकळत पुढे त्याची सवय होती.

४. लग्न झाल्यावर कामेच्छा पूर्ण न झाल्यास व्यक्ती दुसऱ्या जोडीदाराचा शोध घेतात. भिन्नलिंगी जोडीदार न मिळाल्यास अशा व्यक्ती समलिंगी व्यक्तीशी संगत करायलाही घाबरत नाहीत.

समलिंगी असण्याचे धोके व बाहेर पडण्याचे मार्ग:
१.समलिंगी संबंधातील जोडीदारापैकी एकाला एड्स असल्यास व निरोध न वापरता संभोग केल्यास यातूनही एड्स होऊ शकतो.

२. नैसर्गिकरीत्या आपल्याला अशा व्यक्तींचे आकर्षण वाटत नसल्यास अशा व्यक्तींबरोबर शारीरिक संबंध ठेऊ नयेत. कितीही मोह झाला तरीही मनावर संयम ठेऊन अशा व्यक्तींशी शरीर संबंध टाळावा.

३.. योग्य समुपदेशन, डॉक्टरांची मदत व प्रबळ इच्छाशक्ती यामुळे समलिंगी असणाऱ्या व्यक्तींना यातून बाहेर पडणे शक्य आहे. अशा व्यक्ती यातून बाहेर पडू शकतात, त्यांना मुलं-बाळही होऊ शकतात पण परत समलिंगी आकर्षण जागृत होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असते.

कॅनडा, स्पेन, नॉर्वे, बेल्जीअम, दक्षिण आफ्रिका यासारख्या काही देशांनी अशा संबंधाना अधिकृत मान्यता दिली आहे. युरोपातील काही देशात मान्यता नसली तरी त्यांना वैवाहिक जोडप्यांचे अधिकार देण्यात आले आहेत. अमेरिकेतही काही राज्यात याला मान्यता आहे. गेल्याच महिन्यात अमेरिकेची राजधानी असणाऱ्या Washingaton शहरातही समलैंगिक लोकांच्या लग्नाला वैध ठरविणारे विधेयक मंजूर करण्यात आले. इंग्लंडमध्ये तर Manchestar जवळ "गे व्हिलेज" असे समलैंगिक लोकांचे गावच आहे . आखाती देशामध्ये अशा संबंधाना मृत्युदंडाची शिक्षा असून भारतात दंडसंहिता कलम ३७७ नुसार जन्मठेप/काही वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे.(विशेष म्हणजे भारतात बलात्कार करणाऱ्या नराधमाना पण जन्मठेपेची शिक्षा नाही). पण आता सर्वोच्च न्यायालयाने खडसावल्यानंतर सरकारने समलिंगी संबंधाना मान्यता देण्याचे ठरविले आहे..

भारतातील धार्मिक ग्रंथात अशा प्रकारच्या संबंधाना मान्यता नसून भारतीय समाज दुसऱ्या देशांपेक्षा वेगळा आहे. भारतीय संविधान, नैतिक मुल्ये वेगळी आहेत. या संबंधातून घातक आजार फैलाविण्याची जास्त शक्यता असल्याने समलिंगी संबंधास मान्यता देता येणार नाही असे स्पष्टीकरण सरकारकडून देण्यात आलेले आहे.

मुळात, भारतासारख्या देशात लैंगिक संबंधाबद्दल चर्चा करण्यात चोरटेपणा व अपराधीपणाची भावना आहे. एखाद्या मुलाला सायन्सऐवजी आर्ट्सला का जाव वाटत हे देखील ज्यांना चटकन समजत नाही, त्यांना समलिंगी संबंधाना मान्यता देण हेही पचवण अवघडच जाणार आहे. त्यांचे प्रश्न माहित नसलेला समाज त्यांना गुन्हेगार ठरवत आहे. अल्पसंख्याकावर अन्याय करण, त्यांना भेदभावाची वागणूक देण हे घटनाबाह्य असून माणूस म्हणून जगण्याच्या मुलभूत हक्कांच्या विरोधात आहे. सन्मानान जगण हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे.

समलैंगिक वर्तन अनैसर्गिक नाही अशी चर्चा IBN लोकमतवर झाली होती. त्यावेळी बिंदुमाधव खिरे जे समलैंगिक आहेत त्यांनी सांगितले कि, आपण असे संबंध मनापासून मान्य करीत नसलो किंवा असे संबंध मान्य करणे कठीण असले तरी या गोष्टी शास्त्रीय दृष्ट्या नैसर्गिकच आहेत. समलिंगी व्यक्तीस मनाविरुद्ध भिन्नलिंगी व्यक्तीशी संबंध ठेवण्यास भाग पाडले तर अशा व्यक्तींची मानसिक घुसमट होऊन आत्महत्या करेपर्यंत त्यांची मजल जाऊ शकते..

