या वेळी कट्टा जाहिर धागा काढुन ठरलेला असल्यामुळे,इतर अनेक मि.पा.करांप्रमाणे कट्ट्याविषयीची कल्पनाचित्र(जागा आधीच माहित असल्यमुळे ;-) ) आंम्ही मनात तयार केलेली होती.परंतू प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचल्यावर मात्र,हाटीलच्या भायेर(च)-''बनीयन ट्री''खाली(आमच्या आधी)जमलेली मेंबरं पाहुन आमी जरा शंकाकुल झालो होतो,म्हटलं...आधी आलेल्या बनीयन लेंगा प्रस्तावानुसार शेजारच्या गाडीत ती व्यवस्था केलेली आहे कि काय..?आणी नंतर सगळी मेंबरं.सॉरी सॉरी सभासद(हां आता कंसं सभ्य वाटलं बरं..!)जमल्यावर प्रत्येकाचं माप-काढुन त्या प्रमाणे ड्रेपरी वाटप वगैरे ठरलय की काय..?पण हाटीलच्या दरवाज्याजवळ गाडी(सॉरी टू व्हिलर ;-) )लावल्यावर आत डोकावल्या नंतर लक्षात आलं,की मंडळी तयार आहेत,पण अजुन मांडव 'तयार' झालेला नाहीये(बनीयन ट्री कार्यालय नविन असल्याचा परिणाम,दुसरं काय..? ) पण नंतर थोड्याच अवधीत सर्व कोरम हळुहळू भरत गेल्यावर,,मांडवाबाहेरचा 'अंदाज' घेऊन रस्त्यावर दंगा होण्यापेक्षा हे नामी वर्हाड आत बोलावलेलं बरं असा (मुळात भटजी असल्यामुळे ;-) ) कार्यालय वाल्याच्या बाजूनी विचार करत..सोकाजीरावांसारखा भारदस्त मामा हाताला घेऊन आंम्ही मांडवात शिरलो...
बनियन ट्री कर्यालयाच्या म्यानेजरला अदल्यादिवशी मेनु बघायचं निमित्त करुन दस्तुरखुद्द ५०राव यांनी-''उद्या आपल्या इथे काय काय घडू शकणार आहे..(पक्षी-तुंम्हाला सहन करावं लागणार आहे)"याची आगाऊ-कल्पना दिलेलीच होती...पण कार्यालय नवं असलं तरी म्याने-जर जुना मंजे 'तयार' का नेमतात याची प्रचिती संपूर्ण कट्टा होईपर्यंत वारंवार आली..बाकी १मात्र आहे हां..बनीयन ट्री कट्टा-मग्न होण्याकरता १नंबर जागा आहे,हे आसनस्थ व्हायच्या आधीच पटलं.बसाबस झाली..पण हॉटेलचे भटजी नविन असल्यामुळे आपल्या पाटासमोर नुसतच पळीभांड/ताम्हन लावलय,आणी कार्यारंभ करायला कोणीच येत नाही हे पाहुन,वर्हाड अंमळ खिन्न झाल्यासारखं झालं आणी जागा सोडून काही अग्निउपासक हाटिलच्या भायेर,तर आम्च्या सारखे मळीसम्राट तंबाखू साठी वेगवेगळे कोपरे धुंडाळू लागले.पण म्यानेजरच्या करड्या नजरेतनं हे सुटलं नाही,त्यानी लगेच भटजी आले,भटजी आले..चला..चला..अश्या हाळ्या मारत पांगलेलं वर्हाड पुन्हा आसनस्थ केलं. हा मोका साधुन कट्टा आयोजक श्री.पन्नासराव यांनी-''कोणताही कार्यक्रम निर्विघ्न व्हायचा असेल तर,गणंपतिंचं पूजन करण्याशिवाय गत्यंतर नसतं''.या धार्मिक रुढिला अनुसरुन,खादाडीची सुरवात गोडानी केली की पुढे पदार्थ कोणत्या(ही) स्वरुपात आले,तरी चवीत विघ्न येत नाही,अश्या अंदाजानी सगळ्या मेंबरांची तोंडं त्या लाजवाब चॉकलेटयुक्त केकानी खदाडीसाठी तयार केली.काही मिनिटं केक साफ करण्यात जातायत नाही,एवढ्यात कार्यालयात जशी चहा/कॉफी विचारणारी 'पोरं' वर्हाडाच्या मागे मागे 'ट्रे' घेऊन हुभी र्हातात,तशी काही वेटर कम आर्डर घेणारी २ पोरं पन्नासरावांच्या मागं दिमतीला आल्याच्या थाटात हुभी ठाकली..मग सौरभ आणि पन्नासरावांनी पहिल्या आर्डर दिऊन,वेटरना मार्गी लावलं..तो इकडे सगळया मंडळींनी मि.पा.च्या कट्टा संस्कृतीला अनुसरुन दंगा करायला सुरवात केली होती.गप्पा टप्पा,एकमेकाची खेचणं,आणी ओक साहेब आलेले असल्यामुळे एकामेकाच्या नाड्याही खेचायला सुरवात झालेली होती.
हे सर्व यथास्थित चालू असताना ,पूर्वी जशी खास पुणेरी कार्यालयात ''लवकरची पंगत धरुन कामावर जाणारी मंडळी दिसायची'' त्याच प्रमाणे प.रा...आणी मंडळी लवकर जायचं असल्यामुळे हळुहळू आमचा निरोप घेत बाहेर पडली...पका काका तर फ्लाईंग व्हिजिटलाच आले होते त्यामुळे तेही दरम्यान केंव्हातरी ''गमन करिते जाहले'' त्यामुळे मि.पा.धर्माचा स्विकार केलेल्या काही नव प्रवेशितांचे(आणी माझे देखिल) या मंडळींना जाणुन घेण्याचे मनसुबे उधळले गेले,आणी मन जरा खट्टू झालं...सोकाजीरावसुद्धा आम्ही आणलेल्या ''१६०-पानाला'' आणि आंम्हाला सोडून त्यांना जायच होतं म्हणुन गेले,पण आमचं कट्टामानस चित्र त्यामुळे काही प्रमाणात भंगल :-( त्यामुळे आमची अवस्था-'कट्टा आला पण सोकाजी गेला' अशी काही काळ झाली खरी... पण या अवस्थेतून आंम्हाला बाहेर काढायला एक नामी त्रिकुट-वपाडाव,धनाजीराव,आणी वो किस्ना है असं पाहाता क्षणीच ओळखू येणारा आमचा किसन द्येव,यांनी मांडवात हजेरी लावली...मागोमाग...सुहास डॉट-डॉट,गणेशा आणी इतर काही स्वयंभू देवता मांडवात शिरल्या आणी मग मात्र कट्टा खर्या अर्थानी रंगात आला...
