किती नाजूक ती लाजते
लाजत माझ्या कडे बगते
तुझ्या हसण्याने संजीवनी मिळते
तुझ्या असण्याने शांतता मिळते
माझे आयुष्य आता बदलले
सुंदर तैलचित्र मनी जाहले
किती तू अशी दूर राहणार
किती ह्या काळजा जाळणार
तुझा दुरावा आता सहन होत नाही
जीवाची घालमेल आता बघवत नाही
प्रतिक्रिया
30 Nov 2011 - 5:19 pm | गवि
प्रयत्न उत्तम आहे. भावना मनापासूनच्या असल्याने साधेपणातच कवितेची ताकद आहे.
पण,
पहिल्या दोन ओळींमधे "ती लाजते / ती बघते" अशी तृतीयपुरुषी शब्दरचना आहे..
बाकीच्या सर्व कडव्यांत तू, तुझ्या, तुझा असे थेट संबोधन करणारे उल्लेख आहेत.
यामुळे दोन घोळ होतात.
एक. कोणाला उद्देशून आहे याविषयी
दोन. हसते, बघते शांत वाटते वगैरेतून ती साधारण जवळच असते आणि भेटते अशी समजूत होते (अर्थात स्वप्नातही असू शकेल) आणि त्यामुळे शेवटी एकदम ती दूर असणे, जिवाला जाळणे , दुरावा, घालमेल याचा संदर्भ लागत नाही.
मुद्दाम मापे काढणारी प्रतिक्रिया लिहिलीय असे समजू नये. प्रामाणिकपणे चांगलं आणी वाईट जे वाटलं ते सांगतोय.
धन्यवाद आणि मिपावरील पुढील लेखनासाठी शुभेच्छा..
30 Nov 2011 - 5:27 pm | विवेकखोत
धन्यवाद
30 Nov 2011 - 5:22 pm | मोहनराव
छान छान!!
30 Nov 2011 - 5:55 pm | कपिलमुनी
मस्त अह्हे
30 Nov 2011 - 6:45 pm | किचेन
तुझ्या असण्याने शांतता मिळते
? अहो आश्चर्यं !
30 Nov 2011 - 7:18 pm | मोहनराव
त्यांचा अनुभव वेगळा असेल किचेनतै!! :)
30 Nov 2011 - 7:59 pm | कपिलमुनी
काळ्या मातीत मातीत ची चाल लागेल का या कवितेला ??
30 Nov 2011 - 9:01 pm | विजुभाऊ
चालेल की. ती कोलावरी ची सुद्धा चाल चालेल.
कोलावरी डी ची चाल युनिव्हर्सल आहे. मयती पासून , दिल्या घरी तु सुखी रहा , वादा ना तोड , ते शावा शावा ,हडिप्पा पंजाबी भाम्गडा कशालाही चालु शकते
8 Dec 2011 - 9:21 am | अर्धवट
च्यायला.. सृजनात्मकता म्हणातात ती ही.. ईजूभौ आता सगळ्या गाण्यांना कोलावरीची चाल लावण्याचा सपाटा लावला आहे,