आपली तर काय लायकीच नाय
तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम
आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय !
आपली तर काय.....
.................तू McD चा pizza
.................आपण मैद्याचा पाव पण नाय !
.................आपली तर काय...
तू विशालकाय वडाचं झाड़
आपण लाजाळुचे पान पण नाय !
आपली तर काय....
.................तू Rehman चे "जय हो"
.................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय !
.................आपली तर काय....
तू अटलांटिक महा सागरातला "शार्क"
आपण गटारातला अमीबा पण नाय !
आपली तर काय.....
.................तू Rolls Royce ची कार
.................आपण nano चा nut पण नाय!
.................आपली तर काय....
तू I.I.T. ची इमारत
आपण Z.P. च्या बाकावर पण बसलो नाय !
आपली तर काय....
.................तू तिरुपतीचं संस्थान
.................आपण झाडाखालचा शेंदुर फासलेला दगड पण नाय!
.................आपली तर काय.....
तू ''मिसळपाव'' ची owner
आपला तर तिथे एक thread पण नाय !!
आपली तर काय लायकीच नाय..........
- Kale Pushpak (काळे पुष्पक)
१४ नोव्हेंबर २०११
प्रतिक्रिया
14 Nov 2011 - 2:23 pm | किसन शिंदे
=)) =)) =))
तू McD चा pizza
.................आपण मैद्याचा पाव पण नाय !
.................आपली तर काय...
हे तर भारीच.
.................तू Rehman चे "जय हो"
.................आपण प्रीतम चे चोरलेले गाणं पण नाय !
.................आपली तर काय....
अनं हे तर त्याहूनही भारी!
16 Nov 2011 - 10:31 am | पियुशा
जियो व.प्या जियो ;)
तु तर महान्..................कवी झालास रे ;)
ऑटोग्राफ आत्ताच देउन टाक बर्र.................;)
14 Nov 2011 - 2:27 pm | गवि
मज्जा... मस्त..
14 Nov 2011 - 2:38 pm | मन१
अशाच "टोन" मधली एक कविता http://belekar.blogspot.com/2009/05/blog-post.html इथे सापडेल.
"च्यायला आपली लायकीच नव्हती " हे त्यातलं पालुपद आणि "आपली तर काय लायकीच नाय" हे तुमचं.
दोन्ही फर्मास.
14 Nov 2011 - 2:42 pm | सूड
आवडल्या गेले आहे.
14 Nov 2011 - 2:51 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
वड्या लै भारी!!
तुमचे काव्य वाचले आणि वाटले, आपली तर काय...
14 Nov 2011 - 3:06 pm | वपाडाव
किसन, गवि, मन१, सुड व मिका या सर्वांचे आभार......
14 Nov 2011 - 3:14 pm | गणेशा
छान आहे !
आवडेश
14 Nov 2011 - 3:15 pm | मदनबाण
मस्त रे वड्या. ;)
14 Nov 2011 - 3:16 pm | मराठी_माणूस
मस्त
(अवांतर : तू I.I.T. ची इमारत ऐवजी तु संसदेची ईमारत कसे वाटते थोडेसे zp शि नाते सांगणारे)
14 Nov 2011 - 4:15 pm | वपाडाव
अॅक्चुअली, साहेब तसं लिहिण्यास हरकत नाही....
पण IIT व झेड.पीच्या शाळा यांच्यातील तफावत दाखवायची आहे ना त्यात.....
ते दोन्हीही आहेत सरकारचेच पण दोहोंत जमीन-अस्मानीचा फरक आहे....हे यातुन दाखवुन द्यायचे होते...
14 Nov 2011 - 3:19 pm | अन्या दातार
साक्षात्कार झालेला दिसतोय ;)
14 Nov 2011 - 4:15 pm | धन्या
भारी रे दादा...
एक तांत्रिक चुक आहे. पण तेव्हढं चालतं. ;)
14 Nov 2011 - 4:16 pm | वपाडाव
धनाजीराव, मराठी माणुस, गणेशा, अन्या व मदनबाण यांचेही आभार...
14 Nov 2011 - 4:26 pm | फिझा
जमलय !!! वडापाव !!! वपाडाव !!!
14 Nov 2011 - 5:11 pm | धन्या
जमलय म्हणजे काय?
14 Nov 2011 - 7:25 pm | सुहास..
जमलय म्हणजे काय? >>
चवकशीतज्ञ ! ;)
9 Dec 2011 - 6:56 pm | मी-सौरभ
दही जमलं असावं बहुतेक आनी ते पण चांदीच्या भांड्यात....