लाजवाब पालक शोरबा व इतर काही नेहमीच्या सूपनी कट्टा एक्सप्रेस धडधडत धाऊ लागली,भट्टीमधे तितक्याच चांगल्या-पनीर,मश्रूम,चिकन अश्या स्टाटर्सचा नामी कोळसा पडल्यावर मेन खादाडीचा लोणावळा कधी आला ते कळलं सुद्धा नाही...पण तो पर्यंत रविवार-नवं कार्यालय-त्रेधा तिरपिट योगाच्या फेर्यात अडकलेल्या कार्यालयाच्या पोरांमुळे आमची गाडी-मेनकोर्स नावाचा विधि कधी होतो..?अशी वाट बघत काही काळ लोणावळ्यात घुटमळली...मग एकदा गाडी थांबली की प्रवासी शीटावर थोडेच स्वस्थ बसणार,पुन्हा विडीकाडी.पान.चुना,तंबाखू...आणी धिंगाण्याला ऊत आला...शेजारच्या डब्यातले प्र-वासी आमच्या डब्यात डोकावून''कुठनं आली ही जत्रा..?'' असा चेहेरा करून बघायला लागलेच होते...पण पुढचा राग रंग ओळखुन त्या महान म्यानेजरनी आंम्हाला सगळ्यांना एकदाचं-खाली बशिवलं...आणी आधी नुसत्याच रोट्या/नान वगैरेंची रेलचेल सुरू केली.अता मेन कोर्सच्या डिश जर का लवकर पाठवल्या नाहीत,तर लहान पोरांच्या शाळेत जसं..सगळ्यांचा डबा संपल्यावर-शेवटच्याचा डबा हिसकावतात,,,तशी लोणची/कांद्याच्या सगळ्या प्लेटांची अवस्था होइल हे ओळखून पुन्हा त्याच तत्पर आणि तयार म्यानेजरनी मेन कोर्सची ऑर्डर टेबलांवर आणुन रोट्यांवर होऊ घातलेला अनुचित हल्ला रोखला,मग काय..? सग्ळी गप्पा/हलकल्लोळ करुन थकलेली हात आणी तोंडं समरांगणावर एकदम चाल करुन ग्येली...पहिली दहा मिनिटं शत्रूची अशी बेजान कत्तल करण्यात गेली...की पुढच्या डिशची पलटण आंम्हा खादाड योद्ध्यांपुढे आल्या/आल्या नरम पडावी...परिणामी जेवण संपेपर्यंत म्हणजे युद्ध शेवटच्या टप्यात आल्यावर मधेच वेळ काढुन जरा परत गप्पा/टप्पा वगैरे चालू झाल्या...पण शत्रू रणांगणावर शिल्लक राहू द्यायचा नाही,अश्या बेतानीच हल्ला चालला होता...आणी अश्या युद्धाची अंतिम परिणिती अव्वल विजयात होत असते,हे ऐतिहासिक वचन अखेर सर्व मिपाधर्मियांनी सार्थ करुन दाखवलं...म्यानेजरही मनात म्हणला असेल,,,''मायला असलं वर्हाड बघितलं नव्हतं'' अश्या तर्हेनी एकमेकांचा परिचय करुन घेत, मो.नंबरर्सची देवाण घेवाण होत...नेहमीच्या दिमाखदार पद्धतीने मि.पा.कट्टा-खादाड कंपू-२०१२ यथास्थित पार पडला...
कार्य संपलं की शेवटी ग्रुप फोटोंची परंपरा असतेच...त्या प्रमाणे 'भायेर'-वडाच्या झाडाखाली-कट्ट्याला आलेल्या सर्व अवतारी पुरुषांचे वेगवेगळ्या पोज मधले ग्रुप फोटो होऊन...बाहेर पेटलेल्या थंडिचा अंदाज घेत घेत,,,सर्व मेंबरं घराच्या दिशेनी पांगली सुद्धा...
गणपतिंचे पूजन करण्यासाठी ५०रावांनी अणलेला खास नैवेद्य
लवकर सोडुन जाणार्या :-( सदस्यांपैकी १-मि>ध.मु. आणी मिपाकरांनी केलेली त्यांची हास्यबोळवण
बोळवणीला हातभार लावणारे-डाविकडून...सुहास..,पाठिमागे प्यारे१,कडेला आंम्ही,आणी आमच्या पाठिशी विंग कमांडर-ओक
स्टाटरवरचा हल्ला-अनुक्रमे...वल्ली,पिंगू,फक्त५०
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-१...गणेशा,प्रशांत,सूड,धनाजीराव,किसन-द्येव,आणी शामियान्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी एकरुप झालेले-मालोजीराव
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-२...डावी बाजू-मि.ओक,प्रशांत,..उजवी बाजू-मृत्युंजय,पन्नासराव,गंभीरराव,धन्या
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-३(वरचेच सर्व,परंतू-सर्व फोटोंमधिल काही नावे माहित नसल्यामुळे टाकु शकलो नाही..क्षमस्व)
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-४ या रांगेत-सुहास.. पिंगू (कदाचित वेळ जात नसल्यामुळे-नाकात तपकिर लावत असावे ;-) )
रिकाम्या प्लेटा आणी बेचैन मिपाकर-५ या पाचही फोटोंचा अर्थ- रविवार-नवं कार्यालय-त्रेधा तिरपिट योग
यात-कोपर्यातुन-मोदक(चमच्यानी साजुकतूप पोटात पाडून घेत असलेले),त्याच्यापुढे... ,नंतर वपाडाव,,आमच्या आणी वपाडावच्या मधेच दडलेले-मनोबा-यांचा या फोटोत,केवळ हात आहे ;-) ,मग आंम्ही,आणी आमच्या(च)शेजारी पक-पक-पक...
