सरकार करे वो चमत्कार और जनता करे तो बलात्कार....
इंटरनेट विश्वात आणि सोशल नेटवर्किंग साईट्सवर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे केंद्र सरकारने गुगल, याहू, फेसबुक यांच्याविरुद्ध कडक धोरण अवलंबिण्यास सुरुवात केली आहे. 'सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर प्रसिद्ध होणाऱ्या वादग्रस्त मजकुरासंबंधी गूगल व फेसबुक या संकेतस्थळांनी योग्य काळजी घ्यायला हवी. असा मजकूर प्रसिद्ध होणार नाही हे पाहणे त्यांचे काम आहे,' अशा शब्दांत सरकारने या दोन संकेतस्थळांना तंबी दिली आहे.
सरकारला जर वाटत असेल असे काही मजकूर , फोटो झळकू नये तर सरकारने आपली प्रतिमा साफ ठेवावी. सरकारची ही कृती म्हणजे सामान्यांच्या आपले विचार व्यक्त करण्याच्या अधिकारावर गदा आणण्यासारखेच आहे. देशाच्या विरुद्ध काही कुणी बोलले तर चालते मात्र गांधी घराण्याच्या विरुद्ध खरे बोलण्याचे धाडस करायचे नाही. ह्याचा अर्थ सरळ आहे की, कॉंग्रेस ला देशापेक्षा त्यांचे गांधी घराणे जास्त प्रिया आहे.
सरकार करत असलेल्या अन्यायाना प्रसिद्धी देऊ नका, त्यांनी केलेले अन्याय सुद्धा न्यायच आहे असे छापा, लोकशाहीत जनतेची गळचेपी, लूट, फसवणूक केली जात असेल तर ते सुद्धा सरकारच्या कर्तव्याचाच एक भाग आहे असे छापा, अतिरेक्याना फासावर चढवले जात नसेल तर ते मानवतेच्या दृष्टीकोनाचा एक भाग आहे असे समजा, किंमती वाढल्या म्हणजे महागाई वाढली असे समजू नका, गुन्हेगार राजकारणात आले म्हणजे ते सन्मार्गाला लागले असे समजा असाच संदेश यातून सरकारला द्यायचा आहे.
आमच्या शेतकऱ्यांवर जेव्हा आपण गोळीबार करता ......भारतीय जनतेचे करोडो रुपये लुटता .....येथील आई बहिण्नींवर अत्याचार करता.....येथे भर दिवसा चोऱ्या करता.....आमचे शेतकरी आत्महत्या करतात .....आण्णा हजारे ,किरण बेदी ह्यांच्या सारख्या समाजसेवी माणसांवर जेव्हा दिग्विजय आणि कपिलसारखे सारखे नालायक नेते आरोप करतात....त्यावेळी सरकारला जाग येत नाही .
आपल्या संयमाचा चुकीचा अर्थ लावला जातोय.आपल्या अभिव्यक्ती आणि वैचारिक स्वातंत्र्याची कत्तल केली जात आहे.ते दुर्लीक्षले जात आहे.भावनांना बोलता आले असते तर त्यांनी आपल्या व्यथा मांडल्या असत्या.आपल्या भावनांना वेदना आहीत फक्त अश्रू आहेत.क्रोधाला अंगार नाही फक्त क्षमाशीलता आहे.सरकारने अत्याचार करायचे आणि आपण ते सहन करायचे यात काही विशेष मानलंच जात नाही.तो सृष्टीनियमच समाजाला जातोय...
देशाच्या इतिहासाचे पण जर आज बदलले नाही तर बाकी पाने कोरीच राहतील.कधीतरी आण्नासारखे झंझावाती वादळ येईल आणि हे सर्व दूर करेल याच भ्रमात सर्वजण आहेत.धाडस कुणीतरी करायला हव आणि कुणीतरी करायला हव म्हणून सगळेच वाट बघत बसले तर हे कदापि होणार नाही.व्यक्ती हि देशापेक्षा कधीच मोठी नसते हा संदेश आपल्याला द्यायलाच हवा.
देश आपला आहे आणि तो आपल्यालाच सांभाळायचा आहे....
अमित सतीश उंडे, सांगली
netflix, descargar ares, ares
netflix, descargar ares, ares
netflix, descargar ares, ares
netflix, descargar ares, ares
प्रतिक्रिया
27 Feb 2012 - 7:18 pm | अन्या दातार
शमला का कंड??
27 Feb 2012 - 7:24 pm | मोदक
ह्या टाईप चे वाक्य तुझ्या खरडवहीत वाचल्यासारखे वाटत आहे. ;-)
27 Feb 2012 - 7:27 pm | मोदक
तुमच्या या विचारांवर प्रॅक्टिकल सोल्युशन काय आहे असे वाटते..?
