गविंनी खादाडी पोस्टचा सपाटा लावल्याने, त्यात अजुन एक भर.... ;)
मुंबई पश्चिम उपनगरात मराठमोळी खाण्याची ठिकाणे हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच... त्यात आणखी एक भर म्हणजे हे हॉटेल. पाच तरुण मराठी मुलांनी एकत्र येऊन केलेला हा प्रयत्न. हॉटेलचं नाव हे या पाच मुलांच्या नावाच्या आद्याक्षारांपासून बनले आहे.... रस्सा...!! मराठमोळी मेजवानी
चारकोप, कांदिवली (पश्चिम) येथे.. PF ऑफिसच्या बाजूला हे छोटेखानी हॉटेल आहे. शाकाहारी आणि मांसाहारी, असं दोन्ही प्रकारचं उत्तम जेवण इथे मिळतं. चिकन थाळी, सुरमई थाळी, वांग्याचे भरीत, झुणका निव्वळ अफलातून...
इथे पदार्थांचे खूप कमी फोटो दिले आहेत... पण..पण खरंच लक्षातच राहत नाही फोटो काढायचं, जेवण आलं की नुसतं तुटून पडायचं इतकंच माहिती .. शेवटी एक नंबरचा खादाडखौ ;)
चिकन थाळी.. :)
भाकरी आणि वांग्याचं भरीत... :)
रस्सा !!
एकदा जरूर भेट द्या... :) :)
प्रतिक्रिया
31 Oct 2011 - 3:26 pm | गवि
वा.. तातडीने जायला पाहिजे.. धन्यवाद.. यासाठीच धागे काढतोय की आपापल्या माहितीतली ठिकाणं सर्वांना माहिती होतील. त्याचा बराच उपयोग होतो.
उदाहरणार्थः आता कांदिवलीला गेलो की उगीच कुठेतरी दिसेल तिथे उत्तप्पा खाण्याऐवजी इथे जाईन आणि अधिक आनंद मिळवीन.
31 Oct 2011 - 6:43 pm | निवेदिता-ताई
सुंदरच...:)
31 Oct 2011 - 7:30 pm | रेवती
गविंनी सुरुवात करून दिलिये आणि त्या माळेतले पुढले पुष्प आहे.;)
31 Oct 2011 - 9:07 pm | Mrunalini
वा.... काय मस्त आहे हे.....
31 Oct 2011 - 11:25 pm | मी-सौरभ
जागा दिसायला पण भारी वाटली ;)
1 Nov 2011 - 4:10 pm | कच्ची कैरी
अरे व्वा !!मस्तच आहे रस्सा !सध्या मुंबईत नसल्याची खंत वाटतेय :(
5 Nov 2011 - 2:35 pm | सुहास झेले
रस्सा मारके.... :) :)
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/10614529.cms
6 Nov 2011 - 1:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
-दिलीप बिरुटे
6 Nov 2011 - 4:27 pm | मदनबाण
मस्त रे...
रस्सा चापल्या नंतर पोटु इतके भरत असेल की, त्यानंतर मस्त ताणुन द्यावी वाटत असेल...आणि त्यासाठी खाटांची सोय केलेली दिसतेय ! ;)