तिच बेचैनी आणी मिपाकर,पण बेचैनी नुसतीच एंजॉय कशी करावी हे शिकवण्याच्या प्रयत्नात-कोपर्यात बसलेले अव्वल मिपाकर-श्री.प्यारे१(थम्स अप पोज),आणी किसनद्येवांच्या शेजारी 'श्रीरंग'-काय जोडी जमलीये नाई ;-)
वेटरला(आता)बैल होऊन तरी अंगावर ये...असं सुचवणारे गवताळ टिमचे सदस्य-म्हणजे दस्तुरखुद्द आंम्ही(लाल कपडा) यात असलेले-समोरुन..वल्ली-मोबॉइल,वपाडाव,मन-१(मनोबा),बुल-फायटर-आंम्ही, व सूड
खाद्य चिंतनात मग्न असलेले मिपाकर
सूप आणी तितक्याच गरम गप्पांना आलेला ऊत-यात ओकांबरोबरच्या गप्पांमुळे वल्लींचा चेहेरा कसा आनंदानी फुलुन आलाय याची प्रचिती येतीये..पुढे त्या गप्पांमधुन यशस्वीपणे अंग काढून घेतलेले-प्रशांत आणी सौरभ
वल्ली आणी ओकांची गुप्त खलबतं-भाग-१
गुप्त खलबतं-भाग-२
स्टाटर बसलं ;-) आणी सुटली गाडी एकदाची म्हणुन प्रसन्न झालेले धनाजीराव वाकडे ऊर्फ धन्या
मेन कोर्सच्या प्रतिक्षेत
एक गंभीरराव आणी एक खंबीरराव
हाटीलचा एक उत्साहशामक केंद्रबिंदू(ओळखा पाहु हे काय असेल..?) गो-पी,आणी गो-पी--का(?) मंजे यात किस्नाला जागाच नाय,,,अरं..रं रं...द्येव मानसात आला तर त्याची कशी जागा जाते बगा.... ;-)
अवतारी पुरुषांची सभा-१..डावीकडुन-वपाडाव,मालोजीराव,आंम्ही,आम्च्या मागे-नि३,नंतर मोदक,शेजारी प्रशांत,त्या दोघांच्या मागे सुहास..,(खांद्याला झोळी लाऊन)संन्यस्त-प्यारे-१,शेजारील गंभीरराव(हेच भरत असावे का?),किसनराव
सभेतले अवतारी पुरुष-२डावीकडुन-प्रशांत,श्रीरंग,सुहास..,पिंगु,सुड,धन्या,वल्ली,कट्टा आयोजक-फक्त५०,५०आनी माझ्या पाठिशी-नि३,मोदक,नंतर प्यारे१,वपाडाव आणी शेवटी पक पक पक
ता>क>-(प्यायचं नव्हे-पचवायचं ;-) )-मेन कोर्स हा युद्धमग्न परिस्थितीत घडून गेला असल्या कारणानी त्यावेळेसचे फोटो नीट निघुच शकलेले नाहीत..सबब ज्यांना ते याची देही/याची डोळा पहायची इच्छा असेल..त्या सदस्यांनी पुढील युद्धात सामिल व्हावे..ही णम्र इनंती...
अजुन १वाटी ता>क>-- फ्लाईंग व्हिजिट देऊन गेलेले सदस्य-प्रकाश घाटपांडे,परिकथेतील राजकुमार,धमाल मुलगा,विवेक मोडक,प्रीत-मोहर,सोकाजीराव त्रिलोकेकर,नावत काय आहे,गणेशा.. :-)
प्रतिक्रिया
10 Jan 2012 - 6:03 pm | बिपिन कार्यकर्ते
वा! मजा केलीत म्हणायची!
आमचं येणं हुकलं ब्वॉ! समक्ष्व!
11 Jan 2012 - 12:15 pm | गणपा
असचं म्हणतो.
खरं सांगा कुणा कुणाच्या पोटात दुखलं दुसर्या दिवशी? ;)
11 Jan 2012 - 2:03 pm | प्रशांत
व्यनीमधुन सांगितले तर चालेल का रे गणपाभाऊ
10 Jan 2012 - 6:05 pm | मोदक
पुढील युद्धाची वेळ..?
मोदक
10 Jan 2012 - 6:11 pm | सुहास झेले
सॉलिड धम्माल... एकदम मस्त कट्टा झालेला दिसतोय ......
स्वारी, जमलं नाही ह्यावेळी.... पुढल्यावेळी नक्की हजेरी लावणार :) :)
10 Jan 2012 - 6:12 pm | गवि
उत्तम संख्येने मिपाकर आलेले पाहून मिपाधर्म वाढत असल्याचा आनंद झाला. नावे दिली फोटोखाली तर चांगले होईल.
मस्त कट्टा झाला आहे.
अवांतरः तुमच्या कळफलकावरील "एंटर की" तुटली आहे का?
10 Jan 2012 - 6:42 pm | प्रास
हेच बोलतो....
मिपाकट्टा मस्त होतोच....!
पण
हेपण्बोल्तो......
10 Jan 2012 - 7:00 pm | अत्रुप्त आत्मा
@-तुमच्या कळफलकावरील "एंटर की" तुटली आहे का? >>> मी कमप्युतल नव-अशिक्षित हाये... ;-) मी ह्या धा-गेवल अचानक(बदली) खेलायला हुबा ल्हायलो हाये..त्या मुले या वेली--शॉली.. :-)
10 Jan 2012 - 7:48 pm | अन्नू
एक्दम झ्याक! फोटु पण मस्त!! चांगलीच मौज लुटलेली दिसतेय.
:lol: :lol: :lol: :lol:
10 Jan 2012 - 6:15 pm | किचेन
या कट्ट्यावर समस्त महिला वर्गाने बहिष्कार तकला होता का?
10 Jan 2012 - 6:30 pm | अत्रुप्त आत्मा
@-या कट्ट्यावर समस्त महिला वर्गाने बहिष्कार तकला होता का? :-D
छे..!छे..! असं कसं..?
उलट महिला वर्गाचा एक'मताने विजय झाला होता... प्रीत मोहर आल्या होत्या ना..! ;-)
10 Jan 2012 - 6:31 pm | किचेन
फोतोत नाहियेत...
