नासिक लेणी (पांडवलेणी): भाग २

प्रचेतस's picture
प्रचेतस in कलादालन
2 Nov 2011 - 10:49 pm

प्राचीन भारतः नासिक लेणी (पांडवलेणी) भाग १ येथे पहावा.

नासिक लेण्यांतील महत्वाची अशी सातवाहनांची देवीलेणी आणि क्षत्रपांचा नहपान विहार सुरुवातीला पाहून मग इथल्या चैत्यगृहाकडे निघालो.
महाराष्ट्रातील इतर लेण्यांप्रमाणेच इथेही एकमेव चैत्यगृह आणि बाकीचे विहार अशी रचना. पिंपळपानाकृती कमान हे सर्वच चैत्यगृहांचे वैशिष्ट्य. गौतम बुद्धाला गयेत अश्वस्थ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक म्हणून ही रचना कोरली जाते.
इथल्या चैत्यगृहाच्या प्रवेशद्वारावर ही कमान एकावर एक अशी दुहेरी स्वरूपात कोरलेली आहे. फुलाफुलांचे अतिशय नाजूक असे नक्षिकाम, त्यावर बौद्धांचे त्रिरत्न चिन्ह व त्याभोवतीने हत्ती, घोडे इ. प्राणी मोठ्या खुबीने कोरलेले आहेत.
चैत्यगृहावर नेहमीप्रमाणेच कोरलेले यक्ष, गवाक्षांनी केलेला त्रिमितीय आभास, स्तूपांची रचना हे सर्व आहेतच.
चैत्यगृहापाशीच एक शिलालेख आहे.

रञोअमस अरहलयस चालिसलनकस दुहुतुया महाहकुसि-
रिया भतपालिकाया रञोअमस अगियतनकस भदकरिका-
यासा भारिया कपननकमातुय चेतियघरम पावते-
तिरुन्हुमी निठपपित

याचा अर्थ
राजअमात्य चालिसलनाकाची पुत्री, अग्नित्राण भदकरिकाची पत्नी आणि कपननकाची माता महाहकुश्री भट्टपालिकेने हे चैत्यगृह त्रिरश्मी पर्वतावर स्थापित केले आहे.

भट्टपालिका ही नाणेघाटात उल्लेख आलेल्या नागनिकेचा मुलगा महाहकुश्री याची नात असे मानले जाते. याचा अर्थ हे चैत्यगृह क्षत्रप व गौतमीपुत्राच्या आधीचे.

चैत्यगृहात १६ सालंकृत खांबावर तोलले गेलेले गजपृष्ठाकृती छत, मधोमध वाटोळा गुळगुळीत स्तूप, स्तूपाची हर्मिका. इथे छताला लाकडी फासळ्या शिल्लक नाहीत पण त्यांच्या खाचा त्यांचे पूर्वीचे अस्तित्व दाखवतात. खांबांवरही काही शिलालेख कोरलेले आहेत.

१. चैत्यगृहाचे मुखदर्शन

२. पिंपळपानाकृती कमान व वरील स्तूप-गवाक्षांची रचना

३. कमानीवरील सुरेख ऩक्षीकाम

४.स्तंभांसहीत असलेला स्तूप

यानंतरचा एक मोठा विहार यज्ञविहार म्हणून ओळखला जातो, इथे यज्ञश्री सातकर्णीचा शिलालेख आहे. हा विहार अतिशय प्रशस्त असून आतमध्ये गर्भगृह खोदलेले आहे तिथे भगवान बुद्धाची भव्य बैठी मूर्ती आहे. स्तंभांवर नाजूक नक्षीकाम.

