मूळ कलाकृती इथे वाचा: http://www.aisiakshare.com/node/451
आपण आपल्यासाठी सोपे नसलेले प्रश्न स्वत:लाच कशाला बरे विचारतो? कारण आपला आजूबाजूला जे घडतंय, घडत आलं आहे
त्यावर, आपल्या आधीच्या किंवा सोबतच्या माणसांवर, अनुभवांवर, कश्शा-कश्शावरही, अगदी स्वत:चा स्वत:वरही विश्वास
नसतो. त्यामुळं या सोप्या प्रश्नांची उत्तरं आधीच्या लोकांच्या विचारपद्धतीतून आलेल्या धारणांपेक्षा वेगळीच असतात. कुठेही
गेल्यावर कशा प्रतिक्रिया याव्यात ते आपल्याला अपेक्षित असतं. एकदम वेगळेच प्रतिसाद आले तर मग डोकं सुन्न होतं. कालच
एका ठिकाणी फिरायला गेल्यावर असाच काहिसा अनुभव आला. खिशातून चपटी काढताना पाहून, ''इथे चपटीची गरज नाहीच,
उलट चखणासुद्धा आम्हीच देतो, मनसोक्त प्या!'' मग काऊंटरवरच्या माणसानं संपूर्ण भागाचा नकाशा दाखवला. पेन्सिलीने खुणा
करुन ''बाकी कुठेही पिऊन पडलात तरी चालेल, इथे मात्र मॅनहोल आहेत, तेव्हा काळजी घ्या'' असं सांगतानाच, ''तिथे खाली
जाणारच असाल तर या ठिकाणी मात्र जाऊ नका.. तिथून धुलाई केंद्राचा मस्त देखावा दिसतो पण तुम्ही शुद्धीत नसाल,
तेव्हा तुम्हाला काही दिसणार नाही.. हा ही सल्ला दिला. (ते धुलाई केंद्र आपल्याला माहितच आहे, तेव्हा कशाला उगाच फोटो
देऊ) संपूर्ण परिसर फिरताना आम्ही थोडीथोडी घेतली होतीच, त्यामुळं ''इथे ती आपल्याला वॉर्निंग दिलेली मॅनहोल कुठे आहेत
''असा प्रश्न आम्हाला पडला होता. नसती लफडी टाळण्यासाठी म्हणा किंवा एखादा तडमडला तर उगाच पुन्हा डाक्टरला बोलवावं
लागेल म्हणून त्या माणसानं काळजी घ्या हे सांगितलं. आमच्या मागून आलेल्या व्हीलचेअरवरच्या बाईंना ''तुम्ही इथे आलातच
कशाला? घरीच घेऊन बसायचे ना?'' असं विचारुन त्या आल्याबद्दल संतापही व्यक्त केला. ते ऐकून मला तर पुण्यातल्या
एखाद्या कौंटरसमोरच उभं राहिल्यासारखं वाटलं.
एकूण परिसर रम्य असायला पाहिजे असं आम्हाला वाटत होतं, आणि आम्ही तो ठेवलाही आहे. आम्ही अमेरिकेत, भारतात अशा
राहून दोन्हीकडे घातलेला गोंधळ पहाता या स्थळाला किंचीत ऐतिहासिक महत्त्व आहे. पण काय सांगू बाई, तिथे फारसे लोकच
येत नाहीत. ''असा रम्य, शांत, फक्त आपलाच घोडा दामटवता येणारा परिसर मिळाला तर काय बहार येईल'' असा माझा विचार
सुरु असतानाच माझा भ्रमनिरास झाला.. तरी बरं एवढ्या वर्षांच्या वावरातून सगळीकडेच मित्र आहेत ते. चंबुगबाळे आवरण्याची
वेळ आलीच, तर सोय आहे.