10 Jan 2012 - 6:34 pm | मी-सौरभ
त्यांची भेट एवढी धावती होती की फोटो सुद्धा काढायची संधी मिळाली नाही....
10 Jan 2012 - 6:35 pm | अत्रुप्त आत्मा
फोतोत नाहियेत...>>> त्या सुरवातीच्या शीघ्र गंतव्य मंडळाच्या 'सह' आलेल्या होत्या... सबब फोतू न्हाईत..शॉली
10 Jan 2012 - 6:36 pm | मोदक
लौकर गेल्या.
ट = Shift + t
10 Jan 2012 - 6:45 pm | मी-सौरभ
आहेत रे अजून ;)
लौकर= चूक
लवकर=बरोबर
10 Jan 2012 - 7:03 pm | मोदक
ष्री र्राज्मान्य र्राजेष्रि सओर्भ "साहेब"
तेवढी एकच (करण्यासारखी) चूक होती त्या दोन शब्दात. ;-)
आणि त्या "लवकर" वरून धन्या (आणखी) एखादा श्लेष साधायचा.
मोदक
10 Jan 2012 - 7:16 pm | मी-सौरभ
काय कराव ह्या मोदकाचं???
कुस्करुन तूप टाकून खौनच टाकतो....:D
धन्या: तुझ्याबद्दल काय म्हणतोय बघ,
लग्न कर की लव कर ते एकदा क्लीअर करुन घे रे
10 Jan 2012 - 7:53 pm | मोदक
खौनच = चूक
खावूनच = बरोबर
10 Jan 2012 - 6:32 pm | मी-सौरभ
तुम्ही पण पुणेकर आणि मिपाकर आहात .....
आपलं येण झालं असतं तर महिला आघाडी ला पण प्रतिनिधीत्व लाभलं असतं :)
10 Jan 2012 - 8:16 pm | किचेन
मी येणार होते पण महिला सदस्यांची संख्या किती असेल, असतील कि नाही, मग मी एकटी पडेल वगैरे चिंतांनी ग्रस्त झाल्यामुळे मी येण टळल.लोक किती असतील बिल किती येईल, कोण भरेल, t t m m का t t m t अस असेल असे अनेक प्रश्न समोर असल्याने येण टाळल.तसंही तुम्ही सगळी टवाळ कार्टी आणि खादाड खाऊ.वर शब्दांवर प्रभुत्व.मी आपली नवाखी आणि भोळी .कोण जाणे सगळ्याचं बिल मला भाराव लागल असत.
ह.घ्या.
10 Jan 2012 - 8:34 pm | मोदक
प्रतिसाद कोणी लिहून दिला..?
टवाळ कार्टा :-)
10 Jan 2012 - 10:40 pm | किचेन
मि स्वताच लिहिलाय. काहि शंका?
10 Jan 2012 - 11:42 pm | मोदक
बिल्कुल नाही...
बाकी सगळे लिखाण पण त्याच कोलिती ने लिहा... ;-)
ह.घ्या.
मोदक.
10 Jan 2012 - 11:44 pm | मोदक
प्र का टा आ
10 Jan 2012 - 8:32 pm | अत्रुप्त आत्मा
@कोण जाणे सगळ्याचं बिल मला भाराव लागल असत.>>> ह्हा ह्हा ह्हा अहो तै असं कसं होइल.. हो?असो... ज्या ज्या गोष्टींचं आपल्याला भय वाटत होतं,त्या होत नाहीत अमच्या कट्ट्यात...!अता कोअर कमिटिने तसे नियमच केलेत..त्या मुळे या वेळचं,,असू द्या..पण पुढच्या वेळी मात्र नक्की यायचं हं...
10 Jan 2012 - 8:42 pm | विश्वनाथ मेहेंदळे
म्हणजे हुतात्मा जन्मावा, पण तो शेजारच्या घरात काय ???
11 Jan 2012 - 2:56 pm | मी-सौरभ
बॉर्र, आमचं एवढ कौतुक आजवर कुणीच्च केल नव्हतं
=)) गडाबडा लोळून हसणारी स्मायली
10 Jan 2012 - 6:18 pm | पक पक पक
पूढील युद्धाचे रणमैदान..?
10 Jan 2012 - 6:26 pm | अत्रुप्त आत्मा
@-पूढील युद्धाचे रणमैदान..?>>>
<<< शत्रू अजुन कळायचाय...! ;-)
10 Jan 2012 - 6:41 pm | मोदक
आता एखादा कट्टा "जनसेवा" सारख्या पिव्वर महाराष्ट्रीयन (आणि अनलिमिटेड) थाळी देणार्या ठिकाणी होवून जावूदे...
मोदक.
10 Jan 2012 - 7:59 pm | ५० फक्त
थोडं थांबा, एप्रिल मे मध्ये गणेशा तुम्हाला दर रविवारी दुर्वांकुरची यात्रा घडवेल, काळजीच करु नका.
वल्ली, +१००० टाका या प्रतिसादाला.
10 Jan 2012 - 8:02 pm | मोदक
+१०००००००००००००००००००००००००
कॉलिंग वल्ली.. कॉलिंग वल्ली..
10 Jan 2012 - 11:12 pm | प्रचेतस
याला कितीही + दिले तरी ते कमीच आहे कारण या गणेशाला दुर्वांकुर मध्ये चाळीसेक वाट्या आमरस फस्त करताना याची देही याची डोळा पाहिलंय.
11 Jan 2012 - 12:26 pm | स्वानन्द
:-o
11 Jan 2012 - 2:33 pm | गणेशा
[:)] हसतो आहे ... चाळीसीक नसतील त्या ३० च असतील अशी आशा करतो ...
बाकी आमरस खाण्यासाठी भरपुर खाण्यासाठी आणि वजन अतिरिक्त न वाढण्यासाठी मी डिसेंबर पासुनच व्यायामाला सुरुवात करतो ( यावेळेस आताशी सुरवात झाली आहे) ...
त्यामुळे विशेष परिनाम होत नाही..
आणखि एक .. आता आपल्या घरी पण यायचे आमरस खायला ... कारण सांगायची गरज नक्कीच नसेन ... उ
10 Jan 2012 - 6:21 pm | पक पक पक
संजयाने देखील ध्रुतराषट्राला महाभारत रणसंग्रामाचे इतके सुंदर वर्णन करुन सांगितले नसेन.....
