सेलीब्रीटी वॅक्स म्युजीयम, लोणावळा

कपिलमुनी's picture
कपिलमुनी in कलादालन
27 Nov 2011 - 9:20 pm

आज रविवारी दुपारीच न मागता चहा चा कप ४ .३० ला मिळाला तेव्हाच समजला आज 'सरकार' फिरायच्या मूड मध्ये आहेत ..पुण्याच्या ट्राफिक मध्ये गाडी घालायची नव्हती मग लोनावाल्याच्या दिशेने जाऊ असा विचार केला ..तिथल्या म्युजियम बद्दल ऐकला होता..
पुण्याकडून लोणावळाचा टोल नाका ओलांडला की लगेचच डाव्या बाजूला सेलीब्रीती वाकस म्युजियम चा बोर्ड दिसतो ..
सुनील कांडलोर या केरळी युवकाने हे म्युजियम सुरु केले आहे ..
सकाळी ९:३० ते रात्री १० अशी वेळ आहे..आणि १०० प्रती व्यक्ती प्रवेश फी आहे..फोटोग्राफीला मान्यता आहे

प्रवेश द्वार :

समोरच अण्णांचा नवीन पुतळा दिसतो

आपले शिवछत्रपती

650

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रपिता महात्मा गांधी ( खर तर मला दिलिप प्रभावळकरच आठवले )

कै. राजीव गांधी

सद्दाम

नंतर कला क्षेत्रामधली काही शिल्पे

ए आर रेहमान ते पण ऑस्कर बरोबर

लाडका एम जे

कपिल दा जवाब नही !!

अँजेलीना जोली ( बघुन काळजात कळ उठली नाही , म्हन्जे "जमल नाही राव!!")

प्रख्यात गायिका सुब्बा लक्ष्मी

अजुन सुरुवात आहे ..पण खुप सुंदर प्रयत्न आहे ..अमिताभ, लता मंगेशकर, सचिन यांचे पुतळ्यांची उणीव भासली..

कलासंस्कृतीछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

आत्मशून्य's picture

27 Nov 2011 - 10:01 pm | आत्मशून्य

पंण अँजेलीना जोलीच्या पूतळ्यात ती मज्या नाही :( :( :( म्हणजे मेजरमेंट्सच चूकलेत हे त्याकडे नूसतं बघूनच सांगू शकतो.

अन्या दातार's picture

27 Nov 2011 - 9:40 pm | अन्या दातार

अण्णा सोडून बाकी कुणाचेच फटू दिसत नाहीयेत.

प्रचेतस's picture

27 Nov 2011 - 9:47 pm | प्रचेतस

अगदी.
अण्णांना भिऊन बाकीचे पुतळे पळून गेलेले दिसतात वाटते.

गणपा's picture

27 Nov 2011 - 9:48 pm | गणपा

लिंका दुरुस्त करतोय. जरा २ मिनिट धीर धरा.

प्रचेतस's picture

27 Nov 2011 - 9:56 pm | प्रचेतस

जबराह.
धन्स टू गणपा.
सगळेच पुतळे खूप चांगले आहे. पण अण्णा हजारे आणि कपिलदेव यांचे तर अगदीच जिवंत वाटतात.

बर्‍यापैकी एकून आहे या वॅक्स म्युझियम बद्दल.

स्तुत्य प्रयत्न.
पण अण्णा, कपीलपाजी आणि सुब्बा लक्ष्मी वगळता बाकीचे वास्तवा पासुन बरेच दुर आहेत.

सुहास झेले's picture

28 Nov 2011 - 6:17 am | सुहास झेले

ह्येच म्हणतो.....

किसन शिंदे's picture

27 Nov 2011 - 10:02 pm | किसन शिंदे

दिसले कि राव सगळेच फोटो...