एका मुलाने ज्यावेळी आपल्या पालकांना समलैंगिक आहे असे सांगितले त्यावेळी त्याच्या पालकांनी त्याला घराबाहेर काढले. आता ते त्याला भरपूर पैसे पाठवितात, पण आपला मुलगा मानायला तयार नाहीत. समाजाची भीती व अवहेलना यामुळे या मुलाचा एकलकोंडा वाढत गेला. अनावर झाल कि एड्सचा धोका असूनही तो पुरुष वेश्यांकडे जातो. थोडक्यात काय, अशा लोकांना वाळीत टाकून किंवा शिक्षा करून प्रश्न सुटण्यापेक्षा अधिक बिकट होत जाणार आहे. त्यांना धीर व प्रोत्साहन देऊन समाजवून सांगण्याची गरज आहे.

बिली जीन किंग व मार्टिना नवरातीलोका या दोन महान टेनिसपटू समलैंगिक असूनही असंख्य टेनिस चाहते त्यांच्या टेनिस कौशल्यामुळे त्यांच्यावर फिदा आहेत. ओलम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळविणारा व स्पोर्टस्मन ऑफ द सेन्चुरी असा पुरस्कार मिळविणारा कार्ल लुईस हा देखील गे होता. पण म्हणून त्याच्याविषयीचा आदर तसूभरही कमी होत नाही.

सगळ जग त्यांच्याविषयी बोलत असताना, संस्कृतीचे वाद घालीत असताना, सामाजिक स्वास्थ्याच्या चर्चा करीत असताना, ज्यांच्या वाट्याला समलिंगी जगण आल आहे त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे कोणीही समजावून घेत नाही. निकोप मनान समाजान आपल्याला स्वीकाराव, आजार-विकृती, गुन्हा-पाप अशी लेबल न लावता चारचौघांसारख जगू द्याव एवढीच त्यांची माफक अपेक्षा आहे. कदाचित, गैरसमजुतीमुळे समाजाकडून त्यांची उपेक्षा झाली असेल,पण त्यांना सन्मानाची वागणूक मिळणे गरजेचे आहे.

धोरणसंस्कृतीसमाजविचारमत

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

7 Mar 2012 - 9:15 am | प्रचेतस

शिळ्या कढीला परत ऊत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Mar 2012 - 5:16 am | विश्वनाथ मेहेंदळे

ताज्या कढ्यान्ची लिस्ट एकदा देऊनच टाका ना साहेब.

तुम्ही सगळ्या जुन्या आणि जाणत्या लोकांनी बसून ठरवा नवीन लोकांनी नक्की कशा कशा वर धागे काढले तर चालतील. त्याची लिस्ट पब्लिश करू. Lets finish the topic once and for all.

ताज्या कढ्याच आता कुठं मिळना झाल्यात राव. देऊ तरी कुठून?

पिलीयन रायडर's picture

8 Mar 2012 - 11:08 am | पिलीयन रायडर

खरय... कुणी काही लिहिलं की बरेच लोक विनाकारण नकारात्मक प्रतिक्रिया लिहितात...
आणि "अवांतर" करण्यात काहींचा हात कुणीही धरु शकत नाही...
थोडक्यात काय तर काय वाटेल ते झालं तरी धागा भरकटवायचा...

प्रफुल्ल घोडचर's picture

7 Mar 2012 - 9:46 am | प्रफुल्ल घोडचर

चर्चा करण्या योग्य विषय नाहि कारण मन मान्यता देत नाहि.

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 9:53 am | चौकटराजा

वैयक्तिक आवडी जोपर्यंत दुसर्‍या मनाला किंवा शरीराला अति त्रास देत नाही तोपर्यंत विश्वात काहीही विकृत नाही. असे माझे सपष्ट मत आहे.
" अति त्रास " असे म्हणण्याचे कारण असे की " मज फूलही रुतावे " असे व्यक्तिमत्व असेल तर सॉरी ! आपल्याला उन्हाची अ‍ॅलर्जी आहे तर
सूर्यावर कोणताही कायदा पांधरूण घालणार नाही, कोंणतीही संस्कृति नाही !

आपंण हेट्रो सेक्चुअल आहोत म्हणून तसे नसलेल्याना विकृत ते सुद्धा कायद्याने घोषित करणे हा जुलुमच आहे. असे असेल तर भारतात " मांसाहारी" व युरोपात शाकाहारी हे विकृतात धरायचे का?

इरसाल's picture

7 Mar 2012 - 9:57 am | इरसाल

कुठेही मनाचा कोतेपणा न दाखवता दोन्ही बाजु समतोलपणे मांडणारा लेख.

अवांतर : (मित्रा अमित चर्चेची अपेक्षा ठेवु नकोस. ह्या धाग्याचा खरडफळा व्हायला किती वेळ लागतोय ते बघायचेय.)

दिलेले तीनही मुद्दे काहीसे विस्कळित किंवा नॉनस्पेसिफिक :

१.समलिंगी संबंधातील जोडीदारापैकी एकाला एड्स असल्यास व निरोध न वापरता संभोग केल्यास यातूनही एड्स होऊ शकतो.

हे समलिंगी संबंधांसाठी स्पेसिफिक नाही.. अर्थात "यातूनही" असा शब्द वापरुन तुम्ही हे दर्शवलेलं आहेच... समलिंगी संबंध म्हणजे "सेफ" असं नाही हे तुम्ही म्हणताय ते मात्र खरं.

