कोण होती ती.... (४)

फिझा's picture
फिझा in जे न देखे रवी...
25 Nov 2011 - 10:05 am

कोण होती ती.... (४)

ठरवले .........कि जायचे परत
आता घरात थांबणे शक्य नव्हते ,
असे आजपर्यंत कधीच झाले नव्हते
पण एक अनाकलनीय आकर्षण
मला घेऊन चालले होते .....

पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....

रात्र जरा जास्तच काळोखाची होती
पण आता निश्चय केला होता...
खडसावून विचारायचे होते काहीतरी तिला ...
पण खात्री होती , आता तिथे कुणीही नसेल
पाहून चर्र झाले मनात .........

ती तिथेच उभी होती....तशीच .....

चिंब चिंब भिजलेली,
केसांवारचे पाणी गालावर ओघळेले,
पण नजर तशीच मनाला भिडणारी
पुढे जाऊन बोलण्याचा निर्धार केलेला मी ...
स्तब्ध झालो होतो ...

पण
ती तिथेच उभी होती....तशीच .....

कविता