५. यज्ञ विहार

६. यज्ञविहारातील सिंहासनारूढ बुद्धमूर्ती

७. यज्ञविहारातील सालंकृत स्तंभ

यांनतरचे जवळजवळ प्रत्येक दालन विविध शिल्पांनी भरलेले आहे. दुमजली विहार, कधी मधूनच जैन कला तीर्थंकरांच्या मूर्तींसह भेटीस येते तर कधी बुद्धाच्या विविध प्रतिमा त्यांच्या अनुयायांसह कोरलेल्या दिसतात. काही सिंहासनारूढ, पद्मपाणी, शयनआसनावर आरूढ झालेल्या ह्या बुद्धांच्या चेहर्‍यावरील भावही बदलणारे, कधी शांत, कधी ध्यानस्थ योग्याचा भाव, काही ठिकाणी अर्धोन्मिलित भाव तर काही ठिकाणी प्रसन्न मुद्रा. त्यांच्या भोवती नाग, अश्व, इ. प्रतिमा, बाजूला चामर ढाळणारे सेवक, अवकाशातून पुष्पमाला घेउन आलेले गंधर्व अशी विविध शिल्पे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.

८. दुमजली विहार

९. विहार

१०. विहार

११. लेणीमार्ग

१२. विविध भावमुद्रेतील बुद्धमूर्ती

१३.

१४.

१५.

१६.

या सर्व शिल्पांच्या बरोबरीने ब्राह्मी लिपीतले लेखही आपल्याला दिसत असतात.
त्यापैकी काही लेखांची थोडक्यात माहिती देतो.

सिधम सकस दमचिकस लेखकस वुधिकस
विण्हुदतपुतस दसपुरावथस लेणम पोढियो-
चा दो अतो एक पोढि या अपरा--सा मि माता
पितरो उदिसा

शक दमचिकाचा लेखक आणि दशपुराचा रहिवासी विष्णुदत्ताचा पुत्र वुधिकाने एक लेणे आणि दोन पाण्याची टाकी पैकी एक आपल्या माता पितरांसाठी (भेट)दिले आहे

लेणी शब्दाचे प्राचीनत्व इथे दिसून येते. पोढि म्हणजे पाण्याची टाकी त्याचाच अपभ्रंश होऊन (पाण)पोई असा आजचा शब्द रूढ झाला. लेखक ह्या शब्दाचा उल्लेखही येथे महत्वाचा आहे.

अजून एका शिलालेखात यवनांचा पण उल्लेख आला आहे.

सिधम उतरहासा दमतमितियकस योनकस धम्मदेवपुतस इदग्निदतस धम्मतमा
इमा लेणम पावते तिरण्हुमी खनितम अभमतरम च लेणस चेतियघरो पोढियो च मातापि-
तरो उदिस इमा लेणम सवबुधपुजय चतुदिसा भिक्खुसंघसा नियतितम
सह पुतेना धम्मरक्सिता

उत्तरेतील दंतमित्रीचा रहिवासी, धर्मदेवाचा पुत्र, यवन इंद्राग्निदत्त याने त्रिरश्मी पर्वतावरील एका चैत्यगृहानजीकच्या लेण्यात माता पितरांच्या स्मरणार्थ पाण्याची टाकी खोदलेली आहेत. आणि हे लेणे सर्व बौद्धांच्या पुजेसाठी चार दिशांनी आलेले बौद्धसंघां आणि त्याचा पुत्र धर्मरक्षित याने एकत्रितरित्या बांधले आहे.

यवन म्हणजे ग्रीक लोक. इथे येउन स्थायिक झालेल्या यवनांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता हे यावरून सिद्ध होते.

अजूनही असे दातृत्वाचे बरेच शिलालेख या ठिकाणी आहेत.

१७. एक शिलालेख.

शेवटच्या २४ व्या क्रमांकाच्या लेण्यात एका घुबडाचे शिल्प कोरलेले आहे. घुबड आपल्याकडे अपवित्र मानले जाते पण ग्रीकांमधे घुबड देवस्वरूप. ग्रीक उपदेवता अथेनाचे हे शिल्प त्याकाळच्या संस्कृतीवर असलेल्या ग्रीक प्रभावाचेच हे द्योतक.