14 Nov 2011 - 5:17 pm | पैसा
मिसळपावची owner? तेवढं सोडलं तर मस्त! फक्त ही कोणा "पाशवी शक्ती"ला उद्देशून लिहिलेली कविता आहे हे समजलं, त्यामुळे माफ!!! ;)
14 Nov 2011 - 5:23 pm | वपाडाव
तो फक्त एक दाखला आहे हो.... ही कविता पुर्वी मराठी कविता ऑर्कुटवर प्रकाशित केलेली होती...
त्या अनुशंगाने लिहिले होते.... इथे मिसळपाव लिहिले... बाकी भावना त्याच.....
आमच्या तुच्छतेचा अन तिच्या भव्यतेचा दाखला देणार्या.....
14 Nov 2011 - 5:25 pm | दादा कोंडके
आम्हाला काही म्हणायला जागाच ठेवली नाही की! :D
14 Nov 2011 - 5:47 pm | स्मिता.
मस्त जमलीये कविता.
तू Rolls Royce ची कार
.................आपण nano चा nut पण नाय!
.................आपली तर काय....
हे सगळ्यात आवडलं.
14 Nov 2011 - 5:51 pm | वपाडाव
दादा अन स्मिता यांचे आभार.....
14 Nov 2011 - 6:10 pm | छोटा डॉन
च्यामारी ...
ह्या प्रकाराची आम्हाला खबरच नव्हती राव, काय भांजगड आहे नक्की ? ;)
बाकी कविता छानच.
- छोटा डॉन
14 Nov 2011 - 6:15 pm | सुहास झेले
हा हा हा ... सहीच !!
14 Nov 2011 - 6:17 pm | वाहीदा
हि ''मिसळपाव'' ची owner कोण रे ??
<<शोध-मोड ऑन>
निलकांत ला बहिण आहे का ? :?
बाय द वे वप्या, तुझे मिसळपाव वर बरेच थ्रेड आहेत हो
अवांतर -- शोध-मोड ऑफ लवकर होणे नाही ;-)
16 Nov 2011 - 9:25 am | वपाडाव
इथे बर्याच जणांचा गैरसमज होतो आहे.....
मी काहीही क्रिप्टिक लिहिलेलं नाहीये....
आणी कुणालाही बळंच उद्देशुनही लिहिलं नाही....
फक्त उच्च-नीचतेची तफावत दाखवण्यासाठी म्हणुन तो दाखला दिला आहे.....
त्यामुळे गैरसमज नसावा......
- (गोष्टी क्लियर करणारा) वपाडाव
छोटा डॉन, वाहिदा अन सुहास झेले यांचेही आभार.......
14 Nov 2011 - 7:16 pm | आत्मशून्य
असं कसं ? सगळं कळल की हो लोकांना....
14 Nov 2011 - 7:22 pm | रेवती
कवितेत दोन गोष्टींमधली तफावत चांगली दाखवली आहे.
कविता आवडली फक्त "तू ''मिसळपाव'' ची owner" पाशी येऊन जरा अडतय.;)
14 Nov 2011 - 7:23 pm | मोहनराव
लई भारी वपाडाव!!
14 Nov 2011 - 7:30 pm | पूनम ब
एकदम मस्त !! :)
14 Nov 2011 - 7:35 pm | जयवी
मस्त मस्त .... :)
14 Nov 2011 - 8:44 pm | नगरीनिरंजन
हा हा. ढकलपत्र ष्टाईल कविता. गमतीदार.
14 Nov 2011 - 10:49 pm | नावातकायआहे
सही जमलेय!
14 Nov 2011 - 11:04 pm | Nile
कविता आवडली. पण फार लहान वाटली. अजून दोनचार कडवी घालून अजून मजेदार करता येईल.
तू काय सोनियाचा जावई
आम्ही तर संघात पण नाय
;-)
15 Nov 2011 - 9:38 am | वपाडाव
नाइलने सांगितल्याप्रमाणे अजुन तुम्ही लोक एकेक कडवं प्रतिसादांत डकवत चला....
15 Nov 2011 - 3:09 pm | दादा कोंडके
तू काय अॅप्पल चा आयफोन,
आपण तर काय नोकिया ३३५० पन नाय.. :)
16 Nov 2011 - 1:24 am | Nile
३३१० रे. ३३५० नंतरचा.