----
''तुम्हा चोरांना काय किंमत कळणार आहे या गोष्टींची? हातावर फटके पडल्याशिवाय बाटलीची काय मजा'' वगैरे ड्वायलाक
माझ्या पिढीला नवे नाहीत. आणि हे का, तर भिकार लेख, गोडगोड शब्दात एकमेकांना दिलेल्या झापडा गाजताना काही भामटे
वापरले म्हणून! असं कोणी काही बोलंल की मला एकदम ती ''कुवैत'' ची जाहिरातच आठवते. वाळवंटातल्या रस्त्यावर रहाणारे
बाप-लेक.. बाप कोंबडी उलटी टांगून ती भाजत असतो आणि ती कोंबडी केकाटत असते. कोंबडीची कॉक् कॉक् ऐकून पोरगा
उठतो. कुठलंतरी वायर लांबवून तो ते बापाला जोडतो. बाप अतिशय संतापाने पोराकडे पाहून डोळे मिटतो. सगळ्यांनाच ही
जाहिरात आवडते, पण म्हणून कोणी कोंबडी न भाजताच खात असेल की, ''यात खरी मजा नाही'' अशी वाक्यं हुकल्या मनांमध्ये
येतातच.
खरोखर चेष्टेतून काही करणार्या लोकांचं कौतुक जास्त होतं हे रास्तच आहे. पण चेष्टा टाळण्यासाठीच आपापली स्थळं निर्माण
केलेली आहेत. ती वापरणार्यांना कमी का लेखावं. मिपावर येण्यासाठी काही कार लागत नाही. कंपूत रहाणार्यांना लेख चांगले
कळतात आणि काहीच माहिती नसताना सरळ लॉगिन करणार्यांना लेखांबद्दल काहीच कळत नाही असं थोडीच आहे? तरीही
कंपूत रहाणारे अनेकदा काही माहिती नसताना लॉगिन करणार्यांना कमी का लेखतात? आणि त्यावर कडी म्हणजे अशा लोकांनी
स्वत:ला कमी लेखून घेणं.
मी अनेकदा मिपाच्या गडावर गेले होते, थेट माझ्या स्कुटरवरुन उतरुन. नेहमीच स्कुटर गडावर घुसवणं शक्यच नव्हतं. एकदा
आमच्या स्कूटरमागे दोन मध्यमवयीन बाया होत्या. दोघीच फिरायला निघाल्या होत्या. त्यांची छाती अभिमानानं फुगली होती,
हिरकणी ज्या कड्यावरुन खाली उतरली त्याच कड्यावरुन आपण फरफटत का होईना वर चढणार आहोत म्हणून. रोज
लोकलमधून प्रवास करताना रात्री करायच्या भाज्या निसत स्त्री मुक्तीवर गप्पा मारणं, पन्नाशीला आलेलं वय यामुळे ट्रेकींग
करणार्या काही पुरुषांना मिळणारी सूट पाहुन त्या दोघींना प्रचंड चूक वाटत होतं. मला तर त्यांच्या उत्साहाचंच एवढं आश्चर्य
वाटत होतं. त्या दोघी दिवसभर भाज्या निसून, टवाळक्या करुन दमल्या तरीही रात्री उशीरापर्यंत आमच्याबरोबर नाचून अंगात
वारे खेळवत होत्या तेव्हातर मला त्यांचं प्रचंड कौतुक वाटलं. काळ बदलला, हिरकणीचा जमाना आता राहिला नाही; तरुणवयात
एकेकाळी नवर्याच्या पैशावर हात मारुन पै-न-पै जमवलेल्या पिढीतले लोक असे भटकायला निघतात तेव्हा त्यांचंही कौतुकच
करायचं. आणि त्यांच्या वयाच्या लोकांसाठी स्पेशल ब्रॅण्ड डीझाइन करणार्यांचंही कौतुकच करायचं.
(मूड आला तर क्रमश:)
प्रतिक्रिया
19 Jan 2012 - 1:21 pm | श्रावण मोडक
अजून एकदा हात फिरवा यावर यकुशेठ. तुमच्यासारख्याकडून अशा काही अर्धवट प्रयत्नांची अपेक्षा नाही. कल्पना उत्तम आहे.