१८. पांडवलेणीतून होणारे नासिकचे विहंगम दर्शन

एकूण २४ लेण्यांची ही माळ शिलालेखांनी, शिल्पांनी, देखण्या ऩक्षीकामाने सालंकृत झालेली आहे. सातवाहन, क्षत्रप, परत सातवाहन परत क्षत्रप अशी विविध स्थित्यंतरे या लेणीने पाहिली आहेत पण एकानेही दुसर्‍याचे बांधकाम उद्धस्त केले नाही. सातवाहन वैदिक, नहपानाच्या काळातील धर्मविहिन क्षत्रप आणि लेणी मात्र बौद्ध, जैन. सुरुवातीची हिनयान आणि नंतरची महायान. अशा विविध संस्कृतींचा संगम असलेली पांडवलेणी त्यांच्या अद्भूत शिल्पकलेसाठी बघायलाच हवीत.

संस्कृतीइतिहास

प्रतिक्रिया

विलासराव's picture

2 Nov 2011 - 10:58 pm | विलासराव

मस्त.

धन्या's picture

2 Nov 2011 - 11:38 pm | धन्या

मालक,

एकदम जबरा. मस्त अभ्यासपुर्ण लेख. कधीतरी आम्हालाही घेऊन चला हो. खुप इच्छा आहे पांडवलेणी पाहायची :)

सोत्रि's picture

2 Nov 2011 - 11:53 pm | सोत्रि

कधी जायचे बोला?

- (प्राचिन कलेत रूचि असणारा) सोकाजी

नुसतं पहायला एवढं सुंदर वाटतंय तर जे खोदलंय त्याचा अर्थ उलगडून सांगणारा कुणी असेल तर किती मजा येत असेल.
(एरव्ही आम्ही वेरूळ अजिंठ्याला कैकवेळा गेलो.. पण काय उपयोग :( )
वल्लींचा या विषयातला बराच अभ्यास दिसतोय.
धन्यवाद वल्ली.

स्पा's picture

3 Nov 2011 - 9:45 am | स्पा

नुसतं पहायला एवढं सुंदर वाटतंय तर जे खोदलंय त्याचा अर्थ उलगडून सांगणारा कुणी असेल तर किती मजा येत असेल.

+१

इथे यज्ञश्री सातकर्णीचा शिलालेख

याबद्दल अधिक माहिती वाचायला आवडेल.. हे लोक काय यज्ञ करायचे का?

बाकी सगळे फटू उत्तम आलेले आहेत .. वातावरण पण मस्त वाटतंय

प्रचेतस's picture

3 Nov 2011 - 9:50 am | प्रचेतस

सातवाहन वैदिक धर्माचे कट्टर अनुयायी असल्याने यज्ञयागादी क्रियांना प्राधान्य असे. नाणेघाटातील शिलालेखांत सातवाहनांनी केलेल्या अनेक यज्ञांचे व त्यातील दानांचे वर्णन आहे. सर्वात महत्वाच्या असा दोन अश्वमेध व एका राजसूय यज्ञाचा उल्लेख त्यात आलेला आहे.

गौतमीपुत्राच्या काळात यज्ञप्रथा चालू होती की नाही याचे पुरावे मिळत नाहीत पण तो वैदिक धर्माचा कट्टर अनुयायी असल्याने त्याच्या काळातही यज्ञ चालूच असावेत.

सातवाहनांची यज्ञश्री, वेदिश्री, स्कंदश्री आदी नावे त्यांची यज्ञसंस्कृतीच दर्शवतात.

स्पा's picture

3 Nov 2011 - 9:52 am | स्पा

धन्स रे :)

मराठी_माणूस's picture

3 Nov 2011 - 10:06 am | मराठी_माणूस

नासिक नव्हे नाशिक

मराठी_माणूस's picture

3 Nov 2011 - 10:56 am | मराठी_माणूस

कालौघात त्याचे नाशिक असे रूपही प्रचलित झाले.

नाशिक हेच नाव सर्वत्र वापरले जाते . जसे पैठण चे पुर्वीचे नाव प्रतिष्टान होते पण आता पैठण हेच रुढ आहे.

जसे पैठण चे पुर्वीचे नाव प्रतिष्टान होते पण आता पैठण हेच रुढ आहे.

