कोण होती ती.... ( ६)
मी स्तब्ध.. क्षणात सुन्न ..
वाऱ्याचा गोंगाट पण तरीही शांतता ..
आतून असलेली ओळख पण तरीही परका ...
पावसाने चिंब भिजलेला पण तरीही कोरडा ..
अख्खे विश्व माझे पण तरीही मी एकटा.....
तिथेच उभा होतो ....तसाच ......
तिला ...बोलावत नव्हते आता ...
पण सांगायचे होते खूप काहीतरी .....
शब्दच नव्हते व्यक्त करायला .....
कंठ दाटून आला होता ......... ,
हुंदका अडवून धरला होता तिने... कित्येक जन्म...
पण
तो तिथेच उभा होता ....तसाच ......
ती लिहू लागली कागदावर भर भर
तिच्या मनाची झालेली अवस्था .....
चार शब्दात काय लिहिणार होती ...
राहिले होते प्राण फक्त त्याला हे सांगण्यासाठी
जगाचा कधीच निरोप घेणार होती ती .....
पण
तो तिथेच उभा होता ....तसाच ......