नमस्कार,
येथे मिपावरती भारतीय राज्यघटनेवर काही माहितीपर लेखांची एक मालिका लिहायची असे बरेच दिवस आमच्या मनात जे होते त्याची आज आम्ही हा छोटेखानी प्रास्ताविक-लेख लिहून मुहुर्तमेढ करत आहोत.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली जी समिती स्थापन झाली होती त्या समितीने जवळजवळ अडीच ते तीन महिने अथक परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटना तयार केली, जी आपण स्विकारली आणि अंगीकारली.
ही भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ एक कायद्याचे जाडजूड निर्जीव पुस्तक नव्हे, तर गीता, बायबल, कुराण यांच्या तोडीची आणि यांच्याइतकीच पवित्र अशी ती सार्वभौम भारताची राज्यपोथी आहे! ही पोथी म्हणजे लोकशाहीचा, प्रजासत्ताकाचा जसा आधारस्थंभ आहे तसाच तो सर्वोच्च मानबिंदू आहे. अर्थात, पायाही आहे आणि कळसही आहे.
आपल्या सार्वभौम भारताचा श्वासोश्वास जो या राज्यघटनेनुसार सुरू आहे त्या भारतीय राज्यघटनेचा अक्षरश: पन्नास पन्नास वर्षे अभ्यास करणारी मंडळी आहेत. त्यात अनेक विद्वान आहेत, तज्ञ आहेत, भाष्यकार आहेत. त्या मानाने आम्ही अगदीच 'नही के बराबर' या कॅटॅगरीत मोडणारे खूपच खालच्या वर्गातले विद्यार्थी आहोत याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. सबब ही लेखमाला म्हणजे भारतीय राज्यघटनेची आणि त्यातील काही महत्वाच्या कलमांची केवळ अन् केवळ एक तोंडओळख म्हणता येईल. ना हे भाष्य आहे, ना आम्ही भाष्यकार आहोत!
सार्वभौम संसद. हे भारतातचं सर्वात पवित्र मंदीर, सर्वात पवित्र चर्च, सर्वात पवित्र मशीद आणि सर्वात पवित्र गुरुद्वारा!
प्रास्त्वाविकातले पहिलेच शब्द किती सुंदर आहेत पाहा..
We The People of India....!!!!!!
किती मोल आहे या शब्दांना! हे मोल आहे एकीचं, हे मोल आहे सर्वभौम भारताच्या अखंडतेचं, हे मोल आहे बंधुत्वाचं..!
(क्रमश..)
-- (We The People of India मधलाच एक) कॉमॅ.
प्रतिक्रिया
18 Jan 2012 - 8:31 pm | गणेशा
पुढील लेखाच्या प्रतिक्षेत ..
एक चांगली लेखमाला होउद्या अश्या शुभेच्छा!
थोडीसे करेक्शन :
१९४७ साली स्थापण झालेल्या समितीला २ वर्षे, ११ महिने आणि १७ दिवस लागले घटना पुर्ण करायला. (आडीच ते ३ वर्षे)
२६ नोव्हें १९४९ ला ती पुर्ण पणे तयार होती.
पण २६ जानेवारी १९२९ साली जवाहरलाल नेहरु यांच्या प्रेसिडंशिप मध्ये कॉग्रेसने "पुर्ण स्वराज्य" मागणी केली होती. (स्थळ : लाहोर) त्या दिवसापासुन तो दिवस पुर्ण स्वराज्य दिवस मानला जात होता.. म्हणुन घटना २६ जानेवारी १९५० ला अमलात आणली गेली .
18 Jan 2012 - 9:32 pm | कॉमन मॅन
करेक्शनवजा माहितीकरता आभार..
वाचकांकडून हीच अपेक्षा आहे.
24 Jan 2012 - 12:43 pm | शेफ चेतन
मिहि असच वाचल होत. अदिच ते तिन वर्श लगलि अस.
24 Jan 2012 - 12:54 pm | प्रचेतस
दोघांचेही मराठी (देवनागरी) टायपिंग अगदी एकसारखे आहे.
18 Jan 2012 - 8:34 pm | गणपा
स्तुत्य उपक्रमाला शुभेच्छा !!!
मालिकेतील पुढील पुष्पाची वाट पहातोय.
18 Jan 2012 - 9:06 pm | प्रशांत
असेच म्हणतो...
18 Jan 2012 - 8:54 pm | कौशी
पुढील भागाची वाट बघतेय..
शुभेच्छा!!
18 Jan 2012 - 8:56 pm | रेवती
काही छायाचित्रे, लेखनातले लहान उतारे जालावरून उचलल्यास तसा उल्लेख करावा ही विनंती.
तुमचे लेखन वाचत आहे.
18 Jan 2012 - 9:38 pm | कॉमन मॅन
अवश्य. परंतु केवळ छायाचित्रेच जालावरून साभार घेतली आहेत. अन्य लेखन हे आमचे स्वत:चे आहे. यापुढील लेखांमधून ज्या कलमांची माहिती येईल ती कलमे अर्थातच भारतीय राज्यघटनेतून घेतली जातील. त्याला अनुसरून जे लेखन होईल ते आमचे स्वत:चेच असेल.