तुम्हाला 'प्रतिष्ठान' असे म्हणावयाचे आहे काय? ;)

मराठी_माणूस's picture

3 Nov 2011 - 11:17 am | मराठी_माणूस

हो, प्रतिष्ठान म्हणायचे आहे.

किसन शिंदे's picture

3 Nov 2011 - 10:11 am | किसन शिंदे

सह्हीच रे वल्ली!!

हाही भाग तितकाच खास.. जियो वल्ली..

"ञ" वगैरे ऑब्सोलीट अक्षरांचा उपयोग असलेला शिलालेख वाचताना खूप वेगळं मजेशीर वाटलं.

नाशिक शहरही बरंच विस्तारलेलं दिसतंय शेवटच्या फोटोत. वेगवेगळ्या शहरांचे असे बर्ड आय व्ह्यू सुद्धा खूप मस्त वाटतात.. जणू शहराचा चेहरा दिसतो.

सुहास झेले's picture

3 Nov 2011 - 10:39 am | सुहास झेले

सही... लवकरचं भेट देईन इथे.

धन्स वल्ली ही माहिती सांगितल्याबद्दल.... :) :)

लय भारी मालक, जाउच एकदा, जरा दोन्हि टेकायला मिळु दे मग पुन्हा सुरु करु फिरणं.

महत्वपूर्ण माहिती आणि झकास फोटु. :)
मी नाशकात गेलो होतो तेव्हा सीता गुंफा पाहिली होती,त्याची आठवण आली.

पैसा's picture

3 Nov 2011 - 1:52 pm | पैसा

फोटो आणि माहिती सुपर्ब!

वपाडाव's picture

3 Nov 2011 - 2:36 pm | वपाडाव

झक्क....

मी-सौरभ's picture

3 Nov 2011 - 4:54 pm | मी-सौरभ

आता तुला घेऊन 'भाजे'ला तरी जायला पाहिजेच !!

कौन्तेय's picture

3 Nov 2011 - 7:02 pm | कौन्तेय

वल्लीराजे - त्रिवार मुजरा!
नेमके शब्द, नेमकी चित्रं नि नेमकी माहिती. कुठेही काहीही पसरट नाही.
नमुनेदार सादरीकरण -

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2011 - 7:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वल्ली सेठ, हाही भाग सुंदर झालाय....!

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

11 Nov 2011 - 1:51 am | चित्रा

हा भागही सुंदर आहे.

पाषाणभेद's picture

11 Nov 2011 - 2:46 am | पाषाणभेद

सुंदर अन अभ्यासपुर्ण लेखन. आपल्या अभ्यासूवृत्तीचे कौतूक करावे तेवढे थोडेच आहे.

चित्रा's picture

11 Nov 2011 - 3:38 am | चित्रा

तुर्कस्तानातील लिशीया Lycia ( येथील शवे ठेवण्याच्या पेट्या/कबरी (sarcophagus) या साधारण अशाच दिसतात. वरील पिंपळपानाच्या उल्लेखाबद्दल अधिक शोध घेत असताना ही माहिती हाती लागली.

http://en.wikipedia.org/wiki/File:Tomb_of_Payava_1.jpg

किंवा
हा दुवा

जरूर पहावा.

यावरून थोडी रोचक माहिती इथे मिळाली. http://www.kamit.jp/07_lycia/liki_eng.htm

हे स्तूप बरेचदा अशा प्रकारे डोंगरातच का असतात? याचा शोध घेतला असता पर्शियातील राजांच्या कबरी अशा प्रकारे दगडातच आहेत. त्याचप्रमाणे लिशियातही असेच दिसून येते.

लिशिया कबरी

पर्शिया कबरी

महत्त्वाचा प्रश्नः
केवळ बौद्ध स्तूपांबाबतीत असा पगडा आहे का? (यवन म्हणजे नक्की कोण होते?)