२. नैसर्गिकरीत्या आपल्याला अशा व्यक्तींचे आकर्षण वाटत नसल्यास अशा व्यक्तींबरोबर शारीरिक संबंध ठेऊ नयेत. कितीही मोह झाला तरीही मनावर संयम ठेऊन अशा व्यक्तींशी शरीर संबंध टाळावा.

नैसर्गिकरित्या आपल्याला अशा व्यक्तीचं आकर्षण वाटत नसल्यास कशापाई कोणी संबंध ठेवेल? आणि त्यातून ठेवलेच तर "कितीही मोह झाला तरी संयम ठेवण्याची" वेळ यावी इतका अनिवार मोह आकर्षणाशिवाय का होईल?

३.. योग्य समुपदेशन, डॉक्टरांची मदत व प्रबळ इच्छाशक्ती यामुळे समलिंगी असणाऱ्या व्यक्तींना यातून बाहेर पडणे शक्य आहे. अशा व्यक्ती यातून बाहेर पडू शकतात, त्यांना मुलं-बाळही होऊ शकतात पण परत समलिंगी आकर्षण जागृत होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असते.

ज्याला यातून समुपदेशनाने आणि डॉक्टरांच्या मदतीने "बाहेर पडण्याची" "प्रबळ" इच्छा आहे तो समलिंगी कसा?

..

धन्यवाद.

वपाडाव's picture

7 Mar 2012 - 3:38 pm | वपाडाव

मुद्दा नं २ व ३, आपापसांत गुंतलेले वाटतायेत...

अमितसांगली's picture

7 Mar 2012 - 7:26 pm | अमितसांगली

१.समलिंगी संबंधातील जोडीदारापैकी एकाला एड्स असल्यास व निरोध न वापरता संभोग केल्यास यातूनही एड्स होऊ शकतो.....
भिन्नलिंगी संबंधातून एड्स होतो हे सर्वाना माहीतच आहे,पण समलिंगी संबंधही सुरक्षित नाहीत असे मला सांगायचे आहे.

२. नैसर्गिकरीत्या आपल्याला अशा व्यक्तींचे आकर्षण वाटत नसल्यास अशा व्यक्तींबरोबर शारीरिक संबंध ठेऊ नयेत. कितीही मोह झाला तरीही मनावर संयम ठेऊन अशा व्यक्तींशी शरीर संबंध टाळावा.
काही वेळा लैंगिक संबंध ठेवण्याचे विलक्षण कुतूहल वाटते. जर असे काहीही वाटत असले तरी अशा प्रकारचे संबंध टाळावेत इतकच सूचित करायचं आहे.

३.योग्य समुपदेशन, डॉक्टरांची मदत व प्रबळ इच्छाशक्ती यामुळे समलिंगी असणाऱ्या व्यक्तींना यातून बाहेर पडणे शक्य आहे. अशा व्यक्ती यातून बाहेर पडू शकतात, त्यांना मुलं-बाळही होऊ शकतात पण परत समलिंगी आकर्षण जागृत होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असते.
जी लोक नकळत अशा संबंधात अडकतात त्यांना इच्छा असूनही यातून बाहेर पडणे कठीण जाते. बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीची सवय झाली कि त्यातून बाहेर पडण्यासाठी समुपदेशन, कुटुंबाकडून धैर्य तसेच मनावर नियंत्रण मिळवावे लागते.

चौकटराजा's picture

7 Mar 2012 - 10:10 am | चौकटराजा

वैयक्तिक आवडी जोपर्यंत दुसर्‍या मनाला किंवा शरीराला अति त्रास देत नाही तोपर्यंत विश्वात काहीही विकृत नाही. असे माझे सपष्ट मत आहे.
" अति त्रास " असे म्हणण्याचे कारण असे की " मज फूलही रुतावे " असे व्यक्तिमत्व असेल तर सॉरी ! आपल्याला उन्हाची अ‍ॅलर्जी आहे तर
सूर्यावर कोणताही कायदा पांधरूण घालणार नाही, कोंणतीही संस्कृति नाही !

आपंण हेट्रो सेक्चुअल आहोत म्हणून तसे नसलेल्याना विकृत ते सुद्धा कायद्याने घोषित करणे हा जुलुमच आहे. असे असेल तर भारतात " मांसाहारी" व युरोपात शाकाहारी हे विकृतात धरायचे का?

मूकवाचक's picture

7 Mar 2012 - 10:21 am | मूकवाचक

अवांतरः
एक तार्किक निष्कर्ष - 'गे' लोकांना 'समोरच्या पार्टीला' काय वाटेल याबद्दल साशंक होऊन 'ताकाला जाताना' भांडे वगैरे लपवण्याची गरज पडत नसावी.

आपली समाजस्वास्थ्याविषयीची कळकळ आणि आस्था पाहून, समाजातील भल्या-बुर्‍या गोष्टींवर परखड भाष्य करणारे लेख वाचून आमचा ऊर अभिमानाने भरुन येतो, पापण्यांच्या कडा आनंदाश्रूंनी ओलावतात आणि आता या देशाचा उज्ज्वल भविष्यकाळ आता दृष्टीक्षेपात आला आहे या जाणिवेनं अंगावर रोमांच दाटून येतात.