त्या रस्त्याने बर्‍याचदा येतो जातो पण अजुन जायला जमलं नव्हतं, आता फोटो बघुन बघायला जाईन असं वाटतं नाहीये. ;)

अन्या दातार's picture

27 Nov 2011 - 10:36 pm | अन्या दातार

अण्णा, कपिलदेव आणि सुब्बुलक्ष्मी त्यातल्या त्यात चांगले वाटले,

शिल्पा ब's picture

28 Nov 2011 - 12:39 am | शिल्पा ब

हेच म्हणते.

मोहनराव's picture

27 Nov 2011 - 11:06 pm | मोहनराव

कप्या जमतय!!
अजुन फोटो येउदेत!!
पुलेशु!!

वाहीदा's picture

27 Nov 2011 - 11:33 pm | वाहीदा

चला आता त्या Madame Tussauds Museum सारखं वॅक्स म्युजीयम आमच्या कडे देखील आहे अन ते पण चक्क मुबई पुण्याच्या एवढं जवळ !

सुनील कांडलोर या केरळी युवकाचे करावे तेवढे कौतुक कमीच ... अण्णांच्या अन गांधीजींच्या चष्म्याच्या काचा तर अगदी जवळ जाऊन ही त्या वॅक्स च्या आहेत हे ओऴखणे कठीण होईल.
गायिका सुब्बा लक्ष्मी यांचा पुतळा सर्वात जास्त आवडला.

कपिलदेव (नाक एवढं फताडं नसतं तर आणखी चांगला दिसला असता) आणि सुब्बुलक्ष्मी (त्यातही त्यांचा हात वगळता) वगळता एकही पुतळा जमला नाहीय.
शिवाजी महाराज तर फ्रॅक्चर झाल्यामुळं दोन तलवारींच्या आधारानं चालत असल्यासारखे दिसत आहेत.

सॉरी!

कपिलमुनी's picture

28 Nov 2011 - 7:04 am | कपिलमुनी
पियुशा's picture

28 Nov 2011 - 9:24 am | पियुशा

मस्त आहेत फोटो
:)

मदनबाण's picture

28 Nov 2011 - 9:33 am | मदनबाण

अरे वा मस्त ! अण्णा तर सॉलिट्ट दिसत आहेत ! हल्ली टाईमवाले पण अण्णांकडे चक्कर टाकुन गेले आहेत म्हणे.
२७ डिसेंबर पासुन अण्णा परत उपोषण करणार आहे असे समजते...

प्रभाकर पेठकर's picture

28 Nov 2011 - 2:19 pm | प्रभाकर पेठकर

अँजोलिना जोलीच्या पुतळ्यात 'मजा' नाही.... सहमत. (त्यापेक्षा आपल्या राखी सावंतचा पुतळा बनवायला हवा होता.)
राजीव गांधींचा पुतळा 'निर्जिव' वाटतो.
बाकी सर्व पुतळे 'अप्रतिम' आहेत.

मादाम तुसाँचे म्युझियम तितकेसे आवडले नव्हते. तिथेही काही पुतळे चांगले आहेत (विशेषतः पाश्चिमात्यांचे) तर काही यथातथाच आहेत. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, सलमान खान, इंदिरा गांधी इत्यादींचे पुतळे अजिबात जमलेले नाहीत. सचिनचा, गांधीजींचा, बेनझीर भुत्तोचा पुतळा हे जमलेले आहेत.

जागु's picture

28 Nov 2011 - 2:24 pm | जागु

सुंदर फोटो मी पण दोन आठवड्यांपुर्वी कोकणातून येताना ह्या म्युझियमला भेट दिली. १ वर्ष आधीही दिली होती. आता जे आतमध्ये सेक्शन झाले आहे ते वाढवले आहे. पुर्वी नव्हते.