10 Jan 2012 - 6:26 pm | अनुराग
क्षमस्व ! या वेळी येवु शकलो नाहि. पुन्हा नक्कि येउ. फोटो आवडले.
10 Jan 2012 - 6:27 pm | मालोजीराव
कट्ट्याचा वृत्तांत नादखुळा आणि ठसकेबाज झालाय गुरुजी !
- मालोजीराव
10 Jan 2012 - 6:29 pm | मी-सौरभ
भटजी बुवा तुमचं काव्यात्म कट्टा वर्णन त्या सर्व आठवणी पुन्हा जाग्या करतात अन् कामावरच लक्ष उडतं..
रच्याकने: या बिंधास्त कट्ट्याला 'सन्माननीय प्री-मो तै' णि पाशवी मंडळाच्या वतीने पाहुणी उपस्थिती नोंदवली होती हा उल्लेख राहून गेला :(
10 Jan 2012 - 6:45 pm | अत्रुप्त आत्मा
'सन्माननीय प्री-मो तै' णि पाशवी मंडळाच्या वतीने पाहुणी उपस्थिती नोंदवली होती हा उल्लेख राहून गेला :-( >>> खरं आहे... हा असला आव्हानपूर्ण धागा प्रथमच काढत असल्यामुळे बर्याच चुका झालेल्याच आहेत... मेंबरांची नावं र्हायली,,, फोटुंना अकडे लावले,पण द्यायचे र्हायले ;-) ,,,मेन कोर्स मधली नावं इसरलो... परिच्छेद-पाडता येत नसल्यामुळे वृत्तांत वस्तुनिष्ठपणे 'सलग' झाला... तस्मात>>> स्वारी सर्वेषांम ...
म्हणुन म्हणतो-पहिली(च) खेप आहे सांभाळुन घ्या... ;-)
10 Jan 2012 - 6:46 pm | मी-सौरभ
तुमी जेवड लिवलय ते भारीच लिवलयं
10 Jan 2012 - 6:48 pm | मी-सौरभ
प्रकाटाआ
10 Jan 2012 - 6:35 pm | प्रचेतस
झकास वृत्तांत भटजीबुवा. लई झ्याक लिवलय.
10 Jan 2012 - 7:20 pm | मृगनयनी
छान फोटो आलेत!!.... पण माननीय 'परा'साहेब दिसत नाहीत कुठे फोटोत!!!! की ते देखील "शीघ्रगन्तव्य"च्च होते? ;)
एक विनन्ती:... :- वरील फोटोंमध्ये प्रत्येक मिपा-सदस्याची सिरियली- फोटोतील आसनरचनेनुसार नावे टाकलीत... तर आम्हालादेखील कळेल.. कोण कोण आहेत ते....
वरील फोटोंमध्ये फक्त शशिकान्त'जी, धम्या, वल्ली आणि अत्रुप्त आत्मा'जी- तुम्ही स्वतः... इतकेच्च जण आम्ही (मी) ओळखू शकतो(ते).......
10 Jan 2012 - 7:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
एक विनन्ती:... :- वरील फोटोंमध्ये प्रत्येक मिपा-सदस्याची सिरियली- फोटोतील आसनरचनेनुसार नावे टाकलीत... तर आम्हालादेखील कळेल.. कोण कोण आहेत ते....
असेच म्हणतो.
वरील फोटोंमध्ये फक्त शशिकान्त'जी, धम्या, वल्ली आणि अत्रुप्त आत्मा'जी- तुम्ही स्वतः... इतकेच्च जण आम्ही (मी) ओळखू शकतो(ते).......
धम्या, वल्ली आणि ओक यांना ओळखता येत आहे. बाकी, कोणी ओळखता येत नाही. :(
-दिलीप बिरुटे
10 Jan 2012 - 7:35 pm | प्रास
एका फोटोत अंगठेबहाद्दर 'प्यारे१' अख्खे ओळखता येतायत की... की ते कोरडे राहणार असल्याने ओळखू आलेले नाहीत? ;-)
10 Jan 2012 - 8:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रिकाम्या प्लेटा समोर असतांना आवडतं सूप चमच्याने चाखणारे प्यारे१ ओळखता येत आहेत. पण एवढ्या एका फोटोतील ओळखीने आपण भविष्यात एकमेकांच्या समोरुन आलो-गेलो तर ओळखता येईल याची शक्यता खूपच कमी वाटत आहे. :)
च्यायला, तुम्ही सर्व मिळून औरंगाबादला कट्टा करा राव. मी येईन पाहुण्यासारखा वेळेवर. ;)
-दिलीप बिरुटे
(आळशी सदस्य /संयोजक, संभाव्य औरंगाबाद कट्टा)
10 Jan 2012 - 8:14 pm | प्रास
ते प्यारे१ नव्हेतंच की! प्यारे१ म्होरल्या फोटूत अंगठे दाखवतायत (असं वाटतंय)...... :-)
10 Jan 2012 - 8:22 pm | मोदक
भडक लाल रंगाच्या, म्हणजे गेलाबाजार एखादा रेडा नाही तर शेळीला तरी पाठलाग करण्याचा मोह व्हावा अशा शर्टामध्ये मी आहे.
मो द क.
10 Jan 2012 - 8:36 pm | प्रास
राम राम! :-)
10 Jan 2012 - 8:52 pm | मोदक
:-)
मी पहिल्यांदाच आलो होतो कट्ट्याला. :-)
10 Jan 2012 - 8:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जाऊ द्या. पुन्हा कोणत्या तरी कट्ट्यात बाकी राहीलेले मिपाकर ओळखण्याचा प्रयत्न करीन. :)
-दिलीप बिरुटे
10 Jan 2012 - 6:47 pm | सुहास..
भटजीबुवांनी अगदी मंत्रपठण (लग्नाचे) केल्यासारखा वृतांन्त लिहीला आहे ;) (तिथं कुट एन्टर असत का ;) )
असो ...फोटो छान आलेत, वृतान्त ही आवडला ...बाकी लिहितो थोड्या वेळात ;)
11 Jan 2012 - 12:42 pm | प्यारे१
बुच मारल्याबद्दल स्वारी वाश्या .
