तो एक लाज-पुत्र

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
16 Jan 2012 - 2:29 pm

थोडी पार्श्वभूमी-इथे एका कालीज(कॉलेज) कन्यकेने एका रोड-रोमिओमुळे त्रस्त होऊन काही मैतरणींना हाताशी घेऊन,त्याला धडा शिकवला आहे...(खरं म्हणजे प्रस्तुत प्र-संग आमच्या शालीन वयात ;-) ,आमच्या पल्याडच्या कालीजात आखो-देखे घडलेला होता, तो आज त्या कॉलेजला काही कामानिमित्त भेट दिल्यामुळे स्मृतिपटलावर आला...म्हणुन म्हटलं आलाय बाहेर..तर त्याला जमेल तसा मांडावा)

तो एक लाज-पुत्र,मी ही-रान्टी फूलं।
चारिन मी ,मी त्याला ग्राउंडची माती/धूळ॥धृ॥

कंठात बगळ्याचे हाड,केसात उवांची जाळी
अंगाला सार्‍या बरबटुन शाई,घालीन चपलांची माळ।१।

खाशील का पुंन्हा माती..?करशील का उचापती..?।
ताई रे ताई म्हणुन स्वारी,भरशील नळावरी चूळ।२।

काढीन तूझी घाण,ये गं ये... तुही हाणं।
सुखी रे सुखी कालीज सारे,चुटकीत मी करीन।३।

हास्यकविताविडंबनविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

16 Jan 2012 - 5:27 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मस्त रे आत्म्या...
पण हे कसे करणार ते कळले नाही:

कंठात बगळ्याचे हाड

अर्थात आत्म्यांना कुठलेही हाड मिळवणे कठिण नाही म्हणा ;)

मेघवेडा's picture

16 Jan 2012 - 5:55 pm | मेघवेडा

तो कॉलेजकुमार सगळ्या पोरींकडे बगळ्यासारखा मान उंचावून पाहत असणार! म्हणून म्हटलेलं दिसतंय!

यात खास 'आत्मा क्लास' दिसला नाही पण ओके आहे! 'ताई रे ताई म्हणून स्वारी' अधिक सूटलं असतं! ;)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2012 - 5:59 pm | अत्रुप्त आत्मा

पण हे कसे करणार ते कळले नाही:

कंठात बगळ्याचे हाड>>> ती पोरगी त्या सु-कुमाराचे वर्णन करत आहे... काही जणांना गळ्याला बाहेर हालाचाल होताना दिसण्या इतपत हाड असते..तसे ते व्यक्तिमत्व आहे.आणी बगळा मुंडी हलवताना तसा दिसतो....म्हणुन--- कंठात बगळ्याचे हाड ;-)

मे.वें.नी बरोब्बर ताडलय रहस्य.. :-)

मेवे तुमचा बदल अवडला..आणी त्यामुळे केला देखिल.. :-)

गणपा's picture

16 Jan 2012 - 7:00 pm | गणपा

नुकताच पहाण्यात आलेला हा खालचा ईडो आठवला.

धोसु : मुलाची आय माय काढली आहे. तेव्हा आपल्या जवाबदारीवर क्लिक करा.

अत्रुप्त आत्मा's picture

16 Jan 2012 - 10:39 pm | अत्रुप्त आत्मा

गनपा भाऊंनी टाकलेला इडो मंजे आमी क्यालेल्या कवितेच्या इडंबनाचे जवळपास मुळरुप हाय...त्यामुळं आता गंपती बाप्पांना निस्त धण्यवाद म्हनुन उपेग णाय..!
निवद दिला पायजेल...ह्यो घ्या...

चिंतामणी's picture

18 Jan 2012 - 8:26 am | चिंतामणी

From आंब्याचे मोदक">

बाहेरचे कुठलेतरी देण्यापेक्षा घरचे गरम गरम मोदक घ्या.

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2012 - 9:22 am | अत्रुप्त आत्मा

बरं...''ते'' द्या..
पण त्याच्या बरोबर जरा रवाळ साजुक तुप तरी अणायचत की हो..
म्हणजे इषय पूर्ण झाला असता... :-) (आपला ह्यो गंपतीबाप्पा चविनं खानारा हाय) ;-)

लीलाधर's picture

17 Jan 2012 - 8:23 am | लीलाधर

पण परफेक्ट टाकला गेला आहे.. जबरदस्त्च :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Jan 2012 - 8:49 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाप रे. गंपा व्हिडियो लै परफेक्ट टाकला रे.

-दिलीप बिरुटे

पक पक पक's picture

16 Jan 2012 - 7:52 pm | पक पक पक

ठिक ठाक काव्य....? आवड्ले..........

