त्रिकोण - एक हजार वर्षाच्या इतिहासाचा.. - (श्रावणबेळगोळ) भाग - ४

दशानन's picture
दशानन in भटकंती
7 Jan 2012 - 12:13 am

मागील भागात आपण बेल्लुर पाहिले. आता म्हैसूरपासून ९०-९५ कि.मी. दूर असलेल्या विंध्यगिरी पर्वतावर जैनधर्मियांचे मोठे तिर्थक्षेत्र आहे श्रावणबेळगोळ. मराठी माणसाला श्रावणबेळगोळ व तेथील गोमटेश्वराची मुर्ती माहिती असण्याचे कारण म्हणजे त्या मुर्तीच्या पायथ्यावर मराठीमध्ये केलेले शिलालेखन. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांना ही माहिती सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा मान जातो.

श्रावणबेळगोळचा ज्ञात इतिहास हा शकवर्ष 8०० ते ११०० च्या कालावधीतील आहे. गंग राजे राचमल्ल (४ थे) यांच्या कालावधीत शक्यतो शकवर्ष ९५० च्या पुढे-मागे या गोमटेश्वराच्या मुर्तीचे निर्माण केले गेले. ही मुर्ती ५७ फूट उंचीची आहे व ती एका अखंड पाषाणातून बनवली गेलेली आहे. श्री चामुंडराय हे गंग राजे राचमल्ल (४) यांचे सेनापती होते, त्यांनी या मुर्तीची स्थापना केली होती. गोम्मटराय हे श्रीचामुंडराय यांचेच नाव म्हणून या मुर्तीला गोमटेश्वर असे नाव पडले. मुळ मुर्ती ही बाहुबली यांची आहे ( बाहुबली = सम्राट भरतचा लहान भाऊ).

मुर्ती एवढी उंच असल्या कारणाने या मंदिराला फक्त तटबंदी आहे, छत नाही. तटबंदीच्या दोन्ही बाजूला सभापंडप, मुनींच्या राहण्याची व्यवस्था आहे. या पुर्ण विंध्यगिरी पर्वतावर अनेक शिलालेख आहे, व त्या शिलालेखांची पुर्णपणे नीट काळजी घेतली जात आहे.

सिध्दर बस्ती
मुख्यमुर्ती स्थानाच्या बाहेर असलेल्या सर्व पाषाणातून निर्माण केलेल्या गृहांना/ मंडपांना सिध्दर बस्ती असे म्हटले जाते. ज्याचे निर्माण शकवर्ष १७००-१८०० मध्ये केले गेले. या सर्वभागात अनेक शिलालेख असून त्यावर मंदिरासंबधी माहिती, निर्माते व दानासंबधी उल्लेख केलेला आहे.

गुल्लेकायी - अज्जी मंडप
पांच गोलाकार स्तंभ, एक शिलालेख व एका अज्जीची साडी नेसलेली मुर्ती. असलेला हा मंडप अनेक दंतकथेमुळे प्रसिध्द आहे, चामुंडराय यांचा घमंड तोडण्यासाठी देवी पद्मावती तेथे अज्जीच्या रूपात गेली होती ही सर्वात प्रसिध्द दंतकथा आहे. हा मंडप शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेला असून याचे स्तंभ मात्र शकवर्ष १२०० च्या काळातील आहेत.

विंध्यगिरी पर्वतावर त्रिकुट बस्ती (ओदेगल बस्ती) म्हणून एकमात्र त्रिमंदिर आहे. पुर्वीच्याकाळी तळघर बांधण्यासाठी कणाश्म शिला नावाच्या दगडाचा विषेशतः वापर केला जात असे त्याच दगडातून हे मंदिर उभारले गेले आहे. शकवर्ष १४०० च्या काळत उभारलेले हे गोलाकार स्तंभ असलेले मंदिर बाहेरून जरी साधे वाटले तरी विषेश दगडांच्या वापरामुळे व याच्या अतंर्गत रचनेमुळे विशिष्ठ ठरते. आता तीन गर्भगृह असून प्रत्येक गर्भगृहात स्तरितशिला (संगमरवर) चा वापरून करून अत्यंत सुरेख व रेखीव अश्या तीर्थंकरांच्या मुर्त्या आहेत.

त्यागदं स्तंभ
कलात्मक सौंदर्याचे अनुपम उदाहरण असलेला त्यागदं स्तंभाचे ऐतिहासिक दृष्ट्यादेखील अनन्य साधारण महत्त्व आहे. एक छोटा मंडप व त्यामध्ये मध्यभागी हा स्तंभ आहे. याचे निर्माण शकवर्ष ९५०-१००० मध्ये केले गेले असून या वापर श्री चामुंडराय दान-धर्म करण्यासाठी करत (तेथे उभे राहून दे डोळे बंद करून दान देत असत). व शेवटी शेवटी त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचे दान येथे उभे राहूनच केले व सन्यास घेतला. स्तंभावर लतावेली यांचे सुरेख रेखाटन केले असून पुर्ण स्तंभ रेखीव आहे.

विंध्यगिरी पर्वतावरून दिसणारा सुर्यास्त.

लेखसंस्कृतीमाहिती

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

7 Jan 2012 - 1:40 am | अर्धवटराव

अप्रतीम रे रावणा !!
थोडं आणखी वर्णन केलं असतं अजुन मझा आला असता.

अर्धवटराव

उल्हास's picture

7 Jan 2012 - 2:44 am | उल्हास

७ - ८ वर्षापूर्वी भेट दिली होती त्या आठवणी ताज्या झाल्या.

विकास's picture

7 Jan 2012 - 5:34 am | विकास

कॉलेजमधे असताना तेथे गेलो होतो... गोमटेश्वराच्या पायावरील मराठीचा फोटो माझ्याकडे पण आहे. ऐकीव माहितीप्रमाणे ते ज्ञात लिखित स्वरूपातील पहीलेच मराठी आहे.

बाकी फोटो पण मस्त आले आहेत. कधी काळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हस्ते दुधाचा अभिषेक झाला होता तेंव्हा श्रवणबेळगोळला अचानक प्रसिद्धी आली होती.

उत्तम फोटो व वर्णन.
हजार वर्ष उन पावसाचा मारा झेलुनही गोमटेश्वराची मूर्ती अजूनही उत्तम स्थितीत दिसतेय.

पैसा's picture

7 Jan 2012 - 5:31 pm | पैसा

माहिती उत्तम आणि फोटो लाजवाब!

गणेशा's picture

11 Jan 2012 - 6:30 pm | गणेशा

अप्रतिम

दीपा माने's picture

11 Jan 2012 - 11:10 pm | दीपा माने

अप्रतिम फोटोग्राफी केलीत आणि माहीतीही देऊन. आणखी फोटो-माहीती येऊ द्या.