आपल्यासारखे सजग नागरीक असल्यावर भारत ही एक जागतिक महासत्ता व्हायला फार वेळ लागणार नाही.

आपल्या धडाडीस आमचा बहुरंगी आणि बहुढंगी सलाम.

तिमा's picture

7 Mar 2012 - 11:01 am | तिमा

आपली लिंगाविषयीची कळकळ पाहून ह्या 'मल्टीलिंग्विस्टिक' समाजाचे उत्थापन होण्यास वेळ लागणार नाही असे वाटते.

गल्ली चुकलात की हा होळीचा परीणाम म्हणायचा? :)

डॉ.श्रीराम दिवटे's picture

7 Mar 2012 - 10:32 am | डॉ.श्रीराम दिवटे

सापट दिसली की पाचर ठोकायची अनेकांची सवय असते, चालायचेच. मान्यता द्यायला हरकत नसावी.

प्रसाद प्रसाद's picture

7 Mar 2012 - 11:11 am | प्रसाद प्रसाद

उत्तम लेख.
काही मुद्द्यांबाबत थोडासा असहमत, त्याविषयी गविदानी आधीच मला जे म्हणायचे होते ते अधिक चांगले लिहिले आहे.

आदिजोशी's picture

7 Mar 2012 - 12:09 pm | आदिजोशी

समलैंगीक संबंध फार पूर्वीपासून चालत आले आहेत म्हणून बरोबर होत नाहीत. दारू पिणे, जुगार खेळणे आणि वेश्यागमन करणे ह्या गोष्टीही फार पूर्वीपासून चालत आल्या आहेत म्हणून त्या बरोबर ठरतात का?

मला तरी असे संबंध अनैसर्गीकच वाटतात. निसर्गाला मानवाने समलिंगी संबंध ठेवावे असं वाटलं असतं तर त्याने प्रत्येकाला उभयलिंगी केलं असतं.

एक नट आणि एक बोल्ट अशी स्पष्ट रचना निसर्गाने केली आहे. नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट बसवण्याचा प्रयत्न करणं नैसर्गीक कसं होईल?

लैंगीक संबंधांची योजना प्रजोत्पादनासाठी आहे. अ‍ॅडवेंचर म्हणून काही लोकं प्राण्यांशीही संबंध ठेवतात, अगदी पुरातन काळापासून. अरब लोकं तर उंट आणि घोड्यांशीही समागम करतात. हे बरोबर आहे का? की घोडा ही प्राणी आणि माणूसही प्राणीच असं म्हणून त्यालाही '''नैसर्गीक''' अशी पट्टी चिकटवणार.

सद्ध्या सेलिब्रिटीज ना हाताशी धरून समलैंगी संबंधांचे जे उदात्तीकरण आणि ग्लॅमरायझेशन सुरू आहे ते किळसवाणे आहे. अशामुळे अकारण ह्याकडे अडनिड्या वयातली मुलं त्याकडे आकर्षीत होतात. विकॄतीचे उदात्तीकरण अधीकच विकॄत असतं.

प्रचेतस's picture

7 Mar 2012 - 12:10 pm | प्रचेतस

पूर्णपणे सहमत.

समलेंगिकता ही विकृतीच आहे.

मृत्युन्जय's picture

7 Mar 2012 - 2:42 pm | मृत्युन्जय

कुठलीही गोष्ट फार पुर्वीपासुन चालली आहे म्हणुन बरोबर होत नाही. तशीच ती फार पुर्वी फार प्रचलित नव्हती म्हणुन चुकीचीही होत नाही.

समलिंगी संबंध अनैसर्गिक कसे हे मला कळत नाही. जर निसर्गतः अश्या संबंधांनी त्या माणसांना लैंगिक आणि मानसिक सुख मिळत असेल तर ते नैसर्गिकच म्हणावे. जर त्यातुन सुख मिळत असेल तर ती व्य्वस्था देखील निसर्गानेच केली आहे म्हणावे ना? नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट बसतच नाही त्यामुळे ते नैसर्गिक नसेलही कदाचित पण समलैंगिक संबंधांमध्ये नेमके उलटे होते. समानलिंगी व्यक्तींना आकर्षण वाटते आणि समाधानही मिळते. तर मग ते देखील नैसर्गिकच झाले ना?

घोडा आणी मानवाच संबंधांमध्ये देखील दोघांनाही सुख मिळत असेक तर ते नैसर्गिकच म्हणावे. प्रश्न हा आहे की घोड्याला (किंवा घोडीला) सुख मिळते आहे की नाही हे कोणी आणि कसे ठरवावे. मानवी संबंधांमध्ये तो देखील प्रश्न येत नाही. दोघांनाही सुख मिळत असते म्हणुन तर संबंध चालु असतात ना?

लैंगीक संबंधांची योजना प्रजोत्पादनासाठी आहे.