भटाने अगदी मंत्रपठण (लग्नाचे) केल्यासारखा किंवा श्रावणातली सत्यनारायणाची पूजा सांगावी असा वृत्तांत लिहीला आहे. (मध्ये मध्ये येणार्या कॉल्ससकट ;) )
बाकी >>>तिथं कुट एन्टर असत का >>> लग्नात नाही पण 'नंतर' एन्टर असतं. ;) असो.
आमच्या कोरडेपणाबद्दल, अंगठ्याबद्दल बोलले गेल्याने जनतेचे गरीबाकडे लक्ष आहे हे जाणवून ड्वाळे पाणावले. :)
बाकी आम्ही धम्याचे 'जीवश्च कंठश्च मित्र' बनण्याचा केलेला प्रयत्न अंधार्या फटुमुळे कळला नाही काय लोकांना?
10 Jan 2012 - 7:37 pm | गणेशा
व्रुत्तांत झकास ...
10 Jan 2012 - 7:14 pm | ५० फक्त
मस्त मस्त मस्त आणि मस्तच , लई भारी लिवलंय भट्जी बुवा, खरंच मजा आली त्यादिवशी.
एवढे मिपाकर एकत्र पाहुन डोळे पाणावले नसते तर मग कसले ते मिपाकर अन कसले ते त्यांचे डोळे..
असो, बाकी जेवण उत्तम होतं, डिलिव्हरी टाइम ,सर्विस चांगली होती, आणि महत्वाचं म्हणजे खर्च दरडोई २३०/- फक्त झाला.
एक राहुन गेलं माझ्याकडुन ते म्हणजे, बहुधा पुढच्या महिन्यात कोकण ट्रिप करायचं ठरतंय त्याबद्दल जास्त बोलणं झालं नाही, असो, कोअर कमिटि निर्णय घेउन आगाउ कळवेलच अगदी खर्चाच्या आकड्यासहित, तेंव्हा पण असाच लोभ ठेवुन प्रतिसाद द्यावा ही विनंती.
नि३,विवेक मोडक आणि नाकाआ सगळ्यात प्रथम पोहोचले होते, धाग्यावर आणि व्यनितुन जेवढ्यांनी कबुल केलं होतं त्यापैकी बहुतेक सगळे आले होते, त्याबद्दल अतिशय धन्यवाद.
10 Jan 2012 - 7:18 pm | मी-सौरभ
जे नै आले तेंच क्काय??
10 Jan 2012 - 7:36 pm | ५० फक्त
जे नै आले तेंच क्काय??
- हा एक लई मह त्वाचा प्वाईंट अन मुद्याची कल्पना हाय, यावर पण कोअर कमिटि निर णय घेई ललव करच.
का लोक शाई धरमाला अनु सरु न एक धागा काडावा,
मदत हवी आहे, येतो म्हणुन कट्टयाला न येणा-या सदस्यांना/चे काय करावे ?
10 Jan 2012 - 9:15 pm | प्रशांत
एकंदरीत कट्टा खुपच मस्त झाला.
भटजीबुवाच्या शब्दात सांगायचे झाल्यास "अत्रुप्त आत्मा तृप्त झाला"
10 Jan 2012 - 7:22 pm | सुहास..
नि३ !!
लईच येगळं पोरगं आहे राव !! कितीक बोलला ? काय बी नाय , पण छाप पाडुन गेलं, नाही का ??
तसच पक पक पक :)
10 Jan 2012 - 7:33 pm | ५० फक्त
पहिलाच टायम हाय, त्यात तुम्ही, भटजी , वप्या आणि धन्यासारके डुडूळगावचे गोलंदाज समोर, बॅट सावरावी का पॅड असं झालेलं असेल, घ्या सावरुन पुढच्या टायमाला मारतील कवर ड्रायव
10 Jan 2012 - 8:05 pm | बिपिन कार्यकर्ते
एका फोटूत धन्या फारच हसून र्हायलाय बे! ;)
10 Jan 2012 - 8:16 pm | मोदक
लोहगड ट्रेक, जाताना आणि येतानाची चालकाची भूमीका (कारण इतर ३ अशिक्षीत होते) दिवसभर झालेली उपासमार, कट्ट्याआधी १ तास खाल्लेले तन्दूरी चिकन, आणि दिवसभरची कंपनी (मी, वपाडाव आणि किसन)
यातून धन्या खरे खरे हसेल असे वाटते काय.. ;-)
10 Jan 2012 - 9:10 pm | धन्या
खिक्क खिक्क !!!
10 Jan 2012 - 8:16 pm | प्रभो
भारी रे!!
10 Jan 2012 - 8:18 pm | निवेदिता-ताई
वॄतांत झकास,.......
10 Jan 2012 - 8:21 pm | श्रीरंग
कट्ट्यावर येण्याची पहिलीच वेळ होती.
खूप मजा आली. मस्त झाला कट्टा. यापुढेही नियमीत हजेरी लावीनच म्हणतो. :)
आणी हो, अत्रुप्त आत्मा यांनी आणलेल्या बाटलीचा उल्लेख राहिलाच. धन्यवाद, गुरुजी.
10 Jan 2012 - 8:56 pm | अत्रुप्त आत्मा
आणी हो, अत्रुप्त आत्मा यांनी आणलेल्या बाटलीचा उल्लेख राहिलाच. धन्यवाद, गुरुजी.>>> अरे...श्रीरंगा..! मजला मुक्ती देण्याच्या विचारत आहेस काय? :-D
बाटलीचा उल्लेख मजकडूनी राहिला
परि तुझ्याकडुनी तो ऐसा कैसा जाहला...।
बाटली म्हटली की काय-काय अठवते रे,
पण मी तर सु-गंधी अत्तरवाला...॥ ;-)
अवांतर-अत्तर कोणतं होतं..? असे बरेच जण विचारत आहेत...अत्तराचे नाव-कस्तुरी/हीना :-)
10 Jan 2012 - 9:06 pm | श्रीरंग
हाहाहा! लोकांना बाटली म्हणता जे स्मरायचे ते स्मरु द्या. आम्हाला बुवा जाम आवडली कस्तुरी/हीना.
म्हणूनच आवर्जून आठवण करून दिली. :)
10 Jan 2012 - 9:29 pm | अत्रुप्त आत्मा
आम्हाला बुवा जाम आवडली कस्तुरी/हीना.