उत्तम माहिती.
पिंपळपानाकृती कमान म्हणजे बुद्धाला गयेमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक आहे.
महाराष्ट्रातील स्तूप हे बहुतांशी़ डोंगरात आहेत. त्यांना शैलगृह असेही म्हटले जाते. सांची, सारनाथ, अमरावती(आंध्र) इ. स्तूप हे जमिनीवर आहेत व बांधीव आहेत.
महाराष्ट्रात जमिनीहीवरही स्तूपांचे अवशेष सापडले आहेत. नालासोपारा येथे आजही विटांनी बांधलेल्या स्तूपाचे अवशेष आहेत. पैठण, तेर येथेही बांधीव स्तूप उत्खननात सापडले आहेत.
बौद्ध भिक्खूंनी शांतपणे ध्यानधारणा करता यावी म्हणूनही खोदीव स्तूप डोंगरांमध्ये करण्यात आले.

यवन म्हणजे ग्रीक. तिथल्या आयोनिया प्रांतातून ते आले. त्यांना आयोनियन म्हणायचे, पुढे त्याचे योनिय, योन, यवन अशी रूपे प्रचलित झाली. इथे स्थायिक झालेल्या यवनांनी नंतर बौद्ध धर्म स्वीकारल्याचे शिलालेखांमुळे दिसून येते.

चित्रा's picture

11 Nov 2011 - 6:33 pm | चित्रा

पिंपळपानाकृती कमान म्हणजे बुद्धाला गयेमध्ये पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले त्याचे प्रतिक आहे.

असे मला वाटत नाही, असे मी सांगत आहे! मला (वर दिलेल्या उदाहरणांवरून असे) वाटते की हे आकार पूर्वीपासून प्रचलित होते - ते लिशियातही तसेच होते आणि भारतातही तसेच आले. वरील शैलगृहाचे मुखदर्शन आणि लिशियातील त्या दगडी कबरीच्या मुखदर्शन यात खूप साम्य आहे असे मला वाटते. (हेच एका दुव्यातही दिसते आहे).

आपल्याकडे अमूक गोष्ट हे याचे प्रतिक आहे, तमूक त्याचे असे भरपूर सांगितले जाते. (तुम्हाला म्हणत नाही, पुस्तकांतूनही सांगितलेले दिसते). परंतु नीट पाहिल्यास हे आकार पूर्वीपासून प्रचलित होते असे वाटते.
यावरून मी जालीय अर्धवट संशोधन केले आहे! त्यातून जे काही मिळाले ते लेखस्वरूपात इथे टाकते.

बौद्ध भिक्खूंनी शांतपणे ध्यानधारणा करता यावी म्हणूनही खोदीव स्तूप डोंगरांमध्ये करण्यात आले.
हेही तितकेसे खरे नाही. स्तूप हे बौद्ध अवशेषांवर केले आहेत. त्यांच्याबाजूचे विहार यासाठी नक्कीच आहेत (ध्यान, भिक्खूंची राहण्याची व्यवस्था), पण मूळ स्तूप म्हणजे अवशेषांवर तयार केलेले दगडांचे ढीग होते. ह्यांची काळजी घेण्यासाठी भिक्खूंना विहार केले होते, नंतर अर्थात ती तीर्थस्थाने झाली असावीत (जसे कार्ले).

स्तूपाचे अर्थ असे सर्व दिले आहेतः संदर्भः http://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/cgi-bin/tamil/recherche

a knot or tuft of hair , the upper part of the head , crest , top , summit any relic-shrine or relic-casket (made of various materials , such as terra cotta , clay , elaborately formed brick or carved stone ; often very small and portable , and enclosing a fragment of bone or a hair of some saint or deceased relative , or inscribed with a sacred formula ; these are carried long distances and deposited in hallowed spots such as Buddha-Gaya1) ; any heap , pile , mound , tope. ; the main beam (of a house)

बाकी यवन म्हणजे आयोनिया प्रांतातील हे बरोबर, सध्याचे तुर्कस्तान, लिशिया आणि आयोनिया हे सर्व सारखेच. त्यावरूनही ही पिंपळपानाची रचना नसून यवनी शवपेटिकांवर आधारित रचना आहे असे म्हणणे योग्य ठरेल असे वाटते.