चुक. ते तसे इतर प्राण्यांच्या बाबतीत असते पण माणुस (आणि बहुधा माकड किंवा हत्ती) हे लैंगिक सुखासाठीदेखील प्रणय करतात. ज्या भिन्नलिंगी जोडप्यांना प्रजननात रस नाही त्यांचे संबंध तुमच्या प्रतिवादानुसार अनैसर्गिक होतील की हो मग. संततीप्रतिबंधक गोळ्या आणि उपकरणे देखील अनैसर्गिक मानावे लागेल. माणुस सुखासाठी सुद्धा संभोग करतो किंबहुना तो सुखासाठीच जास्त (वेळा) संभोग करतो हे अमान्य करणे भयंकर चुकीच होइल.

सद्ध्या सेलिब्रिटीज ना हाताशी धरून समलैंगी संबंधांचे जे उदात्तीकरण आणि ग्लॅमरायझेशन सुरू आहे ते किळसवाणे आहे. अशामुळे अकारण ह्याकडे अडनिड्या वयातली मुलं त्याकडे आकर्षीत होतात. विकॄतीचे उदात्तीकरण अधीकच विकॄत असतं.

सेलिब्रिटीज ला हाताशी धरुन जे एकुणच लैंगिकतेचे उदात्तीकरण होते ते बरोबर आहे का? त्यामुळे आडनिड्या वयातली मुले प्रभावित होत नाहित काय? पॉर्न मुळे आकर्षण वाढीस लागत नाही काय? मुळात समलिंगी संबंध विकॄती आहे असे म्हणताच येणार नाही. ती देखील निसर्गाची एक रचनाच आहे असे मी म्हणेन.

गवि's picture

7 Mar 2012 - 2:50 pm | गवि

+१००

उत्तम प्रतिसाद रे..

शिवाय

नट मधे नट अथवा बोल्ट मधे बोल्ट अशा उदाहरणांनी रिलेशनशिप ही केवळ लैंगिकच नव्हे तर फक्त आणि फक्त मेकॅनिकलही असते असा सूर भासतो.. मानसिक आणि शारिरिक अशा दोन्ही प्रकारांनी नातं बनतं. समलिंगी किंवा विषमलिंगी कोणतंही "नातं" किंवा "संबंध" म्हणजे केवळ एक अवयव दुसर्‍यात जाणे (फिटमेंट) इतकंच नाही.. असो.

दादा कोंडके's picture

7 Mar 2012 - 4:01 pm | दादा कोंडके

माझीही पींक (मताची, चड्डीचा रंग नव्हे! :))

खरंतर नैसर्गिक, अनैसर्गिक, नैतिक-अनैतिक वगैरे सगळं सापेक्ष आहे. प्रश्न फक्त बहुसंख्य असण्याचा आहे. उद्या गे आणि लेस्बियन यांची संख्या जास्त झाली तर भिन्नलींगी संबंध ठेवण्यासाठी समाजाशी झगडावं लागेल. मुलं काय, लॅबमध्ये सुद्धा होतील. आता कृत्रीमरीत्या गर्भधारणा रोखतच आहोत. उद्या कृत्रीमरीत्या गर्भधारणाही नॉर्मलच समजलं जाईल.

काय मंता मंडली?

हंस's picture

7 Mar 2012 - 7:41 pm | हंस

अशामुळे अकारण ह्याकडे अडनिड्या वयातली मुलं त्याकडे आकर्षीत होतात
अ‍ॅडीभौ हा मुद्दा नाही समजला. आकर्षित होने न होने हे ज्याच्या त्याच्या नैसर्गिक उर्मीवर अवलंबून असते, थोडक्यात काय तर "आडात नाही तर पोहर्‍यात कोठून येणार"
आपल्या समाजात समलैंगिकतेविषयी पसरलेल्या गैरसमजातुन, समलैगिकांना समाजात नाहीतर स्वतःच्या कुटूंबातूनही शारिरिक आणि मानसिक मानहानीला सामोरे जावे लागते. जालावर ह्या विषयावर एका अनुदिनीवर अशाच एका लेखाने ह्रुद्य पिळवटून टाकले- http://alifeinpink.wordpress.com/the-last-letter/
खरच! समाजाचे एक घटक म्हणून आपण ह्यांचा विचार करनार आहोत की नाही हा राहून राहून विचार मनात येतो.

सोत्रि's picture

10 Mar 2012 - 12:15 pm | सोत्रि

प्रत्येक मुद्द्याशी सहमत!

- (स्ट्रेट) सोकाजी

मन१'s picture

7 Mar 2012 - 7:43 pm | मन१

+१००

चिरोटा's picture

7 Mar 2012 - 2:38 pm | चिरोटा

एकदम स्ट्रेट लेख.
मान्यता देण्यास हरकत नसावी पण ह्या गोष्टींचे उदात्तीकरण मिडियामार्फत चालु आहे हे ही खरे. फिल्मी वर्तुळात्,फॅशन उद्योगात अशा प्रकारचे अनेक लोक आहेत. समाजाची मान्यता मिळावी म्हणून मिडियामार्फत त्यांचे मार्केटिंग चालु आहे.
आपण लोकसंख्येत जगात नंबर दोन आहोत. तेव्हा काळजी करायची गरज नाही.

अविनाशकुलकर्णी's picture

7 Mar 2012 - 2:51 pm | अविनाशकुलकर्णी

सापट दिसली की पाचर ठोकायची अनेकांची सवय असते
तसेच उंच्वटे दिसले कि हाताचा आधार घेत चढाई हे राहिलेच कि साहेब..