16 Nov 2011 - 2:09 am | दादा कोंडके
वलकला! आक्षी बराबर! :)
15 Nov 2011 - 12:32 am | विदेश
तू जोड्यांचे ब्रांडेड शो रूम
आपण फलाटावरील चांभाराचे चवाळे पण नाय !
आपली तर काय.....
षटकारानेच सुरुवात केली .. पुढे तर चौफेर फटकेबाजी ! मजा आली वाचताना .
15 Nov 2011 - 1:41 am | पाषाणभेद
प्रस्तूत कवितेवर प्रतिसाद देण्याची
आपली तर काय लायकीच नाय
:-)
15 Nov 2011 - 9:40 am | वपाडाव
पाभे, विदेश, नाइल, ननि, नावातकाय, रेवतीजी, पुनम ब, मोहनराव, आत्मशुन्य, जयवी
आपणा सर्वांचे आभार......
15 Nov 2011 - 10:48 am | प्रभाकर पेठकर
तू कविवर्य एवढा मोठ्ठा
आपली तर कुठे चारोळी पण नाय
आपली तर काय......
15 Nov 2011 - 10:53 am | michmadhura
मजा आली वाचताना. मस्त आहे कविता.
15 Nov 2011 - 10:55 am | सोत्रि
ह्याचा शब्दश: अर्थ घेतला आणि तुझा आकार आठवला, कसली चपखल बसतेय ही उपमा असे वाटून खदाखदा हसू आले.
:lol: :) :lol:
- ('पाताळविजयं'मधील राक्षसासारखा खदाखदा हसणारा) सोकाजी
अवांतर: बाकी कविता मस्त जमलीय, फक्कड!
15 Nov 2011 - 12:24 pm | lakhu risbud
झक्क कविता,वाचून तुला पण अशीच एखादी लायकी नसणारी भेटती का बघ.
तू विशालकाय वडाचं झाड़, आपण लाजाळुचे पान पण नाय !
बाकी
विशालकाय वडाच झाड ऐवजी एखाद्या शोभेच्या फुलाची उपमा कशी वाटते ?
15 Nov 2011 - 1:02 pm | प्रचेतस
मस्त रे वप्या.
मजा आली वाचून.
अजून अशा भन्नाट कविता येउंदेत.
15 Nov 2011 - 1:22 pm | मृत्युन्जय
हि ''मिसळपाव'' ची owner कोण रे ??
15 Nov 2011 - 1:23 pm | किचेन
तू McD चा pizza
बरोबरच आहे
मक डी = बर्गर +फ्रेंच फ्राईज +कोक
पिझ्झा मिळतो का मक-डित.
खर तर तुम्हि एव्ध सगळ लिहिलय
आप्लि तर बोलायचि पण लायकि नाय? :(
15 Nov 2011 - 3:38 pm | स्मिता.
हाच प्रश्न मलाही पडला होता बरं का वापाडाव!
मॅक डी त पिझ्झा नाही ना मिळत... ते मॅकडीचा बर्गर किंवा डॉमिनोजचा पिझ्झा असं करा जमलं तर.
15 Nov 2011 - 4:23 pm | वपाडाव
McPizza – McDonald's has also attempted pizza at various times, with an apple-pie–like McPizza and more conventional McDonald's Pizza. A line of personal-sized pizzas was first seen in the late 1970s in test-market stores near interstate highways around Milwaukee and Madison. In Canada (c. 1992–1999), the pizza originally began as a family-sized pizza that was brought out to the table by an employee and placed on a raised rack in the centre of the table. Later it was scaled down to a personal-sized pizza. However, variations have found their way into some international markets such as India (the pie-like "Pizza McPuff"). McDonald's also test marketed a 14-inch, round, traditional-style pizza in Evansville, Indiana, and nearby Owensboro, Kentucky, in 1989.[23] By 1991, the McDonald's test markets for pizza had grown to over 500 McDonald's locations before the pizza test was placed on hold.[24] Pizza is still sold at one McDonald's location in Orlando, Florida.
येथुन साभार....
15 Nov 2011 - 5:12 pm | किचेन
माहितीबद्दल धन्यवाद!
पुढच्या बारीला मक दि ला गेलात कि आमच्यासाठी पण आणा पिझ्झा! ;)
15 Nov 2011 - 6:11 pm | धन्या
च्यायला, हे कधी झालं... आम्ही आपलं उगाच डॉलर वन मेनू खात दिड वर्ष काढलं तिकडे. आधी माहिती असतं तर पिझ्झाही खाल्ला असता ना राव. ;)
15 Nov 2011 - 6:15 pm | वपाडाव
अहो सोबतच चला, कट्टा मॅकडीला करु.....तुमची अव्हेलिबिलिटी सांगा.....सगळ्या मिपाकरांना बोलवुन धुमाकुळ घालु.....