म्हणूनच आवर्जून आठवण करून दिली...खुलाश्याबद्दल थँक्यू :-)
अता निघालीच आहे अत्तराची चर्चा तर त्याची लेखात लिहायची र्हायलेली अख्खी अठवणच शेअर करतो--- पन्नासरावांनी केकचा नैवेद्य देऊन गणपतिंचे पुजन करण्या आधी मी सगळ्या पंगतीला खुर्च्यांमागुन अत्तराचे मंगलाचरण करत सुटलो होतो...माझी गाडी ओककाकां-जवळ आली,,तेवढ्यात १/२मेंबरं का कोण जाणे हसली..आणी त्याचा परिणाम म्हणुन की काय,कुणास ठाऊक...ओककाकांनी अत्तर लाऊन घेण्यासाठी-मला मिष्किलपणे-''कोणता हात पुढे करू?'' असे विचारले..मग मी ही -''जो लवकर नाकाजवळ जाइल तो...!'' असे उत्तर मुष्किलपणे दिले... (हीह्हा ;-) ) त्यामुळे माझ्या आजुची आणी बाजुची अशी सर्व मंडळी हसली...
10 Jan 2012 - 9:24 pm | प्रशांत
ओक काकांनी केलेला समारोप आणि फक्त ५० नी सांगितलेला जोक्स..
हे लिहायला विसरले तुम्हि
आणि हो तुम्हाला वेळेवर सुचलेल्या त्या कवितेच्या चार ओळि त्या पण....
10 Jan 2012 - 9:33 pm | अत्रुप्त आत्मा
हो त्ये येक र्हायलच...! ओकांचा समा-रोप मला का कोण जाणे अठवत नाही... आणी फक्त५० यांचा जोक त्यांनाच सांगु दे की राव.. ;-)
10 Jan 2012 - 8:44 pm | मन१
मस्त.
10 Jan 2012 - 8:51 pm | रेवती
आपले लेखनकौशल्य महान आहे.
'कट्टा आला पण सोकाजी गेला'
हे मात्र भारी.
बरेच फोटू हे खाद्यपदार्थांची वाट बघतानाचे असल्याने बरे वाटले.
आम्ही तरी दरवेळी आमच्याच डोळ्यांना शिक्षा का म्हणून द्यायची?
एकंदरीत कट्टा चांगला झाला असल्याचे भासत आहे.;)
10 Jan 2012 - 9:00 pm | अत्रुप्त आत्मा
आपले लेखनकौशल्य महान आहे.
'कट्टा आला पण सोकाजी गेला'
हे मात्र भारी.... :-) धन्यु
@-बरेच फोटू हे खाद्यपदार्थांची वाट बघतानाचे असल्याने बरे वाटले.आम्ही तरी दरवेळी आमच्याच डोळ्यांना शिक्षा का म्हणून द्यायची?>> :-D आssssआssss लागलंss लागलंss
10 Jan 2012 - 9:29 pm | पैसा
प्रीतमोहर बै यानी का पलायन केलं हे हळूच विचारून घेण्यात येईल. पुढच्या कट्ट्याला आयोजकांमधे महिलांना प्रतिनिधित्व द्या, आणि ड्रेसकोडची भीती घालू नका, म्हणजे महिला आरक्षणाची मागणी करायची वेळ येणार नाही. ;)
10 Jan 2012 - 10:05 pm | सूड
भटजी वृत्तांत झकास लिहीलाय, एकदम मस्त!! कट्ट्याबद्दल बहुत काय बोलणे.
10 Jan 2012 - 10:15 pm | सोत्रि
लैच भारी वृत्तांत गुर्जी! मझा आला.
मी आणि पिंगू ५० रावांना फोनवत फोनवत ठरलेल्या ठिकाणी पोहोचलो.
पोहोचल्यावर बघितले तर मिपाकर बाहेरच घोळका करू उभे होते. बरेचसे प्रथमच भेट्णारे. घाटपांडेकाका, नाकाआ, प्रशांत, भरत हे पहिल्यांदाच भेटणारे मिपाकर तर परा, ५० फक्त, नुकतीच हुच्चभ्रु झालेली प्रीमो आणि अतृप्त आत्मा हजर होते. नमस्कार चमत्कार झाल्यावर गुर्जींनी (अतृप्त आत्मा) आधि कबूल केल्याप्रमाणे माझ्यासाठी आणलेला 'केसर चुना' माझ्या हवाली केला. गुर्जी लै वेळा धन्यवाद हो !
मग लगेच त्यांच्या आज्ञेचा मान राखून त्यांच्याबरोबर जागेची सोय करायला व्यवस्थापकाकडे गेलो आणि त्याला टेबले लावायला सांगीतलं. त्यानंतर हळू हळू गप्पा टप्पा चालू झाल्या. मी आपली सवयीप्रमाणे 'चैतन्यकांडी' पेटवली तोच वेटरकडून 'बनियान ट्री' मधे 'स्मोकिंग अलावूड नाय' अशी शिकवणी घेणे झाले. मग बाहेर जावेच लागले :( ह्या मोक्यावर सर्व इच्छुकांनी चौका मारून घेतला आणि पुन्हा बाहेर एक घोळका जमा झाला :)
चैतन्यकांडी संपेपर्यंत सूड्चे आगमन झाले. स्वारगेट ते राजाराम पूल हा प्रवास अडीच तासांच्या विक्रमी वेळात पूर्ण करून त्यांनी इतिहासचं घडवला. ह्या विक्रमाबद्दल पुढच्या कट्ट्याला त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करावा असा प्रस्ताव मी ह्या ठिकणी मांडू इच्छितो. वास्तविक सूड माझ्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर नाही पण जवळच रहातो तरीही......असो.
पुन्हा आत आलो तर चॉकलेट केकचे वाटप सुरू होऊन आडवा हात मारणे चालू झाले होते. प्रीमोने लगेच हावरटासारखे आख्खे ३ केक, हो हो... 'तीनं' केक साफ केले. त्यामुळे मला मग प्यारेच्या केक मधला एक तुकडा खाऊन समाधान मानावे लागले. प्यारे, देव तुझे भले करो. अरे हो डब्बल भले करो, प्यारेने मला त्याच्याकडे असलेला दुबईहून आणलेला एक शॉट ग्लास भेट दिला त्यादिवशी.