अविनाशकुलकर्णी's picture

7 Mar 2012 - 2:55 pm | अविनाशकुलकर्णी

उघडले एक चंदनी दार..
पण कुठले मागचे कि पुढचे?
का दोन्ही सताड उघडी ???

एकदा एक मांसाहारी माणूस जंगलात आदिवासी लोकांमधे गेला. याला मांस भाजून खायची संवय . तिथे कसला तरी यांचा कॅम्प होता म्हणे !
एका दिवशी त्याला जरा जंगलातून एकटेच फिरण्याची लहर आली. ईन्डीयाना जोन्स सारखा वाट काढीत एका ठिकाणी घुसला . बघतो तो
एक मनुष्य काही झाडे उपटून मुळाच्या तळाशी असलेल्या आळ्या कच्चाच खात होता. याला ते किळसवाणे वाटले. कारण हा कच्चे मांसाच्या
कल्चर मधला नव्हता. मलाही चिकन खाणारा माणूस असाच किळसवाणा वाटतो ( खरेच ! ) तर मला तुम्ही संस्कृतिवाला म्हणाल की विकृती वाला ?

कपिलमुनी's picture

7 Mar 2012 - 3:55 pm | कपिलमुनी

चिकन खाणारा माणूस असाच किळसवाणा वाटतो..

याला काय म्हणाल ??

तिमा's picture

8 Mar 2012 - 12:06 pm | तिमा

म्हणून प्रतिक्रिया काढून टाकत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

7 Mar 2012 - 3:42 pm | परिकथेतील राजकुमार

लेख आणि काही अनुभवी प्रतिक्रियांमधून दोन्ही बाजू व्यवस्थीत समोर येत आहेत.

इष्टुर फाकडा's picture

7 Mar 2012 - 3:44 pm | इष्टुर फाकडा

या बाबतीत पूर्णतः वैयक्तिक आणि अज्ञानातून आलेले माझे मत म्हणजे लेस्बियन ठीक पण पुरुष होमो म्हणजे दुखादुखीची कामं आहेत. होमो हे मला वाटतं कि मानसिक अधारातून या बाजूकडे वळत असावेत; दोघांना एकाच वेळी रतिसुख मिळणं हे वस्तुतः अशक्य आहे जे भिन्नलिंगी सेक्स मध्ये मिळणं अपेक्षित आहे.
याउलट स्त्री च्या शरीररचनेत रती संवेदना या विखुरलेल्या असल्याने लेस्बियन असणं थोडसं सोपं जात असावं अर्थात शरीरसुखाचा विचार केला तर, सामाजिक दृष्टीने मी बोलतच नाही.
हा दगडापेक्षा विट मऊ छाप विचार मी पुरुष भिन्नलिंगी असल्यामुळे होत असावा बहुतेक.

लेख आणि त्यावर चालेलली चर्चा....... वाचतोय.

आबा's picture

7 Mar 2012 - 4:47 pm | आबा

प्र. का. टा. आ.

आबा's picture

7 Mar 2012 - 4:46 pm | आबा

चर्चेतून बरीच नविन माहिती समोर येत आहे.
..
...भिन्नलिंगी जोडीदार न मिळाल्यास समलिंगी संबंध ठेवले जातात व नकळत पुढे त्याची सवय होती.
समलिंगी संबंधांची 'सवय' लागल्यामुळे कोणी समलिंगी बनत नाही !

हंस's picture

7 Mar 2012 - 7:43 pm | हंस

समलिंगी संबंधांची 'सवय' लागल्यामुळे कोणी समलिंगी बनत नाही !

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Mar 2012 - 8:33 pm | निनाद मुक्काम प...

माझे लंडन च्या हिल्टन मध्ये अनेक सहकारी व वरिष्ठ पदावरील व्यक्ती ह्या समलैंगिक होत्या. अर्थात ही गोष्ट कधीही आमच्या कामाच्या व मैत्रीच्या आड आली नाही. चेहरा पुस्तकावर माझे ते अजूनही स्नेही आहेत. त्यामधील
माझा जर्मन बॉस रोनि ह्याने त्याच्या ब्राझिलियन सहकार्याशी लग्न जर्मनीत शक्य नसल्याने लंडन मध्ये केले. माझ्या सासू ने तर तिच्या मुलीने समलैंगिक जोडीदार निवडला असता तरी माझी हरकत नव्हती असे मला म्हणाली होती
लंडन मधील एका वयस्कर अनिवासी भारतीय आणि माझा एक वयस्कर आफ्रिकन कलीग ह्यांना तर त्यांची मुले समलैंगिक तर होणार नाही ना ह्या भीतीने ग्रासले होते. काही महिन्यात त्यांना ह्या विषयी छेडले असता त्यांनी त्यांच्या मुलींनी वय वर्ष १४ बॉय फेंड निवडल्याचे कौतुकाने सांगितले. कारण आजही युरोपातील आशियन व आफ्रिकन समाजात ह्या गोष्टींना मान्यता नाही आहे
.
हिंदू मुस्लीम व ख्रिशन धर्मामधील साम्य म्हणजे हे तीनही धर्म समलैंगिकतेला कडाडून विरोध करतात.
भविष्यात युरोपात वाढलेली माझी मुले समलैंगिक व्हावीत असे मला अजिबात वाटत नाहीत. हे माझे वयक्तिक मत आहे. हजारो वर्ष निसर्गाच्या नियमाने जे घडत आले आहे. त्यात बदल होऊ नये असे मला वाटते. पण जर त्यांनी हा पर्याय निवडला तर त्यांना विरोध करणे किंवा वाळीत टाकणे असे टोकाचे निर्णय मी घेणार नाही.
माझ्या जोडीदाराबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला माझ्या पालकांनी दिले. तेच मी माझ्या मुलांना ( भविष्यातील ) देणार.