15 Nov 2011 - 6:43 pm | आत्मशून्य
मकडी व्यावसाइक आहे पैका मिल्तो म्हंल्याव पिझ्झाज काय उद्या वडापावही विकायला सूरूवात करतील ते. बाकी मक्-डीचा पिझ्झ्या परोबर ते यकदम मस्त सॅलड सोरी सलाड द्यायचे एकदम टेश्टी....
15 Nov 2011 - 1:28 pm | स्पा
=))
=))
=))
भारी
15 Nov 2011 - 2:10 pm | वपाडाव
प्रभाकर पेठकर, स्पा, किचेन, वल्ली, सोकाजी, मिचमधुरा, लखु यांचे आभार......
मृत्युंजय यांच्या प्रश्नाचे उत्तर = http://www.misalpav.com/node/19741#comment-352254
15 Nov 2011 - 2:40 pm | ५० फक्त
छान रे मस्त झालीय कविता, आता उत्तरार्ध का काय तो येउ दे.
15 Nov 2011 - 4:26 pm | मेघवेडा
हा हा! डब्बलबारी लावल्यासारखा वाटला माहिताय, पुष्पकबुवा काल्यानुं!
सगळ्याच बार्या मस्त हसवून गेल्या पण चोरलेलं गाण, नॅनोचा नट बेष्टच! लगे रहो भिडू!
15 Nov 2011 - 4:34 pm | बिपिन कार्यकर्ते
एक कविता म्हणून वाचताना मज्जा आली! ;)
15 Nov 2011 - 5:27 pm | वपाडाव
बिपिनदा, मेघवेडा अन ५० राव आपले आभार........
15 Nov 2011 - 6:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त मजा आली. :)
-दिलीप बिरुटे
16 Nov 2011 - 4:34 am | आत्मशून्य
म्हणजे एखादा विशीष्ठ प्रसंग डायलॉग वगैरे... ? Coz, I strongly doubt , which one is it... ;)
16 Nov 2011 - 10:49 am | प्यारे१
भन्नाट रे वप्या,
कल्ला कविता.
तू कातीव संगमरवराची मूर्ती
आपण इटकुराचा तुकडा पण नाय..
आपली तर काय....!
तू निवळ निळेशार पाणी,
आपण ओढ्याचा ओहोळ पण नाय...
आपली तर काय....!
तू हिरवीगार पावसाळी मखमल,
आपण तर ग्रीष्मातली कोरडी पानगळ पण नाय ...
आपली तर काय....!
तू अव्यक्ताची व्यक्त जाणीव,
आपण तर मर्तिकातलं मडकं पण नाय....
आपली तर काय लायकीच नाय.
16 Nov 2011 - 11:38 am | वपाडाव
बिरुटे सर, पियुशा व प्यारे यांचे आभार.....
18 Nov 2011 - 11:50 am | डावखुरा
तु झण्झणीत मिसळ्पाव पण मी तर मुंबईची शान..मी हाय वडापाव....
जियो वडापाव...मस्त रचना....
18 Nov 2011 - 12:17 pm | वपाडाव
च्यामारी... हे तर सुचलंच नाही की.....
लाय भारी हो लिंकशांडर..... आवड्या.....
धन्यवाद....
20 Nov 2011 - 12:39 pm | नंदन
झकास जमलीय कविता, मजा आली.
बेश्ट!
9 Dec 2011 - 7:02 pm | मी-सौरभ
तू JD चा खंबा
आपण पावशेर ची पिवशीपण नाय !
आपली तर काय.....
22 Jun 2016 - 3:06 pm | नया है वह
मस्त मजा आली....
22 Jun 2016 - 10:05 pm | जव्हेरगंज
लय जबरी लिहीयंल!!
कडक!!!
23 Jun 2016 - 8:49 am | रातराणी
+१
23 Jun 2016 - 9:11 am | नाखु
माणसात होता तेंव्हा असंही लिहायचा आणि नंतर त्याचा उच्चभ्रू झाला.
हे काव्य मस्त आहे.
वप्या तू तर जाणता खिलाडी मैदानावरचा !
आपण दुकानाबाहेरचा बघ्या (प्रेक्षक) पण नाय
आपली तर काय....