कोण होती ती.... (२)
सांज जवळ आली होती..
आता तिची सावली पण थकली होती ..
काय हवे होते तिला ...
जाऊन विचारावे का ...धीर होत नव्हता
पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....
आता ढग गच्च गच्च भरले होते
पापणी लावतेच तोच बरसतील
रप रप चालू झाली लगेच
मी छत्री उगडली नि रस्त्याच्या कडेला थांबलो
न भिजता सुरक्षित स्थळी पोचलो... ....
ती ? .....
ती तिथेच उभी होती....तशीच .....
ढग कडाडून उतरू लागले
आणि मनात विचारांचे काहूर उठले
तशातच मी गाडी काढली आणि
निघालो घराच्या दिशेने ....
पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....