रघु सावंत's picture

16 Jan 2012 - 11:30 pm | रघु सावंत

आत्मा सायबा
बहुतेक ति आली ,तिने ओळखल
तय्यारी केली ,धुवूनच गेली
असेच झाले असणार

प्रकरण मस्त जमलय
रघु सावंत

चिंतामणी's picture

17 Jan 2012 - 8:19 am | चिंतामणी

पण कितीजणांना मुळ गाणे माहीत आहे???

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2012 - 9:09 am | अत्रुप्त आत्मा

चिंतामणी तुंम्ही म्हणताय ते कदाचित खरं असेल,,,त्यामुळे तुंम्ही युट्युबवरुन गाणं दिल्याबद्दल धन्यवाद... :-)
हे गाणं चानी या चित्रपटातलं आहे,आरती प्रभुंची शब्दरचना आहे---गाण्याच्या मुळ ओळी गीतमंजुषा या संकेतस्थळावरुन इथे देत आहे
-----तो एक राजपुत्र-----

तो एक राजपुत्र, मी ही एक रानफूल
घालीन मी मी त्याला सहजिच रानभूल

कंठात रानवेल, केसात पानजाळी
तुझी रे तुझी नटून ताई, घालील त्यास माळ

भाऊ रे शूर अति, होईल सेनापति
भाऊ रे भाऊ करुन स्वारी, दुष्टास चारील धूळ

होईल बाबा प्रधान, राखिल तो इमान
सुखी रे सुखी राज्य सारे, चुटकीत तो करील

पराग सर गाणे टंकल्याबद्दल थँक्यू.
हे गाणे फार भावूक आहे..
पण चानीने ज्या राजपुत्रासाठी हे गाणे म्हटले आहे तो राजपुत्र जोड्याने हाणायच्या लायकीचाच.
चानी हा सिनेमा फार चटका लावणारा आहे.

लीलाधर's picture

17 Jan 2012 - 8:21 am | लीलाधर

सॉलिडच रे जबरदस्त

भन्नाट बोले तो झक्कास :)

प्रचेतस's picture

17 Jan 2012 - 8:43 am | प्रचेतस

हॅहॅहॅ भटजी, लै भारी, तुमचा आत्मा आता चांगलाच जागृत होवून संचार करायला लागलेला दिसतोय.

स्पा's picture

19 Jan 2012 - 8:57 am | स्पा

हॅहॅहॅ भटजी, लै भारी, तुमचा आत्मा आता चांगलाच जागृत होवून संचार करायला लागलेला दिसतोय.

हॅहॅहॅ
असाच बोल्तो

मी-सौरभ's picture

17 Jan 2012 - 6:27 pm | मी-सौरभ

भटजी बुवा: मस्त कविता...
तुमच कालिजात जाणं कसं काय झाल बुवा??

कॉलेजात होतात की सत्यनारायण वगैरे.. त्याला गेले असतील! आमच्या कॉलेजात व्हायची पूजा दरवर्षी.. याच सुमारास व्हायची आणि..

मी-सौरभ's picture

17 Jan 2012 - 7:04 pm | मी-सौरभ

ती जोश्यांची पुजा का? काय व्हायची ती?

सूड's picture

17 Jan 2012 - 7:18 pm | सूड

काय व्हायची रे ?

मेघवेडा's picture

17 Jan 2012 - 9:29 pm | मेघवेडा

पूजा म्हटल्यावर तुम्हाला जोश्यांची आठवली? अरेरेरे.. मी म्हटलं निदान बेदींची, किमान भट्टांची तरी?!
अगदीच हे की हो तुम्ही.. :D

काय प्रकर्ण वगैरे होतंसं दिसतंय जोश्यांच्या पूजेबरोबर?!

अत्रुप्त आत्मा's picture

17 Jan 2012 - 9:15 pm | अत्रुप्त आत्मा

@-तुमच कालिजात जाणं कसं काय झाल बुवा??>>> मे.वेंनी ओळखलय बरोब्बर.. (हं..शेवटी आमच्या गल्लीतला मानुस हाय..! :-) )
@ती जोश्यांची पुजा का? काय व्हायची ती?>>>
@काय व्हायची रे ?>>>
सौरभच्या वाक्याला सूडाचं कोंदण ।
आमची झाली पुजा,आणी या दोघात जुंपलं भांडण॥ ;-)

प्रकाश१११'s picture

18 Jan 2012 - 8:04 am | प्रकाश१११

हे छानच लिहिले आहे.

कंठात बगळ्याचे हाड,केसात उवांची जाळी
अंगाला सार्‍या बरबटुन शाई,घालीन चपलांची माळ।१।

उत्तम ..!!

पाषाणभेद's picture

19 Jan 2012 - 12:32 am | पाषाणभेद

:-)

सुहास झेले's picture

19 Jan 2012 - 5:47 pm | सुहास झेले

सही....

तो ईडोसुद्धा आवडला :) ;)