18 Jan 2012 - 9:30 pm | टुकुल
मस्त सुरुवात. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
--टुकुल.
18 Jan 2012 - 9:43 pm | सुनील
वाचतोय. विषय आवडीचा आहेच. पण पहिला भाग अगदीच त्रोटक वाटला. भाग अजून थोडे मोठे करावेत असे वाटते.
मला वाटते, तेव्हा दोन समित्या स्थापन झाल्या होत्या. एक होती डॉ राजेंद्रप्रसादांच्या अध्यक्षतेखाली जीने घटनेचा आराखडा ठरवला. आणि दुसरी डॉ बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली जीने प्रत्यक्ष घटना लिहिली.
पुभाप्र.
18 Jan 2012 - 9:48 pm | ५० फक्त
लेखमालिका माहितिपुर्ण आणि त्यावरचे प्रतिसाद सुद्धा माहितिपुर्ण होवो ही शुभेच्छा. आणि +१०० टु पैसाताई.
पण तरीही हे खटकलंच , आणि 'सार्वभौम संसद. हे भारतातचं सर्वात पवित्र मंदीर, सर्वात पवित्र चर्च, सर्वात पवित्र मशीद आणि सर्वात पवित्र गुरुद्वारा!' - संसदेचा अन पवित्रतेचा काही संबंध उरलाय का हल्ली ? तसा ही मंदिरं, चर्चे अन मशीदांचा तरी कुठं उरलाय म्हणा, बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते.
18 Jan 2012 - 9:49 pm | तुषार काळभोर
We The People of India.....
खरंच अतिशय सुंदर वाक्य आहे!
18 Jan 2012 - 10:38 pm | अत्रुप्त आत्मा
व्वा...कॉमन मॅन... ही लेखमाला चालू केल्याबद्दल अगदी मनापासुन धन्यवाद... आपणा भारतीय माणसांचा लोकशाही धर्म अस्तित्वात आणण्यासाठीचा हाच खराखुरा धर्मग्रंथ आहे,पायाभुत आधारग्रंथही आहे...आपण त्याची ओळख करुन द्यायचं मनावर घेतलत ही भारतीयत्वाच्या कर्तव्याला जागल्याची एक अतिशय मोठ्ठी खुण आहे... ,आय डी नेम सार्थ केलत,सलाम तुंम्हाला...आता फार काही बोलत नाही,,,आता-पुढिल भागाच्या प्रतिक्षेत :-)
18 Jan 2012 - 10:50 pm | प्राजु
उत्तम उपक्रम!!
बरेचसे समज गैरसमज दूर व्हायला या लेखमालेचा नक्कीच उपयोग होईल.
वाट पहातेय.
19 Jan 2012 - 3:00 am | बहुगुणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार मानले जात असले आणि त्यांचं नेतृत्व आणि त्यांचा अथक कार्य यांचा सहभाग निर्विवाद असला तरीही या भगीरथ कार्यात इतरही २० घटनाकार सामील होते याची आठवण जेवढी ठेवली जायला हवी तेवढी जात नाही. विशेषत:, पुढे या ना त्या स्वरुपात भारतीय राजकारणात आपला ठसा उमटवणारे आचार्य कृपलानी, पं. नेहेरू, पं. गोविंद वल्लभ पंत, मौलाना आझाद, सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद हे सहा जण सोडले तर इतर १४ लोकांचा फारसा उल्लेख -निदान भारतीय राज्यघटनेच्या संदर्भात - केला जात नाही. घटना समितीचे हे १४ सभासद होते:
श्री. एम. ए. अय्यंगार (हे पुढे लोकसभेचे सभापती झाले)
श्री. गोपालस्वामी अय्यंगार (हे नंतर मंत्री झाले)
श्री. जयराम दौलतराम (नंतर आसामचे राज्यपाल)
श्री. शंकरराव दत्तात्रय देव
श्रीमती जी. दुर्गाबाई
श्री. टी. टी. कृष्णम्माचारी (उद्योगपती, नंतर मंत्री)
श्री. एच. सी. मुखर्जी (नंतर बंगालचे राज्यपाल)
श्री. के. एम. मुन्शी (आधी मंत्री व नंतर उत्तर प्रदेशचे राज्यपाल)
श्री. बेनेगल नर्सिंग राव (निर्वाचित संसद नसूनही घटना समितीवर नियुक्त झालेले हे एकमेव सभासद, कायदेतज्ञ श्री. राव यांचा सहभाग डॉ. आंबेडकरांइतकाच घटना निर्मितीत महत्वाचा मानला जातो असं वाचल्याचं आठवतं. डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपती म्हणून राज्यघटनेवर सही करण्याआधी श्री. राव यांचे विशेष आभार मानले होते. श्री. राव यांनी पुढे राष्ट्रसंघात भारताचं प्रतिनिधित्व केलं.)