आता कोरम पूर्ण भरला होता. गवि म्हणाल्याप्रमाणे मिपाधर्म वाढीला लागलेला पाहून ऊर भरून आला अगदी. डोळे अंमळ पाणावत होते तोच प्रीमोला घरी सोडण्याची तीने आ़ज्ञा केली. आजकालच्या मुलींना विनंती हा शब्द माहीतच नाही :( बरं आ़ज्ञातर केलीच पण वरून माझी शोफर अशी संभावना ही केली. :(
त्यामुळे आणि मिपा कट्ट्याला महिला आयडींनी लावलेल्या अनुपस्थितीचा निषेध म्हणून लवकर निघायचा निर्णय घेतला. असे भरलेल्या पानावरून ऊठून जिवावर आले होते पण.....
गुर्जी आणि ५० फक्त, नियोजन आणि आयोजन ह्याबद्दल मनापासून आभार.
उपस्थित मिपाकरांचेही हजेरी लावून मिपाधर्म वाढवल्याबद्दल आभार!
मिपाकर्स रॉक्स....
- (पुढील कट्ट्याच्या प्रतिक्षेत असलेला) सोकाजी
10 Jan 2012 - 10:46 pm | सूड
. स्वारगेट ते राजाराम पूल हा प्रवास अडीच तासांच्या विक्रमी वेळात पूर्ण करून त्यांनी इतिहासचं घडवला.
वास्तविक पाहता हा प्रवास अवघ्या वीस मिनीटात पूर्ण केल्या गेला होता. उरल्या वेळाचे संदर्भासहित स्पष्टीकरण दिल्या गेले होते तरीही असो.
:D
10 Jan 2012 - 10:36 pm | भिकापाटील
भटजीबुवा तुम्ही फुलांच्या रांगोळ्या नाही काढल्या का इथे. :)
असो!
मजा केलेली दिसते.
पुढच्या वेळेस मलाही अॅड करा.
11 Jan 2012 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा
@-भटजीबुवा तुम्ही फुलांच्या रांगोळ्या नाही काढल्या का इथे. :-) >>>
थितं नै तं,,,हितं घ्या... :-)
आता खुष...? :-)
11 Jan 2012 - 9:14 am | प्रचेतस
चिंचवडहून मी आणि पक पक पक बरोबरच निघालो. साक्षात भगवान किसनदेवांची आज्ञा झाल्यामुळे अप्पा बळवंत चौकात त्यांच्यासाठी सुशिंचे 'बरसात चांदण्यांची' घेणे क्रमप्राप्तच होते. आख्खा अप्पा बळवंत चौक पालथ्या घातल्यानंतर एक अखेरचाच प्रयत्न केलेल्या दुकानात मात्र नेमके ते मिळाले आणि आमचा जीव भांड्यात पडला.
हाटेलजवळ पोहोचलो तेव्हा ७/८ मिपाकर आलेलेच होते. प्रथमच भेटत असलेल्या काहींशी नव्याने ओळख झाली. तितक्यात गुरुजी आलेच. हळूहळू बाकीची मंडळीही आलीच मग एकच दंगा सुरु.
काही वेळाने मग ओक काकांबरोबर खलबते सुरु झाली. महाराष्ट्रातील किल्ल्यांची बांधणी आजच्या काळातही त्यानुरूप करता येईल का या विषयावर काथ्याकूट करण्यात आला, मृत्युंजयचाही त्यात सहभाग होता. सुहासशी गप्पा मारतांना अनेक नवनविन किस्से समजले.
पहिल्यांदाच मिपा कट्ट्याला हजेरी लावणारे काही मिपाकर शांत शांत होते. पुढच्या कट्ट्याला ते नक्की खुलतीलच.
एकंदरीत कट्टा एकदम मस्त झाला.
पण जेवणानंतर पान खायचे राहिलेच. त्याची कमी मग मी आणि पक पक पक यांनी नळस्टॉपवरील शौकीनचे मघई पान खाउन भरून काढली. तिथे एक पुणेरी पाटी पाहून उर भरून आला.
पुणेरीपाट्या यासंथळावरून साभार (या संस्थळावर आम्हीसुद्धा ८९ पाट्या टाकल्या आहेत) ;)
11 Jan 2012 - 3:04 am | पाषाणभेद
फारच गमतीशीर वर्णन कट्याचं
11 Jan 2012 - 3:52 am | स्मिता.
परिच्छेद आणि महिला सभासद नसलेल्या कट्ट्याचे वर्णन आवडले ;)
आजकाल कट्ट्याच्या धाग्यांवर जास्त न बोलायचं ठरवलंय.
11 Jan 2012 - 9:06 am | अत्रुप्त आत्मा
परिच्छेद आणि महिला सभासद नसलेल्या कट्ट्याचे वर्णन आवडले>>>
<<< परि-च्छेद----पाडलेला अवडला ;-)
11 Jan 2012 - 5:19 am | मराठमोळा
मस्त.. बरीच मोठी जत्रा भरली होती म्हणजे.. ;)
कुणीतरी कट्टा चालू असताना फोन केला होता.. ती व्यक्ती म्हणत होती की मासळी बाजारात फोन केला असे वाटत होते.. ;)
बाकी लवकरच एका कट्ट्यात हजेरी लावणारच. :)
11 Jan 2012 - 9:13 am | अत्रुप्त आत्मा
@ती व्यक्ती म्हणत होती की मासळी बाजारात फोन केला असे वाटत होते..>>>त्या दिवशी फक्त मासेबाजार होता.. ;-)
11 Jan 2012 - 8:14 am | स्पा
वा जेब्बात!!!
धमाल केलीत म्हणायची...
कट्ट्याला येऊ शकलो नसलो.. तरी फोटो भरपूर वेण्जोय केले
बरेच नवीन चेहरे दिसत आहेत , नाव टाकली असतीत तर बर झाल असत :)
11 Jan 2012 - 9:03 am | अत्रुप्त आत्मा
@कट्ट्याला येऊ शकलो नसलो.. तरी फोटो भरपूर वेण्जोय केले>>>
<<< आज अकरा तारिख आहे.... ;-)