आजच एक स्नेह्यांकडून हे खालील निमंत्रण मिळाले. मराठी विज्ञान परिषदेकडून आलेले असल्याने मराठी बाण्यावाल्या आपल्या मिपाकरांना हे पाठवत आहे. जर अधिक माहिती साठी तुम्हाला निमंत्रण पत्रिका (पीडीएफ) हवी असेल तर मला खरडीवर/व्यनिने कळवा आणि मी तो संदेश आपल्या पत्त्यावर ढकलून देईन.
----आलेला निरोप येथे सुरु-----
नमस्कार,
४६ व्या अ. भा. विज्ञान अधिवेशनाचे निमंत्रण सोबत पाठवत आहे.
आपण या कार्यक्रमास जरुर यावे.
आपल्याला शक्य असेल तर पुर्णवेळ प्रतिनिधी म्हणून नोंदणी करावी ही विनंती.
-विनय र. र. (९४२२०४८९६७)
कार्याध्यक्ष
मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030
----निरोप समाप्त ----
सरपंचांना विनंती - असे निमंत्रण पाठवणे हे मिपाच्या धोरणाच्या विरुद्ध आहे का नाही हे महित नाही. तसे असल्यास क्षमस्व. या अधिवेशनाशी मझ्या वैयक्तिक काहिही संबंध नाही वा इथे जाहिरातबाजी करण्याचाही उद्देश नाही.
प्रतिक्रिया
26 Oct 2011 - 11:56 am | धमाल मुलगा
भास्करराव,
मला नाही वाटत हे निमंत्रण धाडणे नियमबाह्य आहे असं. तुम्ही हाच धागा संपादित करुन त्यामध्ये पिडिफचा दुवा / चित्र/ तपशील मजकूर द्याल तर अधिक उत्तम होईल.
बर्याचवेळा होतं असं की, खूपसे असे लोक असतात जे मिपावर लॉगिन करत नाहीत, पण वाचक मात्र नियमीत असतात. धाग्यातच तपशील दिला तर ही माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल.
आपला,
ध. :)
26 Oct 2011 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धमालशी सहमत...!
-दिलीप बिरुटे
26 Oct 2011 - 9:22 pm | भास्कर केन्डे
अरे धमु, त्या निमंत्रणाच्या मेलात त्यांनी ते पिडिएफ डकवून पठवलेलं आहे. त्यांच्या मुंबई आणि पुणे विभागाच्या संकेतस्थळांवर सुद्धा याची महिती नाहिये. मात्र त्यांचा ईमेल पत्ता mavipa.pune@gmail.com निमंत्रणात आहे. त्यावर इमेल करुन जाण्याचे नक्की करता येईल. तसेच भ्रमणध्वनी क्र सुद्धा दिलेले आहेत ते खाली देत आहे.
विनय र. र. - 9422048967 आणि संजय भामरे - 9552526909
तसेच त्यांना निरोप पण टकला आहे. बघू या काय उत्तर देतात ते.
27 Oct 2011 - 7:20 pm | भास्कर केन्डे
अत्ताच आयोजकांचा प्रतिसाद आला तो जशाचा तसा खाली देत आहे.
----
नमस्कार,
आणि मन:पूर्वक धन्यवाद.
मराठी विज्ञान परिषद या संस्थेच्या संकेतस्थळावर http://www.mavipamumbai.org/Adhiveshan-2011.pdf येथे ४६ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशनाची माहिती मिळू शकेल. त्यात १५ ऑक्टोबर २०११ मुदत दिली असली तरी अधिवेशन प्रतिनिधींची नोंदणी चालू आहे. आपले स्वागत आहे.
सोबत कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका पाठवित आहे. त्यात अधिवेशनातील कार्यक्रमांची माहिती अतिशय थोडक्यात दिली आहे. सर्वांना निमंत्रण.
विनय र र