पाषाणभेद's picture

28 Nov 2011 - 3:20 pm | पाषाणभेद

कुणी काही म्हणो पण मला तर पहिल्या फोटोतला पुतळा फार आवडला. तिकट काढतांना दिलेले पैसे वसूल.
(१०० रुपये तिकीट म्हणजे जास्त वाटतात ब्वॉ. जत्रेत वाकडे चेहेरे दिसणारे आरसे, काहीतरी जुळ्यामुली आदी बघण्यासाठी पाच रू तिकीट लागते. :-) यांनी २५ /५० रुपये घेतले तर जास्त चांगले. अर्थात हा लोणावळ्याचा परिणाम आहे.)

तू पण ना पाभे..
पहिल्या फोटोत जिवंत माणसू आहे तो पुतळा नव्हे :-)
सुनील कांडलोर या माणसाचा तो नक्कीच फोटो आहे क्रमांक २ पासून पुतळे आहेत.
हो की नाही ओ कपिलमुनी ?

त्या कपल्यानं कुठं लिवलंय तसं मंग माझ्यावालं काय चुकलं?
कालच्याच की परवाच्या पेप्रात माजी मुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ यांच्या पुतळ्याचाही फोटो होता. तो दिसत नाही.

कपिलमुनी's picture

28 Nov 2011 - 6:31 pm | कपिलमुनी

पाभे ,
माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ ..

( बाकी मि पा वर त्यांना मुख्यमंत्री बनवल्यामुळे ते खुश असणार )

पैला फोटु टि़कीट काउंटरचा आहे... बिच्चारा लै आशेने बघत होता ..मग म्हणला "हो , खुश !! " आणि फोटु काढला ..

ऋषिकेश's picture

29 Nov 2011 - 4:40 pm | ऋषिकेश

इथले महात्मा गांधी आम्रिकेतल्या मादाम तुसॉमधल्यापेक्षा बरेच उजवे वाटले. कपिल देव आनि अण्णा तर ब्येष्ट जमले आहेत. एम्जे आणि सुब्बालक्ष्मी यांचेही पुतळे जिवंत वाटतात.

आता अँजेलिना नाहि जमली.. त्या विधात्यालाही तीच्यासारखी (मापे) परत बनवता नाहि आली तर तो वॅक्स पुतळा बनविणारा परत करा बनवेल! ;)

बाकी, पहिल्या फोटोतला माणूस खरा आहे ना? ;)

अत्रुप्त आत्मा's picture

29 Nov 2011 - 11:04 pm | अत्रुप्त आत्मा

फक्त अण्णा अणी गांधीबाबाच कमालीचे खरे वाटतायत...बाकीच्यांचा पुतळाच झालाय असे वाटते.. ;-)

पैसा's picture

29 Nov 2011 - 11:14 pm | पैसा

अण्णा जमलेत. कपिलदेवही बर्‍यापैकी. गांधीजी दिलिप प्रभावळकरच वाटतायत. डॉ. आंबेडकर आणि राजीव गांधी मात्र बाहुल्यांसारखे दिसतायत. रेहमान ठीक आहे. शिवरायांचं हे चित्र तिथे ठेवू नये. पाय फ्रॅक्चर झालेला माणूस काठी घेऊन चालतो तसं वाटतंय. अँजेलिना अजिबात नाही जमली. तसे तर तुसाँ च्या प्रदर्शनातले भारतीय लोकांचे पुतळे निदान चित्रात तरी हास्यास्पद वाटत होते.

याचा अर्थ दिलीप प्रभावळकरांनी गांधीजींची भूमिका इतकी छान वठविली आहे की गांधीजींच्या पुतळ्यात ही आता दिलीप प्रभावळकर झळकतात !
क्या बात हैं !

संजयशिवाजीरावगडगे's picture

30 Nov 2011 - 4:13 pm | संजयशिवाजीरावगडगे

खुपच सुंदर आहे !!

आदिजोशी's picture

5 Dec 2011 - 4:55 pm | आदिजोशी

भयानक आहेत पुतळे. चुकुनही भेट देणार नाही.