निवडणूकीत योग्य उमेदवार निवडून देणे हे ही स्वप्नरंजन आहे - सांगली जिल्ह्यात जिथे दर ३० किमी च्या परिघात एक महत्त्वाचा मंत्री आहे आणि तरीही तिथे Basic गोष्टींसाठी झगडावे लागते..
विमानतळ ही दूरची गोष्ट राहिली, जिथे एक ३ स्टार हॉटेल ही धडपणे चालत नाही तिथे कसा बदल आणणार..? आणि काय विकास करणार..?
* विमानतळ आणि ३ स्टार हॉटेल हे विकासाचे मापदंड नाहीत याची पूर्णपणे जाणीव आहे. :-)
27 Feb 2012 - 8:31 pm | अमितसांगली
मला मान्य आहे...सांगली जिल्ह्याचे मंत्री जास्त असूनही सांगलीचीच अवस्था फार बिकट आहे...पण काय करायला हवे तेही समजत नाही....
netflix, descargar ares, ares
netflix, descargar ares, ares
27 Feb 2012 - 9:40 pm | मोदक
>>>>काय करायला हवे तेही समजत नाही....
वाईट वाटून घेवू नको.. पण मिपावर धागे काढणे हे नक्की सोल्युशन नाही.
जर माहितीच हवी असेल तर जुने धागे वाच. बर्याच म्हणजे बर्याच विषयावर चर्चा झालेल्या आहेत.
28 Feb 2012 - 8:52 am | श्री गावसेना प्रमुख
तुझ्याच जिल्ह्यात झाडुन सगळे आमदार,खासदार जिल्हा परिषद काँग्रेस, राष्ट्रवादी कडेच का?
मतदान करतान्ना विचार करावा.
(कंपुबाजांकडे लक्ष नको देउ,गलि का ...गल्लिमेहिच...है)
28 Feb 2012 - 11:46 am | मोदक
श्री गावसेना प्रमुख,
यात कुठे कंपूबाजी दिसली..?? मी दिलेले प्रतिसाद सरळपणे दिलेले आहेत आणि त्यातही तिरके दिसत असेल तर मोठे व्हा.
तुम्ही काय राजकीय पक्षाचा प्रचार करत होता का मागच्या निवडणूकीत..? दिवसा पण विचार समजून घ्यायची गल्लत होते आहे..
28 Feb 2012 - 4:51 pm | श्री गावसेना प्रमुख
(वाईट वाटून घेवू नको.. पण मिपावर धागे काढणे हे नक्की सोल्युशन नाही) कोणी काय लिहीणार हे ठरवणारे तुम्ही कोण?
.
.
मी प्रचार नाही केला,तुम्ही उभे रहा येतो प्रचाराला ,ते पण घरची भाकर बाधुंन आणतो सोबत
28 Feb 2012 - 5:31 pm | मोदक
मुद्दया मागच्या भावना तुम्हाला कळाला नसल्यामुळे आणि बोलण्याचा रोख पाहता कळवून घेण्याची इच्छा नसल्याचे जाणवल्याने माझा शेवटचा प्रतिसाद.
आणी हो.. वाढदिवसाच्या शुभेच्छा. :-)
27 Feb 2012 - 7:49 pm | वेताळ
म्हणजे सांगली.. असे अलिकडे सगळे म्हणु लागले आहेत.
27 Feb 2012 - 8:28 pm | मोदक
कोण म्हणाले..? कुठे म्हणाले..?
शिवाजी पेठेत किंवा चप्पल आळीतली जनता चुना मळता मळता म्हणात असेल तर (जास्ती विषय न वाढवता) फाट्यावर मारण्यात येत आहे.
ह.घ्या. :-)
27 Feb 2012 - 10:39 pm | हंस
पण हे वराती मागून घोडं का?
28 Feb 2012 - 8:46 am | अन्या दातार
असा प्रश्न विचारुन नवलेखकांना, आपलं, हलवायांना हतोत्साह करणार्या आयडींचा जाहिर निषेध ;)
28 Feb 2012 - 9:16 pm | हंस
(शमला का कंड??)
आयला, हे वाचलच नव्हतं! (ह.घे रे ;))
28 Feb 2012 - 10:11 pm | अन्या दातार
कंड शमला असेल तर दुसर्या दिवशीच्या लेखावर वेळ देता येईल ना. इतक्या सरळ, साध्या, निरागस मनाने प्रतिक्रिया दिली होती मी. रोज लेख टाकायचा म्हणजे काय चेष्टा आहे का राव?
तुम्हाला वाकडंच कसं काय दिसतं ब्वा?? असो, मोठे व्हा :)