पुस्तकवेड्यांसाठी खुशखबर!
इंग्रजीतील पुस्तकांसाठी अंतर्जालावर गुटेनबर्गसारखी अनेक ग्रंथालये आहेत. तसेच, पण इंग्रजीतील मूळ पुस्तके जशीच्या तशी (आणि फुकट, हे महत्त्वाचं ;-) ) ब्राऊझरमध्ये वाचण्यासाठी उपलब्ध असणारे ऑनलाईन ग्रंथालय सहज दिसले.
हा त्याचा दुवा: http://openlibrary.org
पुस्तके बर्याच ठिकाणी उपलब्ध असतात, पण ती पुस्तकांसारखी पुस्तके नसून नुसती अक्षरांची खिचडी असल्याने वाचायला मजा येत नाही.
या संकेतस्थळावर मूळ पुस्तकेच स्कॅन करुन अपलोड केलेली आहेत.
कोणती कोणती पुस्तके आहेत हे सांगणे अवघड आहे, कारण इ.स. १००० ते २००० पर्यंतची कित्येक पुस्तके इथे दिसली.
काही पुस्तके वाचण्यासाठी फक्त दोन सेकंदात मिळणारे सदस्यत्त्व घेणे आवश्यक आहे.
या ऑनलाइन लायब्ररीत सुमारे 1,000,000 पुस्तके आहेत असे साइटवर म्हटले आहे.
कृपया अशी आणखी संकेतस्थळे ज्ञात असल्यास त्यांची लिंक द्यावी.
(जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक जावी यासाठी पुन्हा एकदा हा उद्योग)
प्रतिक्रिया
20 Dec 2011 - 10:43 pm | बहुगुणी
खजिन्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
20 Dec 2011 - 10:51 pm | मन१
मस्त रे! पण प्राधान्याने वाचावित अशी कुठली पुस्तकं तिथं आहेत?
सुरुवात करायची तर कुठून करावी? हे कुणी सांगितलं तर बरं होइल.
माझं इंग्रजी वाचन भोपळा आहे, सुरुवात करावी म्हणतोय.
पटापट वाचता येतील अशी, सरसर नजरेखालून घालावित अशी सुटसुटित पुस्तके कोणती ते कुणी सांगितलं तर लाख उपकार होतील.
(मागे चार्-दोन लघु कथा वाचल्या होत्या. एक्-दोन चेकॉव च्या भाषांतरित होउन आंग्ल भाषेत आल्या होत्या, आवडल्या.)
तसे काही आहे का? अजून एखादा नवीन लिखाण प्रकार तिथे आहे का?(जसे सूक्ष्म कथा हा एक सुंदर लिखाण प्रकार बाहेरच्या भाषांत आढळतो.)
20 Dec 2011 - 11:00 pm | यकु
मला पण हा प्रश्न पडलाय.
लहानपणी खेळण्यांच्या दुकानात गेल्यावर जसं व्हायचं तसं झालं ही साईट पाहून.
पण सध्या तरी -
'by the power of the written word, to make you hear, to make you feel . . . before all, to make you see'
हे जोसेफ कॉनरॅडच्या एका पुस्तकाच्या ओळखीत वाचून तिथून सुरु करु म्हटले.
मराठीत ज्या लेखकांचं आवडतं, त्यांना जे इंग्लिश लेखक आवडायचे ते वाचून पहाणे हा एक पर्याय असू शकतो. म्हणून व्यंकटेश माडगुळकरांचे आवडते लेखक ओ'फ्लॅहर्टी आणि जॉन स्टाईनबेक शोधले. तर स्टाईनबेक महाशयांची बरीच पुस्तके आहेत तिथे.. ती पण जोडून घेतली.. ओ'फ्लॅहर्टीची मात्र नाहीत.
पण कुणी एखादा जाणकार असेल तर इंग्रजी पुस्तकांबद्दल लिहाच राव.. लै बरं होईल.
20 Dec 2011 - 11:14 pm | बहुगुणी
शास्त्रीय/ तंत्रज्ञानाविषयीची पुस्तके
गणिताविषयीची पुस्तके
प्रवासविषयक पुस्तके
आधिक माहिती
21 Dec 2011 - 12:28 am | वाहीदा
बेहतर से बेहतरीन ... !
21 Dec 2011 - 12:36 am | अन्या दातार
धाग्याची वाचनखूण साठवली आहे. :)
21 Dec 2011 - 7:49 am | पाषाणभेद
महत्वपुर्ण धागा. वाखूकेआ.
21 Dec 2011 - 7:52 am | जोशी 'ले'
या साइट्स वर जुनी मराठी पुस्तके सुध्दा वाचता येतील www.dli.ernet.in/ व www.new.dli.ernet.in/ अगदि एकोनिसाव्या शतकातिल मराठी कथा व संदर्भग्रंथ वाचायला मजा येते,
21 Dec 2011 - 8:19 am | जोशी 'ले'
प्रकाटाआ
21 Dec 2011 - 8:23 am | जोशी 'ले'
एकच प्रतिसाद तीन वेळा आल्या मुळे प्रकाटाआ
21 Dec 2011 - 8:43 am | यशोधरा
धन्यवाद.
21 Dec 2011 - 9:14 am | सविता००१
खूप सुंदर माहिती
21 Dec 2011 - 9:50 am | स्पा
यक्कू धन्यवाद रे
मस्त लिंक दिलीस
इंग्रजीचे ज्ञान (पुस्तकी हो- बोलण्याच नाही ;) ) यथा तथाच असल्याने.. पुस्तक वाचणे कधी जमलंच नाही...
एक दोनदा प्रयत्न केला होता, पण पुस्तक हातात घेतल कि झोप यायला लागायची..., नाही म्हणायला एक फायदा झाला
कारण आधी धारपांची कवटी , खोपडी असलेली पुस्तक माझ्या हातात दिसली , कि फर्स्ट क्लास मधील सर्व पांढर्या कॉलरी माझ्याकडे मी करणी करणारा मांत्रिक वेग्रे आहे का काय या थाटात बघायचा
पण नंतर हातात विंग्रजी पुस्तक बघून त्यांच्या बघण्यात बराच बदल झाला, थोडा आदर दाटून आला त्यांच्या डोळ्यात ;)
असो...
आता या साईट वरून पुस्तक वाचून म्या पामर विंग्रजी आणखी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन
21 Dec 2011 - 10:55 am | स्पा
यक्कू त्या लिंक वर read चा option येत नाहीये
21 Dec 2011 - 11:11 am | दिपक
मस्त साईट यंशवतजी. :-)
हिंदी पुस्तके
5 Jan 2012 - 5:34 pm | Ravindra
इन्ग्लिश वाच् नासाठी www.freebookspot.es ही साईट फार छान आहे.