आबा's picture

7 Mar 2012 - 10:25 pm | आबा

वैयक्तिक मत असणं मान्य,
पण,
"हजारो वर्षाचा निसर्गाचा नियम..."
समलैंगिकतेच्या विरुद्ध असलेला असा कोणताही नैसर्गीक नियम नाहीये हो.

शिवाय, समलैंगिक कोणी "होत" नाही,
जेनेटीक गोष्ट आहे ती (एखाद्याचे डोळे जेनेटीकली निळे असावेत तशी)

मला नेहमी प्रश्न पडतो की "समलैंगिकता योग्य की अयोग्य" अशी चर्चा करणारे आपण कोण?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

7 Mar 2012 - 11:34 pm | निनाद मुक्काम प...

निसर्गाचा नियम म्हणजे ?

प्राण्यामध्ये म्हणजे कुत्रा ,मांजर ह्यांच्यात असे संबंध आपणास आढळून आले असतील तर तसे सांगा.

आज जर काही लोक इतरांना त्रास न देता आपल्या परीने जीवन जगात असतील तर त्याला मला विरोध नाही.इतकेच

आबा's picture

8 Mar 2012 - 12:25 am | आबा

प्राण्यांमध्ये सुद्धा असतात असे संबंध !
दीड एक हजार जातींच्या प्राण्यामध्ये आढळून आले आहेत...

चौकटराजा's picture

8 Mar 2012 - 5:13 pm | चौकटराजा

आबा दीडशे स्पीशीजचा जो संदर्भ देत आहेत तो कोठून मला माहीत नाही.
पण मी अस्वल हस्तमैथून करताना प्रत्यक्ष पाहिले आहे.
स्थळ पेशवे उद्द्द्यान पुणे
काळ १९७२ ची एखादी सकाळ साडेदहाचा सुमार

आबा's picture

8 Mar 2012 - 6:08 pm | आबा

दीडशे नाही, हो दीड हजार,
बर्याच ठिकाणी सापडतील संदर्भ
पहिला म्हणजे
Bruce Bagemihl चं पुस्तक Biological Exuberance
येथे त्याचा review आहे ( http://www.cs.cmu.edu/~dtw/reviews/books/Biological_Exuberance.html )

विकीपेडीया वर पण समलैंगीक प्रजातींची भरपूर उदहरणे सापडतील
त्यात ओळखिची उदाहरणे म्हणजे
हत्ती, शेळ्या, जिराफ, सिंह, माकडे, खारी वगैरे सुद्धा आहेत

मुळात लैंगिक संबंधांचा उद्देश काय हेच ठिकसं माहीत नाहीये अजुन
Darwinian Paradox विषयी माहीती वाचली तर हे लक्षात येईल

याच विषयावर एक आर्टिकल आहे येथे
http://www.foxnews.com/story/0,2933,356639,00.html

माझ्याजवळ आणखी दोन - तीन नॉन टेक्नीकल पेपर होते, ते सापडले की टाकतो येथे

(प्राणी समलैंगीक असू शकतात म्हणून समलैंगीकता नैसर्गीक आहे. हे चुकीचं लॉजीक नाहीये का?
समलैंगीकता ही मुळातली नैसर्गीकच उर्मी आहे तीची नैसर्गीकता प्राण्यांच्या संदर्भावरून तपासणं हेच हास्यास्पद आहे. आणि लेखक तर समलैंगीकते मधून "बरे" होण्याचे उपाय देत आहेत :) )

चौकटराजा's picture

8 Mar 2012 - 7:21 pm | चौकटराजा

चूक दुरूस्त केल्याबद्दल व आधेक संदर्भ दिल्याबद्द्ल !

अन्नू's picture

7 Mar 2012 - 11:52 pm | अन्नू

काय रे ह्ये? च्च्यु च्च्यु च्च्यु,,,, देवा रं देवा.
उशीरानं आलु इथं आन् आल्याआल्याच पार बेदुस हुन पडलु Smiley

धनंजय's picture

8 Mar 2012 - 12:53 am | धनंजय

वाचतोय

चित्रा's picture

8 Mar 2012 - 6:48 pm | चित्रा

थोडे बदल करूनही वाक्ये वाचता येतील. काही फरक पडणार नाही, त्यामुळे या लेखात हे मुद्दे का आले आहेत हे कळले नाही.
१.विषमलिंगी संबंधातील जोडीदारापैकी एकाला एड्स असल्यास व निरोध न वापरता संभोग केल्यास यातूनही एड्स होऊ शकतो.