श्री. एन. माधव राव
श्री. सैयद मोहम्मद सादुल्ला
श्री. सत्यनारायण सिंन्हा (हे नंतर सांसदीय कार्यमंत्री झाले.)
डॉ. पट्टाभी सीतारामय्या (नंतर मध्य प्रदेशाचे राज्यपाल.)
जाता जाता:
त्यावेळची संसदचर्चा कशी चालत असे याचं हे (खुमासदार!) प्रत्यक्ष वर्णन
अवांतर:
भारतीय राज्य घटनेला प्रत्यक्षात यायला अडीच वर्षांहून कमी वेळ लागला, त्याच वेळी स्वतंत्र झालेल्या पाकिस्तानची राज्यघटना तयार होण्यासाठी आणखी तब्बल सहा वर्षे जावी लागली (२३ मार्च, १९५६), आणि त्यानंतर अडीच वर्षांतच ती घटना धुडकावून लष्करी राजवट आली (२७ ऑक्टोबर, १९५८)!
23 Jan 2012 - 4:15 pm | परिकथेतील राजकुमार
बहुगुणींशी सहमत.
या २० लोकांना निवडताना काय काय विचारात घेतले गेले हे जाणून घ्यायला आवडेल.
वुई द हलकट ऑफ मिपा.
19 Jan 2012 - 4:30 am | मराठमोळा
चांगली लेखमाला सुरु केल्याबद्दल अभिनंदन आणि आभार.
एक विनंती: लेखमाला लिहिताना संयत भाषेत आणि वादविवाद उठणार नाहीत याची काळजी घ्या.. नाहीतर अवांतर आणि दंगेखोर प्रतिसादांची मालिका तयार होते.
लेखमाला लवकर पुर्ण कराल आणि ज्ञानात मौलिक भर पडेल अशी आशा करतो.
शुभेच्छा!!
19 Jan 2012 - 7:18 am | स्वाती२
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
19 Jan 2012 - 9:52 am | नितिन थत्ते
ऋषिकेश यांची एक मालिका यापूर्वी येऊन गेली आहे.
तरीही यात काही नवीन पहायला मिळेल अशी आशा ठेवतो.
23 Jan 2012 - 10:44 am | कॉमन मॅन
कृपया दुवा द्याल का? ती मालिका पुरेशी असल्यास आमचे पुनर्लेखनाचे कष्ट वाचतील आणि आम्ही अन्य कुठल्या विषयावर लिहू शकू.
24 Jan 2012 - 1:06 pm | नितिन थत्ते
हा घ्या दुवा
यात आधीच्या भागांचेही दुवे सापडतील.
19 Jan 2012 - 10:18 am | नगरीनिरंजन
हे वाचायला लई भारी वगैरे वाटतं पण प्रत्यक्षातली परिस्थिती आठवली की परत जमिनीवर येतो.
लेखमालेसाठी शुभेच्छा!
आपल्याला प्रत्येकाला घटनादत्त हक्क आणि कर्तव्ये माहित पाहिजेच (भले ते बजावण्याचे धाडस अंगी असो वा नसो).
19 Jan 2012 - 10:26 am | गवि
शुभेच्छा आणि उत्सुकता..
19 Jan 2012 - 11:42 am | सुहास झेले
सुंदर लेखमाला...
थोडे मोठे भाग टाका आणि लवकर लवकर टाका... वाचण्यास उत्सुक आहे :) :)
19 Jan 2012 - 11:45 am | मृत्युन्जय
वा. लेखमालिकेसाठी शुभेच्छा. वाचनखुण साठवली आहे.
19 Jan 2012 - 12:48 pm | नि३सोलपुरकर
चांगली लेखमाला ..वाचण्यास उत्सुक आहे
@ बहुगुणी - धन्यवाद ,छान माहीती शेअर केल्याबद्द्ल.
19 Jan 2012 - 4:49 pm | चिगो
एका चांगल्या आणि महत्त्वाच्या विषयावर लेखमाला लिहीताय ह्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन.. स्पर्धा-परीक्षांच्या तयारीच्या काळात मी रोज "प्रिअॅम्बल" मंत्रासारखं घोटायचो.. खरेतर, सर्वोच्च न्यायालय संविधानाशी संबंधित अनेक मुद्दयांवर प्रास्ताविकात उल्लेख केलेल्या तत्त्वांचाच आधार घेतं.
पुढील लिखाणासाठी शुभेच्छा..
19 Jan 2012 - 5:07 pm | इरसाल
वाचण्यास उत्सुक आहे.
५० फक्तच्या दुसर्या परिच्छेदाशी सहमत.
19 Jan 2012 - 5:14 pm | मालोजीराव
वाचत आहे , लेखमालिकेसाठी शुभेच्छा !
-मालोजीराव
23 Jan 2012 - 4:10 pm | विश्वनाथ मेहेंदळे
लेखमालिकेसाठी शुभेच्छा !
पुभाप्र
25 Jan 2012 - 10:45 pm | सुनील
पुढचा भाग आता टाका. समयोचित ठरेल!