कोण होती ती.... (७)

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
28 Nov 2011 - 9:38 am

कोण होती ती.... (७)

ती अबोली लिहित होती ..
न राहवून त्याने कागद ओढला तिच्या हातातला
तिला जे बोलायचे होते ....
शेवटचे कडवे लिहायचे होते...
त्यालाही आता उमगू लागले होते
कोडे आयुष्याचे सुटू लागले होते

तिथेच उभा होतो ....तसाच ......

त्याने वाचायला सुरुवात केली

" माझे जगणे तू, माझे मरणे तू,
माझा देह तू, माझा आत्मा तू,

माझे प्रेम तू माझी मैत्री तू
माझे प्रश्न तू माझी उत्तरे तू

माझा धर्म तू माझे इमान तू
माझा कृष्ण तू माझा राम तू

माझा चेहरा तू माझी ओळख तू
माझे डोळे तू माझे अश्रू तू

माझी नजर तू माझा हुंदका तू
माझे हृदय तू माझा श्वास तू ..."

अश्रूंनी डोळे पाणावले त्याचे, वाचता वाचता

पण
तो तिथेच उभा होता ....तसाच ......

कविता