19 Jan 2012 - 1:29 pm | प्यारे१
___/\___
य कु, तिकीटं बूक करतोय, ये पुण्यात. ;)
19 Jan 2012 - 1:31 pm | प्रचेतस
ठाण्ण करून टोले हाणलेस रे यशवंता.
19 Jan 2012 - 2:43 pm | पैसा
पण 'विस्कळीत लेखाचं' विच्छेदन असलं तरी पूर्ण लिहून निष्कर्ष वगैरे काढायचा होतास की! ते क्रमशः आणि (तेही कदाचित) कशाला?
19 Jan 2012 - 3:03 pm | मन१
यशवंता कै कुणाला हार जात नै.
19 Jan 2012 - 3:33 pm | कवितानागेश
:D
19 Jan 2012 - 3:43 pm | सुहास..
काय यश दा ??
स्कोर सेटलमेंट पेक्षा इतर चांगल लिहीता तुम्ही ;)
अवांतर : या वयात ' माफ ' करावे लोकांना, 'साफ' नाही ;)
(ईथे एक पळुन जाणारी स्मायली कल्पावी)
19 Jan 2012 - 10:30 pm | रेवती
याची इथे गरज नव्हती हे स्पष्टपणे सांगते.
आपल्या गम्मत म्हणून केलेल्या कृतीतून काही आक्षेपार्ह घडले तर जबाबदारी मात्र संमंवर जाते ही जाणीव असेलच म्हणून माझे मत नोंदवले. बाकी, तुमच्या भावना पोहोचल्या आहेत.
20 Jan 2012 - 6:40 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
याच्याशी असहमती.
विडंबन हलक्यानेच घेतलेलं आहे. अगं, तेवढी विनोदबुद्धी मला निश्चित आहे. ही पावती!
अजून येऊ देत रे यशवंत.
20 Jan 2012 - 2:12 am | टुकुल
मस्त.. भावना आणि लेख दोन्ही आवडले.
--टुकुल
20 Jan 2012 - 6:06 am | रामपुरी
विस्कळीत लेखाचे विच्छेदन आवडले. हा लेख सुद्धा विस्कळीत वाटला पण इतक्या विस्कळीत लेखाचे विच्छेदन म्हटल्यावर विस्कळीतपणा असणारच... :) :)
(पुढच्या सफाईदार विच्छेदनाच्या प्रतीक्षेत. आणखी एक विस्कळीत आलेला आहे :) :))
20 Jan 2012 - 6:53 am | पाषाणभेद
>>>विस्कळीत लेखाचे विच्छेदन म्हटल्यावर विस्कळीतपणा असणारच
लेखकाला फारच विस्कळीतपणे विचार न करून लेख लिहावा लागला असेल!
20 Jan 2012 - 9:18 am | नगरीनिरंजन
विच्छेदन म्हणण्यापेक्षा कंदन म्हणेन मी. फार विचार न करता सपासप तलवार चालवल्यासारखे वाटले.
नीट वेळ घेऊन विचार करून दमादमाने विच्छेदन/विडंबन केले असते तर चांगले जमले असते असे वाटते.
20 Jan 2012 - 11:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख जरा विस्कळीत वाटतो. :)
अजून सफाईनं झाडावरची बोरं काढायला पाहिजे होती. बोरं कमी आणि ओरखडे जास्त वाटले.
पळा आता. :)
-दिलीप बिरुटे
20 Jan 2012 - 1:03 pm | यकु
या लेखाची काही गरज नव्हती, हे मान्य.
पण वार, ओरखडे केले आहेत हे मान्य नाही..
अदिती हलक्याने घेणार असे वाटले होते.
1 Jun 2022 - 12:52 pm | विजुभाऊ
पुढे लिहायला हवे होते