२. नैसर्गिकरीत्या आपल्याला अशा (विषमलिंगी) व्यक्तींचे आकर्षण वाटत नसल्यास अशा व्यक्तींबरोबर शारीरिक संबंध ठेऊ नयेत. कितीही मोह झाला तरीही मनावर संयम ठेऊन अशा व्यक्तींशी शरीर संबंध टाळावा.

लेखकाने मांडलेला तिसरा मुद्दा अगदीच आश्चर्यकारक आहे.
>३.. योग्य समुपदेशन, डॉक्टरांची मदत व प्रबळ इच्छाशक्ती यामुळे समलिंगी असणाऱ्या व्यक्तींना >यातून बाहेर पडणे शक्य आहे. अशा व्यक्ती यातून बाहेर पडू शकतात, त्यांना मुलं-बाळही होऊ शकतात >पण परत समलिंगी आकर्षण जागृत होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक असते.

समलिंगी व्यक्तींना यातून बाहेर पडता येऊ शकते म्हणजे समलैंगिकता हे एक ड्रग असल्यासारखे वाटते. ड्रग्ज घेणार्‍या व्यक्ती रिहॅबमध्ये जाऊन परत समाजात निर्व्यसनी होऊन येऊ शकतात त्याचप्रमाणे समलैंगिकतेचे व्यसन दूर करता येऊ शकते असे सुचवायचे आहे असे वाटते. समलैंगिकतेचे व्यसन असते असे शास्त्रज्ञांनी सुचवलेले आहे का? हा संदर्भ देता येईल का?

बाकी नट-बोल्ट ही अ‍ॅडी जोशी यांची प्रतिक्रिया पाहून हसावे का रडावे कळेना. तेच वल्ली यांची पहिलीच प्रतिक्रिया "शिळ्या कढीला ऊत" अशी बघून.

@जोशी: शारिरीक आकर्षणाचे विचारायचे झाले तर लोकांना इतर व्यक्तींचे डोळे, नाक, हात, पाय, कंबर, पोट इ. इ. असे बरेच अवयव आवडतात असे वाटते :) हे सगळे अनैसर्गिक म्हणायचे का?

@ वल्ली: शिळी कढी आपण २००० वर्षांपूर्वीच्या लेण्यांच्या भटकंतीला म्हणू का? आपल्याला जे विषय आवडत नाहीत ते इतरांना महत्त्वाचे असू शकतात एवढे समजून घ्यावे असे वाटते.

हंस's picture

8 Mar 2012 - 7:38 pm | हंस

हेच म्हणतो!

मला असे वाटते की काही संवयी जन्मजात असतात लैगिक तेचे सोडा. खाद्याचे घेउ. काही भाज्या आपल्याला नैसर्गिक रितीनेच आवडत नाहीत.
काही प्रथम आवडत नसतात .आईला त्या नीट करता येत नाहीत म्हणून, पण हॉटेलमधील मसालेदार पणा मुळे रुचि निर्माण होते.
परिस्र्थितीने माणूस दारू, मांसाहार, सिगारेट यांचा स्वीकार करतो. उदा. महाबलेश्वर येथील गार हवेमुळे माझ्या वडिलाना सिगरेटचे व्यसन लागले. माणूस शर्मा, बापट असो वा मुखर्जी युरोपला गेल्यावर मांसाहार व दारू ला त्याच्या आयुष्यात प्रवेश मिळतोच.

एखादी सरळ मुलगी अनिच्छ्नेच वेश्या होते. मग काही दिवसानी तिला काहीही वाटत नाही. म्हणजे हे तिचे ओरिएंटशन स्वीकृत ( acquired)
असते. काही माणसे निसर्गता: च " तशी" काही स्वीकृतपणे "तशी " .
दुसर्‍या प्रकारातील माणसाचे क्रेविंग मारून टाकणे शक्य आहे असे मला तरी वाटते. जादा माहिती मानसतज्ञ देऊ शकतील.

प्रचेतस's picture

8 Mar 2012 - 10:57 pm | प्रचेतस

वल्ली: शिळी कढी आपण २००० वर्षांपूर्वीच्या लेण्यांच्या भटकंतीला म्हणू का? आपल्याला जे विषय आवडत नाहीत ते इतरांना महत्त्वाचे असू शकतात एवढे समजून घ्यावे असे वाटते.

एकापरीने तुमचे म्हणणे बरोबर आहे पण याच समलैंगितकेच्या विषयांवर मिपावरच बरेच लेख यापूर्वी आले आहेत, त्यावर चर्चाही बरीच झाली आहे म्हणून फक्त मी तसे म्हटले. बाकी हे विषय मला आवडत नाहीत असे नाही.

बंद खोल्यांमध्ये कुणी कुणाशी कसे संबंध प्रस्थापित करावेत हा आमच्या मते त्या त्या व्यक्तिंचा प्रश्न आहे. पुरुष-पुरुष, स्त्री-स्त्री किंवा स्त्री-पुरुष हे बंद खोलीत जे काही करतात ते तुम्हाआम्हाला विचारून थोडीच करणार आहेत?! ;)